महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याच्या उत्सवाला आजच्या सारखे
९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ पावले चालत आईच्या नावे जोगवा मागून आणि दशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करून शमीच्या वृक्षाची पूजा करत. आणि आपटयाची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची पौराणिक काळापासून प्रचारात असलेली परंपरा पाळून दसरा व्ययक्तिक पातळीवर साजरा केला जात असे. दशमीच्या दिवशी मुले वह्या पुस्तकांची पूजा करत. याचा दिवशी शेतकरी धान्याची , शेती अवजारांची पूजा करत तर ज्यांच्या कडे वारसाहक्काने आलेली शस्त्रे बंदूक,तलवारी असत ते शस्त्र पूजन करत. असा साधा घरगुती हा उत्सव होता. म्हैसूर चा राजेशाही उत्सव, बंगालमधील उत्सवांचा उत्सव म्हणजे दुर्गापूजा आणि गुजरातने नवरात्राला घट माथ्यावर घेऊन मुली गाणी गात गात घरोघर जात असत. हे फक्त ऐकून होते.या उत्सवाला आजच्या सारखे बाजारू स्वरूप आले नव्हते.
TV आला आणि हा नऊ दीवस चालणारा घरगुती उत्सव सार्वजनिक होवून त्याचे रुपांतर व्यवसायात धंद्यात झाले. आणि मग गुजराथचा दांडियाने भारतभरच्या तरुणाईला कधी झपाटले हे समजलेच नाही.त्याच बरोबर बंगाल मधील सार्वजनिक दुर्गापूजा सारख्या भारतभर मोठमोठ्या दुर्गा मुर्ती गणपतीच्या मुर्ती सारख्या मंबई पासून खेडोपाडी च्या चोंका चोंकात बसवल्या जावू लागल्या. गणपती झाले की पैसा कमावण्याचे नवे साधन निर्माण झाल्या मुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घरगुती वस्तू पासून गुटका सिगारेट च्या जाहिरातीचे फलक लावत धंदा वाढवण्याची संधी साधली.
त्याच बरोबर देवीच्या मूर्ती मागील मंडपात गणपती प्रमाणेच पत्त्यांचे डाव रंगू लागले. ऐच्छिक असलेल्या वर्गणीचे सक्तीचा खंडणीत कधी रुपांतर झाले हे समजलेच नाही. या सक्तीच्या वर्गणी मुळे समाज नाराज झाला पण सगळ्या संवेदना बधिर झाल्यात "तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करायचा" अजुन काय?..... असा विचार करत तो गप्प रहाणे पसंद करू लागला. हजारो लाखो पासून करोडो पर्यंत ही उलाढाल पोहोंचली , आणि हे पाहून राजकारण्यांनी यात उडी घेतली . गावोगावचे आमदार नगरसेवकांनी सुद्धा देवी मंडळ सुरु केलीत. मग गणपतीच्या उंच मूर्ती प्रमाणे देवीच्या सुद्धा मोठमोठ्या मुरत्या उभ्या राहू लागल्या. देवी समोरील सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चा वादविवाद स्पर्धा कधीच बाद झाल्यात . त्यांची जागा हीन पातळीवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमात झाली. देवीच्या समोर मनोरंजनाच्या नावा खाली बाजारू फिल्मी तारे-तारिका विक्षिप्त गाणी म्हणत अंग वेडे वाकडे करत नाचू लागली. या सर्व प्रकाराला विरोध नाही,पण कोणत्या ठिकाणी काय करावे याचे सामाजिक भान उरले नाही .ही खंत सर्वांनाच आहे.
सार्वजनिक मोकळ्या जागा कमी आणि उत्सवी मंडळे मोठ्या प्रमाणात . या मुळे मग हा १० दिवसाचा उत्सव बेकायदेशीर पणे रस्ता बंद करून राजरोस विजेच्या तारेवर आकडे टाकून बेकायदेशीर पणे वीज चोरून लाईट च्या प्रकाशात वेळेचे बंधन न पाळता मध्य रात्री पर्यंत चालू लागला . धर्माच्या नावा खाली चाललेल्या पैश्याच्या खंडणी पासून ते साजरा करण्याची सर्वच बेकायदेशीर कृत्ये प्रशासन हताशपणे पाहत बसण्या पेक्षा कांहींच करू शकत नव्हता.
या सर्व गोंधळात समाजसेवक, विचारवंत मात्र दांडिया उत्सव नंतर ३-४ महिन्यांनी वयस्कर स्त्रीयांच्या , अल्पवयीन मुलींच्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे होणाऱ्या गर्भपाता मुळे चिंतित होवू लागले पण गरबा रास दांडियाच्या ढोलताश्याच्या आवाजात हा क्षीण आवाज आवाज दबून गेला. गणेश उत्सवात फक्त पर्यावरणाचे तीन तेरा वाजत होते.पण या गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही. उपभोगवादी पुरुष संस्कृतीचा हा अत्त्याचार स्त्रिया सीता द्रोपती पासून युगानयुगे सहन करत आहे.
To: thanthanpal parbhanikar
Comments
थोडे पटले नाही.
वरील काही परिच्छेद ठीक किंवा त्यातले बरेचसे पटणारेही आहे पण
पुरे!!!! गरबा दांडियाच्यावेळी बायकांना धरून बांधून आणून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत असे तर म्हणायचे नाही ना ठठपांना? जिथे बायका पुरूष दोन्ही राजी आहेत तेथे कोणाला काय सोयरसूतक असणार.
टाळ्या...सॉरी दांडिया दोन्ही बाजूंनी पिटल्या तरच आवाज येतो. विशेषतः गरबे-दांडियांना हे उदाहरण चपखल आहे.
असो. गणेशोत्सव आला की ध्वनीप्रदूषण आणि नवरात्रींच्या वेळी गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही.
अवांतरः
द्रौपती नाही. द्रौपदी असे लिहा.
द्रौपदीपासून अत्याचार?
अहो पाच दिवस काम आणि दोन दिवस सुटी ही आयटीमधली पद्धत द्रौपदीपासूनच रूढ झाली. याला अत्याचार कसे म्हणायचे बॉ?
माननीय द्रौपदी मॅडम, कुठल्या आयटी कंपनी मध्ये कामाला होत्या
माननीय द्रौपदी मॅडम, कुठल्या आयटी कंपनी मध्ये कामाला होत्या ?
कंपनीचे नाव
इंद्रप्रस्थ टेक्नॉलॉजीज्
आणि मग वास्तवाचे चटके बसले की बदनामीच्या भीतीने
जिथे बायका पुरूष दोन्ही राजी आहेत तेथे कोणाला काय सोयरसूतक असणार. बायकांना धरून बांधून आणून त्यांच्यावर बलात्कार होत आहेत असे तर म्हणायचे नाही ना ठठपांना?
जर दोघे जण राजीखुशी ने सर्व करत असतील तर या उत्सवा नंतर गर्भपात का मोठ्या प्रमाणात होतात . स्त्रीवर बलात्कार करण्यासाठी पकडून आणण्याची गरज नाही. उंची भेटी दिल्या की हुरळून जावून स्त्रिया भान हरपतात. आणि वास्तवाचे चटके बसले की बदनामीच्या भीतीने मग सारवासारवी करतात . सीतेला सुद्धा लक्ष्मणाने संकटाची कल्पना देऊनही सोनेरी हरणाचा मोह आवरला नाही. आणि नंतरचे रामायण झाले.
thanthanpal.blogspot.com
संबंध काय?
गर्भपात लग्न झालेली जोडपीही करवून घेतात. कारणे वेगळी असतील. नवरात्रीनंतर जर गर्भपात होत असतील तर ते अब्रू वाचवण्यासाठी. त्याने अब्रूचे धिंडवडे कसे निघतील?
उंची भेटींचे आणि दांडियाचा नक्की संबंध कसा? उंची भेटी वर्षभर कधीही देता येतील. वास्तवाचे चटके बसणे, सारवासारवी करणे वगैरेंतून स्त्रियाही अशा प्रकारांना तेवढ्याच जबाबदार आहेत असे वाटते. उगीच त्यांच्या अब्रूच्या नावाने गळे काढणे नको.
हे सत्य मात्र मला कळले
गणेशोत्सव आला की ध्वनीप्रदूषण आणि नवरात्रींच्या वेळी गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही.
दुवे दिले असते तर बरे झाले असते. कारण जुने काय लिहिले हे मला माहित नाही. कारण मी ५-६ महिन्या पासूनच लिहित आहे. आणि गेल्या ५-६ महिन्यात नवीन सदस्याने चर्चा सुरु केली की चर्चेचे मुद्दे भलती कडेच वळवली जातात . हे सत्य मात्र मला कळले
thanthanpal.blogspot.com
असे नसावे
इथे अनेक सदस्य लिहितात. त्या सर्वांच्याच चर्चा वेगळीकडे वळवल्या जात नाहीत. काही चर्चा अनवधानाने किंवा इतर काही महत्त्वाचे मुद्दे आल्याने इतरत्र वळतात. त्यांना अनेकांची ना नसते.
परंतु आपल्या चर्चा जर सातत्याने इतरत्र वळत असतील तर आपल्या चर्चाप्रस्तावाशी लोक स्वतःला जोडून घेऊ शकत नाहीत (कनेक्ट होत नाहीत) याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. लेखात येणारा बटबटीतपणा, गचाळ लेखन वगैरे बाबी जर लोकांचे लक्ष तेथेच खिळवून ठेवत असतील तर तो अपराध आपला आहे, मिश्टर ठणठणपाळ.
मध्यंतरी जेव्हा आपण लेखनात बदल करून व्यवस्थित शब्दांत लेख लिहिला होता तेव्हा सदस्यांनी आपले अभिनंदन करून लेखावरच चर्चा केल्याचे आठवते परंतु त्यांचे अभिनंदन क्षणिक असेल तर काय उपयोग?
दुवे
मी आपणस दुवे पुरावा मगितला तर तो न देता आपण परत चर्चाप्रस्तावाशी स्वतःला जोडून घेऊ शकत नाहीत. बाकी भारुड लावत आहात .
दुवे दिले असते तर बरे झाले असते
दुवे शोधा
आपण काय इथले राजे आहात की आपण लोकांना काहीही बोलावे आणि नंतर हे द्या अशी आज्ञा करावी आणि लोकांनी ती पाळावी? तुम्ही दुवे द्या सांगितले की मी द्यावेत असे काही नाही. दुवे हवे असतील तर डावीकडे गूगल शोध आहे त्यावर शोधा.
भारूड मी लावले नाही आपणच आपल्या प्रतिसादात आपल्याला सत्य काय आहे ते कळले आहे असे लिहिले आहे त्यावर प्रतिसाद लिहिला होता. तो वाचून आपण घूमजाव कराल ही अपेक्षा होतीच.
आपण गेली ३-४ वर्षे असे म्हणतात असेच समजावे लागेल.
गर्भपातावरचे लेख मराठी संकेतस्थळांवर गेली ३-४ वर्षे वाचून काही नावीन्य राहीलेले नाही. हा दावा आपणच केला होता. आणि जर आपण ३-४ वर्ह वाचत असाल तर दुवा LINK देण्यास कांहींच हरकत नाही. फक्त चर्चे चे महत्व कमी करण्यासाठी आपण गेली ३-४ वर्षे असे म्हणतात असेच समजावे लागेल.
thanthanpal.blogspot.com
सुविधा वापरा
अर्थातच.
मी गूगल शोधचा पर्याय सांगितला आहे. त्याचा वापर करा. मी दुवे दिले तरी तोच पर्याय वापरून करेन.
गुगल शोध वर विषय दिसला नाही.
मला तरी नवरात्रोत्सव आणि गर्भपात अश्या आशयाचा गुगल शोध वर विषय दिसला नाही. LINK नसेल तर तसे सांगणे. म्हणजे विषय बंद करता येईल.
हाहाहा! मिश्टर ठणठणपाळ खोटं बोलू नका..... (ठणूश्टाईल)
आश्चर्य आहे आपल्याला शोधता येत नसेल किंवा हा जर आपला कावा मला कामास लावण्याचा असेल तर तो मी हाणून पाडेनच. पुन्हा शोधा. अन्यथा, आपल्याला शोधता येत नाही हे मान्य करा.
दुवा नाही, पण संदर्भ देतो..
मी ३ वर्षांपूर्वी माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील स्नेह्यांकडून ही गोष्ट ऐकली होती. त्यांनी अर्थातच वैद्यकीय नीतिमत्तेला जागून फार तपशील उघड केला नव्हता, पण एवढेच निरीक्षण नोंदवले होते, की 'ज्या गोष्टीत उच्चभ्रू वर्गाला फारसे वावगे वाटत नव्हते ते आता मध्यमवर्गीय समाजातही झिरपू लागले आहे.'
लोकसत्ताच्या शनिवारच्या महिलांसाठीच्या चतुरंग पुरवणीत वासंती दामले यांचा एक लेख पान २ वर टॉप लेफ्टला प्रसिद्ध झाला होता. त्यात यासंदर्भातील उल्लेख होता. (अंकाची नक्की तारीख आठवत नाही. वर्ष-दीड वर्षापूर्वीचा असावा)
दुवेही आहेत
अहो दुवेही भरपूर आहेत. ठणठणपाळ उगीच खोटे बोलत आहेत पण त्यांना अशा बातम्या वाचण्यात फार उत्सुकता असावी कारण ते फारच मागे लागले आहेत दुवे द्या, लिंक द्या वगैरे म्हणून त्यांना आणखी एक क्लू.
मिसळपाववर विनायक प्रभू :-) यांनी आय-पील असा लेख २००८ साली टाकून भरपूर प्रतिसाद मिळवला होता. ठणूंना शोधता येईलच.
मान्य
अन्यथा, आपल्याला शोधता येत नाही हे मान्य करा.
मान्य !!!! दुवा पाठवा
हा दुवा तुम्हाला खूप आवडेल. अगदी तुम्हाला शोभेल असा आहे.
हा घ्या. सनातन प्रभातचा दुवा. बाकी स्वतः थोडे कष्ट घ्या. महाराष्ट्रटाईम्स, लोकसत्तेतले दुवे शोधा.
दैनिक .सनातन
दैनिक .सनातन
दैनिक .सनातन .ऑर्ग हे तर हिंदू धर्म प्रचारा करता खास वाहिलेले खास मासिक आहे .ते बातम्या म्हणून देणारच. सामान्य माणसाने लिहिलेला तो लेख नाही.
संबंध काय?
सामान्य माणसाने लिहिला न लिहिला याचा संबंध काय? माझे मूळ वाक्य बघा मी त्यात तसे काही नमूद केलेले नाही. मराठी संकेतस्थळांवर असे लेख आहेत एवढेच म्हटले आहे तेव्हा उगीच नाही ती खुसपटे काढू नका.
हे माझे मूळ वाक्य -
तेव्हा वरचे लेख डॉ.आठवल्यांनी लिहिले, ठठपा की प्रतिभाताई पाटलांनी हा मुद्दा नाहीच.
उपक्रमावर अश्या विषयावर..............
उपक्रमावर अश्या विषयावर लेख या आधी कधी प्रकाशित झाला होता त्याचा दुवा भेटेल काय ?
पुरे हं!
तुम्ही विचारणार मी दुवे देणार हा खेळ आता पुरे करू या. मला जे सांगायचे ते मी सांगितले आहे. संदर्भ दिले आहेत. आता सामान्य माणसाचा लेख दाखवा , बटबटीत लेख दाखवा, अप्रमाण मराठीतील लेख दाखवा वगैरेंमध्ये मला इंटरेष्ट नाही आणि वेळही नाही.
उपक्रमावर जे हवे ते तुम्हीच शोधा.
उपक्रमावर या विषयावर कोणता ही लेख दिसला नाही
उपक्रम सुरु झाल्या पासूनच्या दिवसा पासून ते माझा लेख प्रसिद्ध होण्याच्या दिवसापर्यंत मी उपक्रमाचे संपूर्ण लेखांची पाहणी केल्यावर मला उपक्रमावर या विषयावर कोणता ही लेख दिसला नाही . चला या निमित्य जुने वाद वाचावयास मिळाले हे ही कांही कमी नाही. नजरचुकीने असा लेख माझ्या पाहण्यात आला नसेल म्हणून मी आपणास विनंती केली होती. रागावू नये. ही नम्र विनंती.
गरबा, दांडियाच्या वेळी संततिप्रतिबंधक साधनं वाटावी
पहिला भाग थोडा थोडा पटला. एखाद्या प्रथेचं व्यवसायीकरण झालेलं दिसतं, तेव्हा कोणे एके काळी हे सगळं कसं छोट्या प्रमाणावर होतं, त्यामुळेच मस्त होतं असे विचार मांडले जातात. दुर्दैवाने हे विचार नेहेमी आता असल्या कार्यक्रमांत भाग न घेणाऱ्या पीढीकडून येतात, त्यामुळे त्यातलं सत्य किती व आंबट द्राक्षं किती हे कळायला मार्ग नसतो.
हे पटलं नाही, आणि विशेष आवडलंही नाही. यात वरवर बेकायदा गर्भपातावर हल्ला असला तरी आतून 'हे तरुण तरुणी भलतंसलतं काहीतरी करतात आणि त्याने समाजाची नैतिक पातळी ढासळते' यासारखं वाटतं. जर या सर्वांनी कायदेशीर गर्भपात करून घेतले तर त्याला तुमची हरकत आहे का? जर कोणी गरबा, दांडियाच्या वेळी संततिप्रतिबंधक साधनं वाटली तर तुम्ही त्याला पाठिंबा द्याल का? या दोन्हीचं उत्तर नकारार्थी असेल तर तुमचा नक्की हेतू काय ते कळेल.
मला ऐशीच्या दशकात कायदेशीर (पण चोरीछुपे) गर्भपात करून घेणाऱ्या चांगल्या घरच्या मुली माहीत आहेत. त्या आयुष्यातून वगैरे काही उठल्या नव्हत्या.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
कांहीच हरकत नाही.
कांहीच हरकत नाही. राष्ट्रकुल स्पर्धे मध्ये क्रीडाग्राम मध्ये या साधनांचा मोफत पुरवठा करण्यात आला.भोंगळ संस्कृती रक्षणा पेक्षा हे कधीही चांगले.
thanthanpal.blogspot.com
असहमत
मुद्दाम होऊन या ठिकाणी नियमनाची साधने वाटण्याची कल्पना मला पटत नाही. त्याचप्रमाणे पंढरपूरच्या यात्रेसाठी लसीकरण करविणे, अमरनाथ यात्रेला खास सैनिकी संरक्षण देणे, या कृतीही मला पटत नाहीत. हे मेळावे प्रोत्साहनास्पद वाटतात काय?
वाटावीत, स्वस्तात उपलब्ध करून द्यावीत, वगैरे
माझा मूळ उद्देश होता तो लेखकाच्या भूमिकेबद्दल खुंटा हलवून बळकट करण्याचा. त्यांनी नक्की कुठचा प्रश्न मांडला आहे (गर्भपात की अनैतिकता) हे जाणून घ्यायचं होतं. त्यांनी परवानगी असावी असं म्हटलं यातून त्यांचा अनैतिकता हा मुद्दा नसून, प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी याकडे कल दिसतो.
बाकी लसीकरणाचा मुद्दा या चर्चेत अवांतर होईल. पण समाजात राहायचं तर आपल्या अस्तित्वाचा (आपली इच्छा नसतानाही) इतरांना (संभाव्य) धोका असू शकतो - तो टाळण्यासाठी समाज काही बंधनं पाळायला सांगतो. जर रस्त्यावर गाडी चालवायची असेल तर दुसऱ्याच्या मालमत्तेला हानि झाल्यास भरून देण्यासाठी इंशुरन्स विकत घ्यावा लागतो. लसिकरण हे इन्शुरन्ससारखंच. अशी अनेक उदाहरणं आहेत, पण त्यांची चर्चा इथे अवांतर ठरेल.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
बेकायदेशीर गर्भपातामुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे कसे काय?
बेकायदेशीर गर्भपातामुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे कसे काय निघतील? गर्भपात केला नाही तर अब्रूचे धिंडवडे निघतील ना. जरा समजावून सांगावे.
हा हा हा
मला वाटतं सरकारनं दांडियावर बंदि घातली पाहिजे मला तरी हा एकच मार्ग दिसतो .हा हा हा
मत्
या गरबा रास दांडियाच्या ढोलताश्या मध्ये पर्यावरणाच्या नुकसानी बरोबरच बेकायदेशीर गर्भापता मुळे स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहे त्यां आयुष्यातून उठत आहेत . याचे कोणाला सोयरेसुतक नाही.
-----------------
गणपति मधे हे प्रकार् त्या मनाने कमी आहेत्...