फायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचण्यासाठी युक्ती

तुम्हीही माझ्यासारखेच जर कुमार केतकरांचे फ्यान असाल तर सकाळी सकाळी लोकसत्ता वाचल्याशिवाय दिवस चांगला जात नाही हा अनुभव तुम्हालाही आला असेल. :)

मात्र लोकसत्ता युनिकोडित नसल्याने काही अडचणी आहेत. त्यासाठी खालील युक्त्या वापरा.
१. लोकसत्ताचा मिलेनियम वरुण हा फाँट उतरवून घ्या आणि तो इन्स्टॉल करा.

२. लोकसत्ता फायरफॉक्समध्ये वाचताना प्रत्येक पानावर कॅरॅक्टर एनकोडिंग बदलावे लागते, हे थोडे त्रासदायक आहे.

त्यासाठी युक्ती म्हणजे फायरफॉक्स वापरकर्त्यांनी खालील ऍडऑन लावून घ्यावे.

येथून घ्या

नंतर www.loksatta.com उघडून View->Sidebar->Content Preferences सुरु करावे. डाव्या बाजूला उघडलेल्या खिडकीत www.loksatta.com टॅबवर जावे. तिथे कॅरॅक्टर एनकोडिंग मध्ये Western (ISO-8859-1) निवडावे.

लोकसत्ता व्यवस्थित वाचता येईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

वा

वा!
करून पाहिले दिसले...

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

आय् ई तुन फाफॉ त येताना त्रास झाला. पण आता ही युक्ती वापरल्यावर समाधान वाटले, धन्यवाद अजा.
प्रकाश घाटपांडे

धन्यू

उपयुक्त माहिती. आता आयईला रामराम म्हणायला हरकत नसावी.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अरे व्वा!

कर्ण, हा प्रश्न विचारणारच होतो. तुम्ही आधीच उत्तर दिले. खूप खूप धन्यवाद.
आमची आधीची युक्ती सांगण्याचा मोह आवरत नाही.
१) कुणी दुवा दिला असेल तर फाफॉमध्ये नवीन टॅबमध्ये ओपन करा.
२) तिथे जाऊन ऍड्रेस पूर्ण सिलेक्ट करा. नवशिक्यांना पहिल्यांदा सिलेक्ट करायला अडचण येते. सरावाने जमायला हरकत नाही.
३) राईट क्लिक करुन कॉपी पर्याय निवडा.
४) नंतर आयई उघडा.
५) उघडायला पाच मिनिटे लागतात. तोपर्यंत सैपाकघरात जाऊन काहीतरी तोंडात टाकून या.
६) आयई उघडल्यावर आधीचा ऍड्रेस पेस्ट करा. एन्टर मारायला विसरु नका.
७) मधल्या वेळात दरवाजाच्या आयहोलमधून कोणी दिसते का बघा.
८)फिशिंग फिल्टर ने चेकबिक करुन झाले, पूर्ण पान आले की वाचायला सुरुवात करा.

आता माझा इतका वेळ वाचेल की आयुष्यात काही अजून करुन दाखवता येईल. ;-)

-सौरभदा

==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

अरेच्या!

आम्हाला वाटले ही आमच्या आयडियाची कल्पना आहे. आम्ही याचे पेटंट घेणार होतो. :)
सकाळी उठल्यावर आम्ही देवाला नमस्कार वगैरे करण्याआधी व्हिस्टा सुरू करतो. मग दात घासणे, चहा टाकणे, तो होणे आणि घेणे हे सर्व होईपर्यंत व्हिस्टा कसेबसे सुरू होते. तोच प्रकार विंडोज अपडेट करतानाचा.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

अगदी

काही वर्षांपूर्वी डेस्कटॉपवर फक्त विंडोज होते तेव्हाची गोष्ट अशी की ऑफिसातून आल्यावर पहिल्यांदा डेस्कटॉप चालू करायचो. त्यानंतर मग बूट काढायला, कपडे बदलायला वगैरे.

सगळे आवरून चहा टाकला की मग विंडोजची स्टार्टअप धून ऐकू येऊ लागायची.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फक्त आयई

मस्त प्रतिसाद.

दुर्दैवाने काही सायटी या फक्त आय.ई.वरच चालतील अशा असतात. उदा. आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंड, व मी काम केले/करतो त्या कंपन्यांच्या इण्ट्रानेट सायटी वगैरे. (इण्ट्रानेट सायटींचे समजण्यासारखे आहे कारण इण्ट्रानेट सायटींची निर्मिती करताना सामान्यतः बेंचवरील मंडळी किंवा नवे आलेले कॉलेजकुमार प्रामुख्याने वापरले जातात. अशा प्रकल्पांपासून गुंतवणुकीवर थेट फायदा (ROE) नसल्याने या सायटींच्या रचनेत फार ढिसाळपणा असतो. काही हेचटीएमएल ट्याग फायरफॉक्स व इण्ट्रानेट मध्ये पेज रेंडरिंग करताना वेगवेगळ्या प्रकारे दाखवतात त्यामुळे कोडिंग करताना फार काळजी घ्यावी लागते. शिवाय टेस्टिंगचे तासही वाढतात. त्यात बचत करण्याचा हेतू असावा.)
तिथे आय.ई.ला दुर्दैवाने पर्याय नाही. काही ठिकाणी युजर एजंट स्विचर या ऍडऑनचा उपयोग होतो. नशीबाने फक्त आयई वरच चालणाऱ्या सायटींची संख्या फार मर्यादित आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आणि

मासॉकडून काही हवे असले तरी आयईच लागते. उदा. हजारावा अपडेट घेण्यासाठी किंवा दोन हजारावा प्याच घेण्यासाठी.

----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

लॉजिकल

तसे ते लॉजिकल आहे. म्हणतात ना चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उपयुक्त

माहिती. नाहीतर प्रत्येक पान पाहण्यापूर्वी व्ह्यू->कॅरॅक्टर एन्कोडिंग मध्ये जाऊन बदल करावा लागायचा. लोकसत्तेचे बदललेले 'कॅरॅक्टर' पाहता हे प्रतीकात्मक वाटायचे, हा भाग अलाहिदा :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आमची युक्ती

लोकसत्ताच्या बातम्या नेटावर इसकाळ प्रमाणे अपडेट होत नाहीत. त्यामुळे आम्ही घरचा पेपर लोकसत्ता घेतो जो आजचा उद्याच अपडेट होतो. मग ती छापिल आवृत्ती असो वा ऑनलाईन. त्यामुळे सकाळ ऑनलाईन बरा वाटतो.





लोकसत्ता !

आधी कधी काळी वाचायचो लोकसत्ता !

आज काल नाही वाचला कारण फॉन्ट ची अडचण .. ही लोकं कधी युनीकोड वर येणार काय माहीत..

व पुढारी / सकाळ चे नवीन रुपडं पाहीलं तर् एकदम हसू आलं होतं.. च्या मायला एचटीएम व एसपी / पिचपी शिकत असलेलं शाळेचं पोरं देखील ह्या पेक्षा मस्त वेबसाईट तयार करु शकेल ;)

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

कोडे

माझ्या एका संगणकावरती ही युक्ती पूर्णपणे यशस्वी झाली, दुसर्‍या संगणकावर मात्र सपशेल फसली - साइडबार दिसतो आहे, पण लोकसत्तेच्या संकेतस्थळावर युनिकोड-चौकोन-गोळे आणि वेस्टर्न-चौकोन गोळे वेगळे दिसतात, हाच काय तो फरक.

फाफॉ पुन्हा नवीन उतरवला, मिलेनियम वरुण फाँट पुन्हा स्थापित केला...

कदाचित

फॉंट काढून टाका व पुन्हा टाकून पाहा.

मायक्रोसॉफ्ट मधील सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणजे रिस्टार्ट. त्याचप्रमाणे फॉंट काढून पुन्हा टाकला तर चालायला हवे असे वाटते


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हे ही करून बघा

फायरफॉक्सच्या मेन्यूबार मधून टूल्स -> ऑप्शन्स -> फाँट्स अँड कलर्स -> ऍडव्हान्स्ड ह्या ठिकाणी गेल्यावर एक "Allow pages to choose their own fonts, instead of my selection above" असे चेकबॉक्स आहे. त्याचे सेटिंग बदलून बघा. (ऑन असेल तर ऑफ किंवा उलटे).

(लिनक्स मध्ये ह्या सेटिंगकडे जाण्याचा रस्ता एडिट -> प्रेफरन्सेस -> फाँट्स अँड कलर्स -> ऍडव्हान्स्ड असा आहे)

माझ्या एका संगणकावर लोकसत्ता नीट वाचता येतो - तर दुसर्‍यावर वर सांगितलेला प्रकार करावा लागतो. (आणखी एक मजा म्हणजे त्या चेकबॉक्सच्या एका सेटिंगमध्ये लोकसत्ता दिसतो, पण म. टा. नाही ; तर् दुसर्‍या सेटिंगमध्ये बरोबर उलटे).

-अमित

विंडोजचा किडा

प्रशासक म्हणून नोंद केल्याशिवाय "मिलेनियमवरुण" हा फाँट या नाठाळ संगणकावर मला उपलब्ध नव्हता. (हे नेमके कसे? हे कोडे सोडवायची मला काहीच इच्छा नाही.)

अनेक खटपटी करून तो फाँट आता सामान्य वापरणारा म्हणूनही उपलब्ध केला आहे.
(तो परतपरत खोडून, अनेक द्राविडी प्राणायामांनी पुन्हा बसवावा लागला.) मग आजानुकर्ण यांची युक्ती या संगणकावरसुद्धा कामी आली.

(सामान्यपणे प्रशासक म्हणून मी संगणकावर येत नाही. उगीच कशाला कुठल्या विषाणूला सदासर्वकाळ मोकळीक द्या!)

लोकसत्ता युनिकोडित

लोकसत्ताचा आजचा अंक युनिकोडित आहे असे दिसते. कदाचित आजपासून रोजच युनिकोडित लोकसत्ता मिळेल. मात्र लोकप्रभा व जुने अंक वाचण्यासाठी वरील युक्तीचा उपयोग होईल. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हेच

हेच!!!
आशा आहे आत युनिकोडीत असेल...
आपला
गुंडोपंत

तरीच्!

काल लोकसत्ता फायरफॉक्सात उघडला आणि नेहमीप्रमाणे पान पूर्ण उघडण्याची वाट न पाहता कॅरॅक्टर एन्कोडिंग बदलले, तर मराठी अक्षरे नीट दिसेनात. तेव्हा हे कशामुळे झाले असावे ह्यावर बराच विचार केला, पण उत्तर सापडेना. तेव्हा विविध एन्कोडिंग वापरून पाहू असे म्हणत युनिकोड केले तर अहो आश्चर्यम्! लोकसत्ताला उपरती झाली तर! लोकसत्ताचे अभिनंदन!

शंका

फायरफॉक्सवर उपक्रम वाचता येण्यासाठी काय करावे? माझ्या मशिनची ओ.एस्. विन्डोव्ज एक्स.पी. आहे. अक्षरं दिसत आहेत पण वेलांट्या आणि जोडाक्षरे नीट दिसत नाहीत.
राधिका

फायरफॉक्सवर उपक्रम

फायरफॉक्सवर उपक्रम व इतर युनिकोडित संकेतस्थळे दिसत नसतील तर तुमच्या कम्प्यूटरवर रिजनल-लँगवेज ऑप्शन्समध्ये कॉम्प्लेक्स सपोर्ट टाकला की ही संकेतस्थळे दिसू लागतील. अधिक माहिती इथे मिळेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

धन्यवाद
राधिका

.

अजानुकर्ण,
तुम्ही सांगीतलेल्या युक्तिने फायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचणे शक्य होऊ लागले. आभार.

या खटपटीमध्ये मराठी फॉन्ट्स बद्दल जालावर इतरत्र सुद्धा वाचन केले. त्यात मायक्रोसॉफट ऑफिसमध्ये मराठी फॉन्ट्स टाकले. इतके दिवस लोकसत्ता आयई मध्ये सुद्धा उघडत नसे. आयई बंदच पडत असे. तर आता त्यात सुद्धा तो उघडू लागला.

माहिती बद्दल आभार.
--लिखाळ.

लोकसत्ता युनिकोडीत झाला

गेले दोन दिवस लोकसत्ता युनिकोडीत झाल्यासारखा वाटतो आहे. आता काहीही विशेष न करता फायरफॉक्समध्येही वाचता येतो.

सोपी चाचणी, कॉपी-पेस्ट चालते आहे. ही आजची प्रमुख बातमी:

मुंबई हल्ल्यात पाकिस्तानातील काही संशयित दहशतवादी सामील असल्याबाबतचे पुरावे एफबीआयने पाकिस्तानला सादर केले आहेत. पाकिस्तानने मात्र हे पुरावे फेटाळले असल्याचे सांगण्यात येते. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांनी भारतीय कमांडो आल्याचा संदेश गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांना दिला होता...

चला देव पावला. ;-)

वरचे प्रतिसाद आताच पाहिले. :-)

लोकसत्ता युनिकोडीत

ही बातमी समजल्याने आनंद झाला.
आता लोकप्रभा कधी येणार त्याची वाट पाहतो आहे.

 
^ वर