व्यक्ती आणि वल्ली

विविध प्रांतात आघाडीवर ठरलेल्या,असणार्‍या व्यक्तींचा परिचय सर्वांकरता मराठीत उपलब्ध व्हावा ह्या हेतूने ह्या समुदायाअंतर्गत लेखन करावे. साहित्य,विज्ञान, कला, वाणिज्य, मनोरंजन, राजकारण,समाजप्रबोधन, क्रिडा, व्यवसाय - धंदा, इ. विविध प्रांतात धुरा वाहणार्‍या व्यक्ती आणि वल्लींचे जीवनमान, त्यांचे अनुभव, त्यांच्याबाबत आपण वाचलेले अनुभव, संकलित माहिती, आठवणी इथे मराठीतून मांडा. उदाहरणादाखल स्वांतत्र्ययोद्धे, लेखक, कवी, उद्योजक, संत, समाज संघटक, वैज्ञानिक, तंत्रज्ञ, तत्वज्ञ, समाज सुधारक, नेते, अभिनेते, शिक्षक, वैद्य , पत्रकार, कलाकार, इतिहासकार इ. इ.

नवा लेख लिहिताना ज्या व्यक्तीबद्दल माहिती हवी आहे अथवा द्यायची आहे त्याचे नाव लेखाला द्यावे. त्या व्यक्तीबाबत आपणांस असलेली किमान माहिती लेखात द्यावी. सदस्यांनी सदरहू व्यक्तीबद्दलची आपली मते,अनुभव,माहिती, प्रश्नोत्तरे प्रतिसादाच्या रूपांत द्यावीत. उदा. जन्मतारीख, जन्मस्थळ,शिक्षण, यशाच्या पायर्‍या आणि शिखरे, मैलाचे दगड, मला आलेला अनुभव, असे वाचले होते, इथे भेटलो होतो, मुलाखत, चर्चा, मतांतरे, प्रपंच, सध्या काय करत आहेत, पुरस्कार, मान-सन्मान, उपेक्षा, कष्ट, हाल, सवयी, छंद, मार्गदर्शन इ. इ.

 
^ वर