सागरी तेलविहीर दुर्घटना - १

२० एप्रिल २०१० - अमेरिकेतील लुईजियाना प्रांताच्या किनार्‍यावरून ५० मैल् दूर असलेली "गल्फ ऑफ मेक्सिको" मधे ब्रिटीश पेट्रोलीयम (बिपी) ची असलेली तेलविहीर "डिपवॉटर होरायझॉन" मधे अचानक स्फोट झाला. त्या मध्ये ११ कर्मचार्‍यांचे प्राण गेलेच पण आज म्हणजे ३ जून २०१० पर्यंत आणि अजूनही काही दिवस यातून गळणारे खनीज तेल आणि त्याचे परीणाम त्या प्रदेशालाच नव्हे तर अमेरिकेस आणि काही अंशी उर्वरीत जगाला भोगावे लागणार आहेत. असे नक्की काय झाले आहे? : ह्यात बरेच काही लिहीण्यासारखे आहे. या निमित्ताने तेलाची थॉडक्यात माहीती पण करून घेऊया आणि पुढे जाऊया...

खनीज तेल

Ref: Source: U.S. Energy Information Administration (Public Domain)

कोट्यावधी वर्षांपुर्वी मृत्यूपावलेले सागरी सृष्टी ही मधल्या काळात पाणि आणि जमिनीच्या खाली खोलवर जात राहीली. त्यात तपमान, दबाव वगैरेचा परीणाम घडत हळूहळू त्या अवशेषांचे द्रविकरण झाले ज्याला आज आपण खनीज तेल / क्रूड ऑईल असे म्हणतो.

Ref: http://www.eia.doe.gov

मुलांसाठी आणि मोठ्यांसाथी देखील असेलेल्या युएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या संकेतस्थळावर एका तेलाच्या बॅरल मधून (साधारण ४२ युएस गॅलन्स) काय पदार्थ निघतात हे सांगणारे बाजूचे चित्र बोलके आहे. थोडक्यात बोलायचे तर त्या ४२ गॅलन्स मधून १९ गॅलन्स हे गाड्यांना लागणारे गॅसोलीन/पेट्रोल निघते तर १० गॅलन्स डिझेल, त्या शिवाय प्रोपेन गॅस निघतो. शाई, क्रेयॉन्स, डिशवॉशर फ्लुईड, सीडीज् , डीव्हीडीज्, डिओडरंट, टायर्स पासून ते अगदी हृदयासाठी लागणारे कृत्रिम हार्टव्हाल्व्ज मधे पण उरलेल्यापैकी काही तरी पेट्रॉलियम पदार्थ (प्रॉडक्ट) असतो.

या आलेखातून, २००७ साली, अमेरिकेत उत्पादन केलेल्या ६.५७ बिलियन्स बॅरल्स मधून काय मिळवले याची अधिक माहीती मिळते.

या तेलाचे सागरी उत्खनन साधारण १९व्या शतकाच्या सुरवातीस चालू झाले. रशिया, सौदी अरेबिया, अमेरिका, इराण आणि चीन हे पाच प्रमुख उत्पादक देश आहेत. अमेरिकेसंदर्भात एकूण तेल

Source: Energy Information Adminstration, Petroleum Supply Annual 2007

उत्पादनाच्या एक चतुर्थांश तेल हे गल्फ ऑफ मेक्सिकोमधील सागरी तेलविहीरीतून तयार होते.

अमेरिकेच्या तेल उत्पादनाचा आणि आयातीचा अंदाज घेयचा असेल तर एनर्जी ऍडमिनिस्ट्रेशनच्या या आकडेवारीतून समजेलः एप्रिल-मे २०१० चे दर दिवसाला साधारण सरासरी खनीज तेल उत्पन्न हे ५,५००,००० बॅरल्स (*४२ गॅलन्स) आहे तर त्याच काळात अमेरिकेच्या तेलाच्या भुकेने असलेली आयात ही दर दिवसालासाधारण सरासरी १२,०००,००० बॅरल्स (*४२ गॅलन्स) इतकी आहे.

अमेरिकेतील तसेच एकंदरीतच तेलविहीरी

Source: National Energy Education Development Project (Public Domain)

अमेरिकेसंदर्भात सागरी किनार्‍यापासून ते २०० मैल समुद्राच्या आतील परीसर हा रेगन सरकारने Exclusive Economic Zone (EEZ), म्हणून जाहीर केला होता. त्या अखत्यारीत उपलब्ध असलेली जमिन/पाणी हे अमेरिकन सरकारी मालकीचे आहे. मिनरल्स डीपार्टमेंट त्याचे व्यवस्थापन करते. या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून ते खाजगी कंपन्यांना हा भाग भाडेतत्वावर देते. त्यातून खनीजे आणि खनीज तेलांचे उत्पादन होते. इतरत्र त्या त्या राष्ट्रांच्या धोरणांप्रमाणे या गोष्टी चालत असतात. भारतात इंडीयन ऑईल/ भारत पेट्रोलीयम या सरकारी खात्यांचे अशा प्रकल्पांमधे वर्चस्व असले तरी आता रिलायन्स पण कृष्णा खोर्‍यातील नैसर्गिक वायू प्रकल्पामुळे येऊ लागला आहे. तसेच, त्याच्या बर्‍याच आधीचा बाँबेहाय चा सरकारी प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. असो.

"डिपवॉटर होरायझॉन"

Reference: http://www.deepwater.com

२००१ साली साउथ कोरीयातील तंत्रज्ञांनी बांधलेला हा $३५०,०००,००० किंमतीला बांधलेला तेलविहीर / तरंगता फलाट प्रकल्प लुइझियाना प्रांताच्या सागरी किनार्‍यापासून ४२ मैल दूर होता. बोलींग तसेच चित्रपटगृह असलेला हा प्रकल्प ८००० फूट खोल पाण्यात असून मध्यंतरीच्या काळात त्याने ३२००० फूट पृथ्वीच्या गर्भात भोक पाडून (ड्रिल करून) एक जागतिक विक्रम केला. बिपी या प्रकल्पाच्या वापरासाठी दर दिवशी साधारण $५००,००० देत होते.

२० एप्रिल २०१०, स्थानिक वेळेप्रमाणे (सेंट्रल डे टाईम) रात्रीचा १० चा सुमार: तेल, वायू, बाहेरील तापमान, लाटांचा वेग, वगैरे वगैरे यांचे घातक मिश्रण तयार होत होत, या वेळेस अचानक आधी पाणी उसळून वर आले आणि बघता बघता काही वेळात त्यातून चिखल, तेल, पाणी सर्वच उसळून वर आले. कामगारांनी आपत्कालीन पद्धतीचा वापर करायचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होण्याआधीच स्फोट

Source: US Coast Guard. NEW ORLEANS - Fire boat response crews battle the blazing remnants of the off shore oil rig Deepwater Horizon April 21, 2010. A Coast Guard MH-65C dolphin rescue helicopter and crew document the fire aboard the mobile offshore drilling unit Deepwater Horizon, while searching for survivors April 21, 2010. Multiple Coast Guard helicopters, planes and cutters responded to rescue the Deepwater Horizon's 126 person crew. U.S. Coast Guard photo.

झाला. ११ कामगार त्यात मृत्यूमुखी पडले (मिळाले देखील नाहीत) बाकीचे साधारण ११४ कामगार सुचैवाने वाचले. २२ एप्रिल पर्यंत हा तरंगता फलाट आगीमधे जळत होता. ११ कामगार काही मिळू शकले नाहीत. सरते शेवटी त्या दिवशी आग थांबली... पण त्याच बरोबर एकूण किंमत $ ५६० मिलियन्स असलेला हा दरोजच्या गरजांसाठी महत्वाचा असलेला पण अजस्त्र राक्षस पाण्यात कायमचा बुडला आणि सोबत ५ मैल लांब खनीज तेलाचा तवंग दिसू लागला.

Source: US Coast Guard. NEW ORLEANS Ð Debris and oil from the Deepwater Horizon drilling platform float in the Gulf of Mexico after the rig sank April 22, 2010.

अमेरिकेतील माहीत असलेल्या सर्वच पर्यावरणीय अपघातातील हा एक मोठा अपघात ठरण्याची ही नुसती सुरवात होती.

(क्रमशः)

Comments

सुंदर

वा!

भरपूर आणि चित्रांसहीत माहिती.
लेख आवडला.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

आपला
गुंडोपंत

भयावह.

भयावह. थोडक्यात चांगली माहिती दिली आहे. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धोका

लेख आवडला. या संकटामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होते आहे याचे वाईट वाटते.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

It's one of those irregular verbs, isn't it: I have an independent mind; you are an eccentric; he is round the twist. ~ Bernard, Yes, Minister

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

लेख आवडला

उत्तम चित्रांसह सोप्या भाषेत लिहिलेला लेख कळला :-) आणि आवडला.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

सचित्र, माहितीपूर्ण

या लेखमालेतून या बातमीबद्दल बारकावे आणि सारांशही कळेल.

धन्यवाद

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे तसेच प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार.

ह्या विषयावर लिहीण्याचे बरेच दिवस डोक्यात होते. त्यात काही बदल हवे असल्यास अवश्य सांगावेत ही विनंती.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

 
^ वर