ओपन ऑफिसमधील स्वयंसुधारणा

मी गेल्या वर्षी ओपन ऑफिसमधील स्वयंसुधारणा यावर एक लेख लिहिला होता.
http://mr.upakram.org/node/1887

हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.

http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi

वर दिलेल्या पत्त्यावरून acor_mr-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आणि रायटर पुन्हा चालू करा.
C:\Documents and Settings\UserName\Application Data\OpenOffice.org\3\user\autocorr
वरील फोल्डर दिसत नसेल तर टूल्स - फोल्डर ऑप्शन - व्ह्यू - हिडन फाईल्स निवडा.

रायटर चालू केल्यावर बराहाच्या मदतीने लिहायला सुरुवात करा. उदाहरण म्हणून खालील वाक्य पाहा.
चीकाटीने व कटिबध्द रीतीने काम केले तर हीची प्रगती होईल.

या वाक्यात शुद्धलेखनाच्या ४ चुका आहेत. या चारही चुका आपोआप सुधारल्या जातील. म्हणजे मी "चीकाटीने" असे लिहून स्पेस दिली की लगेच "चिकाटीने" होईल.

चिकाटीने व कटिबद्ध रितीने काम केले तर हिची प्रगती होईल.

आता आपल्याला जर खरोखरच चीकाटीने असे लिहायचे असेल व त्या शब्दापुरती स्वयंसुधारणेची सेवा नको असेल तर त्या शब्दाची सुधारणा झाल्यावर लगेच "undo" हा ऑप्शन वापरू शकता. (Ctrl + z)

आपल्या संगणकामधील रायटरमध्ये मराठी भाषा उपलब्ध आहे का? नसल्यास...
टूल्स = ऑप्शन्स = लॅंग्वेज सेटिंग = लॅंग्वेजस = एनेबल फॉर कॉम्प्लेक्स टेक्स्ट लेआऊट
तसेच डीफॉल्ट लँग्वेज फोर लेआउट मधील सीटीएल मध्ये मराठी निवडलेले असले पाहिजे.

अर्थात याबरोबरच मराठी स्पेल चेकर इन्स्टॉल केला तर उत्तमच. नव्हे तो हवाच. कारण त्यामुळे अशुद्ध शब्द लाल रंगात दिसतात.
http://extensions.services.openoffice.org/project/dict-mr

यात सुमारे २७००० शब्द असून त्याचा साठा मुक्तस्त्रोत असल्यामुळे कुणालाही पाहता येईल किंवा त्यात सुधारणाही करता येईल. यामुळे टंकलेखनाचा वेग लक्षणीयरीत्या वाढेल असे मला वाटते. आपल्यापैकी कोणी ओपन ऑफिसचा रायटर वापरत असाल तर ही एटो करेक्टची सुविधा आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल.

Comments

झकास झाले

झकास झाले.
अजून मदत लागली तर अवश्य करू.
याचे नामकरण काय केले आहे?

माझी सूचवणी -

लोकांचा लोकांसाठी - मुक्तशब्दकोश

आपला
गुंडोपंत

स्पेल चेकर

स्पेलचेकर कुठे डकवायचा? छोटी सुधारणा - UserName च्या जागी तुमचे विंडोजचे लॉगीननेम टाका. :)






मनःपूर्वक शुभेच्छा.

खरोखरच लिखाणाचा वेग वाढवणारे सॉफ्टवेअर.

हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून

हे सॉफ्टवेअर १०० टक्के पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा.

झकास..!

पुढील कामासाठी शुभेच्छा...!

अवांतर : 'चीकाटीने' हा शब्द स्पेस दिल्यानंतर बरोबर उमटला परंतु 'परिक्षा' हा शब्द 'परीक्षा' झाला नाही. :(

-दिलीप बिरुटे

नाही

C:\Documents and Settings\UserName बरोबर आहे पण पुढील फोल्डर माझ्याकडे नाही.

दिलेल्या पत्त्यानुसार माझ्या संगणकावर मी \Application Data\OpenOffice.org\3\user\autocorr
हे शोधले पण ते कुठे मिळाले नाही.

काय करू?

आपला
गुंडोपंत
क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष्क्ष्क्षक्ष्क्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष्क्षक्ष्क्षक्षक्षक्ष्क्षक्ष्क्षक्षक्षाक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्षक्ष्

फोल्डर दिसत नसेल तर

फोल्डर दिसत नसेल तर टूल्स - फोल्डर ऑप्शन - व्ह्यू - हिडन फाईल्स निवडा.
तसेच नवे ओपन ऑफिस ३.० हवे. २.० वर कदाचित चालणार नाही.
जर तो फोल्डर तरीही दिसत नसेल तर खाली दिलेल्या लोकेशनमध्ये ही फाईल सेव्ह करून पाहा.
C:\Program Files\OpenOffice.org 3\Basis\share\autocorr

नाही बॊ

तुम्ही सांगितल्या ठिकाणी सर्व सेव्ह केले आहे.
म्हणजे C:\Program Files\OpenOffice.org 3\Basis\share\autocorr येथे सेव्ह केले आहे.
त्या नंतर रायटर परत चालू केले.
ऑप्शन मध्ये जाउन सपोर्ट एनॅबल आहे असेही पाहिले.
पण तरीही माझ्या ओपन ऑफिसवर नाही बॉ जमले.
अजूनही स्पेस दिल्यावर ते चीकाटी असेच आहे.
कोणती तरी पायरी मी विसरतो आहे का?

आपला
गुंडोपंत

नवीन आवृत्ती

सुमारे ४०,००० शब्दांची स्वयंसुधारणा आता नवीन फाईल मध्ये उपलब्ध आहे. यात असलेल्या शब्दांची वर्गवारी खालील प्रमाणे आहे.

१) चुकीचा "ध्द" असलेले शब्दः
पध्दत - पद्धत

२) एकापेक्षा जास्त र्‍हस्व दीर्घ असलेले शब्द:
ऐतीहासीक - ऐतिहासिक
खूशाली - खुशाली

३) अर्धा र
वर्हाड - वऱ्हाड
खोर्यात - खोऱ्यात

४) विसर्ग
अधपतन - अधःपतन
दुख - दुःख

५) अति, अधि, प्रति यासारखे प्रत्यय लावून झालेले शब्द
अतीथी - अतिथी
अधीपती - अधिपती
प्रतीसाद - प्रतिसाद

६) शब्दांच्या शेवटी येणारे इत, इक, ईय
अवचीत - अवचित
आर्थीक - आर्थिक
परकिय - परकीय

७) क्लिष्ट शब्द
तत्व - तत्त्व
वागमय - वाङ्मय

८) दुर, निर यांनी सुरू होणारे शब्द
दूर्लभ - दुर्लभ
नीरंतर - निरंतर

यात चुकीचे शब्द असण्याची शक्यता कमी आहे, पण कोणाला एखादा शुद्ध शब्द बदलून अशुद्ध होताना दिसला तर तसा उल्लेख इथे करावा म्हणजे मला सुधारणा करता येईल. आणखी असे काही नियम वापरून एटो - करेक्ट अधिक परिणामकारक करू शकतो का?

अतिथी

अतिथीतला अति हा प्रत्यय नाही. अतिथी=अ+तिथी. कुठलीही तिथी-काळवेळ न पाहता उपटतो, तसला पाहुणा.

तिथिपर्वोत्सवाः सर्वे त्यक्ता येन महात्मना ।
सोsतिथिः सर्वभूतानां शेषानभ्यागतान्विदु: ॥

तिथी, सण, उत्सव वगैरे नसताना जो दुसर्‍याच्या घरी येतो, तो अतिथी. बाकीचे अभ्यागत.
--वाचक्‍नवी

ईत, ईक आणि इय

शब्दांच्या शेवटी हे प्रत्ययदेखील येतात. उदाहरणे :
तिर्‍हाईत, बाणाईत, सराईत, सुधारीत(क्रियापद), करीत(क्रि), भानगडीत, चकचकीत, गृहीत, विपरीत, प्रणीत, वगैरे.
गिर्‍हाईक, तर्‍हेवाईक, स(सा)माईक, खर्चीक, पडीक, जवळीक, ठरावीक, लाडीक, मोकळीक, वगैरे.
क्षत्रिय, श्रोत्रिय आणि संस्कृत-हिंदीत राष्ट्रिय(मराठी राष्ट्रीय).
इल/इन शेवटी येणारे शब्द : मलिन, पुलिन, जटिल, कुटिल, सलिल(=पाणी), तुंदिल, वगैरे.
उण शेवटी येणारे शब्द : तरुण, करुण, वरुण, अरुण, दारुण, वगैरे.
उड/ऊड : गरुड, गारुड परंतु भारू‍ ड, कोथरू ड, खत्रू ड/खतरूड. --वाचक्‍नवी.

४४,००० शब्दांची ही आवृत्ती

धन्यवाद. आता एटो-करेक्टमध्ये सुमारे ४,००० शब्दांची वाढ झाली आहे. ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये 'ठराविक' लिहिले की आपोआप 'ठरावीक' होईल. (ठराविक या चुकीच्या शब्दाला गुगलमध्ये १,२५,००० पाने तर ठरावीक या योग्य शब्दाला फक्त २४,००० पाने मिळाली!) यातील शब्दमर्यादा ६५,००० आहे. ५०,००० च्या वर शब्द गेले की संगणक हळू चालू लागतो. सुमारे ५,००० शब्दांची जागा लेखकाला स्वतःचे शब्द जमा करण्यासाठी मोकळी ठेवावी लागेल. म्हणजे आता ४४,००० शब्दांची ही आवृत्ती बहुधा शेवटचीच ठरेल.

http://code.google.com/p/openoffice-marathi-autocorrect/downloads/list

ह्या दुव्यावर दिलेली ओपन ऑफिसमधील शब्द वाचून कोणी जर हे चुकीचे व त्यासमोरील शुद्ध शब्द ठीक आहेत असा अभिप्राय दिला तर इतरांना याचा वापर करण्यास प्रवृत्त करता येईल. acor_mr-IN.dat ही फाईल कशी वापरायची याची चर्चा वर झाली आहेच.

पोपट

गुगल आय एम इ हा एक मजेदार प्रकार आहे.
यात मी एकदा टंकन करायला लागलो तर मला चक्क खाली सुचवण्या दिसू लागल्या.

मी आश्चर्य चकित झालो. मला वाटले की,
वा! गुगलनेही हन्स्पेल पॅक आणला!

पण पोपट झाला!
नंतर लक्षात आले की गुगल फक्त माझ्या स्पेलींग चे मराठीकरण करून
त्याचे जे काही शक्य त्या रचना होत असतील त्या दाखवतो आहे.

पण नंतर असेही वाटले की टंकनाचा वेग वाढण्यासाठी बरा पर्याय आहे.

आपला
गुंडोपंत

 
^ वर