एकदा काय झालं...

नाव : कॅपुसिन, वय वर्षे चार फक्त, देश फ्रान्स.

व्यवसाय : गोष्टी सांगणे.

विश्वास बसत नाही, उभाच रहातो. कॅपुसिनचा गोष्टीचा व्हिडीओ आंतरजालावर बराच लोकप्रिय झाला आहे. हे पाहून तिच्या आईने, अ‍ॅनने, ही लोकप्रियता चांगल्या कामासाठी वापरायचे ठरवले. ती म्हणते, " मी कॅपुसिनची लोकप्रियता चांगल्या कामासाठी वापरायची ठरवली. आणि काही चांगल्या लोकांच्या मदतीने मंगोलियातील मुलांसाठी पैसे जमवण्याची Edurelief ही योजना उभी राहीली. हे पैसे मंगोलियन मुलांसाठी पुस्तके घ्यायला उपयोगी पडतील." यासाठी त्यांनी टी-शर्ट, बटणे, चुंबके आणि पोष्टकार्डही बनवली आहेत.

कॅपुसिनची गोष्ट ऐकताना भंजाळून जायला होते. पठ्ठी एकदम नॅचरल आहे. गोष्टीत सलीम-जावेदला चक्कर येईल इतका मसाला आहे. माकडांची पिल्लं, वाघ, बाळं खाणारी मगर, जादूची अ‍ॅलर्जी असणारा हिपोपोटॅमस, चेटकीण. कॅपुसिनच्या चिमुकल्या डोक्यात हे सर्व कुठून आले तिलाच माहीत. आणि ती मोठ्ठे मोठ्ठे डोळे करून जेव्हा गोष्ट रंगवून सांगते तेव्हा आपण गोष्टीतील संगती लावणे सोडून तिचे लाघवी हावभाव बघत रहातो.

Once upon a time... from Capucha on Vimeo.

अश्या ह्या कॅपुसिनला साक्षात दंडवत.

Comments

गोग्गोड

ह्या गोग्गोड मुलीने लोकांना प्रेमात पाडलं नसतं तरच नवलं
तिचा जादुच्या ऍलर्जीने कांजिण्या येण्याचा प्रकार तर एकदम चित्रदर्शी. निदान कार्टून नियमीत बघणार्‍या माझ्यासारख्यांसाठी हा प्रसंगच नाहि तर ही कथा बर्‍यापैकी समोर उभी राहीली असेल असे वाटते

राबवण्यात येत असलेला उपक्रमही मस्त! तिच्या पालकांनी सामाजिक जाणीव दाखवून तिला आताच एक आदर्श निर्माण केला आहे असं वाटतं

इतकी छान माहिती व गोष्ट सांगितल्याबद्द्ल आरागॉर्न यांना नारंगी अंगठी मिळो ही प्रार्थना :प्

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

कार्टून

कॅपुसिनच्या गोष्टीवर एकाने कार्टून बनवली आहेत. ती ही सुरेख आहेत.

Once Upon a Time from Reuno on Vimeo.

पालकांबद्दल सहमत आहे. नुसते व्हिडीओ बनवून न थांबता त्याचा इतका सुरेख उपयोग केला याचे विशेष वाटते. कॅपुसिन मोठी झाल्यावर तिला नक्कीच चांगल्या मूल्यांची साथ असेल असे वाटते.

नारंगी अंगठीबद्दल धन्यवाद. :-)

----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

जादुई

किती गोड मुलगी. तिच्या कथा 'मॅजिकल' व 'फॅन्टॅस्टिक'. गॅब्रिअल गार्शिया मार्क्वेज़ची आजी अशाच सुरम्य गोष्टी त्याला ऐकवायची. असो. ही मुलगी मोठी कांदबरीकार झाली नाही, तरी नातू मार्क्वेज़सारखा मोठा कादंबरीकार व्हावा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

रोचक

मार्क्वेजबद्दलची माहिती रोचक आहे. ही मुलगी मोठी झाल्यावर काय करते बघणे रोचक ठरावे.

----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

कित्त्ती गोड...

किती गोड आहे ती मुलगी!! तिच्या गोष्टी ऐकत रहावसं वाटतं.
तिच्या पालकांनी सुरू केलेलं कार्य पण छान आहे.

आरागॉर्न

मस्त्! धन्यु.

मस्त!

फारच गोड प्रकार आहे. काय वाट्टेल त्या गप्पा मारते आहे. फारच निरागस.

आभार

प्रतिसादाबद्दल सर्वांचे अनेक आभार.

व्हीडीओ बघताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. या मुलीच्या चेहेर्‍यावर कधीकधी काही क्षणांसाठीच मोठ्या माणसांना शोभतील असे भाव तरळून जातात. वरील व्हीडीओमध्ये तिला चिलखतसाठी शब्द आठवत नाही (१:५१) तेव्हा. आणि खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये ती चमचा बघते आणि नाक मुरडते तेव्हा. (०:१०). लहान मुलांबाबत असे क्वचितच बघायला मिळते का? की हे सर्वांच्याच बाबतीत होते?

Tongue twister from Capucha on Vimeo.

----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

आजकालची मुले

चिलखताला शब्द आठवला नाही तेव्हा तिने दिलेले हावभाव माझ्यासुद्धा लक्षात आले होते. खरं तर तिच्या बर्‍याच लकबी मोठ्यांना शोभण्यासारख्या आहेत.

मला वाटतं आज-कालची बहुतेक लहान मुलं अशी मोठ्यांसारखी वागतात. मी अनेकदा तसा अनुभव घेतला आहे. मागच्या आठवड्यात एका ४-५ वर्षे वयाच्या मुलीने मला असे काय-काय प्रश्न विचारले आणि ती अश्या पद्धतीने बोलत होती की मी आश्चर्याने तोंडात बोट घालायचेच काय ते बाकी ठेवले होते.

लहान मुलांना आजुबाजुच्या मोठ्यांचं अनुकरण करायला, त्यांच्यासारखं 'काहीतरी महत्त्वाचं' बोलायला आवडतं. त्यामुळे ते शक्य तेवढी हुबेहुब नक्कल करण्याचा प्रयत्न करत असावेत.

हम्म

लहान मुलांना आजुबाजुच्या मोठ्यांचं अनुकरण करायला, त्यांच्यासारखं 'काहीतरी महत्त्वाचं' बोलायला आवडतं. त्यामुळे ते शक्य तेवढी हुबेहुब नक्कल करण्याचा प्रयत्न करत असावेत

सहमत आहे. एकूणात पुढची पिढी अधिकाधिक चतुर होते आहे. (असे प्रत्येक पिढीत म्हणत असावेत का?) आमच्या ओळखीचे एक प्राध्यापक सहकुटूंब चार महिने इटलीला गेले होते. परत आल्यावर त्यांची मुले एकमेकांशी इटालियनमध्ये बोलत होती. आपल्या आईबाबांना हे कळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी याचा वापर एकमेकांना सीक्रेट सांगण्यासाठी सुरू केला. :-)

----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

सहमत

एकूणात पुढची पिढी अधिकाधिक चतुर होते आहे.

सहमत.. फारच चतूर/हुशार आहे ही लहानगी पिढी..यांच्याकडे पाहिलं/यांचं ऐकलं की आपण (खरंतर मी) कित्ती कित्ती बावळट्ट होतो असे वाटते ;)
पण एकदा का शाळेत घातली की ही चतुराई/शहाणपण कमी होताना दिसतं असं माझं आपलं एक (इतरांच्या मुलांकडे बघून काढलेलं ;)म्हणूनच दूरस्थ) निरिक्षण आहे

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

हेच

सहमत.. फारच चतूर/हुशार आहे ही लहानगी पिढी..यांच्याकडे पाहिलं/यांचं ऐकलं की आपण (खरंतर मी) कित्ती कित्ती बावळट्ट होतो असे वाटते ;)

अगदी असंच वाटतं...

पण एकदा का शाळेत घातली की ही चतुराई/शहाणपण कमी होते की नाही माहिती नाही पण मुले मात्र त्रासदायक होताना दिसतात असं माझं आपलं एक (इतरांच्या मुलांकडे बघून काढलेलं म्हणूनच दूरस्थ) निरिक्षण आहे ;)

हे हे

यांच्याकडे पाहिलं/यांचं ऐकलं की आपण (खरंतर मी) कित्ती कित्ती बावळट्ट होतो असे वाटते ;
मला वाटत नाही, माझी खात्री आहे की लहानपणी मी अतिमंद असल्याची शंका यावी इतका बावळट्ट होतो. :प्
या दोन पोरी इतरत्र म्हटल्याप्रमाणे गिफ्टेड आहेत पण साधारणपणे यात नेचरचा भाग किती आणि नर्चरचा भाग किती असावा?
----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

कदाचित सारखाच?

या दोन पोरी इतरत्र म्हटल्याप्रमाणे गिफ्टेड आहेत पण साधारणपणे यात नेचरचा भाग किती आणि नर्चरचा भाग किती असावा?

सारखाच असावा असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

'नेचर' असल्याशिवाय एका मर्यादेपलीकडे 'नर्चर'चा उपयोग नसावा, उलटपक्षी 'नेचर' असूनही 'नर्चर' नसणे - किंवा चुकीचे 'नर्चर' असणे - हे मारक ठरावे, असा अंदाज आहे. (पुन्हा चूभूद्याघ्या.)

(अवांतरः 'लेटिंग बी' हाही 'नर्चर'चा एक भाग असू शकतो, असे सुचवावेसे वाटते.)

मस्त!

पोरीचा पूर्ण चेहराच बोलका आहे. गोष्टही रंगवून रंगवून सांगते आहे.
आणि नवी पिढी हुषार आहे याच्याशी सहमत.

पुन्हा पुन्हा ऐकावेसे

ही कापुचिनचे कथाकथन पुन्हा पुन्हा ऐकावेसे आहे. फ्रेंच भाषेतले असल्यामुळे आणखीनच.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

नाही

>या मुलीच्या चेहेर्‍यावर कधीकधी काही क्षणांसाठीच मोठ्या माणसांना शोभतील असे भाव तरळून जातात.
यात फार वेगळे वाटले नाही. इथल्या बर्‍याच मुलांच्या चेहर्‍यावर असे भाव तरळून जाताना पाहिलेले आहेत. ते मोठेपणापेक्षा त्या वेळची नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून असतात.

कापुसकोंड्याची गोष्ट

कॅपुसिनची गोष्ट कापुसकोंड्याच्या गोश्टीसारखी आहे पण खुपच गोड.

गिफ्टेड

भलतीच गोड आहे कॅपुसिन! डोळे मोठे करत गोष्ट सांगताना तर फारच क्यूट दिसते.
हा विडियो पाहुन २ वर्षाच्या लिलीचा हा अचाट पराक्रम आठवला.

बाप रे!!

ही पण पिल्ली फारच गोड आहे. पण एवढं लक्षात कसं राहिलं तिच्या?
बरेचसे देश तर मलाही माहिती नव्हते :(

आणि तिचे आई-बाबा एखाद्या देशाचं नाव सांगतात तेव्हा ती तिच्या बोबड्या बोलीत ते पुन्हा म्हणते... ते ऐकण्यासाठी मी २-३ वेळा पाहिलं.

लिली बातम्यांत

लिली टाळ्या वाजवताना तिला किती आनंद होतो. आणखीनच गोड दिसते. ह्या दोन्ही मुली 'गिफ्टेड' आहेत.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

यामाहामा

लिली म्याडमनाही साक्षात दंडवत. आणि वय फक्त दोन वर्षे?
माझी कितीतरी देशांवर दांडी उडाली. नंतर मोजणेच सोडून दिले. :प्

----
"ज्यूलिया रॉबर्टस की मां स्पिलबर्ग को ऐसे बोल सकती है क्या?"

लीलीलाहि शिसान!

लीलीलाहि शिसान!
काय भन्नाट आहे ही मुलगी देखील... मला देखील तिला माहित असणार्‍या देशांतील ३-४ देशांचे स्थान माहित नव्हते :)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

आपले काही खरे नाही

मस्त चित्रफिती.

(या प्रगत मानवांची पिढी राज्य करती झाली की आपले काही खरे नाही राहाणार. त्या आधी आपल्या सोशल सेक्यूरिटीचे कायदे करून टाकूया!)

 
^ वर