'हू ही अनिरुद्ध बापू'
नुकतेच विकीआन्सर्ज़डॉटकॉमवर हे वाचले:
Anirudha Bapu (Dr. Aniruddha Joshi aka Bapu) is not a simple man or humen being... He is incarnation of GOD. He is Sakshat Saai Baba. I am Devotee of my Bapu and got many experiences as well as getting many more in my day to day life.
I have attended his many Pravachanas (discourses) in Mumbai and he is teaching us How to Love our GOD and how to please him with our innocent Bhakti ( Devotion ) He is teaching mankind as to how to love other humen being and how to respect your own self.
He is GOD He is our Royal King and he know what is going to happen in coming future with mankind. He wrote the Book which is very femous on World War Third which shows extream intteligence and extra ordinary side of my Bapu. Year 2025 is the Golden Day for mankind as he told all of his Devotees ( Year 2025 , Tripurari Pournima Day as per Indian Calender )
Currently our activities are continuously followed throughout the world. Kindly please go through the links mentioned below to be a part of the GOD's family. He has come for us, then why to stay away from HIM?
Amen.
वाचून हे लगेच कळले की हे जे कोण गृहस्थ आहेत त्यांच्या भक्तांचे इंग्रजी दिव्य आहे. थोडा वेळ त्यांना गुगूलन काढल्यावर त्यांचे दर्शनही झाले. त्यांच्या नेमाडपंथी मिशा पाहून अंमळ सुखावलो. काही क्षणासाठी डॉ. नितू मांडकेंचाही भास झाला. हो बापूही नावापुढे डॉ. लावतात/लावायचे. माझ्या एका मित्राने सांगितले की हे बापू एवढे पावरफुल आहेत की ह्यांची आईच त्यांच्या पाया पडते. (बाय द वे, पार्वती गणपतीच्या पाया पडत होती का हो?) तर एकंदरच बापूंबद्दल एवढे वाचल्यावर माझे कुतूहल फार वाढले आहे. ते साक्षात साईबाबा, दत्तदेखील. सगळे तेच. म्हणजे चार ठिकाणी जायला नको.
ह्याशिवाय भक्तांकडून हसत-खेळत इंग्रजीही शिकता येईल ते वेगळेच. असो. तर 'हू ही अनिरुद्ध बापू' ह्या प्रश्नाचे मला समाधानकारक उत्तर मला हवे आहे. मला माहीत आहे की 'हू ही अनिरुद्ध बापू' ह्या प्रश्नाचे उत्तर देणे एवढे सोपे नाही. प्रश्नच तसा आहे. पण तरीही कुणीतरी डिटेलवार उत्तर देईल काय?
आगाऊ धन्यवाद.
जाता-जाता:
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
ह्याचाही अर्थ कुणी समजावून सांगेल का हो!
||अशाप्रकारे मी तूर्तास १० टक्क्याचा नियम पाळणार ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
Comments
अरे वा!
अनिरुद्धबापू म्हणजे दादर स्टेशनाबाहेर डिसिल्वा स्कूलसमोर ज्यांचे भक्तगण बुधवारी का कधीतरी लांबलचक लायनी लावून दर्शन घ्यायला ताटकळत उभे असत/ असतात तेच ना.* मंगळवारी सिद्धीविनायकाचे भक्त वात आणतात आणि इतरवेळेस ह्यांचे. धावतपळत घर गाठणार्या लोकांचे शिव्याशाप घेतात हे लोक. ;-)
बाकी, बापूंच्या लीला अगाध आहेत असे मीही ऐकते. ते पेशाने डॉक्टर आहेत हे माहित आहे; त्याखेरीज या बापूंबद्दल मला फारशी माहिती नाही पण त्यांच्या काही भक्तांची चांगली माहिती आहे. ती वेळ झाला की येथे देईन.
विकिआन्सर्सवरचा प्रश्नकर्ता आणि उत्तरदाता एकच दिसतात. ;-)
* ही १०-१२ वर्षांपूर्वीची गोष्ट असल्याने आता असे होते का माहित नाही.
:)
:)
न बोलणेच बरे.. ह्यांच्या विषयी प्रश्न विचारल्याने आधीच काहि भक्त मला टाळतात आणखी कशाला रोख ओढवून घ्या
खरंतर त्यांच्यापैकी एका भक्त कुटुंबाला हे इतके परोपकारी बापु मुंबई ते शिर्डी या एकदिवसीय धार्मिक सहलीचे
र२००० माणशी का आकारतात हा साधा प्रश्न मी विचारला होता. :)ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
आणखी गोंधळ
मला प्रश्न पडतो तो असा:
वाल्मिकींनी रामायण लिहीलं. भले ते प्रत्यक्षात घडलं असेल वा नसेल. अ.बां.च्या जन्मापूर्वीच ते रामायण अनेक लोकांनी आपापल्या शब्दांत लिहीलं आहे. मग 'रावण मरणार' हे आपलंच् भाकित असल्याच्या थाटात महावाक्यम् असं का लिहीतात? हा भोंदूपणा नव्हे काय?
बरं प.वि.वर्तक जसे चंद्रावर किंवा कुठे फेरफटका मारायचे, त्याप्रमाणे हे अ.बा. वानररूपाने लंकेत फिरत होते काय?
एक ऐकलेली गोष्ट: अ.बा. हे पूर्वी स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करत असत! म्हणे काहीतरी, कसलातरी साक्षात्कार झाला म्हणून "बाबागिरी" (का "बापूगिरी"?) करायला लागले.
-- अ. जोशी
काकुळतीची विनंती
महावाक्याचा अर्थ कृपया कोणीतरी मला समजावून सांगा.
"गण गण गणात बोते" या वाक्याच्या अर्थाविषयीही मला कुतुहल आहे.
हम्म!
राम युद्ध करणार, रावण मरणार म्हणजे सर्व भविष्यकाळ की. हे भविष्यकाळाचे गुपीतही समजवून घेणे आवश्यक वाटते. या पंक्तीतून रामावतार होणे अद्याप शिल्लक आहे असे म्हणायचे असावे इथे पण बापूंच्या एका भक्ताने ते कल्की अवतार असल्याचे सांगितले होते.
कल्की पांढर्या घोड्यावर बसून अवतीर्ण होतो तसे बापू पांढर्या मर्कमधून येतात का ते मात्र मला माहित नाही.
'अशम्य' व अक्षम्य कुतूहल
"गण गण गणात बोते" या वाक्याच्या अर्थाविषयीही मला कुतुहल आहे.
ह्या वाक्याबद्दल वाटणारे कुतूहल अशम्य (शमवता न येऊ शकणारे :प ) व अक्षम्य आहे.
मनोगतावरील ही चर्चा वाचा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
||बघ त्याची आठवण येते का||
पाईप हे विडंबनाचे प्रतीक आहे ना?
सहकुटुंब अवतार
दस्तुरखुद्द बापू हे श्रीविष्णुचे, त्यांच्या पत्नी लक्ष्मीच्या आणि त्यांचा एक मित्र आहे (जो कायम त्यांच्यासोबत असतो) तो शेषनागाचा अवतार आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून (म्हणजे एका भक्ताकडूनच) मला मिळाली आहे.
अवांतरः व्यक्तिगत टीका नाही
का कोण जाणे? मला अनिरुद्धबापूंचा फोटो पाहून आपले गुंडोपंत आठवतात. (त्यांच्या मिशाही अशाच असाव्यात असा अंदाज आहे.) ही वस्तुस्थिती आहे. गुंडोपंत आणि अनिरुद्धबापू यांच्यावर व्यक्तिगत टीका नाही.
आठवण
आमची आठवण झालेली पाहून गहीवरून आलो.
तसा गही खालून आलो असतो तरी बिघडले नसते पण यावेळी वरूनच आलो - वेळेत पोहोचलो ना!
चर्चा महत्त्वाच्या विषयावर आनेकांच्या जीवन (का जीटू?) मरणाचा प्रश्न आहे!
[जीवन असते मग जीअरण्य, जीजंगल,जीउपवन का नाही या विषयावरही एक चर्चा व्हायला हवी... मी म्हणतो की ठणठणपाळांनी याविषयी आवाज उठवायला हवा ;) ]
हो हे खरे आहे आमच्या मिश्या फ्येमस आहेत - पण आमचे प्रेरणास्थळ बापू नव्हेत तर लोकमान्य टिळक!
मुच्छे हो तो लोकमान्य जैसी! त्यांच्यापुढे मी काय हो? सूर्यापुढे जसा काजवा... आहेत म्हणायचे दोन चार केस तोंडवर इतकेच!
आपला
गुंडोपंत मिशिवाले
प्रश्न का पडावा?
'मी वानरसैनिक साचार' या ओळीतून त्यांनी स्वतःची ओळख स्पष्ट नमूद केली असताना 'ते कोण?' अशी शंका पुन्हा का यावी? मला फक्त साचार या शब्दाचा अर्थ समजला नाही. जाऊ दे. 'लाचार' सारखेच काही तरी असावे.
मागे एकदा 'बापूस्तुती' कानावर पडण्याचे भाग्य लाभले होते. 'बापू म्हणा, तुम्ही बापू म्हणा, तुम्ही बापू म्हणा' हे वाक्य आळवून चालीत म्हटले जात होते. मला चाल ओळखीची वाटत होती. मनाशी गुणगुणल्यावर लक्षात आले, की हे तर जुने गाणे 'ओटी भरा गं, ओटी भरा, माझी ओटी भरा'
देवाधर्माच्या नावावर दुकाने किती छान चालतात नाही? बापू, अम्मा, भय्यू , दीदी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ दुकानदार पाहिले की मन आदराने भारुन जाते. नित्यानंद स्वामींच्या आनंदक्रीडा नुकत्याच माध्यमांच्या कृपेने पाहायला मिळाल्या.
काही म्हणा 'बापू' शब्दात मोठी विलक्षण ताकद आहे. या दोन अक्षरांचा ८० वर्षांपूर्वी जनतेला भारुन टाकणारा मंत्र झाला होता. आता ते 'बापू' गेले काळाच्या पडद्याआड आणि अनिरुद्ध बापू, आसाराम बापू, मुरारी बापू असे वेगळेच बापू कला सादर करताहेत.
शालेय जीवनापासून विज्ञान शिकूनही मोठेपणी धर्म ही गोष्ट मनावर अंमल का गाजवत असते? मार्क्स म्हणाला ते 'धर्म ही अफूची गोळी आहे' हे वाक्य कितीतरी पटते.
श्शू...
अनिरुद्धबापू यांच्याविरुद्ध एक शब्दही खपवून घेतला जाणार नाही. बापू हे माझ्या जीवनाचे सार आहे. मी बापूंच्या जीवनाचे सार आहे. मायारुपी भवसागरातून तरुन जाताना आणि मुक्तीच्या कैवल्यस्वरुपी किनार्याला पोचताना लाखो भाविकांनी बापूंचे बोट हातात धरले आहे. 'बा....पू' या दोन अक्षरांत विश्वातला सगळा गोडवा साठला आहे. अर्थात गाढवाला गुळाची चव काय या न्यायाने नास्तिक असणे हेच पुरोगामीपणाचे लक्षण आहे असे मानणार्या संस्कृतीभंजकांना अशा सूर्यांवर थुंकण्यातच धन्यता वाटत असते. त्यांच्या पूर्वजन्मातील पापांची फळे, दुसरे काय? बापू, त्यांना माफ करा. ते काय करत आहेत, ते त्यांना कळत नाही.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान
दुजाभाव का हो?
(संजोपजी, आपला बोलण्याचा रोख समजला आहे, पण गंमत सुरु ठेवण्यासाठी हा प्रतिसाद)
तुम्हाला 'गण गण गणात बोते' आवडलं नाही, पण 'रावण नक्की मरणार' हे पटलेलं दिसतंय. महाराजांपेक्षा बापूंची पॉवर येकदम जबरदस्त हाय जनू.
मलाबी मुक्तीचा मार्ग दावा मालक. दोगंबी संगसंग जाऊया 'हॅप्पी होम' ला. बापूंच्या दर्शनाला.
'भक्त येतील हो गाडीतून न्यायाला. माझ्या बापूंच्या प्रवचनाला'
(मूळ चाल : बंधू येईल गं माहेरी न्यायाला. गौरी गणपतीचा सण आला)
|हा माझा व्यवसाय|मी बसतो धारणेला|का तुझ्या पोटाला|दुखते रे||
कुणाच्याही व्यवसायावर टिका करायची नाही अशी माझी पद्धत आहे. हार्मलेसतेने जर एखादी व्यक्ति समाजातील काहींची सेवा करत असेल व इतर लोकांना त्याचा काहीच प्रश्न नसेल तर ते इतर अनेक व्यावसायिक लोकांच्या पेक्षा वेगळे ठरतात.
|हा माझा व्यवसाय|मी बसतो धारणेला|का तुझ्या पोटाला|दुखते रे||
पत्रकार
कोण्या पत्रकाराने अशी मोठी माणसे, त्यांची संस्थाने, त्याचा अर्थिक कारभार, याविषयी काही लेख लिहले आहेत काय?
माहीती म्हणुन या बाबी समोर यायला हरकत नसावी. किमान कोणत्या दिवशी, वेळी गोरगरीबांना मोफत वैद्यकिय सेवा, वस्त्र, अन्न मिळते हे कळले तरी गरजुंना लाभ घ्यायला सोपे जाईल.
भक्तांनी मदत करावी.
लिहिले तरी उपयोग काय?
पत्रकारांनी काही लिहिले तरी त्याचा उपयोग काय?
एक किस्सा सांगतो. त्यावरुन बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
पुण्यात काही वर्षांपूर्वी एका परिवाराचा विराट मेळावा भरणार होता. त्यानिमित्त स्थानिक आयोजकांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात मेळाव्याची तयारी कशी चालली आहे आणि ५-१० लाख लोकांची व्यवस्था कशी उत्तम होणार आहे, हे सांगितले जात होते. पत्रकार परिषद सुरु असतानाच त्या परिवाराचे चे कार्यकर्ते रंगीत वेष्टनात गुंडाळलेल्या भेटवस्तू लगबगीने आत आणून एकावर एक रचू लागले. हे सगळे मुद्दाम आणि लक्ष वेधून घेण्यासाठी चालले होते. ८०-९० टक्के पत्रकार हे विषयापेक्षा भेटवस्तू काय मिळते, याकडे लक्ष ठेऊन असल्याने त्यांना केव्हा एकदा परिषद संपते असे झाले होते. संयोजक दर दहा मिनिटांनी ' सुग्रास भोजन आहे, पत्रकार बंधूंनी जेवल्याखेरीज जाऊ नये' हे सूचित करायला विसरत नव्हते. प्रत्येक पत्रकाराला एक सुंदर फोल्डर दिला होता. त्यात भाषेचा फुलोरा उधळलेले प्रसिद्धी पत्रक, सुंदरसे महागडे पेन, डायरी व परिवाराच्या प्रवर्तकांचे रंगीत फोटो होते. मेळाव्यानंतर आगामी काळात परिवाराचे प्रणेते असलेल्या महनीयांचा एका रम्य पर्यटनस्थळी सत्संग होणार आहे. त्यालाही पत्रकारांनी सहकुटूंब उपस्थित राहावे, असे मधाचे गालबोट संयोजक लावत होते.
परिषद संपता संपता एका पत्रकाराने रोखठोक प्रश्न विचारला, 'या मेळाव्याला पाच लाख लोक येणार म्हणजे खर्च कोट्यवधी रुपयांत होणार तर त्याची जुळवाजुळव कशी केली जात आहे?' पाठोपाठ एक-दोघा इतर पत्रकारांनी 'हा पैसा कोण देणार आहे? तुमच्या परिवाराचा आर्थिक तपशील कसा मिळू शकेल?' असे प्रश्न विचारले. विषय पैशावर जात असल्याचे पाहून संयोजक सावध झाले. 'सत्कार्याला पैसा कमी पडत नाही. परिवाराचे योगक्षेम साधक व भक्तजन चालवतात. ते हा खर्च विभागून घेणार आहेत.' असे सांगून त्यांनी परिषद आटोपती घेतली. गंमत म्हणजे परिवारातील कुणालाच आर्थिक विषय काढलेला आवडत नव्हता.
पुढे मेळावा झोकात पार पडला. सर्व वर्तमानपत्रांना दोन दिवस पूर्ण पान जाहिराती मिळाल्या. वृत्तांत सविस्तर छापून आले. सगळे खूश.
लाखो अनुयायांचा पाठिंबा मिळतो म्हणून राजकारणी लोक या बाबा-बुवांचे लांगूलचालन करतात. माध्यमांना जाहिराती मिळतात म्हणून ते या पंथांना दुखवत नाहीत. एखादा चौकस पत्रकार जास्त चौकशा करायला लागला तर त्याला गप्प कसे बसवायचे हे या लोकांना चांगले ठाऊक असते. पुन्हा समाजच जर असे विचारत असेल, की 'या निरुपद्रवी पंथामुळे कुणाचे काय नुकसान होते? ते बिचारे समाजसेवा करतात तर करु देत ना' तर मग कुणासाठी पत्रकारांनी लेखण्या झिजवायच्या?
खी खी खी
ह्म्म्म.
तिकडे आमच्या मृगनयनीताईंशी वादविवाद करून दाखवा. मग या बोलायला इकडे. जर शिल्लक राहिलात तर.
इकडे सगळे टिंगल करणार | मऊ माती खणणार ||
गुंडोपंत रागावणार | मजा येणार निश्चित ||
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
इकडे मुक्तद्वार आहे
>> तिकडे आमच्या मृगनयनीताईंशी वादविवाद करून दाखवा. मग या बोलायला इकडे.
हाहाहा. इकडे प्रवेश घेण्यावर कुणी बंदी घातली आहे का कुणावर? इकडे मुक्तद्वार आहे. तिकडच्या तुमच्या मृगनयनीताईंना बोलवा की हिकडं. आम्ही आनंदातिशयाने 'आप्सरा आली' असेच म्हणू त्या आल्यावर.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ये बाबो!
मी कशाला रागावणार बॉ?
मिशा (जरा) मोठ्या असल्याने रागीट दिसतो. पण तसा मी फार्फार प्रेमळ हां!
शिवाय ज्योतिषाविषयी येथे काहीच चर्चा नाही मग मला त्यात काय रस असायचा?
भोंदूगीरीसाठी गुरू कुंडलीत 'तसा' असावा लागतो - कसा ते मला विचारू नये - प्रकाशरावांना विचारावे! ;)
असो, आमच्या शिवाय चैन पडत नाही हे पाहून बरे वाटले...
अन्यथा आम्ही उपक्रमाला आणि एकुण आंतरजालालाच राम राम करण्याच्या बेतात आलो होतो...
आपला
गुंडोपंत
प्रतिसाद संपादित
विषयांतर होऊ नये म्हणून या चर्चेतील काही प्रतिसाद संपादित केले आहेत याची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी. - संपादक मंडळ.
तुम्ही बोलवा
नितिनकाका, इथे खीखीखी हसण्यापेक्षा तुम्ही बोलवा ना मृगनयनीताईंना इथे. तुम्ही दोन्हीकडले सदस्य आहात ना!
इकडे खीखीखी हसणार| तिथे तोंडाला कुलुप बांधणार||
दोन्ही दगडांवर पाय ठेवणार | चर्चा एकतर्फी होणार निश्चित||
आमच्या एक काकू आहेत. काका चांगले धडधाकट असताना बापूंचे लॉकेट गळ्यात घालून मिरवत असतात. त्यात बापूंचा वरील हसरा चेहराच दिसतो. त्यांनी कोठे फोटोसेशन केले त्याची कोणाला कल्पना आहे का? लग्नासाठी फोटो काढायचा आहे. त्याच फोटोग्राफरला गाठतो.
-राजीव.
अनिरुध्द बापू
अनिरुद्ध बापू हे पेशाने डॉक्टर होते. माझे एक मित्र डॉक्टर आहेत त्यांना ते शिकवायला होते. त्यावेळी गुरुला सिगरेट पुरवायचा उद्योग त्यांनी (माझ्या मित्राने) केला होता.
त्यानंतर दादर किर्तीकॉलेजच्या आसपास त्यांचे घर होते. दवाखानाही जवळच असावा. प्रॅक्टीस फारशी चालायची नाही.
त्यांनी प्रवचनाचा उद्योग सुरु केला. हळू हळू भरपूर प्रसिद्धी/धन मिळाले.
पहिल्यांदा ते दादरला प्रवचने देत असत. हल्ली ते खार-बांद्रा (पूर्व) येथे प्रवचने देतात. त्यांच्या नावाचे एक नियतकालिक निघते. त्यात त्यांचे भक्त अनेक चमत्कार सांगत असतात. वानगी दाखल एक. त्यांचा एक भक्त संडासात (बहुतेक चाळीतील बहुघरातून काही अशा.) गेला होता. होताना त्याच्या लक्षात आले की आतल्या नळाला पाणी नाही. आता बिकट प्रसंग ओढवला होता. त्याने मग बापूंची आठवण काढली. लगेच नळाला पाणी आले. त्यांच्या भक्तांना अनिरुद्ध बापू अनेक अपघातातून वाचवतात. (म्हणजे अपघात होतात, जे भक्त त्यांचे नाव घेतात ते वाचतात.) अशा कथा त्यांच्या बद्दल प्रसिद्ध आहेत. एक महत्वाचा चमत्कार एका भक्ताने सांगितला आहे तो असा (परत आठवणीतून देतो.). वांद्र्यात कोणा एका कडे साईबाबाने (शिरडीवाले) एक वस्तु दिली होती . (ती त्याच्याच कडे दिली होती की वंशपरंपरागत आख्यायिका होती हे नीटसे त्यात नव्हते.) आणि सांगितले होते की मी ही वस्तु घेऊन जाईन. त्यानंतर एके दिवशी बापू प्रत्यक्ष येऊन ती वस्तु घेऊन गेले. याचा अर्थ बापू हे साईबाबाचा अवतार.
बापूंची मुलाखत कधीतरी लोकप्रभेत आली होती (मला वाटते की तो विशेषांक असावा.). हा अंक मला मिळाला नाही पण संग्रही ठेवण्याजोगा असावा. (कोणी दुवा काढला तर बरे होईल.)
मुलाखतीत आपण चमत्कार वगैरे करत नाही, घर सांभाळून मी ही प्रवचने देतो वगैरे मुद्दे होते असे आठवते.
चित्रलेखेत या बापूंविरुद्ध बरेच छापले गेले होते.
बापूंचे भक्त काही समाजसेवा (गाजावाजासकट) करतात. गणपती विसर्जनाच्या दुसर्या दिवशी चौपाटी गणपती मूर्त्यांनी (भंगित आणि अखंड) व्यापलेली असते. (याचे छायाचित्र घेण्यास् मनाई आहे.) ती ते साफ करतात. आम्ही काही वर्षांपूर्वी विसर्जित गणपती दान करा अशी मोहिम राबवली होती. (त्याचा परिणामस्वरूप आता ठाण्यातील बहुतांश तलावात गणपतीविसर्जनाला बंदी आहे.) दुसर्या वर्षी बापूंचे भक्त येऊन म्हणाले होते की आम्ही मदत करतो पण हे इकडे नको. (त्यांनी कितपत मदत केली याबद्दल आम्ही साशंक आहोत.)
कित्येक बाबा आणि बापू यात फारसा फरक नाही. मात्र काही फरक मोलाचे आहेत असे ऐकतो. मी ऐकल्याप्रमाणे बापूंनी अगदी मॅनेजमेंटचे /व्यावसायिक जाहिरातदार लोक लावून आपली प्रसिद्धी केली. फक्त दर्शनाला एके काळी ते ५०० रु. घेत असत (ही ऐकीव बातमी आहे.). (हल्ली किती माहित नाही.) अनिरुद्धबापूंचे स्टीकर्स आणि इतर प्रचारसाहित्य पाहण्यासारखे असते. को़कण मुंबईतीत तीन -चार महत्वाचे बाबा आहेत. एक अनिरुद्ध बापू, नरेन्द्र महाराज, वामनराव पै, (??) धर्माधिकारी (जे दिवंगत झाले), सनातन प्रभातचे डॉ. आठवले. यातील प्रत्येकाच्या संगठना आहेत. ही मंडळी वेळेला लाखभर माणसे गोळा करू शकतात. त्यामुळे कुठल्याही राजकारण्याला त्यांच्या पायावर डोके ठेवावे लागते. (नाहीतर एवढी मते जातील अशी धास्ती असते.) या सर्वात अनिरुद्ध बापू आणि वामनराव पै थोडे मागे असावेत. (म्हणजे राजकारणात त्यांचे नाव मोठे नाही.). बापूंचे दुसरे असे विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेले वाङ्मय जवळपास नाही. त्यांची प्रवचने पुस्तकरुपात प्रसिद्ध होत नाही (मी मिळवायचा प्रयत्न केला होता तो फसला.). जी पुस्तके आहेत ती भक्तांनी लिहिलेली व ट्र्स्टने छापलेली. या पुस्तकात काही खोटे सापडले तर त्यातून बापू नामानिराळे रहावे अशी ती योजना असावी असे वाटले.
एक व्यवसाय असावा असे वाटल्यासारखे बापूंच्या वस्तु म्हणजे फोटो, पादुका (?) वगैरे भरपूर किमतीला विकले जातात. बापूंच्या ट्रस्टने भरपूर माया केली असून त्यांनी स्वतःची अशी विस्तीर्ण जागा कर्जत जवळ घेतली आहे.
आता वाक्यावरः हे रूपक समजायला सोपे आहे. माझ्या जीवनातील युद्ध मुख्यतः राम (देव) करणार मी वानर सैनिक त्यात त्वेषाने घाव घालीन वगैरे ठीक आहे, पण मुख्यतः राम युद्ध करेल, रावण मरणार (मी युद्ध जिंकणार) हे रामायणाप्रमाणे निश्चित आहे.
गण गण गणात वोते हे वाक्य निरर्थक आहे. (कित्येक मंत्रही तसेच असावेत) बहुदा गजाननमहाराज या वाक्याशिवाय दुसरे काहीच बोलले नसावेत. अगदी दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजाननमहाराज चरित्रात त्याच्या निरर्थकतेचा उल्लेख आहे. ही पोथी अगदी वाचनीय आहे. जर कोणी टंकून दिली तर मराठीपुस्तके वर टाकण्यास मला विशेष आनंद होईल. या वाक्याला त्यापुढे एक नवीन वळण लावले आहे. ते म्हणजे 'गणी गण गणात वोते'. हा बदल सध्याचे सुप्रसिद्ध नरेन्द्रमहाराज यांनी केला आहे. या वाक्याला त्यांनी काही अर्थ दिल्याचे ऐकिवात आहेत.
माझ्या माहितीत काही चुका झाल्या असतील तर संजोप रावांनी क्षमा करावी आणि चुका सुधारून द्याव्यात.
प्रमोद
मस्त आणि माहितीपूर्ण प्रतिसाद
त्यांचा एक भक्त संडासात (बहुतेक चाळीतील बहुघरातून काही अशा.) गेला होता. होताना त्याच्या लक्षात आले की आतल्या नळाला पाणी नाही. आता बिकट प्रसंग ओढवला होता. त्याने मग बापूंची आठवण काढली. लगेच नळाला पाणी आले.
अनुभवाने डोळे भरुन आले. :) नरेंद्र महाराजांवर मला अशीच अधिक माहिती हवी आहे.
-दिलीप बिरुटे
असेच
मस्त आणि माहितीपूर्ण प्रतिसाद.
माहिती
असा नरेंद्र महाराजांचा संदेश आहे.
ते मठाधीश आहेत आणि विवीध उपक्रम चालवतात.
धर्मातरीत हिंदूंना परत हिंदू करून घेण्याची प्रथा त्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे मला त्यांचे फक्त हेच कार्य भावते. इतर अजून कुणी बुवा बापू असे उपक्रम चालवताना दिसले नाहीत. मुस्लीम व्हा, नाहीतर काश्मीर सोडा!
अशा बातम्यांमुळे हे महत्त्वाचे वाटते!
नाणीज येथे दर रोज अन्नदान होते या व्यतिरिक्त इतर उपक्रमांविषयी मला फारशी माहिती नाही.
बाकी चमत्कार वगैरे नेहमी प्रमाणेच!
आर्थिक व्यवहार बँकेमार्फत होतात असे त्यांच्या स्थळावर समजले.
अधिक माहितीसाठी http://www.nanijdham.org/index_mr.php हे स्थळ पाहा.
आपला
गुंडोपंत
नशीब
तरी बरे की थेट धुवूनच नाही दिले!
लोकप्रभा
अनिरुद्ध बापुंवर लोकप्रभेचा एक नसुन अनेक विशेषांक होते. मी ते वाचले होते. संग्रही ठेवले नाहीत.
अनेक कार च्या मागे ओम् अनिरुद्धाय नमः || ची स्टिकर असतात.
बाकी नरेंद्रमहाराजांपेक्षा हे बुवा निरुपद्रवी आहेत. अंनिस चे पिंपरी चिचवड भागातील कार्यकर्ते व बिल्डर श्री अरविंद पाखले यांच्यावर नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी हल्ला करुन डांबुन ठेवले होते. पुढे केस मधे हे भक्त सुटले. एवढा मनस्ताप झाल्यावरही पाखले यांनी त्यांच्या भक्तांना दोष दिला नाही. त्यांच्या बोलवित्या धन्याशी वैचारिक संघर्ष करणे अधिक पसंत केले. नरेंद्र महाराजांनेही आम्हीच अंधश्रद्धा निर्मुलन करतो असा दावा केला. दाभोलकरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे असा ही आव आणला होता.
नाणीजचे नरेंद्र महाराज वि सातारचे नरेंद्र महाराज असा विषय मिडियाला पुरतो.
कुठल्याही महाराजांच्या नादी न लागता आपापले अध्यात्म जपणारे व विधायक काम करणारे अनेक सश्रद्धही आहेतच की.
प्रकाश घाटपांडे
पण
पण या बिल्डरने नक्की काय उद्योग केले होते ते नाही सांगितले?
बिल्डर आहे म्हणजे काही सरळ माणूस असेल असे वाटत नाही...
बिल्डरलोकांनी जमिनी हडप केल्याचे अनेक ठीकाणी पाहिले आहे.
आपला
गुंडोपंत
काय तुम्ही!
तुम्हाला तर बिल्डरचा अनुभव खूपच चांगला होता ना? तरी बिल्डर जमातीवर संशय?
नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी थोडे पैसे फेकले असते तर हा बिल्डर त्यांच्या ताटाखालचे मांजर झाला असता की!
जनजागृती
नरेंद्रमहाराजांच्या भंपक पणा बद्दल चिंचवड भागात पोस्टर लावुन जनजागृतीचा प्रयत्न केला होता.
प्रकाश घाटपांडे
यादीत
वरील यादीत घोराकष्टोद्धरण स्तोत्रवाले बापट गुरुजी राहिली का?
आपला
गुंडोपंत
मुतार्यांच्या दुर्गंधीपासून सुटका
प्रमोदराव, तुमचे आभार मानायचे विसरलोच की. अगदी माहितीपूर्ण प्रतिसाद. खूप खूप धन्यवाद. उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
वानगी दाखल एक. त्यांचा एक भक्त संडासात (बहुतेक चाळीतील बहुघरातून काही अशा.) गेला होता. होताना त्याच्या लक्षात आले की आतल्या नळाला पाणी नाही. आता बिकट प्रसंग ओढवला होता. त्याने मग बापूंची आठवण काढली.
अगदी अशा बाबतीतही बापू भक्तांची किती काळजी घेतात ते कळले. धन्य ते बापू. धन्य त्यांचे भक्त. बापूंची निसती आठवणही काढली तर मुतार्यांच्या दुर्गंधीपासून सुटका होऊ शकेल. प्रत्येक सुलभ शौचालयात बापूंचे नाव कोरायला हवे. फोटो लावायला हवा. आणि गायत्रीमंत्रासारखा ब्याकग्राउंडवर 'बापू! बापू' असा उद्धोष होत राहावा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
उद्घोष
>>'बापू! बापू' असा उद्धोष होत राहावा.
तो घोष "ओम् मनःसामर्थ्यदाता श्री अनिरुद्ध बापू" असा असायला हवा.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
अनियत जग आणि बापूंची छाया
का, कसे आणि अनियत जगाच्या रखरखीत उन्हातून चालत असताना श्री. धम्मकलाडू यांचा लेख एखाद्या घनदाट व शीतल सावलीसारखा वाटतो आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
+१
मनातलं बोललात...
||वाछितो विजयी होईबा||
उन्हात चालणे
उन्हात चालल्यावरच सावली हवीशी वाटणार, सावलीत असल्यावर एसी. :)
प्रमोद
बापूंची कृपा
यालाच भक्तगण बापूंची कृपा म्हणत असावेत. ;-)
समाज नावाची गुंतागुंतीची गोष्ट
वारंवार तंबी देऊनही बाहेर समाज नावाची एक गुंतागुंतीची गोष्ट असते याचा अनेकांना विसर पडत आहे.
साहेब
यातील समाज ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहे हे मान्य पण तो गुंता तंबी देउन सुटेल हे अमान्य.
प्रकाश घाटपांडे
गुंता सुटणार नाही
तंबी देऊन गुंता सुटणार नाही. पण लोकांना समाज नावाच्या गुंतागुंतीच्या गोष्टीचा वारंवार विसर पडतो हे खेदजनक आहे. कदाचित समाज नावाची गुंतागुंतीची गोष्ट असते याची लोकांना कल्पना नसावी. त्यासाठी लोकशिक्शण आवश्यक आहे.
लगेच नळाला पाणी आले.
त्यांचा एक भक्त संडासात (बहुतेक चाळीतील बहुघरातून काही अशा.) गेला होता. होताना त्याच्या लक्षात आले की आतल्या नळाला पाणी नाही. आता बिकट प्रसंग ओढवला होता. त्याने मग बापूंची आठवण काढली. लगेच नळाला पाणी आले. अरे व्वा !! सरकार बाकी जनता मूर्ख आहे. सरकारने बापुना जलपुरवठा मंत्री करावे. यामुळे धरण बांधण्याचा ,पाणी वाहून नेण्याचा लक्षावधी करोडचा खर्च वाचेल . जनतेनी फक्त बापूचे स्मरण केले की पाणी हजर. श्री सत्यश्री साईबाबांना अन्न उत्पादक आणि पुरवठा मंत्री करावे. ज्या प्रमाणे हे बाबा हवेतून राख, फळ काढतात त्या प्रमाणे साई चे नाव घेताच घरात अन्नधान्य हजर. याचा बरोबर आमच्या जाणत्या राजाच्या मागची कटकट जाईल. असेच अनेक बाबा हाताशी धरून वीज निर्मिती आणि इतर खात्याचे मंत्री नेमून सरकारने भारतात बाबा रामराज्य आणावे.
धंदा
सबगोलंकार कहाणी -
एक महाराज - त्याचे होयबा चेले - श्रीमंत पण संदिग्ध प्रभावळ - काळा पैसा पांढरा करणे - तयार आणि फुकट (फुकाचेही) तत्त्वज्ञान - मनःशांती -सामान्यांच्या जीवनातील समस्या - अगतिकता -लाखों लोकांची आणि करोडो रुपयांची प्रवचने - पंचतारांकित आश्रम -पुस्तके, गंडे,दोरे,लॉकेट, स्टीकर्स - मंत्र -चमत्कारांच्या भाकडकथा - वाजतगाजत समाजकल्याण -मिरवणुका - शिस्त -राजकारणी -मंत्रीसंत्री - प्रसिद्ध खेळाडू/अभिनेते इ.
ॐ शांति: शांति: शांति: |
बोलो, अमुकतमुक महाराज की जय!
धंदा सोपा , भरपूर फायद्याचा आहे. पण करायला जमला पाहिजे. थोडे वेरिएशनही चालेल. टेक युवर चान्सेस इफ इंटरेस्टेड.नुसती नावे ठेवू नका.;)
आणि हो, ( ;) ) अंनिसबरोबरचा संघर्ष हासुद्धा धंद्याचाच भाग आहे. भरपूर आणि फुकट प्रसिद्धी होते. तेव्हा संघर्ष टाळू नका.
ज्ञानी महाराज अज्ञानी टिकाकार
अनिरुद्ध बापू, अण्णासाहेब मोरे, नरेंद्र महाराज, आसाराम बापू, नित्यानंद महाराज, कृपाळू महाराज या सगळ्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली नि आयते सुखासिन जीवनही मिळाले. मेंढरासारखी गोळा होणारी जनताही मिळाली. खरे तर ही महाराज मंडळी मूळात खुपच ज्ञानी आहेत. आणि आपण कुणी चमत्कारी पूरुष नाही याचे ज्ञान त्यांना सर्वार्थाने आहे. पण दूनिया जो पर्यंत मूर्ख बनते तो पर्यंत हे लोक वाढतच राहणार. एखाद्या तोडकर किंवा नित्यानंदाचे बिंग फुटले तर त्यावर थोडीफार चर्चा होते आणि बाकी सारे थंडावते. पण जे कार्यकारण भाव जाणणारे आहेत ते कधीच यांना बळी पडत नाहीत. आणि अशा लोकांचीही संख्या बरीच आहे हे चर्चेवरून दिसून येतेच. यात आपले मत न नोंदवणारे आणि तरीही जागरुकपणे आपले जीवन जगणारेही भरपूर आहेत पण आपण कावेबाजांना ओळखूनही आपल्याच समाजबांधवांना त्यांच्या तावडीत तसेच सोडून देणे हा ही एक प्रकारचा कृतघ्नपणाच ठरतो.
बदल हळूहळू होईलच या आशेवर आपण हा झगडा चालू ठेवायलाच हवा. निदान स्वतःच्या विचारांवर जमा होऊ पाहणारी धूळ झटकल्या जाण्याचा का होईना पण फायदा होतोच.
आपण या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरच्या महाराजांच्या भामटेपणाची चर्चा करतो पण प्रत्येकाने किमान महिन्यातून एकदा हजाराची गर्दी जमवणाऱ्या, एक बऱ्यापैकी मठ, जमिन आणि मंदीर भक्तांच्या पैशातून लाटणाऱ्या लोकल महाराजांची नावे सांगितली तर ही मेंदूबधिरीकरणाची किड किती पसरलीय हे लक्षात येईल.
माझ्या आजूबाजूंचे वरील प्रकारात मोडणारे महाराज- दयानंद महाराज, काशिगीरी महाराज, नारायणदेवबाबा, परमानंदगीरी महाराज या सर्वांकडे किमान दिडदोनशे एकर जमिन, एखाददूसरी निवासी आश्रमशाळा, शेतकी विद्यालये, मंदीरे इतकी मालमत्ता आहे. सामाजिक कार्याच्या नावाने मात्र ठणठणाट. चालतात फक्त यज्ञ, जपानुष्ठाने, पारायणे, जेवणावळी.........
इतके सगळे आयते मिळते वरून पून्हा अजरामर होता येते. मग हा गोरखधंदा सोडावा तरी का? कधी कधी तर असे वाटू लागते की हे महाराज लोक खरेच ज्ञानी आहेत आणि टिकाकार अज्ञानी.
आमच्या इकडून एकदा एक सुचना आली होती - तुम्ही एखादी गोष्ट खुपच चांगली पटवून देता. चांगले महाराज होऊ शकता. चला निदान रिकामपणात भामटेपणा करण्याईतकी तरी आपली योग्यता तरी आहे म्हणायची
बापू अपघातातून वाचवतात
प्र.स. यांनी म्हटल्याप्रमाणे बापूंचे भक्तच त्यांच्याबद्दल लिहित असतात किंवा गवगवा करत असतात. याचा अतिशय वाईट अनुभव आयुष्यात घेतला आहे. कधीतरी त्यावर कथा लिहायचा मानस आहे पण तूर्तास थोडक्यात येथे देते.
---
आमच्या इमारतीत एक कुटुंब राहत असे. यातील बाई उच्चशिक्षित, चांगल्या ठिकाणी मानाची नोकरी करणार्या, सुमारे ४० वर्षांपूर्वी आंतरजातीय आणि आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या मनुष्याशी लग्न केले म्हणून लोकांची नाराजी आणि कौतुक आनंदाने सहन करणार्या. आपले विचार परखडपणे मांडणार्या आणि स्पष्टवक्त्या. नवराही चांगला मनुष्य होता. दोन मुले होती; अभ्यासात व्यवस्थित होती. गुणांनी चांगली होती. बाई नोकरी करून सासूसासर्यांना आपल्या घरीच ठेवून होत्या. नंतर या बाईंचे काय झाले कोणास ठाऊक? त्या बापूंच्या भजनी लागल्या की त्यांच्या मोठ्या मुलाला दारूची सवय आधी लागली याचा निश्चित पत्ता नाही.
परंतु, मुलाला रिहॅबमध्ये पाठवणे किंवा घरातच त्याला खडसावणे असे उद्योग न करता बाई अनिरुद्धबापूंवर हवाला सोडून मोकळ्या झाल्या. नंतर एके दिवशी त्यांचा मुलगा एका लहानशा अपघातातून वाचला. तेव्हा ही बापूंची कृपा. केवळ ते आहेत म्हणून हे सर्व झाले असे लोकांना सांगू लागल्या. त्यांच्या तोंडून बापूंच्या अनेक कहाण्या आम्ही ऐकल्या होत्या - बापू स्टेजवर उभे राहीले की लोकांना विष्णूचे बाकीचे अवतार दिसतात. बापूंनी तोंड उघडले की लोकांना त्यात ब्रह्मांड दिसते वगैरे. बापूविशेषांकही मी यांच्याच घरात पाहिला होता.
यानंतर एके दिवशी मुलाचा प्यालेल्या अवस्थेत ट्रेनमधून पडून अपघात झाला आणि त्यात त्याचा एक पाय गेला. तरूण मुलाची ही अवस्था पाहून लोक हळहळले. या बाईही हातातोंडाशी आलेल्या मुलाचे असे झाले म्हणून खचल्या पण त्यातही त्या लोकांना सांगत, "बापूंनी अपघात होईल अशी भविष्यवाणी केलीच होती पण सोबत आशिर्वादही दिले होते म्हणून केवळ पायावर निभावले." :-(
...
प्रतिसादातील घटना भाष्य करण्याच्या पलीकडची!
अजून एक भक्तिभावाचा दाखला म्हणजे मुलाच्या मुंजीच्या पत्रिकेत गणपती अथवा कुलदेवतेऐवजी 'अनिरुद्ध प्रसन्न' (आणि खाली फोटो) छापून घेण्याचा पाहिलेला प्रकार.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
भोंदूगिरीचे बळी
हे असे पडतात. विश्वासावरच परिणाम झाला की तो बळी नाहीच अशी भावना होते. हाच प्लासिबो परिणाम असावा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
गडबड
प्रियालीताईंच्या प्रतिसादातल्या पहिल्या दोन पॅरॅग्राफमधली ष्टोरी मी पुण्यातल्या एका मराठी दैनिकात स्वतःला डॉक्टर म्हणवून घेऊन सुळसुळाट करत असलेले एक मेक्यानिकल इंजिनियर व याच दैनिकाचे एक प्रमुख अधिकारी यांच्या बाबतीत ऐकली होती. जय बापू
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
गडबड कसली?
गडबड कसली ते कळले नाही?
त्या दोघांचे आंतरजातीय लग्न झाले. सुधारक प्रवृत्तीचे असूनही बाबांच्या मागे लागले असे काहीसे?
गडबड कसली
प्रियाली ताई तुम्ही म्हणता तशी ष्टोरी नाहीयेहो. या दैनिकाच्या अधिकार्याचा मुलगा म्हणे व्यसनाच्या गर्तेत अडकला होता. स्वतःला डॉक्टर म्हणवणार्या मेक्यानिकल इंजिनियर साहेबांनी त्याला म्हणे परत मार्गावर आणले. यामुळे या इंजिनियर साहेबांना या दैनिकात आणि त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटीजमधे मुक्त द्वार मिळाले आहे असे म्हणतात. अर्थात ष्टोरी पूर्ण ऐकिव. खरे खोटे माहीत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
हाहाहाहा
मला उगाच ते 'ओ सजना बरखा बहार आई' हे गाणे कशासाठी उपयुक्त आहे याची आठवण झाली. ष्टोरी ऐकली आहेच.