शहरातील रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा आणि शासकीय कामा बद्दल आपण माहिती मागू शकतो

माहितीचा अधिकार खालील लिंक्स वर आणि CIC http://www.cic.gov.in/ या भारत सरकारच्या मुख्य माहिती अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या साईट वर सर्व माहिती मिळेल . तसेच हा अधिकार वापरून शासनावर जनतेने दबाब आणून न्याय कसा मिळवला यांच्या हकीकती सुद्धा आहेत
यशद पुणे http://yashada.org/index.php?option=com_content&view=article&id=204&Item...
महा न्यूज http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=hxergx9g/MZi081LMkz6QkxBC033BLqdPE|Ngh7sOP5XtPyeWnkRuQ==
मुख्य माहिती आयुक्त महाराष्ट्रा राज्य http://sic.maharashtra.gov.in/
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=858... माहिती
अधिकाराची नोकरशाही कशी वाट लावते हे येथे लोकसत्ता त वाचा.
एक साधा पांढरा कागद पेन आणि १० रुपयाचे तिकीट यांच्या साहीयाने आपण शासकीय निम्म शासकीय सरकार अनुदानित संस्था सहकारी संस्था सार्वजनिक ट्रस्ट यांच्या कडून आपणास आवशक ती माहिती आपण मागू शकतो. या साठी प्रत्येक कार्यालयात माहिती अधिकाऱ्यांची नेमणूक सरकारने केली आहे. या अधिकार्याने ही माहिती ३० दिवसात देणे बंधनकारक आहे. याने
वेळेत ही माहिती दिली नाही किंव्हा खोटी माहिती दिली, त्या माहितीने आपले समाधान झाले नाही तर त्या कार्यालयाच्या अपिलेट माहिती अधिकार्याकडे आपणास तक्रार करता येते. तेथे ही माहिती बरोबर दिली नाही तर मुख्य अधिकाऱ्या कडे तक्रार करता येते . आपल्याला माहिती देण्याचे आदेश हा अधिकारी देतो. तसेच माहिती दिली नाही, चूक दिली म्हणून २५००० पर्यंत दंड ही माहिती अधिकाऱ्यास लावण्याचे त्यास अधिकार आहे,
शहरातील रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा आणि शासकीय कामा बद्दल आपण माहिती मागू शकतो या मुळे कारभार स्वच्छ होण्यास मदत होईल .आज पर्यंत आपणास कोणी विचारणार नाही म्हणून जी मुजोरशाही नोकर शाही राजकारण्यात होती , तीला आळा बसत आहे. आपला भ्रष्ट्राचार उघडकीस येत असल्या मुळे माहिती मागणार्यांचे खून केले जात आहे. पण हे फार दीवस चालणार नाही. जनता मोठ्या प्रमाणात जागृत झाली की या सर्व भ्रष्ट्राचारास आळा नक्की बसेल.
मंत्र्यांची संपत्तीसाठी माहितीचा अधिकार
कार्यकतेर् सुभाषचंद अग्रवाल यांनी हा अर्ज केला होता.कार्यकतेर् सुभाषचंद अग्रवाल यांनी हा अर्ज केला होता. नेमकी माहिती कुणाकडे आहे, याबाबत घोळ असल्याने त्यांचा हा अर्ज पंतप्रधान ऑफिस आणि कॅबिनेट सचिवालयामध्ये लटकला होता. गेल्या डिसेंबरमध्ये पंतप्रधान ऑफिसने ही माहिती उघड करता येत नाही, असे स्पष्ट केले.
लोकसभा आणि राज्यसभा यांच्या परवानगीने हा तपशील माहितीच्या अधिकारात देता येतो, असे म्हणून 'केंदीय माहिती आयोगा'ने (सीआयसी) हे प्रकरण अध्यक्ष सोमनाथ चटजीर् यांच्याकडे सोपवले. लोकांचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक उमेदवारांची संपत्ती, उत्पन्न व कर्ज आदिविषयी माहितीच्या अधिकारांतर्गत सविस्तर तपशील द्यायला हवा, असे सुप्रीम कोर्टाने एका निकालात म्हटले होते. त्याचाच आधार घेऊन 'सीआयसी'च्या कमिशनरनी राज्यसभेशी संवाद साधला.
त्यामुळे अग्रवाल यांनी पुन्हा याच आशयाचा अर्ज दोन्ही सभागृहांना केला. यावेळी त्यांना निराश व्हावे लागले नाही. १८ पैकी १६ खासदारांच्या मालमत्तेविषयीची माहिती उपलब्ध असल्याचे राज्यसभेच्या सचिवालयाने कळवले आहे
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

धन्यवाद

फारच चांगला उपक्रम,
कृपया आपण अशीच उदाहरणे व माहिती देत राहावी, हि नम्र विनंती.
ह्यातून सर्वसामान्य (माझ्यासारख्या ) लोकांचे मनोधैर्य नक्कीच वाढेल आणि हळूहळू ते सुद्धा ह्याचा वापर करू लागतील.
धन्यवाद

काही प्रश्न

माझी एक शंका आहे, माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्त्वात आलाच कसा? जर हा नोकरशाही आणि राजकारण्यांना गैरसोयीचा आहे (असे लेखातील मतांवरुन दिसते) तर या नोकरशहांनी आणि राजकारण्यांनी हा कायदा होऊ कसा काय दिला? सरकारला हा कायदा करणे का भाग पडले असावे? जनता जर एवढी पॉवरफुल आहे, तर अनेक गोष्टींमध्ये सरकारविरूद्ध/ नोकरशाहीच्या मनमानीविरुद्ध वेळोवेळी असहायता का व्यक्त होते?

हा कायदा बनवण्यासाठी सरकारला/ नोकरशाहीला काहीच श्रेय जाऊ नये का?

हा अधिकार वापरून शासनावर जनतेने दबाब आणून न्याय कसा मिळवला यांच्या हकीकती सुद्धा आहेत

या हकीकती शासनाच्याच वेबसाइटवर असाव्यात हे इंटरेस्टिंग आहे.

जनता मोठ्या प्रमाणात जागृत झाली की या सर्व भ्रष्ट्राचारास आळा नक्की बसेल.

यावरुन असं दिसतं की जसं काही जनता म्हणजे सरकारपासून अगदी वेगळा असा घटक आहे, ज्याचं कायम शोषणच केलं जातं. आता ही जनता (म्हणजे नेमकं कोण?) जणू काही झोपलेली आहे, म्हणून भ्रष्टाचार होतोय. ती जागी झाल्यावर होणार नाही. म्हणजे काय? सरकारमध्ये/ नोकरशाहीमध्ये कुठली माणसं असतात? जनतेमधलीच ना? ऑफिसमधून घरी गेल्यावर तेही जनताच असतात. कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर त्यांना काही वेगळी वागणूक मिळत नाही. नरसिंहराव, दिनकरन इ. प्रकरणात हे दिसले आहेच.

कार्यकतेर् सुभाषचंद अग्रवाल यांनी हा अर्ज केला होता.

हे अग्रवाल कोण आहेत? यांच्याविषयी काही माहिती आहे काय?

बाकी माहिती अधिकाराच्या कायद्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आलेले आहे/ येत आहे/ येईल यात वादच नाही.

धन्यवाद

माहिती अधिकाराचा वापर करणं, व त्याआधी तो पदरात पाडून घेणं हे तितकं सोपं नाही हे आपल्या लेखनावरून दिसून आलं. त्यासाठी लोक जिवाचं रान करत आहेत हे वाचून बरं वाटलं. माहितीबद्दल धन्यवाद.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर