मेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच मेडिकल प्रवेश परीक्षा सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.
ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना जाणून बुजून स्पर्धेतून बाद करण्या साठी INDIA च्या नोकरशाही आणि राजकारण्यांनी हि खेळी रचली आहे. . आज ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांची बोंबाबोंब आहे. बऱ्याच खेड्यात शाळात गुरुजी नाहीत, शैक्षणिक साधने नाहीत . उलट शहरी भागात शाळांपासून खाजगी शिकवणीचे गलोगल्ली कारखाने आहेत,बालवाडी पासूनच खाजगी शिकवण्या लावल्या जातात. त्यात CBSE च्या विध्यार्थ्यांना पडणारे भरमसाठ गुण. या गुणांमुळे खुद्द महाराष्ट्रातातील नव्हे तर भारतातील नावाजलेल्या शैक्षणिक सुविधा असलेल्या मुंबई शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गेल्या ३ वर्षा पासून ससेहोलपट चालू आहे. प्रत्येक वर्षी कोर्टात प्रकरण गेल्या शिवाय प्रवेश होत नाही . आज आगस्ट संपत आला तरी प्रवेश झाले नाही. हा सर्व वाईट अनुभव असूनही सर्व भारतभर एकच सीएटी घेण्याचा अट्टाहास का?
राज्यापुरता विचार केल्यास सामाईक परीक्षेत "एनसीईआरटी'ने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमांतून प्रश्‍न विचारले जाणार आहेत. मात्र राज्य प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात त्या मानाने मोठी तफावत आहे. त्यातून राज्यातील "सीबीएसई'चे विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांना किमान 20 टक्‍के गुण कमी मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच हा निर्णय आता जाहीर झाला असल्याने बारावीतील विद्यार्थ्यांची मानसिकता विचलित होऊ शकते. राज्याराज्यात घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा त्या त्या राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात तर ही देशभर घेण्यात येणारी परीक्षा CBSC च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल . यामुळे ग्रामीणभागातीलच नव्हे तर सरकारी शाळातून शिकणारी , बहुसंख्य मुले यास्पधेतून बाद होतील . केवळ कांही % ( टक्के )विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात म्हणून बाकी बहूसंख्य विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चूक आहे.
शहरात असलेल्या शैक्षणिक सोयी काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कच्छ पासून मेघालाया पर्यंत आधी सारख्या शैक्षणिक सुविधा द्या.जो पर्यंत या सुविधा खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण शिक्षण तज्ञांनी आताच या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. शहरात शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी या विरुद्ध आवाज उठवावा शहरी संघटना कांही करणार नाही त्यांचा फायदा आहे

Comments

सध्याची पद्धत किती परीणामकारक आहे?

सध्याच्या पद्धतीमधुन किती ग्रामीण भागातील विद्यार्थी मेडीकलला प्रवेश घेतात?
जे प्रवेश घेऊ शकतात ते का घेऊ शकतात?

आजकाल

आजकाल ज्यांना शिकवणी (अगदी प्रायवेट ट्यूशन हव्यात असेच नाही पण शाळेव्यतिरिक्त अधिक कोचिंग) परवडत नाही त्यांना मेडिकलचा खर्च परवडतो असे गणित मांडणारे नेमके किती मिळतील काही कल्पना आहे का?

तर्कक्रीडा

सात दरोडेखोर आहेत, सर्वच बुद्धिमान, स्वार्थी आणि क्रूर आहेत. सगळे एकमेकांना ओळखून आहेत. त्यांच्या वागणुकीचे नियम असे आहेत:

  1. स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.
  2. वरील नियमाला सांभाळून प्राप्त परिस्थितीत शक्य असलेल्या कृतींपैकी सर्वाधिक धनप्राप्ति करणारी कृती निवडावी.
  3. वरील नियमांना सांभाळून शक्य तितक्यांच्या मृत्यूस कारणीभूत व्हावे.

त्यांच्या टोळीत नेतृत्वाची क्रमवारी (हायरार्की) निश्चित ठरलेली आहे. उदा., नेता मेला तर क्र. २ ला नेता बनविले जाईल, क्र. २ मेला तर क्र. ३, असे.
त्यांना एका लुटीत १०० नाणी मिळाली. नाण्यांची वाटणी करण्याची त्यांची पद्धत अशी आहे:
नेता वाटणी सुचवितो. सगळे मतदान करतात. (नेतासुद्धा करतो.) वाटणीला ५०% किंवा त्याहून अधिक मते मिळाली तर वाटणी होते, अन्यथा नेत्याला मारून टाकून नवा नेता वाटणी सुचवितो. एखाद्या वाटणीला स्वीकृती मिळेपर्यंत असे मतदानचक्र सुरूच राहते.
प्रश्नः

  1. कोणती वाटणी (किती मृत्यूंनंतर) स्वीकारली जाईल?
  2. पुढील बदलांपैकी एक किंवा दोन्ही बदल केले तर त्या कोड्यांची उत्तरे कायकाय असतील?
  • नियम २ आणि ३ यांची क्रमवारी बदलली.
  • "५०% किंवा त्याहून अधिक मते मिळालेली वाटणी स्वीकृत" या नियमाऐवजी "५०% किंवा त्याहून कमी मते मिळालेली वाटणी अस्वीकृत" असा नियम वापरला.

उत्तरे पांढर्‍या किंवा लाल किंवा निळ्या रंगात, धाग्यातच, या प्रतिसादाला तिरकी द्यावीत ही विनंती.

नियम पाळतात??

"सात दरोडेखोर आहेत, सर्वच बुद्धिमान, स्वार्थी आणि क्रूर आहेत. सगळे एकमेकांना ओळखून आहेत. त्यांच्या वागणुकीचे नियम असे आहेत:"...

ह्यातील सगळे वीर वर्तमानकाळातील असल्यामुळे ते जिवंत असावेत असा एक कयास आहे. त्यामुळे ते तसले नियम पाळतात हे झूट आहे. ते मांडवली करत असावेत.

व्याख्या

'मांडवली' या शब्दाचा विचार करू.
'तडजोड', 'वाटाघाटी', 'देवाणघेवाण', या अर्थांनी हा शब्द वापरला जातो. अशी तडजोड कधी करावी लागते?

  • विवक्षित इच्छा असणे
  • ((त्या इच्छा पूर्ण करण्याची कुवत नसणे) && (त्या पूर्ण करण्यास सक्षम व्यक्तींना त्याविषयी अनुत्सुकता असणे)) || (त्यांच्या पूर्तेतेत विघ्न घालू इच्छिणार्‍या व्यक्ती उपस्थित असणे)
  • अशा व्यक्तींना विवक्षित इच्छा असणे
  • ((त्या इच्छा पूर्ण करण्याची त्या व्यक्तींना कुवत नसणे) && (त्या पूर्ण करण्यास मूळ व्यक्ति सक्षम असणे)) || (त्यांच्या पूर्ततेत विघ्न घालण्याची मूळ व्यक्तीत कुवत असणे)

या सर्व अटींचे पालन झाले तरच मांडवली घडते.
'इच्छा' या शब्दाला 'स्वार्थ' हा समानार्थ नाही काय?
परिस्थितीचे आकलन करून योग्य निर्णय (घासाघीस घालण्याची कुवत) घेण्यासाठी बुद्धिमत्ता लागत नाही काय?
'क्रौर्य' ही इच्छा हल्ली आढळतच नाही काय?

तरीही, वर्तमानकाळातील लोक तसे वागत नाहीत असे गृहीत धरून तुम्ही सुधारित नियम सुचविण्यास मोकळे आहातच! तसे कोडे विचारलेत तर त्या आवृत्तीचे उत्तर शोधण्यास मला आवडेलच!

सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत घेणे हा मूर्खपणाच

माझ्या या पोस्ट वर प्रतिक्रया मला अपेक्षितच नव्हत्या कारण या प्रश्नाशी जाल वर असलेल्यांचे कांही संबंध नव्हताच उलट देशपातळीवर परीक्षा झाली तर INDIA च्या जनतेचा फायदाच होणार आहे. म्हणून त्यांचा पाठींबा या प्रस्तावास आहेच. ग्रामीण भागातून किती विद्यार्थी मेडिकल ला प्रवेश घेतात आणि आजकाल ज्यांना शिकवणी परवडत नाही त्यांना मेडिकलचा खर्च परवडतो असे गणित मांडणारे नेमके किती मिळतील काही कल्पना आहे का ? या दोन प्रश्ना मुळे तर ग्रामीण भागाकडे , त्यांच्या समस्या कडे तुच्छ दृष्टीने पाहण्याचा शहरी लोकांचा दृष्टिकोन दिसून येतो. शिक्षण हे कांही शहरी भागाची मक्तेदारी नाही. एखाद्या विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असण्याचे दीवस इतिहास जमा झाले आहेत. मुख्यमंत्री वसंत दादा पाटलांनी जेंव्हा खाजगी विनानुदानित मेडिकल इंजिनिअर कॉलेज निम्म शहरी भागात चालू केली तेंव्हा सुद्धा शहरी लोकांनी नाके मुरडली होती, समान शिक्षणाच्या सोयी द्या मग दर्जाची तुलना करा.माझे जाल वरील मित्र प्रकाश यांची प्रतिक्रया बोलकी आहे.

show details Aug 22 (1 day ago)
अशी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेणे हा एक चांगला निर्णय आहे; पण तो शहरात असलेल्या शैक्षणिक सोयी जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत घेणे हा मूर्खपणाच नव्हे तर 'भारताची' जाण नासारांचा 'भारता' विरुद्ध डावच आहे. आज पुण्या-मुंबईत किंवा अशा शहरात इंग्रजी मध्माच्या शाळेत भरमसाट फी भरून शिकनारांना घरच काम करून. शाळा करणे खरच समजणार नाही आणि ते समाजाव ही अपेक्षाही ही बावळटपणा ठरेल. पण ग्रामीण भागातून गेलेले आमचे 'नेते' ही परिस्थिती जाणून नाहीत का? का हरम्यांना हा प्रश्न किती गहन आहे ते कळलेच नाही? इंग्रजाळलेल्या नौकरशाहीच्या हातचे बाहुले बनून गेलेले आमचे प्रतिनिधी अक्कल मतदार संघात ठेऊन दिल्ली आणि मुंबई गाठतात हेच खरे!

नम्र विनंती

तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी नम्र विनंती.

अतिनम्र विनंती

तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी अतिनम्र विनंती ;)

तुच्छ दृष्टी

दोन प्रश्ना मुळे तर ग्रामीण भागाकडे , त्यांच्या समस्या कडे तुच्छ दृष्टीने पाहण्याचा शहरी लोकांचा दृष्टिकोन दिसून येतो.

हाहाहा! तुच्छ दृष्टी ग्रामीण भागाकडे खचितच नाही; असलीच तर ती तुमच्या बटबटीतपणावर आहे. असो.

ग्रामीण भागातले लोक मेडिकलचा खर्च कसा करतात हे विचारले आहे त्याचे उत्तर द्या. उगीच खोटेनाटे आरोप नकोत.

मेडिकलचे खर्च ट्यूशनला जाणार्‍या मुलांचे आईबाप ठरवत नसतात तेव्हा उगीच त्यांच्यावर रोख ठेवण्याची गरज नाही.

शहरी लोकां प्रमाणे भ्रष्ट्राचार नक्कीच करणार नाहीत

ग्रामीण भागातील लोक मेहनतीने पैसा कमावून वेळ प्रसंगी स्वतःस गहन ठेवून पैसा उभारतील पण शहरी लोकां प्रमाणे भ्रष्ट्राचार नक्कीच करणार नाहीत. आणि ते कोठून पैसा आणतील याची चिंता शहरी लोकांनी करायची गरज नाही. अनेक स्वयंसेवी संस्था जिचा फायदा फक्त मुठभर शहरी लोक घेतात त्या संस्थाना ग्रामीण भागा कडे पैसा वळवण्यास सांगता येईल. त्यांची माहिती ग्रामीण भागात सांगितली जाईल. मेडिकलचा खर्च शहरी मुलांचे आई वडील ही ठरवत नाही. हे लक्षात घ्या. ग्रामीण भागातील विध्यार्थी मेडिकल जात नाही किंवा किती जातात हा प्रश्न परत स्वतः ची मक्तेदारी राहावी म्हणून उपस्थित केला जात आहे. भारतीय घटने प्रमाणे खेड्यातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. आणि तोच नाकारला जात असल्या मुळे अन्यायाला प्रतिकार करण्याच्या अधिकाराला आपण बटबटीतपणा चा आरोप करत आसल तर मला मान्य आहे. तो अपराध मी हजर वेळा करीन

कुठल्या आधारावर?

ग्रामीण भागातील लोक मेहनतीने पैसा कमावून वेळ प्रसंगी स्वतःस गहन ठेवून पैसा उभारतील पण शहरी लोकां प्रमाणे भ्रष्ट्राचार नक्कीच करणार नाहीत.

काय म्हणता आणि कोणत्या आधारावर म्हणता? आतापर्यंत किती लोकांनी स्वतःला गहाण ठेवून पैसा गोळा केला असावा? दोन-चार नावे संदर्भासहित पुढे करा बघू.

आणि ते कोठून पैसा आणतील याची चिंता शहरी लोकांनी करायची गरज नाही. अनेक स्वयंसेवी संस्था जिचा फायदा फक्त मुठभर शहरी लोक घेतात त्या संस्थाना ग्रामीण भागा कडे पैसा वळवण्यास सांगता येईल. त्यांची माहिती ग्रामीण भागात सांगितली जाईल

वा!व्वा! आतापर्यंत काय केलेत तुम्ही आणि किती संस्थांना वळवलेत? तुमच्यासारखे तोंडाची वाफ दवडणारे खूप असतात. काम करायचे नसते, उगीच लोकांना शिव्या घातल्या की आपण फार मोठे काम केले असे तुम्हाला वाटते. खरी माहिती समोर नसते आणि हवा तसा ठणठणाट केलेला असतो मग लोकांनी प्रश्न विचारले की फॅफॅ उडते आणि त्यांच्यावर राळ उडवली जाते.

मेडिकलचा खर्च शहरी मुलांचे आई वडील ही ठरवत नाही. हे लक्षात घ्या.

कप्पाळ! माझेच वाक्य माझ्यावर फेकून मलाच लक्षात घ्या सांगताय. ठणठणपाळ आहात खरे.

ग्रामीण भागातील विध्यार्थी मेडिकल जात नाही किंवा किती जातात हा प्रश्न परत स्वतः ची मक्तेदारी राहावी म्हणून उपस्थित केला जात आहे. भारतीय घटने प्रमाणे खेड्यातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे. आणि तोच नाकारला जात असल्या मुळे अन्यायाला प्रतिकार करण्याच्या अधिकाराला आपण बटबटीतपणा चा आरोप करत आसल तर मला मान्य आहे.

नव्हे नव्हे माझा आरोप असा आहे की तुम्ही अमेरिका धार्जीणे आहात तसे नसते तर तुम्ही निळा आणि लाल या रंगांचा समावेश तुमच्या लेखनात करणार नाही. खरा भारतीय भगवा आणि हिरवा रंग वापरेल. ;-)

दुसरी गोष्ट अशी की तुमची मर्दूमकी केवळ INDIA मधील लोकांसमोर हुशारी सांगण्यात आहे. उपक्रमावर येऊन रतीब लावल्यासारखे लेख टाकायचे आणि क्ष नावाचा प्राणी माझ्या लेखवर काय भकला त्यात समाधान मानायचे एवढेच तुमचे कार्य. प्रत्यक्षात तुम्ही काहीच करत नाही.

यु गॉट इट राँग.

ठण्२पाळ, यु गॉट इट राँग.

--ग्रामीण भागातील विध्यार्थी मेडिकल जात नाही किंवा किती जातात हा प्रश्न परत स्वतः ची मक्तेदारी राहावी म्हणून उपस्थित केला जात आहे. ---

यु मेड माय डे.

शहरी/ग्रामीण, जगाच्या पाठीवरील कोणताही डॉक्टर किती पैसे शिक्षण पुर्ण करण्यासाठी लावतो, व नंतरही व्यवसाय चाल्वण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागते हे माहिती असेल तर तुम्हाला पटेल की आम्हा शहरी लोकांनाही ते झेपत नाही.

मग ग्रामीण भागातील मुलांनी एम्बीबीएस्ला प्रवेश घेतल्यावर, सगळे शिक्षण घेतल्यावर, जागा वगैरे सेट करुन तो खर्च जर वसुल करायची मनीषा न बाळगता त्यांनी डॉक्टरी केली तर ते कर्जबाजारी होतील. नाहीतर ते शिकुन शहरात येऊन डॉक्टरी करतील, मग गावाला काय फायदा? तरीही, सध्या गावात जितके डॉक्टर आहेत त्यांनाच पुर्ण व्यवसाय मिळत नसल्यामुळे ते आपासात मारामा-या करण्याच्या घटना घडत आहेत.

जर प्रवेश पद्धत बदलली तर ग्रामीण भागातील मुलांचा तोटा होणार असेल तर तो आता होत नाही आहे हे तुम्हाला सिध्द करण्यासाठी काहीतरी डाटा द्यावा लागेल असे वाटते. आणि जर त्यांना शहरी मुलांप्रमाणे सुविधा नसुनही, पैसे नसुनही, शिक्षणाचा दर्जा एकच नसुनही जर आता प्रवेश मिळत असेल तर तो कशामुले मिळतोय? ग्रामीण भागातील मुलांसाठी सोप्या प्रश्नपत्रिका काढल्या जात आहेत का?

खरे म्हणजे ग्रामीण भागात जे उपचार लागतात ते शिकण्यासाठी एमबीबीएस ++ सारखा कोर्स करणे म्हणजे ग्रामीण भागातील मुलांचा वेळ आणि एनर्जी फुकट घालवण्यासारखे आहे (तुमच्या म्हणण्याप्रमाणे पैसा तर त्यांच्याकडे नसतोच). त्यापेक्षा एखादा असा कोर्स असावा की ज्याने ती मुले कंपाऊंडर, व् नर्स पेक्षा कुशल असतील आणि साधारणपणे २ वर्षात खूपच कमी खर्चात उपडॉक्टरी सुरु करु शकतील आणि ब्रेन ड्रेनही होणार नाही (अशी आशा बाळगु).

सरसकट

खर तर अशी सरसकट विधाने करता येणार नाहीत. ग्रामीण भागातुन जेव्हा विद्यार्थी शहरी भागाकडे येतो तेव्हा त्याला प्रथम न्युनगंडाने पछाडलेले असते. ( हे देखील सरसकट विधान म्हणता येणार नाही पण स्वानुभव आहे)
शहरी भागात तुलनेने सर्वच सुविधा अधिक असतात. ग्रामीण भागात तसे नसल्याने तो विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या कुपोषित राहतो.
पुण्यातील ब्रिलियंट अकादमीचे संचालक प्रा. काळभोर गप्पा मारताना म्हणाले कि आता ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिक यशस्वी होउ लागला आहे. शहरी व ग्रामीण भाग याची तुलना त्यांनी झू मधील प्राणी व जंगलातील प्राणी अशी केली. झु मधील प्राण्यांना नक्की माहित आहे कि आपल्याला नक्की खायला मिळणार आहे. पण जंगलातील प्राण्याला तशी खात्री नसते म्हणुन तो शिकारी साठी अधिक चपळ व सावध बनतो. शहरातील विद्यार्थ्यांना आपले आईबाप आपल्या पाठीशी असुन उपाशी पडू देणार नाही हे माहित असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे तसे नसते त्यामुळे तो झपाटल्या सारखा अभ्यास करतो.
प्रकाश घाटपांडे

हम्म!

ग्रामीण भागातुन जेव्हा विद्यार्थी शहरी भागाकडे येतो तेव्हा त्याला प्रथम न्युनगंडाने पछाडलेले असते.

मालाड-कांदिवलीची मिड्डलक्लास पोरे जयहिंद आणि झेवियरला प्रवेश घेतात तेव्हा तीही न्यूनगंडाने पछाडलेली असतात म्हणे. माझ्यामते न्यूनगंड हा सापेक्ष असतो. कोणीतरी कोणापेक्षा वरचढ असतो.

शहरातील विद्यार्थ्यांना आपले आईबाप आपल्या पाठीशी असुन उपाशी पडू देणार नाही हे माहित असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे तसे नसते त्यामुळे तो झपाटल्या सारखा अभ्यास करतो.

शहरातील कामगार, मजूर, मोलकरीण, शिपाई, रिक्शाचालक वगैरे आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय लोकांच्या मुलांना आपले आईबाप आपल्याला उपाशी पडू देणार नाहीत हे कसे माहित असते त्यावर एकदा प्रकाश टाकाल का प्रकाशराव?

सुखी

केवळ खाउन पिउन सुखी न राहता आपल्याला उंचावलेला आर्थिक व सामाजिक स्तर गाठायचा असेल तर झपाटले पण हवे. ते ग्रामीण विद्यार्थ्यात येउ लागले आहे असे निरिक्षण त्यांना नोंदवायचे होते. शहरातील निम्न स्तराला देखील हे लागु आहे. तरी शहरी म्हणुन असलेल्या गोष्टी / सुविधा या त्याच्या अनुभव विश्वात असतातच.
पुर्वी रिक्षावाल्याचा मुलगा डॉक्टर / इंजिनिअर, मोलकरणीची मुलगी शिक्षिका. पोलिसाचा मुलगा सीए असे चित्र दिसत नसे.
प्रकाश घाटपांडे

हेच

शहरातील निम्न स्तराला देखील हे लागु आहे. तरी शहरी म्हणुन असलेल्या गोष्टी / सुविधा या त्याच्या अनुभव विश्वात असतातच.

हेच उत्तर अपेक्षित होते. :-)

अमेरिका धार्जीणे माझे दुश्मन सुद्धा असा अविचार करणार नाही.

मी आणि अमेरिका धार्जीणे हा हा हा. माझ्या सर्व लिखाणावरून माझे दुश्मन सुद्धा असा अविचार करणार नाही. तो आपण केला. आरोप वाचून करमणूक झाली. या निमित्ताने का होईना आपण ग्रामीण भागाबाबत काय विचार करतात हे स्पष्ट झाले. आपण जश्या नकारात्मक प्रतिक्रिया देता तसे सकारात्मक प्रतिक्रिया देणारे सुद्धा आहेत आणि मी ती दिली तर आपणास राग येण्याचे कारण नाही. मी आपणा सारखा काळा, नीला, हिरवा भगवा रंग मानत नाही , मला फक्त रक्ताचा एकच रंग लाल समजतो त्यामुळे ज्यांचे रक्त लाल असून ही त्यांच्यावर अन्याय केला जात असेल तर मी त्यास विरोध करणार. मला वाटते उपक्रमावर ज्या चर्चेचा समजला कांही उपयोग होईल अश्या सामाजिक चर्चा व्हाव्यात . पण आपण आपल्या कोषातून बाहेर येण्यास तय्यार नाही आणि माझ्या वरच आगपाखड करत असाल तर तुमच्या वैचारिक पातळीची कीव करावी तेव्हडी कमी. आता मक्क्तेदारीचे दीवस संपलेत , उगाच आकांताडव करून फायदा नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर होवून कोठे का डॉक्टरी करेना तो आजारी माणसास नक्कीच सेवा देईल कट प्रक्टिस च्या जाळ्यात रुग्णांना लुबाडणार नाही हे नक्की. आणि हो २-३ वर्षाचा अभ्यास क्रम शहरी लोकांना का नको. उलट तो सुरु झाला तर चांगलेच आहे. सर्व क्षेत्रात डिप्लोमा असताना डॉक्टरी व्यवसायात का नको? आणि तो व्हावा अशी शहरी जनतेची सुद्धा इच्छा आहे यामुळे निदान रुग्णांना सेवा तरी चांगली मिळेल. सरकार पण त्या दिशेने पावले टाकतच आहे. या मुळे आज जो वैद्यकीय व्यवसाय हा ओषध निर्माते, विमा कंपन्या आणि सभ्य डॉक्टरांच्या कट प्रक्टिस च्या जाळ्यात अडकला आहे तो मोकळा तरी होईल. पण शहरी तज्ञा कडून आत्ता मुन्ना भाई डॉक्टर तय्यार होणार म्हणून विरोध होत आहे.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

हसू नका.. हा गंभीर प्रकार आहे. देशद्रोह आहे. (ठणूश्टाईल)

हसू नका ठणठणपाळ. आपल्या खोटे बोलण्याकडे लक्ष द्या. आपण अमेरिकेचे एजंट असावेत म्हणून भारतातील लोकांत (शहरी वि. ग्रामीण) (इंडिया वि. भारतीय) अशी फूट पाडत आहात.

मी आपणा सारखा काळा, नीला, हिरवा भगवा रंग मानत नाही ,

हे वाक्य पुरावा आहे की आपण भारतीय नाहीत. अमेरिकेचे एजंट आहात. भारतीय व्यक्ती मी हिरवा आणि भगवा रंग मानत नाही असे म्हणत असेल तर तो देशद्रोह आहे. तुम्ही देशद्रोही आहात. ;-)

ग्रामीण भागातील विद्यार्थी डॉक्टर होवून कोठे का डॉक्टरी करेना तो आजारी माणसास नक्कीच सेवा देईल कट प्रक्टिस च्या जाळ्यात रुग्णांना लुबाडणार नाही हे नक्की.

कशावरून? खोटे बोलण्याची कम्माल आहे हं!

असो बाकीचे जाऊ दे पण अमेरिकेच्या एजंटांकडून आम्हा भारतीय लोकांवर केलेल्या अशा आरोपांचा मी निषेध करते.

याना ढाल करून बचाव करू नका.

शहरातील कामगार, मजूर, मोलकरीण, शिपाई, रिक्शाचालक वगैरे आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय लोकांच्या मुलांना आपले आईबाप आपल्याला उपाशी पडू देणार नाहीत हे कसे माहित असते त्यावर एकदा प्रकाश टाकाल का प्रकाशराव? या वर्गा पासुन आपन तर ४ हात दुरच असतात याना ढाल करून बचाव करू नका. समान शिक्षणाच्या सोयीच्या मुद्या बद्दल आधी बोला. या वर्गाच्या मुलांची आणि खेड्यातील मुलांची परिस्थिती सारखी आहे. आणि आजकाल यांचीच मुले मेरीट च्या यादीत चमकत आहेत म्हणून तर ती यादीच न्यूनगंडाने पछाडलेल्या शहरी तज्ञांनी रद्द केली

अमेरिकाधार्जीण्या लोकांशी का बोलावे?

या वर्गा पासुन आपन तर ४ हात दुरच असतात याना ढाल करून बचाव करू नका.

हे तुम्हाला कसे कळले? की स्वानुभावावरून सांगताय. तुम्ही अमेरिकेचे एजंट असल्याने तुम्ही त्यांच्यापासून आठ हात दूर असणारच.

समान शिक्षणाच्या सोयीच्या मुद्या बद्दल आधी बोला.

अमेरिकाधार्जीण्या लोकांशी आम्ही का बोलावे? आमचे प्रश्न भारताचे आहेत. ते अमेरिकेच्या एजंटांशी आम्ही का शेअर करावे?

या वर्गाच्या मुलांची आणि खेड्यातील मुलांची परिस्थिती सारखी आहे.

कसे शक्य आहे? हा वर्ग शहरी आहे ना!

आजकाल यांचीच मुले मेरीट च्या यादीत चमकत आहेत म्हणून तर ती यादीच न्यूनगंडाने पछाडलेल्या शहरी तज्ञांनी रद्द केली

पुन्हा फूट पाडताय एजंटराव!!

विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत.

अजुनही ठणठणपाळ ह्यांनी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत.

या ग्रामीण भागातील मुलांना असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्

आपले हितसंबंध धोक्यात येत आहेत म्हणून मी अमेरिकेचा एजंट आणि काळा, हिरवा ,नीला, लाल, भगवा असा फरक करून आपण भारतीय समाजात ,धर्मात वर्षानु वर्ष फुट पडत आहात ते बरोबर. मी तर फक्त मानवजातीच्या रक्ताचाच एक रंग असलेल्या लाल रंगाचा आदर करतो तर चूक आपले तत्वज्ञान अजब आहे. आणि For Your Kind Information अमेरिकन एजंट म्हणून मला आपण शिवी देण्या पेक्षा नक्षलवादी म्हंटले असते तर मला आभिमान वाटला असता. आज ग्रामीण भागातून किती मुले प्रवेश घेतात या प्रश्नाचे उत्तर अगदी ५% आहे असे मानले तर नव्या परीक्षा पद्धतीत तो वर्ग असमान सामाजिक, शैक्षणिक फारका मुळे दूर फेकल्या जाणार आणि शहरवासियांना हेच पाहिजे. मी तर उलट असे म्हणेन या ग्रामीण भागातील मुलांना असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या.

अच्छा अच्छा

म्हणजे तुम्ही आम्हाला तोंडाला येईल ते म्हणत सुटणार आणि आम्ही तुमची स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्हाला आवडत नाही का? असं चालणार नाही बॉ! हिरवा आणि भगवा हे आपल्या तिरंग्यावरील रंग आहेत पण तुम्ही फुटीचं राजकारण करणारे पडलात त्यामुळे तुम्हाला फूटच दिसते. आले ना मनातले बाहेर. असा चोर पकडला जातो.

आज ग्रामीण भागातून किती मुले प्रवेश घेतात या प्रश्नाचे उत्तर अगदी ५% आहे असे मानले तर नव्या परीक्षा पद्धतीत तो वर्ग असमान सामाजिक, शैक्षणिक फारका मुळे दूर फेकल्या जाणार आणि शहरवासियांना हेच पाहिजे.

का मानायचे? खरी संख्या द्या ना. तुम्हाला कळकळ आहे तर थोडा अभ्यासही पुढे येऊ दे. शहरवासियांना हेच पाहिजे म्हणून पुन्हा फूट पाडण्याचा प्रयत्न. आपल्या अशा देशद्रोही विचारांनी आम्हा सर्व शहरवासियांना अतिशय खेद होतो.

आणि For Your Kind Information अमेरिकन एजंट म्हणून मला आपण शिवी देण्या पेक्षा नक्षलवादी म्हंटले असते तर मला आभिमान वाटला असता.

नक्षलवादी कशाला म्हणू. तुम्ही अमेरिकन धार्जीणे आहात. देशात आणि देशबांधवांत फूट पाडण्याचे काम परकीय शक्ती करतात त्यातलेच तुम्ही.

ठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट हे नाव कसं शोभून दिसतंय.

आपण तर माझ नामकरण सुद्धा करून टाकल.

ठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट हे नाव कसं शोभून दिसतंय. अरे व्वा !! बर झाल. आता महत्वाचे मी चर्चेत जे मुद्दे मांडले त्या बद्दल आपण सर्व जणांनी सोयीस्कर मोंन बाळगले आहे. असमान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पातळी वरील स्पर्धा.! किती % टक्के विद्यार्थी मेडिकल च्या ६-७ परीक्षा देतात. त्यांचा तो त्रास वाचवा म्हणून सगळ्यांना का वेठीस धरता.CBSE परीक्षे मुळे आमच्यावर अन्याय होतो म्हणून ३ वर्ष कोर्ट कचेरी करून ११ वी च्या सामान्य विद्यार्थ्याचे का नुकसान केले. प्रवेश तर सर्वांनाच मिळणार होते. मग CBSE च्या विद्यार्थ्र्या बद्दल त्यांना चांगले कॉलेज मिळतात म्हणून आपण आकस धरून का कोर्ट कचेरी केली. जेंव्हा स्वतःचं जळत तेंव्हा माणसाला त्याची धग लागते, चटके बसतात. खेड्यातील मुलांना आरक्षण द्यायलाच पाहिजे. दया नको भिक नको .आमचा हक्क आम्ही मिळवूच . मराठी ज्ञानेश्वरीला विरोध करणारे केंव्हाच नामशेष झाले. पण मराठी तर महाराष्ट्राची अस्मिता झाली आहे. काळा बरोबर बदला.

मौन कुठे? इतकं पटवून देतो आहोत लोकांना

आता महत्वाचे मी चर्चेत जे मुद्दे मांडले त्या बद्दल आपण सर्व जणांनी सोयीस्कर मोंन बाळगले आहे.

ते मुद्दे आम्हाला कसे कळणार? आम्ही पडलो शहरी लोक. मांडायचेच कशाला असे मुद्दे आमच्यासमोर? असे करू नका. तुम्ही काहीतरी कार्य करा आणि मग येथे येऊन सांगा.

त्यांचा तो त्रास वाचवा म्हणून सगळ्यांना का वेठीस धरता.

का म्हणजे? हक्क आहे तो आमचा. शहरातल्या लोकांचे हे कारस्थान आहे म्हणून तुम्ही नाही का वेठीला धरत आम्हा सर्वांना. आम्हीही धरणार तुम्हाला वेठीला. फिट्टंफाट!

आमचा हक्क आम्ही मिळवूच

म्हणजे? तुम्हालाही मेडिकलला ऍडमिशन हवी आहे का?

मिश्टर ठणठणपाळ द ग्रेट अमेरिकन एजंट, जे खरे कार्यकर्ते असतात त्यांना नेटावर येऊन प्रतिसाद आणि लेखाच्या रांगा लावण्यास वेळ कसा मिळतो हो?

काळा बरोबर बदला

--काळा बरोबर बदला.---
तुम्ही बदलत आहात?

आपण सरकार कडून कशी भिक घेतात हे मला सांगावे लागले.

मला वाटलेच होते आपण हा मुद्दा उपस्थित करून आरक्षण नको असे म्हणणार . ते ज्या सामाजिक,आर्थिक , कोटुंबिक हालात शिक्षण घेतात ते पाहता त्यांचे हे ८०% मार्क्स १०० पेकी १०० असतात. यात वाद नाही. आणि आपण म्हणता त्या प्रमाणे आरक्षण भिकच आहे असे मानले तर शासन घरगुती गस ला जी २५०-३५० रुपयाची सबसिडी देवून नुकसानीत जनतेला गस पुरवठा करते आणि आपण ती वापरता ती सुद्धा भिकच आहे. सरकारी मेडिकल . इंजिनिअर, आणि इतर उच्च शैक्षणिक कॉलेज मध्ये अत्यंत नाममात्र फी आकारून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते त्यात आपली मुले शिकतात ती सुद्धा भिकच आहे. आपण कधी म्हणतो का की माझ्या जवळ भरपूर पैसा आहे , मी सरकारला जेव्हढा खर्च येतो तेव्हढी अधिक फीस भरण्यास तय्यार आहे.गेली शतकानुशतके ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना थोड्या सवलती मिळाल्या की आपले पोट दुखते यामुळे आपण सुद्धा सरकार कडून कशी भिक घेतात हे मला सांगावे लागले.

सहमत

सैपाकाचा गॅस आणि उच्चशिक्षण यांसाठी मिळणारी सवलत हीसुद्धा भिकेचीच उदाहरणे आहेत.

 
^ वर