कालगणना -भाग २

आपण वापरत असलेले दिवस, महीना,वर्ष:-

चिल्ड्रन्स ब्रिटानिका vol 3 1964 कॅलेंडरचा इतिहास आहे.कॅलेंडर म्हणजे काळाची विभाजन पद्धत.चांद्रमास व सौरवर्ष (solar year)
ह्या संज्ञा आज वापरतात. चांद्रमास व सौरवर्ष यात मेळ बसत नाही. याच कारणाने बहुतेकदा त्यात बदलसुद्धा झाले आहेत.ऎतिहासिक आधारभुत घटना प्रमाण मानुन त्यात बदल करण्याची परंपरा पुर्वी पासुनची दिसते.
ख्रिस्तजन्म आधारभुत घटना मानुन ख्रिस्तपुर्व(B.C.- BEFORE CHRIST) ख्रिस्तनंतर(A.D.- AFETR DOMINI. म्हणजे FROM THE YEAR OF LORD CHRIST ) आज आपण वापरतो.(वैदीक पध्दतीचे भाग ३ मध्ये लीहील.)

रोमन संवत :-

आजच्या इसवीसनाचे मुळ रोमन संवत होय.ते ख्रिस्तपुर्व रोमच्यास्थापने ( अंदाजे ७५३ वर्षा पुर्वी ) पासुन मानतात. प्रारंभी त्यात १० महिन्याचे वर्ष होते. ते मार्च ते डीसें ,दिवस होते ३०४ नंतर नुमा पिम्पोलियस या राजाने त्यात JONUARIES AND FEBRUARIUS हे दोन महीने घातले (तरीही मार्च वर्षाची सुरवात करत असे) वर्ष झाले १२ महीने व ३५५ दिवसाचे. पण ग्रहीय गती नुसार फ़रक पडत होता. ते बरोबर करण्यासाठी (आजच्या भाषेत ४६ B.C.- BEFORE CHRIST करण्यासाठी) ज्युलियस सीझर याने ग्रहीय गती आभ्यासकांच्या मदतीने वर्ष ३६५ १/४ करण्याचा(G.R.) आदेश दिला. तसेच त्या पुर्वीचा फ़रक जाण्यासाठी ते वर्ष ४४५ १/४ दिवसांचे असे ठेवले.इतीहासात त्या वर्षाला (४६ B.C- YEAR OF CONFUSION ) संभ्रम वर्ष मानतात.ज्युलियस सीझरने वर्ष १२ महीने व ३६५ १/४ असे करण्यासाठी सर्व वर्ष क्रमाने ३१ व ३० दिवसाचे केले होते, फ़ेब्रु तेंव्हा ३० दिवसांचा होता. ईतिहासात आपले नांव अजरामर करण्यास त्याने सातव्या महीन्याचे जुने QUINITILES हे नांव बदलून जुलै केले. त्या नंतर आगस्टस ह्या राजाने आठव्या महीन्याचे हे नांव बदलुन आगस्ट असे ठेवले ,पण ते ३० दिवसांचे होते आपण सीझर प्रमाणेच आहोत हे दाखविण्यासाठी,
फ़ेब्रुचा १ दिवस कमी केला व आगस्ट ३१ दिवसाचे केले.
ह्या कॅलेंडरला ज्युलियन कॅलेंडरही म्हणतात.

ग्रेगॅरियन कॅलेंडर:-

पुढे ज्युलियन कॅलेंडर चे १० दिवस वाढले आणि चर्च उत्सव वैगरे.. यात घोटाळे होउ लागले मग तेरावा पोप ग्रेगरी याने १५८२ साली ते दुरुस्थ करण्यासाठी (G.R.) आदेश काढला कि, ४ OCT --१५ OCT मानावे व वर्षाची सुरवात जानेवारी पासुन करावी. रोमन कॅथलिकांनी पोपचे आदेश मानले पण प्रोटेस्टंटांनी उशीरा मान्यता दिली.
ब्रिटन ज्युलियन कॅलेंडर ला मान्यता देत राहीला पुढे मग ११ दिवसाचे अंतर पडले ते कमी करण्यासाठी २ सप्टेंबर नंतरचा दिवस १४ सप्टेंबर गणला गेला. त्या काळी घोषणा प्रसिद्ध होती की,CRISEUS BACK OUR 11 DAYS.

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ३ मध्ये

संर्दभ:-
कालयात्रा-
भारतीय कालगणना का वैज्ञानिक व वैश्विक स्वरुप- डा. रविप्रकाश आर्य
भारत मे विज्ञान की परंपरा- सुरेश सोनी

क्रमश:

शैलु.

Comments

उत्सूक

कालगणना विषयावर ससंदर्भ लेख लिहित आहात हा प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र याविषयात माझा काहिच अभ्यास नाहि. मात्र उपक्रमवर इतके लिहिले जाऊनही याविषयाबद्दल उत्सुकता बरीच आहे. पुढील भाग वाचायला उस्तूक आहेच.
अनेक उपक्रमींना याविषयात उत्तम गती आहे त्यांचेही खंडन / पुरवण्या वाचायला आवडतीलच. लेखाची लांबी मोठी करता आली तर नीट चर्चा होईल असे वाटते.

बाकी टंकनापासून सुरुवातकरून आता अगदी लेख लिहायला घेतलेत याबद्दल अभिनंदन

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

+१

लांबी मोठी करावी असं मीही म्हणतो - त्यामागची कारणं व परिणाम यातून मेंदूला खाद्य मिळेल. (उदा. कालगणनेचा स्पर्श मूलभूत विज्ञानाला होतो -खगोलशास्त्राचा अभ्यास त्यातूनच सुरू झाला. त्यातूनच पृथ्वीकेंद्री सिद्धांत गेला, गुरुत्वाकर्षणाचा नियम आला.)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

वाचतोय.

वाचतोय.

एक सुधारणा... AD = Anno Domini

बिपिन कार्यकर्ते

कालगणना

कालगणना
वाचतोय.
एक सुधारणा... AD = Anno Domini

हो. मान्य.

 
^ वर