संपादकांना विनंती

संपादकांना मनापासून विनंती की उपक्रमवर ज्योतिष या विषयावरील सर्व लिखाण त्वरीत काढून टाकावे. असल्या भ्रामक विषयांचा प्रचार उपक्रमसारख्या माध्यमातून तरी होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते.
चंद्रशेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

नाही!

संपादकांना मनापासून विनंती की उपक्रमवर ज्योतिष या विषयावरील सर्व लिखाण राहू द्यावे. असल्या विषयां वरील मतांचा प्रचार उपक्रमसारख्या माध्यमातून तरी व्हावा, असे प्रामाणिकपणे वाटते.

आपला
गुंडोपंत

वाचा.

वाचा.

ह्या प्रकारचे 'विषय नियंत्रण' अमान्य असल्याचे http://mr.upakram.org/node/1857 येथे बहुमताने पारित करण्यात आलेले आहे. पुनश्च एकवार वाचावे. आपणांस ज्या विषयात रुची आहे त्या विषयावर लेखन करणे हा प्रत्येकाचा नैसर्गिक अधिकार आहे. तिथूनः तात्पर्यः आपणांस काय वाचावयाचे आहे अथवा काय वाचणे टाळावयाचे आहे, तेवढेच आपण ठरवावे. कोणी काय लिहावे, कोणी काय लिहिणे थांबवावे, हे सुचवू नये. मी प्रश्न कुंडली मांडली.. असा निर्णय होणे शक्य दिसत नाही. :) लेख प्रसिद्ध करु नयेत / काढून टाकावेत हे अमान्य. विषय नियंत्रण अमान्य. अधिक माहिती साठी http://mr.upakram.org/node/1065

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

वा

वा हैयो हैयैयो! साहेब,

तुमच्या इतका नेमका प्रतिसाद कुणीच देवू शकत नाही हेच खरे.
अनेक सो कॉल्ड तंत्रज्ञही आपले प्रस्ताव धड विचार करून मांडू शकत नाहीत. तेच ते परत परत मांडतात.

आपला
गुंडोपंत

सहमत

हैयो हैयैयो यांच्याशी पुर्णतः सहमत आहे.
http://mr.upakram.org/node/777#comment-12763 पहावे चंद्रशेखर यांनी आपल्या विचारांचा प्रसार प्रचार जरुर करावा पण त्यासाठी इतरांचे विचार स्वातंत्र्यावर घाला घालणे मला विवेकी वाटत नाही. वाद संवाद चालु राहिला पाहिजे.विचारांचा प्रतिवाद विचारांनेच करावा. आम्ही फलज्योतिषांना शत्रु मानीत नाही अथवा फलज्योतिष हा अविषय मानीत नाही. उपक्रम वर फलज्योतिष हा समुदाय उपक्रमाच्या स्थापनेपासुन आहे. जनसामान्यात फलज्योतिष या विषयाचे कुतुहल फार पुर्वीपासुन आहे.
या ज्योतिषाचं काय करायचं ? हा प्रश्न अनेकांना पडतो.
ऋषिकेश ने देखील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा चांगला मांडला आहे. समोरच्या व्यक्तिचे विचार मला मान्य नसतील तरी त्याच्या विचारस्वातंत्र्याची जर गळचेपी होत असेल तर त्याच्या बाजुने उभे राहणे हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा विचार आहे.

प्रकाश घाटपांडे

सहमत आहे

चंद्रशेखर यांनी आपल्या विचारांचा प्रसार प्रचार जरुर करावा पण त्यासाठी इतरांचे विचार स्वातंत्र्यावर घाला घालणे मला विवेकी वाटत नाही. वाद संवाद चालु राहिला पाहिजे.विचारांचा प्रतिवाद विचारांनेच करावा.

ज्योतिष हे काही व्यक्तिंच्या मते थोतांड असू शकते परंतु इतर अनेकांच्या मते तिला कला :-), विद्या, गरज मानले जाते. केवळ उपक्रमावरच नाही तर वर्तमानपत्रे, नियतकालिके, दिनदर्शिका वगैरेंमध्येही ज्योतिषावर पाने खर्ची घातलेली असतात.

आपल्याला विषय मान्य नसेल तर त्या वाटेला जाऊ नये किंवा वाटेला जाऊन प्रतिवादाने आपल्या विचारांचा प्रसार करावा.

लेखनविषयक मार्गदर्शन

लेखनविषय मार्गदर्शनात 'उपक्रम' म्हणते की, ''भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी हा उद्देश आहे'' [पाहा:लेखनविषयक मार्गदर्शन]त्यामुळे 'ज्योतिष' या विषयाचा उल्लेख नसला तरी त्यावर इथे माहितीपूर्ण देवाण-घेवाण / चर्चा होण्यास हरकत नसावी असे वाटते.

-दिलीप बिरुटे

नियंत्रण

उपक्रम हे खाजगी संकेतस्थळ आहे की कसे ते माहिती नाही. तसे असेत तर इतर काही संकेतस्थळांप्रमाणे मालक ठरवतील ती पूर्व दिशा हे उघडच आहे. मग चर्चा करण्यासारखे काही उरतच नाही.

तसे नसेल तर....

(मी सामान्यपणे ज्योतिष या विषयाच्या विरोधात असलो तरी) सेन्सॉरशिप कुठल्याही प्रकारची असू नये असे मला वाटते.
(देशात लागू असणार्‍या कायद्यांच्या मर्यादेत न बसणारे लेखन सोडून) इतर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण असू नये. असे नियंत्रण घालायचे म्हटले तर त्याचे योग्य ते जस्टिफिकेशन द्यावे लागेल.

परंतु चंद्रशेखर यांचे मत एका दृष्टीने विचारार्ह आहे. ते म्हणजे एखाद्या गोष्टीची वरवरची माहिती करून देण्यापुरते लेखन असावे. शिक्षणाचा कोर्स (उदा. कुंडली कशी पहावी)येथील लेखनातून चालवू नये. जाहिरातवाचक असू नये. प्रचारात्मक तर असूच नये.

नितिन थत्ते

सहमत..

उपक्रम हे खाजगी संकेतस्थळ आहे की कसे ते माहिती नाही. तसे असेत तर इतर काही संकेतस्थळांप्रमाणे मालक ठरवतील ती पूर्व दिशा हे उघडच आहे. मग चर्चा करण्यासारखे काही उरतच नाही.

सहमत आहे! :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

+१

मी ही सहमत आहे.
(सहमत) बेसनलाडू

'विषय नियंत्रण

संपादकांना मनापासून विनंती की उपक्रमवर ज्योतिष या विषयावरील सर्व लिखाण त्वरीत काढून टाकावे.

// आपल्या विषया विषयी मी सहमत //
पंरतु कला म्हणुज जर हा विषय असेल तर आपले ................. काय असेल?

एक कलाकार
संजीव

असहमत

मागे एका लेखाच्या प्रतिक्रीयेत म्हटल्या प्रमाणे वरील मागणीशी असहमत आहे. मी स्वतः फलज्योतिषाचा समर्थक नसलो तरी त्यावर लेखन येऊ नये असे अजिबात वाटत नाहि.
जोपर्यंत त्याद्वारे स्वतःच्या धंद्याची जाहिरात करत नाहि तोपर्यंत अश्या लेखांना प्रत्यवाय नसावा (अश्याच काय पण उद्या कोणी काळी विद्या, चेटूक वगैरे विषयांवर अभ्यासपूर्ण माहिती देणार असेल तर मी स्वागतच करेन) .. [निदान माझा झगडा कोणाशी आहे.. कीती खोल रुजलेल्या विचारांशी आहे ते तर कळेल]

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

+१

>>निदान माझा झगडा कोणाशी आहे.. कीती खोल रुजलेल्या विचारांशी आहे ते तर कळेल

सहमत.

नितिन थत्ते

खरं आहे

खरं आहे रे बाबा.

खरा झगडा आपण नकळत पणे कुणाचे विचार आपलेच म्हणून चालतो आहोत हे समजण्याचाच असतो.
अन्यथा अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणून भुईच धोपटत बसावे लागते.

व्यंकटेश माडगुळकर त्यांच्या जंगलातले दिवस पुस्तकात एक प्रसंग सांगतात.

"जंगलच्या सफरीत त्यांनी एका आदिवासी माणसाला अंगात आलेले पाहिले आणि त्यांच्या त्याच्या विषयी आपलेपण वाटला. कारण ते म्हणतात की आपल्याही अंगात येतच असते. लेखकाला लिहिल्या शिवाय रहावत नाही तेंव्हा त्याच्या अंगातच आलेले असते. दिग्दर्शकाला नाटक केल्या शिवाय रहावत नाही तेंव्हा त्याच्या अंगातच आलेले असते.
म्हणून त्या आदिवासीचे अंगात येण्याचा आणि माझा जवळचा संबंध आहे."

आपण कोणत्या रीतीने जगण्याकडे पाहतो आणि इतरांशी स्वतःला जोडण्याचे इतके सुंदर उदाहरण माझ्या तरी वाचनात नाही.

असो,
तुझ्या या प्रवासाला माझ्या मनापासून शुभेच्छा!

-प्रवासी,
गुंडोपंत

अभिव्यक्तिस्वातंत्र्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे हे मान्य केल्यावर,तोच युक्तिवाद पुढे नेऊन श्री.चंद्रशेखर यांनी जे मत मांडले आहे त्याचेही समर्थन होतेच.
विषय कोणता याला महत्त्व नसले तरी तो कशा पद्धतीने मांडला आहे,शब्दयोजना योग्य आहे काय?, वाक्यरचना कशी आहे,लेखनदोष किती आहेत याचा विचार अवश्य करायला हवा.उपक्रम स्थळाच्या दर्जाला आणि नावलौकिकाला शोभेल अशाच लेखनाला इथे स्थान मिळायला हवे.
उपक्रमी सदस्यांची एकूण संख्या किती याची कल्पना नाही.एकावेळेस बाराहून अधिक सदस्य उपस्थित असल्याचे कधी दृष्टोत्पत्तीस आले नाही.पणसध्यां पाहुण्यांची संख्य मात्र अनेक वेळां तीन अंकी दिसते.याचे भान ठेवून अगदीच अर्थशून्य असे काही लिखाण गाळणे आवश्यक आहे असे वाटते.योग्य निर्णय घेण्यास उपक्रमकर्ते समर्थ आहेत.

ध्येयधोरणाचा अन्वयार्थ

प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे हे मान्य केल्यावर,तोच युक्तिवाद पुढे नेऊन श्री.चंद्रशेखर यांनी जे मत मांडले आहे त्याचेही समर्थन होतेच.

असहमत. चंद्रशेखर यांची ज्योतिष विषय काढुन टाकावा अशी मागणी आहे. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला म्हणुन दुसर्‍यांदा हा प्रयत्न आहे. म्हणजे मला हा विषय मान्य नाही म्हणुन या विषयाचे अस्तित्वच डोळ्यासमोर नको. समजा उपक्रमाच्या ध्येयधोरणात ज्योतिष विषयावर लेखन नको असे ठरले असते तर गोष्ट वेगळी होती. आमचे मते या विधानावर उपक्रमींचा कौल घ्यावा.चंद्रशेखर यांची मागणी मला व्यक्तिशः अतिरेकी वाटते. मात्र त्यांच्या विषयावरील मतांशी मी बहुतांशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

सहमत आहे

हो अतिरेकीच आहे.
असल्या मागण्यांना उपक्रमाने आजिबात भीक घालू नये.

उद्या कुणी तरी म्हणेल की,
मॅकेनिकल इंजोनियरींग वरचे लेख लिहु नयेत - मला डोक्यात हतोडे मारल्या सारखे वाटते.
परवा कुणे म्हणेल की रसायन शास्त्र नको, अंगावर आम्ल पडल्यासारखे वाटते.

असे चालेल का?

आपला
गुंडोपंत

यनासरांचे म्हणने बिल्कूल पटले नाही.

>>विषय कोणता याला महत्त्व नसले तरी तो कशा पद्धतीने मांडला आहे,शब्दयोजना योग्य आहे काय?, वाक्यरचना कशी आहे,लेखनदोष किती आहेत याचा विचार अवश्य करायला हवा.

उपक्रमचा दर्जा, नावलौकिक, आणि उपक्रमचे वेगळेपण या बाबतीत मराठी संकेतस्थळावर उपक्रमचा एक दबदबा आहे.[असे वाटते] पण म्हणून उपक्रमवर लिहिणार्‍याच्या विषयाची मांडणी, शब्द, वाक्यरचना व लेखनदोषाचा विचार करायचा म्हटल्यावर इथे 'मोजकेच प्रतिभावंत लोक' [माझ्या मनात प्रतिभावंताची यादी आहे] असे दर्जेदार लिहू शकतील. पण आमच्या सारख्या हौशा-गौशांनी, माहितीपूर्ण लेखन/ चर्चेत भाग घेऊ इच्छिणार्‍यांनी काय करायचे. आम्हाला दुसरे दर्जेदार मराठी संस्थळे असले तरी आम्हाला इथे लेखन/प्रतिसाद वाचल्याशिवाय-लिहिल्याशिवाय होत नाही. तेव्हा उपक्रमवर लेखनाच्या बाबतीत अटी लादून सामान्य आणि नवीन वाचक-लेखकांना माहितीपूर्ण लेखन /चर्चा/ प्रतिसाद लिहिण्यासाठी प्रोत्साहान देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वरील प्रतिसादातून दिसतो. आणि असे प्रतिसाद वैयक्तिक मला निषेधार्ह आहेत असे वाटते. अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करत असल्यामुळे आम्ही आपला आणि आपल्या लेखनाचा आदर करतो, हे काही सांगण्यासारखे नाही. पण, पाहुण्यात दिसणारी अधिकची संख्या कमी होऊन, बाराहून अधिक सदस्य दृष्टोत्पत्तीस [बाप रे ! काय शब्द योजना आहे] येण्यासाठी उपक्रमने लवचिक धोरण ठेवले पाहिजे, यासाठी सदस्यांचा उलट उपक्रमवर दबाव असला पाहिजे, असेही वाटते.

-दिलीप बिरुटे
[उपक्रमी]

भ्रामक/अभ्रामक

विषय भ्रामक का अभ्रामक हे लोकांना ठरवू द्यावे.

श्री. यनावाला वर म्हणतात "उपक्रम स्थळाच्या दर्जाला आणि नावलौकिकाला शोभेल अशाच लेखनाला इथे स्थान मिळायला हवे.. तो कशा पद्धतीने मांडला आहे,शब्दयोजना योग्य आहे काय?, वाक्यरचना कशी आहे,लेखनदोष किती आहेत याचा विचार अवश्य करायला हवा."

अगदी बरोबर. पण वैज्ञानिक विषयांना वाहिलेल्या जर्नलांमध्येही एखाद्या लेखनात लेखनदोष असले म्हणून लेख "रिजेक्ट" होत नाही. तो सुचवण्यांसहित दुरूस्तीसाठी परत पाठवला जातो.

उपक्रमाचा दर्जा आणि नावलौकिक उत्तम आहेच यात शंकाच नाही. पण हा दर्जा अनेक सदस्यांच्या लेखनाने निश्चित झाला आहे, तसेच उपक्रमाच्या काहीशा "सैल" अशा मार्गदर्शनानेही ठरला आहे. हा दर्जा अधिक वेगळ्या पद्धतीने बदलायचा असल्यास हा सैलपणा सोडून सध्याच्या उपक्रमावर लेखन कुठच्या विषयांवर असावे, कसे असावे याच्या ज्या मार्गदर्शन पद्धती आहेत त्या त्यासाठी अधिक सुनिश्चित/नियंत्रित कराव्या लागतील.

खुलासा

माझ्या या पोस्टचा बराच विपर्यास झालेला दिसतो आहे; कोणाच्याही अभिव्यक्तीवर बंधन आणावे किंवा एखाद्या विषयाचे नियंत्रण करावे हे मला अभिप्रेत नव्हते.
उपक्रमच्या लेखनपर मार्गदर्शनात असे स्पष्ट म्हटलेले आहे की ''भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी हा उद्देश आहे''
यापैकी कोणत्याही विषयाखाली ज्योतिषावरील लेख बसत नसल्याने ते उपक्रमवरून काढून टाकावेत एवढीच विनंती संपादकांना करण्याची माझी इच्छा आहे.
चन्द्रशेखर

विपर्यास?

म्हणजे लेखन
''भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी,


यासारख्या इतर विषयांवर
हे शब्द वाचायचे विसरलात का?

आपला
गुंडोपंत

विपर्यास

भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास
हे विषय आणि ज्योतिष यांच्यात कोणताही सारखेपणा किंवा साम्य आहे असे मला वाटत नाही.
चन्द्रशेखर

समुदाय

उपक्रमाने ज्योतिष या विषयावर समुदाय ठेवला आहे. पहा http://mr.upakram.org/og पण आमचे मित्र धोंडोपंत हल्ली गायब दिसतात.
प्रकाश घाटपांडे

:)

भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास
हे विषय आणि ज्योतिष यांच्यात कोणताही सारखेपणा किंवा साम्य आहे असे मला वाटत नाही.

मुळात आपले मत ज्योतिषशास्त्रा संबंधी नसून त्याला चिकटलेल्या फलज्योतिष नावाच्या बांडङुळाविषयी आहे असे गृहित धरतो. (नसल्यास निव्वळ ज्योती:शास्त्र हे गणित, विज्ञान, कला, इतिहास या सार्‍यात नि:संशयपणे येते)

आता फलज्योतिष हे भाषेत कसे येते बघु. "आमल्यामागे काय साडेसाती लागली आहे" वगैरे उद्गार आपण नेहमी ऐकतो, बोलतो.. त्यात साडेसाती लागणे हा वाक्प्रचार थेट फलज्योतिषावरून आलेला आहे. त्याचा अर्थ मुळ जर साडेसाती म्हणजेच काय माहित नसेल तर लागणार नाहि.

फलज्योतिषाचा साहित्यावर तर गहिरा प्रभाव आहे. अनादी ग्रंथांपासून ते पुलंचे "माझे काहि नवे ग्रहयोग" पासून ते तुमच्या रोजच्या 'वर्तमान'पत्रात 'भविष्य' हे सदर त्याचा पुरावा आहे.

फलज्योतिषाच्या संस्कृतीवरील प्रभावाबद्दल मी काय बोलणार. तो प्रभाव आहे म्हणून तर असे लेख येतात नाहि का?

तेव्हा फलज्योतिषावरील लेख येण्यास आता आपला प्रत्यवाय नसावा ;)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अर्थशून्यता-तांत्रीक् अडचण्?

कोणता विषय/लेख् अर्थशुन्य आहे हे ठरवायचे कसे ही एक अडचण ठरु शकते. मग एक् समिती बसवा, मग् समिती पक्षपातीपणाचे आरोप सांभाळत् बसा! इ. इ.

यापेक्षा असे लेख ज्यांना सोडुन द्यायची आहेत् त्यांनी सोडुन् द्या. ज्यांना ते चुकीचे वाटतात् त्यांनी त्यावर् टीका करा वगैरे पद्धत् सोपी वाटते.

एक गैरसमज

श्री. चंद्रशेखरजी यांचा फक्त ज्योतिषाला विरोध आहे असा गैरसमज काही लोकांचा झालेला
दिसतो. तसे काही नाही. त्यांनी महाभारत व पुर्वांचल या मालिकांना विरोध दर्शवून स्वाईन फ़्लूची आठवण करून दिली होती.
शरद

अहो, अस्सं काय करता राव !

श्री. चंद्रशेखरजी यांचा फक्त ज्योतिषाला विरोध आहे असा गैरसमज काही लोकांचा झालेला
दिसतो. तसे काही नाही. त्यांनी महाभारत व पुर्वांचल या मालिकांना विरोध दर्शवून स्वाईन फ़्लूची आठवण करून दिली होती.

ठीक आहे, आता तुम्ही म्हणता म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवतो.

चंद्रशेखर यांनी एखादा नवीन धागा काढून 'उपक्रमवर ज्योतिष या भ्रामक विषयांचा प्रचार उपक्रमसारख्या माध्यमातूनतरी होऊ नये' अशी संपादकांना विनंती केली की काय असे वाटले होते. ;)

-दिलीप बिरुटे

भुमिका

ऋषिकेश चा प्रतिसाद मला संतुलित वाटला. समाजात चंद्रशेखर यांच्यासारखे ताणुन धरणारे देखील आवश्यकच आहे. संतुलनाचे महत्व त्यामुळेच निर्माण होते. गुंडोपंताचा 'आपलेपणा' ची अश्रद्धांना देखील 'अनुभुती' कधीतरी आली असेल. बिरुटे सरांचे लिखाण 'भान' देणारे आहे. विद्वानांच्या आखाड्यात जर संवेदनशील लेखनाची कुचंबणा होत असेल तर लोक विद्वानांपासुन लांब पळायला लागतील. विद्वानांनी बौद्धिक दांडगाई करणे हे संसदेत दांडगाई करणार्‍या लोकप्रतिनिधींसारखेच असेल तर 'यांच्यात' आणि 'त्यांच्यात' फरक काय?
संजीव नाईक यांना अस वाटत असणार कि पाहु यात प्रयत्न करुन उपक्रमींना थोडा वेगळा विचार करायला लावण्यात आपण यशस्वी होतो का?
उपक्रमावर उपलब्ध असलेले ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी....... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद हे पुस्तक या वैचारिक मंथनातुनच निर्माण झाले आहे. माझ्या माहितीनुसार हे पुस्तक फक्त उपक्रमावर उपलब्ध आहे. माझ्या अंनिसतील काही मित्रांनी कशाला असली पुस्तक लिहुन वेळ श्रम व पैसा वाया घालवायचा? फलज्योतिष हे थोतांडच आहे. असे मत देखील व्यक्त केले होते. मला दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने जी भुमिका घ्यावी लागली तिचा पुनरुच्चार खाली करीत आहे

दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने

आपल्याला जे पटत नाही ते सर्व त्याज्य अशी भूमिका न घेता बहुविध दृष्टिकोणातून या विषयाकडे बघण्याची दृष्टि ही मला माझया ज्योतिष प्रवासातूनच मिळाली. अनेक बुद्धिप्रमाण्यवादी फलज्योतिष विरोधक आपल्या मताशी जो पूर्णत: सहमत नाही तो फलज्योतिष समर्थकच आहे असे मानणारे आहेत. तसेच अनेक फलज्योतिष समर्थक हे आपल्याशी सहमत नसणारा तो विरोधक असे मानणारे आहेत. हे पुस्तक फलज्योतिषाचे समर्थन करते की विरोध असाही प्रश्न काही लोकांना पडला. एखाद्या गोष्टीला समर्थन वा विरोध यो दोनच बाजू नसून चिकित्सा नावाची वेगळी बाजू पण आहे. चिकित्सा ही दोन्ही पातळयांची करावी लागते. फलज्योतिष समर्थक वा विरोधक हे आपापल्या व्यासपीठावरुन एकमेकाविरुद्ध आग्रही मतं मांडत असतात. या दोन्ही भूमिका लोकांना एकाच वेळी ऐकायला मिळाव्यात या हेतूने पहिल्या आवृत्तीचे समारंभपूर्वक प्रकाशन केले. त्यात डॉ.नरेन्द्र दाभोलकर यांनी आपला फलज्योतिष विरोधी आणि ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी आपली समर्थक भूमिका मांडली. तसेच श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची दोघांनीही उत्तरे दिली. उत्तरे पटणे वा न पटणे हा भाग निराळा. पण या निमित्ताने एक विचार प्रक्रिया तर चालू झाली. आतापर्यंत फलज्योतिष हा विषय वा ज्योतिषी ही व्यक्ती केन्द्रबिंदू धरुन विरोध वा समर्थन झाले आहे. हा विषय मुख्यत: ज्योतिषाकडे जाणारी व्यक्ती म्हणजेच जातक यांच्या करता आहे. परंतु यांना केन्द्र बिंदू मानून चिकित्सा केली जात नाही. जातक हा चिकित्सकही बनू शकतो अशी भूमिका मांडताना त्याची मानसिक जडणघडण विचारात घेतली आहे. फलज्योतिष हा श्रद्धेचा विषय झाला की चिकित्सेच्या वाटाच बंद होतात. चिकित्सेला प्रवृत्त करण्यासाठी काही तडजोड करणे ही आवश्यक असते. ती तडजोड म्हणजे जातकाला वेळोवेळी समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
फलज्योतिषातील समर्थक वा विरोधी मते यातील विविध अंतर्प्रवाह मला जवळून पहायला मिळाले. अत्यंत तटस्थ राहून मी फलज्योतिष चिकित्सा केली आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही. टीकाकार या नात्याने अंतर्विसंगती मांडायच्या झाल्या तर त्या फलज्योतिषीय परिभाषेत मांडाव्या लागतील. त्या फक्त अभ्यासकांनाच समजतील सर्वसामान्य माणूस चिकित्सेपासून पुन्हा वंचितच राहिल म्हणून तो विषय फलज्योतिषीय पातळीवर फारसा मांडला नाही. चिकित्सा करताना दोन्ही बाजू अभ्यासक या नात्याने समजावून घेताना कधी सुसंगतीतही विसंगती आढळली तर कधी विसंगतीतही सुसंगती आढळली. हेच तर मानवी स्वभावाचे वैशिष्टय आहे. मनुष्य हा काही विवेकवाद, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्यवाद यांचे प्रोग्रामिंग फीड केलेला जैवरासायनिक यंत्रमानव नव्हे. त्याला केवळ बुद्धी नाही तर भावनाही आहेत हे भान ठेवून चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने वाचकांना काही अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर