प्रतापगड जीर्णोद्धार कार्य


प्रतापगड जीर्णोद्धार कार्य

लिंकसाठी - प्रतापगड जीर्णोद्धार कार्य ">

महाराष्ट्र ही भूमी शिवछत्रपतींच्या अलौकिक कर्तृत्वाची. मराठमोळ्या, रांगड्या महाराष्ट्रातील सह्याद्री हा शिवकाळात मराठ्यांच्या पाठीशी असलेला जणू स्वराज्याचा कणा. सह्याद्रीतील आणि सागरातील किल्ले हे मराठंयाच्या पराक्रमाचे साक्षीदार. प्रतापगड हा ह्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला. ह्या शिवप्रतापदुर्गाचे पुनर्बांधणीचे प्रचंड महत्वाचे कार्य चालू झाले आहे. ह्या कार्याची सर्वांगीण माहिती ह्या संकेत स्थळामार्फ़त आपल्यापर्यंत पोहोचत आहे.

इंदिरा पुरस्कार विजेते मा. हिराभाई बुटाला खेड रत्नागिरी यांचे सुपुत्र व रेव्हमॅक्स या कंपनीचे प्रवर्तक-मालक श्री. कौस्तुभ बुटाला यांच्या पुढाकाराने व सांगलीचे दुर्गतज्ञ श्री. प्रवीण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगडाच्या जीर्णोद्धाराचा पहिला मेळावा ९ मे २०१०ला गडावरील भवानी मातेच्या मंदिर परिसरात संपन्न झाला.
त्यावेळी मा. कामगार मंत्री श्री. हसन मुश्रीफ, राजमाता कल्पनाराजे भोसले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वास्तूचे ऐतिहासिक व पर्यटनाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाची बघ्याची भूमिका न राहता भरीव कार्य व आर्थिक मदत मिळेल असे आश्वासन त्यावेळी मिळाले.
कोल्हापुरातील मराठेशाहीचे इतिहासतज्ञ श्री.इंद्रजित पवार, श्री. भगवान चिले यांचा भाषणे व नंतर श्री. प्रवीण भोसले याच्या मार्गदर्शनाखाली गडावरील जसेच्या तसे बांधकाम करायच्या प्रकल्पाची पहाणी व कार्याची माहिती दिली गेली.
श्री. कौस्तुभ बुटाला यांनी आपल्या भाषणात या कार्याची प्रेरणा संहितामहर्षीं भृगुंच्या विविध आदेशातून मिळत गेली असे अभिमानाने सांगितले.
उपक्रम वरील इतिहास व गडप्रेमी याची दखल घेऊन या कार्यात सहभागी होतील असा विश्वास वाटतो.
संपर्क
मायभवानी सामाजिक संस्था, प्रतापगड.
ता. महाबळेश्वर, जि. सातारा
नोंदणी क्रमांक - महा/९०८०/सातारा
श्री. संतोष जाधव
अध्यक्ष, मायभवानी सामाजिक संस्था, प्रतापगड.
मोबाईल ९९२३११७५१७

नेहरु युवा मंडळ, प्रतापगड.
ता. महाबळेश्वर, जि. सातारा
श्री. विलास मोरे
अध्यक्ष, नेहरु युवा मंडळ, प्रतापगड.
मोबाईल ९८६९८५८९१६

ग्रामस्थ मंडळी, प्रतापगड.
ता. महाबळेश्वर, जि. सातारा
श्री. आप्पा उतेकर
हस्तकला केंद्र, प्रतापगड.
फोन (०२१६८) २४९३१६
मोबाईल ९८२२५३०८८२

ई-मेल : contact@pratapgad.in, mybhavani@gmail.com

 
^ वर