युनिकोडविषयी काही प्रश्न
क चा पाय मोडून त्याला ष जोडला की 'क्ष' बनतो. त्याची एकूण लांबी होते ३. पण त्याला ष जोडायच्या आधी "झिरो विड्थ जॉइनर" जोडला तर त्याची लांबी होते ४ आणि तो बनतो 'क्ष'. जोडाक्षरांची आडवी मांडणी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच बरोबर "झिरो विड्थ नॉन जॉईनर" असा देखील एक प्रकार असतो व त्याने 'क्ष' काढता येतो.
आता हेच पाहा, 'व्यक्ती' आणि 'व्यक्ती' हे दोन्ही शब्द बरोबर आहेत. जोडाक्षरे लिहिण्याचे हे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकाराला उभी मांडणी असे म्हणतात. तर दुसरा प्रकार आडव्या मांडणीचे उदाहरण आहे.
आडवी मांडणी - प्रश्न, तृप्त
उभी मांडणी - प्रश्न, तृप्त
अशी अनेक उदाहरणे देता येतील. पण लिखाण मात्र दोन्हीही प्रकारे बरोबरच. खात्री पटण्यासाठी उभ्या व आडव्या मांडणीचे दोन्ही शब्द गुगलमध्ये शोधून पाहा. दोन्हीना सारखेच रिझल्ट्स मिळतात.
१) झिरो विड्थ जॉईनर वापरून 'क्ष' (किंवा वर दाखविलेली आडव्या मांडणीची जोडाक्षरे) उपक्रमावर अथवा इतर संकेतस्थळावर लिहिता येतात का?
बरहात k^Sh वापरून क्ष लिहिता येतो. हे झाले 'झिरो विड्थ जॉईनर'चे उदाहरण. अर्धा क आणि ष म्हणजे अर्थात 'क्ष' देखील लिहीता येतो. त्यासाथि k^^Sh असे लिहावे लागेल. हे झाले 'झिरो विड्थ नॉन जॉईनर'चे उदाहरण.
हे स्वातंत्र्य लेखकाला असावे अशी अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. पण एकाच प्रकारे जोडाक्षरे लिहिली गेली तर वाचकांच्या (वाचनाच्या सवयीच्या) दृष्टीने ते चांगलेच ठरेल असे मला वाटते. आता हेच पाहा,
तत्त्व
तत्त्व
तत्त्व
वर दिलेले तीनही शब्द गुगलसाठी सारखेच आहेत. पण पहिल्याची लांबी आहे ६ तर इतर दोघांची आहे ७. एक बाईट वाढला, कारण दुसर्या शब्दात वापरला जॉईनर तर तिसर्या उदाहरणात वापरला नॉन जॉईनर. हे कळले. आता यात चौकानेवाली बात अशी आहे की स्पेल चेकर (मी बनविलेला! - जाहीरात) मात्र पहिला आणि दुसरा शब्द बरोबर दाखवत असून तिसरा शब्द चुकीचा दाखवत आहे. हे का होत आहे?
२) गुगल तीनही जोडाक्षरे योग्य तर्हेने हाताळतो. पण प्रत्येक जोडाक्षरामागे १ बाईट जास्त (विनाकारण) जात आहे असे मला वाटते. हा एक्स्ट्रा बाईट नगण्य असला तरी भविष्यात पुस्तकासारख्या मोठ्या मजकुरासाठी तो निर्णायक ठरू शकेल. अर्थात माझ्याकडे हा दावा सिद्ध करण्यास पुरेसा विदा नाही, पण जरुरी नसताना झिरो विड्थ (जॉईनर असो अथवा नॉन जॉईनर) वापरू नये ही सूचना या निमित्ताने कशी वाटते?
select 'क्ष' as akshar, char_length('क्ष') as akshar_count, left('क्ष', 1) as first, left(right('क्ष', 2), 1) as second, right('क्ष', 1) as third;
akshar : क्ष
akshar_count : 3
first : क
second : ्
third : ष
select 'क्ष' as akshar, char_length('क्ष') as akshar_count, left('क्ष', 1) as first, right(left('क्ष', 2), 1) as second, right(left('क्ष', 3), 1) as third, right('क्ष', 1) as forth
akshar: क्ष
akshar_count : 4
first : क
second : ्
third :
forth : ष
Comments
लेखकाला स्वातंत्र्य असावे
भक्त हा शब्द भक्त, भक्त, किंवा भक्त यापैकी कसा लिहायचा याचे स्वातंत्र्य लेखकाला असावे असे वाटते. तीनही शब्द व्याकरणाचे नियम पाळून लिहिलेले असल्याने शुद्धच आहेत असे माझे मत आहे.
मी उपक्रम देत असलेली टंकनसेवा (गमभन) न वापरता इनस्क्रिप्ट वापरतो. zwj आणि zwnj चे प्राथमिक ज्ञान असले की कोणीही हवे तशी जोडाक्षरे (किंवा जोडाक्षरे किंवा जोडाक्शरे [हा शब्द श्री. रावले यांना समर्पित]) लिहू शकतो.
गरज म्हणजे काय आणि चैन म्हणजे काय हे जसे ठरवता येत नाही तसेच इथेही जरूरी केव्हा आहे हे कसें ठरवणार?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
भक्त, भक्त आणि भक्त
भक्त लिहिणे हे आदर्श. भक्त हे कमी आदर्श. मात्र, कधीकधी तसे लिहायची गरज पडते, कारण फ़ॉन्ट तयार करणार्यांनी वाचनीयतेचा विचार केलेला नसतो. प्त आणि प्त हे दोन्ही प्+त. पण पहिला नीट वाचता येत नाही, स सारखा दिसतो. फ़ॉन्टकाराने विचारपूर्वक अक्षरजोडणी केली असती तर पहिलाही वाचनीय झाला असता, आणि खुशीने वापरला असता. दुसरे उदाहरण छन्न या शब्दाचे. मनोगतावर उभी मांडणी असल्याने तिथे हा शब्द छ्त्र दिसतो.
तिसरा पर्याय भक्त. असे लिहिणे निखालस चूक! आपण व्यंजनाचा पाय मोडण्यासाठी जे हे हलन्त चिन्ह(्) वापरतो, त्याला संस्कृतमध्ये आणि हिंदीत विरामचिन्ह म्हणतात. असे चिन्ह असलेल्या अक्षरानंतर एक यती घेणे अपेक्षित असते. भक्तचा उच्चार भक्-त असा होतो. बालोद्यान आणि बालोद्यान यांतला पहिला शब्द एखाद्या यानाचे नाव असल्यासारखा वाटतो. कारण तो शब्द उच्चारताना द् नंतर स्वाभाविक आणि सक्तीचा विराम घ्यावा लागतो. तीन्मीचा उच्चार ती न् मी असा होतो, तीन्मी असा नाही. अशी अनेक उदाहरणे : घरन्घर(घरन्घर), बर्मिंग्हॅम(बर्मिंघॅम) वगैरे. ट, ठ, ड, ढ, आणि ह यांना य जोडायचा असेल तर जोडण्यासाठी पाऊण य आवश्यक आहे. नाहीतर घरट्यात म्हणजे घरट्- यात आणि घरट् यातच!. पण शब्द नीट लिहायचा तर पाऊण य पाहिजे. तो वापरायला मिळतच नाही. ट्विटर या शब्दाचा उच्चार ट्इ व ट र याशिवाय दुसरा होणारच नाही. स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स यांतला फरक लक्षात घ्यावा. तत्त्वत: दोघांचे उच्चार सारखे व्हायला हवे होते. पण होत नाहीत.
एक शंका : काही संकेतस्थळावर एक्स् दाबून क्ष उमटवता येतो, तिथे किती बाइट्स खर्च होतात?
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की युनिकोडमध्ये मराठी अक्षरे मनासारखी लिहिण्याचे स्वातंत्र्य नाही, कारण आपल्या फ़ॉन्टकर्त्यांना धड मराठी येत नाही. महाराष्ट्र सरकारने फक्त मराठी श आणि ल मान्य केला आहे. ( संस्कृत ख अजूनपर्यंत स्वीकारलेला नाही! हे खरोखरीच दुर्दैव.) मराठीतला तिसरा श, अश्व मध्ये लागतो, हाही टंकता येत नाही. कारण त्यासाठी युनिकोडधारित फ़ॉन्ट्स नाहीत.
विशेष सूचना : हे लिखाण मोझिला फ़ायरफ़ॉक्स वापरून केले आहे, दुसर्या ब्राउझरवर नीट दिसेलच असे नाही.--वाचक्नवी
उत्तर आणि शंका
येथेही एक्सने क्ष् च येतो.
क्ष् ला १२ बाईट लागतात तर क्ष ला ९. (यूटीएफ-८ युनिकोडमध्ये प्रत्येक देवनागरी चिन्ह ३ बाईटचे असते: क + हलंत + श + हलंत = १२)
असे का?
लिनक्स फाफॉमध्ये दोन्ही सारखेच दिसत आहेत.
स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स
स्पोर्ट्स=स्पो र्ट् स. इथे र्ट् हे एक अक्षर आणि त्याला जोडलेले स हे दुसरे.
स्पोर्ट्स=स्पो ट् र्स. ट्स हे एक अक्षर. तेव्हा त्यावर रफार दिला की आधी र चा उच्चार आणि मग ट्स चा.(बुटका ट काढून त्याला खाली स चिकटवता येत नाही म्हणून केवळ नाइलाजाने ट चा पाय मोडावा लागला. आपल्या फ़ॉन्टकर्त्यांनी ट च्या खालच्या बाजूला कुठलेही अक्षर जोडता येईल अशी सोय करायला पाहिजे!) या दोन्ही प्रकारात उच्चार Sports आहे असे मानले जाते.
हा ट्विटर शब्द तुमच्या संगणकाच्या पडद्यावर कसा उमटला आहे ते माहीत नाही. पण माझ्या संगणकावर तो (टि्)पायमोडक्या ट ला वेलांटी+वटर असा दिसतो आहे. याचा स्वाभाविक उच्चार आहे : आधी पायमोडक्या टि चा अतिर्हस्व उच्चार आणि मग व ट र.
परत शंका : क्ष हे स्वतंत्र अक्षर मानले तर त्याला फक्त ३ बाइटे लागायला हवीत. आन्सीमध्ये बहुधा एकच लागत असावा.
माझ्या वरच्या प्रतिसादात, पाऊण य जोडावा लागतो अशा व्यंजनांच्या यादीत छ आणि क्वचित(वैकल्पिक) द यांचा समावेश करायचा राहिला होता, तो करून घ्यावा. --वाचक्नवी
समजले पण पटले नाही
भक्त आणि भक्त हे दोन्ही समानच ना? टिळकांनी तसेच सांगितले होते.
क हे व्यंजन आहे की क्? मी असे शिकलो आहे की क्अ असे लिहिले की क बनतो. हलन्त येथेही आहेच! स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स हे याच विषयाचे उदाहरण आहे असे वाटते. (पायमोडक्या अक्षरावरील रफार पुढे ढकलण्याची जवाबदारी फॉन्टकर्त्यांची आहे असे वाटते.)
हलन्तला युनिकोडमध्ये विराम म्हटल्याचा निषेध कोठेतरी वाचला होता.
विंडोज फाफॉमधून तुम्ही म्हणता तसे दिसते आहे. ट्विटर या शब्दात लिनक्समध्ये बुटक्या ट च्या खाली अर्धा व दिसतो. हीदेखिल फॉन्टकर्त्यांची जवाबदारी आहे असे वाटते. पण वरील मुद्याचा (भक्त आणि भक्त) निकाल लागला तर सध्या विंडोजमध्ये दिसते त्याचाही उच्चार चुकणार नाही. मुळात पायमोडका टि हेच ऑक्सिमोरॉन वाटते. ट् अधिक इ = टि. मग पायमोडका टि कसा बनेल?
युनिकोड देवनागरीच्या चिन्ह तक्त्यात क्ष साठी वेगळे चिन्हच नाही. टीटीएफ प्रकारच्या काही फाँटमध्ये एक्स टंकून क्ष हे अक्षर उमटू शकते, उदा. अमृता, शिवाजी, इ. तेथे क्ष ला एकच बाईट लागतो. उपक्रम वगैरे संस्थळे मात्र एक्स टंकल्यावर तो पोहोचवतच नाहीत आणि त्याऐवजी क्ष हे युनिकोड जोडाक्षर टंकतात आणि उमटवितात. युनिकोड चिन्हाला यूटीएफ-८ पद्धतीत एक ते चार असे कितीही बाईट लागू शकतात. लेस इक्वल लिप्यांना खर्चिक जागा दिल्या आहेत. सर्व देवनागरी चिन्हांना प्रत्येकी ३ बाईट लागतात.
बच्चा टिळक
लोकमान्य टिळकांनी जेव्हा संत, सन्त आणि सन्त हे शब्द एकाच लिखाणात लिहिले तेव्हा टिळक लोकमान्य नव्हते, तर बच्चा होते. मुळात एकाच निबंधात हे शब्द, तसे खास कारण नसताना, वेगवेगळ्या प्रकारे लिहिणे अनुचित आहे. म्हणजे इंग्रजीत लिहिताना एकदा Connection, Gray असे लिखाण, आणि लगेच पुढे Connexion आणि Grey. असे लिखाण मुद्रितशोधनात दुरुस्त केले जाते. वैचारिक लिखाणात बोलीभाषा वापरणे निषिद्ध असते, पण समजा एखाद्याने वापरलीच तर, अर्धेमुर्धे शब्द बोलीभाषेत आणि उरलेले प्रमाणभाषेत लिहायला अनुज्ञा नसते.
बालटिळकांच्या वेळचे शिक्षकही सामान्य असणार. ते टिळकांच्या या ज्ञानाने इतके भारावून गेले असणार की तेच टिळकांना शाबासकी देऊन धन्य झाले असावेत.
व्यंजन क् हेच आहे, पण उच्चारसुविधेसाठी आपण त्या अक्षराचा भाग असलेले विराम ऊर्फ़ हलन्त चिन्ह (इंग्रजीत Nether Stroke) वगळून ते अक्षर क असे लिहितो. संस्कृतमध्येसुद्धा हीच प्रथा आहे. माहेश्वरी सूत्रांतल्या ञमङणनम् किंवा खफछठथचटतव् या ओळी पहा. तिथे व्यंजनांची नावे देताना पूर्ण अक्षरांचा समावेश केला आहे.
क्+अ=क. क्अ=क नाही. कारण या दुसर्या प्रकारात क् च्या उच्चारानंतर एक यती घेऊन, मग अ चा उच्चार करणे क्रमप्राप्त आहे.
अतिर्हस्व उच्चार करायचा असेल तर पायमोडका टि् लिहायला हरकत नसावी. दक्षिणी भारतीय भाषांच्या लिप्यांत र्हस्व एकार-ओकार आहेत. ही अक्षरे लिहायची असतील तर सध्या क्+ऎ=कॆ आणि क्+ऒ=कॊ अशी रूपे वापरतात. त्यांऐवजी के् , को् लिहिता आले असते. मलयालम्मधल्या(मलयालम्म नाही!) अतिर्हस्व उ करिता युनिकोडने काय सोय केली आहे ते शोधावे लागेल, पण नसेल तर उ ला हलन्त देऊन अक्षर लिहिता येईल.
असा निषेध करून कसे चालेल? आपल्या काना-वेलांटी-मात्रा-उकार-अनुस्वारांना हिंदीत मात्रा म्हणतात. आपण फक्त एकार-ओकाराची एक आणि ऐकार-औकाराच्या दोन( े ै ो ौ )यांनाच मात्रा म्हणतो. संस्कृतमध्ये र् या अक्षराला ला रेफ म्हणतात, तर हिन्दीतला रेफ़ म्हणजे आपला रफ़ार. हिंदीतली विरामचिन्हांची नावे पहा : दंड(।)साठी पूर्णविराम. बाकीची नावे : अर्द्ध विराम(;), अल्प विराम(,), प्रश्नवाचक चिह्न(?), विस्मयवाचक चिह्न(!),
योजक वा विभाजक(-), निर्देशक चिह्न(_), उद्धरण चिह्न("), कोष्ठक(), {}, [ ], विवरण चिह्न(:-) आणि अशीच अनेक. ही नावे मराठी नावांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे युनिकोडने हलन्त चिन्हाला विराम म्हटले तर निषेध करायचे कारण नाही; फक्त एकच, त्यांनी त्यांच्या लिपीला देवनागरी म्हणू नये, हिन्दी लिपी म्हणावे.--वाचक्नवी
हे काय बरे लिहीले आहे?
आधी पायमोडक्या टि चा अतिर्हस्व उच्चार आणि मग व ट र.
वाचक्नवी,
मला हे काय लिहीलयं तेच समजले नाही. कृपया समजवून सांगाल का?
'ट्' हे व्यंजन आहे. व्यंजनाला स्वराची सोबत मिळाल्यानंतरच त्याचे अक्षर होणार, व तो उच्चारता येणार. हा माझा समज आणि अभ्यास आहे. उच्चार दिर्घ कि रस्व हा वेगळा विशय. आहे. परंतु युनिकोड तंत्रद्न्यानात सद्ध्या अवलंबिलेले स्वराचे इकारान्त चिन्ह हे जोडाक्शर आले की थिटे पडते.
म्हणजे:-
'थिटे' हा शब्द लिहीताना 'थि' असे लिहीता आले. पण
'थ्विटे' हा शब्द लिहीताना 'स्वराचे इकारान्त चिन्ह' हे 'व' ह्या वर्णापर्यंत पोहोचायला हवे होते. तसे होत नाही. हीच ती अडचण आहे 'ट्+विटर' बाबतीत.
तसे असताना:- 'व्यंजनाचा दिर्घ उच्चार' असे का बरे लिहीले आहे? माझ्या अभ्यासानुसार - व्यंजनाचा उच्चार स्वरांशिवाय करता येत नाही. अभ्यासापुरता उच्चार करताना 'आधी स्वर मग व्यंजन(क्शर)' असा करता येवू शकतो. (अपवाद फक्तः 'र'चा )
उदा.:-
'प्'= 'अ'(स्वर)+ 'प'(क्शर)
'म्'= 'अ'(स्वर)+ 'म'(क्शर)
अपवादी 'र्' = 'अ'(स्वर)+ 'र्' =(उर्दुतल्या 'नजर' सारखा)= गर्व
'र्'='अ'(स्वर)+ 'र'(क्शर)= पोर्या, प्रगति
अ+प
प्=अ+प; म्=अ+म. ही माहिती नव्यानेच कळाली. धन्यवाद.
अक्षराला तळाशी विराम चिन्ह लावले की विराम घ्यायचा हे नक्की. टि् लिहिले की, टि्चा उच्चार करून एक यती घ्यायचा, आणि मगच पुढची अक्षरे उच्चारायची. यात कळायला काय अवघड आहे? इथे युनिकोड असो की आणखी कुणी, आपला सामान्य, आणि इथे अधिकृतही, समज महत्त्वाचा.--वाचक्नवी
तुम्ही जे सांगताय ते अधिकृत आहे? मला नाही कळले?
'अक्षराला तळाशी विराम चिन्ह लावले की विराम घ्यायचा हे नक्की.'
हे विधान कळले नाही. विराम चिन्ह (म्हणजे '.') इथे कुठे आहे?
तुम्ही एखादे व्यंजन(क्शर) दाखविण्यासाठी अक्षराचा 'पाय मोडण्याच्या चिन्हाला' विराम म्हणत आहात का?
'टि् लिहिले की, टि्चा उच्चार करून एक यती घ्यायचा, आणि मगच पुढची अक्षरे उच्चारायची.
इंग्रजी Twitter च्या स्पेलिंग मध्ये देखिल 'डब्लू' या अल्फाबेट नंतरच 'i' हे vowel अर्थात स्वरचिन्ह आलेले आहे. तसे असताना ''व्' व्यंजनाच्या मागोमाग स्वर आला तरीही 'टि्चा उच्चार करून एक यती घ्यायचा, आणि मगच पुढची अक्षरे उच्चारायची.' ही मला काहीतरी भानगडच वाटते. आता हा यती कोण? तो कसा घ्यायचा?
twinkal चा उच्चार व लिखाण मराठीत ट्+विंकल असाच होणार परंतु युनिकोड मध्ये तो दिसताना 'ट्विंकल'असाच दिसणार.
स्वरचिन्हाची जी रफार आहे ती 'व' पर्यंत खेचली जात नाही/ खेचली जायला हवी व हे सगळे प्रचलित व अधिकृत व्याकरणानुसारच आहे. तेच मी सांगत आहे.
माझ्या वैयक्तीक मतानुसार इकारान्त स्वरचिन्हांची दांडी फक्त व्यंजनाच्या मागेच देण्याची पद्धत असायला हवी. इकारान्त व उकारान्त स्वरांमधील रस्व स्वरचिन्ह देण्याची पद्धत बंद केली जायला हवी. आणी ते सामांन्याच्याच सोयीचे असेल.
विराम चिन्ह, टि् वगैरे.
हो, पाय मोडण्याच्या हलन्त चिन्हाला मराठी सोडून सर्व भारतीय भाषांत विराम चिन्ह म्हणतात. युनिकोडच्या अधिकृत संस्थळावरही त्या चिन्हाला Viraam Sign म्हटले आहे. या खुणेनंतर उच्चारात एक पॉज़ घेणे अपेक्षित असते. म्हणूनच संस्कृतमध्ये म् असा अंत असलेले शब्द फक्त वाक्याच्या शेवटी येतात. अधेमधे आले तर, निष्कारण वाचनात खंड पडू शकेल.
विराम ऊर्फ़ यती म्हणजे पॉज़. यती हा छंदरचनेतला शब्द आहे. उदाहरणार्थ, भुजंगविजृंभित नावाच्या २६ अक्षरी गणवृत्तात, ओळीतल्या आठव्या, नंतरच्या अकराव्या आणि पुढच्या सातव्या अक्षराला यती येतात.
इंग्रजी शब्दातही यती असतात. Twitt`er या शब्दातला यती ` या चिन्हाने दाखवला आहे. Tit`bit`, Onomato`poe'ia या शब्दांत दोन यती आहेत. (अमेरिकन उच्चारात ऑनऽ` मॅटऽ` पीऽ`अ असे तीन यती येतात.)
ट् विंकल असे लिखाण कधी पाहिले नाही ना असा उचार कधी ऐकला. इंग्रजीत To चा उच्चार परिस्थिनुरूप कधी टू तर कधी टु, ट किंवा ट् असा होतो हे माहीत होते. तसेच, The चा दी, दि किंवा द. ('ऑल द बेस्ट' या नाटकाचे नाव चुकीने 'ऑल दी बेस्ट' असे ठेवले गेले आहे! )
Twinkle जर मराठीत 'ट्विंकल' (ट ला खालच्या बाजूला जोडलेला व, आणि त्या जोडाक्षराला वेलांटी-अनुस्वार)असा दिसला तर यतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण जर तो टि् वंकल असा दिसला तर टि् नंतर पॉज़ अनिवार्य.--वाचक्नवी
धन्यवाद!!!
वाचक्नवी,
हि चर्चा मराठी भाषा, लिपी यांचा युनिकोड या तंत्रद्न्यानाशी संबंध यावर बेतलेली आहे/ होती. असंच मी समजतो. इतर गोष्टी जर मनात ठेवून/ न मांडता व्यक्त केल्याने बराच गोंधळ होतो. तो गोंधळ झाला.
मराठी व्याकरणाच्या चौकटीत 'विराम चिन्ह' ही शब्द, वाक्ये यांचे लिखाण झाले कि तो शब्द वा ते वाक्य नेमके काय आहे?, हे सांगण्यासाठी लिहीली जातात. ती चिन्हे शब्द/वाक्यांच्या नंतर येतात. त्यांना खेटून/चिकटून (ओवरलॅप करून)येत नाहीत.
व्यंजन(क्शर) हि संकल्पना 'स्वरांशिवाय अव्यक्त रहाणारा ध्वनी' दाखविणारी आहे.
(मग त्यांचा उच्चार कसा करायचा? हे शाळेत ही शिकवले गेले नाही. अभ्यासापूरता उच्चार कसा करायचा? हे जे वर सांगितले आहे, ते विचार/चिंतन माझे आहेत.)
ब्राह्मी लिपीतून विकसित झालेल्या काही अक्शर चिन्हांनी आपोआप स्वतःच्या बाजूला 'अ' स्वरांची दांडी स्विकारली, तर काही अक्शर चिन्हांनी नाही. जर ही 'अ' स्वराची दांडी बाकी अक्शर चिन्हांनी स्विकारली असती, तर वैचारिक स्तरावरील 'अक्शर संकल्पना'व चिन्हांतून व्यक्त होणारी 'अक्शर संकल्पना' ह्या मध्ये भेद राहिला नसता. भेद आहे हे वास्तव.('अक्शर'= 'क्शर' +'स्वर')
उदा.:
(ग, च, त, प, य इत्यादी) ह्या अक्शरांना व्यंजन/क्शर म्हणून दाखवताना त्यांमध्ये असलेली 'अ' स्वराची दांडी न दाखवता काम झाले असते.
पण समस्या होती (ट, ठ, ड, ढ, ळ इत्यादी) या अक्शरांची. या एवढ्या कारणासाठीच, 'पाय मोडण्याचे चिन्ह' सर्वच अक्शरचिन्हांना , 'व्यंजन म्हणजे काय?' हे दाखविण्यासाठी वापरले गेले. ते 'विरामचिन्ह' नाही.
- चर्चा करत असताना, हे होतं माझ्या मनातले.
'twinkal चा उच्चार आणि लिखाण मराठीत ट्+विंकल असेच होणार '
हो. मी जे म्हणतोय ते चूक नाही. युनिकोड च्या तंत्रद्न्यानाचा वापर करीत 'ट् विंकल' / 'ट् विटर' हे व ह्या समशब्द संगणकावर लिहीताना चूकीचेच दिसणार. परंतु चूकीचे दिसणार म्हणून भलतच काहितरी गृहीत धरून ते चूकिचे गृहीत 'अधिकृत' आहे असे म्हणणे योग्य नाही. असे म्हणतो.
'वि' या अक्शरावरील वेलांटीतून आकारलेल्या तंबू/डोम मध्येच 'ट्' शिरायला हवा. तो शिरत नव्हता म्हणून मी 'ट्+विंकल'असे लिहीले. हे माझं मत कायम आहे. आणि हे सगळे मी मराठी व्याकरणाच्या चौकटीत राहूनच लिहीत आहे.
'सर्व भारतीय भाषांमध्ये पाय मोडण्याच्या चिन्हाला 'विराम चिन्ह' म्हणतात.' आपले हे विधान वाचून मला आपला व आपण मिळवलेल्या द्न्यानाचा व त्यासाठी उपसलेल्या कष्टाचा मला आदर वाटतो, मी आपल्याला प्रणाम करतो.
आभारी आहे
भक्त हा शब्द चुकीचा आहे हे मान्य. त्यासंदर्भातला माझा गैरसमज आता दूर झाला आहे.
भक्त लिहिणे हे आदर्श. भक्त हे कमी आदर्श असे का? शाळेत असताना पाटीवर किंवा वहीवर 'क्त' असा कधीच लिहिला नाही. आम्ही नेहमी क्त असेच लिहायचो. (कदाचित लिहायला सोपे म्हणून?)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
क्त आणि क्त
मराठी टंकनयंत्रावर क्त आणि क्त अशी दोन्ही अक्षरे टंकण्याची सोय नव्हती. तिथे फक्त अर्धा क(क्) आणि पूर्ण त होता. जेव्हा पाठपुस्तकाचे लेखक टंकमुद्रित केलेले लिखाण प्रकाशकांना सोपवायला लागले तेव्हा एकच क्त शिल्लक राहिला. मराठी पाठ्यपुस्तकांत हमखास आढळून येणारा आणि डोळ्यांना खुपणारा शब्द म्हणजे द्वंद्व. याचा उच्चार अनेक मुले दवंदव करीत असत.--वाचक्नवी
जोडाक्षरांची उभी मांडणी
मायबोलीवरील एका चर्चेत कुणीतरी "भक्त हा शब्द भत्क असा दिसतो म्हणून तो न वापरता भक्त वापरा." असे अगदी आक्रमकपणे सांगीतले होते.
http://www.maayboli.com/node/16886
तसे असेल तर पद्धत या शब्दात अर्ध्या ध् ला पूर्ण द जोडल्यासारखा "दिसला", तरी प्रत्यक्षात अर्ध्या द् ला पूर्ण ध जोडलेला आहे. त्यामुळे पद्धत एकवेळ चालेल पण पध्दत पूर्ण चूक! आता "पद्धत" हे झाले आडव्या मांडणीचे जोडाक्षर आणि "पद्धत" आहे उभ्या मांडणीचे जोडाक्षर. शासनाच्या नियमानुसार जोडाक्षरे उभ्या मांडणीने दाखविली पाहिजेत.
http://tinyurl.com/y8pzet3
सरकारचे नियम (सोयीचे असतील ते) पाळण्याच्या माझ्या पापभिरू मानसिकतेमुळे मी माझ्या लेखात उभ्या मांडणीचा (जोरदार) पुरस्कार केला आहे. दिसायला वाईट दिसले तरी चालेल पण नियम म्हणजे नियम.
भक्त आणि इतरेजन
देवनागरीतला भक्त जर भत्क वाटत असेल तर बंगालीतल्या या जोडाक्षरांना काय म्हणाल? अक्षरांचे आकारमान कृपया मोठे करून वाचावे.
ক + য = ক্য (क+य=क्य)
ক + র = ক্র (क+र=क्र)
ভ + র = ভ্র (भ+र=भ्र)
ষ + ণ = ষ্ণ (ष=ण=ष्ण)
ধ + ৱ = ধ্ৱ (ध+व=ध्व)
হ + ন = হ্ন (ह+न=ह्न) आणि शेवटी,
ক + ত = ক্ত (क+त=क्त)
जोडाक्षराची फोड करून जोडलेली अक्षरे वाचण्याचा प्रयत्न करून पहावा. यशस्वी झाल्यास क्तवर टीका करण्यास हरकत नाही.--वाचक्नवी
ध्द ची गोष्ट
ध्द वरून एक हकीकत आठवली. संस्कृत पंडित मोक्षमुल्लर(फ़्रेडरिक मॅक्स-म्यूलर) जर्मनीमध्ये काही संस्कृत ग्रंथांची छपाई करून घेत होते. त्यांचा चलाख खिळेजुळार्या मोठ्या चापल्याने ठसे जोडून शब्द बनवीत होता. मध्येच तो अडला आणि काहीतरी पुटपुटला. साहेबांनी विचारले, "काय झाले?" उत्तर मिळाले, "हे जे अक्षर आहे ना त्याची जुळणी जराशी विचित्र आहे. एरवी
ध ची जोडाक्षरे बनवताना डाव्या हाताने अर्धा ध(ध् ) घ्यायचा, आणि उजवीकडच्या कप्प्यांमधून म-न-य-व यांतले एक अक्षर उचलून शेजारी ठेवले की ध्म, घ्न, ध्य, ध्व तयार होतात. पण हा ध्द बनवताना मला उजव्या कप्प्यातला द सापडतच नाही. तो उचलण्यासाठी मला डाव्या हातावरून उजवा हात नेऊन हाताची फुली करावी लागते, आणि मग डाव्या बाजूच्या कप्प्यातून द उचलावा लागतो. संस्कृतचे कुठलेही जोडाक्षर बनवताना मला हातांची असली आडनिडी सर्कस करावी लागली आहे, असे मला आठवत नाही." मोक्षमुल्लरसाहेब हसले आणि त्यांनी ते अक्षर बदलून द्ध करून दिले. त्यांना माहीत होते की, झलां जश् झशि (पाणिनी ८.४.५३) या सूत्रान्वये पाणिनीने ध्द सारखी अक्षरे संस्कृत(आणि म्हणून इतर भारतीय भाषांत) बनू नयेत याची चोख व्यवस्था केली आहे.--वाचक्नवी
त आणि भ
वरील प्रतिसादात बंगातलीत त आणि भ साठी सारखेच अक्षर वापरले आहे. हे असेच असते का टंकन दोष आहे?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
नाही!
'भ'ला मध्ये आणखी एक गाठ आहे.
(तसे गोंधळात टाकणारे आहेत खरे. गुजराती लोकांना मराठी/देवनागरीमधले "भ/म" असेच गोंधळात टाकत असावेत. त्यांच्या ભ/મ पेक्षा त्यांना देवनागरीतली छोटीशी गाठ फारच सूक्ष्म वाटत असेल!)
थोडेसे तथ्य
भ ची गाठ गुजराथ्यांना फारच सूक्ष्म वाटत असेल, यात तथ्य आहेच. म्हणूनच ध-थ-भ ही अक्षरे लिहिताना वरची शिरोरेषा तोडून गाठीसाठी जागा केलेली असते. या अक्षरांच्या गाठी, तसेच म-न-र-स-ग आदींच्या गाठी तत्त्वत: भरीव हव्यात.
हिंदीतल्या ध-भ-थंना अजिबात गाठ नसते, ती अक्षरे केवळ शिरोरेषेतल्या फटीवरून ओळखावी लागतात. गुजराथ्यांच्या महाजन लिपीत शिरोरेघ नाही, त्यामुळे तिकडची माणसे हिंदी-मराठी सुद्धा शिरोरेषेशिवाय लिहितात. त्यामुळे त्यांचा घोटाळा होणारच.
अवांतर : गुजराथीत लिहिलेला दुकानावरच्या पाटीवरचा કક્કડ हा शब्द मी एका मराठी माणसाला वाचायला सांगितला होता. दहा मिनिटे प्रयत्न करून त्याने शेवटी शरणागती पत्करली! --वाचक्नवी
अवांतर
अवांतर होतंय, पण दुवा माहितीपूर्ण आहे- (9.1 Devanagari)
जोडाक्षरांची आडवी मांडणीच योग्य!
'जोडाक्षरांची आडवी मांडणी' या विचारांचा मी समर्थक आहे. कारण त्यातून शब्दाचे स्वतःचे अर्थ हळू-हळू दिसू लागतात, आणि ते शब्दांची वेगळी दुनिया दाखवतात.
उदाहरणार्थः
(हिंदी) कक्श= इंग्रजी 'सेल'
(हिंदी) कक्शा= इंग्रजी 'डिविजन'
(संस्कृत) अक्श= डोळा
(उर्दु) अक्स=इंग्रजी 'रिफ्लेक्शन', प्रतिबिंब
क्शर = माझ्या मते...'व्यंजन', अक्शरांमधून स्वर वेगळे केल्यानंतर विभाजीत न करता येणारा भाग
क्शार=खार्या पाण्यातून पाणी वेगळे केल्यावर जे उरते ते
अक्शर= एक अखंड उच्चार, ज्यात स्वर ही आहे व व्यंजन ही आहे. जे उच्चार एखादी भाषा बोलताना वारंवार येतात असे ते.
पूर्वीच्या काळी हाताने लिखाण करताना कमीत-कमी जागेत लिहीता यावे ह्या सोयी साठीच जोडाक्षरांना स्वतःची नवी रूपे मिळाली असावीत.
सहमत
'तुमचे विचार योग्य' या विचारांचा मी समर्थक आहे. कमीत कमी जागेत उभा राहिल्यास शब्दाचे स्वतःचे अर्थ मला हळूहळूच कळतात आणि माझ्या डोळ्यांतून खारे पाणी वेगळे होऊ लागते. माझ्या शरिरातील क्शार कमी झाले की मला वारंवार आडवे व्हावेसे वाटते. मग मी अशा एका अखंड दुनियेत जातो जेथे मीही आहे आणि माझे प्रतिबिंबही आहे. तेथे केवळ जोडाक्शरांनाच नव्हे तर डिविजन होणार्या लक्श लक्श सेल्सप्रमाणे मलाही नवनवी रुपे मिळतात.
५.२
युनिकोड ५.२ ची अक्षरे असलेला एखादा देवनागरी फाँट कोणाला माहिती असल्यास कृपया कळवावा.
आडवी मांडणी
आडव्या मांडणीच्या बाजुला माझे मत जाते. एकतर उभ्या मांडणीत अक्षरांचा संकोच केल्याशिवाय लिहिता येत नाही. त्यामुळे डोळ्याला त्रास होतो किंवा एकंदरच अक्षरे मोठी काढावी लागतात. दुसरे म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने आडवी मांडणी मान्य करत वर शालेय शिक्षणात आणली होती. द्ध, ध्द लिहिण्यापासून रोखण्यासाठी पायमोडका द आणि ध असे लिहिण्याचा नियम केला होता.
युनिकोड सरकारनेच बनवले तेंव्हा स्वतःचे निययम धाब्यावर बसवून वा हिंदी दट्यापुढे मान तुकवून केल्यासारखे दिसते. युनिकोड मध्ये स्वाभाविक रित्या काही ठिकाणी उभी पद्धत आहे. कदाचित मराठी हिंदी वेगळे झाले तर हा प्रश्न सुटेल. पण यावर कोणास भेटायचे (याला जबाबदार कोण?) म्हणजे आपले म्हणणे मार्गी लागेल हे कळत नाही. माहितीयुगातील माहिती न मिळण्याची ही परिसीमा दिसते.
झिरो जॉयनर पद्धत आवडली पण ती गमभनत कशी वापरायची कळले नाही.
कुठलेही स्टॅन्डर्ड हे पूर्णतः लॉजिकल नसते. तर सार्वत्रिक समजाला शब्दबद्ध केले जात असते. उभ्या मांडणीची जुनी पुस्तके (यातच स च्या खाली त) आज वाचवत नाहीत. कदाचित एके काळी तसे सहज शक्य असेल. मोल्सवर्थचा जुना शब्दकोश पाहिला तर तो कुठल्या लिपीत लिहिला आहे असे वाटावे इतका वेगळा वाटतो. आताच्य लोकांनी आताचे स्टँडर्ड वापरावे या मताचा मी आहे म्हणून आडवी मांडणी.
प्रमोद
युनिकोड फाँट
जोडाक्षर (लायगेचर) कसे दिसावे ते युनिकोडवाले ठरवत नाहीत असे मला वाटते. विंडोजमध्ये -य हे चिन्ह जसे दिसते तसे र्य हे जोडाक्षरही दिसते. पण लिनक्समध्ये ते र्य असे (र् खाली एक बिंदू दिसतो) आडव्या मांडणीचे दिसते. गंमत म्हणजे लिनक्सचा फाँट, युनिकोड ५.२ च्या चंद्रवाल्या अ (विंडोजमध्ये अॅ जसा दिसतो ते अक्षर) ला ॲ असा अचूक दाखवितो, स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स हे दोन्ही शब्द टिळकांच्या नियमाने स्पोर्ट्स असे दाखवितो.
आडवी विरुद्ध उभी.
>>आडव्या मांडणीच्या बाजूला माझे मत जाते. एकतर उभ्या मांडणीत अक्षरांचा संकोच केल्याशिवाय लिहिता येत नाही. त्यामुळे डोळ्याला त्रास होतो किंवा एकंदरच अक्षरे मोठी काढावी लागतात. दुसरे म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने आडवी मांडणी मान्य करत वर शालेय शिक्षणात आणली होती. द्ध, ध्द लिहिण्यापासून रोखण्यासाठी पायमोडका द आणि ध असे लिहिण्याचा नियम केला होता.<<
उभ्या मांडणीची छपाई कमी जागा घेते आणि तोच मजकूर कमी पानात छापला जातो. ज्या आकारमानाची अक्षरे आपण हाताने लिहितो त्यासाठी, उभ्या मांडणीचा कुठलाही अडथळा होत नाही. आपल्याला थोडे लांबट अक्षर काढायला कुणी मनाई घातलेली नसते. उभ्या बांधणीची शेलाटी जोडाक्षरे सुरेख दिसतात आणि आडव्या बांध्याची कमी सुरेख, यावर चर्चा करायला फारसा वाव नाही. अक्षरांचे आकारमान फार लहान असते तेव्हाच वाचनीयतेचा मुद्दा उभा राहतो. संगणकाच्या पडद्यावर अक्षर कधीही मोठे करून वाचता येते, आणि तशीच जरूर असेल भिंग वापरून घरी. आजवर आपण जुनी पुस्तके वाचतो तेव्हा क्वचित भिंग वापरावेच लागते. जुन्या शब्दकोशांसाठी तर हमखास! पण त्याचे कारण, सफ़ाईदार नसलेली छपाई.
महाराष्ट्र शासनाने आडवी जोडणी नाइलाजाने मान्य केली असणार. कारण त्या काळी, उभ्या जोडणीची टंकलेखनयंत्रावर सोय नव्हती म्हणूनच केवळ! पण आडवी जोडणीच करावी असा आदेश असल्याचे ज्ञात नाही. पायमोडकी अक्षरे लिहिणे सपशेल चुकीचे आहे, हे वर अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे.
मोल्सवर्थची छपाई शिळाप्रेसवर झालेली आहे. त्या काळची पुस्तके अशीच होती. देवनागरी, रोमन आणि पर्शियन लिप्यांत केलेली तेवढी बिनचूक छपाई आता होईल? (पण तेथे ही स्त काढताना स च्या खाली त जोडलेला नाही.) ह.अ.भाव्यांनी मोल्सवर्थ सर्व अक्षरजुळणी करून परत छापला आहे, पण त्यात पर्शियन लिपीतले शब्द नाहीत.
मराठीतली अनेक अक्षरे युनिकोडाधारित फ़ॉन्ट्सवर नाहीत, पण त्याला लिपिकार जबाबदार आहेत. --वाचक्नवी
?
यती घेणे, सुरेख दिसणे, यांच्यात चूक-बरोबर कसे ठरविता येईल? याबाबतीत जे नियम बहुमताला आवडतील ते वापरण्यास मी तयार आहे.
बहुमताचा प्रश्नच नाही
इथे बहुमताचा काय संबंधे. जे चूक आहे, ते चूकच. पायमोडकी अक्षरे लिहिण्याने काय अनर्थ होतात याची वर दिलेली उदाहरणे पुरेशी नाहीत?
आणि एक लक्षात असू द्यावे, शुद्ध भाषा बोलणारे-लिहिणारे विचारवंत कुठल्याही समाजात अल्पसंख्यच असतात. हीच माणसे प्रमाणभाषा जिवंत ठेवतात.--वाचक्नवी
अनर्थ?
पायमोडकी अक्षरे योग्य प्रकारे 'रेन्डर' करणारी लिपी बनवून सारे अनर्थ टाळता येतील असे वाटते.
बहुमत कोणाचे
प्रमाण भाषा ठरवताना बहुमतापेक्षा जाणकारांचा अभिप्राय मोलाचा हे मान्य. मात्र जाणकारांमधे एकमत नसेल तेंव्हा काय करायचे?
जाणकारांमधील बहुमत? सरकारने जारी केलेल्या शुद्धलेखन पुस्तिकेचे पालन? शाळेत शिकवल्याप्रमाणे? आजकाल जे चाललेय (मुद्रणविश्वात) त्याप्रमाणे?
लिपीतील अक्षरे ही तंत्रज्ञानाप्रमाणे बदलत असतात. (इतिहासावर तंत्रज्ञानाचा प्रभाव हा माझा जिव्हाळ्याचा विषय.) बोरु, टाकातील तिरक्या निबेनी काढलेली अक्षरे ही तंत्रातूनच आली. तशीच बॉलपेनने. पहिल्यांदा मुद्रकांनी (अक्षर ओतणार्यांनी) लिप्यांतरे केली, त्यानंतर टाइपरायटरवाल्यांनी आता आले बाईटवाले त्यातही युनिकोडपूर्व आणि युनिकोडोत्तर हे दोन प्रकार.
यातील युनिकोडवाले नवीन म्हणून त्यांना आपण सरळ व्हा म्हणतोय. काही दिवसांनी यांच्या रेट्याखाली प्रमाण॑लिपी (युनिकोड ही लिपी नसली तरी) आणि प्रमाण भाषा बदलली तर त्यात नवल नाही.
प्रमाण लिपी आणि प्रमाण उच्चार यात अंतर असले तरी चालेल पण लिखित भाषा प्रमाण करावी असे माझे एक जाणकार मित्र म्हणतात. आपली लिपी बरीचशी उच्चाराधित आहे अशा समजुतीत मी असल्याने याचे मला वाईट वाटायचे. पण हल्ली मला ते पटते. त्यामुळे इंग्रजीसारखे मराठीतही स्पेलिंग होईल पण लिखित भाषा प्रमाणबद्ध राहील.
तुम्ही लिहीलेला हलन्त उचाराचा मुद्दा मला पूर्ण पटला आहे तरीही हे.
प्रमोद
मराठी शुद्धलेखनाचे नियम
‘रेन्डर’ करायची म्हणजे नेमके काय करायचे?. अक्षरे बदलून घ्यायची? की त्यांचे रूप बदलायचे? त्याने काय फरक पडणार आहे?
१९६२ चे सुधारित मराठी शुद्धलेखनाचे नियम याच तत्त्वावर आधारलेले होते. महाराष्ट्र राज्य नव्याने झाले होते. कामकाज मराठीतून करायचा राज्यकर्त्यांचा इरादा होता. आता फायलींवर भराभर मराठी लिहावे लागणार आणि पत्रे मराठीत टंकलेखित करून पाठवावी लागणार. याला जुने शास्त्रशुद्ध नियम आणि टंकलेखनयंत्राच्या मर्यादा आडव्या आल्या. मग काय? करा नवे नियम : शब्दान्ती येणार्या सर्व वेलांट्या-उकार दीर्घ लिहायचे. (अपवाद : आणि, नि, परंतु, मराठी शब्दकोशात छापायचे सर्व मूळ संस्कृत शब्द व समासात प्रथमपदी येणारे तत्सम शब्द.) व्युत्पत्तीने किंवा व्याकरणाने सिद्ध होणारे, वा ना होणारे, सर्व अर्धोच्चारित अनुस्वार नवीन नियमांनी काढून टाकले. म्हणजे ना लिहायचे ना उच्चारायचे.(आता कोंकण, फ. मुं शिंदे किंवा ज. शं. जोगळेकर कसे उच्चारणार?)शब्दान्ती येणार्या सर्व पायमोडक्या अक्षरांचे हलन्त काढून टाकले. त्यामुळे कुर्यात सदा मंगलम, सुस्वागतम आणि वंदे मातरम लिहिताना त-म चे पाय मोडता येत नाहीत. एम.ए., पण एल्एल.बी. आणि एस्एस्सी. कारकुनांसाठी केलेले नियम पुढच्या सरकारांनी सर्वांना सक्तीचे केले.
हिंदीने मात्र अजून संस्कृत हस्वदीर्घ, पायमोडकी अक्षरे आणि अर्धोच्चारित अनुस्वार कायम ठेवले आहेत. तसेच इतर भारतीय भाषांनी केले, अपवाद फक्त मराठीचा. त्यामुळे मराठीतले क्वचित-कदाचित हिंदीत आणि उरलेल्या सर्व भारतीय आणि अभारतीय भाषांमध्ये क्वचित्-कदाचित् होतात. दक्षिणेत तर शॉप आणि मार्ट असल्या शब्दांतले अन्त्याक्षरही हलन्त लिहितात.
मलयालम्मध्ये क्, ण्, न्, र, ल, ळ ही स्वतंत्र पायमोडकी अक्षरे आहेत. उर्वरित व्यंजनांना हलन्त करण्यासाठी व्यंजनाला चिकटून लगेच पुढे वरच्या बाजूला एक अतिशय छोटी उपडी वाटी काढतात. अशीच वाटी उ लाही काढून अतिर्हस्व उ लिहितात. कन्नडमध्ये त्याच जागी एक आळे*(दुसर्या लिपीतला सिग्मा) काढतात, तर तामीळमध्ये अक्षरावर एक टिंब देतात. एकूण काय, हलन्त अक्षरांपासून सुटका नाही.
* पूर्वी आणे-पैसे-पया लिहिण्यासाठी रेघी पद्धतीत आडव्या आणि उभ्या रेघा वापरत. चार आण्यासाठी(पाव रुपयासाठी) एक उभी रेघ. आणि एक पैशासाठी(पाव आण्यासाठी)पण तशीच उभी रेघ. फरक समजावा म्हणून पैशासाठीच्या उभ्या रेघेआधी, आण्याच्या आडव्या रेघा नसल्यास, एक आळे(σ) काढत.
११।-॥ म्हणजे ११ रुपये पाच आणे आणि दोन पैसे. ११σ॥ म्हणजे ११ रुपये व दोन पैसे. --वाचक्नवी
शॉप आणि मार्ट
माझ्या अल्पज्ञानानुसार, जर हे हलन्त लिहिले नाही तर त्याचा उच्चार शॉपा, मार्टा असा होतो. त्यामुळे ते हलन्त लिहिणे भाग आहे. उदा. कन्नडमध्ये मुलीचे स्नेहा हे नाव लिहिताना ते 'स्नेह' असे लिहिले जाते व उच्चारताना 'स्नेहा' असे उच्चारले जाते.
मराठी वगळता इतर सर्व भाषक शब्दाच्या शेवटी येणारा 'अ' व्यवस्थित उच्चारु शकत नाहीत असे डॉ. द. दि. पुंडे यांचे मत कुठेतरी वाचले होते. (भयंकर सुंदर मराठी भाषा?). त्यामुळे गुप्त, शुक्ल, योग या शब्दांचे उच्चार गुप्ता, शुक्ला, योगा असे होतात.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मराठी भाषकांशिवाय
हो, ते द.दि.पुंड्यांच्याच त्या पुस्तकात केलेले विधान आहे.
मराठीभाषकांशिवाय आणखी काही अमराठी भाषक अकारान्त अ चा उच्चार व्यवस्थितपणे अ करतात. गुजराथ आणि राजस्थान, मध्य प्रदेशातली इंदूर-भोपाळ-जबलपूर, धार-देवास ही शहरे आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा उत्तर कर्नाटकाचा व मराठवाड्याच्या सीमेवरचा आंध्र प्रदेशाचा भाग. इथली माणसेही शब्दान्ती येणार्या अ चा योग्य उच्चार करतात. पंजाब ते (अरुणाचलमार्गे) केरळ या पट्ट्यातल्या लोकांना अकार जमत नाहीत. अमिताभ बच्चन क ख ग घ ला काखागाघा म्हणतो. मराठीतले ग म भ न आणि सा रे ग म, हिंदीत गामाभाना आणि सारेगामा असते.
बंगाली-आसामी आणि उडियांची वेगळीच तर्हा. ते शब्दातल्या पहिल्या अकाराचा ओकार करतात. शब्दात पहिला अकार नसेल तर दुसर्याचा. कप-कोप, भजन-भोजन, रविंद्र-रोबिंद्र, परंतु विजय-बिजॉय, विनय-बिनॉय, वगैरे.
हलन्त लिहिण्यासाठी गुजराथी-बंगाली लिप्यांत मराठीसारखीच पाय मोडल्याची खूण करतात. बंगालीत अनुस्वार अक्षराच्या शेजारी असल्याने त्याचाही पाय मोडावा लागतो.
दक्षिणी भाषांतील हलन्त(=विराम)चिन्हे :
मल्याळम् : पूर्णाक्षर(अर्धाक्षर) : च ച(ച്), ट ട(ട്), प പ(പ്)
कन्नड : च ಚ(ಚ್), ट ಟ(ಟ್), प ಪ(ಪ್)
तामीळ : च ச(ச்), ट ட(ட்), प ப(ப்).
मल्याळम मधली हलन्त चिन्हाशिवाय हलन्त उच्चाराची चिल्लू अक्षरे(क्, ण्, न्, र्, ल्, ळ्) मल्याळी फ़ॉन्टांवर सापडली नाहीत, आणि जिथे सापडली तिथून नकल-डकव पद्धतीने ती इथे चिकटवता आली नाहीत, याबद्दल क्षमस्व.--वाचक्नवी