संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

संगीत सम्राट तानसेनाची गणेशभक्ति

जीवनात साहित्याप्रमाणे संगीतकलेला असाधारण स्थान आहे. संस्कृत सुभाषितकाराने "साहित्यसंगीत कलाविहिन; साक्षात् पशु: पुच्छविषाणहीनः" असे म्हणून गायनी कलेचे महत्त्व मान्य केलेले आहे. ललित कलांत तर संगीताचे साधन असलेला स्वर हा सूक्ष्म असल्यामुळे या कलेची साधना श्रेष्ठ मानली जाते. या कलेचा प्रभाव चराचर सृष्टीवर पडतो व म्हणूनच या कलेच्या खर्‍या आराधकांवर जातीची, देशाची व काळाची बंधणे घालणे अन्यायाचे आहे. हे सर्वमान्य आहे.

सूक्ष्म अशा संगीतकलेला साधना ही तितकीच प्रखर व एकाग्र असावी लागते. किंबहुना सम्पूर्ण जीवन या कलेच्या नि:सीम आराधनेवर ओवाळून टाकणार्‍या खां, रहिमत खां, नत्थूखां, भास्करबुवा बखले, यांसारख्या व्यक्तिंनाच खरा सूर सापडतो व प्रतिष्ठा मिळते अशी इतिहासाची साक्ष आहे. या एकान्त साधनेला उपासनेची जोड असली तर सोन्याहून पिवळे, उपासनेमुळे साधनेच्या गौरीशंकरावर आरुढ व्हावयाला मदत होते; त्यामुळेच विख्यात गायक इष्टदेवतेला आळवताना जी आलापी करतात त्याला 'परत्त्वाचा स्पर्श' होतो व त्यामुळे त्याच्या गायनी कलेला अभिनव रुप प्राप्त होत असते. संगीतकलेचा मुकुटमणी तानसेन याच्या बाबतीतही त्याची गणेशभक्ति उपकारक ठरली असे अनुमान करायला हरकत नाही.

मुसलमान गायक तानसेन हा गणेशभक्त कसा ह प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु वस्तुतः तानसेन हा वेदशास्त्रपारंगत ब्राम्हण घराण्यातला हे लक्षात ठेवले पाहिजे, त्याचे वडील ग्वाल्हेर भागातल्या केरट गावचे मकरन्द पाण्डे. भगवान शंकराची आराधना करुन त्यांनी पुत्रप्राप्ति करुन घेतली व हा पुत्र म्हणजेच विख्यात गायक तानसेन. सुरवातीला पाच वर्षापर्यंत मुका असणार्‍या तानसेनाला तत्कालीन विख्यात गायक स्वामी हरिदासांचे मार्गदर्शन लाभले व त्यांच पट्टशिष्य व त्यांच्या पठडीतला अप्रतिम गायक म्हणून तो प्रसिध्द झाला. त्याची कीर्ती सम्राट अकबराच्या कानी गेली व दरबारी गायक म्हणून त्याची नियुक्तिही झाली.

यातूनच पुढे बैजूबावराशी तानसेनाचा संघर्ष निर्माण होऊन त्यात तानसेनाला पराजय पत्करावा लागल्याची दंतकथा प्रसिध्द आहे. या पराजयामुळे तानसेनाला जी उपरती झाली त्यातच त्याच्या गणेशभक्तिचे व नंतरच्या भक्तिपरक गायकीचे मूळ सापडते. सुदैवाने तानसेनाने लिहिलेली काही भक्तिपूर्ण पदे आता उपलब्ध झालेली आहेत. या काळात तानसेनाचा संबध हरिभक्त व विख्यात कवी सूरदासांशी आला व त्यामुळे तानसेनाची भक्ति दृढ झाली असावी असे म्हणण्यास हरकत नाही.

मंगलमूर्ती गणेशाचे नामस्मरण का करावे याचे उत्तर देताना तानसेन एका पदात म्हणतो 'प्रथम नाम गणेश को लेहूँ, आ सुमिरे सर्व सिध्दि काज' कारण तोअ 'विघन-विनाशक' आणि 'मंगल-नायक' आहे. या भावनेनेच तानसेनाला 'लम्बोदर नाम जपत सकल सृष्टी' चा भास होतो व 'सब देवन सिरताज' व 'सुर नर मुनि शेष राज' या शब्दांत हा कवी त्याचा गौरव करताना दिसतो. गणेशाच्या प्रचलित पूजेत त्याची बारा नांवे गोवलेली आहेत व रोज त्यांचे पठण करणार्‍या व्यक्तिच्या बाबतीत विघ्नांचे निवारण होते व इष्टफलप्राप्ति होते असे म्हटलेले आहे याच धर्तीवर तानसेनाने एके ठिकाणी 'एकदंत गजबदन विनायक // विघन विनाशक हे सुखदायी // लम्बोदर गजानन जगवन्दन // शिवसुत धुंडीराज सब वरदायी // गौरीसुत गणेश // मूषकवाहन फरसिधर स्कंद सुक्त रिध्द सिध्द //' असे म्हणून 'तानसेन तेरी स्तुति करत // कटो क्लेश, प्रथम वन्दन करत' या शब्दात गणेशाला वन्दन केलेले आहे. तुम हो गणपति देव बुध्दिदाता // सीस धरै गज सुण्ड // जेहि जेहि घ्यावै तेहि फल पावै ' असे म्हणणारा तानसेन, 'नमो नमो ऋध्दि सिध्दि के स्वामी' या शब्दांत गणेशाला वन्दना करणारा तानसेन व विद्याधर गुणनिधान' असलेल्या गणेशाचेच ध्यान ब्रह्मा विष्णू आणि शंकर करीत असतात अशी प्रार्थना तानसेन प्रभु तुम ही को ध्यावै ब्रह्मा विष्णू महेश' या शब्दांत करणारा तानसेन खर्‍या अर्थाने गणेशाचा हिन्दू भक्त वाटला तर नवल नाही. अशा भक्तिपरक काव्यरचनेमुळे तानसेनाला उत्तरायुष्यात शान्ती व समाधान लाभले असावे. तानसेनाची ग्णेशभक्ति कोणाही गणेशभक्ताला प्रेरक व मंगलकारक ठरेल.

गणेशभक्त
संजीव
http:\\vastuclass.blogspot.com
श्री डॉ. मो. दि. पराडकर यांनी वरील विषयाचा शोधनिबंध लिहीलेला आहे.

Comments

नवीन

>>मुसलमान गायक तानसेन हा गणेशभक्त

तानसेन मुसलमान असल्याची नवी माहिती मिळाली. ;)

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

रामतनु मकरंद पांडे

तानसेन मुसलमान असल्याची नवी माहिती मिळाली. ;)

खरेच की! आत्ता शोध घेतला तेंव्हा विकीवर लिहीले आहे की "इट् इज् रिझनेबली सरटन.." की तानसेन हा हिंदू कुटूंबात जन्माला आला होता. पण अजून थोडे शोधल्यावर हा दुवा मिळाला ज्यात तानसेनचे दिलेले नाव हे रामतनु असे सांगितले आहे तर वडीलांचे नाव मकरंद पांडे असे आहे (मकरंद हे नाव उत्तर भारतातल्या नावांमधे वेगळे आहे का?) . मात्र त्यापुढे जाऊन पाहीले तर त्याच्या मोठ्या मुलाचे नाव हे "सुरत सेन"असे आहे, धाकट्याचे नाव "बिलास खान", तर जावयाचे "मिश्री सिंघजी" . या सर्वांचे संगीतात योगदान आहे असे दिसते. तेंव्हा कलेला धर्म नसतो आणि नावात काय आहे असे म्हणूया झाले! ;)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

इस्लाम

तानसेन जन्माने हिंदू होता. पण मुहंमद घौस नावाच्या एका सूफी साधूच्या प्रभावाखाली येऊन त्याने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला. त्याच्या वंशजांपैकी बरेच जण अतिशय तयारीचे गायक झाले.

आता जालावर पण अधिक माहिती सापडू शकते.

बिपिन कार्यकर्ते

हा कलेच्या खऱ्या आराधकावर अन्यायच

या कलेचा प्रभाव चराचर सृष्टीवर पडतो व म्हणूनच या कलेच्या खर्याय आराधकांवर जातीची, देशाची व काळाची बंधणे घालणे अन्यायाचे आहे.
आपल्या लेखात व आतापर्यंतच्या मतांमधून तर तानसेनाच्या हिंदू असण्याचीच फक्त चर्चा चालू आहे. हे कसे काय बूआ?

सम्पूर्ण जीवन या कलेच्या नि:सीम आराधनेवर ओवाळून टाकणार्याअ खां, रहिमत खां, नत्थूखां, भास्करबुवा बखले, यांसारख्या व्यक्तिंनाच खरा सूर सापडतो
या खरा सुर सापडलेल्या व्यक्तींच्या आराध्य दैवतांची माहितीही देऊन टाका. कि ते खरा सुर सापडूनही सामान्य जनात प्रसिद्ध नसल्याने त्यांची जात धर्म कोणता किंवा आराध्य हिंदू दैवत कोणते हे शोधण्याची लेखकाला आवश्यकता वाटत नाही.

गौरीशंकरावर आरुढ
याचा मतलब कळाला नाही.

त्याची गणेशभक्ति उपकारक ठरली असे अनुमान करायला हरकत नाही.
तुमच्या गणेशभक्तीचा पूर्णतः आदर करुनही तुमच्या या अनुमानाला माझी हरकत आहे.

वस्तुतः तानसेन हा वेदशास्त्रपारंगत ब्राम्हण घराण्यातला हे लक्षात ठेवले पाहिजे.
हे विसरल्याने काय होते. तर तो गणेशभक्त कसा काय हे पटवून द्यायला अवघड जाते हेच ना. मग असे ही म्हणता येते की तो गणेश भक्त होता हे विसरता कामा नये म्हणजे तो ब्राह्मण घराण्यातला होता हे पटवून द्यायला अवघड जायचे नाही.

सुदैवाने तानसेनाने लिहिलेली काही भक्तिपूर्ण पदे आता उपलब्ध झालेली आहेत.
जसजसे एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व जगास मान्य होऊ लागते तसतशी ती व्यक्ती हिंदू आणि खासकरून ब्राह्मण असल्याचे पूरावे उपलब्ध होऊ लागतात.

अशा भक्तिपरक काव्यरचनेमुळे तानसेनाला उत्तरायुष्यात शान्ती व समाधान लाभले असावे.
अशा भक्तीपर काव्य रचनेमूळे म्हणजे गणेशभक्तीपरच असे लेखकाला म्हणायचे आहे. की तानसेनाने अल्ला ची भक्ती म्हणून भक्तीपर काव्ये रचली असती तरी लाभले असते हे लेखकाला मान्य आहे. (शेवटी कलेच्या खऱ्या आराधकारवर असली बंधने घालता येत नाहीत. नव्हे का? ) तानसेनांनी अशी इतर दैवतांची भक्तीपर रचना गायली नसावीच असे ही नाही.

एकूण तानसेनांच्या गणेशभक्तीचा प्रसार करायच्या नादात त्यांचे मोठेपणाला आपल्या कोतेपणाचा रंग द्यायचा हा एकूण प्रकार दिसतो आहे. असे करुन लेखकर्त्यांनी कलेच्या खऱ्या आराधकावर खरे तर अन्यायच केला आहे. पहीला उतारा सोडला तर लेख नंतर भलत्याच उताराला लागलेला दिसतो.

बुबुवा, परतत्व म्हणजे काय बुवा?

त्यामुळेच विख्यात गायक इष्टदेवतेला आळवताना जी आलापी करतात त्याला 'परत्त्वाचा स्पर्श' होतो

बुवा, परतत्व म्हणजे काय बुवा? एलियन की काय? आम्हाला खूप आवडणाऱ्या सिगर्नी वीव्हरची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

सिगर्नी वीव्हर

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर