एक शिक्षका- अ‍ॅन सिलीव्हन

हेलन केलर हे जगाला परिचित असलेलं व्यक्तिमत्त्व. ती एक गोड मुलगी होती जीला लहान वयातच आपल्या मुलभुत दोन इंद्रियांना गमवावं लागलं; डोळे, कान अणि पर्यायाने ती मुकि बनली. पण तरीही ती एक लेखिका,एक अभिनेत्रि अणि एक समाज कार्यकर्ती म्हणून गाजली. वयाच्या पाचव्या वर्षी अ‍ॅन सिलीव्हनने तिच्या आयुष्यात एक शिक्षक म्हणून प्रवेश केला, आणि त्यानंतर तिने आपलं आयुष्य हेलनसाठी समर्पित केलं. "आंधळि" या अनुवदित पुस्तकात शांता शेळके यांनी हेलन केलर आणि अ‍ॅन या दोघींची जिद्द, चिकाटी यांचं सुरेख वर्णन केलं आहे. हेलन आपल्य अन्धत्वामुळे,चिडखोर आणि हट्टी मुलगी बनलि होती. परन्तु, अ‍ॅन सिलीव्हनने तिच्यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणले.तिने हेलनला शिक्षण द्यायला सुरुवात केल्यानन्तर तिच्या समोर कितीतरि प्रश्न असतील. हेलनला द्रुष्टी नव्हती,ती बहिरि आणि मुकिहि होती? मग तिला या जगाचि ओळख कशी करुन द्यायचि? अ‍ॅनने तिला स्पर्शाने नव्या जगात पाऊल टाकण्यास मदत केली. बोटांच्या लिपिच्या सहयाने तिला निरनिराळ्या गोष्टि वाचून दाखवल्या..तिच्याबरोबर सतत राहणं, तिला अनेक ठिकाणि प्रवासाला नेणं, तिच्या प्रश्नांना उत्तरे देणं..या सगळ्याला अ‍ॅन कधिच थकली नाहि. प्रवासाला गेल्यानंतरसुद्धा, अ‍ॅन हेलनला बाहेरच्या वातावरणाचे हुबेहुब वर्णन करुन सांगत असे. ऋतु, चंद्र,चांदणे,रंग, यांना तर ना स्पर्श ना गंध ! परन्तु, अ‍ॅन हेलनला आपल्या वर्णनातुन सतत सांगत असे.
अ‍ॅनला स्वत:ला निट दिसत नव्हते. तिला एक विशिष्ट प्रकारचा चष्मा लावावा लागे. हे अन्धत्व तिला लहानपणी गरिबी आणि कुपोषणामुळे आले होते. तरिदेखिल ति हेलनसाठी अविरत कष्ट घेत होती. तिला आजुबाजूच्या घटनांचा परिचय करुन देत होती.तिच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करत होती. तिच्यामध्ये उत्तम संस्कारचं बिज रोवत होती. अ‍ॅन हेलनसाठि केवळ एक शिक्षक नव्हती, ती हेलनची बहिण, मैत्रिण, अधार सर्व काहि होती.
ज्यावेळि हेलनने आपले आत्मचरित्र प्रकशित केले त्यवेळि अमेरिकेतिल एका प्रसिद्ध लेखकने हेलनला पत्रात म्हट्ले," तु आणि तुझ्या बाई,दोघीजणी केवळ अद्भुत आहात. हेलनसारख्या मुलीसोबत राहणे म्हणजे स्वतःच्या इच्छा,व्यक्तिमत्त्व,आवडीनिवडी पार पुसुन टाकण्यासारखेच होते..हेलनसाठी समर्पित केलेल्या आयुष्याखातर अ‍ॅन आपले वैवाहिक सुखदेखिल नकारयला तयार होती. जिवनाचे सगळे क्षण तिने हेलनला दिले. तेहि स्वखुशीने, स्वमर्जीने!!

sullivan-with-an-8-year-old-keller
anne-sullivan
anne_sullivan_seated_with_helen_keller

Comments

ब्रेकथ्रू

उत्तम परिचय. वरील चित्रे दिल्याबद्दल धन्यवाद. ऍनने घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगेच आहेत.

हेलनला पाणी हा शब्द कसा कळला त्याची गोष्ट पुढीलप्रमाणे सांगितली जाते.

ऍनने सुरुवातीला हेलनच्या हातावर शब्दांची स्पेलिंग लिहिणे सुरु केले. महिनाभर तिने हा प्रयोग केला पण फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर एकदा ऍनने पाण्याच्या पंपातून पाणी काढताना हेलनचा हात त्या पाण्यात धरून त्यावर तिने W-A-T-E-R असे लिहिले आणि पाणी म्हणजे W-A-T-E-R हा साक्षात्कार हेलनला झाला.

यू. एस. कॅपिटल बिल्डींगमध्ये या घटनेची साक्ष देणारा हेलनचा पुतळा हल्लीच रोवला गेला आहे. त्याचा फोटो खाली दिला आहे.

आभारः http://www.cec.sped.org

असेच म्हणतो....

या उत्तम परिचयाबद्दल आभार. चित्रेही त्या काळात घेऊन जाणारी आहेत.

धन्यवाद.

==================

सुरेख लेख

या पद्धतीचे लेख आणखी यावयास पाहिजेत.
शरद

छान लेख

वा वा! फारच छान लेख.. अजून असे लेख येऊ देत..
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

पॉली थॉमसन

पॉली थॉमसन हि हेलनची दुसरी मदतनीस होती. अ‍ॅनच्या म्रुत्युनंतर तिची जबाबदारी पॉलीने आनंदाने घेतली.
हिरोशीमा आणि नगासाकिच्या बॉम्बस्फोटानंतर त्या दोघी त्या स्थळांना भेट देण्यासाठी ,नागरीकांना उत्तेजन देण्यासाठि गेल्या होत्या.

helen and polly

सहमत

आहे. उत्कृष्ट लेख. आणखी येऊ द्या.

---
"भाई बनना है तेरेको?" -- भिकू म्हात्रे

 
^ वर