ओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग २ (स्वयंसुधारणा)

मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्‍या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/project/EnglishAutocorrectList

मराठीसाठी स्वयंसुधारणा मनोगत वेबसाइटवर फार पूर्वीपासून उपलब्ध आहे. पण ती वापरण्यासाठी आधी इंटरनेट जोडणी हवी, मनोगतवर येण्याची नोंद करायला हवी आणि तरीही आपल्याला हवे ते शब्द आपोआप न सुधारणे अशा काही त्रुटी त्यात आहेत. अर्थात ऑनलाईन व ऑफलाईन यात तुलनाच होऊ शकत नाही. ऑफलाईन टंकलेखन कधीही अधिक परिणामकारक ठरते. ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये टंकलेखनाला सहाय्यभूत ठरू शकतील अशा असंख्य बाबी आहेत.
मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी चुकीचे शब्द व त्यासमोर योग्य शब्द अशी यादी मला हवी आहे. अशी यादी करायला मी सुरुवात केली आहे...

http://spreadsheets.google.com/ccc?key=rMJYRkasGPlEM3fyjA1gOxA

मनोगतावरील "हे शब्द असे लिहा (अं - अ)” या लेखात दिलेल्या शब्दांपासून सुरुवात केली आहे.

http://www.manogat.com/node/3176

कोणाला वेळ व इच्छा असेल तर यात अधिकाधिक शब्दांची भर घालावी म्हणजे हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल व आपल्याला परीपूर्ण ऑटो करेक्टची सुविधा उपलब्ध होईल.

मी सुमारे शंभर शब्द खाली दिलेल्या दुव्यावर उपलब्ध करून दिले आहेत.

http://code.google.com/p/openoffice-marathi-autocorrect/

वर दिलेल्या पत्त्यावरून acor_hi-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आता रायटर पुन्हा चालू करा.

C:\Documents and Settings\UserName\Application Data\OpenOffice.org\3\user\autocorr

वरील फोल्डर दिसत नसेल तर टूल्स – फोल्डर ऑप्शन – व्ह्यू - शो हिडन फाईल्स निवडा.

रायटर चालू केल्यावर बरहाच्या मदतीने लिहायला सुरुवात केल्यावर स्टेटस बारमध्ये हिंदी येईल. ते तसेच राहू द्या. स्वयंसुधारणा (Auto Correct) व स्मरण सुविधा (Auto Complete) या दोन्ही सुविधा वापरून टंकलेखन होऊ द्या. आता टूल्स – लेंग्वेज – फोर ओल टेक्स्ट – मराठी हा पर्याय निवडा म्हणजे डिक्शनरी वापरून शुद्धलेखनही तपासता येईल.

१) साधे साधे शब्द काहीवेळा चुकीचे लिहिले जातात. ते एटो करेक्टने सहजगत्या सुधारता येतील.
ओचित्य औचित्य
अतीक्रमण अतिक्रमण
अजीबात अजिबात
अतीरेक अतिरेक
अधपतन अधःपतन
अंतीम अंतिम
अगतीक अगतिक
अधीवेशन अधिवेशन
अनूचित अनुचित
अभीनंदन अभिनंदन
अभीनेता अभिनेता
अनूसूचीत अनुसूचित

२) बरहात जोडाक्षरे व काही विवक्षित शब्द कसे काढायचे हे माहीत नसल्यामुळे चुका होतात.
उदा. “ष्टी" अक्षर कसे काढायचे हे माहीत नसल्यामुळे काहीवेळा चुका होतात. लेखकाला ठाऊक असते की हा शब्द चुकीचा आहे पण तो शोधत बसायला त्याच्याकडे वेळ नसतो.
जसे... अंतेश्टी - अंत्येष्टी

३) बरहातील त्रुटींमुळे लिहिले गेलेले नुक्तावाले तसेच ऐ च्या ऐवजी ऎ वापरले गेलेले शब्द सुधारणे.
बरहात P+H च्या ऐवजी F की वापरून जो नुक्तावाला फ़ लिहिला जातो तो आपोआप सुधारता येईल.
उदा. फ़लक - फलक, ऎवजी - ऐवजी

४) अर्ध्या र च्या चुका
काहीवेळा युनिकोड (१.० आवृत्ती) मधील त्रुटींमुळे अशुद्ध शब्द लिहिले जातात ते सुधारणे.
उदा. होणार्या - होणार्‍या

Comments

चांगला प्रकल्प

स्वयंसुधारणा प्रकल्पात जमेल तसे शब्दांची भर घालेन.
'आ'पासूनच्या शब्दांची भर घालावी का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वयंसेवकांकडून अपेक्षा

कटिबद्ध हा शब्द "कटिबध्द" किंवा "कटीबध्द" अशा दोन प्रकारे चुकीचा लिहिला जाण्याची शक्यता आहे.
हे दोन्ही चुकीचे शब्द व त्याऐवजी अपेक्षित असलेला शुद्ध शब्द खाली दिलेल्या संचात टाकले.

block-list:block block-list:abbreviated-name="कटिबध्द" block-list:name="कटिबद्ध" /
block-list:block block-list:abbreviated-name="कटीबध्द" block-list:name="कटिबद्ध" /

त्यानंतर त्याची एक एक्स.एम.एल फाईल बनविली. त्याची झिप फाईल .dat नावाने संगणकावरील एका विवक्षित फोल्डरमध्ये सेव्ह केली. आता मी ओपन ऑफिसच्या रायटरमध्ये किंवा कैल्क मध्ये "कटीबध्द" असे टाईप केल्यानंतर आपोआप "कटिबद्ध" होत आहे. यामुळे मराठी टंकलेखनाचा वेग काही पटींनी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी मला अशुद्ध शब्द व त्यासमोर शुद्ध शब्द अशी यादी करून हवी आहे. त्याची सुरुवात वर झालीच आहे. आपले सक्रीय सहकार्य अपेक्षित आहे. हा लेख वाचणाऱ्यांपैकी १० जणांनी प्रत्येकी एक तास दिला तरी पाच हजार शब्द सहज जमा होतील. हे शब्द ऐटो-करेक्टच्या एक्स्टिंशनमध्ये उपलब्ध झाले की आपला टंकलेखनाचा एक तास नक्कीच वाचेल. आहे की नाही "फायदे का सौदा"?

 
^ वर