मनात मोठे स्वप्न पाहण्याची उर्मी असेल, स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द असेल तर असाध्य ते साध्य होऊ शकते

मुख्य पानई सकाळ विशेष

हातगाडीवाल्याचा मुलगा झाला सी. ए.
-
Tuesday, July 20, 2010 AT 12:50 AM (IST)
Tags: sandeep ghodke, chartered accountant, north maharashtra

आनंद सपकाळे
भुसावळ - घरची परिस्थिती कितीही गरिबीची असली तरी मनात मोठे स्वप्न पाहण्याची उर्मी असेल, स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत करण्याची जिद्द असेल तर असाध्य ते साध्य होऊ शकते, हे येथील एका हातगाडीवाल्याच्या मुलाने दाखवून दिले आहे. त्याचा मुलगा सी. ए. (चार्टर्ड अकाऊंटंट) झाला आहे. सी. ए. झालेल्या संदीप रमेश घोडके या युवकाची ही कहाणी आहे.

इंटरनेटवर आज या परीक्षेचा निकाल लागला. त्यात संदीप उत्तीर्ण झाल्याचे कळताच कळताच त्याच्या आईवडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. संदीपचे प्राथमिक शिक्षण येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात, तर माध्यमिक शिक्षण महाराणा प्रताप विद्यालयात झाले. दहावीनंतर त्याने येथील नाहाटा महाविद्यालयात प्रवेश घेतला. संदीपने बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. अकाऊंट विषयात तो तालुक्‍यातून प्रथम आला. नाहाटा महाविद्यालयातील प्राध्यापक डी. एम. राठी व जळगाव येथील चार्टंर्ड अकाऊंटंट गोपाल सी. पांडे यांनी सी. ए करण्याचा सल्ला आणि प्रेरणा दिल्याचे संदीप सांगतो. फाऊंडेशन कोर्सनंतर संदीप ट्रेनिंगसाठी मुंबईला गेला. तुटपुंज्या पैशात आपल्या गरजा कमी केल्या. जास्तीत जास्त काटकसर करून "आर.जेथलिया अँड कंपनी'त (फोर्ट) तीन वर्षांचा प्रशिक्षण पूर्ण केले.

आईवडील व दोन बहिणी असा संदीपचा परिवार आहे. दोन बहिणी सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. वडील रमेश नेमिनाथ घोडके हातगाडीवर हंगामी व्यवसाय करतात. उन्हाळ्यात कुल्फी, पावसाळ्यात रांगोळी, रक्षाबंधनावेळी राख्या, गणेशोत्सवात हातगाडीवर गणेशमूर्तींची विक्री करतात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एकाच व्यवसायावर अवलंबून राहता येत नाही. त्यामुळे हंगाम बदलला, की व्यवसायही बदलतो. चार पैशांची कमाई व्हावी, हाच त्यामागचा उद्देश असतो. या संघर्षातून मिळणाऱ्या मिळकतीवर कुटुंबाचा चरितार्थ चालवतो, असे ते सांगतात. वडिलांचा हा नित्य संघर्ष संदीपने लहानपणापासून पाहिलेला. त्यामुळे अडीअडचणीच्या वेळी वडिलांना व्यवसायात त्याने मदत केली आहे.

आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी म्हणजे एक प्रकारची परीक्षाच असते. ध्येय गाठण्यासाठी कितीही अडथळे आले तरी दृढनिश्‍चयाने आपण ठरवलेली वाट सोडायची नसते, असे वडील नेहमी सांगतात. त्यामुळे मी जिद्द, चिकाटीने शिकायचे ठरविले, असे संदीप सांगतो. प्रशिक्षण काळात मुंबईला आर. जेथलिया कंपनीत खूपच शिकायला मिळाले. त्यात व्यावसायिक प्रशिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास व इतरही अनेक गोष्टींचे शिक्षण मिळाले. या यशात आईवडिलांचा मोलाचा वाटा आहे. रोज सकाळी चारला अभ्यासासाठी उठवण्याची सवय आईने लावली. परीस्थितीवर मात करण्याचे मानसिक धाडस बाबांकडून मिळाले, असे संदीप सांगतो.

घरात शिक्षणाच्या कोणत्याही सुविधा नसताना केवळ दृढविश्‍वास व मेहनतीच्या जोरावर संदीपचे सी. ए. होणे ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. अत्यंत तुटपुंज्या मिळकतीतही आयुष्याचा गाडा सांभाळत मुलांना अभ्यासाचे योग्य संस्कार दिले. योग्य संस्कार, मेहनतीमुळे माझा मुलगा सी. ए.ची परीक्षा पास होऊ शकला. मी आयुष्यभर केलेल्या श्रमाचे चीज झाल्याचे रमेश घोडके यांनी सांगितले. भविष्यात एक नामांकित चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचे संदीपचे स्वप्न आहे.

दहावीत कमी गुण
वास्तविक दहावीच्या परीक्षेत संदीपला खूपच कमी गुण मिळाले. त्यामुळे नाराज न होता त्याने तेव्हाच खूप अभ्यास करण्याचा, जीवनात काही तरी करून दाखवायचा निश्‍चय केला. त्यानुसार अकरावीपासूनच अभ्यासाची जोरदार तयारी सुरू केली.

Comments

दारूगोळा संपला?

हा केवळ चावटपणा आहे. आपलं नाव दर दोन-तीन लेख वा चर्चा प्रस्तावानंतर दिसावे ही एकच इच्छा ठणठणपाळ यांची दिसते. इसकाळ मधली बातमी घेवून काहीतरी स्वतःचे मत/प्रश्न मांडले असते तर ठिक. पण वर लिहीलेले सगळेच्या सगळे कॉपी-पेस्ट करून ठेवले आहे. हे मला तरी आवडलेले नाही.
बातमी कॉपी केलीच परंतु स्वतःहून छोटे शीर्शक ठेवण्याइतपत ही कश्ट नाहीत?
ठणठणपाळ, साहेब हा आळशीपणातून केलेला चावटपणा आहे.

बातमीकारांची धारणा !

हातगाडीवाला, रीक्षावाला, हमाल अशा व्यक्तिंच्या घरात हुशार मुल जन्माला येऊ शकत नाही अशी एक बातमीकारांची धारणा असते की काय अशी नेहमी शंका येते. असे मथळे असलेल्या बातम्या वाचल्या की, हसू येते.

अशा बातम्या रंगवून् सांगण्यापेक्षा त्याने अभ्यास कसा केला, खिशात पैसे नसतांना शिकवण्या न् लावता जास्त मार्क कसे मिळाले? हे त्याचे मॉडेल समजावून् सांगितले तर् जास्त वाचनीय होतील ह्या बातम्या.

प्रतिकुल परिस्थिती

संदीपच्या यशाचे कौतुक आहे पण असे वाटते कि प्रतिकूल परिस्थितीमधेच माणूस असे काहि करु शकतो. मध्यमवर्गिय घरात जन्मास आला असता तर हि बातमी छापून आली आसती?

चरित्रनायक

प्रत्येक चरित्रनायक हे म्युनिसिपालिटि च्या दिव्याखाली अभ्यास करुनच का मोठे होतात कोण जाणे? -- पु.लं.

कोणी तरी यशस्वी विद्यार्थ्याचे कोतूक करेल म्हणून............

कोणी तरी यशस्वी विद्यार्थ्याचे कोतूक करेल म्हणून मी ही बातमी माझे विचार न मांडता फक्त बातमी दिली. पण फक्त स्वत:च्या मुलांचे कोतूक ऐकवायची/ करायची सवय असल्या मुळे हा कोण गाडीवाल्याचा मुलगा सी ए झाला हे ऐकून,आजच्या संगणक युगात ही ज्ञान ही आमचीच मक्तेदारी आहे अश्या भ्रमात वावरणाऱ्या अनेकांच्या मनात असूया निर्माण झाली. त्या असूये पोटी मग पुढील COMMENTS टाकल्या गेल्या . दारूगोळा संपला? हा केवळ चावटपणा आहे. प्रत्येक चरित्रनायक हे म्युनिसिपालिटि च्या दिव्याखाली अभ्यास करुनच का मोठे होतात कोण जाणे? -- पु.लं..... हा पु ल चा मध्यमवर्गीय फालतू जोक लिहिला गेला. आहो पु ल चा जमाना गेला. आता उपराकार, ढसाळ, नेमाडे माने यांच्या समाजाचे, दाहक वास्तववादी सत्य चित्रण करणाऱ्यांचा जमाना आहे. ज्ञान ही कोणा एकाची मक्तेदारी नाही हे वास्तव सत्य समजून घेण्याची वेळ आली आहे. काळ हा कोणा करता थांबत नाही.

मक्तेदारी !!!

:) किती त्रागा करुन घेताय.

कौतुक केले आहे हो, पण नुसतेच कौतुक करावे म्हणून तुम्ही लेख लिहिणार असाल तर तसे सांगावे ना, इथे तशी पद्धत रूढ नाही.
तरीही उत्तर असे आहे कि आपण कौतुक करावे म्हणून तो सी. ए. झाला नाही, आणि तुम्ही त्याचा कौतुक केला म्हणून बाकी गाडीवाल्यांची मुले काही प्रेरित होणार नाही.
विनोदाबद्दल म्हणाल तर आपण आपल्या स्तरावर राहिलेले चांगले, उगाच थोरामोठ्यांची लायकी काढण्यात काय उपयोग...तरीही एक माणूस म्हणून तुमचे मत प्रदर्शित करण्याचा हक्क आहे हो.

'माझी टोपी घेतली, राजा भिकारी...'

कोणी तरी यशस्वी विद्यार्थ्याचे कोतूक करेल म्हणून मी....
काय केले? 'कॉपी-पेस्ट' केले. आपण स्वतः कौतुक केले का?
'राईट क्लीक करून कॉपी या नावावर क्लीक च बटन दाबयचं व जिथे पाहीजे तिथे पुन्हा तसेच करून 'पेस्ट' या नावावर क्लीक च बटन सोडायचं' याला तुम्ही द्न्यान म्हणता? व
हे 'द्न्यान' तुम्ही मिळवलं म्हणून मी तुमची असुया करतो?

'एक उंदिर व एक राजा' यांची गोष्ट अंधुकशी आठवली. त्यात उंदिर म्हणतो, 'माझी टोपी घेतली (इथे...'उडवली'), राजा भिकारी...'

दीप रमेश घोडके

दीप रमेश घोडके यांच्या भावी वातचालीस् शुभे॰या..दुदो नहाओ पुतो पलो

 
^ वर