हिंदू कादंबरीः आनंदाची बातमी

नेमाड्यांच्या चाहत्यांचे इतकी वर्षे वक्री असलेले ग्रह अखेरीस मार्गी लागलेले दिसतात. बरीच वर्षे ज्याची वाट पाहत आहोत ती हिंदू ही कादंबरी अखेर यंदा प्रकाशित होणार असे दिसत आहे.

प्रकाशनपूर्व सवलतीची नोंदणी पॉप्युलर प्रकाशनाच्या मुंबई, पुणे, नागपूर येथील कार्यालयांत किंवा प्रकाशकांनी नेमलेल्या अधिकृत पुस्तकविक्रेत्यांकडे करता येईल. प्रकाशनपूर्व सवलतीत नोंदणी केलेल्या ग्राहकांना 'हिंदू' ची भालचंद्र नेमाडे यांची स्वाक्षरी असलेली खास प्रत मिळेल. आवडत्या लेखकाच्या पुस्तकाची ऑटोग्राफड प्रत मिळवण्याची संधी अनेक वर्षानंतर वाचकांकडे चालून आली आहे.

ब्रूटस यू टू?

Comments

काय हे!

मी भिका मागत, वर्ग चालू असताना, पुस्तक वाचले.

ज्ञानमंदिरात पटापट ज्ञानकण वेचायचे सोडून क्रुशिओ आणि एक्सपेक्टो पेट्रोनम! :प्

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

मिळाली बरं का!

Hindu

मिळाली...

स्पॉईलर

वाचून झाली की कृपया स्पॉईलर सांगा या धाग्यात.

मलाही मिळाली

मलाही मिळाली. सुबक व देखणी प्रत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

देखणी आवृत्ती

बाहेर धो-धो पाऊस पडत असतानादेखील 'ट्रॅकऑन कुरिअर"च्या सेवकांने आज दुपारी "हिंदू" चे पाकिट अतिशय चांगल्या अवस्थेत आणून दिले. खूपच चांगल्या प्रतीचे पॅकिंग आहे. उत्सुकतेने, लगबगीने पाकिट फोडले आणि "हिंदू" ची देखणी आवृत्ती हाताळली. आज रात्री वाचन सुरू करणार.

 
^ वर