ज्योतिषासंबंधी लेख्

उपक्रमवर लेखन सुरू करून मला थोडेच दिवस झाले आहेत. या संकेतस्थळावरच्या लेखांचा दर्जा व येणारे प्रतिसाद हे खरोखरच् उच्च अभिरुचीचे असतात. या संकेतस्थळावर फेरफटका मारताना, ज्योतिषासंबंधी काही लेखन दृष्टीस पडले. ज्या विषयांना कोणतेही शास्त्रीय अधिष्ठान नाही अशा विषयावरचे लेख उपक्रमने प्रसिद्ध करू नयेत असे मला प्रामाणिकपणे वाटते. ज्योतिष हा अशा विषयांपैकीच एक आहे.
चंद्रशेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

शास्त्रीय अधिष्ठान

शास्त्रीय अधिष्ठान

ज्या विषयांना कोणतेही शास्त्रीय अधिष्ठान नाही अशा विषयावरचे लेख उपक्रमने प्रसिद्ध करू नयेत असे मला प्रामाणिकपणे वाटते. ज्योतिष हा अशा विषयांपैकीच एक आहे.

'ज्योतिष ह्या विषयास कोणतेही शास्त्रीय अधिष्ठान नाही' असे आत्तापर्यंत कोणीही शास्त्रज्ञ ठामपणे - शास्त्रीय दृष्ट्या - सर्वमान्य पद्धतीचे निकष लावून - सिद्ध करू शकलेला नाही. तथापि उपक्रमावर ज्योतिष विषयावरील लेख येत रहावेत असे माझे मत आहे. ते वाचणे आपणांस रुचत नसल्यास आपण वाचू नयेत.

अवांतर: टाईम्स् आफ् इण्डिया ह्या वृत्तपत्रसमूहाविरुद्ध अलिकडेच एक दावा ठोकण्यात आला होता. त्यांच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणारी प्रकाशचित्रे अत्यंत गलिच्छ असतांत, ते चंगळवादाला प्रोत्साहन करणारे लेख प्रसिद्ध करतांत, त्यामुळे लहान मुलांवर अयोग्य संस्कार होतात असा वाद घालण्यात आला होता. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वरील सर्व दावे खोडून काढत, 'जर आपणांस तसे वाटत असेल तर आपण त्वरीत ते वृत्तपत्र वाचणे थांबवावे' असे वादींना सुनाविले होते.

तात्पर्यः आपणांस काय वाचावयाचे आहे अथवा काय वाचणे टाळावयाचे आहे, तेवढेच आपण ठरवावे.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

उत्तर योग्यच

आपले उत्तर योग्यच आहे. या लिखाणाचा रोख फलज्योतिषावर असला तरी गेल्या काही महिन्यातील ज्योतिषावरील जे काही विचार व्यक्त केले गेले त्यात बरेचसे लेखन नाडीग्रंथांवरच झालेले आहे.त्यामुळे मला यात लिहायला रस आहे. पण जोवर नाडी हा शब्द येत नाही तोवर ऊगाच लेखणी चालवण्यात अर्थ नाही.
नाडी ग्रंथ हे निव्वळ फलज्योतिषाच्या आधाराने केलेले कथन असावे असा पक्का निष्कर्ष काढता येत नाही. मात्र अनुमान, तर्क, वारंवार परीक्षण आदि वैज्ञानिक आधार मानून फलज्योतिषाची जशी खिल्ली उडवता येते तशी नाडी ग्रंथांची उडवायला तरी शोध कार्य करायला कोणी पुढे का येत नाहीत. हा प्रश्न पडतो.
शिवाय बी. प्रेमानंद यांच्या इंडिया स्केप्टिक मधील विचारांवर नाडी केंद्र संचालक श्री.ईश्वरन यांच्या उत्तरावर कोणी विचार व्यक्त करू शकेल का? असा ही प्रश्न आपल्या सारख्यांनी विचारावा असे सुचवावेसे वाटते.

प्रश्न कुंडली

मी प्रश्न कुंडली मांडली.. असा निर्णय होणे शक्य दिसत नाही. :)
(ह. घ्या. )

अमान्य

ज्या विषयांना कोणतेही शास्त्रीय अधिष्ठान नाही अशा विषयावरचे लेख उपक्रमने प्रसिद्ध करू नयेत असे मला प्रामाणिकपणे वाटते. ज्योतिष हा अशा विषयांपैकीच एक आहे.

लेख प्रसिद्ध करु नये हे अमान्य. अधिक माहिती साठी http://mr.upakram.org/node/1065
प्रकाश घाटपांडे

अमान्य

विषय नियंत्रण अमान्य.

ज्योतिषांचे म्हणणे असे

ज्योतिषांचे म्हणणे असे की य ज्ञानाला शास्त्रीय अधिष्ठान आहे. या बाबत प्रकाशकाकांनी उपक्रम दिवाळी अंकात छान लेख लिहिला आहे. अवश्य वाचा.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उपक्रमचे धोरण...

कविता,कथा,कादंबरी,ललितलेखन,प्रवासवर्णन,सोडून उपक्रमवर कोणत्याही विषयाला बंदी नसावी असे एक उपक्रमी म्हणून वाटते!(उपक्रमचे वेगळेपण आपण नै जपणार तर कोण जपणार )
उलट 'उपक्रमने' सर्व ज्योतिषांना एकत्र आणून भविष्य,फल, याविषयी सतत चर्चा घडवून आणल्या पाहिजे असे वाटते. काय निवडायचे ते वाचक आणि उपक्रमी ठरवतील नै का ?

अर्थात आपल्या वाटण्याला काय किम्मत आहे म्हणा, उपक्रमचे मालक आणि संपादक जे ठरवतील तेच इथे होइल :(

-दिलीप बिरुटे
(उपक्रमच्या धोरणांचा आदर करणारा उपक्रमी)

थोडे अवांतर

अर्थात आपल्या वाटण्याला काय किम्मत आहे म्हणा, उपक्रमचे मालक आणि संपादक जे ठरवतील तेच इथे होइल :(

मला वाटते अशी वाक्ये चर्चेला विषयांतराचे वळण देतात त्यामुळे शक्यतो अशी वाक्ये टाळण्याकडे कल असावा. मराठी संकेतस्थळांवर काय होते हे सर्वांनाच माहीत असते. (झमझम बारच्या धर्तीवर) आम्हीही एका संकेतस्थळाचे संपादक म्हणून काम पाहिले आहे आणि तिथे दुनियादारी शिकलो आहोत. हवे असल्यास माहितीपूर्ण लेखमाला लिहीन.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वोक्के !

मला वाटते अशी वाक्ये चर्चेला विषयांतराचे वळण देतात त्यामुळे शक्यतो अशी वाक्ये टाळण्याकडे कल असावा.

सहमत आहे ! यापुढे काळजी घेईन !

(झमझम बारच्या धर्तीवर) आम्हीही एका संकेतस्थळाचे संपादक म्हणून काम पाहिले आहे आणि तिथे दुनियादारी शिकलो आहोत. हवे असल्यास माहितीपूर्ण लेखमाला लिहीन.

मला वाटते अशी वाक्ये चर्चेला विषयांतराचे वळण देतात त्यामुळे शक्यतो अशी वाक्ये टाळण्याकडे कल असावा.

-दिलीप बिरुटे
(आज्ञाधारक)

धन्यवाद

मीसुद्धा काळजी घेईन


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझे मत

काही ज्योतिषांची काही भाकिते खरी ठरतात हा अनुभव बर्‍याच लोकांना आला आहे म्हणूनच ज्योतिष हे थोतांड आहे असे सर्व विज्ञाननिष्ठ सांगत असतानाही लोकांचा ज्योतिषावर विश्वास आहे. किती टक्के ज्योतिषांची किती टक्के भाकिते खरी ठरतात यावर ज्योतिषात खरे आहे की नाही ठरत नाही. अगदी एका ज्योतिषाचे एक भाकित खरे ठरले तरी ते का खरे ठरले यावर संशोधन आवश्यक आहे. सूर्य, चंद्र, राहू, केतू ग्रह नाहीत, वक्री - मार्गी केवळ दृष्टीभ्रम आहेत हे सर्व मान्य. मग भाकिते खरे ठरतात याची कारणे संशोधन करून काढावी लागतील. कुठल्याही शास्त्रात पहिल्याने ऑब्जर्वेशन आणि मग थिअरी अशीच वाटचाल असते. ज्योतिषाची थिअरी आज चूक असेल तर उद्या बदलेल. पण जी भाकिते खरी ठरतात ती केवळ काकतालीय न्यायाने खरी ठरतात असे कुठलेही संशोधन न करता म्हणणे हा बौद्धिक अप्रामाणिकपणा आहे.

विनायक

कोणती भाकिते ?

>>भाकिते खरे ठरतात याची कारणे संशोधन करून काढावी लागतील.

उदाहरणार्थ कोणती भाकिते खरी ठरली आहेत ? आणि अशी भाकिते कधी कोणी केली होती ?

>>पण जी भाकिते खरी ठरतात ती केवळ काकतालीय न्यायाने खरी ठरतात असे कुठलेही संशोधन न करता म्हणणे हा बौद्धिक अप्रामाणिकपणा आहे.

वरील वाक्याचा मराठीत अर्थ सांगाल काय ?

-दिलीप बिरुटे
(अडाणी)

काकतालीय न्याय

काकतालीय न्यायः म्हणजे कावळा बसणे आणि फांदी तुटणे. (योगायोग)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्वतःचे एक - दोन अनुभव

आहेत. सवडीने सविस्तर लिहीन.

विनायक

सार्वत्रिक अनुभव

>>स्वतःचे एक - दोन अनुभव
कृपया सार्वत्रिक अनुभव आणि त्यापूर्वीची भाकिते सांगा !
आपले अनुभवातील सत्य तपासणे अवघड जाईल. आपल्यावर आणि आपल्या अनुभवावर विश्वास कोण ठेवेल नाही का ?

अवांतर : 'नास्त्रेदेमस की आश्चर्यजनक भविष्यवाणिया' पुस्तक तो पर्यंत शोधून ठेवतो !

-दिलीप बिरुटे

ऑब्जर्वेशन आणि मग थिअरी

>>>कुठल्याही शास्त्रात पहिल्याने ऑब्जर्वेशन आणि मग थिअरी अशीच वाटचाल असते
नम्र नकार.
कित्येक शास्त्रे ही देव वाणी किंवा साक्शात्कार वगेरे सदराखाली येतात.
उदा. सुर्य सिद्धांत : सुर्याने अरुणास सांगितला.

अचुक भविष्यकथन

ज्या विषयांना कोणतेही शास्त्रीय अधिष्ठान नाही अशा विषयावरचे लेख उपक्रमने प्रसिद्ध करू नयेत

शास्त्रीय अधिष्ठान आहे की नाही त्या बाबत फारशी कल्पना नाही पण अनेकांना अचुक भविष्यकथनाबाबत अनुभूती आलेली आहे. उदा. मला आठवते, शिशिरातील गुलाब ह्या आत्मचरित्रात मा. न्या. मोहम्मद करीम छागला ह्यांनी असे लिहिलेले आहे की एकदा ते ज्या विमानातून प्रवास करीत होते त्याच विमानातून इंदिरा गांधी प्रवास करीत होत्या. आसपासच्या सर्व प्रवाश्यांना इंदिराजींच्या बाबतीत कुतुहल होते. इंदिराजींनी चहा पिऊन झाल्यावर एक सहप्रवासिनी त्यांच्या जवळ येऊन म्हणाली की मी आपल्या चहाच्या कपात डोकावून पाहू का? त्यांनी हो म्हटल्यावर त्या महिलेने चहाच्या कपातील अवशिष्ट पाहिले आणि म्हणाली की आपला वध आपल्याच सुरक्षा रक्षकाकडून होईल व तसेच घडले.

मात्र उपक्रमावर काय प्रसिद्ध व्हावे आणि काय होऊ नये हा विषय माझ्या कार्यकक्षेच्या, तर्कज्ञानाच्या आणि आकलनाच्या पलिकडचा आहे. त्या विषयी न बोललेलेच बरे.

--------------------------X--X-------------------------------
सिंह एकटाच प्रतिसाद देतो. डुकरे मात्र त्या प्रतिसादावर कळपाने टीका करतात. महानवल : एका झोपडपट्टी संकेतस्थळावर केवळ डुकरेच प्रतिसाद देतात.

राजीव गांधीही

ह्यांच्या हत्येनंतर टी एन् शेषन यांना वारंवार कोर्टात साक्शी पुराव्याकरता बोलावले होते.
कारण? त्यांनी त्यांना सांगितले होते, अमुक अमुक ग्रह स्थिती आहे, तिकडे गेलात तर "परत येणार नाहीत".

ह्या विषयी

काही सविस्तर सांगता येईल का? काही दुवे देता येतील का? तुम्ही फार वेगळी / चांगली माहिती दिलेली आहे.

--------------------------X--X-------------------------------
अरे मानसा मानसा, तुझी नियत बेकार |
तुझ्याहून बरं, गोठ्यातलं जनावर ||
मतलबासाठी मान मानुस डोलये |
इनामाच्यासाठी कुत्रा शेपुट हालये ||

+१

अनुमोदन..
ज्योतिष-विषयावरील लेख उपक्रमासारख्या स्थळावर नसावेत असे वाटते.

:) ज्योतिष हे शास्त्र आहे की नाहि हे सिद्ध होईपर्यंत.. (म्हणजे तेव्हा आपण नसुच) चर्चा प्रस्ताव स्वीकारण्यास हरकत नसावी..

(अजूनही आशावादी) ऋषिकेश
------------------
आपले ते टंकनदोष दुसर्‍याच्या त्या प्राथमिक चुका

या विषयातला आपला अभ्यास?

आपले मत रसपूर्ण आहे.

या संकेतस्थळावरच्या लेखांचा दर्जा व येणारे प्रतिसाद हे खरोखरच् उच्च अभिरुचीचे असतात.
खरे आहेत तरीही आमच्या सारखे लोक अनेकदा गोंधळ घालतात असे वाटते. पण आता काय करणार? आम्ही पडलोच तसे!

या संकेतस्थळावर फेरफटका मारताना, ज्योतिषासंबंधी काही लेखन दृष्टीस पडले. ज्या विषयांना कोणतेही शास्त्रीय अधिष्ठान नाही अशा विषयावरचे लेख उपक्रमने प्रसिद्ध करू नयेत असे मला प्रामाणिकपणे वाटते.
आपला प्रामाणिकपणा आवडला. परंतु, असा निर्णय का घ्यावा बॉ?

असो,
असा निर्णय घेण्यासंबंधी आपले मत आपण दिलेत, पण तत्पूर्वी आपण आपला ज्योतिष विषयक अभ्यास येथे दिला असता, आणि त्या विषयाची मीमांसा केली असती तर, जास्त संयुक्तिक झाले असते असे वाटते.

आमचे घाटपांडेसाहेब यांनी आयुष्यभर म्हणजे किमान गेली ५० वर्षे या विषयाचा तौलानिक अभ्यास केला आहे. त्यांची मते परखड आणि अनेकदा ज्योतिष्यांना अप्रिय आहेत. परंतु ते ही अशा विषयावरचे लेख उपक्रमाने प्रसिद्धच करू नयेत असे म्हणत नाहीत, तर चर्चेचे स्वागत करतात!

माझ्या पुरते, मी म्हणेन की एखादी गोष्ट पूर्ण माहिती नसेल तर मी त्याला विरोध का करावा?

एक आवांतर कल्पना/विचार - ज्युल व्हर्न नावाचा एक (आता! वैज्ञानिक लेखक म्हणून मान्यता मिळालेला) लेखक चंद्रावर जाण्याच्या गोष्टी लिहित होता तेंव्हा त्याला कुठे काय शास्त्रीय अधिष्ठान होते? परंतु शास्त्रीय अधिष्ठान नसतांनाही कल्पना मांडली गेली, सुमारे शंभर दिडशे वर्षात मानव खरोखर चंद्रावर गेलाही. मग ती कल्पना मांडायलाच विरोध केला असता तर?

यापुढे जावून मी म्हणेन की, शास्त्रीय अधिष्ठान ही कल्पना म्हणजे काय यावरच एक चर्चा होवू शकेल.
(अति आवांतर : ज्युल व्हर्न च्या पत्रीकेत शुक्र, चंद्र आणि बुध उत्तम संबंधात असले पाहिजेत यात शंका नाही!)

ज्या क्षणी नव्या (किंवा जुन्याही!) कल्पनांना अनेकवीध निकषांवर, दीर्घकालापर्यंत तपासून पाहण्याआधीच नाकारल्या जातात, तेंव्हाच वैज्ञानिक विचार संपलेला असतो आणि सनातनी मनोवृत्तीच्या, नारळीकर विचाराच्या जन्माची सुरवात झालेली असते काय?

आपला
गुंडोपंत

विरंगुळा

विषय समजात नसल्यास त्या विषयाकडे थोडावेळ विरंगुळा म्हणुन बघीतल्यास, ह्या विषयाकडे शास्त्र का म्हणावे ह्याचा अभ्यास करायला मदत होईल.

दूरसंच्यावरच्या प्रत्येक मराठी वाहिनी वर ज्योतिषशास्त्र विषयाचे कार्यक्रम असतात. ते बंद करण्याचा कोणी प्रस्ताव ठेवला आहे का? ते बंद न होता.. त्या कार्यक्रमांचा उपयोग ... वाहिनी नंबर १ साठी मोठ्याप्रमाणात केलाजातो.

टी व्ही वरचे भविष्यविषयक कार्यक्रम

या कार्यक्रमांपेक्षा हिन्दी 'सोप्स' मालिका सुद्धा जास्त बर्‍या असाव्यात.
जगातील सर्व माणसांचे १२ भाग करून त्याना निरनिराळे गुणधर्म चिकटविण्याचा हा उद्योग, तो करणार्‍यांचे बुद्धिवैभव दाखवतो यात शंकाच नाही.
एक प्रामाणिक शंका.
माणसांप्रमाणे कुत्री, मांजरे, गायी, म्हशी व घोडे यांनाही रास असते का हो?
चन्द्रशेखर

जन्मणार्‍या

मला माहित असलेले प्रामाणिक उत्तर

जन्मणार्‍या प्रत्येकाला जसे जन्मस्थान असते तसेच त्याला रासही असते.
ही रास जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल त्यानुसार ठरते.

आपला
गुंडोपंत

रास

चंद्र ज्या राशीत असेल
म्हणजे काय? चंद्र आहे तिथेच असतो. तो फक्त पृथ्वी आणि स्वतः भोवती एका ठराविक कक्षेत फिरत रहातो.
चन्द्रशेखर

हीच शंका

हा हा... हीच शन्का मलाही आहे. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रास कशी ठरते?

समजा आपल्या घराच्या खिडकीच्या काचेवर एक माशी वेगवेगळ्या जागी बसत आहे आणि आपण स्वतः खोलीमधील वेगवेगळ्या जागेवरून तिच्याकडे पाहिले तर ती कधी आपल्याला दूरवरच्या एकद्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर दिसेल तर केंव्हा एकाद्या देवळाच्या किंवा शाळेच्या इमारतीवर दिसेल. दूरवर असलेले तारे ही अशीच एक पार्श्वभूमी आहे आणि आपल्या जवळ असलेल्या चंद्राला आपण त्या पार्श्वभूमीवर पाहतो. संपूर्ण आकाशाचे बारा भाग करून त्यातील तारकांच्या समूहांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. त्यांना राशी म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र तिच्याभोवती फिरतो यामुळे तो वेगवेगळ्या तारकांच्या सान्निध्यात दिसतो. यालाच तो अमक्या किंवा तमक्या राशीत आहे असे समजले जाते. कोणाही जीवाचा जन्म ज्या क्षणी होतो त्या क्षणी ज्या राशीत चंद्र असेल ती त्याची रास असे आपल्याकडे समजतात. पश्चिमेकडे (युरोपात) कोणाचीही रास सूर्याच्या स्थानावरून समजली जाते.

हे विश्लेषण उमजत नसल्यास

समजा आपल्या घराच्या खिडकीच्या काचेवर एक माशी वेगवेगळ्या जागी बसत आहे आणि आपण स्वतः खोलीमधील वेगवेगळ्या जागेवरून तिच्याकडे पाहिले तर ती कधी आपल्याला दूरवरच्या एकद्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर दिसेल तर केंव्हा एकाद्या देवळाच्या किंवा शाळेच्या इमारतीवर दिसेल. दूरवर असलेले तारे ही अशीच एक पार्श्वभूमी आहे आणि आपल्या जवळ असलेल्या चंद्राला आपण त्या पार्श्वभूमीवर पाहतो. संपूर्ण आकाशाचे बारा भाग करून त्यातील तारकांच्या समूहांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. त्यांना राशी म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र तिच्याभोवती फिरतो यामुळे तो वेगवेगळ्या तारकांच्या सान्निध्यात दिसतो. यालाच तो अमक्या किंवा तमक्या राशीत आहे असे समजले जाते. कोणाही जीवाचा जन्म ज्या क्षणी होतो त्या क्षणी ज्या राशीत चंद्र असेल ती त्याची रास असे आपल्याकडे समजतात. पश्चिमेकडे (युरोपात) कोणाचीही रास सूर्याच्या स्थानावरून समजली जाते.

हे विश्लेषण उमजत नसल्यास स्टेल्लारियम् हे साफ्ट्वियर् डौन्लोड् करावे आणि वापरून घ्यावे. वरील विश्लेषण उमजण्यास नक्की उपयोग होईल.

Stellarium is planetarium software that shows exactly what you see when you look up at the stars. It's easy to use, and free.
www.stellarium.org/ -

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

रास कशी ठरते

म्हणजे मी निळ्या पडद्यासमोर माझा फोटो काढला की मी निळ्या पडद्याचा
मी लाल पडद्यासमोर माझा फोटो काढला की मी लाल पडद्याचा.
वर्गीकरणाची अजबच रीत आहे.
चन्द्रशेखर

बघणार्‍याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे

म्हणजे मी निळ्या पडद्यासमोर माझा फोटो काढला की मी निळ्या पडद्याचा
मी लाल पडद्यासमोर माझा फोटो काढला की मी लाल पडद्याचा.
वर्गीकरणाची अजबच रीत आहे.

निरीक्षकाच्या दृष्टिकोनातून निरीक्षण केल्या जाणार्‍या वस्तूची (अथवा व्यक्तीची) पार्श्वभूमी कशी दिसते अशा अर्थाने ("पत्ता देण्याच्या भूमिकेतून"), विशेषतः अशा पार्श्वभूमीत काळाच्या दृष्टिकोनातून बर्‍यापैकी स्थैर्य असेल (दीर्घ काळात, विशेषतः निरीक्षकाच्या आणि/किंवा निरीक्षकाच्या मागीलपुढील काही किंवा अनेक पिढ्यांच्या हयातीच्या काळात होणारे पार्श्वभूमीतील बदल पार्श्वभूमीचे वर्णन करण्याच्या दृष्टीने खूप मोठे नसतील) आणि पार्श्वभूमीत दीर्घकाळात होणारे सूक्ष्म बदलसुद्धा निरीक्षकाच्या नियंत्रणातील नसतील, तर केवळ एक वर्गीकरण म्हणून यात काही गैर नसावे.

मात्र त्यापुढे जाऊन या वर्गीकरणाच्या आधारावर जर काही गुणधर्म, वैशिष्ट्ये अथवा भाकिते यांचा संबंध अशा वर्गीकृत वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी जोडला जात असेल, तर असे गुणधर्म, वैशिष्ट्ये अथवा भाकिते आणि असे वर्गीकरण यांचा निश्चित संबंध काय, आणि असावा असे वाटल्यास त्यामागील निश्चित प्रक्रिया काय असावी, हे खोलात शिरून तपासल्याशिवाय असा संबंध आपोआप ग्राह्य मानता येऊ नये.

समांतर उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या गावात एखादा एकमेव उंच मनोरा (किंवा डोंगर/तलाव/कोणतीही निश्चितपणे सांगता येण्यासारखी पत्त्याची खूण) पिढ्यान् पिढ्यांपासून असेल, आणि आजवर तो मनोरा पाडण्याच्या (किंवा डोंगर भुईसपाट करण्याच्या/तलाव बुजवण्याच्या/पत्त्याची खूण नष्ट करण्याच्या) भरीला कोणी पडले नसेल आणि नजीकच्या भविष्यकाळातही असे कोणी काही करण्याची शक्यता दिसत नसेल, तर 'त्या मनोर्‍याच्या समोर (अथवा डोंगराच्या पायथ्याशी अथवा तलावाच्या काठाजवळ अथवा खुणेच्या ठिकाणाजवळ) असलेले घर' हा एक पत्ता म्हणून वैध ठरू शकतो, आणि 'मनोर्‍याच्या समोर (अथवा डोंगराच्या पायथ्याशी अथवा तलावाच्या काठाजवळ अथवा खुणेच्या ठिकाणाजवळ) असलेली घरे आणि अशा घरांत राहणारी माणसे' हे एक वैध वर्गीकरण (उदा. विभागविकासाच्या दृष्टीने) होऊ शकते.

मात्र अशा वर्गीकरणावरून अशा वर्गीकृत घरांबद्दल अथवा व्यक्तींबद्दल अशा वर्गीकरणाच्या आधारे काही सामायिक निष्कर्ष काढले जात असतील, तर असे निष्कर्ष आणि असे वर्गीकरण यांचा काही निश्चित संबंध आहे काय, हे खोलात शिरून तपासून पाहणे इष्ट ठरते. वरील उदाहरणांतील मनोर्‍यापासून जवळात जवळची शाळा जर शंभर मैलांवर असेल आणि दळणवळणाची सोय नसेल, तर '(सोयिस्कर अंतरावर असलेल्या शाळेच्या आणि दळणवळणाच्या सोयीच्या अभावी) मनोर्‍यासमोर असणार्‍या घरांतील व्यक्ती शाळेत जात नाहीत' हा निष्कर्ष कदाचित योग्य ठरू शकेल. (सोयिस्कर अंतरावर नवीन शाळा उघडल्यास अथवा दळणवळणाच्या सोयी निर्माण झाल्यास हे चित्र बदलूही शकेल.) मात्र 'मनोर्‍यासमोरील घरांतील व्यक्ती शिक्षणाबद्दल उदासीन असतात' हा निष्कर्ष बहुधा योग्य ठरणार नाही. किंवा 'डोंगराच्या पायथ्याशी राहणार्‍या व्यक्ती सदैव खाकी कपडे परिधान करतात' हा निष्कर्ष 'डोंगराच्या पायथ्याशी असणारी घरे ही तूर्तास केवळ युद्धकालीन संग्रामतत्पर लष्करी छावणीसाठी राखीव असून सामान्य नागरिकांस अथवा सैनिकांच्या कुटुंबियांससुद्धा सध्या तेथे प्रवेशबंदी आहे' अशा स्वरूपाची काही आवश्यक अधिक माहिती असल्याशिवाय आपोआप ग्राह्य ठरणार नाही. 'तलावाच्या काठी राहणारे बहुतांश लोक वेडे असतात' हा निष्कर्ष 'तो परिसर मनोरुग्णालयाच्या आवाराने व्यापलेला आहे' या किंवा अशासारखी काही माहिती हाताशी असल्याखेरीज आपोआप मानता येणार नाही.

फोटोसाठी लाल अथवा निळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवरून केलेले वर्गीकरण हे केवळ वर्गीकरण म्हणूनसुद्धा कदाचित ग्राह्य मानता येऊ नये. याची ढोबळमानाने दोन कारणे देता येतील. (१) पार्श्वभूमीचा पडदा हा दीर्घ मुदतीसाठी कायम नसून निरीक्षकाच्या अथवा फोटोनायकाच्या हयातीतच (बहुधा फोटो काढण्याचे काम झाल्यानंतर) ती पार्श्वभूमी न टिकणे, आणि (२) पडदा कोणत्या रंगाचा निवडावा यावर कोणाचे तरी नियंत्रण असणे. (या दुसर्‍या कारणाच्या औचित्याबाबत मात्र थोडा साशंक आहे.)

मात्र 'फोटोनायक ज्या कालावधीत फोटो काढण्यासाठी उभा होता त्याच कालावधीत फोटो काढण्यासाठी लाल (अथवा निळ्या) पडद्यासमोर उभी असलेली माणसे' हे वर्गीकरण (for whatever it is worth) वैध ठरावे. तसेच फोटोनायकांऐवजी फोटोंचे वर्गीकरण 'लाल (अथवा निळ्या) रंगाची पार्श्वभूमी घेऊन काढलेली छायाचित्रे' असे करायचे झाल्यास असे वर्गीकरण हे केवळ वैधच नव्हे, तर छायाचित्रणकलेच्या अभ्यासाच्या अथवा छायाचित्रकारांच्या दृष्टिकोनातून कदाचित उपयुक्तही ठरावे.

लालनिळ्या पडद्यांचा विषय थोडा पुढे न्यायचा झाल्यास, लाल आणि निळ्या रंगांचे पडदे काटकोनात उभे करून त्यामध्ये एखाद्या व्यक्तीस उभे करून दोन छायाचित्रकारांनी एकाच वेळी (एकाने लाल पडद्यासमोर तर दुसर्‍याने निळ्या पडद्यासमोर उभे राहून) त्याचा फोटो काढल्यास, अशा फोटोनायकाचे वर्गीकरण त्या क्षणी फोटो काढण्यास उभ्या राहिलेल्या व्यक्तींमधील 'लाल पडद्याची व्यक्ती' आणि 'निळ्या पडद्याची व्यक्ती' असे दोन्ही पद्धतींनी करता येईल. मात्र वर्गीकरणातील असा फरक हा निरीक्षकाच्या (या ठिकाणी कदाचित छायाचित्रकाराच्या) संदर्भचौकटीवर अवलंबून असून, अशा संदर्भचौकटींचा अभ्यास करून त्यांचे गणित मांडून अशा फरकांचे स्पष्टीकरण देता यावे.

सकाळमधले एक पत्र....

पुण्यात विधीलिखित भविष्य नावाने एक गृहस्थ बर्‍याचदा राजकीय पुढार्‍यांचा, ज्यांना लाभ झाला अशा लोकांचा हवाला देऊन आमच्याकडे या अशा जाहिराती छापत असतात. तर त्या पत्रात ह्या गृहस्थाने सांगितल्यानुसार बर्‍याच जणांचे भविष्य बरोबर येत नाही, चुकते व लोकांची फसवणूक चालली आहे, सावध रहावे असे पत्र वाचून बरीच करमणूक झाली होती. ते आठवले. :-)
पुण्यात वास्तव्याला असणार्‍यांना प्रस्तुत भविष्यवाल्याचे नाव आठवत असेलच. :-)

-सौरभ.

==================

उत्तम विनोदी साहित्य

भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी हा उद्देश आहे.
वर्तमानपत्रातले भविष्यविषयक स्तंभ माझ्या मते उत्कृष्ट विनोदाचे प्रकार असतात.

निव्वळ थापेबाजी चे शास्र.

चित्रलेखाच्या गेल्या महिन्याभरापूर्वीच्या अंकात पूण्या मुंबईचे प्राख्यात जोतिषतज्ज्ञ (प्रश्नार्थक) जमा करून पंतप्रधान कोण होणार व कोणत्या पक्षाचे कसे भवितव्य आहे यावर स्पेशल सविस्तर रिपोर्ट छापून आला होता. चित्रलेखाच्या पूरोगामीपणाचा अभिमान बाळगणाऱयांचा तेव्हा चांगलाच भ्रमनिरास झाला होता. पण म्हटले पाहू काय होते ते. आज तो लेख व सर्व ज्योतिषी विनोदाचा एक उत्तम नमुना ठऱले आहेत. अर्थात झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून यावर कुठेच चर्चा झाली नाही. कारण ते ज्योतिषशास्राच्या भविष्याच्या दृष्टीने धोकादायक होते. माझ्या मते ज्योतिष शास्र म्हणजे पोटभरू थापेबाजीचा, कमकुवत मानसिकतेचा फायदा घेणाऱया प्रकाराचा एक उत्तम अशास्रीय नमुना आहे. आणि याचे समर्थन करणाऱया महाभागांची गिरे तो भी टांग उप्पर अशी वागणूक असते. नमुना दाखल सांगतो माझे भविष्य एका वर्तमानपत्रात नशीबवान ठराल असे आहे. माझा नेमका त्या दिवशी अपघात होतो आणि एक हात फॅक्चर होतो. बघा नशीबवान ठरलात म्हणून बचावलात. जीवावर आले ते हातावर निभावले. आता बोला...

१९९१

अशीच अजून एक आठवण.
१९९१ च्या मे महिन्यात भारतात निवडणुका सुरू होत्या. त्या सुमारास लोकप्रभाने एक विशेषांक काढला होता. निवडणुकीच्या निकालाविषयी अनेक ज्योतिष्यांनी भाकिकते केली होती. त्या निवडणुकीत राजीव गांधी हे प्रमुख उमेदवारांपैकी एक होते. काँग्रेस गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्याच्या मागे होती. तर भाजप अडवाणींच्या रथयात्रेच्या गरमीमध्ये होती.

गंमतीची गोष्ट म्हणजे राजीव गांधी निवडणूक काळात मरण पावले. पण् याचे भाकीत एकाही ज्योतिषाला करता आले नव्हते.

मुख्य मुद्दा

फलज्योतिष खरे ठरते की नाही हा या चर्चेचा विषय नसून त्यासंबंधीचे लेख उपक्रमावर असावेत की नकोत आणि ते कां हा आहे. सपादक मंडळींनी याबद्दल खुलासा करावा अशी अपेक्षा होती.

अपेक्षाभंग ! :)

सपादक मंडळींनी याबद्दल खुलासा करावा अशी अपेक्षा होती.

सहमत आहे.
मलाही मालक किंवा संपादककडून काही खुलासा येईल असे वाटले होते ! :)

-दिलीप बिरुटे

मला वाटते

उपक्रम हे इतर मराठी संकेतस्थळांप्रमाणेच खाजगी मालकीचे संकेतस्थळ आहे तेथे मालक (किंवा संपादक) उत्तरे द्यायला बांधील असतातच असे नाही असे वाटते.

मलाही मालक किंवा संपादककडून काही खुलासा येईल असे वाटले होते ! :)

असे वाटण्याचे कारण काय आहे हे कळाल्यास बरे होईल. कोणत्या संकेतस्थळावर तुम्हाला असा अनुभव आला आहे हे जाणण्यास उत्सुक आहे. आमच्या समृद्ध जालानुभवात आम्हाला उपक्रमावर बरे अनुभव येत आहेत. काही संकेतस्थळांचे व तेथील मालक/संपादकांचे अनुभव सांगितले तर तुम्हाला अधिकच आश्चर्य वाटेल याची खात्री आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लेख असावेत की नसावेत

उपक्रमाचे मुखपृष्ठ पाहिले तर ज्योतिषशास्त्र हा धोंडोपंतांनी सुरु केलेला समुदाय स्पष्ट दिसून येईल. समुदायाची मान्यता उपक्रमपंत स्वतः देतात असे वाटते. तेव्हा ज्योतिष हा विषय उपक्रमाला वर्ज्य नसावा. यापूर्वीही उपक्रमावर ज्योतिषविषयक लेख येऊन गेलेले आहेत त्यामुळे असे लेख असावेत का नसावेत हा वादाचा मुद्दा असण्याचे काही कारण नसावे.

या खुलाशासाठी संपादक किंवा उपक्रमाचे चालक यांची गरज नाही असे वाटते. उपक्रमाच्या सर्वसाधारण सभासदांनाही हे लेख आणि समुदाय सहज शोधल्यास मिळण्यासारखे आहे.

तरीही, असे लेख उपक्रमावर नसावेत असे ज्यांना वाटते त्यांनी उपक्रम या आयडीवर लिहून कळवणे अधिक इष्ट वाटते.

असो.

 
^ वर