उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
हिंदू कादंबरीः आनंदाची बातमी
आजानुकर्ण
June 20, 2010 - 3:54 am
नेमाड्यांच्या चाहत्यांचे इतकी वर्षे वक्री असलेले ग्रह अखेरीस मार्गी लागलेले दिसतात. बरीच वर्षे ज्याची वाट पाहत आहोत ती हिंदू ही कादंबरी अखेर यंदा प्रकाशित होणार असे दिसत आहे.
प्रकाशनपूर्व सवलतीची नोंदणी पॉप्युलर प्रकाशनाच्या मुंबई, पुणे, नागपूर येथील कार्यालयांत किंवा प्रकाशकांनी नेमलेल्या अधिकृत पुस्तकविक्रेत्यांकडे करता येईल. प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी केलेल्या ग्राहकांना 'हिंदू' ची भालचंद्र नेमाडे यांची स्वाक्षरी असलेली खास प्रत मिळेल. आवडत्या लेखकाच्या पुस्तकाची ऑटोग्राफड प्रत मिळवण्याची संधी अनेक वर्षानंतर वाचकांकडे चालून आली आहे.
ब्रूटस यू टू?
दुवे:
Comments
बातमी दिल्याबद्दल धन्यवाद
बातमी चांगली आहे.
लेखकाच्या भोवतीचे वलय आणि पुस्तकाच्या "हिंदू" नावापेक्षा "जगण्याची समृद्ध अडगळ" हे वाक्य इतके लक्षवेधी आहे की पुस्तक मागणी नोंदवणार आहे.
याशिवाय यापुस्तकातील काहि वेचे आज लोकरंगत वाचले ते इथे वाचता येतील
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
मी नोंदवली आहे
मी पॉप्युलरच्या साईटवर ऑनलाईन मागणी नोंदवली आहे. पेमेंट झाल्यावर 'पेमेंट सक्केसफुल एरर' असे पान आल्याने अंमळ काळजी वाटते. पण ऑर्डर नंबर इमेलने आला त्यामुळे फॉलो अप करता येईल. व घरीच पुस्तक येईल. मराठी पुस्तकाच्या मानाने 450 + 30 (शिपिंग) = 480 अंमळ जास्त वाटतात. पण असो.
त्याऐवजी 'अक्षरधारा'च्या राठिवडेकरांना फोन करुन मागणी नोंदवली असती तर बरे झाले असते असे वाटून गेले.
मात्र पुस्तकाची ऑटोग्राफ्ड प्रत वगैरे ट्रिक्स* यावेळी नेमाड्यांनी कराव्यात/करु द्याव्यात याची मौज वाचली.
*(या ट्रिक्स नेमाड्यांच्या की भटकळांच्या?)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
गंमत
गंमत वाटलीच. प्रकाशरावांनी दिलेल्या "प्रकाशनाच्या गणितांकडे" बघितलं तर ही खेळी भटकळांची असण्याची शक्यता अधिक वाटते.
बाकी साईटवर भारतात शिपिंग फ्री लिहिले आहे.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
फसले रे नंदलाला
हो क्की.
पण माझ्याकडून 480 घेतले. पुस्तकाची बातमी वाचल्याने बेहोष होऊन ऑर्डर फॉर्म भरताना हळूच लावलेले शिपिंग चार्जेस नजरेस पडलेच नाहीत. (तसाही पीएमपीएमएलचा चिंचवड-अप्पा बळवंत चौक हा येण्याजाण्याचा प्रवास जमेस धरता 480 म्हणजे स्वस्तातच पडले. शिवाय सुट्या पैशावरुन कंडक्टरशी असलेले भांडणही टळले.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
वाट पाहूनी जीव शिणला
किती वर्षे या पुस्तकाची चर्चा चालू होती याबाबत बॉलपार्क फिगर सांगता येईल काय? माझ्याकडे सध्या हूल हाताशी नाही. मला वाटते २० वर्षे तरी हे पुस्तक लिहिले जात असावे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
१९७९
ऋषिकेशने दिलेल्या दुव्यात म्हटल्याप्रमाणे नेमाड्यांनी १९७९ साली ही कादंबरी लिहिणार अशी घोषणा केली होती.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
३० साल बाद?
आता डिलीवरीची वाट पाहणे आले.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
डिलीवरीच ती.. जिथे ब्रह्मदेवाचे पुढे मागे होते तिथे नेमाड्यांची/भटकळांची काय कथा ;)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
अरे वा!
उत्तम बातमी.
>>> आवडत्या लेखकाच्या पुस्तकाची ऑटोग्राफड प्रत मिळवण्याची संधी अनेक वर्षानंतर वाचकांकडे चालून आली आहे.
--- यात काही फारसं वावगं आहे असं वाटत नाही. मात्र नेमाड्यांनी एरव्ही याची 'लेखकाचा लेखकराव होण्याची प्रक्रिया' अशी वासलात लावली असती :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म ;)
--- यात काही फारसं वावगं आहे असं वाटत नाही. मात्र नेमाड्यांनी एरव्ही याची 'लेखकाचा लेखकराव होण्याची प्रक्रिया' अशी वासलात लावली असती :)
तेच तर. त्यामुळेच अंमळ मौज वाटली. पण सदर पुस्तक नेमाड्यांच्या चाहते वर जायच्या आधी आले हे नशीब की योगायोग?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हिंदू बद्दल
हिंदूबद्दल थोडे अधिक येथे वाचा.
दुवा
ऋषिकेश च्या पहिल्याच प्रतिसादात हा दुवा दिलेला आहे.
प्रकाश घाटपांडे
जिप्सी
जिप्सी लोक मूळचे भारतातीलच असे विकीसर्फिंग करताना वाचले होते.
शाळेत कोसला कादंबरीतून एक धडा होता. बोरिंग होता एवढेच आठविते. नेमाडे यांचे बाकी काही वाचलेले नाही. त्यांचे यूएसपी काय असते? या कादंबरीतून काय अपेक्षा आहे? नवल मासिकातील कथांप्रमाणे गूढरम्यता हा जॉन्र आहे का? पहिले प्रकरण खिळविणारे वाटले नाही.
बुद्धदर्शन?
शाळेत कोसला कादंबरीतून एक धडा होता.
बुद्धदर्शन? त्या प्रसंगामागचे-पुढचे काहीच न कळल्याने तो धडा बोरिंग वाटला असावा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
शक्य आहे
हां! वेगवेगळ्या मूर्तींची वर्णने होती.
शक्य आहे.
सुवार्ता...
सुवार्ताच म्हणायची... मी स्वतः ही बातमी साधारण २६-२७ वर्षांपासून ऐकत आहे. उत्सुकता आहेच.
बाकी, लेखकाचा लेखकराव वगैरे होणे हे अटळ आहे यावर शिक्कामोर्तब झाले. पण अशा आक्षेपांवर नेमाड्यांचे स्वतःचे उत्तर काय असेल ते जाणून घ्यायला आवडेल. ;)
बिपिन कार्यकर्ते
मागणी नोंदवली
मी अमेरिकेतून मागणी नोंदवली. बिलात शिपिंगचा खर्च ७०रु होता. मला हा खर्च कमी वाटतो, त्यामुळे चिंताही वाटते. कुणी यापुर्वी पॉप्युलर प्रकाशनाकडून बाहेरच्या देशातून पुस्तक मागवले आहे का?
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
मलाही काळजी वाटते आहे!
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
माहिती कुणी नेमाडपंथी देऊ शकेल का?
[मी ही उत्सुकतेने मागणी नोंदवली आहे.
त्यात काही अडचणी आल्या.
म्हणजे मागणी नोंदवल्यावर पेज लोडींग म्हणत काहीच आले नाही - आणि नंतर कनेक्शन एक्सपायर्ड असा संदेश आला.
फाफॉने सांगितल्यानुसार रिलोड करावे की न करावे असा विचार करत असतांना रिलोड केले.
मग खालील मेल आली.
Dear Customer,
Thank you for your order from http://www.popularprakashan.com
We have received a duplicate order for the above order number, however the status of the order could not be determined. This duplicate Order could have been placed in case 'Back' Or 'Refresh' was pressed during the processing.
This could be a successful or a Failed Order. To know the correct status of your order, kindly contact CCAvenue Support Team through email at service@ccavenue.com
Be assured that only one transaction with this particular Order Number will be processed.
You can also contact the seller directly by e-mail at : prayagr@popularprakashan.com for the Order status .
Regards,
CCAvenue Customer Service]
दोनदा चार्जेस लावणार नाहीत या कल्पनेने बरे वाटले.
बिलिंगमध्ये कोणतेही चार्जेस नाहीत - त्यामुळे मलाही काळजी वाटते आहे!
भारतातून ऑस्ट्रेलियात फुकट पुस्तक पाठवणे कसे परवडेल या विषयी साशंक आहे.
पॉप्युलर काही तरी सोय करेल असे वाटते.
आवांतर -
मराठी पुस्तक खरेदी करण्यासाठी 'मायबोली खरेदी' हे सगळ्यात चांगले स्थळ आहे असे वाटते.
कदाचित तेथूनच घ्यायला हवे होते असे आता वाटते आहे.
इ रसिक ही आहे - पण महाग आहे.
पॉप्युलर ने या सीसीऍव्हेन्युचा वापर का केला आहे ते कळत नाही - मायबोली/रसिकचा सेटअप आहेच.
करार करून तोच वापरता आला असता असे वाटले.
-निनाद
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
कादंबरीने उत्सुकता चाळवली आहे.
वाचण्याची इच्छा आहे.
नेमाडे यांच्या लिखाणाविषयी आणि इतर पुस्तकांविषयी माहिती हवी आहे.
नेमाडे यांच्याविषयी थोडीशी माहिती
नेमाडे देशीवादी असल्याने बिडी ओढतात. त्यांनी स्वतः अनेक ठिकाणी हा उल्लेख अभिमानाने केला आहे. नेमाडे व हातकणंगलेकर एका प्रशिक्षणासाठी बाहेरगावी एकत्र होते. हातकणंगलेकरांना त्यांच्या ब्रँड कुठे मिळाला नाही तेव्हा त्यांनी नेमाड्यांकडे चौकशी केली तेव्हा नेमाड्यांनी त्यांनी बिडी ऑफर केली असा उल्लेख म.द. हातकणंगलेकर यांच्या एका लेखात वाचला आहे.
त्यांच्या लेखनाविषयी व पुस्तकाविषयी बऱ्याच ठिकाणी लिहिले गेले आहे त्यामुळे ही (अनेकांसाठी जुनीच असलेली पण तुलनेने) नवी माहिती द्यावीशी वाटली. :-)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
निरोप
मलाही श्री निनाद यांच्याप्रमाणेच सीसीऍव्हेन्युकडुन निरोप आला. मजकुरही दोनदा चार्जेस सोडल्यास सारखाच आहे. prayagr@popularprakashan.com या पत्त्यावर निरोप पाठवला आहे. उत्तराची वाट पाहत आहे.
युट्युबवर नेमाड्यांची एक दीर्घ मुलाखत उपलब्ध आहे. या मुलाखतीत श्री नेमाडे त्यांच्या लेखनासंदर्भातील विचारांवरही बोलतात.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
पुरवणी
आजच खालील निरोप पॉप्युलर प्रकाशनाकडून मिळाला. त्यामुळे निश्चिंत झालो आहे.
Dear Shri ***
We have received your order. The order number for your reference is
*******
Thank you for shopping online and availing of the special pre-publication offer for ‘Hindu' by Bhalchandra Nemade. We will dispatch your autographed copy of the book on the 15th of July, 2010.
Many thanks for your order once again. We will keep you updated.
Thanks and Regards
A**** *****e
Tel. (022) 23530303
Mob. *******1
विवेकवादी लेखन वस्तुनिष्ठ असते,व्यावहारिक, वास्तववादी असते.धादान्तवादावर(कॉमनसेन्सवर) आधारित असते. निसर्ग नियमांना धरून असते. तर्कसुसंगत तर असतेच असते.त्यामुळे बुद्धिमान व्यक्तींना ते अपरिहार्यपणे पटते. पण हे पटणे बौद्धिक पातळीवर असते.
मग इतके दिवस ज्या संकल्पना (पूर्वजन्म, पुनर्जन्म,संचित,परब्रह्म, आत्मा, स्वर्ग,मोक्ष इ.)खर्या मानल्या त्यांचे काय? बालपणी मोठ्या माणसांनी जे सांगितले,मोठेपणी प्रवचनात,व्याख्यानांत जे ऐकले,ग्रंथांत, संतसाहित्यात जे वाचले ते खोटे कसे असेल? सत्यच असले पाहिजे. असे भावनेला वाटते.खोटे आहे हे बुद्धीला पटत असूनही पूर्वसंस्कारांमुळे ते खरे मानण्याचा भावनेचा हट्ट म्हणजे श्रद्धा. भावनेला ही श्रद्धा सोडवत नाही.त्यामुळे बुद्धी आणि भावना यांत द्वंद्व निर्माण होते.त्याचा त्रास होतो. मग भावना बंड करून उठते."हे काय लिहिले आहे? हेच सत्य आणि असेच मानावे! आम्हांला शिकवणारे हे कोण? आम्ही हे मुळीच सत्य मानणार नाही"
खरे तर "हेच सत्य" असे लेखात मुळीच म्हटलेले नसते.ते सांगते बुद्धी. राग निघतो लेखावर) !! तर असा हा एकूण प्रकार असावा.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
हा निरोप कधी आला
मला काल माझे वैयक्तिक मेलखाते तपासण्यास वेळ मिळाला नसल्याने मलाही असा मेल आला आहे का हे पाहता आले नाही.
ऑर्डर दिल्यावर सीसीएवेन्यूचा मेल येतो. त्यानंतर हा पॉप्युलर प्रकाशनाचा मेल तुम्हाला किती दिवसांनी आला हे सांगता येईल का? (म्हणजे मी लायब्रीत जाऊन माझे वैयक्तिक मेलखाते तपासून पाहतो.)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चार दिवस
ऑर्डर २० जूनला (हा धागा वाचल्यानंतर लगेच) नोंदवली. वरील निरोप काल (२४ जूनला) आला. वर दिलेल्या दुध्व क्रमांकावर फोन करून चौकशी करता येईल. तसे करायचे असल्यास ज्यांनी निरोप पाठवला त्यांचे नाव व भ्रध्व क्रमांक व्यनिने पाठवू शकतो.
________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.
मेरा पिया घर आया ओ रामजी
मलाही वरील आशयाचा मेल २३ जूनला आला होता. मात्र स्प्याममध्ये असल्याने लवकर लक्षात आला नाही. आता फक्त पुस्तकाची वाट पाहणे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नकार
मला आत्ताच आलेल्या निरोपानुसार कादंबरी मिळणार नाही असे दिसते.
from J*** Ba*** <*****b@popularprakashan.com>
to ****
cc ******@popularprakashan.com
date Fri, Jul 23, 2010 at 12:47 AM
subject Your Order
12:47 AM (6 hours ago)
Dear Mr. ***,
We thank you for your order for a copy of "Hindu". The book has been launched last Sunday in Mumbai.
Kindly note that the online scheme vide which you have ordred and paid was open to deliveries in India only. Under these circumstances please advise whether you would like a refund of the amount to your bank account which can be done in the next 3-4 working days or you would like to provide an alternate address in India where the book can be delivered.
We shall look forward to your response.
Regards
Jayant ***
Regional Head - North India
कादंबरी संदर्भातील श्री. नेमाडे यांची प्रकट मुलाखत
"हिंदु ~ जगण्याची समृध्द अडगळ" असे लेखकाच्या भारदस्त मिशासारखेच नाव असलेल्या जवळजवळ ३० वर्षे वाट पाहायला लावणार्या या कादंबरीविषयी आणि एकुणच् तिच्या प्रदीर्घ प्रवासाविषयीची श्री. भालचंद्र नेमाडे यांची एक चांगली मुलाखात् "स्टार् माझा" वर परवा प्रसृत करण्यात आली. कादंबरीचा नायक "खंडेराव" याच्याहून एकुणच हिंदु संस्कृतीच्या अनुषंगाने ती मुलाखात झाली. शिवाय मराठी साहित्यातील सध्याच्या घडामोंडीविषयींची त्यांची "सर्वद्न्यात रोखठोक" मतेही त्यांनी ठामपणे मांडली, विशेषतः "मराठी साहित्यात कादंबरी हा प्रकारच नाही, आहे तो फक्त एका दीर्घकथेला मोठे करण्याचा केविलवाणा प्रयत्न" असे त्यांचे विधान चकरावून टा़कणारेच आहे. पण असे असले तरी आम्ही त्यांना मायमराठीतील एक ज्येष्ठ कादंबरीकार असेच मानणार आणि त्याच भूमिकेतून् मी "हिंदु..." ऑनलाईन बूक केली आहे.
(वि.सू. : भारतातील डिलीव्हरीसाठी "शिपिंग चार्जेस्" नाहीत हे प्रकाशकाच्या साईटवर अगोदरच वाचले असल्याने फक्त रुपये ४५०/- चे पेमेन्ट मी केले होते, आणि ती ऑर्डर स्वीकारलेची मेलही झटकन आली आहे.)
हिंदू चतुष्टय?
महाराष्ट्र टाईम्समधील एका बातमीत वाचल्याप्रमाणे ही कादंबरीही चार भागात येणार आहे. त्याविषयी रा. नेमाडे यांनी काही वक्तव्य केले काय? (त्यासाठी आणखी किती वेळ वाट पाहावी लागणार?)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
बग फिक्सिंग
बग फिक्सिंग झालेले दिसते. मी आता एक डमी ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिपिंग चार्जेस 0 रुपये दाखवले. यापूर्वी माझ्याकडून 480 रुपये घेतले होते. प्रकाशकांकडे पाठपुरावा करुन ३० रुपये परत मिळतात का ते पाहतो. :p
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
"चतुष्ट्य"
१. रा.रा. नेमाडे यांनी थेट "चतुष्ट्य" असा प्रयोग आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत केलेला नाही, तथापि "हिंदु १५०० पानापर्यंत् तर नक्कीच जाणार आहे इतका मोठा आवाका मी कथानकात घेतलेला आहे" असे मात्र ते म्हणाले. अर्थात त्या बोलण्याचा "फायदा" पॉप्युलर सराईत धंदेवाईक दृष्टीने उचलणारच आणि जसे "बिढार" ला भाव आल्या आल्या चतुराईने त्यांनी "हूल" चे पिल्लू त्यातून बाहेर काढले आणि "स्वतंत्र" कादंबरी म्हणून नेमाडेप्रेमी वाचकांच्या पाकिटावर डल्ला मारलाच; तीच गत "हिंदु" च्या १५०० पानांची ते करणारच यात तीळमात्र शंका नाही, आणि आता लेखकाचे लेखकराव झालेले पांडुरग उर्फ चांगदेव उर्फ खंडेराव उर्फ भालचंद्रपंत आपल्या मानधनाचे चेक्स निमूटपणे स्वीकारून परत यापुढील साहित्यिकांच्या फडात प्रकाशकांना शिव्या हाणत बसणार. असो. मराठीचा एक कट्टर वाचक म्हणून आपण "हिंदु" चे स्वागत तर करणारच. बाकी जो इतिहास या निमित्ताने घडेल तो पाहु या !
२. तीस रुपयाबाबत फोनवरील संभाषणावर विसंबून राहू नका, ई-मेल हाच एकमेव "अन्सरेबल" उपाय आहे. ~~ बेस्ट लक !
अगदी अगदी
नेमाड्यांच्या साहित्यप्रतिभेबाबत तीळमात्र शंका नसली तरी हिंदूच्या निमित्ताने त्यांचा पुरता लेखकराव झाला आहे याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही. एकंदरीत त्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
टीकास्वयंवरमध्ये आदिम उग्र लेखकाचे कौतुक करुन इतरांना शिव्या हासडणारे नेमाडे स्वतःच्या पुस्तकाची पब्लिसिटी करण्यासाठी भटकळांसोबत मुलाखतींवर मुलाखती देत आहेत असे मटामध्ये वाचले. (मटाच्या बातमीत मुलाखतींच्या रतीबाचे वर्णन होते.) नेमाडे यांची स्वाक्षरी असलेल्या खास प्रतीही उपलब्ध होणार आहे. कोणता उग्र आणि आदिम लेखक अशा स्वाक्षऱ्या देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हिंदू चतुष्टय असल्याचे वरील दुव्यातील मुलाखतीत नेमाड्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यापैकी तीन पुस्तकांची नावेही ठरलेली आहेत. त्याबाबत नेमाडे काही बोलले असल्यास ती माहिती हवी होती. (ष्टार माझावरील मुलाखतकार नेहमीचेच यशस्वी चंद्रकांत पाटील होते की काय? :-) )
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
तीस रुपयांबाबत
तीस रुपयांबाबत पॉप्युलरला मेल केला आहे. शेवटी तत्त्वाचा प्रश्न आहे. :). फोनवरील संभाषणात उगीच आणखी पैसे वाया घालवून तीस रुपयांमधील मार्जिन कमी करायला नको असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ब्राह्मणद्वेष/खोडसाळपणा की कसे?
राजवाड्यांनी ज्ञानेश्वरीची मूळ प्रत नाहिशी केली असे नेमाड्यांनी म्हटले आहे. (९:२९ पासून पुढे)
ह्याबाबत पुरावे आहेत काय? नसल्यास ही खोडसाळ स्टंटबाजी म्हणायला हवी. एका दगडात नेमाड्यांनी खरे तर अनेक पक्षी मारले आहेत. राजवाड्यांनी ही प्रत गायब केली नाही असे म्हटल्यास मग ज्ञानेश्वर जातीपाती मानणारे, ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत असे मानणारे आहेत असे मानावे लागते. असो.
कादंबरीला मिळणारा प्रतिसाद बघता एकंदर नेमाड्यांचा वृद्धापकाळ अधिक सुखात जाईल असे दिसते आहे. (ऑर्डर नोंदवली आहे.)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ब्राम्हणद्वेष
नेमाड्यांच्या लेखनातून ब्राम्हणद्वेष दिसतोच. मात्र त्याला ते ब्राम्हण्यद्वेष असे म्हणतात.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
खरा उद्देश् !!
खरंतर नेमाड्यांच्या रक्तामांसात भिनलेला एकमेव "पांडुरंग सांगवीकर" त्यांना अजूनही सोडायला तयार नाही असेच "स्टार माझा" वरील ही प्रदीर्घ मुलाखात सांगते. पांडुरंग जसा काहीही करायला तयार असतो किंवा काहीही न करायला तयार असतो तद्वतच दस्तुरखुद्द लेखकराव नेमाडे वर्षानुवर्षे जपलेल्या आपल्या भूमिका बदलायला तयार असतात. ज्या मुंबईने आपल्यातले स्वत्व खावून टाकले असा कांगावा करणार्या आणि म्हणून् "स्वतःला" त्या मुंबईपासून कायमचे (?) दूर घेवून जाण्याचा 'थोर डिसिजन' घेतलेला चांगदेव (पक्षी : नेमाडे) प्रोफेसरीतील अखेरची वर्षे मात्र बेमालूमपणे त्याच मुंबईत काढतात कारण तिथे "पॉप्युलर" नावाचा पोपट लाडू घेवून २४ तास सेवेसाठी उपलब्ध आहे. आता वयोमानानुसार नसा थंड पडल्या असल्याने "कोसला"सारखी फेसाळलेल्या नदीतून उसळी मारता येत नाही, आणि मग अशावेळी हेही सोयीस्कररित्या विसरले जाते की १९६०-६५ च्या आगेमागे रा.ज.देशमुख हे जहागीरदाराच्या आविर्भावात रणजीत देसाईंची जी देखभाल करत होते, त्या प्रवृत्तीला आपणच आपल्या जोषपूर्ण तारूण्यात शिव्यांची लाखोली वाहत होतो.
या ज्या मुलाखतींचा सपाटा आपणास दिसत आहे, शिवाय प्रकाशनाच्या दिवशी लेखकाने बिग बझार कॉम्प्लेक्समध्ये बसून वाचकांना (खरे तर गिर्हाईकांना) स्वाक्षर्या करून देण्याची अमेरिकन संस्कृती अंगीकारणे (वर "भारतीयत्व टिकवून ठेवणे ही खरी गरज आहे" असे अधुनमधुन उमाळे काढणे), ही सगळी गिमिक्स भटकळांची नवी पिढी "प्ले" करीत् आहे. अर्थात प्रकाशन व्यवसाय हा कितीही "सोफिस्टिकेटेड" असला तरीदेखील तो एक पूर्णार्थाने धंदा आहे, आणि इंग्लंड अमेरिकेतून एमबीए पदवी घेवून आलेले या क्षेत्रातील् एक्झेक्युटीव्ह प्रकाशनपूर्व वातावरण कसे आणि किती "अलाईव्ह" ठेवायचे हे नक्कीच जाणतात. नेमाड्यांच्या अशा जुन्या बाटलीत परत जुनीच दारू घालून तिला आता नव्याने खुद्द् लेखकरावानेच उकळी देणे हा चर्चेचा विषय असलाच तर तो "वैचारिक" नसून "आर्थिक" आहे.
नेमाडे यांची मुलाखत
'हिंदू' संदर्भात नेमाडे यांची एक चांगली मुलाखत लोकमतच्या मंथन पुरवणीमध्ये वाचनात आली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मुलाखत
नेमाड्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे काही वेळा समजले नाही. बरीच वाक्ये विस्कळीत वाटली. उदा. " आपल्याकडे पालेभाज्याच पन्नासएक प्रकारच्या असायच्या. त्या नाहीशा झाल्या. जगभर मधुमेह वाढला, रक्तदाब आहे, माहिती नसलेले व्हायरस येत आहेत. स्वाईन फ्ल्यू हे काही नाव नव्हे. हे सारे संस्कृतीच्या संदर्भात तपासले पाहिजे." स्वाइन फ्लू संस्कृतीच्या संदर्भात तपासायचा म्हणजे काय?
बहुदा
आपल्याकडे पालेभाज्याच पन्नासएक प्रकारच्या असायच्या. त्या नाहीशा झाल्या. जगभर मधुमेह वाढला, रक्तदाब आहे,
बहुतेक आपण पिष्टमय (बटाटे इ.) भाज्या अधिक खाऊ लागलो, त्यामुळे होणारे आजार - मूळ संस्कृतीपासून (पालेभाज्या खाण्याच्या) दूर नेणारे. (या पार्श्वभूमीवर http://misalpav.com/node/13064 हा जागु यांचा प्रकल्प मला आवडतो).
स्वाईन -फ्लू म्हणायचे नाही कारण त्यात "डुक्कर" (विशिष्ट समाजांमध्ये न पटणारे) अशी संभावना आहे. म्हणून अमेरिकेतही एचवनएनवन असे म्हणू लागले असे ऐकून आहे.
पुस्तकावर टिपणी करण्यासाठी आधी ते वाचावे लागेल..
हम्म
मुलाखत सगळी कळण्यासाठी बरेच 'रिडींग इन बिटविन द लाइन्स' करावे लागेल असे वाटते. मला आधीचे वाक्य कळले होते (पालेभाज्या, रक्तदाब वगैरे) पण शेवटच्या वाक्यात गोंधळ झाला.
दा विंचि कोड सोडवल्याबद्दल आभार. :)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
इतिहासाचार्य नेमाडे
मुलाखत चांगली आहे. पुस्तकाची वाट पाहतो आहे.
मलाही तसे वाटते. बौद्ध, जैन किवा आजवर होत आलेले संघर्ष यातून आपण सगळे काही टाकून दिले नाही. अगदी मुसलमानांचेही सगळे काही टाकून दिले नाही आपण. तेही ठेवले. ख्रिश्चन लोकांकडूनही किती घेतले ! तेही जशाच्या तसे ठेवले आपण. ख्रिश्चनांची जी द्वैत फिलॉसॉफी म्हटली जाते ती घेतली आपण. मध्यंतरी मी उटीला गेलो होतो. चौदाव्या-पंधराव्या शतकातील मध्वमुनींचे सात-आठ मठ तेथे आहेत. त्यांचे सहा शिष्य होते. त्यांचेही मठ तेथेच आहेत. मोठी सुंदर शिल्पकला आहे. त्यांनी ख्रिश्चनांपासून शिकून ते द्वैत इकडे आणले. आपल्या भक्तीसंप्रदायातदेखील मुसलमानांची देण मोठी आहे. हे सगळे घेताना मागचे टाकले नाही आपण. आज जो काही हिदू धर्म आहे त्यावर आपल्याकडचा सनातन धर्म हक्क सांगतो; पण या सनातन्यांचा हक्क किती आहे, तर तो अडगळीचाच हक्क आहे फक्त. ही आमची अडगळ तेवढी शिल्लक आहे बस्स.
नेमाडे ज्याला अडगळ म्हणत आहेत त्याला इतिहासाच्या भाषेत निरंतरता/अखंडता किंवा काँटिन्युइटीही म्हणतात. नेमाडे हे काही इतिहासलेखक नाहीत. वरील काही वाक्ये वाचल्यावर मात्र आता ते इतिहासाचार्यही झाल्यासारखे वाटले.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आमच्या मनातली विचारांची `अडगळ`
खूपच उशिरा वाचली आम्ही ही चर्चा. म्हणजे उदाहरणार्थ काल वगैरे !
भालचंद्र नेमाडे यांची `हिंदू` येत आहे, हे खूपच चांगले आहे वगैरे...अनेकांप्रमाणे आम्हीही तिची उदाहरणार्थ आतूरतेने वगैरे वाट पाहत होतो, अनेक वर्षांपासून. आपले नवे काही प्रस्थापित करायचे असेल तर `प्रस्थापित प्रस्थापितां`ना जोरदार दणके द्यायचे, ही रीतच असते. नेमाडे यांना या रीतीचे जनक म्हणता येईल. पण हेच `जनकराव` जेव्हा `प्रस्थापित` झाले, तेव्हा त्यांनीही `प्रस्थापित प्रस्थापितां`सारखाच मार्ग अवलंबावा, उदाहरणार्थ वाहिन्यांवरून, वृत्तपत्रांमधून झळकणे वगैरे, हे काही आम्हाला रुचलेले नाही. त्यांच्या इतरही अनेक चाहत्यांची आमच्यासारखीच भावना असणार, अशी आम्हाला खात्री आहे.
इथे एक शक्यता अशीही मांडली जाईल कुणाकडून की, एवढी बहुप्रतीक्षित कादंबरी येत असताना तिची दखल वाहिन्या आणि वृत्तपत्रे स्वतःहून घेणारच ! कारण त्यांचे ते कामच आहे...होय. अगदी बरोबर. त्यांचे ते कामच आहे. आम्ही प्रसारमाध्यमांना इथे अजिबातच दोष देणार नाही. त्यांच्यामुळेच तर आम्हाला कळले ना की, येत आहे, येत आहे...आली. `हिंदू` आली !
वृत्तपत्रे आणि वाहिन्याच स्वतःहून त्यांच्याकडे गेल्या तर मग त्याला काय करणार बिचारे `कोसला`कार, असाही प्रश्न कुणी विचारील; पण हा प्रश्न आमच्या दृष्टीने तरी भाबडा आहे.
मी वृत्तपत्रे वाचतच नाही, असे एकेकाळी मोठ्या अभिमानाने सांगणारे नेमाडे यांना वृत्तपत्रांशी, प्रसारमाध्यमांशी फटकून राहण्याचे व्रत पूर्वीप्रमाणेच आत्ताही पाळता आले असते, असे आपले आम्हाला वाटते...(मग आमचीही ही भावना किती का भाबडी असेना !!!)
`शंभरातल्या नव्व्याण्णवां`साठी लढणाऱयाने असे `शंभरातीलच एक` झालेले पाहताना आमच्या मनाला उदाहरणार्थ किती यातना झाल्या असतील, याची काही कुणाला कल्पना वगैरे ?
एखादी बहुप्रतीक्षित कादंबरी; आणि तीही कसलेल्या आणि `कोसले`ल्या साहित्यिकाची येणार म्हटल्यावर तिच्यावर उदाहरणार्थ आमच्यासारख्यांच्या उड्या पडणारच पडणार...मग आधीची, वेगळेपणा जपण्याची `बिकट वाट` सोडून असा `भसाभसा` प्रसिद्धीचा `धोपटमार्ग` वगैरे का बरे स्वीकारला असावा, पांडुरंग सांगवीकरच्या या `साहित्य-पित्या`ने, असा प्रश्न आम्हाला साहजिकत पडला. त्याचे उत्तर आम्हाला कदाचित मिळणार नाही...पण आमच्या मनाच्या `अडगळी`त हा प्रश्न आता असाच कायमचा पडून राहणार, असे दिसते.
ठीक आहे...आमचे मन तरी त्यामुळे काही अंशी उदाहरणार्थ `समृद्ध` वगैरे होईल !!
`हिंदू`च्या निमित्ताने गेले काही दिवस आमच्या मनात विचारांची ही जी `अडगळ` निर्माण झाली होती, ती आम्ही यानिमित्ताने `उपक्रमा`च्या गॅलरीत आणून ठेविली आहे. आता या `अडगळी`चे काय करायचे ते `उपक्रम`कार जाणोत, आजानुकर्ण जाणोत की आणखी कोणी जाणोत...!
तूर्तास आम्ही उद्याची (पक्षी : १५ जुलै) वाट पाहत आहोत...
उद्या आम्हाला नवीकोरी, करकरीत `जगण्याची समृद्ध अडगळ` घरी आणायची आहे...!
नेमाडे कसेही वागोत... प्रसिद्धिमाध्यमांशी फटकून वागण्याचे आपले व्रत मोडोत की वसा सोडोत...त्यांचे त्यांच्यापाशी !
...आणि आमचेही आमच्यापाशीच ! त्यानुसार त्यांच्या कादंबऱया वाचण्याचे व्रत आम्ही काही मोडणार नाही की वसाही सोडणार नाही... आधीच्या त्यांच्या इतर सर्व कादंबऱयांप्रमाणेच `हिंदू`चाही फडशा आम्ही पाडणारच !
उत्तम प्रतिसाद
सहमत आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मुलाखतीचा दुसरा भाग
रा. नेमाडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग येथे वाचता येईल.
तंबी दुराई यांनी लोकरंगमध्ये नेमाड्यांना मस्त 'घेतले' आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
हॅहॅहॅ
लोकरंग मस्त आहे. :)
--
सहमत
श्रीकांत बोजेवार रॉक्स.
जेम्स लेन बाबत नेमाडे यांचे मत ;)
मूळ दुवा येथे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
और ये लगा सिक्सर!
शिवाजी राजांनी औरंगजेबासहीत अनेकांच्या कारकिर्दी संपवल्या आहेत. त्यात जेम्स लेनची संपली तर आश्चर्य वाटू नये.
नेमाडेंचे फुटवर्क मस्त आहे. :)
शंका
याचा अर्थ काय असावा बरे?
कंटेक्स्ट
बहुदा तो एक हलकाफुलका विनोद असावा असे इथे वाचल्यावर कळले.
शिवाजीच्या कारकीर्दीत मुघल कंपनीचा सीईओ म्हणून औरंगजेबाला दक्षिणेत फारसे मर्जर अँड ऍक्विझिशन्स करता आले नसावेत.. असा अर्थ असावा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
कोणाला मिळाली का?
आज १९ जुलै २०१०.
कादंबरी प्रसिद्ध होऊन ४ दिवस झाले.
आगाऊ नोंदणी करणार्यात मीही आहे.
मला तरी अजून मिळाली नाही.
येथील कोणाला 'हिंदू' कादंबरी मिळाली काय?
हॅहॅहॅ
बेस्टसेलर पुस्तकांच्या परदेशातील कथा (दुकानाबाहेर रात्रीपासून झोपणारे पालक, इ.) वाचून मी हॅरी पॉटरच्या पाचव्या पुस्तकासाठी आगाऊ पैसे भरले. पहिल्या दिवशी मित्रासोबत फोर्टला स्ट्रँड मध्ये गेलो तर तेथे चार-पाचच ग्राहक होते. शिवाय त्याचा टपालखर्चही वाचला. मी भिका मागत, वर्ग चालू असताना, पुस्तक वाचले. अर्धे वाचून झाले आणि मित्र पुस्तक घेऊन गेला. मग दुसर्या मित्राचे पुस्तक घेऊन वाचले. माझी प्रत दहा दिवसांनी मिळाली.