रामायण आणि महाभारताचा काळ

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येणारा काळ कोणता या विषयी अनेक अटकळी बांधल्या जातात, बांधल्या गेल्या आहेत.

वास्तव रामायणकार प. वि. वर्तक यांच्यामते रामायणाचा काळ सुमारे इ.स.पूर्व साडे सात हजार वर्षांचा असून महाभारताचा काळ इ.स.पूर्व साडे तीन हजार वर्षांचा भरावा. (चू. भू. दे. घे.) याला छेद देणारे इतर अनेक संदर्भही सापडतील. मनोगत या संकेतस्थळावरील एका चर्चेत हे असे निष्कर्ष मांडलेले आढळतील. तर विकिपिडीयावरील या लेखात अनेक वेगवेगळे काळ मांडलेले आढळतील.

१. केवळ काळाचे, ग्रह तार्‍यांचे गणित मांडले की रामायण महाभारताचा काळ शोधता यावा का? यासाठी अधिक कोणत्या संदर्भांची आवश्यकता आहे?

२. रामायण वाल्मिकिंनी रचले असे म्हटले जाते परंतु महाभारताच्या वेळी व्यासांनी गणेशाला लेखनिकाचे काम करण्यास सुचवले. याचा अर्थ महाभारत काळी लेखनकला अवगत होती असा घ्यावा का? असल्यास हा काळ कोणता?

३. हडप्पा, मोहेंजेदारो, लोथल, ढोलवीरा येथील शहरांत कोरीव लिपी (चित्रलिपी नव्हे) किंवा रामायण, महाभारत यांतील प्रसंगांची शिल्पकामे इ. दिसत नाहीत. यावरून सदर संस्कृती रामायण-महाभारतपूर्व होत्या असे मानण्यास कितपत जागा आहे?

४. या संदर्भात आणखी पूरक वाचन कोणते? कोणा तज्ज्ञाचे संदर्भ खात्रीशीर मानता येतात?

यासर्व आणि या विषयाशी संबंधीत मुद्द्यांवर येथे चर्चा अपेक्षित आहे.

विशेष सूचना: वर्तकांच्या काळाचा संदर्भ मी वापरला असला तरी तपासलेला नाही. तो चुकीचा असू शकेल. तसे असल्यास कृपया सांभाळून घ्यावे. घरून तपासून पुन्हा देईन.

Comments

छान चर्चाविषय

छान चर्चाविषय. अभ्यासू मते वाचायला उत्सुक आहे.

>>१. केवळ काळाचे, ग्रह तार्‍यांचे गणित मांडले की रामायण महाभारताचा काळ शोधता यावा का? यासाठी अधिक कोणत्या संदर्भांची आवश्यकता आहे?<<
टिळकांनी 'आर्क्टिक होम इन वेदाज'* मध्ये ऋग्वेदातल्या ऋचांचे अर्थ लावत त्याकाळचे वातावरण, सरकते भूखंड इत्यादी वैज्ञानिक बाबी लक्षांत घेत अभ्यास केला आहे. ओरायन या ग्रंथात ग्रहतार्‍यांचे वर्णन लक्षांत घेत महाभारताचे कालमापन केले आहे. असा अभ्यास हा एक मार्ग.
*'आर्यांचे मूलवस्तीस्थान' (की अश्याच काही नावाने) या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.
--लिखाळ.

:)

रामायण वाल्मिकिंनी रचले असे म्हटले जाते परंतु महाभारताच्या वेळी व्यासांनी गणेशाला लेखनिकाचे काम करण्यास सुचवले. याचा अर्थ महाभारत काळी लेखनकला अवगत होती असा घ्यावा का? असल्यास हा काळ कोणता?

लेखनिक! अहो कुबेराच्या विमानाचं काय् मग्? :)

वेदांचा काळ ५००० वर्षा पुर्वीचा आहे असं ऐकलं होतं! तद्न्यानीं रामायण, महाभारत आणि वेद यांच्यातील साहीत्यीक संबंधांवर प्रकाश टाकल्यास वाचायाला आवडेल. :)

कुबेराचं विमान

कुबेराच्या विमानाचं काय् मग्? :)

कुबेराचं विमान गेलं उडत, ते पुन्हा पृथ्वीवर येण्याआधी आपण -

वेदांचा काळ ५००० वर्षा पुर्वीचा आहे असं ऐकलं होतं! तद्न्यानीं रामायण, महाभारत आणि वेद यांच्यातील साहीत्यीक संबंधांवर प्रकाश टाकल्यास वाचायाला आवडेल.

केवळ या विषयावर बोलू. :-)

प.वि.वर्तक

रामायणकार प. वि. वर्तक ?
चन्द्रशेखर

वास्तव रामायण

'वास्तव रामायण' या पुस्तकाचे लेखक प. वि. वर्तक.

प. वि. वर्तक

प. वि. वर्तक हे वास्तव रामायण या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांची गृहितके अनेकजण मानतात. त्यांच्या रामायण कालनिश्चितीवर हा लेख वाचता येईल.

मला त्यांची काही मते पटतात तर काही मते पटत नाहीत. काही मते हास्यास्पदही वाटतात.

'वास्तव रामायण'कार वर्तक आणि 'तेजोमहाल'वाले ओके

'वास्तव रामायण'कार प. वि. वर्तक आणि 'तेजोमहाल'वाले पु. ना. ओक ही नावे गंभीरपणे इतिहासाच्या चर्चेत कुणी घेतली मला हसू येतं. ह्याचा अर्थ ह्या दोघांचे कुठलेच मत पटण्यासारखे असू शकत नाही असा होत नाही.

ओक्के :-)

'वास्तव रामायण'कार प. वि. वर्तक आणि 'तेजोमहाल'वाले पु. ना. ओक ही नावे गंभीरपणे इतिहासाच्या चर्चेत कुणी घेतली मला हसू येतं.

तसे वर्तक अभ्यासू आहेत. जाणकारही आहेत. त्यांचे अनेक संदर्भ मी पडताळून पाहिलेले आहेत - ते योग्यही असतात. परंतु जेथे जेथे ते आपले निष्कर्ष मांडू लागतात तेव्हा हास्यास्पद प्रकाराला सुरुवात होते असा माझाही अनुभव आहे.

उदा. पेरु हा देश भारताच्या पूर्वेला आहे असे त्यांचे मत, तसे असल्यास अमेरिकाही पौर्वात्य आणि भारत पश्चिमात्य गणता यावा. शेवटी पृथ्वी गोल आहे. :-)

पुलंपेक्षाही विनोदी

हे दोघे पुलंपेक्षाही विनोदी लेखक असावेत. पुलंची पुस्तके वाचून हसू येते तर इथे काहींना ओक किंवा वर्तक यांची पुस्तके न वाचताच हसू येते. हा बहुधा ओक किंवा वर्तक या विशिष्ट समाजी आडनावांचा प्रताप असावा.

विनायक

हा त्यांचा दोष नाही

हे दोघे पुलंपेक्षाही विनोदी लेखक असावेत. पुलंची पुस्तके वाचून हसू येते तर इथे काहींना ओक किंवा वर्तक यांची पुस्तके न वाचताच हसू येते.

पुलंच कशाला माझ्या आवडत्या चिंविपेक्षाही विनोदी. हेच कशाला वर्तक आणि ओक ह्यांच्या समर्थकांचे प्रतिसाद वाचूनही भयंकर हसू येते. किंबहुना त्यांचे प्रतिसाद न वाचतादेखील हसू येते.

हा बहुधा ओक किंवा वर्तक या विशिष्ट समाजी आडनावांचा प्रताप असावा.

वर्तक आणि ओक हे एका विशिष्ट समाजातले आहेत हा काही त्यांचा दोष नाही. त्यांनी इतिहास संशोधनाच्या नावाने भरपूर कल्पनारंजन केले एवढेच. तुम्ही म्हणता त्या विशिष्ट समाजातल्या गजानन भास्कर मेहेंदळे आणि ग. ह. खरे ह्यांनी जे इतिहाससंशोधन केले आहे त्याबद्दल गंभीर इतिहास संशोधक असे म्हणू शकत नाही.

हा हा हा!

वा छान् हसलो. आता हे दोघे वाचले पाहीजेत मग, वर्तक अन ओक हो. ;)

अवांतर

This comment has been moved here.

वर्तक व ओक

माझ्या मनातले बोललात.
यू सेड इट
चन्द्रशेखर

उत्सुक

रामायण वाल्मिकिंनी रचले असे म्हटले जाते परंतु महाभारताच्या वेळी व्यासांनी गणेशाला लेखनिकाचे काम करण्यास सुचवले. याचा अर्थ महाभारत काळी लेखनकला अवगत होती असा घ्यावा का? असल्यास हा काळ कोणता?

या विषयावर पूर्ण अज्ञान आहे. चर्चा वाचण्यास उत्सूक आहे

तरी एक वाटते की महाभारत (किंवा रामायण) घडले आणि रचले गेले हा काळ वेगळा असावा. त्यामेळे रचले गेले त्या काळचे प्रतिबिंब त्या काव्यात उठले असावे. कवी जुने संदर्भ देताना, समजावून सांगताना सद्यस्थितीतील उदाहरणे देतो काहिसे तसे.
त्यामुळे काव्यातील वर्णनात्मक तपशीलांपेक्षा त्यावेळचा काळ दर्शवणारी वर्णने जसे ग्रहस्थिती, परदेशस्थ समकालिन राजांचा उल्लेख वगैरे वरून काळ निश्चित केला असल्याल मला तो अधिक विश्वासार्ह वाटेल

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

रामायणाचा काल

सात आठ वर्षांपूर्वी दिल्लीला रहाणारे श्री. पुष्कर भटनागर यांनी वाल्मिकी रामायणात रामजन्माच्या वेळी असलेली ग्रह तार्‍यांची स्थिती, संगणकावर वापरल्या जाणार्‍या ज्योतिर्विद्या संगणक प्रणालीला देऊन(Feed) रामजन्माचा काल निश्चित करण्याचा एक प्रयत्न केला आहे. माझ्या मते शास्त्रीय आधारावर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात उत्तम प्रयत्न आहे. या प्रयत्नाप्रमाणे रामजन्माचा दिवस १० जानेवारी इ.स. पूर्व ५११४ हा येतो.
आपल्या प्रयत्नांचे बारकाव्यासह वर्णन भटनागर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. या पुस्तकाचे परीक्षण मी माझ्या या ब्लोगमधे केले आहे. त्यात या प्रयत्नांचा सारांश् आहे.
भटनागर यांच्या हिशोबात काही महत्वाच्या तृटी आहेत असे मला वाटते. त्या मी माझ्या ब्लॉगमधे बारकाईने दिल्या आहेत. पण तरीही त्यांचे निरिक्षण बर्‍यापैकी अचूक असावे असे वाटते.
प.वि वर्तकांच्या शास्त्रीय (अ)ज्ञानाविषयी पुन्हा कधीतरी.
चंद्रशेखर

रामायण-महाभारत काल

रामायणाचा काल एकदा निश्चित झाला की त्या कालापासून् महाभारतापर्यंत किती राजे हो ऊन गेले यावरून श्री.शरद यांच्या हिशोबाप्रमाणे महाभारताचा काल ठरवणे सोपे जावे असे मला वाटते.
चन्द्रशेखर

काळ सांगता येईना ?

रामायण आणि महारभारताचा काळ नक्की सांगता यावा, अशी संदर्भांची पुस्तके शोधुनही मला मिळाली नाहीत.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता असलेल्या 'भारताचा इतिहास व संस्कृती' अशी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके चाळली,पण प्रमाण मानावी अशी पुस्तकांची माहिती नसल्यामुळे कोणी सांगत असेल तर तशी पुस्तके मिळवीन आणि महाविद्यालयासाठी खरेदीही करेन. राजपुरुषांच्या शौर्यकथेतून वा काव्यातून महाकाव्याचा उदय झाला, होतो. महाभारताच्या रचनेसंबधीही तसेच असावे. महाभारताचा रचना काळ इ.स.पू. ४०० ते इ.स. ४०० काळात झाले असावे. महाभारताची कथावस्तू लहान आहे आणि उपाख्यानामुळे तिचा विस्तार वाढत गेला. असे असले तरी महाकाव्यावरुन तत्कालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक जीवनातील पैलूंचा अभ्यास करता येऊ शकतो असे म्हटल्या जाते.प्राचीन अवशेष, प्रवासवृत्ते यावरुन काळाचा शोध घेण्यास मदत होत असावी असे वाटते. विकासरावांनी प्रतिसादात जो उल्लेख केला.'व्यासांनी गणपतीस लेखनिक म्हणून बोलावले.. ते मात्र डॉ.रा.श.वाळिंबे यांनी संपादित केलेल्या महाभारताच्या दहा खंडापैकी पहिल्या खंडात वाचायला मिळाले.[मात्र ग्रहतार्‍यांच्या अंदाजावरुन काळाचे गणित करता यावे असे उल्लेख महाभारतात कुठे शोधावे, असा प्रश्नही पडला.] नैमिष्यारण्यामधे कुलपती शौनकाच्या आश्रमात उपनिषदाचे रहस्य अवगत असलेल्या आणि पुराणांमधे पारंगत असलेला सूतपूत्र लोमहर्षण सौति त्यांच्याकडे जातो आणि जमलेल्या ऋषींना महर्षीव्यासांनी सांगितलेले आख्यान सांगतो ( अशी माहिती काल उपक्रमी मित्राने दिलीच होती ).मात्र महाभारताच्या नेमक्या काळाच्या बाबतीत,ऐतिहासिक घटनेबद्दल फार काही वाचायला मिळाले नाही, तेव्हा आम्ही आपली रजा घेतो...! :(

-दिलीप बिरुटे

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण नाही

पुराव्याअभावी रामायण किंवा महाभारत ऐतिहासिकदृष्ट्या फारसे महत्त्वपूर्ण नाही. ही टोळीयुद्धांवर रचलेली महाकाव्ये आहेत. नंतरही ह्या काव्यांत बराच भाग घुसडण्यात आला आहे. असो. सुरवातीच्या वैदिक काळ (अर्ली वेदिक पीरियड इसवी सनापूर्वी २००० वर्षे) ऋग्वेद रचला गेला. ब्राह्मण-उपनिषद-अरण्यकांनंतर रामायण-महाभारत अवतरले असे वाचल्याचे आठवते. ह्याच काळात शेवटी शेवटी बहुधा पुराणातली वांगी शिजवायला सुरवात झाली असावी. चूभूद्याघ्या.

ऐतिहासिकदृष्टीने

पुराव्याअभावी रामायण किंवा महाभारत ऐतिहासिकदृष्ट्या फारसे महत्त्वपूर्ण नाही. ही टोळीयुद्धांवर रचलेली महाकाव्ये आहेत. नंतरही ह्या काव्यांत बराच भाग घुसडण्यात आला आहे. असो

.

हे खरे आहे. स्वत: व्यासांनीही दाशराज युद्धावरून महाभारताची निर्मिती केली असावी असे एक मत पडते त्यात तथ्य वाटते.

परंतु, बरेचदा आणखी एक प्रश्न पडतो. महाभारत, रामायण घडणे आणि रचणे यांचा काळ वेगळा असावा का? सदर इतिहास (जर खरा मानला) घडतेवेळीच महाकाव्यांची निर्मिती झाली यात किती तथ्य असावे?

कोठेतरी रामायणकार वाल्मिकी इ.स.पूर्व ४ थ्या शतकात होऊन गेले असे उल्लेखही वाचले आहेत.

खरडवहीतील चर्चा

साधारण याच विषयावर माझी आणि श्री. वाचक्नवी यांची मध्यंतरी खरडवही चर्चा झाली होती. ती या संदर्भात वाचनीय ठरावी. वाचक्नवी यांनीही या संदर्भात अधिक माहिती दिल्यास ती उपयुक्त ठरावी.

१००० किलोमीटरवर्.

सध्या मी माझ्या संदर्भग्रंथसंग्रहापासून एक हजार किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे तूर्त खरडवहीत दिली आहे त्याहून अधिक माहिती देणे संभवनीय नाही.--वाचक्नवी

वर्तक आणि कालगणना

वर प्रियालीने दिलेला काळच माझ्या आठवणीप्रमाणे वर्तकांनी त्यांच्या पुस्तकात सिद्धांत म्हणून मांडलेला आहे. मला रामायणासंदर्भात आठवत नाही पण महाभारतासंदर्भात त्यांचे तर्क पटण्यासारखे आहेत. त्यातील त्यांनी मांडलेले गणित बरोबर की चूक हे मी खोलात जाऊन तपासले नव्हते. मात्र त्यांनी दिलेले काही संदर्भ तपासले होते इतकेच आठवते. (आठवते म्हणण्याचे कारण इतकेच की आत्ता ते पुस्तक माझ्याजवळ नाही आहे. पुस्तकाचे नावः स्वयंभू)

त्यांचा महाभारताच्या कालगणनेसंदर्भातील तर्क असा: व्यासांनी गणपतीस लेखनिक म्हणून बोलावले. गणपतीने एक अट घातली की, "मी लिहायचे थांबणार नाही. जर तुम्ही (व्यास) थांबलात तर मी लेखणी ठेवून निघून जाईन." व्यासांनी मग त्याला उलट अट घातली, "ते ठिक आहे, पण मी जे काही लिहायला सांगेन, ते समजल्याशिवाय लिहायचे नाही." गणपतीने ती मान्य केली. या अटीचा वापर व्यासांनी विचार करायला वेळ मिळवण्यासाठी केला. आणि त्यासाठी त्यांनी काही कोड्यात पडतील असे प्रसंग अथवा विधाने मांडली. त्याचा संबंध हा खगोलशास्त्रीय ग्रहतार्‍यांच्या, सप्तर्षी आणि ध्रुव तार्‍यांच्या स्थितीशी होता. त्यावरून कालगणना करणे शक्य आहे. हे करत असताना व्यासांनी जसे गणपतीस विचार करायला लावले तसेच पुढच्या पिढ्यांना तत्कालीन कालासंबंधी अप्रत्यक्ष माहीती सांगितली. नाहीतर त्यात असे एक पंचांग सोडल्यास सनावळी हा प्रकार नाही आहे.

सप्तर्षी, तसेच धृव तारा यांची आत्ताची स्थिती आणि ४-५००० वर्षांपुर्वीची स्थिती यात फरक आहे. तेच इतर नक्षत्रांबाबत. वर्तकांनी त्यांच्या पुस्तकात ही खगोलशास्त्रीय कोडी वापरून त्याचा संदर्भासहीत संबंध लावून कालगणना केली आहे. सुरवातीस म्हणल्याप्रमाणे तर्क म्हणून मला ते पटले मात्र त्यांचे खगोलशास्त्रीय गणित बरोबर आहे का चूक ते माहीत नाही.

रामायण वाल्मिकिंनी रचले असे म्हटले जाते परंतु महाभारताच्या वेळी व्यासांनी गणेशाला लेखनिकाचे काम करण्यास सुचवले. याचा अर्थ महाभारत काळी लेखनकला अवगत होती असा घ्यावा का? असल्यास हा काळ कोणता?
तेंव्हा, लेखनकला अवगत नव्हती असे जर नक्की माहीत नसेल तर अवगत असू शकते असे म्हणणे काही गैर ठरणार नाही.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्व नाही

मुळात वाल्मिकी आणि व्यास ह्यांनी लिहिलेले ग्रंथ हे रचलेले आहेत की सत्य घटनेवर आहेत, असल्यास त्यात व्यास/वाल्मिकींचा कल्पना विलास किती/ लेखन स्वातंत्र्य किती हे सांगणे अशक्यच असावे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या ग्रह तार्‍यांचा स्थितीवरुन अथवा अन्य काही बारकाव्यांवरुन कसलेही गणित मांडणे आणि त्यावरुन अंदाज बांधणे हे सगळेच बिनबुडाचे वाटते. म्हणूनच चित्त ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे ह्या ग्रंथांना ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या महत्व नाही.

अवांतर: समांतर उदाहरण

मुळात वाल्मिकी आणि व्यास ह्यांनी लिहिलेले ग्रंथ हे रचलेले आहेत की सत्य घटनेवर आहेत, असल्यास त्यात व्यास/वाल्मिकींचा कल्पना विलास किती/ लेखन स्वातंत्र्य किती हे सांगणे अशक्यच असावे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या ग्रह तार्‍यांचा स्थितीवरुन अथवा अन्य काही बारकाव्यांवरुन कसलेही गणित मांडणे आणि त्यावरुन अंदाज बांधणे हे सगळेच बिनबुडाचे वाटते.

यावरून एक समांतर उदाहरण आठवले. (चर्चेच्या मूळ विषयाशी याचा यत्किंचितही संबंध नाही.)

'सनसेट ऍट ब्लँडिंग्ज़' हे पी.जी.वुडहाउसचे अखेरचे पुस्तक. त्यातसुद्धा हे पुस्तक अर्धवट लिहून झाले असता वुडहाउसचा मृत्यू झाल्याकारणाने कथानक अपुरे राहिलेले. प्रकाशकांनी (पेंग्विन) तरीही ते प्रकाशित करण्याचे ठरवले. आणि मग अपुर्‍या कथानकानंतर भरणा म्हणून वुडहाउस आणि वुडहाउसच्या विविध लेखनाशी संबंधित इतरांचे लेखही प्रकाशित पुस्तकात अंतर्भूत करण्यात आले.

या इतर लेखांपैकी काही लेख (कदाचित वुडहाउसच्या कथेपेक्षासुद्धा) रोचक आहेत. पैकी एक लेख वरील प्रतिसादाच्या संदर्भात प्रकर्षाने आठवतो.

वुडहाउसच्या कथांपैकी 'ब्लँडिंग्ज़ कॅसल'शी संबंधित कथामालेत (लॉर्ड एम्ज़वर्थ इ.) वारंवार येणारे आणि लॉर्ड एम्ज़वर्थ जेथे राहतात त्या ब्लँडिंग्ज़ कॅसलच्या जवळचे रेल्वेस्थानक असलेले 'मार्केट ब्लँडिंग्ज़' हे गाव खरे तर पूर्णपणे काल्पनिक आहे. परंतु ते जर प्रत्यक्षात अस्तित्वात असते तर वुडहाउसच्या कल्पनेप्रमाणे इंग्लंडात साधारणपणे कोठे असते, याचा वेध घेण्याचा प्रयत्न उपरोल्लेखित लेखात केलेला आहे. त्याकरिता 'ब्लँडिंग्ज़ कॅसल' कथामालेतील विविध कथांमध्ये येणार्‍या विविध जणांच्या लंडनहून मार्केट ब्लँडिंग्ज़पर्यंतच्या रेल्वेप्रवासाची वर्णने, गाडी लंडनहून निघण्याची आणि मार्केट ब्लँडिंग्ज़ला पोहोचण्याची (किंवा उलट दिशेने मार्केट ब्लँडिंग्ज़हून निघण्याची आणि लंडनला पोहोचण्याची) साधारण वेळ आणि त्यावरून एकंदर प्रवासाला लागणारा साधारण वेळ, वाटेतील थांबे वगैरेंबद्दल येणार्‍या विविध उल्लेखांचा सूक्ष्म अभ्यास करून, त्यांची सांगड घालून, अशा (काल्पनिक) गाड्यांचे एका प्रकारचे वेळापत्रक बनवून त्यावरून अंदाज बांधून मार्केट ब्लँडिंग्ज़ हे वुडहाउसच्या कल्पनेतील गाव इंग्लंडात साधारणपणे कोठे असावे याबद्दल निष्कर्षाप्रत येण्याचा प्रयत्न केलेला आहे. (पुस्तक आणि लेख वाचून बराच काळ लोटल्यामुळे नेमका निष्कर्ष आता आठवत नाही.)

(बाकी चर्चेच्या मूळ विषयात मला यत्किंचितही गती नसल्याने त्याविषयी अधिक मतप्रदर्शन करू इच्छीत नाही.)

माझेही अवांतर

उदाहरण रोचक आहे. याच्या काही उलटे उदाहरण मागच्या वर्षी बघण्याचा योग आला. अलेक्झांडर ड्यूमांची प्रसिद्ध कादंबरी 'काउंट ऑफ मॉन्ते क्रिस्तो' ज्या बेटावर घडते ते बेट म्हणजे शातो-दीफ. कादंबरी पूर्णपणे काल्पनिक असली तरी ती प्रसिद्ध झाल्यानंतर बेटावरील तुरूंगात मॉन्ते क्रिस्तोची खोली, त्याने बनवलेले भुयार हे सर्व बनवण्यात आले. आता पर्यटकांना दाखवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मार्सेपासून इथे बोटीने जाण्यास ४५ मिनिटे लागतात.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

आणखी अवांतर

'ऍस्टेरिक्स' मालिका आणि त्यातील ऍस्टेरिक्स राहत असलेले निनावी खेडेगाव हेही पूर्णपणे काल्पनिक आहे. परंतु हे खेडेगाव बेतताना लेखकद्वयाने आजमितीच्या कोणत्या गावावरून ते बेतले असावे (आणि म्हणूनच ऍस्टेरिक्सचे गाव हे जर प्रत्यक्षात अस्तित्वात असले, तर ते फ्रान्समधील आजमितीचे कोणते गाव असू शकेल) यावरही अशाच प्रकारचे बरेच संशोधन झाले असल्याचे कळते.

किंबहुना फ्रान्समधील आजमितीची अनेक गावे ऍस्टेरिक्सचे मूळ गाव असल्याबद्दल दावा करतात, असेही ऐकलेले आहे. (संदर्भ नक्की आठवत नाही, पण बहुधा पीटर केस्लरचे 'द कंप्लीट गाइड टू ऍस्टेरिक्स'. गरजूंनी वाचून खात्री करून घ्यावी.)

द्वारका

आंतरजालावर द्वारकेच्या उत्खननाबद्दल एक लेख सापडला. या संदर्भात लेख रोचक वाटला. दुसरा एक दुवा इथे. (यात द्वारकेचा काल ५-६००० इ.स.पू. म्हटले आहे.)

दुवा ३.

यावर एक पुस्तकही आहे. योगायोगाने याचे लेखक (अन्सारी) आमचे शेजारी होते. काही वर्षांपूर्वी ते गेल्याची बातमी कळाली.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

अवांतर

(महाभारत-महाभारत काल व) अवांतर गोष्टी

हे चंद्रशेखर पुण्यातील आहेत हे न सांगता कळतेच. नाही तर हे इंजिणेर तेलबीयांपासून दाशराज्ञ (दाशराज नव्हे) युद्धावर सर्वत्र संचार कसा करणार बुवा? पण सदाशिव पेठेतले की शनवारातले? रामेश्चर देवळात संध्याकाळी नक्कीच सापडावेत. असे बघा, यांनी उपक्रम संपादकांना विनंती केली " महाभारत कालावर स्वतंत्र लेखमाला सुरू करा". लगेच श्री. स्वप्नालींनी वेळ काढून सुरवात केली आणि हे लगेच लिहणार " महाभारताला ऐतिहासिक मह्त्व काही नाही." याला "पुडी सोडून देणे व गंमत बघत बसणे" असेच म्हणावयाचे ना? तसेच रामायण -महाभारत ह्या टोळ्यांमधील लढाया?( नशीब, चकमकी म्हणाले नाहीत!). आणि आम्ही बिचारे एक अक्षौहिणी म्हणजे किती रथ, गज, पदाती यांचा हिशोब लावत बसणार! त्यांचेही खरेच म्हणा, नाही तरी तो राम आपल्या एकट्या भावाला घेऊनच निघाला होता. दोघांची टोळी.ह्या! यांच्यापेक्षा D टोळी नक्कीच मोठी.
साम्यवाद्यांचा निराळाच मार्ग. कोणत्याही १९२० च्या आधीच्या गोष्टीला फाटे फोडणे हा यांचा आवडीचा उद्योग. रामायण -महाभारतात वर्गविद्रोह, कामगारांचे शोषण दिसत नसेल तर तसे काही नव्हतेच याचेच खरे-खोटे पुरावे शोधणे यातच वेळ घालवावयाचा.. महाभारत झाले की चार्वाकाबद्दल लिहणार आहे , त्यावेळी डाव्याच्या (कु)तर्क पद्धतीबद्दल लिहणार आहेच.. तेंव्हा जे.एन.यु. मधील लेखांचा काळजीपूर्वक विचार करावा.
स्त्री सौंदर्य.... मला वाटले होते पहिला प्रतिसाद येणार "तन्वि शामा शिखरीदशना:, "जशी चवळीची शेंग कवळी" वा "दिसे ही सातार्‍याची तर्‍हा " पण छे! आम्हीच साले पुस्तकांमधले किडे.
नीतीचे तसेच. खरे बोला, शेजार्‍यावर प्रेम करा, अहिंसा पाळा,चोरी करू नका, इत्यादी नीतीच्या कल्पना. त्या नक्कीच कालातीत आहेत. वयात आलेली स्त्री चार जणांकडे गेली यात नीतीचा संबंध कोठे आला? आणि त्याबद्दल शिक्षा कसली? हा, सॉक्रेटिस, महात्मा गांधी नीतीवान होते, त्यांनाच कठोर शिक्षा भोगाव्या लागल्या.

आता दाशराज्ञ युद्धाबद्दल कोठे लिहावयाचे? श्री वैद्यांचे महाभारत कालाबद्दलचे मत पडले अडगळीत.
(अवांतर गोष्टी हसून घेण्याकरिता, ग्रहांबद्दल जास्त लेखन म्हणजे घाटपांडे काकांना आमंत्रण).

शरद

हा हा हा हा

प्रतिसाद आवडला....! :)

>>स्त्री सौंदर्य.... मला वाटले होते पहिला प्रतिसाद येणार "तन्वि शामा शिखरीदशना:, "जशी चवळीची शेंग कवळी" वा "दिसे ही सातार्‍याची तर्‍हा " पण छे! आम्हीच साले पुस्तकांमधले किडे.

रामायण महाभारताचा काळ सापडेल न सापडेल, पण आम्ही स्त्री सौंदर्यावर काथ्याकूट करण्यास उत्सूक आहोत, आम्ही ते विसरलेलो नाही. :)

>>श्री. स्वप्नालींनी वेळ काढून सुरवात केली
स्वप्नाली म्हणजे कोण हो ? ;)
(नाव चांगलं आहे) (ह्.घे)

-दिलीप बिरुटे

सहमत

शरदरावांशी सहमत आहे!

आपला
गुंडोपंत

अवांतर

शरदजी आपले बरोबर आहे. मी पुण्याचाच आहे पण पुण्यात नाही.
मी माझ्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे मी ऋगवेद किंवा महाभारत यांच्याकडे महाकाव्ये म्हणून बघतो. मला त्यातल्या गोष्टी खूप आवडतात वाचायला. महाभारत तर अरेबियन नाइट्स सारखेच मनोरंजक आहे. पण म्हणजे मी त्यांना धार्मिक ग्रंथ नाही म्हणणार. माझ्या दृष्टीने धार्मिक ग्रंथ एकच आहे. तो म्हणजे गीता. आता तुम्ही म्हणाल की तो महाभारताचाच भाग आहे. मला तसे नाही वाटत. श्री मूर्ती साम्यवादी आहेत ही टीका मी पूर्वीही ऐकलेली आहे. साम्यवादी विचारसरणीच्या माणसाने, महाभारताबद्दल लिहिले तर त्याचा तो व्ह्यू पॉइंट आहे. आपण तो मानायचा की नाही ते आपण ठरवायचे. मुख्य म्हणजे मला श्री.मूर्ती यांची मते मान्य आहेत असे आपण धरून चालला आहात ते तितकेसे बरोबर नाही. ज्या गोष्टीबद्दल काही आधार पुरावेच नाहीत ती अमुकच आहे असे कसे सांगणार? महाभारत घडले असेल किंवा नसेल्. आपण ते कसे सांगणार?
तुम्ही जवाहरलाल नेहरूंचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया वाचले आहे का? त्यात ऋग्वेद आणि महाभारतकालाबद्दल त्यांनी लिहिलेले वाचनीय आहे. पण त्यांचे मत मानायचे की नाही आपण ठरवायचे.
व्यक्तीशः मला विचारलेत तर उत्क्रांतीच्या सिद्धांताप्रमाणे, कोणत्याही एका मानवी पिढी पेक्षा पुढची पिढी जास्त ज्ञानी व हुशार असते असे मी मानतो. त्यामुळे ५००० वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज सर्वज्ञ होते हे मला कधीच मान्य होणार नाही.कोणताही जुना ग्रंथ त्यामुळे पिन्च् ऑफ सॉल्ट सकटच वाचावा असे मला वाटते.
थोडक्यात काय तर प्रत्येकाला जुन्या ग्रंथांबद्दल आपले मत ठरवण्याचा अधिकार आहे. तो त्याने मांडला म्हणजे तसा व्ह्यू पॉइंट नसणार्‍यांची तो टिंगल टवाळी करतो आहे असा अर्थ होत नाही. ग्रंथांवरचा प्रत्येक टीकाकार हे त्या वेळचे प्रचलित ज्ञान काय आहे या संदर्भातच स्वतःचे मत मांडतो. श्री वैद्यांच्या कालापेक्षा, आपल्याला सर्व बाबतीतील ज्ञान आणि ज्ञानसाधनेची साधने(उदा. इंटरनेट) आधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपली मते त्यांच्या मतापेक्षा निराळी असली तर तो श्री. वैद्यांच्या व्यासंगाचा अपमान होतो असे निदान मला तरी वाटत नाही.
आपल्याला माझी भूमिका समजेल अशी मी आशा करतो.
चन्द्रशेखर

महाभारत, स्त्रीसौंदर्य आणि अवांतर

शरदराव,

महाभारताला ऐतिहासिक महत्त्व नाही असे काहींना वाटत असेल तर वाटू द्या बापडे. लोकांना काहीतरी वाटत असते, लोक काहीतरी बोलत असतात किंवा काहीतरीच बोलत असतात असे एक महान संत सांगून गेला आहे नाही का? ;-) कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना| आता प्रत्येकाला आपापली मते असतात तर त्यांनी ती मांडली म्हणून तुम्हा-आम्हाला कसला त्रास? तुम्ही महाभारत-१ लिहिलेत आता महाभारत-१०५ होईपर्यंत थांबू नका. :-) कौरव-पांडव (म्हणजे विरोधक-समर्थक) सर्वांना आपापली मते मांडू द्या. त्यामुळेच चर्चा रसभरीत होईल.

आता गोष्ट निघाली आहे तर टोळीयुद्ध हा शब्द मागे कधीतरीही चित्तरंजन यांनी वापरला होता आणि तो मला फारच आवडला. (पुन्हा आपापली वैयक्तिक मते) नाहीतर, मगध, कलिंग या अवाढव्य साम्राज्यांपुढे हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ हे जरा टोळी-इलाकेच वाटतात.

बाकी, चंद्रशेखर म्हणतात तसे - ५००० वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज सर्वज्ञ होते हे मलाही कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे अक्षौहिणी सैन्ये लढली की शे-पाचशे-हजार लढले यावर आपापली मते व्यक्त करणे आलेच.

आता पुन्हा स्त्रीसौंदर्याकडे बघू तर मूळ कथेत हर्यश्व राजा जे म्हणतो ते कथेशी किती चपखल आहे बघा - राजाचा मूळ हेतू आहे कुलीन राजकन्येकडून पुत्रप्राप्ती आणि त्या नजरेतून तो तिचे सौंदर्य पाहतो.

ही कन्या नि:संशय सुलक्षण आहे. सामुद्रिकात सांगितल्याप्रमाणे जे सहा अवयव उन्नत असावे; {(१) दोन पायांचे तळवे, दोन हातांचे तळवे व दोन स्तन वा(२) स्तनद्वय, नितंबद्वय व नेत्रद्वय वा(३) छाती, कुशी,केश,खांदे,हात व मुख} जे सात भाग सूक्ष्म असावे; (त्वचा,केश,दंत, करांगुलि, पादांगुलि व त्या अंजुलींची पेरे) जे तीन गंभीर असावे (स्वर, मन आणि नाभि);जे पांच आरक्त असावे (हाताचे तळवे, डोळ्यांचे कोंपरे,ताळू, जिव्हा व अधरोष्ठ)ते तसे आहे.

दुसर्‍या शब्दांत - कन्येची वाढ पूर्ण झालेली आहे. ती बालिका नाही, हे तिच्या उन्नत भागांवरून कळते. ती सुदृढ आहे, तिचे जे भाग आरक्त आहेत त्यावरून कळते की ती रोगट नाही. जे भाग सूक्ष्म आणि गंभीर आहेत त्यावरून कळते की ती पुत्र देण्यास सक्षम आहे. (आजही बेढब किंवा नको त्या जागी चरबी वाढली असेल तर डॉक्टर मूल न होण्यास ते एक कारण आहे असे मानतात. - मी डॉक्टर नाही परंतु डॉक्टरांनी चूक असल्यास सुधारावी.)

जेथे युवराज किंवा वारस महत्त्वाचा गणला जातो तेथे आजही अशा परीक्षा केल्या जातात असे वाटते. लेडी डायना ब्रिटनला युवराज देण्यास सक्षम आहे का ही परीक्षा लग्नाआधी केली होती असे वाचल्याचे आठवते. चू. भू. दे. घे.

मला वाटते, जे कोणी याच कारणास्तव बाईकडे पाहत असतील तर त्यांनी आजही हर्यश्व राजाचा सल्ला मानण्यात गैर नाही. :-) बाकी, राजेंद्रने त्या चर्चेत स्त्रीसौंदर्याची आपली व्याख्या दाखवली होतीच. अन्य पुरुषांनी दाखवली असती तर आम्हालाही कळले असते असो.

आता अवांतरः

स्वप्नाली??

तसे माझे बारसे अनेकांनी केले आहे, त्यात हे आणखी एक. त्यानिमित्ताने, सर्व माझ्या बारशाला जेवलेले आहेत असे म्हणायला मी मोकळी. :-) ह. घ्यावे.

रामायण व महाभारताचा काळ.

पुर्वी पुण्यातुन" तरुण भारत "नावाचे दैनिक प्रसिध्ध होत होते .त्या दैनिकात" युधिष्ठिराने "चालु केलेला शक म्हणजे " युगाब्द " लिहिण्याची
पध्दत होती. हे दैनिक साधारणपणे १९९०ते १९९१ च्या दरम्यान बंद पडले. त्यावेळेस ते दैनिक "युगाब्द ५०६८ "असा लिहित होते
हे वाचल्याचे आठवते.
यावरुन मला असे वाटते की महभारत सुमारे ५१५० वर्षापुर्वी घडले असावे.
मागिल वर्षि एका व्रुत्त वाहिनीवर.( ती बहुधा आजतक असावी. ) रावणाचा म्रुतदेह अजुनही श्रीलंकेत "ममी ' च्या स्वरुपात जतन केलला गेलेला आहे असे दाखवत होते. त्यावेळेस त्यांनी रामाची जन्मतारीखही शोधुन काढल्याचे दाखवण्यात आले होतें.
नंतर हीच माहिती इतर व्रुत्तवाहिन्यांनी प्रस्सरित केलि होती. त्यात रामाची जन्मतारिख 'जानेवारी १०११४ " च्या काळातील
असावि असे प्रसारित केले जात होते.
पण रामायण व महाभारत या दरम्यानच्या काळातील उल्लेख वाचावयास मिळत नाहीत.

रामायण व महाभारताचा काळ.

रामायण आणि महाभारत यांचा श्री प वि वर्तकांनी ठरवलेला काळ ज्योतिर्गणिताप्रमाणे जरी योग्य असला, तरी भक्कम पुरव्या अभावी तो ग्राह्य धरता येणार नाही. शेवटी ग्रहांची स्थिती काही ठराविक वर्षानंतर रीपीट होत असते. परन्तु जो पर्यन्त उत्खननात सापडलेले पुरावे, भाषिक, भुशास्त्रीय पुरावे इत्यादी सापडत नाहीत की जे या ज्योतिर्गणितीय कालास पाठबळ देतील, तो पर्यन्त वर्तकांचे निश्कर्ष अवैज्ञानिक मानले जातील.

घड्याळाचा काटा

रामायण आणि महाभारताचा काळ हा घड्याळाचा काटयाप्रमाणे नुकताच सुरु झाला आहे.

बरोबर ५००० वर्षा नि पुन्हा हेच घडणार आहे.

समतादर्शन

रामायण आणि महाभारताचा काळ

>>> रामायण/ महाभारत खरोखरच घडले का?
हो.
१. राम, हनुमान, श्रीकृष्ण, लो. टिळक इ. सारख्या व्यक्तींची जयंती साजरी केली जाते. जयंतीची कल्पना केवळ प्रत्यक्ष जन्माला आलेल्या व्यक्तींनाच लागू होते, काल्पनिक व्यक्तिरेखांना नाही.
२. कालगणना (शालिवाहन शके, शिवशके, इसवी सन, हिजरी सन) सुरु करण्यामागची सांगितली जाणारी कारणे (अनुक्रमे, शालिवाहन आणि शिवाजी यांचा राज्याभिषेक; ख्रिस्ती, इस्लाम मतांची स्थापना) ही खरी असतात. युधिष्ठीर राजाने महाभारत युद्ध जिंकल्यावर युधिष्ठीर शके सुरु केले असे म्हणतात. (सध्या अंदाजे युगाब्द ५२००+ सुरु असावे).

--------------------------------------------------------------------------------------------
वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

काहीही!

राम, हनुमान, श्रीकृष्ण, लो. टिळक इ. सारख्या व्यक्तींची जयंती साजरी केली जाते. जयंतीची कल्पना केवळ प्रत्यक्ष जन्माला आलेल्या व्यक्तींनाच लागू होते, काल्पनिक व्यक्तिरेखांना नाही

.

काहीही! ज्या कथांमध्ये जन्माचे दाखले आहेत अशा कोणाचीही जयंती साजरी करता येते. राम, हनुमान वगैरेंना धार्मिक अधिष्ठान मिळाल्याने जयंती साजरी होते इतकेच.

... वगैरेंना धार्मिक अधिष्ठान मिळाल्याने जयंती साजरी होते

जयंती साजरी करण्यासाठी धार्मिक अधिष्ठान आवश्यक नाही, प्रत्यक्ष जीवन मात्र पाहिजे, उ.दा. राजकीय पुढार्‍यांच्या जयंत्या.

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

प्रत्यक्ष जीवन असल्याचे दाखले द्यावे

तर मग प्रत्यक्ष जीवन असल्याचे दाखले द्यावे. मू़ळ विषयाबद्दल ठोस माहिती असेल तर द्यावी. उगीच ते होते म्हणून जयंत्या साजर्‍या होतात वगैरे नको. हे शब्दखेळ झाले.

असो. आपल्या माहितीकरता, हे सनातन धर्मीयांचे संकेतस्थळ नाही. पुरावे असतील तर ते कृपया मांडावेत, अन्यथा आपल्याबरोबर उगीच वेळ घालवण्यात स्वारस्य नाही.

जन्माचे दाखले

>>>ज्या कथांमध्ये जन्माचे दाखले आहेत अशा कोणाचीही जयंती साजरी करता येते.

जन्माचा (प्रत्यक्ष जीवन जगल्याचा )काहीतरी पुरावा असल्याशिवाय जन्माचा दाखला मिळतो का?

आणि इतर मुद्द्यांचं काय?

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

न मिळायला काय झालं?

ज्या कथांत पात्रे रंगवलेली असतात उदा. सुपरमॅनच्या जन्माची कथा रंगवलेली आहे म्हणजे सुपरमॅन खराच आहे असे म्हणायचे का?

आणि इतर मुद्द्यांचं काय?

कसले इतर मुद्दे?

सुपरमॅन

>>>सुपरमॅन
सुपरमॅनची जयन्ती जगात कुठे साजरी होते?

>>>कसले इतर मुद्दे?
शकांबद्धल काय?

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

जयंती

जयंती साजरी का व्हावी? त्याला ख्रिश्चनांनी स्वीकारले आहे का देव म्हणून? जर धार्मिक अधिष्ठान नसेल तर ऐतिहासिक व्यक्ती असणे आवश्यक आहे. त्यासाठी जे संदर्भ, पुरावे लागतात ते टिळकांच्या बाबत पूर्ण होतात. राम कृष्ण जयंती साजरी होते ते केवळ त्यांना धार्मिक अधिष्ठान आहे म्हणून. तशी तर गणेशजयंतीही साजरी होते. कृपया, जे लिहिले आहे ते पूर्ण वाचा.

शालिवाहन शकांचे दाखले इतिहासात मिळतात. शालिवाहन राजा असल्याचे दाखलेही मिळतात. त्याच्या आईने लिहिलेले शिलालेख आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये नसून खरा इतिहास आहे हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

गणेशजयंती

>>>तशी तर गणेशजयंतीही साजरी होते.

जगात कुठेही गणेशजयंती साजरी होत नाही. गणेश चतुर्थी निराळी!

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

सॉरी!

चतुर्थी लिहायचे होते, चुकून जयंती पडले. पण म्हणून मुद्दा बदलत नाही. गणेशजयंती नाही हे कोणी सांगितले? गणेशचतुर्थी साजरी होते म्हणून गणपती आहे असे म्हणायचे असेल तर चर्चा कसली?

असो. आपल्याशी चर्चेत स्वारस्य नाही. आपल्याकडे मुद्दे दिसत नाहीत तेव्हा मी थांबते. आपणही चर्चेतले प्रतिसाद खाणे थांबवलेत तर बरे होईल.

गणेश जयंती

ठाण्यात (दोन्ही) बालेकिल्ल्यांमध्ये गणेशजयंती ऊर्फ माघी गणेशोत्सव साजरा होतो.

नितिन थत्ते

मग काय ठरलं शेवटी?

युधिष्ठीर किंवा इतर मान्यवरांची पुण्यतिथी कधी येणारे?
नंतर आपण राज्याभिषेक दिन पण साजरा करीत जाऊ.

कालगणना

महाभारत युध्द संपल्यापासून म्हणजे 5113 वर्षापासून कलियुग सुरू आहे व ते 4,32,000 वर्षे चालेल, द्वापारयुग (8,64,000 वर्षे), त्रेतायुग (12,96,000 वर्षे) व सत्ययुग (17,28,000 वर्षे) होते. अशाप्रकारे या चार युगांचे एक महायुग (43,20,000 वर्षे) चालते.

आजपर्यंत 27 महायुगे झाली आहेत. सध्या 28 वे महायुग चालले आहे. या प्रमाणे 71 महायुगे म्हणजे (30,67,20,000 वर्ष) एका मनूचा कालावधी असतो. त्याला मन्वंतर म्हणतात.

आतापर्यंत स्वंयभू, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष ही सहा मन्वंतरे झाली आहेत. सध्या वैवस्वत मन्वंतर चालले आहे. यानंतर सावर्णि, दक्षसावर्णि, ब्रह्मसावर्णि, धर्मसावर्णि, रूद्रसावर्णि, देवसावर्णि आणि इंद्रसावर्णि ही सात मन्वंतरे यायची आहेत. अशाप्रकारे ही 14 मन्वंतरे

म्हणजे (4,29,40,80,000 वर्ष) म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस.

जगाची उत्पत्ती होऊन सध्या ब्रह्मदेवाची पन्नास वर्षे झाली आहेत. अशा रितीने ब्रह्मदेवाची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा सृष्टी नाशाप्रत होईल आणि हा एवढा कालावधी एका कल्पाचा असतो.

प्रश्न

>>म्हणजे (4,29,40,80,000 वर्ष) म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस.

जगाची उत्पत्ती होऊन सध्या ब्रह्मदेवाची पन्नास वर्षे झाली आहेत.

ब्रह्मदेवाचे वर्ष हे ब्रह्मदेवाच्या किती दिवसांचे असते (३६०, ३६५ की आणखी काही)?

नितिन थत्ते

ब्रह्मदेवाचे वर्ष..

पुर्ण चर्चा येथे वाचा वर्ष कसे मोजायचे?

 
^ वर