अनैतिक

आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वी लग्न म्हणजे शरीरसंबंध हे स्पष्ट समीकरण होते....मी तर असेही वाचलेले आहे कि ब्राह्मणेतर मुली बऱ्याचदा मांडीवर बाळ घेऊन डोरलं बांधून घेत असत..."आता कोणाचा किडूक मिडूक गेलं मला काय ठाव?" हा स्वच्छ प्रश्न विचारात.... sex हि एक नैसर्गिक गरज आहे...पशु असो व मनुष्य...आता मनुष्यप्राण्याचा mating season नसतो हा भाग वेगळा. पशूंनी अनैतिक वर्तन केल्याचे कधीही ऐकिवात नाही मग आपणच का शारीरिक संबंधाना इतके महत्व देतो ? आणि ते सुद्धा स्त्रीच्या वागण्यावर अवलंबून असते...पुरुषापेक्षा स्त्रीची "नैतिकता"- शारीरिक भूक भागविण्याची वृत्ती हि जास्त महत्वाची....कारण एकदा का हे स्त्रीसाठी निषिद्ध असे ठरवले कि ती मुठीत ठेवायला पुरुषांना वेळ लागत नाही...

पुरुष वयाची साधारण २५ वर्षे पूर्ण झाल्यावरच लग्न करायचा विचार करतो...मी इथे विचार म्हंटले आहे....प्रत्यक्ष लग्नाला अजून ४-५ वर्षे तरी जातात...तोपर्यंत काय हे हातावर हात ठेवून बसतात काय? पण मग स्त्री जर असे वागली तर मात्र लगेच तिची बेअब्रू करायला तयार....अगदी थोडेसे modern वागणाऱ्या स्त्रीलासुद्धा लगेच "चालू" ठरवून मोकळे...साऱ्या समाज्याच्या नैतिकतेची जबाबदारी स्त्रीचीच...आणि पुरुष जेंव्हा अनैतिक अथवा लग्नाआधी शरीर संबंध ठेवतात ते काय बाहुलीशी? लग्न झालेले पतीदेवसुद्धा बाहेर शेण खातातच ना? नजरेने व शरीराने स्त्रीचा उपभोग घेण्याचा प्रयत्न असतोच ना ? गर्दीच्या ठिकाणी लहान मुलगी, तरुण स्त्री अथवा गळ्यात मंगळसूत्र बांधलेली बाई यांना सारख्याच वखवखीला सामोरे जावे लागते...गर्दीच्या ठिकाणी लहान मुलगी, तरुण स्त्री अथवा गळ्यात मंगळसूत्र बांधलेली बाई यांना सारख्याच वखवखीला सामोरे जावे लागते....या ठिकाणी पुरुष हा फक्त पुरुष असतो...एक वखवखले शरीर जे इतर असहाय्य - केवळ लोकात "बेअब्रू" होऊ हाये म्हणून शांत बसणाऱ्या स्त्रिया - यांची एक human meat म्हणूनच ओळख दाखवतो...
एकदा आई झाल्यावर आपल्या लेकाला स्त्री पुरुष समानता शिकवायला काय हरकत आहे ? शिवाजी कायम शेजारच्याच घरात पाहिजे...आणि समजा कधी एखादीला नाही आवेग आवरता आला तर तिच्या मागे उभे राहण्यापेक्ष्या तिला समाजात अप्मानितच कसे करता येईल यात बायकाच जास्त interest घेतात...हे खरं कि नाही ? परदेशातून आलेल्या गोऱ्या बायकांवर होणारे अत्याचार काय दाखवतात....परदेशी स्त्री म्हणजे केवळ sex oriented mentality ची असते हा समज आहे जो खरं नाही...इथे लोक sex एक गरज म्हणून बघतात...extra-marital affairs सगळीच कडे आहे....पण हे विसरता कामा नये कि यात स्त्री आणि पुरुष दोघांचाही सहभाग असतो...आणि जर चूक असेल तर शिक्षा दोघानाही व्हायला हवी नाही का ? पण असे होत नाही... पुरुष मोकळा सुटतो आणि स्त्री मात्र " बाजारू" म्हणून कलंक लागतो...

नुसतीच बेगडी स्त्री पुरुष समानता काय कामाची? आपल्याला समान वागणूक दिली पाहिजे ह्या मताच्या किती स्त्रिया त्यांच्या लेकांना स्त्रीचा आदर करायला शिकवतात? boys will be boys म्हणून सोडून देतात याला काय म्हणावे...यातूनच मग so called अनैतिकता वाढीला नाही का लागत? कदाचित हा लेख पूर्णपणे अनैतिक या विषयाला न्याय देणारा नसेल तेंव्हा आपले मत कळवा आणि माझेही प्रबोधन करा हि एक विनंती... अजूनही या विषयावर नंतर लिहिण्याचा विचार आहे...तूर्तास इतकेच.

- गोंधळलेली शिल्पा

लेखनविषय: दुवे:

Comments

पुर्वसंदर्भ

उपक्रमावरील या अगोदरचे काही स्त्री पुरुष विषयावरील लेख वाचावेत.
स्त्रियांची शा(उ)लिनता
''मराठी साहित्यातील स्त्रीवाद ''
"संस्कृतीची जपणूक"
प्रकाश घाटपांडे

आणखी काही चर्चा

हल्लीच रंगलेल्या काही चर्चा. :-) एंजॉय!!

मुलींच्या अपेक्षा
सदैव स्त्रियाच टिकेचे लक्ष्य का ???

फक्त विवाहपूर्व संबंधांपूरते

स्रीपूरष समानतेचा विषय व्यापक आहे. त्याला पूर्वपरंपरेची सुद्धा बाजू आहे. सध्या मात्र विवाहपूर्व शारीरिक संबंधांबद्दल विषय आहे. यासंबंधी स्रियांना पूर्णतः स्वातंत्र्य असावे असे माझे मत आहे. स्वातंत्र्य म्हणजे सर्व स्रियांनी असे वागायला हवे असे नाही. पण निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार स्रियांना असावा. पूरेसे निकोप लैंगिक शिक्षण आणि जागरुकता असली तर न्यूनगंड, भीती, घृणा या भावनांचा याबाबतीत स्रियांच्या मनाचा होणारा कोंडमारा थांबेल. अर्थात ज्यांच्या मनाचा कोंडमारा होतो त्यांच्यासाठीच. बाकी लग्नाआधी प्रत्येक पुरूष शेण खातो हे मात्र शंभर टक्के खऱे नाही आणि त्याचप्रमाणे फक्त पुरूषांच्याच सगळ्या तरुण स्रियांवर तसल्या नजरा असतात हे ही अर्धसत्यच. शंभर टक्के वर्जिन मुलीशी लग्न करायला मिळेल ही अपेक्षा ठेवणे हे शहाणपणाचे नाही असे खुशबू म्हणाली होती. शंभर टक्के वर्जिन मुलाशी लग्न करायला मिळणे शक्य नाही हे सत्य मुलींनी गेल्या कित्येक वर्षांपासून समंजसतेने पचवले आहे. मग आता पुरूषांनीही मनाचा मोठेपणा दाखवायला हवा. अर्थात लौकीकअर्थाने बाहेर जरी शेण खाणारे (की पक्वान्ने) खलपात्र असले तरी त्याची निष्ठा घरच्या जेवणावरून ढळणार नाही याची काळजी मात्र संसाराच्या दोन्ही शिलेदारांनी घ्यायलाच हवी.

घरी दाल बाहेर् मुर्गी

अर्थात लौकीकअर्थाने बाहेर जरी शेण खाणारे (की पक्वान्ने) खलपात्र असले तरी त्याची निष्ठा घरच्या जेवणावरून ढळणार नाही याची काळजी मात्र संसाराच्या दोन्ही शिलेदारांनी घ्यायलाच हवी.

हेच जर एखादी स्त्री म्हणाली तर? असा वागली तर ? असा वागावे हे माझं म्हणणं नाही...किंबहुना असे होऊच नये ...आपापल्या जोडीदाराशी लग्नाच्या अथवा live in relationship वाल्या एकनिष्ठ राहणे अवघड नाही....बाहेर खायला मिळते म्हणून खावे असे नाही...सगळेच असे वागतात असे नाही पण मी स्वतः बघितलेले आहे कि घरी लग्नाची बायको आणि बाहेर मैत्रीण अथवा sex पार्टनर, बर्याचदा हि व्यक्ती अविवाहित असते..
...आणि स्त्रिया हा पर्याय निवडतात जेंव्हा नवरा कायम कामानिमित्त घराबाहेरच असतो (त्यानाही गरजा असतातच)...पुरुषांचे असे नाही...

प्रेम करणे अनैतिक नाहीच"लव इज मॉरल ईवन विदाउट लीगल मॅरिज, बट मॅरिज इज इम्मॉरल विदाउट लव" हे कोटेशन मला पटते. लग्न करा किंवा करू नका, काय फरक पडतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

१. मी केलेले स्वैर भाषांतर:
"प्रेम हे विवाहाशिवायही नैतिक आहे, पण प्रेमाशिवायचा विवाह अनैतिकच."

इथे स्वैर हा शब्द वापरताना मजा आली. 

चर्चा वाचतोय...!

सामाज जीवनातील स्त्रीयांच्या दु:खाच्या अनेक छटा अनेकदा वाचायला मिळतात.
बाकी, वखवखलेल्या नजरा, शारीरिक संबंध, स्त्री- पुरुषांच्या लैंगिक भावना, आणि वगैरे यावर जरुर चर्चा व्हावी. त्याचबरोबर फक्त पुरुषच असे असतात का ? स्त्रिया जो चोरटा कटाक्ष टाकतात त्यामागील कोणती भावना असते, वगैरेही वाचण्यास उत्सूक ! :)

वखवखलेल्या नजरांवरुन आठवण झाली. 'रामायण महाभारतातील धागेदोरे' नावाचे एक पुस्तक चाळत होतो. त्यात महाभारतातील 'स्त्रीशाप' नावाचे प्रकरण होते. त्यात प्रियाराधनेत योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने दुखावलेल्या, अपमानित झालेल्या काही स्त्रीयांचे शाप होते त्याची आठवण झाली. अर्जूनाने उर्वशीकडे टक लावून पाहिले आणि तिने भलताच अर्थ घेतला. अर्जूनाच्या मनात तसे काही नव्हते. पुढे तिने त्याला शाप दिला. देवयानी ही गुरुकन्या तिने कचाकडे प्रणय भावनेने पाहिले पण कचाच्या मनात तसा काही विचार नव्हता. असो, सारांश सांगायचे असे की, पुरुषांमध्ये असे अपवाद असतात असा विचार डोकावला. :)

-दिलीप बिरुटे
[बीझी ]

स्त्रियांची शालिनता हा नैतिकतेचा मानदंड

तुमचा मुद्दा पटला. धर्म, रूढी, यांमध्ये स्त्रियांची शुचिता हेच पावित्र्याचं, उच्च नैतिकतेचं प्रमाण मानलेलं आहे. प्राचीन समाजात स्त्रियांना अधिकार नाही, पुरुष सर्व संपत्तीचे मालक, असं असताना स्त्रियांकडे 'आपल्या' वंशाचे दिवे काढण्याचं यंत्र म्हणून पाहिलं गेलं. त्यातून या अतिरेकी व्यवस्था निर्माण झाल्या असाव्या असं वाटतं.

आज ती परिस्थिती नाही, पण अजून पीळ गेलेला नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अनैतीक संबंध स्त्रीने केल्यास गुन्हा नाही

भारतीय कायद्याप्रमाणे अनैतीक संबंध स्त्रीने केल्यास गुन्हा नाही. पण पूरुषानीं केल्यास हा गुन्हा आहे.

कोणत्या

कोणत्या भारतीय कायद्यानुसार हो?

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अनैतीक संबंध स्त्रीने केल्यास गुन्हा नाही

भारतीय दंड संविधान ( कलम ४९७ )

 
^ वर