कालगणना -भाग १
कालगणना -भाग १
काळचा प्रारंभ केव्हा झाला?
प्रख्यात ब्रह्मांड वैज्ञानिक स्टिफन हाकिन्स यांनी The Brief History of Time हे पुस्तक लीहले आहे.या पुस्तकात ते लीहतात, सॄष्टी आणि काळचा प्रारंभ एकाच वेळी झाला. त्यावेळी महाविस्फोट (Big Bang)झाला, आणि अव्यक्त ब्रह्मांड व्यक्त होऊ लागली. त्या सोबत काळाची सुरवात झाली.
काळाचे अस्तीत्व किती?
सॄष्टी जोवर राहील तोवर काळ राहील.
सॄष्टीच्या पुर्वी काय होते?
हाकिन्स म्हणतात, ते अजुन कळले नाही. एखाद्या तारा संपण्याच्या काळात(त्याचे इंधन प्रकाश व ऊर्जा समाप्त होतात) तो क्षीण होतो, इतका की तो बिंदुएवढा राहतो. ( तरी का माहीत नाही ) त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते, (हे आपण प्रयोगाने अभ्यासले आहे.) ती प्रकाशाला सुध्दा शोषुन घेते आणि म्हणून सॄष्टीच्या पुर्वी काय होते जाणता येत नाही. कदाचीत प्रकाशाच्या अभावाला अंधकार म्हणतात, म्हणून मी ’कॄष्ण विवर’(Black Hole) म्हणतो.सॄष्टीच्या पुर्वी काय होते तर मी म्हणेन ’अंधकार’(कॄष्ण विवर/Black Hole) होता.
The Brief History of Time हे पुस्तक आतंर-जालावर (PDF FORMAT मध्येसूध्दा) उपलब्ध आहे.
भारतातील वैदीक संर्दभ:-
ऋवेदातील नारदीय सूक्तात वर्णन करतांना म्हटले आहे. त्यावेळी ’सत’नव्हते ’असत’नव्हते, परमाणू नव्हता की अवकाशही. त्या वेळी मॄत्यु नव्हता,अमरत्व नव्हते,दिवस नव्ह्ता रात नव्हती. सॄष्टीच्या पूर्वी अंधकार हा अंधकाराने झाकोळला होता आणि तप:शक्तीयुक्त एक तत्व होते. (तप:शक्तीयुक्त एक तत्व होते.-यात अधिक संशोधनाची गरज आहे.) त्याच शक्तीच्या प्रभावाने ती एकात्मता भंग पावली आणि अव्यक्त अवस्तेतून व्यक्त झाली व ब्रह्मांडाच्या उत्पतीचा प्रारंभ झाला व त्याच बरोबर काळाचा प्रारंभ झाला.
ऋषींनी काळ विषयक परीभाषेत म्हटले आहे, "कलयती सर्व भूतानि" म्हणजे जो सर्व ब्रह्मांडाला,सॄष्टीला(भूतांना,प्रकाशाला वै) गिळण्याची शक्ती ठेवतो. हे ब्रम्हांड उत्पती आणि लय व पुन:उत्पती, आणि लय असे चक्र चालु राहते.
सॄष्टीच्या उत्पतीच्या बाबतीत सध्याचे वैज्ञानिकांचे विचार व वैदीक यात एक मुळ भेद आहे .EVOLUTION OR CREATED .
EVOLUTION हे वैज्ञानिक मत तर CREATED हे वैदीक.
क्रमश:
संर्दभ:-
The Brief History of Time - स्टिफन हाकिन्स
भारतीय कालगणना का वैज्ञानिक व वैश्विक स्वरुप- डा. रविप्रकाश आर्य
भारत मे विज्ञान की परंपरा- सुरेश सोनी
शैलु.
Comments
छान....!
पुस्तकाची ओळख फारच थोडक्यात सांगितली राव...! :(
अंधकारानंतर [प्रकाशाची ]जगाची सुरुवात कशी झाली वगैरे काही आहे का अजून ?
अवांतर : आजच एक पेपरात बातमी वाचली की, डायनासोर नष्ट झाले ते ग्रह पृथ्वीवर आदळल्यामुळेच..यावर शास्त्रज्ञांचे आता एकमत झाले आहे.[एकमत व्हायला २०१० उजाडले] महाकाय प्राण्यांचे जग संपले आणि नंतर मानवाने आपल्या बुद्धीद्वारे प्रगती केली. बाय द वे, अशी आदळ-आपट अनेकदा झाली असेल तर भविष्यात असे धोके आहेच म्हणायचे. आणि आपण पुन्हा प्रकाशाकडून अंधाराकडे जाऊ का, असा विचार येत आहे.
-दिलीप बिरुटे
सृष्टी...कृष्णविवर वगैरे
यातला 'का हे माहीत नाही' हा भाग कळला नाही. ताऱ्यात होणाऱ्या स्फोटांमुळे त्यातलं वस्तुमान केंद्रस्थानी असलेली गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून केंद्रापासून लांब जात असतं. हे स्फोट संपतात तेव्हा अव्याहतपणे ते वस्तुमान केंद्राकडे खेचलं जातं व त्याची घनता वाढत जाते. त्यामुळे केंद्रापासून कमी, कमी त्रिज्येत ते वस्तुमान सामावलं जातं. त्यामुळे केंद्रापासून अगदी कमी अंतरावर असलेलं गुरुत्वाकर्षण वाढतं. कालावकाश पराकोटीच ताणला जातो. म्हणून प्रकाश तिथून बाहेर पडू शकत नाही.
कालच जर महास्फोटापासून सुरू झाला असेल तर 'त्या आधी' हे शब्द जपून वापरावे लागतात.
तसंच काव्य आणि विज्ञान यांची तुलनाही विशिष्ट मर्यादा लक्षात ठेवूनच करायला हवी. काव्यात, किंवा कल्पनेत जे दिसतं ते आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या सत्यांमध्ये साम्य दिसलं तर तो योगायोग असतो. प्रत्यक्ष एका शिखरावर कोणी चढून गेलं आणि तिकडे जाऊन स्वत:चा फोटो काढून घेतला तर ते एक. आणि त्याच्या आजोबांनी लहानपणी तो पर्वत न चढता कल्पनेने काढलेलं कुठच्यातरी शिखरावर उभ्या असलेल्या माणसाचं चित्र हे एक. या दोनमध्ये प्रचंड फरक आहे. दुसऱ्या चित्राची पहिल्या फोटोशी तुलना करताना, रोचक, इतपतच प्रतिक्रिया यावी. दोन्हीमध्ये आसपास डोंगर दिसताहेत, आणि आकाश वरच आहे, माणसाचे पाय टोकावरच जमिनीला टेकलेले आहेत - या साम्यांमधून आजोबाही तिथेच जाऊन आले होते असा निष्कर्ष काढू नये. तसा काढण्याचा आपला उद्देश वाटत नाही, आपण केवळ साम्य दाखवली आहेत.
नासदीय सूक्त हे अतिशय वरच्या दर्जाचं काव्य आहे यात शंका नाही. (धनंजय यांना त्यांच्या उत्तम चर्चेचा दुवा देण्याची विनंती). त्यात 'सलिल' - प्रवाही जल, असादेखील उल्लेख आहे. त्याची आधुनिक वैज्ञानिक चित्राशी कशी सांगड घातली जावी?
योग्य. किंबहुना ते केवळ वैदीकच नव्हे तर जवळपास सर्वच धर्मांच्या 'हे विश्व काय आहे, का आहे, आपलं त्यात स्थान काय आहे..' अशा प्रश्नांच्या उत्तरात दिसून येतं.
पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
नासदीय सूक्ताचा दुवा
नासदीय सूक्ताबद्दल उपक्रमावर चर्चा झाली, त्याचा हा दुवा.
लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील भागाबद्दल प्रोत्साहन.
मात्र एक गोष्ट खटकते आहे. लेख म्हणतो :
यातील "EVOLUTION" शब्दाचा अर्थ या संदर्भात मला कळलेला नाही. जीवजंतूंमध्ये कालांतराने जे फरक होतात, त्याबद्दल "EVOLUTION"चा वैज्ञानिक सिद्धांत मला ठाऊक आहे. मात्र यात
(१) अनुवांशिक गुणांचे जवळजवळ (पूर्ण नव्हे) निर्दोष पुनरुत्पादन करणारी एकके = जीवजंतू,
(२) पुनरुत्पादनाची वीण तगेल त्यापेक्षा मोठी असणे, आणि
(३) काही जीवजंतू पुनरुत्पादनात/तगण्यात अधिक सफल होणे
अशी तत्त्वे आहेत.
लेखात तर विश्वाच्या आदि-उत्पत्तीबद्दल काही मते मांडलेली दिसतात - बिगबँग बाबत उल्लेख आहे. त्या काळात पुनरुत्पादने कसली होती? अनुवांशिक असे काय होते? पुनरुत्पादनात सफलता कुठली? असे काही अजून तरी माहीत नाही. म्हणजे आजकाल जीवशास्त्रात वापरतात (आणि वर्तमानपत्रात वापरतात) त्या अर्थाने "EVOLUTION"चा सिद्धांत लेखात अभिप्रेत नसावा. मग कुठल्या अर्थाने हा "EVOLUTION" शब्द वापरलेला आहे?
आदि-उत्पत्तीच्या संदर्भात मला तो शब्द निरवकाश वाटतो आहे. (ज्या संकल्पनेची तात्त्विक आवश्यकता नाही असा शब्द आहे). सृष्टीच्या आदिम उत्पत्तीबद्दल "EVOLUTION" असे कुठले मत वैज्ञानिकांमध्ये प्रचलित नसावे, असे वाटते. उलट असे मत अगदी विज्ञानविरोधी वाटते.
समजण्यात माझा काही घोटाळा झाला असावा.
दुरुस्ती
धनंजय यांच्या प्रतिसादावरून माझ्या लक्षात आलं की सृष्टी या शब्दाचा सजीवसृष्टी असा अर्थ मी गृहित धरला होता. तो जर विश्वाच्या उत्पत्तीसाठी वापरला असेल तर माझा धनंजयना दुजोरा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
काळ
काळ ही संकल्पना पूर्णपणे मानवनिर्मित असून काळाची भौतिकीय व्याख्या करता येत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
साडेसहा कोटी वर्षापूर्वी डायनॉसोअर नष्ट होण्याचे कारण मेक्सिकोच्या किनार्यावर झालेला एक महाउल्कापात होता. याच्या संशोधनाबद्दल मी हे ब्लॉग पोस्ट लिहिले होते. हाच लेख मराठी विज्ञान पत्रिकेमधेही प्रसिद्ध झाला होता. ज्या वाचकांना रुची असेल ते हा लेख बघू शकतात.
चन्द्रशेखर
मानवनिर्मित?
काळ ही जर मानवनिर्मित राशी असेल आणि तिची भौतिकीय व्याख्या करता येत नसेल तर आपल्या मते भौतिकीय व्याख्या करता येतील अशा कुठच्या राशी आहेत? त्यातल्या एखादीची मानवनिरपेक्ष व्याख्या द्यावी. त्याच धर्तीवर मला कालाची व्याख्या करता येते का ते पाहीन.
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मानव नव्हता, काळ ही संकल्पनाच नव्हती. मग डायनॉसोअर कसे होते?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
धन्यु...आणि जरासे अवांतर
आपला ब्लॉग आम्ही वाचतच असतो. आपल्या वरील दुव्यावरील लेखही वाचला.
आंतरराष्ट्रीय तज्ञांची समिती असे म्हणते की, ''दहा ते पंधरा किमी क्षेत्र व्यापणारा दगड अवकाशातून कोसळल्यानंतर हिरोशिमा व नागासकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या अब्जावधी पट अधिक स्फोटक उर्जा बाहेर पडली.'' आणि पुढे सामूहिक विनाश झाला.
मला एक विचारायचे आहे की, पृथ्वीवरील संपूर्ण होत्याचे नव्हते होण्यासाठी धुमेकेतूचा किंवा एखाद्या लघुग्रहाचा पृथ्वीवर आदळण्यासाठी किती किमी आकार पुरेसा आहे ? आणि मेक्सिकोत जो लघुग्रह किंवा धूमेकेतू आदळला तिथून पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट व्हायला सुरुवात झाली. याला अजून कोणते आधार आहेत ?
-दिलीप बिरुटे
अशनिपात आणि सजीव सृष्टीचा विनाश
बिरुटेसाहेब
पृथ्वीवरील सर्व मोठे सजीव नष्ट होण्यासाठी खूप महाकाय असा उल्कापात होण्याची गरज नसते.उल्कापातानंतर जे परिणाम होतात ते असे असतात.
1. उल्का पडलेल्या ठिकाणचे तपमान भयानक रित्या वाढल्याने आजूबाजूचा प्रदेश भस्मसात झाल्याने होणारी हानी.
2. उल्का समुद्रात किंवा समुद्रकिनार्यावर पडली तर तयार होणार्या सुनामी लाटांमुळे लाखो चौरस मैल प्रदेश नष्ट होणे.
3. उल्का पडल्यावर त्या ठिकाणाहून वातावरणात धूळीचे प्रचंड लोट उठतात. हे लोट हळूहळू सबंध पृथ्वीला वेढून टाकतात. यामुळे एकतर प्रथम सबंध पृथ्वीचे तपमान अतिशय वाढते. ज्यामुळे बरेचसे सजीव नष्ट होतात. व नंतर पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोचू शकत नसल्याने हळू हळू पुढची अनेक शतके किंवा सहस्त्रके पृय्वीवर हिमयुग येते. यामुळे झाडे झुडपे नष्ट होतात व अन्न साखळी तुटल्यामुळे सर्वच मोठे सजीवही हळूहळू नष्ट पावतात. 74000 वर्षापूर्वी इंदोनेशियातील सुमात्रा बेटावर झालेल्या एका ज्वालामुखी स्फोटानेही असेच 100 वर्षाचे हिमयुग आले होते. या कालात विषुव वृत्तीय भागात रहाणारे थोडे मानव सोडले तर बाकी सर्व मानवजात नष्ट झाली होती.
थोडक्यात काय! होत्याचे नव्हते होण्यासाठी भला थोरला उल्कापात होण्याची गरज नाही. चिक्षूल्युबमधल्या साडेसहा कोटी वर्षांपूर्वीच्या उल्कापाताएवढा उल्कापात किंवा अमेरिकेतील प्रसिद्ध यलोस्टोन नॅशनल पार्कमधला महाकाय ज्वालामुखीचा स्फोट हा सुद्धा संपूर्ण मानवजात सुलभतेने नष्ट करू शकेल.
चन्द्रशेखर
भौतिकीय राशी
स्पष्ट व्याख्या करता येणार्या दोन भौतकीय राशी (फिजिकल एन्टीटीज) वस्तूमान (मास) व उर्जा (एनर्जी) या आहेत.
आईनस्टाईनचे ई= एमसी(स्क्वेअर) हे समीकरण प्रसिद्ध आहे.
चन्द्रशेखर
त्यांची व्याख्या द्या ना राव
मुळात मी तुम्हाला त्यांची व्याख्या विचारली होती. वस्तुमानाची जर तुम्ही मानवनिरपेक्ष व्याख्या केलीत तर तशीच, त्याच प्रणालीने मी कालाची करीन असं म्हणत होतो.
जर काल मानवनिर्मित का आहे आणि इतर राशी का नाहीत हे तुम्हीच समजावून सांगितलं तर उत्तमच.
आणि हो, मी डायनॉसोअर मानव नसताना, कालाची निर्मिती नसताना कसे अस्तित्वात होते हेही विचारलं होतं. त्याचाही खुलासा करा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
कालगणना
सर्वांच्या प्रतीक्रीये बद्दल धन्यवाद.
श्री राजेश
यातला 'का हे माहीत नाही' हा भाग कळला नाही.
ताऱ्यात होणाऱ्या स्फोटांमुळे त्यातलं वस्तुमान केंद्रस्थानी असलेली गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून केंद्रापासून लांब जात असतं. हे स्फोट संपतात तेव्हा अव्याहतपणे ते वस्तुमान केंद्राकडे खेचलं जातं व त्याची घनता वाढत जाते. त्यामुळे केंद्रापासून कमी, कमी त्रिज्येत ते वस्तुमान सामावलं जातं. त्यामुळे केंद्रापासून अगदी कमी अंतरावर असलेलं गुरुत्वाकर्षण वाढतं. कालावकाश पराकोटीच ताणला जातो. म्हणून प्रकाश तिथून बाहेर पडू शकत नाही.
तसंच काव्य आणि विज्ञान यांची तुलनाही विशिष्ट मर्यादा लक्षात ठेवूनच करायला हवी. काव्यात, किंवा कल्पनेत जे दिसतं ते आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या सत्यांमध्ये साम्य दिसलं तर तो योगायोग असतो.
श्री राजेश यां नी 'का हे माहीत नाही' चे उत्तर दिले आहेच.मी 'का हे माहीत नाही' हे स्टिफन हाकिन्स यांच्या The Brief History of Time च्या संर्दभातुन दिले होते. पण आपण उत्तर दिले आहेच.
काव्य आणि विज्ञान यांची तुलनाही विशिष्ट मर्यादा लक्षात ठेवूनच करायला हवी.
मान्य.
काव्यात, किंवा कल्पनेत जे दिसतं ते आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेल्या सत्यांमध्ये साम्य दिसलं तर तो योगायोग असतो.
हे विधान मान्य नाही.
४ वेद,रामायण,महाभारत ही महाकाव्य(काव्य कल्पनेत आहेत की वैज्ञानिक),तसेच १८ पुराण(१८ पुराण जी रुपकात्मक आहेत.)यात मांडण्यात आलेल्या अनेक गोष्ठी वैज्ञानिक कसोट्यावर सिद्ध होतात.
तो योगायोग का मानावा ?
ह्या बद्दल योग्य पद्धतीने पुर्वाग्रहविरहीत संशोधन व्हावे असे वाटते.पुढील लेखात काळा संर्दभात मी ती मांडण्याचा प्रयत्न करणार आहेच.
श्री धनंजय
EVOLUTION OR CREATED
कुठल्या अर्थाने हा "EVOLUTION" शब्द वापरलेला आहे?
EVOLUTION हा शब्द डर्विनशी निगडीत नाही.EVOLUTION ऐवजी योग्य शब्द मिळत नव्हता.महाविस्फोट (Big Bang)झाला, आणि ग्रह,तारे इ. निर्माण झाले असे मत विज्ञानाचे,तर वैदीक पध्दतीत ग्रह,तारे इ. चा निर्माणकर्ता मानला जातो. पण लेखाशी (कालगणना) संबधित नसल्याने तसेच अनुत्तरीत असल्याने व मी जास्त लीहले नाही.
महाविस्फोट (Big Bang) बाबत अभ्यासक सध्या प्रयोग करत आहेत.पण वैदीक अभ्यासकांची आवश्कता वाटते.मी आग्रही नसुन अभ्यासकच/जिज्ञासू आहे.
शैलु.
काही बाबतीत असहमती.
टंकण्याच्या अडचणीवर मात करून लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.
मी जवळजवळ दोन दिवसांनी ऑनलाईन झालो असल्याने लेख उशिरा वाचला. त्यामुळे बहुतेक मुद्द्यांवर राजेश आणि धनंजय यांनी मतप्रदर्शन केलेच आहे. माझेही मतप्रदर्शन तसेच आहे.
पण अजून थोडे.
>>मी 'का हे माहीत नाही' हे स्टिफन हाकिन्स यांच्या The Brief History of Time च्या संर्दभातुन दिले होते.
पुन्हा कळले नाही. स्टीफन हॉकिंग यांनी स्पष्टीकरण दिले नाही असे म्हणणे असेल तर ते योग्य नाही. ते स्पष्टीकरण आपण उल्लेखिलेल्या पुस्तकात आहेच पण कृष्णविवरे तितकी काळी नसतात (म्हणजे तीही काही प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करतात) असे एक प्रकरणही त्यात आहे.
पुराणातली वांगी / वानगी हा नारळीकरांचा लेख तुम्ही वाचला आहे का? जरूर वाचा.
वैदिक किंवा प्राचीन ग्रंथातील विज्ञानसदृश उल्लेख यावर बरीच चर्चा वेळोवेळी विविध माध्यमांतून झालेली आहे. वैदिक अभ्यास (किंबहुना कुठलाच अभ्यास) करायला कोणाचीच हरकत असू नये. पण येथे अडचण अशी आहे की असा अभ्यास करण्यापासून कोणी कोणास रोखले आहे असे वाटत नाही. पण हा अभ्यास टी आय एफ आर किंवा नासाने करावा अशी अपेक्षा असेल तर तो करणे श्रेयस्कर आहे असे त्यांना वाटावे असे थोडेतरी काहीतरी या वैदिक ज्ञानवाद्यांकडून यायला हवे. अनेकदा जुन्या वाङमयातली शब्दांची व्याख्या भोंगळ असते. मी मागे एक असेच ढकलपत्र वाचले होते. कुठलासा दुवा दिला होता 'प्राईड ऑफ इंडिया'. त्यात कुठल्यातरी अंतराची/की वेगाची आधुनिक माहितीशी तुलना करून ते बरेचसे अचूक असल्याचे दाखवले होते. त्यामध्ये अंतराचे एकक म्हणून योजन हा शब्द वापरला होता. त्याच ढकलपत्रात अजून काहीतरी अशीच माहिती होती आणि तेथेही योजन हे एकक वापरले होते. गंमत म्हणजे दोन्ही ठिकाणी योजनची व्याख्या वेगवेगळी होती. त्यावेळी ढकलपत्र पाठवणार्याला मी लिहिलेले उत्तर खालील प्रमाणे.
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
आआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ
2202 Yojanas in Half a Nimish. the conversion of yojana does not tally with conversion factor given on page 16. There, yojana is defined as 768000 angula (fingers) if finger is taken as 15 mm, the yojana is approx 11.5 km. But in this calculation of speed of light it is shown as 9.06 mile i.e 14.4 km. It could be that this 14.4 km is arrived at by reverse calculation of modern value of speed of light. I don't know what a nimish means. Moreover sayanacharya is talking about the speed of sun and not light. That must be the apparent speed of sun in the sky.
:) सध्या एवढेच पुरे
नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)
प्रकाटाआ
प्रकाटाआ
कालगणना -भाग १
मी 'का हे माहीत नाही' हे स्टिफन हाकिन्स यांच्या The Brief History of Time च्या संर्दभातुन दिले होते. हा पु र्वि चा त र श्री राजेश यांनी दिलेला नंतरचा संर्दभ आहेच.
ताऱ्यात होणाऱ्या स्फोटांमुळे त्यातलं वस्तुमान केंद्रस्थानी असलेली गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून केंद्रापासून लांब जात असतं. हे स्फोट संपतात तेव्हा अव्याहतपणे ते वस्तुमान केंद्राकडे खेचलं जातं व त्याची घनता वाढत जाते. त्यामुळे केंद्रापासून कमी, कमी त्रिज्येत ते वस्तुमान सामावलं जातं. त्यामुळे केंद्रापासून अगदी कमी अंतरावर असलेलं गुरुत्वाकर्षण वाढतं. कालावकाश पराकोटीच ताणला जातो.
सध्या एवढेच पुरे.
शैलु.
हम्म!
पहिला भाग वाचला. बाकीचे भाग वाचून सविस्तर प्रतिक्रिया देता येईल.
काव्य आणि कल्पना
१००% सहमत.
कारण वैज्ञानीक पद्धतीमध्ये दिलेल्या सिद्धांतांच्या विकासाची प्रक्रीया दिसुन येते(उदा. गुरुत्वाकर्षणाविषयी मानवाची सध्याचे ज्ञान हे गॅलिलीयोने केलेला प्रयोग, न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, आईन्स्टाईनचे सापेक्षतावाद व ईतर अनेक वैज्ञानिकांनी याविषया वर केलेले काम) पण अशा प्रकारचा विकास वेद व पुराणांतील उल्लेखांबाबत दिसत नाही. थत्ते यांनी वर उल्लेखलेल्या लेखात नारळीकरांनी हा विषय छान मांडला आहे.
शिपाईगडी
कालगणना -भाग १
कारण वैज्ञानीक पद्धतीमध्ये दिलेल्या सिद्धांतांच्या विकासाची प्रक्रीया दिसुन येते(उदा. गुरुत्वाकर्षणाविषयी मानवाची सध्याचे ज्ञान हे गॅलिलीयोने केलेला प्रयोग, न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, आईन्स्टाईनचे सापेक्षतावाद व ईतर अनेक वैज्ञानिकांनी याविषया वर केलेले काम) पण अशा प्रकारचा विकास वेद व पुराणांतील उल्लेखांबाबत दिसत नाही.
--काही प्रश्न असेच मलाही पडतात त्यांची उत्तरे मी पण अजुन शोधतोय.
मी आग्रही नसुन साधक/ अभ्यासकच/विद्दार्थी /जिज्ञासू आहे.
भाग ४ मध्ये जमतं का बघतो. .
शैलु.
छे!छे! यापुढे या विषयावर चर्चा नको
काय हे? कशावर म्हणजे अगदी कशावरच विश्वास ठेवायचा नाही? हद्द झाली.
धनंजय, घासकडवी इ. प्रकारची मंडळी नॉन्-बिलीव्हर्स् प्रकारात मोडतात.
'आपले' विज्ञान वेदपूर्वकालातही अत्यंत प्रगत होते.
अहो, आमच्यासारखे विचारवंत, ज्ञानवंत ते मान्य करतात याहून मोठा आधार हवाच कशाला?
आमची प्रांजळ मते येणेप्रमाणे -
१. 'मानव' हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीतून उत्क्रांत झालेला प्राणी नव्हे.
२. परकीय जीवसृष्टीतील अतिप्रगत एलिअन्स एक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर उतरले.
३. त्यावेळी 'होमोसेपियन' आणि 'निएंडरथाल' या नावांच्या उत्क्रांत वानरजाती पृथ्वीतलावर अस्तित्वात होत्या.
४. अतिप्रगत एलियन्सनी उत्तर धृवाजवळ यातील होमोसेपियन्सवर जेनेटिक इंजिनियरिंगचे प्रयोग केले. त्याची ०.५ टक्के जीन्स बदलली.
५. या प्रयोगांमुळे होमोसेपियन्सचा मेंदू जास्त तल्लख झाला.
६. त्या सुपिक मेंदूमुळेच होमोसेपियन्सनी निअँडरथाल वानरावर मात केली.
७. वेदपूर्वकालीन 'संस्कृत' ही परग्रहवासी ऍलिअन्सची भाषा (गीर्वाणवाणी - देवभाषा) होती. ती त्यांनी उत्तर धृवाजवळच्या प्रगत होमोसेपिअन्सना शिकवली.
८. ५०००० वॉट स्पीकर्समधून त्यांनी होमोसेपियन्सना ऋग्वेद इ. वेद 'ऐकवले'. म्हणून त्या शृती आहेत.
९. या वेदांमध्ये अवघ्या विश्वाचे ज्ञान / विज्ञान भरलेले आहे. 'वेद' भ्रष्ट आणि प्रक्षिप्त झाल्याने ते ज्ञान निखळ स्वरुपात उपलब्ध नाही.
अन्यथा स्टीफन हॉकिन्स वा आईनस्टाईन वा तत्सम शास्त्रज्ञांची गरजच उरली नसती. (उदा. राम पुष्पक विमानात बसून..., ब्रह्मास्त्र म्हणजेच हायड्रोजन बाँब...,
अग्न्यास्त्र विरुद्ध पर्जन्यास्त्र म्हणजेच मिसाईल शील्ड...
१०. सर्व ज्ञान प्रत्येक मानवी मेंदूत पूर्वीच साठवून ठेवले आहे. ते जाणून घेण्यासाठी (आमच्यासारखी )पात्रता लागते. शिवाय केवळ योग्य गुरूच ज्ञानाची कवाडे उघडू शकतो.
यालाच ध्यान, समाधी, मोक्ष अथवा शक्तीपात असे नाव आहे.
११. पिरॅमिड, माया संस्कृती, ज्योतिषशास्त्र आणि सहस्त्रावधी चमत्कारी व्यक्ती हे आमच्या म्हणण्याला प्रमाण आहे.
१२. ....
इ.इ.इ.
इतके विकीवरचे दुवे असूनही वरील मजकूर वाचणार्यास त्यावर विश्वास बसत नसेल तर त्याची मर्जी!
ही आमची ठाम मते आहेत. यापुढे या विषयावर चर्चा नको. असो.
वरील लिखाण मुळीच हलकेच घेऊ नये हे मुद्दाम वेगळे सांगतो.
कालगणना -भाग १
श्री विसुनाना
आपले' विज्ञान वेदपूर्वकालातही अत्यंत प्रगत होते.
खंडण - मंडण अपेक्षीत आहेच.वॆयक्तीक खंडण - मंडण नको
शैलु.
वैयक्तिक! :)
खंडन वा मंडन (-वैयक्तिक-) नाहीच! काळजी नसावी. ;)