'हू ही अनिरुद्ध बापू'

नुकतेच विकीआन्सर्ज़डॉटकॉमवर हे वाचले:

Anirudha Bapu (Dr. Aniruddha Joshi aka Bapu) is not a simple man or humen being... He is incarnation of GOD. He is Sakshat Saai Baba. I am Devotee of my Bapu and got many experiences as well as getting many more in my day to day life.

I have attended his many Pravachanas (discourses) in Mumbai and he is teaching us How to Love our GOD and how to please him with our innocent Bhakti ( Devotion ) He is teaching mankind as to how to love other humen being and how to respect your own self.

He is GOD He is our Royal King and he know what is going to happen in coming future with mankind. He wrote the Book which is very femous on World War Third which shows extream intteligence and extra ordinary side of my Bapu. Year 2025 is the Golden Day for mankind as he told all of his Devotees ( Year 2025 , Tripurari Pournima Day as per Indian Calender )

Currently our activities are continuously followed throughout the world. Kindly please go through the links mentioned below to be a part of the GOD's family. He has come for us, then why to stay away from HIM?

Amen.

वाचून हे लगेच कळले की हे जे कोण गृहस्थ आहेत त्यांच्या भक्तांचे इंग्रजी दिव्य आहे. थोडा वेळ त्यांना गुगूलन काढल्यावर त्यांचे दर्शनही झाले. त्यांच्या नेमाडपंथी मिशा पाहून अंमळ सुखावलो. काही क्षणासाठी डॉ. नितू मांडकेंचाही भास झाला. हो बापूही नावापुढे डॉ. लावतात/लावायचे. माझ्या एका मित्राने सांगितले की हे बापू एवढे पावरफुल आहेत की ह्यांची आईच त्यांच्या पाया पडते. (बाय द वे, पार्वती गणपतीच्या पाया पडत होती का हो?) तर एकंदरच बापूंबद्दल एवढे वाचल्यावर माझे कुतूहल फार वाढले आहे. ते साक्षात साईबाबा, दत्तदेखील. सगळे तेच. म्हणजे चार ठिकाणी जायला नको.

ह्याशिवाय भक्तांकडून हसत-खेळत इंग्रजीही शिकता येईल ते वेगळेच. असो. तर 'हू ही अनिरुद्ध बापू' ह्या प्रश्नाचे मला समाधानकारक उत्तर मला हवे आहे. मला माहीत आहे की 'हू ही अनिरुद्ध बापू' ह्या प्रश्नाचे उत्तर देणे एवढे सोपे नाही. प्रश्नच तसा आहे. पण तरीही कुणीतरी डिटेलवार उत्तर देईल काय?

आगाऊ धन्यवाद.

जाता-जाता:
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

ह्याचाही अर्थ कुणी समजावून सांगेल का हो!

||अशाप्रकारे मी तूर्तास १० टक्क्याचा नियम पाळणार ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

Comments

चुकीच्या संस्थळावर

माझ्यामते हि चर्चा चुकीच्या (की सुरक्षित?) मंचावर/संस्थळावर मांडली आहे. इथे अशी एकतर्फीच मते येणार.. (त्यामुळे मजा नाही :) )

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

परवानगी आहे

माझ्यामते हि चर्चा चुकीच्या (की सुरक्षित?) मंचावर/संस्थळावर मांडली आहे. इथे अशी एकतर्फीच मते येणार.. (त्यामुळे मजा नाही :) )
हाहाहा. असे वाटत असल्यास तुम्ही हीच चर्चा तिकडे खुशाल मांडा. तुम्हाला तशी परवानगी देत आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सुरक्षित

माझ्यामते हि चर्चा चुकीच्या (की सुरक्षित?) मंचावर/संस्थळावर मांडली आहे. इथे अशी एकतर्फीच मते येणार..

सुरक्षितच्या ऐवजी मऊ असा शब्द वापरायचा होता का तुम्हाला?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मऊच असावे

बघा, नाही नाही म्हणता किती लोकांना पटते ते. :-)

गणगण गणात् बोते

'हू ही अनिरुद्ध बापू' असो वा शेगावचे गजानन महाराज असोत, यांचे देवपण निर्माण करायला धनदांडग्यांसमवेत जर कुणाचा मोठा हात असेल तर तो आहे महाराष्ट्रातील थोर्र् थोर्र् "शिक्षणमहर्षीं'चा. इथे त्या गोष्टीचा पुनरूच्चार करण्याची आवश्यकता नाही की या आधुनिक महर्षींचे आधुनिक "सम्राटा" मध्ये कसे रूपांतर झाले, कारण आपल्याच मायबापांनी म्हणेल ती देणगीची रक्कम याना अदा केलेली असते (आमच्या उन्नतीसाठी..). वरून हमेशा सफेद सफारीमध्ये वावरणारे आणि सफेझ बेंझमधून डौलाने हिंडणार्‍या या जमातीला "डॉ.अनिरूद्ध् बापू" आणि "गणगण गणात बोते" यांचा काळ्या धंद्याच्या बरकतीसाठी आशीर्वाद/आधार हवा असतो.

काही वर्षापूर्वी कोल्हापुरात रमेश मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. रमेश मंत्रीना विजयी करण्यात कोल्हापुरचे शिक्षणमहर्षी डॉ.डी.वाय्.पाटील यांचा अर्थातच सिंहाचा वाटा. त्यामुळे इंदिरा संतासारखी ज्येष्ठ्, श्रेष्ठ लेखिका पराभूत झाली. पाटलांनी मंत्रींचा हा विजय म्हणजे "साक्षात शेगावच्या गजानन महाराजांचा आशीर्वाद" असे उदगार त्यांच्या सत्कार प्रसंगी काढले आणि मंत्री यांनीही नंदीबैलासारखी त्यावेळी मान डोलावली. इतकेच नाही तर प्रत्यक्ष साहित्य संमेलन उदघाटनादिवशी अध्यक्षाच्या हस्तेच "गणगण गणात बोते"च्या गजरात शेगावच्या या महाराजांच्या फोटोसमोर् दीप प्रज्वलित करण्यात आला. अशी आमची पुरोगामी साहित्यिक मंडळी; आणि अशी जर यांची लाजिरवाणी मनोवृत्ती तर मुंबईत ट्रॅफिक ज्यामला फाट्यावर मारून थोर बापूंच्या दर्शनासाठी रांगा लावणार्‍यांनी तर् बोल कसा द्यायचा?

("साचार" च्या गुढाबाबत आमच्या लाडक्या मोल्सवर्थ महाराजांना विचारले. त्यांनी सांगितले :

साचार (सत्य or साच) True, real, actual, just. Mostly used adverbially. Ex. राम परब्रह्म साचार् ॥ सातवा अवतार
तसेच अनेक वाद्यांत साचार ॥ येकचि नाद दुमदुमति.) ~~ बापूंच्या वाणीतील 'साचार' अशा अर्थाने असेल की या भूमंडळी फक्त बापूंचाच 'साचार' दुमदुमणार!

लाजिरवाणी गोष्ट

काही वर्षापूर्वी कोल्हापुरात रमेश मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. रमेश मंत्रीना विजयी करण्यात कोल्हापुरचे शिक्षणमहर्षी डॉ.डी.वाय्.पाटील यांचा अर्थातच सिंहाचा वाटा. त्यामुळे इंदिरा संतासारखी ज्येष्ठ्, श्रेष्ठ लेखिका पराभूत झाली. पाटलांनी मंत्रींचा हा विजय म्हणजे "साक्षात शेगावच्या गजानन महाराजांचा आशीर्वाद" असे उदगार त्यांच्या सत्कार प्रसंगी काढले आणि मंत्री यांनीही नंदीबैलासारखी त्यावेळी मान डोलावली.
अरेरे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट. काय बोलावे! छे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

स्टिंग ऑपरेशन

डंख मोहिमेसाठी बापू हे कसे गिर्‍हाईक वाटते?
मुद्दे:
बापूंचे लिखित विचार उपलब्ध नाहीत असा मुद्दा वर आला आहे. प्रत्यक्ष प्रवचनांमध्ये काही आक्षेपार्ह/चविष्ट (उदा. जातिव्यवस्था, प्रॉब्लेम ऑफ इवल, स्त्री-पुरुष समानता, इ. वरील मौलिक विचार) सापडण्याची शक्यता आहे काय?
चित्रीकरणासाठी तांत्रिक आणि आर्थिक गरजा किती/कोणत्या? (या मुद्यावर गाडी फारशी अडणार नाही अशी आशा आहे.)
स्वतः जाऊन शिरकाव करून चित्रण करण्याचा उत्साह आणि वेळ कोणाजवळ आहे काय? (मला उत्साह आहे, वेळही आहे परंतु त्या परिसरात मला ओळखणारे लोक भेटण्याची शक्यता आहे. कोणी सोबत असेल तर "माझा विश्वास नाही पण याने मला आणले" असा 'बॅडकॉप' म्हणून मी जाऊ शकतो.)
बापूंच्या सान्निध्यातील भक्त/सेवक कितपत संशयी/आक्रमक आहेत?
काही आक्षेपार्ह विचार सापडले तरी ती चित्रफीत प्रकाशित केल्यानंतर किती मोठी गंमत उडण्याची (=गदारोळ होण्याची) शक्यता आहे?
इतर कोणत्या मुद्यांचा विचार करावा लागेल?

याच मुद्यांवर इतरही बाबा/मातांचा विचार करता येईल. (नित्यानंद किंवा स.सा.बा. अशांसारख्यांच्या 'शारीर' कृतींच्या अफवांचे चित्रीकरण हा उद्देश नाही, विचार पकडणे हा उद्देश आहे.)

अरेरे!

आयड्या मस्त आहे. १०-१२ वर्षांपूर्वी (तेव्हा तुम्ही स्टिंग ऑपरेशन करायच्या वयात होतात का माहित नाही) विचारले असते तर मी नक्की आले असते. आता शक्य नाही पण आयड्या भारी आहे. तुम्हाला कोणाची तरी साथ मिळून हा संकल्प सिद्धीस जावो.

फक्त भक्तांपासून सावध राहा.

चिंता

बापूंच्या सान्निध्यातील भक्त/सेवक कितपत संशयी/आक्रमक आहेत? ओह्ह. ही का हो चिंता?
काही आक्षेपार्ह विचार सापडले तरी ती चित्रफीत प्रकाशित केल्यानंतर किती मोठी गंमत उडण्याची (=गदारोळ होण्याची) शक्यता आहे? चिंता नसावीच. पुरेशी उडेल. अगदी हाती पॉपकॉर्न घेऊन झाडावर बसून मजा पाहण्यात काही दिवस घालवता येऊ शकतील इतकी नक्कीच.
इतर कोणत्या मुद्यांचा विचार करावा लागेल? काय विचारताय राव?
असे प्रश्न तुम्हालाही पडल्याचे पाहून डोळ्यांत पाणीच आले. हातपाय गळाठले आमचे. पुढे कसे होणार या देशाचे, मुक्त विचारांचे, लोकशाहीचे, अशी चिंता लागली आहे आता.

धन्यवाद

माझ्या नेहमीच्या गल्लीत, माझ्या आवडत्या खांबाशेजारी पायधूळ झाडल्याबद्दल धन्यवाद.

ओह्ह. ही का हो चिंता?

जितके संशयी असतील तितकी कॅमेरा लपविण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागेल. जितके आक्रस्ताळे असतील तितकी मला अधिक फुशारकी मारता येईल. नाहीतर एखाद्या पुसिलॅनिमसशी नडण्यात काय गंमत?

काय विचारताय राव?
असे प्रश्न तुम्हालाही पडल्याचे पाहून डोळ्यांत पाणीच आले. हातपाय गळाठले आमचे. पुढे कसे होणार या देशाचे, मुक्त विचारांचे, लोकशाहीचे, अशी चिंता लागली आहे आता.

उपरोध समजला पण नेमके काय म्हणता ते मात्र स्पष्ट नाही. माझ्यावर फट्टूपणाचा आरोप आहे काय?

धन्यवाद

धन्यवाद.
आरोप वगैरे काही नाही. जे तुम्ही लिहिले ते बोलके आहे. कॅमेरा लपवणे, एखाद्या पुसिलॅनिमसशी लढणे; जालावरचे, घेण्यास सोपे असणारे पवित्रे आणि वास्तवातील स्थिती वगैरेची जाणीव तुम्हाला आहे, हे पाहून त्यातून इतरही काही जण धडे घेतील असे वाटल्याने तसे लिहिले इतकेच.
सर्वांना एक विनंती - माझा मुद्दा इथे दिलेल्या यासह दोन प्रतिसादांत मांडलेल्या मुद्याइतकाच आहे. त्याचा मूळ विषयाशी कोणताही संदर्भ जोडू नये.

गैरसमज

पुस्सिशी नडण्यात मला स्वारस्य वाटत नाही असे मी लिहिले आहे.
कॅमेरा लपविणे आवश्यकच असते, त्याशिवाय 'ऑफ गार्ड' विधाने मिळणार नाहीत. चित्रफीत माझ्या नावानिशी प्रसिद्ध करण्यास मी घाबरणार नाही.

असेल तर

मला वाटते की यात काही दम नाही. मेलेल्यांना काय मारता?
एखाद्या मोठ्या मशिदीत हे करा (तिथे तर चिक्कार क्लेम्स सापडतील की बापू तर अनिसचे प्रतिनिधीच भासू लागतील!) मग तुमची हिम्मत कशी दिसेल ते पाहू...
त्याची भीती वाटत असेल तर नागालँड किंवा मिझोरमच्या चर्चमध्ये असले डंख मारून दाखवा.

एखाद्या हिंदु बुवा बाबा ला झोडणे सोपेच असते, त्यात काय विशेष? लाडू सारखे लै लल्लू पंजू लोकं ते करतात.

नीट वाचा

  1. मशिदीच्या आत मी काही करावे अशी अपेक्षा का ठेवता? बाबा/मातांच्या मठांमध्ये केवळ चित्रण करून ते नंतर प्रसिद्ध करण्याविषयीची चर्चा मी केली आहे.
  2. येथे, फॅनॅटिकांवर टीका करण्यापेक्षा समन्वयवाद्यांवर टीका करण्यात मला अधिक रस आहे. जहाल लोकांवर टीका होतच असते, त्यांना मास बेस मिळेल अशी परिस्थिती सध्या नाही. उलट, समन्वयवादी लोक सेफ्टी वॉल्वचे काम करून धर्माचा समूळ नायनाट घडणे लांबवितात.

मग

मग मुल्ला मौलवींचे आणि फादर्सचे दरबार कमी आहेत का?
त्यात करून दाखवा चित्रीकरण आणि नंतर प्रसिद्धीही.
मग पाहू...

हिंदूंना झोडणे सोपेच असते हो. त्यात काही विषेश नाहीच. असले फालतू निरुपद्रवी प्रोजेक्ट पायलीला पन्नास लोक करतात.
तुम्ही काही विषेश सांगत नाही आहात.

हिम्मत इतर धर्मांतल्या वाईट गोष्टीं बंद करण्यासाठी दाखवा, ही मग बडबड करा!

सांगा

मग मुल्ला मौलवींचे आणि फादर्सचे दरबार कमी आहेत का?
त्यात करून दाखवा चित्रीकरण आणि नंतर प्रसिद्धीही.

पांढरपेशा लोकांमध्ये सन्माननीय असलेला कोणी मुस्लिम/ख्रिश्चन बाबा (मुंबई-पुण्याजवळ) माहिती आहे का? सोबत येता का?

हिंदूंना झोडणे सोपेच असते हो. त्यात काही विषेश नाहीच. असले फालतू निरुपद्रवी प्रोजेक्ट पायलीला पन्नास लोक करतात.
तुम्ही काही विषेश सांगत नाही आहात.

मी सुचवितो तशी गंमत उडाल्याचे उदाहरण सांगा बरे!

हिम्मत इतर धर्मांतल्या वाईट गोष्टीं बंद करण्यासाठी दाखवा, ही मग बडबड करा!

प्रमोद सहस्रबुद्धे यांनी एका उच्चब्रो बाबाविरुद्ध तसा प्रयत्न केला होता.
जॉय्स मेयर कधी महाराष्ट्रात येत असेल तर जरूर निषेध करू(या). फालतू लोकांना आम्ही विरोध केला तर त्यांना फुकटची प्रसिद्धी मिळते. वृंदा करात यांनी बोंबाबोंब केली तेव्हापासून रामदेवबाबा बघा किती प्रसिद्ध झाला!

बाय द वे

पंत अहो ख्रिश्चनधर्मीयात देखील टिकाकार बरेच.

माझ्या एका आवडत्या कलाकाराचा हा व्हिडिओ बघा.

एकदम ह ल्क ट पण मुद्देसूद

पण अशी ऑसम चर्चा काही इथे किंवा लाडूंच्या प्रिय वाडीत कुठेच दिसत नाही.

कूपमंडूकत्व?

कोणी मुस्लिम/ख्रिश्चन बाबा (मुंबई-पुण्याजवळ) माहिती आहे का?
जॉय्स मेयर कधी महाराष्ट्रात येत असेल तर जरूर निषेध करू(या).

  1. परदेशी विषयांवर टीका करण्यात 'मराठीपणा' काय?
  2. 'टार्गेट ऑडियन्स' नसेल तर नेमके कोणाचे प्रबोधन (हवे तर त्याला खिजविणे/खिल्ली उडविणे म्हणा) करण्यासाठी चर्चा चालवावी?

मोडकसाहेब, तुम्ही आणि ठणठणपाळ!

बापूंच्या सान्निध्यातील भक्त/सेवक कितपत संशयी/आक्रमक आहेत? ओह्ह. ही का हो चिंता?
काही आक्षेपार्ह विचार सापडले तरी ती चित्रफीत प्रकाशित केल्यानंतर किती मोठी गंमत उडण्याची (=गदारोळ होण्याची) शक्यता आहे? चिंता नसावीच. पुरेशी उडेल. अगदी हाती पॉपकॉर्न घेऊन झाडावर बसून मजा पाहण्यात काही दिवस घालवता येऊ शकतील इतकी नक्कीच.
इतर कोणत्या मुद्यांचा विचार करावा लागेल? काय विचारताय राव?
असे प्रश्न तुम्हालाही पडल्याचे पाहून डोळ्यांत पाणीच आले. हातपाय गळाठले आमचे. पुढे कसे होणार या देशाचे, मुक्त विचारांचे, लोकशाहीचे, अशी चिंता लागली आहे आता.

मोडकसाहेब, तुम्ही आणि ठणठणपाळ! किती लाल करायची वाक्ये. असो. तुमच्या डोळ्यांत पाणी आले हे उत्तमच झाले. ह्या पाण्यात सगळे काही धुतले जाईल असे वाटते. (मल्हार/मलहार रागाची किमयाच न्यारी.) मुक्त विचारांचे समर्थन करणे/पाठराखण करणे चांगलेच. बाकी समाजाची फार काळजी करू नका ;)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नो कमेंट्स

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हे वाचलं. पटलं. स्वतःला लागू होतं हे कळलं. त्यामुळं तुम्ही बाकी वर जे लिहिलंय त्याविषयी नो कमेंट्स!

आत्मसाक्षात्कार विरळाच

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हे वाचलं. पटलं. स्वतःला लागू होतं हे कळलं.
असा आत्मसाक्षात्कार होणे दुर्मीळच. ही सगळी बहुधा बापूंची कृपा.

त्यामुळं तुम्ही बाकी वर जे लिहिलंय त्याविषयी नो कमेंट्स!

:) तुमच्यासारखेच आम्हीदेखील मुक्तविचारांचे पाठीराखे असल्यामुळे आम्ही, तुम्ही किंवा इतरांनी वर, खाली, आजूला, बाजूला किंवा इतरत्र (आउटरस्पेसमध्ये) जे लिहिलंय किंवा लिहिलेलं नाहीय त्याविषयी आम्ही आपले कॉमेंट करत राहू.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सहमत - असहमत!

असा आत्मसाक्षात्कार होणे दुर्मीळच. ही सगळी बहुधा बापूंची कृपा.

पूर्वार्धाविषयी सहमत. उत्तरार्धाविषयी (तिथं स्मायली वगैरे नसल्यानं तुम्ही ते गंभीरपणे लिहिलं आहे असं मानून) असहमत. अर्थात, मुक्त विचारांच्या तत्वानुसार ते तुमचे मत असू शकते. त्याविषयी आदरच आहे! :)

अरेरे

तिथं स्मायली वगैरे नसल्यानं तुम्ही ते गंभीरपणे लिहिलं आहे असं मानून

किती बरे हा आज्ञाधारकपणा! 'हसा' असे सांगितले तरच हसायचे का?

इथले बाबा आणि त्यांचे भक्त

याबद्दल इथल्या विदुषींनी "साक्षात्कार" या शीर्षकाच्या प्रतिसादामध्ये केलेले भाष्य मला अतिशय आवडले. ते खालील दुव्यावर वाचता येईल.

दुवा

हरि ओम्

सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम अनिरुद्ध बापुंवी जी चुकीची माहिती लोकांसमोर आलेली आहे त्याविषयी अतिशय वाईट वाटते .आज सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे लाखो अनुयायी आहेत..त्यात.अगदी लहान मुलानाप्स्सून ते वृद्ध लोकांपर्यंत भक्त आहेत.आज बापुनाची जगबारात उपासना केंद्रे आहेत..या उपसना केंद्र मध्ये येनाय्साठी कुठल्याही प्रकारचा निधी लागत नाही. तसेच त्यांचं दर्शन घ्ण्य्साठी कुठलीही फी दय्वी लागत नाही...मुख्य म्हणजे..प्रमोद यांची चुकीची माहिती आहे....ती सुधारावी....हि अपेक्षा..उगाच माहित नसत्ना..लोकांना चुकीची माहिती पुरवणे..हे योग्य नाही..
बापू हे डॉक्टर आहेत.....दर गुरुवारी ते प्रवचने देतात..दर शनिवारी संस्थे मार्फत जागोजागी उपसना करण्यात येते.. जुईनगर येथे मंदिर ,कर्जत येथे, गोविध्यापिथम नावाची वास्तू,रत्नागिरी येथे अतुलीत्बालाधाम नावची वास्तू,खार येथे हैप्पी होमे ....या वास्तू आहेत...
अनेक प्रकारच सामजिक कार्य बापूंच्या संस्थे मार्फत निसावार्थ पद्धतीने चालते.....ते पुढील लेखात.
परंतु जर काही निरुपद्रवी समाज एकत्र बसून देवाची प्रार्थना आणि सामजिक कार्य करत असेल तर..नुसती टीका करणार्यांनी याचा विचार करावा कि ..माही नसत्ना चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचवणे हे निशेध्यार्ह आहे ...

^ वर