स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ...........

स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ............
प्रतिक्रिया
मुलगा कधी आईचा तिरस्कार करतो का? हुसेन हेही लक्षात ठेव कलावंताच्या स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे नग्न चित्र काढून त्याचे प्रदर्शन करत मोठेपणा मिरवत नाही. तू चूक नव्हता ९०% लोक तुझ्या बाजूने आहेत तर चोरा सारखा पळून का गेला. या देशत अनेक प्रमाणिक common man वर खोटे खटले न्यायालयात चालू आहेत ते कांही तुझ्या सारखे देश सोडून पळून जात नाही. भारतात उशिरा का होएना न्याय मिळतो. धर्मनिराक्षेपता याचा तुम्ही लोकांनी चूक अर्थ लावला व धार्मिक दहशदवाद नंगानाच माजविला म्हणून पळाला
On 3/4/2010 10:39 AM thanthanpal said:
चिदंबरम: तुम्ही भारतीय नागरिकांना संरक्षण देवू शकत नाही आणि चालले हुसेन यांना न मागता संरक्षण द्यायला. हुसेन यांनी तुम्हाला अर्ज करून संरक्षण मागितले काय? मात्र्भूमीची नग्न चित्रे कडून भारत मातेचा अपमान करणारयाला, पाकची पाठराखण करणारया खान ला संरक्षण द्या असा कायदा आहे का? मनाची नाही तरी मातृभूमीची तरी लाज राखा, त्या करता गृहमंत्री हे पद आहे. पद स्वीकारताना देशाचे संरक्षण करीन हि घेतलेली शपथ तुम्ही विसरला का?आपल्या सारखे ग्रहमंत्री असताना भारताच्या सत्यानास करण्यास पाक अंतकवादी ची गरज नाही.
कथित गुन्हेगार रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया याला पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार मारले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना अटक प्रदीप शर्मा यांना अटक. वाचले का? .भागोड्या हुसेन, भारतीयान वर खोटे आरोप करून स्वताच्या कामापिसाट वर्तनाचा माज करणाऱ्या वर त्याचे समर्थन करणाऱ्या अंतकवादी कामापिडीत हुसेन चित्रकार तू मानवजातीस नव्हे तर पशु जातीस हि कलंक आहे. भारतात प्रामाणिक नागरिकास न्याय मिळतोच हिम्मत असेलतर आपल्या आईं चे (माफी मागतो) असे चित्र काढून त्याचे कतार अरबस्थान पाकीस्थान व इतर मुसलमान देशात प्रदर्शन कर. त्याचे निर्लज्ज समर्थन कर . दफन करण्यासाठी ही तुझ्या शरीराचा तुकडा ही शिल्लक राहणार नाही.

Comments

च् च् च्

* हुसेनने 'ती' चित्रे ७० च्या दशकात काढली होती. त्यावर २० वर्षे कोणतीही चर्चा / आक्षेप वगैरे आले नव्हते. १९९६ मध्ये हिंदू उन्मादाच्या कालखंडात अशी चित्रे असल्याचे प्रथम 'उघडकीस आणण्यात आले'. त्यानंतर हुसेनवर हजारो(?) खटले भरण्यात आले. इतर मार्गांनीही पर्सिक्युशन चालू झाले. त्याला कंटाळून हुसेन कतारला गेला. मग तो गेल्यावर (आपल्या दैवतांचे विकृतीकरण करणार्‍याला यशस्वीपणे पळवून लावल्यावर) आता त्यावर शेलक्या शिव्याशापांची काय गरज?

अवांतरः ती चित्रे हुसेनने काढली होती असा ऑथेंटिक दुवा जालावर सापडला नाही.

असो. हा धागा (त्यातल्या भाषावैशिष्ट्यांसह) उपक्रमाऐवजी दुसर्‍या संकेतस्थळांवर जास्त शोभून दिसतो असे वाटते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

उपक्रमावर चांगली संधी मिळाली आहे

असो. हा धागा (त्यातल्या भाषावैशिष्ट्यांसह) उपक्रमाऐवजी दुसर्‍या संकेतस्थळांवर जास्त शोभून दिसतो असे वाटते.

अहो कशाला थत्तेसाहेब. करू द्या ना चर्चा. उपक्रमावर चांगली संधी मिळाली आहे आम्हाला. ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी :) बाकी दुसऱ्या संकेतस्थळावरील शूशीतैंची कलंक चर्चा वाचली नाहीत का? ती उपक्रमावर व्हायला हवी होती असे वाटते राहून राहून. प्रामाणिकपणे. त्यांना बोलवा इकडे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नॉन इव्हेन्ट

एम.एफ.हुसेन हे बहुतेक भारतीयांसाठी नॉन एन्टीटी व त्यांची चित्रकला ही नॉन इव्हेन्ट आहे. त्याच्याबद्दल चर्चा करण्यात मुंबईचे थोडेफार स्यूडो बुद्धीमंत सोडले तर बाकी कोणाला रुची नाही.या व्यक्तीबद्दल आपण येथे चर्चा करून वेळ व उर्जा कशाबद्दल वाया घालवावी असे मला वाटते.
चन्द्रशेखर

सहमत

या व्यक्तीबद्दल आपण येथे चर्चा करून वेळ व उर्जा कशाबद्दल वाया घालवावी असे मला वाटते.

सहमत.
पळून गेलेल्या हूसैनपेक्षाही बरीच भयानक माणसे भारतातली श्रध्दास्थाने आहेत.

आपल्यापैकी बरेच लोक नॉनएन्टिटी

आपल्यापैकी बरेच लोक भारतात नॉनएन्टिटी आहेत आणि आपल्यापैकी बर्‍याच लोकांचे काम हे नॉन इव्हेन्ट आहे. उदाहरणार्थ दस्तूरखुद्द मी अशांपैकी आहे.

माझ्याबाबत चर्चा करण्यात माझे कुटुंबीय आणि काही थोडे आप्तस्वकीय सोडल्यास फारशा लोकांना रस नाही. हे लोक कदाचित स्यूडो-बुद्धिवंत असतील किंवा नसतील.

माझ्या व्यक्तिगत संदर्भात असे काही घडले, तर भारतातल्या काही लोकांनी तरी वेळ आणि ऊर्जा खर्च करावी, असे मला वाटते. नाहीतर आधीच नॉनएन्टिटी, अस्तित्वातून पुसला जाणे ही एक शोचनीय बाब आहे.

उद्या वेळ आल्यास माझ्या बाबतीत कोणी वेळ आणि ऊर्जा खर्च करावी असे मला वाटते, म्हणून आज कोणा नॉनएन्टिटीच्या बाबत वेळ आणि ऊर्जा खर्च करणे, ही माझी जबाबदारी आहे.

चंद्रशेखर यांचा प्रतिसाद विनोदी असल्यास ठीक. (पण तसे स्पष्ट होत नाही.) मुद्दा गंभीर असल्यास एन्टिट्या आणि इव्हेन्टांची यादी मिळाल्यास बरे. किंवा निकष. फक्त एन्टिट्याच ऊर्जा खर्च करण्यालायक आहेत, याबद्दल नैतिक तर्क सांगितला तर मुद्दा सर्व वाचकांना समजायला सोपा होईल.

मूळ लेखाकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होते, पण ते "नॅन-एन्टिटी या कारणासाठी नव्हे. पण या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करणे जड जाते आहे!

कारण लातोंके भूत बातोंसे मानते नाही.

हेच कच खावू धोरण आपल्या नाशास कारणीभूत ठरले आहे.ही चित्रे हुसेन ने काढली नाही मान्य केले तर त्यास पळून जाण्याचे कांहीच कारण नव्हते. तसेच कलाकारांच्या स्वातंत्र्या च्या नावाने यांनी बोंब का मारली जाते. आणि हा विषय येथे मांडू नये कारण सांगितले असते तर बरे झाले असते . आणि हो भारतात भाषा दर १५ मेला वर बदलते. गुळगुळीत भाषा बदलून प्रश्न सुटत नसतात. कारण लातोंके भूत बातोंसे मानते नाही.

काही अंशी

<<कारण लातोंके भूत बातोंसे मानते नाही.>>
काही अंशी हे खरे असले (म्हणजे त्यांना त्यांच्या भाषेत सांगितले तर समजते अशा अर्थाने) तरी लोकशाही मुल्य स्वीकारल्यावर अशी भाषा म्हणजे फॅसिझमला मूक पाठिंबा दिल्यासारखे असते. प्रत्येकाने आपले म्हणणे पटवण्यासाठी अशा गोष्टींचा आधार घेतला तर?

प्रकाश घाटपांडे

आजच्या या चुकीच्या लोकशाही पेक्षा हुकुमशाही फासिझम चांगले

प्रत्येकाने आपले म्हणणे पटवण्यासाठी अशा गोष्टींचा आधार घेतला तर?
प्रत्येकाने आपले म्हणणे पटवण्यासाठी अशा गोष्टींचा आधार घेतला तर? कांही फरक पडत नाही. नेता मार्गदर्शक हा एकच असतो. आणि भारतीय जनतेची मानसिकता ही लोकशाहीस पूरक नाही. यांना राजाच हवा आणि हे गुलाम मग हे सुता सारखे सरळ होतात.आणीबाणी कितीही वा ई ट म्हणा पण लोक सरळ झाले होते. नोकरशाही सरळ झाली होती. आणीबाणी ला विरोध करणाऱ्यांनी देशात काय उजेड पाडला दिसले. आजच्या या चुकीच्या लोकशाही पेक्षा हुकुमशाही फासिझम चांगले देशाची इज्जत तर राहील. अमेरिकेच्या मागे लाचार सारखे फिरावे लागणार नाही.

हा हा हा

प्रतिसाद वाचून प्रचंड करमणूक झाली.

यांना राजाच हवा आणि हे गुलाम मग हे सुता सारखे सरळ होतात.

यात हे कोण? भारतीय नागरीक? मग तुम्ही कोण? (राजे समजताय की काय?)*

असो.ज्याची त्याची समज, जाण इत्यादी इत्यादी म्हणून गप्प बसायचे झाले :(

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

हुकुमशाही

१. फॅसिस्ट हुकूमशहा चांगलेच घडवील या भाबड्या आशेला कशाचा आधार आहे?
२. आपल्या शेजारी बहुतांश काळ हुकूमशाही होती आणि ती अमेरिकेची लाचारी करीतच टिकून होती.
३. हुकूमशाही एकदा स्वीकारली की हुसेनने केलेले त्या हुकूमशाहीने मान्य केले तर तुम्हाला ब्लॉग लिहून मनातली मळमळ ओकताही येणार नाही. :)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

भा. दं. वि. १५३अ

उपक्रमवर thanthanpal ची मते बघून सखेदाश्चर्य वाटले.

हुसेनचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मला मान्य असले तरी माझा प्रश्न असा आहे की नसरीनचे, रश्दीचे, आणि jyllandsposten चे अभिव्यक्तिस्वातंत्र्य त्याला मान्य आहे का? (मला या साऱ्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य आहे.)

 
^ वर