पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल
पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल ह्यांच्याबद्दल माहिती हवी आहे.
प्रश्न:
पुण्याच्या पेशव्यांच्या आणि बावनखणीचा संबंध काय? असल्यास पुण्याच्या पेशव्यांना बावनखणीत विशेष मान होता का? बावनखणी ह्या नावामागचा इतिहास काय? त्रेपनखणी का नाही. बावनखणी ही वास्तू होती काय?
घाशीराम कोतवाल ह्या ऐतिहासिक पात्राबद्दल माहिती कुठे मिळू शकेल? घाशीराम कोतवाल हा उत्तरेतून पुण्यात आलेला भैय्या होता असे म्हणतात. त्याकाळी पुण्यात उत्तरेतून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असावी. ह्याबाबत दस्तावेज उपलब्ध आहे काय?
अवांतर प्रश्न:
घाशीराम कोतवाल ह्या नाटकाची मध्यवर्ती कल्पना 'भैय्या लोकांची दादागिरी' आहे काय?
घाशीराम कोतवालाच्या काळात मनसेसारखी एखादी संघटना होती काय? पुण्याच्या बामणहरींनी त्याचा काटा कसा काढला असावे बरे?
घाशीराम कोतवाल नाटकात बावनखणीचे स्तुतिगीत आहे असे म्हणतात. ते कुणाला इथे देता येईल काय?
कृपया सवड काढून वरील प्रश्नांची उत्तरे दिल्यास आभारी राहीन. प्रश्नोत्तरातून, चर्चेतून निष्पन्न होणारी माहिती कुणी विकीला दिल्यास उत्तमच.
धन्यवाद.
Comments
पुस्तक.
पुण्याचे पेशवे : लेखक प्रा. अरविंद कुलकर्णी
हे पुस्तक वाचावे. सर्व माहिती मिळेल. हवेतर हे पुस्तक हिंदीत भाषांतरीत करुन घ्यावे. राष्ट्रभाषेचा अभिमानही वाटेल. :)
-पुण्याचे पेशवे
थयथयाट कशाला?
हा थयथयाट का हो पेशवेकाका?
बावनखणी नावाचे प्रसिद्ध नाटक होते ना हो?
खरे आहे
संगीत बावनखणी नावाचे नाटक प्रसिद्ध होते खरे. पण माझ्यामते बावनखणी प्रसिद्ध झाली ती घाशीराम कोतवालामुळे.
बावनखणी
मला असलेल्या तुटपुंज्या ऐकीव माहितीनुसार बावनखणी ही वास्तू शनवारवाड्याजवळ होती. बावनखणीत राहणाऱ्यांवर नाना फडणिसाला शनवारवाड्यातून चौकस नजर ठेवता येईल अशी बावनखणीची वास्तुरचना होती. तूर्तास इतकेच आणि चूभूद्याघ्या.
घाशीराम्...
१. बावन्न खणी ही वास्तु होती हे खरे आहे.
(खण म्हणजे जुन्या घरातील छताचे आडवे 'बीम्स', ती वास्तु बावन्न खणांची असल्याने बावनखणी म्हण असावेत असा कयास आहे)
असे वाटत नाही.
'बावनखणी' असे गाणे आहे, स्तुतीगीत हा वादाचा मुद्दा होउ शकेल. (उलट ब्राह्मणद्वेष तेंडुलकरांनी या नाटकात् पुरेपुर ओतला आहे असे बर्याच जणांचे मत् त्याकाळी होते असे वाचल्याचे आठवते)
नाना फडणवीसांवर एक पुस्तक वाचले आहे (२०व्या शतकाच्या सुरुवातीला लिहलेले) पण् लेखकाचे नाव. आता आठवत नाही, ते वाचुन नाना फडणवीसांबद्दल् आदर् निर्माण् झाला हे नमुद् करु इच्छितो. (फारसा मसुदा लिहु शकणार् नाही या बद्दल् दिलगीर् आहे)
खण म्हणजे खोल्या(?)
खण म्हणजे खोल्या तर नव्हेत? ही बावन्न खोल्यांची वास्तु असणेही शक्य आहे.
अशी वास्तु किंवा तिची मूळ जागा आजही पुण्यात दाखवली जाते का/ अस्तित्वात आहे का?
खण
कोल्हापूर भागात पाण्याच्या छोट्या जलाशयालाही 'खण' म्हणतात.
खण्.
तुमचा अर्थही काही भागात रुढ असु शकतो, पण् जुन्या घरांकडे पाहीले तर दोन् खणांमधील् अंतर् साधारण ५-६ फुट् असावे त्यामुळे इतकी लहान् खोली असणे बरोबर् वाटत् नाही.
खण म्हणजे बीम्स हे मला माहीत् आहे त्याच वरुन 'खणा खाली उभे राहुन पाया पडणे, ओवाळुन् घेणे' याला जुन्या लोकांचा विरोध असतो हे आठवते. तसेच जुने लोक अमुक् अमुक खणांची खोली असे म्हणतात.
खण
पूर्वी म्हणजे आरसीसी स्लॅबचे तंत्र निघाले नव्हते त्या काळात छप्पराचे सर्व वजन भिंती आणि खांब यांवर तोलून घ्यावे लागत असे. दोन समांतर भिंतींवर किंवा ओळीवार रांगेत उभ्या केलेल्या खांबांच्या माथ्यावर लाकडांच्या आडव्या तुळया (बीम्स) ठेवल्या जात. अशा समांतर तुळयांवर काटकोनात बांबूचे वासे किंवा जंते एकाला लागून एक असे रचले जात. त्यांवर बारीक चिवाट्या, चटया वगैरे अंथरून त्यावर माती पसरत असत. अशा प्रकारे धाबे तयार होत असे. निसर्गात मिळू शकणार्या साधनसामुग्रीनुसार तुळयांची लांबी साधारणपणे आठदहा फुटाहून जास्त नसायची आणि दोन तुळयांमधील अंतर (स्पॅन) चार पाच फूट एवढेच ठेवणे शक्य असे. अशा प्रकारे आठ दहा फूट लांब आणि चारपाच फूट रुंद जागेला खण असे म्हणत. असे दोन तीन खण असलेली खोली किंवा पांच सात खण असलेला सोपा किंवा स्वयंपाकघर असे. आमच्या घराची रचना अशी होती. मोठ्या सभागृहात वीस पंचवीस खण असू शकत, पण त्यात मध्ये खांबांच्या रांगा द्याव्या लागत. बावनखणी या इमारतीतील सगळ्या खोल्या धरून एकंदर बावन खण कदाचित असावेत. किंवा अंदाज येण्यासाठी एक मोठा आंकडा द्यायचा म्हणून ५२ हा अंक घेतला असेल. ( आपण दहा वेळा, शंभर चुका, १७६० गोष्टी असे म्हणतो तेंव्हा त्यांची संख्या मोजलेली नसते)
हे थोडे अवांतर झाले. घाशीराम कोतवाल आणि बावनखणी ही दोन्ही नाटके मी पाहिली आहेत. बावनखणी नाटकांत एक काल्पनिक उदात्त प्रेमकथा आहे, ती कुठेही घडू शकते, तर सत्ता, विषयलोलुपता आणि उन्माद या कालातीत विषयावर घाशीराम कोतवाल या नाटकाने प्रखर प्रकाशझोत टाकला आहे. पुणे शहर, तिथले ब्राह्मण, पेशवाई, नाना फडणवीस, घाशीराम कोतवाल, वगैरेंचा उल्लेख न करता एक संपूर्ण काल्पनिक कथा म्हणून ते लिहिले गेले असते तर निव्वळ नाट्यकृती म्हणून मला ते अप्रतिम वाटले असते. पण ऐतिहासिक विषयांवर लिहिले गेले असल्यामुळे आणि इतिहासातील व्यक्तींचा नांवानिशी उल्लेख करून त्याची पात्ररचना केली गेली असल्यामुळे प्रेक्षकांवर त्यांचा कदाचित विपरीत परिणाम होऊ शकतो असे मला वाटते. याबद्दल पूर्णसत्य, अर्धसत्य वगैरे जाणून घेण्याची मला कधी इच्छा झाली नाही. त्यामुळे मला त्याबद्दल कांहीही वेगळी माहिती नाही.
धन्यवाद
खणाच्या माहितीबद्दल धन्यवाद.
अवांतरः देवीला चोळीसाठी जे कापड दिले जाते त्यालाही "खण" म्हणतात. खणा-नारळाची ओटी. यानिमित्ताने एकाच शब्दाचे विविध अर्थ मिळाले.
खण | अधिक माहिती
अतिशय शास्त्रशुद्ध माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या एका तज्ज्ञ मित्राने अशीच काहीशी माहिती दिली. सरदार खासगीवाल्यांनी बावनखणी ही वास्तू उभारल्याचे कळते. सध्याच्या श्रीनाथ टॉकीजजवळ ही वास्तू होती. पुण्यात इकडीतिकडे विखुरलेली गणिकांची वस्ती बावनखणीत आणून त्यांनी वसविली. त्यामुळे इतरत्र होणारा उपद्रव कमी होईल व अधिक चांगले नियंत्रण ठेवता येईल अशी अपेक्षा असावी.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अरेरे
(उलट ब्राह्मणद्वेष तेंडुलकरांनी या नाटकात् पुरेपुर ओतला आहे असे बर्याच जणांचे मत् त्याकाळी होते असे वाचल्याचे आठवते)
बिच्यार्या पुरोगामी तेंडुलकरांना कुणीही उठावे आणि झोडपावे...
आपला
गुंडोपंत
तरी बरं
तरी बरं वाक्यात् मी- 'असे मत् बर्याच् जणांचे त्याकाळी होते' असं लिहलं आहे
खाली तो. यांनी दिलेल्या पहिल्या दुवावरील् सुरुवातच् अशी आहे:
असो.
सहमत
सहमत आहे. बिचाऱ्या गुंडोपंतांना बिचाऱ्या तेंडुलकरांची किती बिचारी काळजी :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
घाशीराम कोतवाल
कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातल्या एखाद्या घटनेला प्रमाणाबाहेर महत्व देऊन त्या व्यक्तीचे कार्य, समाजातले तिचे महत्व हे सर्व नष्ट करून त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन किती सहजपणे करता येते याचे घाशीराम कोतवाल नाटक हे उत्तम उदाहरण आहे. नाना फडणवीस या व्यक्तीने उत्तर पेशवाईत किती महत्वाची कामगिरी बजावली आहे व केवळ त्यांच्यामुळे पेशवाई चाळीस पन्नास वर्षे टिकून राहिली व तिचे सामर्थ्य कुठेही कमी पडले नाही या ऐतिहासिक सत्याकडे दुर्लक्ष करून पुण्याच्या त्या वेळच्या अतिशय कडक म्हणून गाजलेल्या पोलिस कोतवालाच्या (सध्याचे नाव पोलिस कमिशनर) मुलीबरोबरचे त्याचे संबंध या एकाच गोष्टीला अवास्तव महत्व दिले गेले आहे. या घटनेचा बाऊ करून नाना फडणवीसांना हीन चारित्र्याचा, वेश्यागमन करणारा वगैरे काहीही नावांनी संबोधले जाऊ लागले आहे.
इतक्या महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तीच्या तोंडाला डांबर फासण्याचा उद्योग करणार्यांचे हेतू काय असतील ते असोत. पण कोणत्याही इतिहासप्रेमीला (विशेषेकरून पेशव्यांच्या इतिहासाबद्दलच्या) नाना फडणवीसांच्या या चारित्र्यहननामुळे दुखःच झाले आहे यात शंकाच नाही. मराठ्यांच्या इतिहासातील दुसर्या काही व्यक्तींविरूद्ध ब्र जरी काढला तरी जाळपोळ करणार्या मंडळींना प्रत्यक्ष इतिहासाशी काहीच कर्तव्य नसल्याने नाना फडणवीसांना कोणी वालीच उरला नाही ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणीही उठावे आणि काहीही बरळावे अशी परिस्थिती या बिचार्या ऐतिहासिक व्यक्तीची झाली आहे.
पुण्याची पेशवे कालीन पोलिस व्यवस्था या बद्दल माझ्याकडे काही संदर्भ आहेत. त्यावर आधारित लेख लिहिण्याचा मानस आहे. बघू कधी जमते ते.
चन्द्रशेखर
इथे पाहा
महाराष्ट्रातले खलपुरूष - 1 : घाशीराम कोतवाल
कथानक
घाशीराम कोतवाल.... मनसे ;)
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
धन्यवाद!
महाराष्ट्रातले खलपुरूष - 1 : घाशीराम कोतवाल इथला वरील परिच्छेद वाचून डोळे उघडले. खट्टामीठा हा ब्लॉगही अत्यंत अत्यंत वाचनीय आहे. धन्यवाद.
(घाशीराम कोतवालात तेंडुलकरांनी ब्राह्मणद्वेष ओतायला हवा होता की नव्हता, हा आणखी वेगळ्या चर्चेचा विषय. )
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
ब्राह्मणांबद्दल ब्र काढला
ब्राह्मणांबद्दल ब्र काढला की लग्गेच तो ब्राह्मणद्वेष होतो. त्यातला खरे-खोटेपणा जाणून घ्यायची गरज नसतेच. इथे घाशीराम ब्राह्मण आणि नानाही ब्राह्मण पण तेंडुलकर म्हणजे सारस्वत ना? ते काही ब्राह्मण नव्हेत, ते करणारच ब्राह्मणद्वेष. त्यात नवल ते काय?