फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड

ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड
From लेख

फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भारुड हे नावच इतके स्वयंस्पष्ट आहे कि लेखकाला नेमक काय म्हणायच आहे हे यातुन स्पष्ट होत. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर फलज्योतिष = लोकभ्रम + लबाडी+योगायोग+ इंट्युशन ग्रहतारे हे फक्त शोभेसाठी!

असे समीकरण मांडुन लेखकास काय सांगायच आहे याचे मुद्दे दिले आहेत. काही मुद्दे थोडक्यात असे आहेत.
*फलज्योतिष हे शास्त्र नसुन फक्त काल्पनिक ठोकताळ्यांचा संग्रह आहे.
*तारे व ग्रह यांचे परिणाम इथल्या सजीवसृष्टीवर होत असतील ही पण व्यक्तिश: प्रत्येक माणसाच्या नशीबावर त्याचे वेगळे परिणाम होतात असे मला वाटत नाही.
*कुंडलीत ग्रह कुठल्या स्थानात पडला आहे यावर ग्रहाचे फल अवलंबुन असते हा सिद्धांत भ्रममूलक आहे.
*अशा भ्रामक सिद्धांतावर आधारलेल्या ठोकताळ्यांची सुद्धा प्रत्यंतरे येउ शकतात. पण ती संभवनीयतेच्या नियमाप्रमाणे असतात.
पुस्तकात कुंडलीची प्राथमिक माहिती चित्रांद्वारे सुलभ केली आहे. फलज्योतिषाला विज्ञानबाह्य गृढ लहरींचे प्रभाव मानल्याशिवाय त्यातील सिद्धांतांची मांडणीच करता येत नाही. या प्रतिपादनावर आधारलेले विवेचन पुस्तकात वाचायला मिळते. भुपृष्ठाची वक्रता व कुंडलीतील स्थाने यांचा परस्पर संबंध दाखवताना ग्रह एकाच वेळी अनेक स्थानात कसा हजर असतो? हे आकृतीद्वारे दाखवले आहे.

स्थानांनुसार ग्रहांची फलिते बदलतात या सिद्धांतावर हल्ला चढवला आहे.ग्रहांची दृष्टी, ग्रहांच्या दशा व गोचरी या बाबत पुस्तकात विवेचन असुन या संकल्पनांवर हल्ला चढवला आहे.
लेखकाने आपल्यापुरता विचार मांडताना " भविष्य काळातील घटनांना आज कोणत्यातरी स्वरुपात अस्तित्व आहे कि नाही याचे उत्तर मला ठामपणे हो किंवा नाही असे देता येत नाही. जर त्या घटनांना तसे अस्तित्वच असेल तर भविष्य जाणणे या शव्दाला अर्थ रहात नाही" असे म्हटले आहे.
पुस्तकाच्या मुख पृष्ठावरील चित्रे पुरेसे सुचक असुन शीर्षकातील शास्त्र शव्दावर मारलेली रिक्त जागेची काट कल्पक आहे. मुखपृष्ठाच्या व मलपृष्टाच्या आतील बाजुस " गर्भ आपली वेळ स्वत:च ठरवतो काय?" "गोकॆलिन व फलज्योतिष" असा वेचक व लक्षवेधी मजकुर परिशिष्टासारखा टाकला आहे. मलपृष्ठावर " एक सोपा मार्ग" म्हणुन खालील आवाहन केले आहे. "फलज्योतिषाचा खरेखोटेपणा ज्यांना पडताळुन पहायचा आहे. त्यांना एक सोपा मार्ग उपलब्ध आहे.पन्नाशी गाठलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बर्‍या वाईट अशा निदान तीन-चार ठळक घटना घडलेल्या असतात. जर फलज्योतिष हे खरेखुरे शास्त्र असेल तर जन्मकुंडलीवरुन या घटना साधारणपणे वयाच्या कितव्या वर्षी घडल्या असाव्यात ते सांगता यायला पाह्जे.तुमच्या आयुष्यातल्या अशा २-३ घटना आठवा. त्यांच्या तारखा, निदान महिना, लिहुन ठेवा तुमची जन्मकुंडली आणि या घटनांचे स्वरुप एवढेच फक्त तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे अशा ज्योतिषाला द्या आणि त्या घटनांचे वर्ष कुंडलीवरुन सांगता येईल का विचारा. प्रत्यक्षात काय होते ते पहा. ' हा सुर्य हा जयद्रथ' या म्हणीचा अनुभव तुम्हाला येईल."
लेखक माधव रिसबुड हे निवृत्त डिव्हीजन फॉरेस्ट ऑफिसर होते. निवृत्ती नंतर त्यांनी फलज्योतिषाचा छंद जोपासला. रिसबुडांचा परिचय आपल्याला इथे पहाता येईल.त्यांचे २००३ मध्ये पुणे येथे निधन झाले.
पुस्तक बाजारात फुटपाथवर मिळणार्‍या अनमोल खजान्यातच कदाचित मिळु शकेल. उपक्रमींना मात्र ते इथे ते वाचता येईल.

लेखक मुद्रक प्रकाशक:- माधव रिसबूड; २ वासवी, २१०१ सदाशिव पेठ, पुणे ३०
पृष्टसंख्या- ३०
मुल्य १० रु ; प्रकाशन :- जुलै १९९७

Comments

उपयुक्तता

>>>तुमच्या आयुष्यातल्या अशा २-३ घटना आठवा. त्यांच्या तारखा, निदान महिना, लिहुन ठेवा तुमची जन्मकुंडली आणि या घटनांचे स्वरुप एवढेच फक्त तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे अशा ज्योतिषाला द्या आणि त्या घटनांचे वर्ष कुंडलीवरुन सांगता येईल का विचारा.

हा हा हा. ही टेस्ट फारशी उपयुक्त वाटत नाही.
तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे असा ज्योतिषी सहसा तुमच्याशी अनेक वर्षे संपर्कात असलेला/तुमच्या घराण्याशी खूप काळ संबंध असलेला असणार. त्यामुळे त्याला अशा घटना केव्हा घडल्या हे माहितीच असणार. त्यामुळे तो कुंडली पाहिल्यासारखे करून बरोबर माहिती सांगू शकेल.

नितिन थत्ते

आमचा प्रयोग

आम्ही याविषयी प्रयोग केले आहेत. एका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते.

उधृत ज्योतिषा कडे जाण्यापुर्वी.. http://mr.upakram.org/node/854 प्रश्न क्र. ५९
वरील वाक्यातील एक गृहस्थ म्हणजे स्वतः माधव रिसबुड. मूळ धनुर्धारीतील हे आवाहन प्रकरण आपल्याला इथे वाचता येईल
प्रकाश घाटपांडे

प्रयोगाबद्दल वाचायला आवडेल

आपल्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल वाचायला आवडेल. आपल्याला सवड असल्यास जरुर त्याबद्दल लिहावे.

चांगले पुस्तक - धन्यवाद

पुस्तक आवडले. उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

समुदायाचे नाव

या समुदायाच्या नावात शास्त्र हा शब्द का आहे बरे?

शास्त्र

http://mr.upakram.org/node/806 प्रश्न क्र १ पहा
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रकाश घाटपांडे

प्रति: शास्त्र

मला तुमचे उत्तर समजले नाही. पूर्वी ज्याला ज्योति:शास्त्र म्हणत त्याला आता खगोलशास्त्र म्हणतात एवढेच कळले.
हा समुदाय केवळ होरा-स्कंधाविषयी आहे ना? त्याला शास्त्र असे संबोधिल्यास फुकटची विश्वासार्हता मिळू शकते.

 
^ वर