इंटरनेट एक्स्प्लोररला राम राम!

आजपर्यंत इंटरनेट एक्स्प्लोरर विषयी कितीही वाईट वाचले असले तरी आज पर्यंत मी तोच ब्राउजर मुख्य ब्राउजर म्हणून वापरत होतो. ह्यामागचे एकमेव कारण म्हणजे ह्या ब्राउजरमध्ये अतीशय सूबक दिसणारी अक्षरे विशेषतः मराठी स्थळांवरील. खूप काही केले तरी मला आय ई वर जशी अक्षरे उमटतात तशी फायरफॉक्स किंवा क्रोमवर उमटवता येत नव्हती. शेवटी आज वेळ मिळाल्यावर काही क्लुप्त्या करुन बघीतल्या आणि आता कोणतेही स्थळ फायरफॉक्स किंवा क्रोम मध्ये जसेच्या तसे आय ई सारखे दिसु लागले आहे.

माझ्याप्रमाणेच आणखी कुणी देखिल आय.ई. निव्वळ त्याच्या सौंदर्यामुळे वापरायचे थांबत नसेल, तर त्यांच्यासाठी मी इथे स्टेप बाय स्टेप कृती देतो आहे.

१) सर्वप्रथम सीडॅकचा योगेश हा टंक इथुन उतरवुन घ्या.

२) हा टंक संगणकावर व्यवस्थित इंस्टॉल करा. कंट्रोल पॅनेल - फाँट्स- इंस्टॉल न्यू फाँट्स्

३) आता तुमच्या ब्राउजरमध्ये जाऊन देवनागरीसाठी हा फाँट निवडा. फायर फॉक्स मध्ये टूल्स् - ऑप्शन्स - कंटेंट्स् -फाँट्स् अँड कलर्स् -ऍडव्हान्स्ड्

आता तुमच्या फायरफॉक्सवर देखिल उपक्रम/मनोगत/मिपा/बजबजपुरी इ. ठिकाणी वापरलेला फाँट दिसू लागेल. पण अजुनही आयई इतका गुळगुळीतपणा अक्षरांना येणार नाही. त्यासाठी खालील स्टेप्स :

१) डेस्क्टॉप वरती मोकळ्या जागेत कुठेही जाऊन राईत क्लिक करुन प्रॉपरटीज उघडा

२) तिथे ऍपिअरन्स ह्या टॅब वरती टिचकी मारुन इफेक्ट्स् वरती क्लिक करा.

३) खालीच चित्रात दाखवल्याप्रमाणे स्टँडर्ड एइवजी 'क्लियर टाइप' निवडा.

बस! तुमच्या फायरफॉक्स मध्ये आता अक्षरे आयई सारखीच सुबक गुळगुळीत दिसू लागतील. ह्याचा आणखी एक फायदा म्हणजे असे केल्यानंतर आता मला निव्वळ मराठी स्थळेच नाहीत तर सगळे मराठी ब्लॉग देखिल माझ्या आवडत्या फाँटमध्ये बघता येतात.

माझी ही एकमेव अडचण फायरफॉक्सने दूर केल्याने आता आमचा तरी आयई ला कायमाचा राम राम!!

Comments

मस्त रे

मस्त रे कोल्या!
लेख व चित्रे एकदम चान. मी पण म्हणूनच करत नव्हतो.
आता मी पण राम राम करतो.

हे विकिवरही टाकणार का?

आपला
गुंडोपंत

विकि

हे विकिवरही टाकणार का?

टाकुया की! पण कुठे आणि कुठल्या विषयात ते सांगा लगेच टाकतो.

आता आमच्या फायरफॉक्स मध्ये मराठी विकी देखिल फार सुंदर दिसू लागले आहे :)

फाररफॉक्स

मला मराठी विकिवर शोध घेतल्यावर फायरफॉक्स नावाचे पान सापडले तेथे मराठी टंक नावाचा विभाग आहे. त्यात बहुदा हे टाकता येईल असे वाटते.
अजून ते व न्याहाळक/विचरक ही पाने वाढवताही येतील...

आपला
गुंडोपंत

मस्तच

एकदम साध्या भाषेत माहिती आणि कोणालाही समजेल असे स्पष्टीकरण. आम्ही सुद्धा आय. ई. ला या आगोदरच राम राम ठोकला आहे. पण या माहितीमुळे आनंददायक अनुभव मिळतो आहे. या लेखाला उपक्रमाच्या मुख्यपानावर जागा मिळावी अशी संपादक/उपक्रमपंत यांना विनंती.






टुकटूक...ठेंगा.....;-)

कोलबेर, तुम्ही चित्रांसह वगैरे छान समजावून दाखवले आहे. आता कुणालाच कळायला अडचण पडू नये. :-)

स्वगतः कोलबेरपंत, आत्ता तुम्ही हे वापरायला सुरुवात केलीत? आजानुकर्ण यांनी तुमचा लेख अजून वाचलेला दिसत नाही! ते नक्कीच कपाळावर हात मारुन घेतील. या आणि या लेखात बघा. ही पाने तुम्ही वाचली नाहीत काय? क्लिअर टाईपचे काम तर संगणकावर विंडोज टाकले की पहिले ते करावे.(ह.घ्या.) :-)

सौरभ.

==================

आयई

अभिनंदन. सुंदर लेख.
आकाशगंगेच्या इकडल्या कोपर्‍यातील जगात आयई हा एकमेव ब्राउझर असा आहे ज्याचे अपडेट केल्यावर तुम्हाला संगणक रिस्टार्ट करावा लागतो. इतर ब्राउझरप्रमाणे आयईच्या मेनूमध्ये अपडेट नाहीत. मासॉने कायद्यांमधून पळवाट काढण्यासाठी आयई आणि खिडक्या यांचे संबंध 'जनम-जनम का साथ है निभानेको' अशा प्रकारचे करून ठेवले आहेत. आणि आता आयईला पडलेली भगदाडे बुजवताना त्यांना नाकीनऊ येते आहे.
सूरजका सातवा घोडामध्ये आयईची काय परिस्थिती आहे कल्पना नाही.

ताक. मी योगेश वापरत होतो पण क्लिअर टाइपबद्दल माहित नव्हते. आता त्यामुळे अक्षरे अधिक सुबक दिसत आहेत. अनेक आभार.
----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

केले. पण्..

वर केल्याप्रमाणे सर्व काही केले, छान जमले. पण.....
उपक्रमावरील छापून आलेल्या मजकुराचा फॉन्टसाइझ थोडा छोटा आहे. परंतु लिहिलेल्या प्रतिसादातल्या अक्षरांचा साइझ जरा मोठाच आहे. दोन्हीतील अक्षरांचे आकारमान एक का नसावे? योगेश डिफ़ॉल्ट देवनागरी फ़ॉन्ट स्वीकारताना अक्षरांचे कोणते आकारमान मागायला हवे होते?
प्रतिसादातल्या अक्षराचे आकारमान मोठे झाल्याने, मजकुराचा रंग निवडताना आलेल्या रंगांचे चौकोनपण मोठे झाले, आणि त्यांतील रंगांच्या सीमारेषा एकमेकात मिसळून गेल्याने रंग निवडणे जड जाते आहे.
--वाचक्‍नवी

आकारमान

योगेश डिफ़ॉल्ट देवनागरी फ़ॉन्ट स्वीकारताना अक्षरांचे कोणते आकारमान मागायला हवे होते?
तो १२ वापरतो. अक्षरांचे आकारमान वेगवेगळे दिसणे (प्रतिसाद लिहिताना) जाणवले. पण प्रकाशित प्रतिसाद मूळ लेखाच्या आकारमानातच दिसल्याने ही अडचण मोठी वाटत नाही. याचा संबंध उपक्रमाशी असावा, योगेशशी नसावा.

आणखी एक अडचण..

आय्‌ईवर उघडलेल्या उपक्रमच्या मुखपृष्ठाचा शॉर्टकट डेस्कटॉपवर आय्‌कॉन स्वरूपात मांडता येत होता. फ़ाफ़ॉमध्ये ती सोय दिसत नाही आहे.
अजूनसुद्धा, आय्‌ईवरील अक्षरे फ़ाफ़ॉशी तुलना करताना काकणभर सुबकच आहेत. पण पूर्वी अगदीच नकोशी वाटायची, त्यापेक्षा खूपच सुरेख आहेत.
--वाचक्‍नवी

शॉर्टकट > बुकमार्क

तुमचा डिफॉल्ट ब्राउसर (न्याहाळक) आय ई असेल्याने तो शॉर्टकट आ.ई. मध्ये उघडतो. दोन पर्याय आहेत.
१. उपक्रमाला तुमचे फाफॉचे मुख्यपान बनवा. (टूल्स-ऑप्शन-मेन) याने फाफॉ उघडताच उपक्रम उघडेल.
२. (अधिक चांगला उपाय) उपक्रमाला तुमच्या बुकमार्क्स मध्ये स्थान द्या. (पत्ता लिहिण्याच्या ठिकाणी दिसणास्या चांदणीवर क्लिक करून.)
३. उत्तम उपाय फा.फॉ. ला तुमचा डिफॉल्ट न्याहाळक बनवा. (टूल्स>ऑप्शन्स>ऍडव्हान्सड्>जनरल, तळाशी)

मस्त

अगदी डिटेलवार दिलेल्या या माहितीबद्दल धन्यवाद, वरूणराव. अक्षरे एकदम सु-रेख दिसू लागलीत आता :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

छान

कोलबेर,
तुमचा खुप खुप आभारी आहे. मस्त समजावुन सांगितले आणी पटकन झाले. धन्यवाद ! :)

सफारीदेखील वापरून बघा

माझ्यामते केवळ फाँटसौंदर्याचीच चर्चा करायची असेल तर ते सफारी ह्या न्याहाळकावरच न्याहाळावे. सफारीवर ठळक (बोल्ड), तिरकी, तिरकी-ठळक अक्षरे जेवढी छान दिसतात तेवढी इतर न्याहाळकांवर दिसत नाहीत.

पण सफारीवर अजून हवा तो फाँट निवडण्यावर मर्यादा आहेत. मी फायरफॉक्स वापरतो कारण मला भरपूर एक्सटेंशने वापरता येतात. सौरभ म्हणतात त्याप्रमाणे 'क्लिअर टाइप' वापरूनही फाँटसौंदर्य खुलवता येईल.

योगेशचा प्रचार-प्रसार व्हायला हवा, एवढे मात्र खरे.

छान माहिती

छान माहिती दिलीत्. धन्यवाद.

धन्यवाद..

आम्हीही कोलबेररावांनी सांगितलेला प्रयोग करून पाहिला. कोलबेररावांचे आभार..

परंतु एक गोष्ट मात्र आहे की आय ई ज्या सहजतेने चालतो तेवढ्या सहजतेने फायरफॉक्स चालत नाही. सांगायचा मुद्दा असा की आय ई च्या एकापेक्षा अधिक खिडक्या उघडल्या असता संगणक मंद गतीने चालत नाही, मात्र त्या तुलनेत फायरफॉक्सच्या बाबतीत मात्र संगणक चालण्याचा वेग कमी होतो. असे का?

कोलबेरपंत ह्या संदर्भात काही उपाय आहे का?

आपला,
(शिकाऊ) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

संगणक चालण्याचा वेग

आय ई च्या एकापेक्षा अधिक खिडक्या उघडल्या असता संगणक मंद गतीने चालत नाही, मात्र त्या तुलनेत फायरफॉक्सच्या बाबतीत मात्र संगणक चालण्याचा वेग कमी होतो.

ह्याचा अर्थ तुम्ही आय् ई च्या (एकाच खिडकीमधे) एकापेक्षा जास्त टॅब्स उघडत आहात असा अर्थ मी घेतो.

फायरफॉक्स उघडायला आय ई पेक्षा थोडा जास्त वेळ लागतो हे खरं आहे.

पण एकदा कार्यरत झाल्यावर त्यातल्या टॅब्स उघडायला काही त्रास झाला नाही पाहिजे. मला तरी होत नाही.

ही काहीतरी तुमच्या संगणकाशी निगडीत समस्या असू शकते.

फायरफॉक्स प्रीलोडर

आय ई साठी वापरात येणार्‍या अनेक लायब्र्या विंडोजच्या नेटिव असतात त्यामुळे संगणक चालू केल्यावर त्यातील बहुतेक मेमरीमध्ये आपोआप लोड होतात. नंतर आयई फक्त त्या वापरते. आयईला वेगळे काही लोड करावे लागत नाही असे वाटते.
फायरफॉक्स मात्र स्वतःच्या लायब्र्या आणत असल्याने त्या लोड होण्यासाठी थोडा वेळ लागतो. विंडोज वापरकर्त्यांना फायरफॉक्स प्रीलोडरसारखे काही पर्याय उपलब्ध आहेत. स्वतःच्या जबाबदारीवर हे वापरुन पाहता येतील.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फायरफॉक्स २.क्ष मध्ये

फायरफॉक्सच्या द्वितीय आवृत्तीमध्ये मेमरी लीकचा प्रॉब्लेम होता असे दिसते. ३.० मध्ये ही अडचण दूर केली आहे


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एक शंका

विंडोजची माहिती असणार्‍यांसाठी एक प्रश्न आहेः

कोलबेरपंतांच्या सूचनेतील दुसरी पायरी ही संपूर्ण संगणकावरील फाँटांचे सेटिंग बदलणारी आहे. (केवळ फायरफॉक्सचे नाही). मात्र हे सेटिंग न करताही आधी आयईवर क्लीअर टाईप फाँट का दिसत होते व फायरफॉक्समध्ये का दिसत नव्हते? वर सांगितलेले सेटिंग केल्यावर आयईमध्ये अक्षरे दिसण्यात काही फरक पडला का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

विंडोज विस्टा

विंडोज विस्टावर मी जेंव्हा कोलबेरच्या सुचना पाळल्या त्यावेळी क्लिअर टाईप फाँट हे सेटिंग आधी पासुनच होते. बदलण्याची गरज पडली नाही.

अवांतरः सी डॅक ने आहार शास्त्रासाठी नवे सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. त्या बद्दल काही माहिती आहे का?






सेटिंग

मात्र हे सेटिंग न करताही आधी आयईवर क्लीअर टाईप फाँट का दिसत होते व फायरफॉक्समध्ये का दिसत नव्हते?

कारण 'क्लिअर टाईप' हे सेटींग सगळ्यांच्याच पसंतीस उतरते असे नाही. तसेच सगळ्याच मॉनीटरांवरती ते आकर्षक दिसत नाही असेही ऐकून आहे. उदा. काही जून्या सीआरटी मॉनीटरांवरती ते फार खराब दिसते. म्हणून डीफॉल्ट सेटींग्ज् मध्ये ते डिसेबल्ड् ठेवलेले असावे.

सेटींग क्लिअर टाईप केल्यावर आय.इ. मध्ये काहीही फरक पडला नाही.

चाणक्य म्हणतात ते बरोबर आहे. विस्टा मध्ये मात्र डिफॉल्ट सेटींग्ज क्लिअर टाइप आहे. कारण विस्टा वापरणारा वर्ग हा तुलनेने जास्त अत्याधुनिक संगणक वापरतो आणि म्हणून वरची समस्या येत नसल्याने मायक्रोसॉफ्टने ते डिफॉल्ट् सेटिंगमध्ये घातले असावे.

 
^ वर