असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या

आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आरक्षणाविषयीची चर्चा संपणार नाही असे म्हणतात. जाऊ दे! साध्याच शैलीत लिहितो.

उपेक्षित, दुबळ्या, अन्यायग्रस्त गटांना आरक्षण देण्याची पद्धत सर्वच समाजांमध्ये असते. समाजाची कल्याणकारी मानसिकता असेल तितक्या प्रमाणात आरक्षणे देण्याविषयी उदारभाव असतो. तरीही, आरक्षणाविषयी विचार करताना उपयुक्त वाटण्याची शक्यता असलेले काही मुद्दे नोंदवितो.

काही शतके विशिष्टीकृत व्यवसाय आणि अंतर्समूह विवाह करणार्‍या समाजांमध्ये उत्क्रांतीदत्त जनुकीय वैशिष्ट्ये शिरतात. ज्यू लोकांना सावकारीव्यतिरिक्त फारसे पर्याय नसल्यामुळे त्यांची गणितात (जनुकीय) प्रगती झाली असे दावे आहेत. ज्यूंना नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता इतरांच्या ३०० पट असते. मानवी त्वचेची उत्क्रांती काही हजार वर्षांपूर्वीच झाली. चश्मा लागण्यासाठी कारणीभूत जनुके असलेल्या बालकांना कमी वयात वाचन/लेखन शिकता येते, काही शतके बैठी कामे करणार्‍या घराण्यांमध्ये अशी जनुके टिकून राहू/वाढू शकतील; घराबाहेर काम करणे आवश्यक असल्यास तशी जनुके अडचणीची ठरू शकतील. अधिक काळ शेती केलेल्या किंवा जंगलात राहणार्‍या समाजांना क्रीडाप्रकारांमध्ये अधिक यश मिळते. "ऑल मेन (अँड विमेन) आर इक्वल" हा गेल्या शतकांतील आशावाद भाबडा आहे.

अर्थात, क्षमतांच्या कमतरतेची कारणे गौण आहेत. एखादे शिक्षण किंवा नोकरी पार पाडण्याची कुवत आहे की नाही, हाच मुख्य मुद्दा आहे. येथे अनेक पोलिटिकली इन्करेक्ट (येट ट्रू) विधाने करता येतील. ठेचकाळलेला हापूस आणि रायवळ आंबा या दोन्हींची किंमत हापूसपेक्षा कमी असते. अन्यथा, बुद्धिमत्तेची जनुके असलेल्या मुलाला अपघातात मतिमंदत्व आले तरी पुढच्या इयत्तांमध्ये ढकलले गेले असते. कमकुवत उमेदवाराच्या अपयशामागे त्याचा दोष नसला (कदाचित त्या खापरपणजोबावरील अन्यायामुळे त्याला अपयश आले असेल) तरी अन्यायाचे परिमार्जन करून त्याला डॉक्टर बनविल्यास त्याच्या रुग्णांवर पुन्हा अन्यायच होणे शक्य असते. तसा अन्याय होऊ नये म्हणून "आरक्षित जागांवरील विद्यार्थी आणि अनारक्षित जागांवरील विद्यार्थी यांच्या क्षमतांमधील तफावत पुरेशी कमी होते काय?" या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आवश्यक आहे. वैयक्तिक निरीक्षणांनुसार, वैद्यकीय शिक्षणामध्ये (घोकंपट्टीला महत्व असल्यामुळे?) आरक्षित जागांवरील विद्यार्थी प्रगती करतात* पण, अभियांत्रिकी शिक्षणात (गणिताला, वैज्ञानिक दृष्टिकोनाला अधिक महत्व?) मात्र त्यांच्या गळतीचे प्रमाण खूपच अधिक असते. आयआयटी दिल्लीतून इतक्या आरक्षित विद्यार्थांना हाकलले गेले की त्या निर्णयावर जातिद्वेषाचा आरोप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

कल्याणकारी समाजाच्या रचनेत, कमी क्षमताधारींनाही सन्मानाने वागविण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही, त्यांच्या आयुष्याचा दर्जा बलवानांइतका करण्याचे ध्येयच नसते, नसावे. (येथेही अनेक पोलिटिकली इन्करेक्ट उदाहरणे देता येतील.) स्वस्त धान्यांच्या दुकानांतील धान्यांचा दर्जा, शासकीय रुग्णालयांमधील उपलब्ध औषधे, यांच्यावरून असे दिसते की सर्वोत्तम दर्जाचे जीवनमान मिळविण्यासाठी 'मदत' दिली जात नाही. संसाधनांच्या उपलब्धतेनुसार ही 'वरची मर्यादा' ठरविता येते. "आरक्षण काय केवळ झाडूवाल्यांच्या जागांसाठीच द्यायचे काय?" असा प्रश्न (बहुदा) डॉ. मुणगेकर यांनी विचारला होता असे स्मरते. सामान्य वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये आणि एम्स, आयआयटी, आयआयएम, इ. मध्ये फरक करावा असे मला वाटते.
आपत्कालीन वैद्यकीय उपचारांमध्ये 'ट्रियाज' ही एक पायरी असते. अतिगंभीर जखमींना (हताशपणे) आणि किरको़ळ जखमींना (निर्धास्तपणे) केवळ वेदनाशामक औषधे देऊन मध्यम प्रतीच्या जखमा झालेल्यांवर तातडीचे उपचार केले जातात. एखाद्या अतिगरजूला अतिविशिष्ट उपचार देण्याच्या खर्चात/वेळेत अनेक कमी-गरजूंना मदत करता येते.

* मी जमविलेली माहिती:
ज. जी. रुग्णालय आणि ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयातून २००४ साली एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थांची काही माहिती मी जमविली होती. एमबीबीएस तृतीय वर्ष भाग २ या परीक्षेच्या गुणांनुसार त्यांची क्रमवारी पुढीलप्रमाणे होती.

क्रमगट अनारक्षित समाज इ. मा. व. अनु. जा. अनु. ज. भ. ज. वि. जा. माहिती सापडली नाही
01 to 20 17 1 1 0 1 0 0
21 to 40 15 4 1 0 0 0 0
41 to 60 14 3 1 0 1 1 0
61 to 80 10 7 3 0 0 0 0
81 to 100 12 4 2 0 1 1 0
101 to 120 11 4 3 1 0 1 0
121 to 140 5 7 3 0 4 1 0
141 to 160 6 5 1 0 0 0 8
161 to 180 11 0 3 0 2 0 4
181 to 192 1 2 1 0 0 0 8

गृहीतक**: १९९९ साली आरक्षित समाजांच्या सर्वच उमेदवारांनी आरक्षित जागांवरून प्रवेश घेतला होता.
निष्कर्ष: संधी मिळाल्यास आरक्षित विद्यार्थी काही प्रमाणात प्रगती करतात.
हा निष्कर्ष फसवा असल्याचे ठरवू शकणार्‍या काही परिस्थिती (कन्फाउंडर्स):

  • अपुर्‍या आकाराचे आत्त
  • आकडे जमविण्यात माझ्याकडून गफलती होणे
  • ** आरक्षित समाजांतील काही उमेदवारांनी अनारक्षित (=उच्च) जागांवरून प्रवेश घेतला होता (संख्या अनुपलब्ध). (त्या उमेदवारांचा 'तसा' उद्देश नसतो. उमेदवारांना निवडपर्याय दिलेच जात नाहीत. विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी आरक्षित (७०%) जागा वापरून मला प्रवेश देणे शक्य होते परंतु माझ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुली (३०%) जागा वापरली गेली. मला प्रवेश देणार्‍या कर्मचार्‍याला विदर्भ/मराठवाडाद्वेष्टा ठरवावे काय?)
  • २००३ साली अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी येथे गणले जाणे (संख्या अनुपलब्ध). त्यांना अभ्यासासाठी दोन वर्षे वेळ मिळाला.
  • निवड परीक्षांमध्ये डॉक्टर बनण्याची कुवत (=अंतिम परीक्षेतील यश?) तपासलीच जात नाही. धावणे/चित्रकला/चमचालिंबू स्पर्धा आयोजित करून, त्यांच्या विजेत्यांना वैद्यकीय शिक्षणात प्रवेश दिल्यास तेही पुरेसे चांगले डॉक्टर बनतील काय? तृतीय वर्ष भाग २ या परीक्षेतील यशाचा वीस वर्षांनंतरच्या आर्थिक परिस्थितीशी किंवा २०० वर्षांनंतरच्या सन्मानाशी संबंध असतो काय? नोकरी किंवा शिक्षणासाठी नेमकी किती कुवत आवश्यक असते, नाकारल्या गेलेल्या सर्वोत्तम उमेदवाराची कुवत त्यापेक्षा अधिक नसते काय, इ. प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नसुद्धा आवश्यक आहे.
  • आरक्षित जागांवरील काही विद्यार्थी अंतिम वर्षापर्यंत पोहोचलेच नसणे (आयआयटी दिल्ली प्रमाणे) शक्य आहे.

बहुतेक मजकूर इतरत्र पूर्वप्रकाशित आहे.

Comments

खुलासे

मग कुवत नसते हा निष्कर्ष कसा काढला?

ती शक्यता मोठी वाटते.

इंग्रज गेल्यावर त्यावेळी जे शिक्षण क्षेत्रात होते त्यांच्या हाती बाय डिफॉल्ट सूत्रे आली. यात संशय कोणता आहे?

ज्या काळात 'प्रगती नव्हती' असा तुमचा दावा आहे त्याही काळात ते शिक्षणक्षेत्रात अधिक होते हे प्रगतीचेच लक्षण नाही काय? त्याला बाय डीफॉल्ट म्हणावे का प्रगतीमुळे प्राप्त?

मग जनुकीय वैशिष्ट्यांचा दावा करायला आधार काय आहे?

समजले नाही.

एवढा काल जनुकीय वैशिष्ट्ये निर्माण व्हायला पुरेसा नसावा असे माझे मत आहे. काही कौशल्ये सवयीने चांगली जमतात हे खरे पण त्यात जनुकीय वैशिष्ट्य काही नसते. ऍबिलिटीत फरक असतो हे खरे पण त्यात जातीविषयक वैशिष्ट्य नसते असे वाटते.

ज्यूंचे उदाहरण मान्य नाही काय?

बालपणापासून तिखटजाळ जेवणार्‍यांना त्याची
सवय होते पण त्यांचे मूल जन्मतः तिखट सहन करण्याची शक्ती घेऊन येत नाही.

नक्की?

अशीच रॅशनल आरक्षण देण्याच्या मागे होती.

त्यात रॅशनॅलिटी (विवेक) काय आहे?

' आपणच' या शब्दात ब्राह्मण फक्त नसून सर्व उच्चवर्गीय आहेत. म्हणूनच उच्चवर्गीयांपैकी शिक्षणात पुढे नसलेल्यांनीही स्वतःला आरक्षण घेतले नाही.

अशी अपराधी भावना बाळगणे बालिश आहे.

नाही. कुवत तात्पुरती कमी किंवा तसे प्रतिपादन वगैरे नसून कुवत उच्च असली (आणि ती सिद्ध केली असली) तरी त्याला कमी लेखण्याचे (कुवतीपेक्षा जात महत्त्वाची असल्याचे दाखवण्याचे) उदाहरण आहे.

तसे नाही, प्रवेश नाकारणारे लोक प्रतिपादन करतात की त्या लोकांना कुवत नाही. या उपेक्षेला परिस्थितीजन्य हँडिकॅपचाच एक प्रकार म्हणता येईल.

उच्च वर्णीय कसे सातावतात त्रास देतात हे इतर वाचकांनी आपणास प्रति

अर्थात, क्षमतांच्या कमतरतेची कारणे गौण आहेत. ही कारणे गौण का? हे एखादे शिक्षण किंवा नोकरी पार पाडण्याची कुवत आहे की नाही, हाच मुख्य मुद्दा आहे. या मुद्या आडून आपणास आपणास काय सुचवायचे? अशी कुवत फक्त एखाद्या समाजातच असते का? या समाजातील बालकाला इतर समाजात जेथे कोणत्याही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत अश्या ठिकाणी लहानपणा पासून वाढवले तरी ते बालक त्याचा जन्मजात गुणा मुळे उच्च श्रेणीतच पास होईल असे आपणास म्हणावयाचे का? ठेचकाळलेला हापूस आणि रायवळ आंबा या दोन्हींची किंमत हापूसपेक्षा कमी असते.हे मान्य. पण हा नियम मानव जातीला लागू होत नाही .संपूर्ण मानव जातीच्या रक्ताचा रंग लालच असतो त्यात फरक करण्याची गरज नाही. मानव जातीत हा फरक केवळ स्वताचा मोठेपणा कायम राहावा म्हणून केला गेला. तरी अन्यायाचे परिमार्जन करून त्याला डॉक्टर बनविल्यास त्याच्या रुग्णांवर पुन्हा अन्यायच होणे शक्य असते. अरे वा जसे कांही हुशार समजल्या जाणाऱ्या समाजातील मुले डॉक्टर झाली तर रुग्णांवर अन्याय करतच नाही असे आपणास म्हणायचे का? उलट ही मुले शिक्षण झाले की पैशाच्या लोभाने मातृभूमीचे, समाजाचे उपकार विसरून परदेशी पळून जातात.हे सत्य आहे. जन्मजात कोणी हुशार किंवा बुद्धू नसतो. जशी सामाजिक,आर्थिक परिस्थिती असते तसे ते बालक घडत जाते . आणि समाजात अतिशय असमानता असल्या मुले ज्यांची सामाजिक परिस्थिती खालावलेली आहे त्यांना आरक्षण देणे म्हणजे भिक नाही. तो त्यांचा हक्क आहे. आणि आज आरक्षित आणि अनाआराक्षी जागांच्या मार्क्स मध्ये जास्त फरक नाही.उच्च वर्णीय कसे सातावतात त्रास देतात हे इतर वाचकांनी आपणास प्रतिक्रियेत सांगितले आहे मी IIT बद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही.

खुलासा

ही कारणे गौण का?

अन्यायामुळे कुवत नसो किंवा स्वत:च्या दोषांमुळे, पण कुवत नसलेल्याला डॉक्टर केले तर तो रुग्णांवर अन्याय आहे.

या मुद्या आडून आपणास आपणास काय सुचवायचे?

कै नै!

अशी कुवत फक्त एखाद्या समाजातच असते का? या समाजातील बालकाला इतर समाजात जेथे कोणत्याही शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत अश्या ठिकाणी लहानपणा पासून वाढवले तरी ते बालक त्याचा जन्मजात गुणा मुळे उच्च श्रेणीतच पास होईल असे आपणास म्हणावयाचे का?

नाही.

पण हा नियम मानव जातीला लागू होत नाही .संपूर्ण मानव जातीच्या रक्ताचा रंग लालच असतो त्यात फरक करण्याची गरज नाही. मानव जातीत हा फरक केवळ स्वताचा मोठेपणा कायम राहावा म्हणून केला गेला.

थोडे फरक सत्य आहेत, थोडे फरक वर्चस्व टिकविण्यासाठी प्रतिपादिले गेले.

अरे वा जसे कांही हुशार समजल्या जाणाऱ्या समाजातील मुले डॉक्टर झाली तर रुग्णांवर अन्याय करतच नाही असे आपणास म्हणायचे का? उलट ही मुले शिक्षण झाले की पैशाच्या लोभाने मातृभूमीचे, समाजाचे उपकार विसरून परदेशी पळून जातात.हे सत्य आहे.

तो अन्याय ती व्यक्ती, स्वत:च्या इच्छेने करते, त्याबद्दल नियम, कायदे असतात. उपेक्षेमुळे/त्रासामुळे/परिस्थितीमुळे कुवत नसो किंवा जनुकांमुळे, पण कुवत नसलेल्याला डॉक्टर केले तर सरकारतर्फे रुग्णांवर अन्याय होतो, त्या व्यक्तीचा दोष नाही. रुग्णांवरील सर्वच अन्याय टाळले पाहिजेत. उमेदवारांची उपेक्षा, त्रास, परिस्थिती, या अन्यायांविरुद्ध कायदे असतात, आरक्षणे असतात. ते कायदे काही वेळा पाळले जात नाहीत हेही मान्य आहे.
खरा महत्वाचा प्रश्न आहे की आरक्षण मिळाल्यामुळे कुवत नसलेल्यांना कुवत पूर्ववत करणे शक्य असते काय? ते काही प्रमाणात शक्य असते असे माझे मत आहे.

जन्मजात कोणी हुशार किंवा बुद्धू नसतो. जशी सामाजिक,आर्थिक परिस्थिती असते तसे ते बालक घडत जाते.

दोन्ही घटक असतात.

समाजात अतिशय असमानता असल्या मुले ज्यांची सामाजिक परिस्थिती खालावलेली आहे त्यांना आरक्षण देणे म्हणजे भिक नाही. तो त्यांचा हक्क आहे.

का? ती भीकच आहे. स्वस्त धान्य, सरकारी रुग्णालयातील उपचार, खतांवर सबसिडी, आयकरात सूट (नोकरी करणार्‍यांनाही ती मिळते), या सर्व भिकाच आहेत.

आज आरक्षित आणि अनाआराक्षी जागांच्या मार्क्स मध्ये जास्त फरक नाही.

मग आरक्षण जास्त आवश्यक नाही.

उच्च वर्णीय कसे सातावतात त्रास देतात हे इतर वाचकांनी आपणास प्रतिक्रियेत सांगितले आहे मी IIT बद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही.

तेही एक कारण आहे.

हा ही निष्कर्ष

प्रवेश मिळुनही काही अनारक्षित विद्यार्थी प्रगती करतांना दिसत नाहीत- हा ही निष्कर्ष काढता येइल.

मान्यच

म्हणजेच, "तुलनेने, आरक्षित विद्यार्थी कमतरता भरून काढतात".

म्युच्युअली एक्स्ल्युझिव्ह

असा हा म्युच्युअली एक्स्ल्युझिव्ह नियम आहे असे मला वाटत नाही.

टक्केवारी

जो निष्कर्ष कढायचा आहे / काढला आहे त्यासाठी तक्ता निरूपयोगी वाटतो. "एमबीबीएस तृतीय वर्ष" यात उरलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक गटातील विद्यार्थी किती विद्यार्थी परिक्षेला बसले हे माहित असणे फार गरजेचे आहे त्यावरून उत्तीर्णांचे प्रमाण (टक्केवारी) काढता यावी. ती टक्केवारी मिळाल्याशिवाय हे आकडे फारसे उपयोगाचे वाटत नाहीत

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

काळी पेटी

१९९९ मधील प्रवेश परीक्षा आणि २००४ मधील अंतिम परीक्षा या दोन बिंदूंमधील काळाला ब्लॅक बॉक्स मानून विचार करता येतो.

समजा

नाही तसं नाही समजा अनारक्षित गटात २५ जागा आहेत. आरक्षित विभागातील एखाद्या गटासाठी ३ जागा आहेत. व अनारक्षित विभागात २५ पैकी १४ उत्तीर्ण झाले व त्या आरक्षित गटातील तीघेही उत्तीर्ण झाले हा विदा वरील तक्ता देत नाही. जर असे असेल तर इथे आरक्षितांची प्रगती तुलनेने अतिशय लक्षणीय ठरावी.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

तरीही

गृहितक असे आहे की अनारक्षित जागेवरून आरक्षित समाजाच्या एकाही विद्यार्थाने प्रवेश घेतला नाही. तशा परिस्थितीत जर एकाही अनारक्षित समाजाच्या विद्यार्थापेक्षा आरक्षित समाजाच्या विद्यार्थ्याला अधिक गुण असतील तर ती प्रगतीच ठरते.

आरक्षण केवळ वंचिताला हवे...

ज्या व्यक्तीला अथवा समाजाला आजवर कधीही आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही, तसेच खरोखर आर्थिक दुर्बल याच घटकांना केवळ एका पिढीपुरते आरक्षण द्यावे. बाकीच्या सर्वांचे आरक्षण रद्द करावे आणि सगळ्यांनाच खुल्या प्रवर्गातून स्पर्धा करायला लावावी. काही उदाहरणे अशीही बघायला मिळतात की लोक धर्मांतरित म्हणून मिरवतात, मूळच्या धर्मावर जहरी भाषेत टीका करतात आणि नोकरी-शिक्षणात सवलती व राखीव जागा मिळवायची वेळ आली की कागदोपत्री मात्र मूळ धर्मातील जातच लावतात. माझा एक मित्र डॉक्टर होईपर्यंत आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र सादर करत होता, प्रत्यक्षात घरी व्यापार होता. कधी विचारले तर म्हणायचा, 'अरे हेच तर आमचे व्यापारी डोके असते बाबा'. राजकारणात भरपूर माया जमवलेल्या, तसेच क्रिमी लेयरना कशाला पाहिजे आरक्षण?

हाच तर कळीचा मुद्दा

कॅटॅगरीतील मुलाने खुल्या जागेतील कोट्यातुन प्रवेश घेतला तर हा आमची जागा कमी करतो असे म्हणणारा गट देखील आहे. वस्तुतः तो आता सक्षम झाल्याने आरक्षण ही सवलत म्हणा कुबड्या म्हणा ही त्याने टाकून दिली आहे. आरक्षणाचा खरा हेतु तोच तर आहे ना? वर येण्यासाठी मदतीचा दिलेला एक हात.
प्रकाश घाटपांडे

सहमत आहे!

सहमत आहे!

आपण सुद्धा सरकार कडून कशी भिक घेतात हे मला सांगावे लागले

'आपण सरकार कडून कशी भिक घेतात हे मला सांगावे लागले.' by thanthanpal मला वाटलेच होते आपण हा मुद्दा उपस्थित करून आरक्षण नको असे म्हणणार . ते ज्या सामाजिक,आर्थिक ,
कोटुंबिक हालात शिक्षण घेतात ते पाहता त्यांचे हे ८०% मार्क्स १०० पेकी १०० असतात. यात वाद नाही. आणि आपण म्हणता त्या प्रमाणे आरक्षण भिकच आहे असे मानले तर शासन घरगुती गस ला जी २५०-३५० रुपयाची सबसिडी देवून नुकसानीत जनतेला गस पुरवठा करते आणि आपण ती वापरता ती सुद्धा भिकच आहे. सरकारी मेडिकल . इंजिनिअर, आणि इतर उच्च शैक्षणिक कॉलेज मध्ये अत्यंत नाममात्र फी आकारून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते त्यात आपली मुले शिकतात ती सुद्धा भिकच आहे. आपण कधी म्हणतो का की माझ्या जवळ भरपूर पैसा आहे , मी सरकारला जेव्हढा खर्च येतो तेव्हढी अधिक फीस भरण्यास तय्यार आहे.गेली शतकानुशतके ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना थोड्या सवलती मिळाल्या की आपले पोट दुखते यामुळे आपण सुद्धा सरकार कडून कशी भिक घेतात हे मला सांगावे लागले

सहमत

सैपाकाचा गॅस आणि उच्चशिक्षण यांसाठी मिळणारी सवलत हीसुद्धा भिकेचीच उदाहरणे आहेत.

तुच्छता

भिक या शब्दात तुच्छता वाटते. 'सवलत' या शब्दात परिमार्जन करण्यासाठी देउ केलेली मदत असा भावार्थ दडलेला आहे.
आरक्षण नसते तर तळागाळातील समाज कधीच वरती आला नसता.
प्रकाश घाटपांडे

तुच्छता

भिक या शब्दात तुच्छता वाटते.

तोच तर हेतू असावा. आरक्षण घेणार्‍या समाजाचा अपमान करण्याची यापेक्षा बरी संधी मिळणार नाही असे वाटते. आरक्षणाला भीक मानणे म्हणजे आईला भूक लागली म्हटल्यावर आई नाराजीने का होईना पण उठून जेवण करते आणि मुलासमोर ठेवते त्यालाही भीक म्हणण्यासारखे आहे.

बाकी, आरक्षण - जातपात या न संपणार्‍या गोष्टी आहेत.

जनुकांचा मुद्दा मान्य आहे.

+१

आरक्षणाला भीक मानणे म्हणजे आईला भूक लागली म्हटल्यावर आई नाराजीने का होईना पण उठून जेवण करते आणि मुलासमोर ठेवते त्यालाही भीक म्हणण्यासारखे आहे.

असेच म्हणते.

पुढील प्रश्न रिकामटेकडा यांना किंवा ज्यांना यातील अधिक माहिती आहे त्यांना -
जनुकांचा मुद्दा मला कळलेला नाही.
बुद्धिमत्तेची जनुके कशी असतात? किंबहुना बुद्धी कशाला म्हणतात?
मेंदूला आलेले सिग्नल इंटरप्रीट कसे होतात, पुढील क्रिया काय असावी ह्याचा निर्णय मेंदू घेत असावा, पण हे जनुकांवर कसे अवलंबून असते? लोकांच्या जनुकांमध्ये असे काही सिग्नेचर पॅटर्न दिसले आहेत का जे इंटरप्रीटेशन इ. क्रियांशी संबंधित आहेत? मला हे कोणी समजावले तर हवे आहे.

या विषयात मी तशी ढ असल्याने सध्या नुसते ऐकून घेते.

जनुके

प्रत्येक मज्जापेशीने इतर मज्जापेशींशी केलेल्या जोडण्यांची संख्या/रचना, मज्जातंतूंमधील संदेशवहनाचा वेग (स्पायडरमॅनला सिक्स्थ सेन्स येतो तसे काहीसे), मज्जापेशींची संख्या, आयुष्य, संप्रेरकांचा मज्जापेशींवर होणारा परिणाम, मेंदूला मिळणारा रक्तपुरवठा, इ. अनेक घटकांवर जनुकीय परिणाम होऊ शकतात.
चिंपांझी आणि मानव यांच्यादरम्यान केवळ २-३% जनुकीय फरक असतात. आंतरवंशीय फरक ०.३% असतात. आंतरजातीय फरक असण्यात अशक्य काय?

अशक्य काहीच नाही

शारिरीक घडणीत फरक असण्यात अशक्य काहीच नाही, असावेच. पण हे फरक वेगळ्या जातींमधील व्यक्तींना होणारे एकाच परिस्थितीचे/प्रॉब्लेमचे आकलन - त्या परिस्थितीचे योग्य ईंटरप्रीटेशन - त्या अनुषंगाने करण्याची कृती - कॉंप्लेक्सिटी कळण्याची क्षमता असे सगळे वेगवेगळे असते हे आपण ज्याला बुद्धिमत्तेची अंगे म्हणू शकू, अशा पातळीवर जाऊन सिद्ध झाले आहेत का?

सध्याची परिक्षापद्धती ही पातळी मोजण्यास उपयुक्त नाही. (मला वाटते हा मुद्दा वरही कुठेतरी आलेला आहे).

अगदीच तसे नसावे

आरक्षण घेणार्‍या समाजाचा अपमान करण्याची यापेक्षा बरी संधी मिळणार नाही असे वाटते.

आरक्षणाचा गैरफायदा घेणार्‍या लोकांना डिवचण्यासाठी देखील कुबड्या भीक असे शब्दप्रयोग वापरुन अस्मिता दुखावण्याचा प्रयत्न व्यकिगत प्रतिक्रियेत दिला जातो. लेखात आरक्षण हे तत्वतः मान्यच आहे असा भावार्थ आहे. त्यामुळे अगदीच तसे नसावे.
आरक्षण अमान्य असणार्‍यांचा गट वेगळाच आहे.
प्रकाश घाटपांडे

असहमत

गैरफायदा घेणारे लोक सर्वच क्षेत्रात असतात पण म्हणून संपूर्ण क्षेत्राला नावे ठेवणारे लोक आढळत नाहीत (उदा. शिक्षकी पेशा) आणि संपूर्ण क्षेत्राला नावे ठेवणारे [काही] लोक आढळतात (उदा. पोलिस विभाग) पण गैरफायदा घेणार्‍या लोकांना समज मिळावी म्हणून सरसकट पोलिसांना आणि शिक्षकांना शिव्या घालाव्या असे म्हणावे असे तुमचे म्हणणे वाटते. ते मला पटत नाही.

लेखात आरक्षण हे तत्वतः मान्यच आहे असा भावार्थ आहे.

कोण जाणे? लेखातील मुद्दे पाहता हा भावार्थ स्पष्ट होतो असे वाटत नाही.

खुलासा

पोलिटिकली इन्करेक्ट विधाने करावी लागू शकतात असे मी आधीच नोंदविले होते. हक्क नसताना मिळणार्‍या सुविधेला उपकार, सवलत, भीक असे काहीही म्हणता येते.
मला तत्त्वतः आरक्षण मान्य आहे परंतु त्याला हक्क म्हणण्यास माझा विरोध आहे. समाजाने स्वतःवर बंधने घालून केलेला तो एक उपकार आहे.

खूप चांगला विचार!

---मला तत्त्वतः आरक्षण मान्य आहे परंतु त्याला हक्क म्हणण्यास माझा विरोध आहे.---

खूप चांगला विचार!

कि त्याला जास्त भिक् मिलते म्हनुन् असुया

सहमत. या सवलती भिक आपन घेतो तर् बाकी जनतेने जरा जास्त् भिक् घेतलि तर काय नुकसान आहे.कि त्याला जास्त भिक् मिलते म्हनुन् असुया !!

सहमत

बाकी जनतेने जरा जास्त् भिक् घेतलि तर काय नुकसान आहे.कि त्याला जास्त भिक् मिलते म्हनुन् असुया !!

ते एक कारण आहे.

जनुकिय

यात जनुकिय भाग असू शकतो हे पटते. मात्र माणसाच्या जडणघडणीत जनुकिय आणि वातावरण (नेचर आणि नर्चर) चा वाटा किती-किती असतो हा आरक्षणाइतकाच चिरंतन विषय आहे.

दुसरा एक वेगळा मुद्दा म्हणजे जातींचे उच्चाटन व्हायला हवे की नको? जोपर्यंत आरक्षण आहे तोपर्यंत जातीला सरकारी संरक्षण आहे.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

सुधारक

जातिव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय जातिभेद नष्ट होणार नाहीत असे मला वाटते.

आजचा सुधारक या मासिकाच्या जात विशेषांकाचे एक अतिथी संपादक प्रभाकर नानावटी हे उपक्रमचे सदस्य आहेत. जातिव्यवस्था नष्ट करणे हे ध्येयच चुकीचे असल्याचा त्यांचा युक्तिवाद असल्याचे स्मरते.

जात

जातिव्यवस्था नष्ट करणे हे ध्येयच चुकीचे असल्याचा त्यांचा युक्तिवाद असल्याचे स्मरते.

यावर अधिक जाणून घ्यायला आवडेल.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

कुठली कसली जनुके?

"काही समाज परीक्षांमाध्ये मागे दिसतात त्याचे कारण १००% परिस्थितीजन्य असून ०% जनुकीय आहे" या विधानाला विरोध माझा आहे.

मागे असलेल्यांच्या मागासपणात परिस्थितीबरोबरच काही जनुकीय कारणे सुद्धा असतात असे आपण या ठिकाणी स्पष्टपणे म्हणतात. याला आधार म्हणून आपण जी माहिती जमवली आहे ती (कोणी काही म्हणो) फारच त्रोटक आहे. महत्त्वाचा मुद्दा हा की जेव्हा मागासवर्गीय उमेदवार हा उच्चगुणांसहित एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो तेव्हा तो सरळ सरळ खुल्या प्रवर्गात गणला जातो. (त्याला पूढील काळातही मागासवर्गीयांच्या सवलती मिळतात ही बाब अलहिदा) त्यामुळे आपल्या तक्त्यात अनारक्षित समाज म्हणून जो कोटा दिला आहे त्यात मागास गटातील उच्चगुण प्राप्त उमेदवार नसतीलच कशावरून.

दूसरी बाब अशी की आज संख्येने बहूसंख्य पण तरीही अनारक्षित गणल्या गेलेल्या काही समाजांमधूनही (उदा. महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा समाज) फारसे विद्यार्थी (खरे तर संख्येच्या बाबतीत अतिशय नगण्य) आपण म्हणता त्या प्रतिभावंतांच्या स्पेशालिस्ट शाखांमधून चमकतांना दिसत नाहीत. मग या अनारक्षित बहूसंख्य उमदेवारांच्या मागे राहण्यामागे कुठले जनुकीय कारण आपण मानता?

आपल्या विधानाचा मला जाणवलेला रोख असा की प्रतिभावंत व्हायचे असेल तर नुस्ती परिस्थिती अनुकूल असून उपयोगाची नाही तर तुमची जनुके ही सुव्यवस्थित (सुवर्णी) असायला हवीत. तुम्हाला हे म्हणायचेच नाही असे जरी तुम्ही म्हणत असाल तरी ते मान्य पण मग

ज्या अनारक्षित वर्गातील मुलांची संख्या आपल्या तक्त्यात (जी की आपण या लेखापूरती प्रमाण मानली आहे.) जास्त आहे त्या अनारक्षित समाजांमधल्या मागे पडलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपणास ज्ञात आहे काय? जर अशी मुले ही बहूसंख्येने असतील तर मग त्यांच्यातल्या जनुकीय कुठल्या जनुकीय बिघाडांची कुठली मिमांसा आपण करु इच्छिता?

एकंदरीत असमान पातळीवर असल्याने त्यांना आरक्षण द्या अशी आरोळी ठोकत पातळीची मिमांसा करतांना आपण जे काही जनुकीय कुभांड रचू पहात आहात त्यामागे आहे बिचारा गरीब कुणी असहाय तर द्या त्याला भाकर तुकडा अशी क्रुर दयाबूद्धीच अधिक दिसते. आणि कुणाच्या भिकारपणाच्या सामाजिक कारणांचा धांडोळा घेऊन आपल्या उरी येणारी उत्तरदायित्वाची जबाबदारी झिडकारण्यासाठीचाच हा लेखनप्रपंच असावा असे वाटते.

असो. माझ्या प्रतिसादातील मते एकांगी असतील तर आपण व इतर उपक्रमी प्रतिवादासाठी आहातच. बाकी आरक्षणाचे चटके आताकुठे बहूतांशी अनारक्षित लोकांना सोसावे लागत आहेत. म्हणून कुठले कसले बहाणे करत आरक्षणावर आक्षेप घेण्याचे उद्योग सुरू असलेले दिसतात. असे आक्षेप घेतांना मग आपल्या प्रतिभावंत जनुकांचाही बऱ्याच जणांना विसर पडतो.

खुलासा

जेव्हा मागासवर्गीय उमेदवार हा उच्चगुणांसहित एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो तेव्हा तो सरळ सरळ खुल्या प्रवर्गात गणला जातो. (त्याला पूढील काळातही मागासवर्गीयांच्या सवलती मिळतात ही बाब अलहिदा) त्यामुळे आपल्या तक्त्यात अनारक्षित समाज म्हणून जो कोटा दिला आहे त्यात मागास गटातील उच्चगुण प्राप्त उमेदवार नसतीलच कशावरून.

मी दिलेले रकाने हे विद्यार्थांच्या जातींचे आहेत, त्यांच्या प्रवर्ग-कोट्यांचे नाहीत. त्यामुळे तेथे 'अनारक्षित' या गटामध्ये एकही आरक्षित विद्यार्थी नाही.

दूसरी बाब अशी की आज संख्येने बहूसंख्य पण तरीही अनारक्षित गणल्या गेलेल्या काही समाजांमधूनही (उदा. महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा समाज) फारसे विद्यार्थी (खरे तर संख्येच्या बाबतीत अतिशय नगण्य) आपण म्हणता त्या प्रतिभावंतांच्या स्पेशालिस्ट शाखांमधून चमकतांना दिसत नाहीत. मग या अनारक्षित बहूसंख्य उमदेवारांच्या मागे राहण्यामागे कुठले जनुकीय कारण आपण मानता?

जनुकीय तसेच परिस्थितीजन्य (शिक्षणाच्या वातावरणाची कमी, आर्थिक सुबत्ता, इ.) अशी दोन्ही कारणे असू शकतात हे मी मान्य करतोच!

ज्या अनारक्षित वर्गातील मुलांची संख्या आपल्या तक्त्यात (जी की आपण या लेखापूरती प्रमाण मानली आहे.) जास्त आहे त्या अनारक्षित समाजांमधल्या मागे पडलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी आपणास ज्ञात आहे काय? जर अशी मुले ही बहूसंख्येने असतील तर मग त्यांच्यातल्या जनुकीय कुठल्या जनुकीय बिघाडांची कुठली मिमांसा आपण करु इच्छिता?

"प्रवेश घेताना आरक्षित विद्यार्थी हे अनारक्षित विद्यार्थ्यांपेक्षा मागे असले तरी शिक्षणासोबत ते तफावत कमी करतात (म्हणजेच तुलनेने अनारक्षित विद्यार्थी मागे पडतात)" असा माझा निष्कर्ष आहे.

एकंदरीत असमान पातळीवर असल्याने त्यांना आरक्षण द्या अशी आरोळी ठोकत पातळीची मिमांसा करतांना

ते वाक्य माझे नाही, thanthanpal यांचा तसा दावा आहे.
असमानता आहे; थोडी जैविक आहे, थोडी परिस्थितीजन्य आहे असे मला वाटते. त्यावर थोडे आरक्षण द्यावे असेही मला वाटते.
"जातींमध्ये असमानताच नाही" असा तुमचा दावा आहे काय?

आपण जे काही जनुकीय कुभांड रचू पहात आहात

argument from personal incredulity

आहे बिचारा गरीब कुणी असहाय तर द्या त्याला भाकर तुकडा अशी क्रुर दयाबूद्धीच अधिक दिसते. आणि कुणाच्या भिकारपणाच्या सामाजिक कारणांचा धांडोळा घेऊन आपल्या उरी येणारी उत्तरदायित्वाची जबाबदारी झिडकारण्यासाठीचाच हा लेखनप्रपंच असावा असे वाटते.

'क्रूर दयाबुद्धी' या शब्दांमुळे नक्की अर्थ समजला नाही पण बहुदा तुम्हाला माझा युक्तिवाद समजला आहे असे वाटते.

म्हणून कुठले कसले बहाणे करत आरक्षणावर आक्षेप घेण्याचे उद्योग सुरू असलेले दिसतात. असे आक्षेप घेतांना मग आपल्या प्रतिभावंत जनुकांचाही बऱ्याच जणांना विसर पडतो.

'बहाणे करणे', 'विसर पडणे' हे आरोप कृपया विशद करून सांगा.

आप्पलपोटेपणाचे लक्षण

प्रतिभावंत हे जनुकीय आघाताने निर्माण झालेली व्यक्ति असते- आणी उच्च जातीय हे जनुकीय फरकांमुळे सतत प्रतिभावंत (वगैरे) असतात असा एक सुर मला वरील काही प्रतिसादात दिसतोय. हे विधान चूक असल्यास माझा गैरसमज झाला असावा असे माना.

इतके भारदस्त विधान समजण्यासाठी काही पुरक विदा वाचायला मिळाला तर बरे. अन्यथा मला हे विधान आप्पलपोटेपणाचे लक्षण वाटते.

कोणत्या?

एकतर त्या प्रतिसादांना तिरका प्रतिसाद देऊन विचारा किंवा येथे त्यांची वाक्ये उद्धृत करा. तुमच्या मनातील प्रतिसाद ओळखावे अशी अपेक्षा आहे काय?

सर्च मारा.

ह्या वेब पेजवर "जनुक" असा सर्च मारा.

शीर्षक संपादित

वाक्ये उद्धृत करा.

प्रतिवाद करताना अपमानास्पद वैयक्तिक रोख टाळावा.

दुसरा खेळ खेळू.

जाउ दे, दुसरा काहीतरी खेळ खेळू.
तुमचे संपादीत झालेले शिर्षक मला दिसले. ते वेब पेज क्याश मधे होते, वाईट वाटले- युक्तिवाद संपला की, माणूस हमरी-तुमरीवर येतो.

धन्यवाद

संपादीत झालेले शिर्षक मला दिसले.

आधी एकदा तर तो आख्खा प्रतिसादच उडला होता, पुन्हा टंकला त्याचे सार्थक झाले. पावतीबद्दल धन्यवाद.
इतक्या चटकन पाने गूगल कॅश मध्ये जपली जात नाहीत याचा मला खेद आहे.

युक्तिवाद संपला की, माणूस हमरी-तुमरीवर येतो.

या उपधाग्यात तुम्ही युक्तिवाद सुरूच होऊ दिला नाहीत.

दुसरा खेळ

|दुसरा खेळ खेळु
हेच म्हणतो
+१

खेळ?

मी गांभीर्याने मते मांडतो आहे.

सातत्य खूप आवडले.

लेखातील तपशील, मांडणी आणि लेखातील व प्रतिसादातील विचारातले सातत्य खूप आवडले.

अटळता

>>> आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आरक्षणाविषयीची चर्चा संपणार नाही असे म्हणतात. <<<

.... आणि जोपर्यंत राज्याचेच काय पण देशाचे राजकारण हे जातिनिष्ठ धोरणावर चालत राहणार आहे तो पर्यंत आरक्षणाची पताका फडकतच राहणार हे सत्य जर एकदा (जे आहेच) मान्य केले तर जनुकांची महती केवळ कागदावरच राहणार. मतलबी असो वा धुरंधर राजकारणी असो, त्यांना ४२ ते ५८ टक्के मतदानावर स्थापन झालेल्या राजसत्तेवर विराजताना हेही माहित् असते की, हा मतदानाच्या पेटीपासून फटकून दूर राहिलेला सुमारे ५० टक्के वर्ग कोण आहे. त्यामुळे "कल्याणम्" महती आळवण्यासाठी आरक्षणाची गादी सदैव सेवेस ठेवणे हे त्यांच्या हिताचेच आहे.

निरर्थक मुद्दा

कोणताही विश्वसनीय विदा, उदाहरणे व शास्त्रीय संशोधनाचा स्पष्ट दाखला न देता उगीचच आपला मुद्दा रेटण्याचा प्रयत्न रिकामटेकडेराव करीत आहेत. नितिन थत्ते यांनी केलेला युक्तिवाद योग्यच आहे. मुंबईतील रुपारेल व वझे केळकर या महाविद्यालयातील प्रवेशाच्या याद्या पाहिल्या तरी आरक्षित जागांवरील विद्यार्थ्यांचे गुण व खुल्या जागावरील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये जवळपास काहिच फरक नसतो. आरक्षित कोट्यातून वैद्यकिय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला तरी परिक्षेची प्रश्नपत्रिका व गुणदान पद्धत सर्वांना समानच असते. त्यात कोणतीही सवलत नसते.

माझे एक नातेवाईक हा मुद्दा निघाला की तू 'त्यांची' वकिली का करतोस असे विचारतात. त्यांना जेंव्हा मी विचारतो "अहो काका, तुमच्या मुलाला कुठे तुम्ही सरकारी नोकरीत लावणार आहात. तुम्ही तर त्याला परदेशात पाठविण्याची आत्ता पासूनच तयारी करता आहात". यावर त्यांच्याकडे उत्तर नसते.
आरक्षण हे फक्त शैक्षणिक संस्था व सरकारी नोकर्‍यातच आहे. उदारीकरणाच्या धोरणाने सरकारी कंपन्या व पर्यायाने त्यातील नोकर्‍यांची संख्या घटत आहे.

वादासाठी जरी आपला जनुकीय दावा मान्य केला तरी समाजस्वास्थ्यासाठी तो योग्य आहे का याचा जरा विचार करा. कटूता वाढवायची की कमी करायची? शारीरिक अपंगांसाठी आपण राखीव जागा ठेवतोच ना? तसेच ज्या समाजास आपण (म्हणजे आपल्या आधीच्या पीढीने हो) सामाजिक दृष्ट्या अपंग केले त्यांना वर येण्यासाठी थोडी सवलत दिली तर कुठे बिघडते? आणि ठणठणपाळ यांनी म्हटल्याप्रमाणे असेही आपण सर्वच जण कोणत्याना कोणत्या प्रकारात आरक्षणाचा / सवलतींचा लाभ घेतोच ना!

अशा निरर्थक वादामध्ये आपली कुशाग्र बुद्धी वाया घालवू नका. मनाचा मोठेपणा दाखवा.

जयेश

नाही

मी केलेल्या कोणकोणत्या दाव्यांचे संदर्भ हवे आहेत ते कृपया सांगा.

नितिन थत्ते यांनी केलेला युक्तिवाद योग्यच आहे.

त्यांना मी आधीच प्रतिसाद दिला आहे.

मुंबईतील रुपारेल व वझे केळकर या महाविद्यालयातील प्रवेशाच्या याद्या पाहिल्या तरी आरक्षित जागांवरील विद्यार्थ्यांचे गुण व खुल्या जागावरील विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये जवळपास काहिच फरक नसतो.

चर्चा व्यावसायिक अभ्यासक्रमांविषयी आहे.

आरक्षित कोट्यातून वैद्यकिय वा अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला तरी परिक्षेची प्रश्नपत्रिका व गुणदान पद्धत सर्वांना समानच असते. त्यात कोणतीही सवलत नसते.

उपकारच झाले!

तुमच्या मुलाला कुठे तुम्ही सरकारी नोकरीत लावणार आहात.

सरकारी शिक्षण अनेकदा सर्वोत्तम असते त्याचे काय?

शारीरिक अपंगांसाठी आपण राखीव जागा ठेवतोच ना? तसेच ज्या समाजास आपण (म्हणजे आपल्या आधीच्या पीढीने हो) सामाजिक दृष्ट्या अपंग केले त्यांना वर येण्यासाठी थोडी सवलत दिली तर कुठे बिघडते?

'आपण' नाही. अशी नुकसानभरपाई नसते.
सवलत ही 'थोडी'च असावी हाच तर मुख्य मुद्दा आहे.

चालू द्या.

महार जातीतल्या माझ्या काही जिवलग मित्रांना बामणांपेक्षा जास्त गुण मिळाले होते ही वस्तुस्थिती आहे. बाकी चालू द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

मी जमविलेल्या आकड्यांच्या तक्त्यातही तशीच माहिती आहे.

 
^ वर