भ्रष्ट्राचार मुक्त भारत !!

भ्रष्ट्राचार मुक्त भारत !! हे स्वप्न आता दूर राहिले नाही. राष्ट्रीय भ्रष्ट्राचार-विरोधी धोरण या मथळ्या खाली आज लोकसत्तेत केंद्रीय दक्षता आयोगाने एक जाहिरात दिली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने भ्रष्ट्राचार-विरोधी राष्ट्रीय धोरण तय्यार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे शासकीय धोरण निव्वळ सरकारी होवू नये म्हणून आयोगाने सर्व हितसंबधिता कडून म्हणजेच भारतीय नागरिक, सिव्हील सोसायटी,ऑर्गनायजेशनस, खाजगी व्यवसायिक,प्रसिद्धी माध्यम, राजकीय व्यक्ती, न्यायधीश, यांच्या कडून आयोगाने या मसुदा धोरणावर जनतेचा प्रतिसाद मागितला आहे. २०/०९/२०१० पर्यंत आयोग कडे आपली मते पोहोचणे आवश्यक आहे. आयोगाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. ज्या भारतीय नागरिकांना देश भ्रष्ट्राचार मुक्त भारत व्हावा असे वाटत असेल त्यांनी कृपया आपली मते, सूचना आयोग कडे आवश्य पाठवाव्यात. ही नम्र विनंती.
श्री. के. सुब्रमण्यम
ओ एस डी टु सीव्हीसी
सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशन
सतक्रता भवन आयएनए ;
नवी दिल्ली ११००२३
फोन : ०११-२४६५१०८५
e mail: subramaniam.k@nic.in

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

चांगली कल्पना, पण...

चांगली कल्पना आहे,
पण...
माहितीच्या अधिकाराप्रमाणे (जनतेच्या आयुष्याशी) खेळखंडोबा होऊ नये, एव्हढीच माफक अपेक्षा.

||वाछितो विजयी होईबा||

ढ्याण्ट्याड्याण!

ढ्याण्ट्याड्याण!

टर्रर् ...डूम्म्!!!

सोबत लोकसत्तेतील केंद्रीय दक्षता आयोगाने दिलेली जहिरात जोडली असती तर बरे झाले असते. नाही का?

 
^ वर