गीतेद्वारे संस्कृत शिक्षण व संस्कृतद्वारे गीता शिक्षण

तमाम संस्कृतप्रेमी जनांसाठी सुवर्णसंधी :

मुंबई येथे ९ ठिकाणी लवकरच संस्कृत माध्यमातून गीता शिक्षण व श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सविस्तर माहितीसाठी संपर्क : श्री. दीपेश कटिरा - ०९३२३९९३८२५.

दादर येथे सदर उपक्रम दिनांक १९ जुलैपासून प्रत्येक रविवारी सकाळी १० ते दुपारी १ ह्या वेळेत श्री व्यास विद्या प्रतिष्ठान, १ ला मजला, सरस्वती भुवन, गणेश पेठ गल्ली, शिवाजी मंदीर जवळ, दादर, मुंबई - ४०० ०२८ येथे होईल.

Comments

संस्कृत प्रसार

हा फक्त कार्यक्रमांच्या जाहिरातींपुरताच उरला आहे का? काही दिवसांपूर्वी संस्कृत - दिन साजरा झाला त्यावेळी प्रसारकांकडून संस्कृतविषयी लेखनाची अपेक्षा होती. विरोधकांची पर्वा न करता प्रसार सुरू ठेवावा ही विनंती.

विनायक

अनुभव

असा आहे की वेगवेगळ्या संस्थळांवर सदस्यसंख्या व प्रत्यक्ष वाचकसंख्या ह्याचे गुणोत्तर व्यस्त असल्याने संस्कृतचा अंतरजालावर प्रसार करून नक्की कितपत लोकांपर्यंत आपण पोहोचतो हे एक कोडेच आहे. त्यामानाने प्रत्यक्ष कार्य केले तर आपण नक्की किती जणांपर्यंत पोहोचलो ते नक्की कळते त्यामुळे एकूण भर हा आभासी विश्वापेक्षा प्रत्यक्ष जगात कार्य करण्यावरच आहे. एकट्या मुंबईत गेल्या महिन्यात २०००+ जणांनी विविध संस्कृत संभाषण शिबिरांना उपस्थिती लावली. त्यातली अनेक मंडळी जी शालेय जीवनात पण कधी संस्कृतशी संबंधित नव्हती ती आज चांगल्यापैकी संस्कृत बोलू, जाणू लागली आहेत. त्यातले अनेक जण उपजीविकेचा व्यवसाय वेगळाच असला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संस्कृतशी संबंधित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत उदा. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे चालविल्या जाणार्‍या परीक्षांना बसणे.

असो. प्रत्यक्ष संस्कृत प्रसार न करता अंतरजालाच्या आभासी जगात वावरणारे अनेक संस्कृत तज्ज्ञ आहेतच ते तुमची मनोकामना नक्की पुरी करतील (ह्यावरून सहजच "पेज थ्री" चित्रपटातील चित्रपटतार्‍यांना बंदूक कशी पकडावी त्याचे प्रशिक्षण देणारा पोलीस निरिक्षक आठवला).

--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

आपली मर्जी

आंतरजालाचे विश्व आभासी असले तरी माणसे खरी असतात. प्रत्यक्षात ज्यांना भेटता येत नाही अशा लोकांपर्यंत आंतरजालातर्फे पोचता येते आणि त्यांच्यापर्यंत पोचले तर निदान काही लोकांमध्ये संस्कृतबद्दल जि़ज्ञासा जागृत होऊ शकते. बहुधा म्हणूनच आपण इथे संस्कृत प्रसाराला सुरूवात केली होती. नंतर काही मंडळींनी विरोध, टवाळी, निंदा - कुचेष्टा केल्याने त्याला घाबरून आपण प्रसार सोडला असा लोकांचा समज होणे साहजिक आहे. तसा तो होऊ नये म्हणून आपल्याला विनंती केली. ती मान्य करायची की नाही ही आपली मर्जी.

विनायक

वेळे अभावी

संस्कृत प्रसार हा फक्त कार्यक्रमांच्या जाहिरातींपुरताच उरला आहे का?

मी मुंबईत व आसपास होणार्‍या संस्कृत कार्यक्रमांच्या शेकडा १ टक्के कार्यक्रमांची आगाऊ सूचना पण इथे लिहू शकत नाही. तसेच वेळे अभावी हे कार्यक्रम घडून गेल्यावर त्यांचा वृत्तांत देता येत नाही. उदा. डोंबिवलीमध्ये ज्या संमेलनाविषयी ह्या मंचावर लिहिले होते त्या संमेलनाला मुंबई व गोव्यातून एकुण ३५० जण उपस्थित होते. जिथे अध्यक्ष म्हणून श्री. चंद्रगुप्त वर्णेकरांसारखे जेष्ठ संगणकतज्ज्ञ आलेले होते. इ.इ.
--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

म्हणजे काय म्हणायचे आहे?

सदस्यसंख्या व प्रत्यक्ष वाचकसंख्या ह्याचे गुणोत्तर व्यस्त असल्याने
याचा अर्थ असा की, जसजशी सदस्यसंख्या वाढत जाते, तसतशी वाचकसंख्या कमी होते. म्हणजे सदस्यसंख्या तिप्पट झाली की वाचकसंख्या एक तृतीयांश होते. हे कसे ठरवले?--वाचक्‍नवी

सोपे आहे...

इथेच काही दिवसांपूर्वी एकांनी हे संस्थळ सोडले. सोडताना उपक्रमपंताना विनंती केली होती की मी हे संस्थळ सोडत आहे. कृपया मी इथे ज्या तीन नावांनी लिहित होतो ती तिन्ही नावे व त्यांनी केलेले लिखाण येथून कमी करावीत. ह्याचाच अर्थ व्यक्ती एक (वाचक संख्या १) आणि सदस्य संख्या ३ होय. एका मराठी संकेतस्थळाने तर आपली सदस्यसंख्या ३०००+ सांगितली आहे. बोलवा अशी आहे की पहिली ६ खाती तर खुद्द मालकांनीच वेगवेगळ्या (***स्थ नावांनी) घेतली आहेत. :) :) :)

अवांतर : कल्पना मस्त आहे. मला पण वापरून पाहावी असे वाटू लागले आहे. :)
--------------------------X--X-------------------------------

इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||

 
^ वर