जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार:

'शिवाजीः द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया’ या जेम्स लेन लिखित पुस्तकावर राज्य सरकारने टाकलेली बंदी उठवण्याचा मुंबई हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. जेम्स लेन लिखित या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात काही आक्षेपार्ह माहिती देण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टात न्या. बी. के. जैन आणि न्या. ए. के. पटनाईक यांच्या खंडपीठात या प्रकरणी सुनावणी झाली. त्यांनी हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला, यात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाकडून कळवण्यात आले.

मुळात शासनाने घातलेला बंदीचा निर्णय योग्य होता का? हायकोर्टाने व नंतर सुप्रीम कोर्टाने ह्या पुस्तकावर राज्य सरकारने टाकलेली बंदी उठवून योग्य पाऊल उचलले आहे का? हा निर्णय आल्यावर जेम्स लेनच्या या पुस्तकाची एकही प्रत राज्यात विकू देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. इतर पक्ष आणि संघटनाही देतील. अहमहमिका लागेल. अशा इशारांबद्दल तुम्हाला काय वाटते?

कृपया मते मांडावी, ही विनंती.

लेखनविषय: दुवे:

Comments

इश्यु

निवडणुक आल्या नाहीत अजुन. हा इश्यु कसा काय येतोय?
प्रकाश घाटपांडे

आक्षेपार्ह सत्य

या पुस्तकात नक्की 'आक्षेपार्ह' मजकूर काय होता हे आठवत नाही. तो असत्य नसावा असं गृहित धरतो, नाहीतर ही बंदी उठली नसती.

तसं असेल तर काही ऐतिहासिक सत्यं आक्षेपार्ह मानली जातात हे दुर्दैव आहे. एखाद्या असामान्य का होईना, पण माणसाला देवपदाला पोचवायचं, आणि मग त्याचे सामान्यपणाचे पुरावे अशा अनैतिक मार्गांनी पुसून टाकायचे हे सामाजिक अपरिपक्वतेचं लक्षण आहे. छापलेला शब्द म्हणजे निव्वळ एक मत असतं, व त्याने मोठेपणाला कलंक लागत नाही हा विश्वास निर्माण व्हायला ९०% साक्षरतेच्या काही पिढ्या जाव्या लागतात बहुतेक... मग त्या अक्षरांत खरं तर तितकी शक्ती नसते हे उमगत असावं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

बंदीचे कारण

या पुस्तकात नक्की 'आक्षेपार्ह' मजकूर काय होता हे आठवत नाही. तो असत्य नसावा असं गृहित धरतो, नाहीतर ही बंदी उठली नसती.

बंदीचे कारण मजकुर सत्य असत्य असे नव्हते. सरकारने १५३ व १५३अ या कलमांचा वापर करून बंदी घातली होती.
Laine's Shivaji was, ultimately (months after the book had been withdrawn from the market), banned, the author and the publisher charged under Sections 153 ("Wantonly giving provocation with intent to cause riot") and 153A ("Promoting enmity between different groups on grounds of religion, race, place of birth, residence, language, etc., and doing acts prejudicial to maintenance of harmony ") of the Indian Penal Code. (या दुव्यावरून)

निरर्थक

सॅटॅनिक व्हर्सेसवर तर कस्टम्स कायद्याखाली बंदी होती. FAPP (आणि न्यायालयातही?) बदनामी हाच विषय होता.

युक्तिवाद

सरकारने आणि बचाव पक्षाने काय काय युक्तिवाद केले हे मला माहीत नाही. परंतु बंदी घालण्यासाठी वापरलेल्या कलमांवरून 'समाजात अशांतता माजवण्याचा उद्देश' या कारणाने बंदी घातल्यासारखे वाटते. (इतर काही कलमे वापरली असल्यास त्याविषयी माहिती नाही.) भारतीय समाज कशानेही दुखावून जातो व अशांतता माजण्यास काहीही कारण पुरेसे ठरते. (केस इन पॉइंट या लेखात भारतीयांच्या भावना दुखावण्यासारखे काय होते हे कळत नाही.)

अवांतर: 'सॅटॅनिक वर्सेस' ही सलमान रश्दीची सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे, असे माझे मत आहे.

सहमत

भारतीय समाज कशानेही दुखावून जातो व अशांतता माजण्यास काहीही कारण पुरेसे ठरते.
सहमत आहे. भारतीय सामाजची संवेदनशीलता पाहीली की पायाखाली लवंग चिरडली म्हणून सर्दी होणार्‍या राजकन्येची आठवण होते.
दा विंची कोड प्रदर्शित झाल्यावर कॅथोलिक धर्माची राजधानी असलेल्या इटलीत लोक आरामात होते पण भारतातील किरिस्तावांच्या भावना लगेच दुखावल्या.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

लंवंगेने सर्दी?

लवंगेने उष्णता तर वेलदोड्याने सर्दी होते असे आयुर्वेदाचे शास्त्र सांगते असा माझा समज आहे. लवंग उष्ण तर वेलदोडा शीत. बर्फ उष्ण तर कॉफी शीत. जय आयुर्वेद!
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

शक्य आहे

गोष्ट लहानपणी वाचली होती त्यामुळे तपशीलात चूक होण्याची शक्यता आहे. मुद्दा हा की राजकन्या अतिसंवेदनशील होती.
भावनाओं को समझो.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

शक्य आहे.

बर्फ उष्ण तर कॉफी शीत.
आयुर्वेद शरीरावर होणारे परिणाम विचारात घेतो. तापमान नाही. बर्फ खाण्याने उष्णताजन्य आणि अतिकॉफी पिण्याने जर शीतजन्य विकारांना चालना मिळत असेल, तर आयुर्वेद खरा असणार.
आमच्या घरी एक विकेशा आजीबाई स्वयंपाकाला यायच्या. त्यांना लिहितावाचता देखील येत नव्हते. त्यामुळे त्यांचा आयुर्वेदाशी काही संबंध असेल असे वाटत नाही. लहानपणी मी त्यांना अनेक प्रश्न विचारीत असे. त्या क्षणार्धात उत्तर द्यायच्या. मीठ उष्ण की शीत..शीत. आंबा गरम की थंड--गरम. चिंच वातजनक की पित्तजनक--पित्तशामक. दोनचार दिवसांनी मी हेच प्रश्न त्यांना पुन्हा विचारीत असे. परत तीच उत्तरे विनाबदल मिळायची. समाजात खोलवर शिरून हाडीमांसी मुरलेल्या आयुर्वेदात काहीतरी तथ्य असावे ह्याची तेव्हा मला जाणीव झाली. --वाचक्‍नवी

वेलदोडा - उष्ण

अवांतर आहे, पण वेलदोडा शीत नाही. तो उष्ण असतो. येथे वाचा.

धन्यवाद !

छान दुवा दिलात. वेलदोडा उष्ण आहे असे मी अंधुकसे ऐकले होते, त्याला थोडासा आधार मिळाला.
बर्फ उष्ण आहे हे सिद्ध करणे फार सोपे आहे. बर्फ खाल्ल्यावर शरीराचे तापमान कमी होत असणार, आणि म्हणून बाहेरच्या तुलनात्मक उष्ण हवेने माणसाला उष्णताजन्य विकार होण्याची शक्यता वाढणार. बर्फाचा परिणाम उष्ण म्हणून बर्फ उष्ण. वेलदोड्याचे तसे सिद्ध करता येत असले पाहिजे.--वाचक्‍नवी

उष्णता-एकसारखीच

हे फक्त बर्फासाठीच् का बरे खरे असेल्?

समजा दोन वेगळे थंड पदार्थ अशा प्रमाणात खाल्ले की शरीर थंड (समान् थंड होईल आणि) होउन तितकीच् उष्णता पुन्हा घेउन वातावरणाशी समान् तापमानास येईल. कुठलाही पदार्थ असला तरी उष्णतेचे गुण तेच आहे. त्यामुळे 'बर्फ' असो की अजुन् कुठला पदार्थ ते एकाच गुणधर्माचे होतील. असेच आयुर्वेदात आहे का?

-Nile

उद्देश?

सरकारने लेनचा उद्देश सिद्ध करण्याचे काही प्रयत्न केले का? सरकारी वकिलांना अक्कल कमी असते म्हणून कलमे चुकीची लावतात. बदनामीचा खटला थोडातरी सयुक्तिक आहे.
या विषयात अशांतता माजवतील त्यांना शासन देण्याची सरकारची हिंमत नाही आणि इच्छाही नाही.

माहीत नाही

सरकारने लेनचा उद्देश सिद्ध करण्याचे काही प्रयत्न केले का?

काही माहिती नाही.

सहमत

असत्य लेखनावर कायद्याने बंदी नाही. (असा मुंबई उच्च न्यायालयाचा एक निर्णय मी मागे वाचला होता. मला तो निर्णय आणि ते तत्त्व, दोन्ही पटतात.)

"सध्याच्या काळात हिंसा करा" अशी थेट उकसावणी असल्यास कायद्याने बंदी आणली जाऊ शकते. या कलमाचा अतिरेकी उपयोग शासन कधीकधी करते. ("थेट" नसतानाही अतिव्याप्ती :-) होते, प्रतिक्षेपाने हिंसा उसळू शकते, असा युक्तिवाद होतो).

कायदा आणि सुव्यवस्था

'कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो' या कारणाखाली सरकार या पुस्तकाच्या प्रती विकण्यास बंदी आणू असते असे वाटते. 'सखाराम बाईंडर' च्या वेळी नाट्यपरीनिरीक्षण मंडळाने प्रमाणपत्र नाकारल्यानंतर न्यायालयातला खटला जिंकूनही धुरत-सारंग यांना सुखासुखी प्रयोग करता आले नाहीत. सारंग-तेंडुलकर-लागू खमके असल्याने त्यांनी प्रयोग केले मात्र तत्कालीन परिस्थिती व सद्यपरिस्थितीमध्ये बराच फरक आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

या

कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणाखाली सरकार काहीही करू शकते असे आता वाटू लागले आहे. अफजल गुरूची फाशीही याच कारणामुळे लांबली आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

स्कोप!

'कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो' असे वाटल्यास झ+ सुरक्षा देण्याची सरकारची जवाबदारी आहे. शाहरुखने पैसे चारले असतील का ते मला माहिती नाही. कदाचित सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे का होईना, महाराष्ट्र सरकारने 'माय नेम इज खान' प्रकरणात चांगले केले.

माय नेम इज खान

एक तर शाहरुखची सोनियाबाईंशी असलेली सलगी सर्वशृत आहे. त्यामुळे शाहरुखने थेट इटालियन बटणे दाबून 'माय नेम इज खान' प्रकरणात संरक्षण मिळवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रस्तुत प्रकरणात सत्तारूढ राष्ट्रवादी (मेटे, आर. आर. पाटील, जितेंद्र आव्हाड, उदयनराजे) आणि अधिक उपद्रवमूल्य असणारी मनसे आणि त्यांच्या कुरघोडी करण्याच्या संधीच्या शोधात असलेली शिवसेना हे सर्वच पुस्तकाच्या विरोधी आहेत. काँग्रेसने अधिकृत/अनधिकृत भूमिका कळवली नसली तरी त्यांची वोटबँक असलेल्या मराठा समाजाच्या भावना दुखावण्याची हिंमत ते करणार नाहीत. त्यामुळे या पुस्तकाला काही संरक्षण मिळेल अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मुळात

मुळात केलेला विरोध खरा असण्याऐवजी चित्रपटाची पब्लिसिटी करण्याचा ष्टंट होता अशी शंका येते. (इतके करूनही चित्रपट आपटलाच.)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

"माय नेम इज् खान"

या चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासामुळे आयुष्याची अमूल्य अशी तीस मिनिटे वाया गेली. नंतर निद्रादेवीने कृपा केल्याने पुढचा वेळ सत्कारणी लागला.

ये पैसा वो पैसा

पण पैसे वाया गेलेच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धैर्य

अर्धा तास! तुमचे धैर्य वाखाणण्यासारखे आहे. करण-शाहरूख कॉम्बो म्हंजे लेथल वेपन ५ आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हेच म्हणतो

करण-शाहरुखचे सिनेमे लागले की मी सामान्यतः वापरात असणारा थिएटरवरुन येणारा रस्ताही बदलून एका झोपडपट्टीतून येणारा शॉर्टकट पकडतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

का?

असत्य विधाने वापरून बदनामी करणे तुम्हाला का पटते?
माझ्या आठवणीनुसार, सत्य विधाने वापरूनही बदनामी करण्यास अनुमती नाही. मला संदर्भ सापडत नाही पण 'अ' ला तुरुंगवास झाला ही बातमी 'ब' च्या वृत्तपत्रात रोज छापून येई त्यास न्यायालयाने गैर ठरविले. ते मात्र मला पटत नाही.

सहमतीचे वाक्य

सहमतीचे वाक्य हे होते.

बंदीचे कारण मजकुर सत्य असत्य असे नव्हते.

इतकेच.
असत्य लेखनावर बंदी नसावी, हे मला पटते.
(बदनामीचा मुद्दा वेगळा. त्यासाठी कायदेशीर निकष "हेतू" वगैरे आहेत.)

प्रतिसाद संपादित

प्रतिसाद संपादित. चर्चेतील मुद्द्यांचा प्रतिवाद करताना असभ्य भाषेचा वापर उपक्रमावर अपेक्षित नाही याची कृपया नोंद घ्यावी. व्यक्तिगत रोखाच्या प्रतिसादांसाठी खरडवही किंवा निरोप सुविधेचा वापर करावा.

नव्हता

मुळात शासनाने घातलेला बंदीचा निर्णय योग्य होता का?

नाही.
बदनामी सिद्ध होण्यासाठी, सत्य असल्याचा दावा केलेल्या लेखनात "हेतुपूर्वक खोटी विधाने करणे" ही कृती आवश्यक असल्याचे माझे मत आहे. (शिवाय ती विधाने त्या व्यक्ती/समाजाच्या सन्मानाला हानिकारक असल्याचेही सिद्ध झाले पाहिजे.) शिवाजीबाबत खोटी विधाने लेनने केली नव्हती, "ती विधाने समाजात केली जातात" एवढेच त्याने लिहिले होते, असे कोठेतरी वाचल्याचे आठवते. मुळात "आईचा पती हा जीवशास्त्रीय पिता नसल्याचे विधान बदनामी करते" हे गृहीतकच तपासले पाहिजे. अर्थात सध्याच्या समाजात तसे विधान त्या व्यक्तीस हानिकारक आहे हे मला मान्य आहे.
कलाकृती (सत्य असल्याचा दावा न केलेले लेखन) वर बदनामीच्या कारणाने किंवा इतर कोणत्याच कारणाने बंदी येऊ नये.

अशा इशारांबद्दल तुम्हाला काय वाटते?

शाहरुख खानच्या उदाहरणावरून हे स्पष्ट आहे की सरकारला हवे असल्यास ते समाजकंटकांना यशस्वी वेसण घालू शकते.

बंदी अयोग्यच होती.

आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारने किंवा अशाच काही सरकारांनी ज्या ज्या पुस्तकांनाटकांवर बंद्या घातल्या त्या सर्व अयोग्यच होत्या. इंग्रजी पुस्तक लोलिता, सलमान रश्दीचे सॅटॅनिक व्हर्सेस, मी नथुराम गोडसे बोलतोय, गांधी हत्या आणि मी, मी गांधींना मारले, कीचक वध, सखाराम बाइंडर, गिधाडे, घाशीराम कोतवाल, संतसूर्य तुकाराम(लेखकाने लोकक्षोभाला घाबरून कादंबरी मागे घेतली) , केभि ढवळ्यांनी प्रकाशित केलेला शब्दकोश, ख्रिस्ताच्या जीवनावरचे एक मल्याळी नाटक, लीळाचरित्र, लज्जा(कादंबरी), अरुण शौरी-लिखित शीखांचा इतिहास, आणि हे जेम्स लेनचे इतिहास-पुस्तक. जेव्हा जेव्हा लेखक/प्रकाशक न्यायालयात गेले तेव्हा तेव्हा ते बंदी उठवून घेण्यात यशस्वी ठरले. यापेक्षा, बंदीचा विचार मनात आणण्याआधी सरकारांचे प्रतिनिधी ते पुस्तक वाचत का नाहीत? ही पुस्तके न वाचताच त्यांवर बंदी आणली असणार.
आंबेडकरांनी श्रीरामाच्या खाजगी आयुष्याबद्दल रिडल्स ऑफ़ रामाय़णमध्ये काहीबाही लिहिले, त्यावर बंदी न घालता, हे आंबेडकरांचे स्वतःचे विचार आहेत अशी टिप्पणी देऊन ते पुस्तक छापले(हे योग्यच केले!). त्या वेळी दुर्गा भागवतांनी तीनचार लेख लिहून आंबेडकरांच्या मतांवर टीकेची झोड उठवली होती.
संतसूर्यमध्ये लेखकाने तुकारामाच्या आयुष्यात एक तरुण स्त्री हो्ती अशी कल्पना केली आहे.
एकूण काय, जे होते ते भल्यासाठीच होते. --वाचक्‍नवी

+१

वाचक्नवींच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत. कुठल्याही पुस्तकावर अथवा कलेवर बंदी घालणे योग्य नाही. ती घालू नये. जर कुणाला त्यातील विचार अयोग्य वाटले तर त्याविरुद्ध आवाज करायचा आणि त्यात जर काही चुकीचे असेल तर तसे सिद्ध करायचा हक्क आहेच. तो कोणी नाकारलेला नाही आणि तसा कोणी बजावला तर कोणी आक्षेप घेण्याचे कारणही नाही. मात्र त्या संदर्भात जी गुंडगिरी झाली ती आक्षेपार्ह आहे. अगदी तशी न होता जर कोणी नुसते पुस्तक जाळले असते तरी ते अयोग्यच होते.

मला देखील या संदर्भात आंबेडकरांच्या "रिडल्स इन् हिंदूइझम"ची आठवण झाली. त्यावेळेस दुर्गा भागवतांचे लेख आलेले लक्षात आहेत आणि ते वाचनीय होते. त्यांनी आंबेडकरांवर टिकेची झोड उठवली पण ती अभ्यासू टिका होती. आणि असेच कायम असावे असे वाटते. त्यावेळेस मी इतर काही रेल्वे स्टेशनांवर अथवा अशीच वाटलेल्या पत्रिका पण पाहील्याचे आठवते, ज्यात आंबेडकरांबद्दल अप्रत्यक्षपणे, पण गैरसमज होऊ शकेल असे लिहीले होते. सुदैवाने त्यामुळे वेडावाकडा भडका उडालेला दिसला नाही...

त्याच संदर्भात जो काही "सिव्हिलाइझ्ड" आक्षेप होता, तो असे (ज्यात भारतातील बहुसंख्यांकाना जो देव वाटतो, त्यावर टिका असलेले) पुस्तक सरकारी मुद्रणालयाने अथवा अनुदानाने छापण्यावर होता. त्यावर शोधलेला "डिसक्लेमरचा" पर्याय मात्र सगळ्यांना स्वागतार्ह वाटला होता.

बदलत्या काळात चित्रपटांवरील सेन्सॉरशीप पण बर्‍यापैकी शिथील झाली आहे. (कधी कधी वाटते दादा कोंडकेंचे चित्रपट पण सभ्य होते ;) ). तर जिथे अभ्यास, व्यासंग आदीची गरज आहे तिथे झुंडशाही होउन न देता अभ्यासाला अभ्यासाने, व्यासंगाला व्यासंगाने उत्तर देण्याची सवय लावणारे प्रौढत्व देखील भारतीय समाजाने आता आत्मसात केले पाहीजे.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

समांतर उदाहरण

वसुलि यांनी दिलेला 'बिनतोड' प्रतिसाद दुसर्‍या पानावर गेला आहे. तो येथे अधिक शोभून दिसेल म्हणून इथे पुन्हा पेस्ट करीत आहे.

सावरकर
प्रेषक वसंत सुधाकर लिमये (शनि, 07/10/2010 - 19:45)
"

लोक असत्यकथन करतात" हे सत्य लेनने कथले आहे. त्यात बदनामी काय?

बरोबर आहे. ह्यात वावगे काहीच नाही. उलट लोकांच्यात काय काय घाणेरडे बोलले जाते ते बाहेर आल्यने ह्या लोकांना शरम वाटेल.

ह्यावरुन आणाखी एक उदाहरण आठवले. नथुराम गोडसेवरील नाटकात सावरकरांच्या तोंडी एक वाक्य आहे. गांधीहत्येनंतर सावरकर नथुरामाला कळवतात, नथुरामा तू दधिची आहेस तुझ्या अस्थिंची शस्त्रे होतील वगैरे. एका फोरमवर चर्चेत हे वाक्य जसेच्या तसे टाकले होते.

आता मराठी नाटकांमधून सावरकरांविषयी असे बोलले जाते, असे कुणी म्हंटल्यास ते असत्यकथन कसे काय? माझा तो प्रतिसाद एका स्युडो-सावरकरप्रेमीच्या हट्टाने नाटकाचा संदर्भ (चित्रफितीसह) देऊनही संपादित झाला होता.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

डबल स्ट्यांडर्ड

हा पहा त्या चर्चेचा दुवा आणि तिथे घातलेला थयथयाट.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdooक्ष्

मुद्दा आणि फुकट प्रसिद्धी

कोणत्याही पुस्तकावर बंदी नसावी व असल्या पुस्तकांचा बोभाटाही होऊ नये असे वाटते. जर पुस्तक वाचण्याजोगे नसेल तर आपोआपच कोणी घेणार/वाचणार नाहि.

अशी बंदी राजकीय पक्षांना मुद्दा तर पुस्तकाला फुकटाची प्रसिद्धी मिळवून देते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

देर आये दुरुस्त आये

मुळात शासनाने घातलेला बंदीचा निर्णय योग्य होता का?

जेम्स लेनच्या लेखनात असे काय आक्षेपार्ह होते ते मला अद्यापही कळलेले नाही. एखाद्या समाजात शिवाजीबद्दल अमुक म्हटले जाते असे म्हणून त्यानंतर त्याने त्यात तथ्य वाटत नाही असे काहीसे लिहिले होते असे वाटते. (आत्ता वाक्ये समोर नाहीत. असो.)

हायकोर्टाने व नंतर सुप्रीम कोर्टाने ह्या पुस्तकावर राज्य सरकारने टाकलेली बंदी उठवून योग्य पाऊल उचलले आहे का?

देर आये दुरुस्त आये|

हा निर्णय आल्यावर जेम्स लेनच्या या पुस्तकाची एकही प्रत राज्यात विकू देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. इतर पक्ष आणि संघटनाही देतील. अहमहमिका लागेल. अशा इशारांबद्दल तुम्हाला काय वाटते?

निवडणुका कधी आहेत?

जेम्स लेनच्या पुस्तकात

जेम्स लेनच्या पुस्तकात शिवाजी हा शहाजीचा मुलगा नसून दादोजी कोंडदेवांचा असावा, असे काही पोर्तुगीज इतिहासकारांचे मत असल्याचा जाताजाता उल्लेख झाला आहे.
गर्भवती जिजाबाईला शहाजी राजांनी स्वत: शिवनेरीवर पोहोचवले होते. आणि नंतरच्या काळात मायलेकरे माहुलीच्या किल्ल्यावर होती. माहुलीच्या पाडावानंतर बालशिवाजीला घेऊन दादोजी कोंडदेव १६३६ मध्ये पुण्याला आले. त्यावेळी दादोजींचे वय ७० वर्षे होते. त्यापूर्वी ते त्यांच्या पुण्याजवळच्या कोंढाणा किल्ल्याचे नामजाद सुभेदार होते. हा इतिहास ज्यांनी वाचला आहे, त्यांनी, पोर्तुगीजांनी काहीही लिहिले तरी त्यावर भिस्त ठेऊन, न वावलेल्या पुस्तकावर बंदी आणावी?--वाचक्‍नवी

थोडीशी वेगळी आठवण

शहाजीमहाराजांनी शिवाजीमहाराजांना आपला मुलगा मानला होता. यानंतरचे सगळे इतर पुरावे दुय्यम ठरतात.

माझ्या आठवणीत पुस्तकाबद्दल जे आले होते त्यात पोर्तुगीज इतिहासकाराबद्दल नव्हते. (आताच गुगलून पाहिते तेंव्हा हे दिसले http://www.complete-review.com/quarterly/vol5/issue1/laine0.htm) "Maharashtrians tell jokes naughtily that Shivaji’s biological father was Dadoji Kondeo Kulkarni" असे वाक्य आहे.

शिवाजी महाराजाच्या राज्यस्थापनेच्या मागच्या उद्दीष्टांकडे लोक वेगवेगळ्या नजरेने बघतात. त्यातील हिंदूधर्मरक्षक ही एक प्रतीमा होय. त्या प्रतीमेबद्दल जेम्स लेनचे पुस्तक असावे. शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या राज्यप्राप्तीच्या घटना या शहाजीप्रेरीत (वा इच्छित) असाव्या. शहाजीमहाराजांवर मलिक अंबरचा प्रभाव (यात गनिमी कावा, रयतवारी, कल्याणकारी राज्य हे येऊ शकतात.) होता. अशी एक मांडणी केली तर ती हिंदूपदपादशाही विचाराच्या विरुद्ध जाते. जेम्स लेनच्या पुस्तकात शिवाजीमहाराजांपेक्षा त्यावरील संकल्पनांचा शोध घेतला होता असे वाचल्याचे मला आठवते. या पुस्तकाचा प्रतिवाद नक्कीच करावा पण बंदी वा आंदोलने म्हणजे वाचायला प्रवृत्त करणारी दिसतात.

भारतात राहून लेखन करायचे असेल तर अमुक एका यादीतील महापुरुषांबद्दल काही वेगळे लिहिता कामा नये असा एक प्रवाद आहे. ही यादी वाढतच चालली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मात्र सहिष्णुता येईल अशी आशा धरतो.

प्रमोद

कुतूहल

Maharashtrians tell jokes naughtily that Shivaji’s biological father was Dadoji Kondeo Kulkarni

असे विनोद सांगणारे 'महाराष्ट्रीयन' कोण आहेत याविषयी कुतूहल आहे.

लक्षपूर्वक वाचा

असे विनोद सांगणारे 'महाराष्ट्रीयन' कोण आहेत याविषयी कुतूहल आहे.

वरील दुव्यातील टेलेग्राफचा आणखी एक दुवा आढळतो. तुम्हाला अपेक्षित उत्तर तेथे मिळेल.

धन्यवाद

टेलिग्राफमध्ये लिहिलेले तुम्हीच सांगून टाकले असते तरी चालले असते. :) टेलिग्राफचा दुवा पाहतो. (त्या संकेतस्थळावरील काही वृत्तपत्रिय दुवे काम करत नसल्याने सर्व दुवे तपासले नाहीत.)

बहुदा

नक्की आठवत नाही, पण एका प्रसिद्ध मराठी इतिहासकारानेही हा वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला होता असे कुठेतरी वाचल्याचे आठवते.किती खरे खोटे हे आत्ता सांगु शकत नाही, जमल्यास शोधतो. बहुदा राजवाडे असावेत.

-Nile

थोडीशी रोचक माहिती

या विकिपानावर जयंत लेले (क्विन्स विद्यापीठात प्राध्यापक) यांनी शिवाजी महाराजांच्या पित्याविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांच्या पुस्तकावर बंदी घातल्याचे लिहिले आहे. जेम्स लेनने सुरूवातीला आभार मानलेल्या लोकांमध्ये जयंत लेले यांचे नाव आहे.

नाही सापडले

टेलिग्राफच्या दुव्यावर तसे काही स्पष्ट शब्दांत लिहिलेले सापडले नाही. शिवाय असले विधान काही महाराष्ट्रीय विनोदाने करतात असे जेम्स लेन म्हणतो. पण ही विनोदी माणसे काय भांडारकरमध्ये काम करतात? पटण्यासारखे नाही. आणि केवळ काही माणसे म्हणतात म्हणून जेम्स लेनने ते छापायचे?--वाचक्‍नवी

मलाही कुतूहल आहे

असा 'विनोद' मी पहिल्यांदाच वाचला. त्यामुळे मी महाराष्ट्रीय आहे की नाही अशी शंकाही मनात उत्पन्न झाली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मी सुद्धा...

जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा पेटले तेव्हा मी सुद्धा असे काही तरी आयष्यात प्रथमच ऐकले. रात्रपाळीत रिकामा वेळ घालवण्यासाठी चालणार्‍या आमच्या खमंग गप्पांमधे एका मित्राने जेव्हा हे असे काही तरी सांगितले तेव्हा मी त्याला अविश्वासाने "हॅट् बे, तू काहीही बह्याडा सारखा बोलतो लेका "असे म्हणून उडवून लावले होते.( बह्याड म्हणजे येडपट, मूर्ख!! असे त्याला नंतर अर्थ समजाऊन ही सांगितले होते, मला चांगले आठवतेय.)

बह्याड

आमच्याकडे (नागपूर्) भयताड शब्द वापरायची पद्धत आहे. त्याची आठवण झाली.
प्रमोद

बह्याड

हा खानदेशात प्रचलित असलेला शब्द आहे का?

बह्याड- भयताड इ.इ.

बह्याड, भयताड हे दोन्ही शब्द विदर्भातलेच आहेत. बाकी ह्या सगळ्या प्रकारा वरून बह्याडांची महाराष्ट्रात कमी नाही असेच वाटते.

भैताड

पश्चिम महाराष्ट्रात भैताड म्हणतात.-- वाचक्‍नवी

योग्य निर्णय

मुळात शासनाने घातलेला बंदीचा निर्णय योग्य होता का?

नाही. उठसुठ कशावरही बंदी घालणार्‍या शासनामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्यासारखे वाटते.

हायकोर्टाने व नंतर सुप्रीम कोर्टाने ह्या पुस्तकावर राज्य सरकारने टाकलेली बंदी उठवून योग्य पाऊल उचलले आहे का?

होय.

हा निर्णय आल्यावर जेम्स लेनच्या या पुस्तकाची एकही प्रत राज्यात विकू देणार नसल्याचा इशारा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. इतर पक्ष आणि संघटनाही देतील. अहमहमिका लागेल. अशा इशारांबद्दल तुम्हाला काय वाटते?

अशा इशार्‍यांना भीक घालू नये. पण पुस्तकाच्या प्रती महाराष्ट्रातल्या दुकानांमधून उपलब्ध होऊ शकतील असे वाटत नाही.

जेम्स् लेनचे पुस्तक

पुस्तक न वाचतातच त्यावर मत कसं बनवतात बुवा?? बंदी घालण्याची मागणी करणारे, इशारे देणारे यातल्या कोणी हे पुस्तक वाचलं असेल का? पण त्यात खरचं काही आक्षेपार्ह असेल तर सुजाण वाचकांनी निषेध केलाच पाहिजे. "कोणीही यावे, टिचकी मारुनि जावे.." असं चालवुन घ्यायचं का?

 
^ वर