आयई मध्ये गंभीर धोका! फाफॉ वापरा.

आयई (ईंटरनेट एक्स्प्लोरर) मध्ये गंभीर सुरक्षाधोका असल्याचे मासॉने जाहीर केले आहे. याचा उपयोग करून तुमच्या संगणकाचा ताबा घेता येऊ शकतो आणि तुमचे पासवर्ड चोरता येऊ शकतात. अधिक माहिती इथे.
सगळ्यात बेष्ट म्हणजे आजच फाफॉ वापरायला सुरूवात करा.

Comments

धन्यवाद

आजच पहाटे ही बातमी टिव्हीवर (चॅनेलः एबीसी) पाहिली. मायक्रोसॉफ्ट जो पर्यंत पॅच देत नाही तोपर्यंत कोणत्याही पैशांच्या व्यवहारासाठी आय ई अजिबात वापरू नका असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

अवांतरः आईमध्ये गंभीर धोका असे वाचून जरा गंमत वाटली. ;-)

धन्यू

आईमध्ये गंभीर धोका असे वाचून जरा गंमत वाटली

गलतीसे मिष्टेक हो गया :)

बाकी मासॉ आज १७/१२/०८ रोजी १८०० (GMT) वाजता हा धोका दुरुस्त करणारा प्याच(ठिगळ*?) प्रकाशित करणार आहेत अशी बातमी आहे. असे असले तरी आयई वापरणे सोडावे असे सांगावेसे वाटते. खिडकीधारकांना आयई वापरणे संपूर्ण बंद करता येणार नाही मासॉच्या संकेतस्थळावरून अपडेट किंवा इतर काही हवे असले तर त्यांना आयईच लागतो. (हाइट ऑफ इनसिक्युरिटी!)

*दर महिन्याला एक ठिगळ? व्हिस्टा आहे की गोधडी? :)

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

:)

१. प्याच मराठी शब्द आहे. पॅच हा इंग्रजी समजा हवंतर
२. दर महिन्याला एक असे म्हणून व्हीस्टाचा घोर अपमान करताय ... साधारणतः दर आठवड्याला क्वचित प्रसंगी दर २-३ दिवसांत ठिगळ जोसून मिळते... अहो त्या मासॉतहि आयटी लोकं आहेत त्यांचं पोट कसं भरणार?

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सहमत

सहमत आहे. मी आपलं लाजेकाजेस्तव महिना म्हटल. व्हिस्टाबाबत कुठेतरी वाचल की "It is not good enough even for piracy" :)

आणि मासॉची गंमत म्हणजे सिक्युरिटी प्याच काढला की लगेच ह्याकर लोक त्या प्याचमध्येच पुन्हा चोरट्या वाटा शोधतात. आता जानेवारीत सूरज का सातवा घोडा उर्फ विंडोज सेवन येतय. आधीच्या उसवलेल्या गोधड्या तशाच ठेवून नवीन शिवायला सुरूवात. :)

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

प्याच

मासॉच्या चटक्यांचे दु:ख विसरण्यासाठी हा एक प्याला प्याच.

प्याला

मासॉचे दु:ख विसरण्यासाठी प्याला नाही, ग्यालनभर रासायनिक द्रव्यांची आवश्यकता आहे.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

धन्यवाद

आजच फायरफॉक्स उतरवून घेऊन वापरायला सुरुवात केली. एक्स्प्लोररच्या तुलनेत फारच बरे वाटते आहे. धन्यवाद.
सन्जोप राव

अपडेटवर अपडेट

मासॉने अपडेट प्रकाशित केला आहे.

अजूनही आयईशी एकनिष्ठ असणार्‍यांसाठी क्रोम, फाफॉ आणि आयई ची तुलना इथे.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

विषय निघालाच आहे तर

IE आणि FF यांची तुलना करताना: मी जेव्हा 'उपक्रम' किंवा अन्य मराठी संकेतस्थळे उघडतो, तेव्हा IE मध्ये दिसणारा मराठी फाँट FF च्या फाँटपेक्षा बराच सुबक असतो. या एकाच कारणामुळे सगळे दोष असुनसुध्दा प्रत्येकवेळी IE वरच टिचकी मारली जाते.

कबूल

सहमत आहे. मीही कधीकधी त्याच साठी वापरतो. आणि याचप्रमाणे व्हिस्टाची हजार लफडी असूनही व्हिस्टा वापरण्याचे एकमेव कारण म्हणजे एज ऑफ एम्पायर्स किंवा सिव्हिलायझेशन खेळता यावे म्हणून. :)
पण इथे एक वेगळा मुद्दा आहे. मराठी माणसांचे हे कारण झाले पण जगात इतरत्र लोक आयई कशासाठी वापरत असतील? अजूनही मासॉचे आयई मार्केट ७२% (अबब!) आहे. याला लोकांची अपथी (शब्द?) म्हणावे का?

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

उदासीनता

अपथी (शब्द?)

हो

धन्यू, उदासीनता चालेल असे वाटते.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

हेच हो!

मराठी संकेतस्थळे उघडतो, तेव्हा IE मध्ये दिसणारा मराठी फाँट FF च्या फाँटपेक्षा बराच सुबक असतो. या एकाच कारणामुळे सगळे दोष असुनसुध्दा प्रत्येकवेळी IE वरच टिचकी मारली जाते.

अगदी हेच कारण हो...

असो,

फाफॉ मध्येही आय ई 'सुबक मराठी टंक' दिसावेत यासाठी काय करता येईल?

आपला
गुंडोपंत

सीडॅक योगेश

सीडॅक योगेश टंक उतरवून घ्या. व तो फाफॉ च्या ऑप्शन्स कन्टेन्ट मध्ये बदला. अक्षरांतील अंतरातला किंचित फरक सोडल्यास अक्षरे आय.ई. इतकीच सुबक दिसतात.

(मंगल अंमळ अमंगल आहे.)

अगदी

फायरफॉक्समध्ये जो हवा तो फाँट लावता येतो. मराठी संकेतस्थळांवर साधारणतः योगेशची चलती आहे. ;) सीडॅकचा हा फाँट उतरवून घेतला की तो वापरता येईल.

मंगल फारच वाईट आहे. अर्थात मायक्रोसॉफ्टने रोमन फाँटांइतकी मेहनत देवनागरीवर घेतलेली नाही. मायक्रोसॉफ्टचे इंग्लिश फाँट सुरेख आहेत.

आकृती-देवनागरी फाँट जर उपलब्ध असतील तर ते लावावेत. मराठी संकेतस्थळे फार सुंदर दिसू लागतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मदत...

सीडॅक योगेशने फाफॉमध्ये मराठी आयईसारखेच छान दिसते. मागे कर्णभाऊंनीच आम्हाला मदत केली होती. (चांगला माणूस आहे हो तो!) ;-)
पुन्हा एकदा धन्यवाद!

-सौरभ.

==================

'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'

माहिती आवडली

मागे कर्णभाऊंनीच आम्हाला मदत केली होती. (चांगला माणूस आहे हो तो!) ;-)

माहितीपूर्ण संकेतस्थळावर आणखी एक चांगली माहिती / बातमी !!! ( ह. घ्या )

वा, नेमकी माहिती दिलीत!

त्याला शतश: धन्यवाद!

दुवा: http://tdil.mit.gov.in/download/GISTYogeshN.htm
येथून उतरवला. अन झिप केला. त्यातल्या टीटीएफ एक्स्टेंशच्या फाईल्स
CDACOTYGB.TTF, CDACOTYGN.TTF, CDACYGIT.TTF
कंट्रोल पॅनल मध्ये फाँट्स नावाच्या फोल्डर मध्ये पेस्ट केल्या.

फायरफॉक्स च्या
टुल्स > ऑप्शन्स > कंटेंटस्
मधील टाइम्स हा टंक काढून टाकला हवा तो आकार घेतला आणि अहाहा!
फायरफॉक्सवर सुंदर, कोरीव, गोलाकार अक्षरे उपक्रम डॉट ऑर्ग येथे उमटली!

आता माझी आगकोल्ह्या विषयी कोणतीच तक्रार नाही.
याच एका कारणाने मी आय ई वर जायचो. आता ते ही काम नाही.
हा टंक इतका सुरेख आहे, आवडलाच!

आपला
गुंडोपंत

थोडा बदल

गुंडोपंत,

माझ्या मते हा फाँट मशीनवर असला की फायरफॉक्समध्येही काही सेटिंगा कराव्या लागत नाहीत.

मात्र तुम्ही केलाच आहे तर अजून थोडा बदल असा की, कंटेंट मध्ये फॉन्ट बदलताना ऍडवान्स्ड वर क्लिक करा. तेथे फॉन्ट फॉर देवनागरी निवडा व त्यासाठीच हा फॉन्ट लावा. म्हणजे इंग्रजी सायटी त्यांच्या मूळ फाँटातच दिसू लागतील. व हा फाँट फक्त देवनागरी सायटींसाठीच (ज्यांच्या हेडरमध्ये lang="mr" असते त्या) लागू होईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आणखी एक अडचण -

फायरफॉक्स मध्ये योग्य फॉन्ट्स् असल्यास मराठी छान दिसते खरे, पण मराठी टेक्स्ट जेव्हा जस्टीफाइड असते तेव्हा फारच खराब दिसते. याला काही उपाय.

फायरफॉक्स ३.०

फायरफॉक्स ३.०.x मध्ये जस्टिफाई़ड टेक्स्टची अडचण मला आली नाही. तुम्ही कोणते वर्जन वापरत आहात.

मी हे वाक्य जस्टिफायित केले आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसते का? अग्निकोल्ह्याची तिसरी आवृत्ती वापरुन पाहा.

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फायरफॉक्स ३.०

धन्यवाद. आपण लिहिलेले वाक्य पहिल्यांदा पाहिले तेव्हांही पूर्वीसारखेच , म्हणजे अक्षर वेगळे व त्याचा काना, मात्रा, वेलांटी वगैरे वेगळे असेच दिसले. पण वर्जन विचारलेत तर ते ३.०.३ होते. मग आधुनिक वर्जन ३.०.५ घेतल्यावर आता एकदम व्यवस्थित दिसते आहे. परत धन्यवाद.

आकृती चित्रलिप्या आणि फायरफॉक्स

उपक्रम दिवाळी अंकाचे काम चालू असताना घेतलेली ही चित्रे.

त्यातील एका लेखाचे आकृतीच्या लिप्या वापरुन होणारे फायरफॉक्समधले दर्शन पाहा.

मनोगताच्या दिवाळी शुभेच्छा या फॉण्टात असतात.

हा फॉण्ट लायनक्समधील लोहित आणि लोकसत्तेच्या वरुणच्या बराच जवळपास जाणारा आहे. यात र वगैरे छान दिसतात.

मनोगतही कसे दिसते ते पाहा.

सर्व चित्रे जुनी आहेत.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सफारी

मी मागील १ वर्ष सफारी वापरत आहे. मराठी अक्षरे अतिशय सुबक दिसतात. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही समाधानकारक आहे.
मुख्य फायदा:(माझ्यासाठी महत्वाचा कारण मी कधीकधी खूप आळशी होतो.) सर्व अर्जांतले रकाने-नाव, पत्ता, विरोपाचा पत्ता, आयडी, पासवर्ड-सर्वकाही आपोआप भरले जाते. उदा. कोठे सदस्यत्व नोंदणी करायची असताना फक्त शेवटच्या सबमीट वर टचकी मारली की काम होते.
दिसायला सुबक आहे.
ब्रॉडबँड वर नाही जाणवत पण स्लो जोडणी असेल तर ब्राउझिंग वेगवान होते आयई पेक्षा.
ई. ई.

 
^ वर