रा.चिं.ढेरे यांचे संकेतस्थळ

ज्येष्ठ साहित्यीक व इतिहाससंशोधक रा. चिं. ढेरे यांच्या संकेतस्थळाचे नुकतेच उद्घाटन झाले. ढेरे यांचे जीवन व कार्य याचा सुरेख आढावा या स्थळावर घेतलेला आहे. ढेरे यांच्या पुस्तकांतील सुमारे ४५०० पानांचा सारांश या स्थळावर दिलेला आहे.
याशिवाय आपल्या मनात असलेल्या पण वयोमानानुसार आपण करु न शकलेल्या अशा संशोधनविषयांची यादीही या स्थळावर दिलेली आहे. नव्या पिढीच्या संशोधकांनी यांतील काही विषय हाती घेतले तर आपल्याला समाधान वाटेल, असे ढेरे यांनी म्हटले आहे. आपण, आपले काम आणि आपले संशोधन यांबाबतीत कमालीची गुप्तता बाळगून सतत कोणत्याही कामाचे 'क्रेडिट' आपल्याकडे कसे येईल हा विचार करत राहाणे अशा वृत्तीच्या संशोधकांमध्ये ढेरे यांचे वेगळेपण उठून दिसते.

Comments

आभार

या संकेतस्थळाच्या माहितीबद्दल आभार. निवांत वाचतो, पण वरवर पाहूनही चांगले वाटले. पुस्तकातले उतारे इंग्रजीबरोबरच मराठीतही हवे होते, असं वाटलं. (कदाचित भविष्यात ती भर पडेलही)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

रा चिं ढेरे

संकेतस्थळ बघितले व पुस्तकखूण करून ठेवले
ज्यांचा व्यासंग आणि बुद्धीमत्ता यांच्याविषयी मला नितांत आदर आहे त्यापैकी रा.चिं ढेरे आहेत. त्यांच्या संकेतस्थळावरची माहिती निवांतपणे संपूर्ण वाचीनच. हे संकेतस्थळ दाखवल्याबद्दल आभार.
चन्द्रशेखर

धन्यवाद

संकेतस्थळाला भेट दिली. संकेतस्थळावरील लेख, विवेचने थोडक्यात असली तरी माहितीपूर्ण आणि रोचक वाटली. ढेर्‍यांच्या संकेतस्थळाची माहिती येथे करून दिल्याबद्दल आभारी आहे.

संकेतस्थळाची माहिती येथे करून दिल्याबद्दल आभार

या संकेतस्थळाबद्दलची बातमी दोन-चार दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचली होती. तेव्हा तिथे संकेतस्थळाचा पत्ता दिला होता पण त्या पत्त्यावर स्थळ चालू झाले नसल्याने काहीच दिसले नव्हते :). आता स्थळ चालू झाले आहे असे दिसते.
त्यांच्या मराठी साहित्याचा लाभ इंग्रजीमधून व्हावा या हेतूने अनेक पाने अनुवादित करुन तेथे चढवली आहेत असे बातमीमध्ये म्हटले होते.
--लिखाळ.

धन्यू......!

रा.चि.ढेरे यांच्या संकेतस्थळाची माहिती दिल्याबद्दल आभारी..!

-दिलीप बिरुटे

एक इंटरेस्टिंग उल्लेख

"बुक गॅलरी" मध्ये ३९ क्रमांकावर "दलितांचे कैवारी भार्गवराम" या पुस्तकाचा उल्लेख आहे. त्यात हे पुस्तक श्रीक्षेत्र परशुराम आणि विष्णुचा अवतार असलेल्या परशुरामाबद्दल असल्याचा उल्लेख आहे. मला फक्त परशुरामाबद्दल त्याने २१ वेळा नि:क्षत्रिय पृथ्वी केली आणि वडिलांच्या आज्ञेनुसार आईचा वध केला इतकीच माहिती होती. तो "दलितांचा कैवारी"होता ही माहिती नवी आहे.

अर्थात् मी पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे जास्त लिहिण्यात अर्थ नाही. फक्त कोणी वाचले असल्यास त्या व्यक्तीने शीर्षकाचा उलगडा केल्यास बरे होईल.
विनायक

रावसाहेब...

ढेर्‍यांच्या संकेतस्थळाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

चं. प्र. देशपांडे

चं. प्र. देशपांडे यांचे संकेतस्थळ सुरू झाल्याची बातमी अलीकडेच लोकसत्तेत वाचली. त्याचा दुवा असा आहे - http://www.champralekhan.com/

वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आपली नाटकं अधिकाधिक लोकापर्यंत पोचावीत, मग रॉयल्टी बुडाली तरी चालेल या भूमिकेतून त्यांनी त्यांच्या नाटकांच्या संहिता पीडीएफ रूपात संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी ठेवल्या आहेत. (http://www.champralekhan.com/downloads.html)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

 
^ वर