इतक्यात काय पाहिलेत? - भाग १

आठवड्यातून दोन किंवा एक दिवस सुट्टी. काही वेळ रिकामा. अशा वेळी एखादा सुंदर चित्रपट बघता आला तर आटवलेल्या दुधात केशर, बदाम, पिस्ते. पण निवड कशी करायची? आणि अशात घजनीसारख्या एखाद्या मरतुकड्या घोड्यावर पैसे लावले तर तीन तास गेल्यावर सुट्टी फुकट गेल्याचे दु:ख होतेच शिवाय आमिरने हे काय केले हा मनस्ताप वेगळा.

हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी एखादी यादी असली तर? हा चर्चाप्रस्ताव अशा यादीसाठी आहे. हेतू हा की यादी पाहून चटकन चित्रपट ठरवता यावा आणि सुट्टी सत्कारणी लागावी. साधारण रूपरेखा अशी.

१. चित्रपट आवडला असेल तर एक-दोन ओळीत काय विशेष आहे ते सांगावे. अर्थात चित्रपटावर वेगळा परीक्षणात्मक लेख लिहायचा असेल तर स्वागतच आहे. पण प्रत्येक आवडलेल्या चित्रपटावर लेख लिहीणे शक्य होत नाही.
२. चित्रपट शक्यतो अपरिचित असावा. यात नवे, नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट येतीलच. पण जुने, परिचित नसलेलेही येऊ शकतील. उदा. मागे शशांकने 12 अँग्री मेन या सुंदर चित्रपटाची ओळख करून दिली होती. फक्त शोले किंवा म्याट्रिक्स असे आख्ख्या ब्रह्मांडाला माहित असलेले चित्रपट नसावेत.
३. खूप प्रसिद्ध चित्रपट टुकार असेल तर पाहू नका असे सांगावे. उदा. घजनी*
४. प्रतिसादाच्या शीर्षकात चित्रपटाचे नाव असल्यास वाचन सोपे होईल.

*घाव बराच खोल गेलेला दिसतो!

Comments

ओये लकी! लकी ओये!

ओये लकी! लकी ओये!
निरनिराळ्या शहरात मोठमोठ्या चोर्‍या करून बराच माल जमवणार्‍या एका चोराच्या सत्यकथेवर आधारित. मुख्य भूमिकेत अभय देओल संयत अभिनय करतो, बरेचदा अनुपमातील जुना धर्मेंद्र आठवतो. परेश रावल ट्रिपल रोलमध्ये धमाल. वेगळ्या विषयावरील हलकीफुलकी कॉमेडी.

अवांतर : अशीच यादी आवडलेल्या पुस्तकांवरही करता आली तर 'टांगा पलटी, घोडे फरार!' :-)
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

काही जुने धागे

अशीच यादी आवडलेल्या पुस्तकांवरही करता आली तर 'टांगा पलटी, घोडे फरार!' :-)

राजेंद्रराव ,

हे काही जुने धागे तुम्ही (त्यावेळी) पाहिले का नाही हे माहीत नाही. नसल्यास ते कदाचित् तुम्हाला रोचक वाटावेत.

http://mr.upakram.org/node/813
http://mr.upakram.org/node/830

धन्यू

मुक्तराव,
अनेक आभार. हे नक्कीच पाहिले होते, लिहीताना आठवले नाहीत.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

ओये लक्की

ओये लक्की लक्की ओये नुकताच पाहिला. या चित्रपटात नक्की काय आवडले हा प्रश्न तसा अवघड आहे. काहीतरी वेगळे आहे हे खरे. सर्वात आवडली म्हणजे चित्रपटाची 'ट्रीटमेंट'. कुठेही हा चित्रपट ठराविक साच्यात अडकत नाही. अनेक अशक्यप्राय घटना, प्रसंग दाखवूनही चित्रपट अगदी खराखरा वाटतो. तसा 'टिपिकल' विनोदीही नाही. विनोदी बनवण्याचा प्रयत्न करणे शक्य असूनही तो मोह दिग्दर्शकाने टाळला आहे हे विशेष. अभिनय कुठेही आवश्यकतेपेक्षा कमीजास्त होत नाही. अभय देओलने मस्त काम केले आहे. परेश रावल उत्तम. जरूर पाहावा असा चित्रपट!

रबने बना दी जोडी

या नावाचा "रबडी-मिक्स" फुटकळ चित्रपट पाहण्याचा प्रयत्न मध्यंतरी केला होता. पाहवला नाही तेव्हापासून हिंदी चित्रपटांपासून २ हात दूर राहायचे असे ठरवले.

मार्ली अँड मी पाहिला दोन आठवड्यांपूर्वी. चांगला आहे पण डिविडी आली की बघा.

- राजीव.

मेमेंटो

अलिकडे "गझनी"/"घझिनी" या बहुचर्चित हिंदी चित्रपटाच्या संदर्भात "मेमेंटो" या चित्रपटाचे उल्लेख आले. त्यामुळे हा चित्रपट पाहून टाकला. ("गझनी"/"घझिनी" बद्दल मनात तीन तास फुकट घालवण्याबद्दलची भीती आहे. त्यामुळे तो पाहिला नाही.)

"मेमेंटो" हा एकूण श्रीमंत असा अनुभव असला तरी गुंतागुंतीचा आहे हे आधीच ऐकले होते. त्यामुळे सब्-टायटल्स् (क्याप्शन्स्) ऑन ठेवून पाहिला , आणि असे केल्याबद्दल स्वतःचे नंतर अभिनंदन केले. कारण असे करूनही हा चित्रपट आपल्याला थोडासा समजेल असे वाटण्याकरता दोनदा पहावा लागला. मात्र दोन्ही वेळेला पाहण्याचा अनुभव , आनंददायकच होता.

"गझनी"/"घझिनी"मुळे आता सर्वश्रुत असलेली सिनेमाची स्टोरी म्हणजे , एका माणसाच्या बायकोवर अत्याचार् होऊन तिचा खून झालाय. या झटापटीत , खुन्याने त्या माणसाला डोक्यावर अघात केल्याने, त्याची शॉर्ट्-टर्म् स्मृती नाश पावलेली आहे. म्हणजे , या क्रूर प्रसंगीच्या आधीचे पूर्वायुष्य त्याला पूर्ण आठवते , ज्यात त्याच्या बायकोच्या स्मृती आहेत, आणि डोक्याला इजा होण्याच्या क्षणापर्यंतच्या. शुद्धीत आल्यानंतरची त्याची स्थिती अशी होते , की , त्याला चालू क्षणापूर्वीची केवळा १५ मिनिटे आठवतात ! याचा अर्थ , दर १५ मिनिटानी त्याची पाटी कोरी होत रहाते. मग या एकाकी अवस्थेत तो त्याच्या दृष्टीने खुन्याचा शोध घेतो असे कथानक.

काही रोचक गोष्टी :

१. चित्रपट फ्लॅशबॅकमधे घडतो : १५-१५ मिनिटांच्या स्मृतीचे फ्लॅशबॅक्स्.याचा अर्थ चित्रपटाच्या सुरवतीलाच नायकाला "खुनी" सापडलाय. मग तो या बिंदूपर्यंत कसकसा आला याचे फ्लॅशबॅकमधले चित्रण. असे केल्याने चित्रपटाच्या प्रत्येक सीनमधे त्यानंतर येणार्‍या सीनकरताचे क्लूज् येतात. त्यामुळे चालू सीनमधे काय घडते आहे याची कारणीमीमांसा म्हणा किंवा एकूण लिन्क तुम्हाला पुढच्या सीन मधे लागत रहाते.

२. इतकी गुंतागुंत कमी पडते म्हणून की काय , ब्लॅक ऍंड व्हाईट मधला अजून एक धागा चित्रपटात चालतो. या ब्लॅक-ऍंड्-व्हाईट् धाग्यात कथानक क्रोनोलॉजिकली (मराठी शब्द ??) पुढे सरकते. या धाग्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे , नायक ज्या एका मोटेलमधे एकाकी अवस्थेत आहे तिथे तो एका माणसाशी फोनवर बोलतोय, आपल्या पूर्वायुष्याबद्दल , आपल्या सद्यस्थितीबद्दल. चित्रपटाच्या अखेरीपावेतो हे दोन धागे मर्ज होतात.

३. माझ्या दृष्टीने सगळ्यात आवडलेला भाग : हे सारे जगत असताना, या सार्‍या स्मृतीरूप मृगजळामागे धावत असतानाची नायकाची स्थिती (ह्युमन् कंडीशन्) आणि या स्थितेमुळे आपल्या स्मृती, मानवी सुख-दु:खांबद्दलचे , आपल्या भावभावनांबद्दलचे एका बंदिस्त अवकाशात क्रिस्टलाईज् झालेले (मराठी शब्द ?) भाष्य. नायकाला त्याच्या प्रिय व्यक्तीच्या सुखद स्मृती आहेत आणि त्यानंतरच्या आयुष्यात तो नवे स्नेहबंध , नव्या आठवणी , असे काहीच बनवू शकत नाही. तो जगतो त्याच भूतकाळाच्या संचितावर. त्यावेळच्या क्षणांमधे जी मनःस्थिती गोठवली गेली होती त्यातील वियोगाचे दु:ख, संताप , सूड यांच्या प्रतिक्रियांवर तो जगतो. हा सूड तो कसा घेतो , त्याकरता त्याशी स्वतःची "सिस्टीम" तो कशी बनवतो : ज्यात गोंदविणे , १५ मिनिटांपूर्वीचे लक्षात ठेवण्याकरता चिठ्ठ्या-चापाट्या इ.इ. प्रकार फार रोचक.

सूड

हा सूड तो कसा घेतो
या चित्रपटात नायक सूड नक्की 'कशाचा', नक्की 'कसा' व नक्की घेतो का हीच खरी गोम आहे. गंमत लक्षात आली असेल अशी आशा आहे. चित्रपट दाखवला आहे तसा नाहीच पण दिसतो तसाही नाही असे सांगावेसे वाटले.

हाहा

सूड नक्की कशाचा आणि कसा हे कळलेले आहेच. पण ते देणे म्हणजे सगळा सस्पेन्स् देण्यासारखे.

जॉनी गद्दार.....

मस्त धमाल करमणूक. धक्क्यांवर धक्के बसत जातात. अवश्य बघण्यासारखा. राजेंद्र, तुम्हाला नक्की आवडेल.

-सौरभदा

==================

चांदनी चौक टू चायना ... पाहु नये

काय पाहु नये हे सांगु शकतो आज. कारण कालपासुन घडलेल्या चुकीबद्दल पश्चाताप होतोय. कालच 'चांदनी चौक टू चायना' बघितला. गझनी आवडला नव्हता, पण तो खुपच चांगला आहे असे वाटते एवढेच सांगतो म्हणजे 'चांदनी चौक..' बद्दल कल्पना येईल ;). आज एखादा चांगला चित्रपट बघुन काल केलेली चुक सुधारण्याचा विचार आहे.

हेच म्हणतो...

अगदी कचकड्याच्या चायनीज खेळण्यासारखा आहे....

बिईंग जॉन माल्कोविच

परकायाप्रवेश ही काही नवी संकल्पना राहिलेली नाही. अगदी हरिश्चंद्र राजापासून ते तात्या विंचूपर्यंत अनेक ठिकाणी हा प्रयोग आपण पाहिलेला आहे. ढोबळमानाने हीच संकल्पना घेऊन केलेला हा धमाल मनोरंजक तरीही फार अर्थपूर्ण चित्रपट आहे.

कठपुतळ्यांचे खेळ करणारा हीरो खेळांमधून वादग्रस्त विषय हाताळत असतो. मात्र सगळीकडे येणाऱ्या अपयशामुळे व अपमानामुळे त्याला नैराश्य आलेले आहे. पाळीव प्राण्यांसोबत (माकड, सरडा वगैरे) रमणाऱ्या त्याच्या बायकोचा सल्ला ऐकून तो स्वतःच्या कुशल बोटांचा उपयोग होईल अशी (फायली हाताळण्याची) नोकरी स्वीकारतो.

याठिकाणी मोठी मजा आहे. हीरोचे ऑफिस हे साडेसातव्या मजल्यावर आहे. चित्रपटाचा बराच काळ या अर्ध्या मजल्यावर पार पडतो. या मजल्यावर लिफ्ट (उद्वाहक यंत्र) थांबत नाही. त्यामुळे सातवा मजला गेल्यावर 'स्टॉप' हे बटण दाबून पहारीसारखी मोठी लोखंडी दांडी घालून दरवाजा उचकटून काढावा लागतो. सर्व कामगार या प्रकाराला सरावलेले आहेत. पहिल्या दिवशी अचंबित झालेला हीरो या प्रकारात निष्णात होतो.

एक दिवस अचानक हीरोला कपाटाच्या मागे एक छोटे भुयार आहे असा शोध लागतो. हे भुयार जॉन माल्कोविचच्या मेंदूचा प्रवेशमार्ग आहे हे त्याच्या लक्षात येते. ह्या भुयारात प्रवेश केल्यास 15 मिनिटांसाठी जॉन माल्कोविचच्या रुपात वावरता येते.

आपल्या कलीगला हे सांगितल्यानंतर दोघांच्या सुपीक डोक्यातून थोडे पैसे कमावण्याची कल्पना निघते आणि 200 डॉलरचे तिकीट ठेवून 15 मिनिटासाठी जॉन माल्कोविच बनण्याची योजना सुरु करतात.

पुढे हा चित्रपट अनेक धक्कादायक वळणे घेत जातो. जी आवर्जून पाहण्यासारखी आहेत. या वळणांवळणातून आपल्या जगण्याबाबतचे, नैतिकतेचे अनेक प्रश्न, शंका उपस्थित होत राहतात.

चित्रपटाची परकायाप्रवेशाची संकल्पना नवी नसली तरी ज्या पद्धतीने चित्रपट उलगडत जातो ते फार रोचक आहे. चित्रपटातील विनोदही वेगळ्या जातकुळीचे आहेत.

संधी मिळाल्यास चुकवू नका.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

व्वा!

कसली भन्नाट कल्पना आहे ही! या चित्रपटामधे भीतीदायक दृश्ये किती आहेत? फारशी नसली तर हा चित्रपट मिळवायचा प्रयत्न करण्याचा विचार आहे.

राधिका

भीतीदायक नाहीत

भीतीदायक दृश्ये अजिबात नाहीत. विनोदी चित्रपट आहे :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अरे वा

मग शोधायलाच हवा.
राधिका

मस्त धागा

ऑफिस स्पेस: हलका फुलका मस्त विनोदी चित्रपट. क्युबीकल्स मधे लेऑफच्या भितीखाली जगणार्‍या चाकरमान्यांची भन्नाट कथा. सुरूवाती पासुन शेवट पर्यंत हास्याचे फवारे उडवत कुठेही भिभत्स किंवा लाऊड न होता कथा उत्तम करमणुक करत जाते. हलका फुलका 'गोलमाल (जुना)' च्या तब्येतीचा विनोद असणारा दुर्मिळ हॉलीवूडपट

फाईट क्लब : चाकोरी बाहेरचा चित्रपट कसा असावा ह्याचे उत्कृष्ट उदाहरण! एड नॉर्टन आणि ब्रॅड पीट चे अफलातुन काँबीनेशन. एका मागोमाग एक् येणार्‍या चित्र विचित्र अफलातुन कल्पना पाहुन् थक्क व्हायला होते. वेगवान हाताळणी, रोलर कोस्टर मधुन राईड घेतल्या सारखे वाटते

खूप प्रसिद्ध चित्रपट टुकार असेल तर पाहू नका असे सांगावे. उदा. घजनी*

हा हा! घजनी विषयी आमचे मत इथे पहा

द कॉन्स्टंट् गार्डनर

हा उत्कॄष्ट चित्रपट बघावा.
अजुन सांगायचे झाले तर बॅबेल, रनअवे ज्युरी, म्युनिक इ.

- सूर्य.

आणखी काही

आम्ही हल्ली बघितलेले काही चित्रपट - ऑल द प्रेसिडेंट्स मेन, स्पॅनिश प्रिझनर, रिअर विंडो, बोन कलेक्टर, लाँगेस्ट यार्ड, द फ्रेशमन, वॅग द डॉग, मॅच पॉईंट

(परीक्षणांची वाट बघतोय ;) )

अवांतर - मेमेंटो पहिल्यांदा बघितला - नंतर परीक्षण वाचले - नंतर पुन्हा बघितला तेव्हा कुठे सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला! कॉन्स्टंट गार्डनर चांगला आहे.

परीक्षण

यापैकी ऑल द प्रेसिंडेंट्स मेन प्रमाणाबाहेर आवडल्यामुळे त्यावर लेख लिहीला होता.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

लाँगेस्ट यार्ड

द लाँगेस्ट यार्ड हा ऍडम सँडलरचा का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्ट्रेंजर दॅन फिक्शन

कथेतील पात्रे जर खर्‍या जगात येऊन लेखिकेला भेटली तर कथा पुढे जाईल का? याचे उत्तर ह्या चित्रपटात मिलेल. एम्मा थॉम्पसन, ड्स्टीन हॉफमन, विल फॅरल आणि गोड मॅगी ग्निनहॉल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
याबद्दल विस्तृत माहिती इथे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

' द आवर्स्'

याच प्रकारात मोडणारा , परंतु स्थलकालाच्या निरनिराळ्या धाग्यांमधे ,कल्पनाजगत आणि वास्तव यांच्यामधल्या एकाच प्रकारच्या संवेदना , सुख-दु:खांचा पॅटर्न चितारणारा सिनेमा म्हणजे 'द आवर्स्' . व्हर्जिनिया वूल्फ या , स्वतःच एक गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असणार्‍या लेखिकेचे शेवटचे दिवस , या शेवटच्या दिवसात तिने चितारलेल्या नायिकेची मनःस्थिती , आणि या दोघी (म्हणजे वूल्फ आणि तिची नायिका) यांच्या स्थितीशी साधर्म्य असणार्‍या १९५० आणि २००० सालातल्या २ स्त्रिया यांचे वेगवेगळे वाटणारे पण एकत्र येणारे धागे , सुखःदु:खांच्या वैश्विकतेबद्दल भाष्य करणारा एक चित्रपट. हे सांगायची गरजच नाही की यात फॉर्म्युलावजा काहीच नाही आणि दुसरे म्हणजे अनेकानेक ऑस्करचा विजेता.

रिलीज्युलस

कोलबेरपंतांनी एकदा सुचवल्याने रिलीज्युलस हा माहितीपट वजा सिनेमा पाहिला. राजकीय समालोचक बिल माऽर आणि साईनफेल्डच्या काही भागांचा दिग्दर्शक असलेल्या लॅरी चार्ल्सने बनवलेला हा चित्रपट धार्मिक अंदाधुंदीवर बोचरी टीका करणारा आहे. या पटात अनेक धर्मगुरु, धार्मिक नेते, आस्तिक व्यक्तींच्या मुलाखतींमधून ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाममधील शिकवण व वागण्यातील विसंगतींवर नेमके बोट ठेवले आहे.

चित्रपटातील काही मुलाखतींमध्ये बिलने विचारलेले प्रश्न हे मुद्दाम ठरवून खवटपणा केल्यासारखे असले तरी चित्रपट धमाल मनोरंजक आहे.

(हिंदू-बौद्ध या पूर्वेकडील धर्मांना या विश्लेषणापासून का वगळले असावे याचा विचार करत आहे. कदाचित चित्रपट बनवण्याचा हेतू मध्यपूर्वेतील प्रश्न, इराक-अमेरिका युद्ध व जागतिक दहशतवाद यामागे असणारी धार्मिक तत्त्वांचा निषेध करण्याचा असावा. तसेही हिंदू-बौद्ध धर्म हे पुरेसे लवचिक आहेत आणि यांत धर्मांधांचे प्रमाण तुलनेने कमी आहे असे वाटते. )


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माहितीपट

खरं आहे. काही ठिकाणी मुद्दामहुन खवटपणा केला आहे जो टाळता आला असता.

विश्लेषणातुन हिंदू बौद्ध धर्म वगळ्याचे कारण 'टारगेट ऑडीयन्स अमेरिकन लोक' हे असावे. अमेरिकन लोकांच्या रोजच्या जीवनात ख्रिश्चानीटी, ज्युडाईजम आणि ९/११ नंतर इस्लाम ह्यांचे संदर्भ जितके येतात त्यामानाने हे लोक हिंदू/बौद्ध ह्या धर्मांविषती अनभिज्ञ असल्याने ते वगळले असावेत.

माहितीपटांमध्ये गेल्या महिन्यात 'फास्ट फूड नेशन' नावाचा माहितपट वजा चित्रपट पाहिला होता. माहितीपट म्हणजे एका ठरावीक साच्यातुन (मायकल मूर चा ज्यात हातखंडा आहे) न बनवता वेगळ्याच पद्धतीने बनवला आहे. एक मध्यवर्ती कथानक आणि अनुरुप पात्रे असे काहीसे चित्रपटाचे स्वरूप देऊन हा माहितीपट बनवला आहे. एकदा जरूर बघण्यासारखा आहे

गंमत म्हणजे

गंमत म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीची श्रेयनामावली व प्रस्तावनेचे प्रसंग आहेत त्यात तलवारी घेऊन जाणारे कुंभमेळ्यातील साधू दाखवले आहेत. त्यामुळे अंमळ उत्सुकता होती.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

डॉगव्हिल

मागे एक डॉगव्हील नावाचा निकोल किडमनचा चित्रपट पाहिला होता. वेगळाच प्रायोगिक चित्रपट आहे. संपूर्ण चित्रपट एखाद्या प्रायोगीक नाटकात शोभेल अश्या सेटवर घडतो. कथानक ,मांडणी, चित्रीकरण हे सगळेच नेहमीपेक्षा फार वेगळे आहे. समाजाने स्विकारलेली मूल्ये, वर वर सोज्वळ असणार्‍या प्रत्येकाची परिस्थीती आल्यावर उघड होणरी काळी बाजू अश्या अतीशय गंभीर गुंतागुंतीच्या गोष्टींवर भाष्य करणारे लांबलचक कथानक आहे.

अनेक समीक्षकांनी हा चित्रपट गौरवला असला तरी मला अर्ध्या तासाच्यावर बघणे म्हणजे पोटात ढवळायला लागले. चित्र विचित्र कॅमेरा अँगल्स, फोकस करण्याच्या विचित्र पद्धती, प्रायोगीक रंगभुमीवर शोभेल असा अगम्य सेट, भयाण कथानक हे सगळे मला तरी रुचले नाही. आणखी कुणी पाहिला असल्यस त्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल.

मीही पूर्ण पाहू शकले नाही

खूप गौरवला गेल्याने मी पाहण्याचा प्रयत्न केला पण शेवटपर्यंत पाहणे जमले नाही. ;-)

तो ही

तो ही हा चित्रपट पूर्ण पाहू शकला नाही :(.

(तो 'सिटीझन केन' पाहू शकला हे नोंद घेण्यासारखे.'फाईट क्लब' पाहू शकला नाही हे विसरण्यासारखे.)

मला बरा वाटला

मला तेव्हा तरी बरा वाटला होता. पण आता फारसा आठवत नाही - म्हणून "उच्च" वगैरे वाटला नसावा.

आता आठवले. लोकांच्या भानगडींमध्ये, सुखदु:खांमध्ये जसे आपले मन ओढले गेले, तसे "गावातल्या घरांना भिंती नाहीत" ही बाब लक्षात येईनाशी झाली. आपले लक्ष केंद्रित झालेल्या पात्रावेगळे सर्व लोक अंधुक फोकसमध्ये दिसत होतेच - त्यामुळे फक्त "गावात गुप्त असे खरे काहीच नसते" असे वातावरण मनाच्या पार्श्वभूमीतही सतत जाणवत होते.

मला तो चित्रपट बघण्यासारखा वाटला - बहुधा पुहा बघीनसुद्धा. पण मानवाच्या क्रौर्याबद्दल भयंकर टिप्पणी आहे, त्यामुळे कदाचित बघवणारही नाही. ह्म्म्

अबाऊट श्मिड्ट

जॅक निकल्सनचा घासून गुळगुळीत, साचेबद्ध विषयावरचा अबाऊट श्मिड्ट पाहिला. जॅक नसता तर चित्रपट पाहणे शक्य झाले नसते. त्याची कामगिरी छान आहे. जॅकप्रेमींनी बघण्यासारखा आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ग्रॅन टुरीनो

आजच ग्रॅन टुरीनो पाहिला! ज ब र द स्त!!

साधी सोपी (काहिशी घिसिपीटी ) कथा पण इस्टवुडमुळे गारुड करते.. म्हातारबाबाने एकहाती चित्रपट अशक्य केला आहे.

इस्टवूड चे फ्यान आम्ही होतोच पण आता भक्त झालो :)

अगदी हेच

गारूड म्हणजे काय हे हा चित्रपट पाहून कळते. ईस्टवूडचा स्क्रीन प्रेझेन्स हा अवर्णनीय आहे. चेहऱ्यावर दिसणाऱ्या भूतकाळातील पापांच्या खुणा, सुरुवातीला असलेल्या ताठर भूमिकेनंतर स्वभावात येऊ लागलेला मऊपणा, मुलांचा स्वार्थ लक्षात आल्यावर एकाच वेळी दिसलेला संताप आणि अपेक्षाभंग हे अशक्य आहे.

चित्रपटाच्या अगदी पहिल्याच प्रसंगात तोकडे कपडे घातलेल्या नातीबद्दलची नाराजी त्याने न बोलता ज्यापद्धतीने डोळ्यांनी दाखवून दिली आहे तो प्रसंग तर अभिनय शिकण्यासाठी फार उपयुक्त ठरावा.

मला त्याचे संवाद समजायला त्याच्या खरखरीत आवाजामुळे आणि अस्पष्ट उच्चारामुळे आधी फार अवघड गेले. मात्र नीट फ्रिक्वेन्सी सेट झाल्यावर अपूर्व आनंद मिळाला. शेजारच्या मुलाबरोबरचे (शेवटच्या प्रसंगांतले) संवाद फारच अप्रतिम आहेत.

कथेत काहीही नवे नाही मात्र ब्याकग्राऊंड म्युझिक ( हा माणूस कुठूनकुठून तुकडे शोधून आणतो देव जाणे) आणि (त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणेच असलेले) एक पोक्त, गंभीर वातावरण यामुळे चित्रपट वेगळ्याच उंचीवर जातो.

लीजंड म्हणजे काय याचा पदोपदी अनुभव येतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बाप आदमी

इस्टवूड बाप माणूस आहे. आणि विशेष म्हणजे गुणवत्ता इतकी ठासून भरलेली असतानादेखील तो कुठल्याही प्रकारचा आव आणत नाही. त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शन करताना तो इतरांप्रमाणे ऍक्शन आणि कट असे किंचाळत नाही. तर मृदू आवाजात 'ओके, व्हेनएव्हर यू आर रेडी' आणि 'ओके, दॅट्स इनफ'! असे करणारा तो जगातील एकमेव दिग्दर्शक असावा. आणि असे करण्याचे कारण म्हणजे तो घोड्यांबरोबरचा प्रसंग दिग्दर्शित करत असताना दिग्दर्शक ओरडला तर घोडे बिथरत असत. यावरून त्याला वाटले की घोड्यांप्रमाणेच अभिनेत्यांचे लक्षही आरडाओरडा केल्यावर विचलीत होत असणार. तेव्हापासून त्याने आपली ष्टाइल बदलली.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

वॉली

मी तसा ऍनिमेशन चित्रपटाचा चाहता आहे. पिक्सारचे बरेच चित्रपट मला आवडतात. रॅटाटुई, आईस एज १, रोबॉट्स् हे देखिल धमाल वाटले होता. त्यामुळे खूप अपेक्षेने वॉली पाहिला. वॉलीला आयएमडीबी वरती लोकांनी डोक्यावर घेतले आहे, त्यामूळे देखिल अपेक्षा वाढल्या होत्या.

पण भरवशाच्या म्हशीच्या म्हणीचा प्रत्यय यावा असा हा चित्रपट निघाला. उच्च दर्जाचे ऍनीमेशन तंत्रज्ञान वगैरे दाखवले असले तरी एक चित्रपट म्हणून मला हा अतीशय पोकळ आणि रटाळ चित्रपट वाटला. पिक्सारचा 'कार्स' देखिल फारसा आवडला नव्हता आणि वॉलीने तर सपशेल अपेक्षाभंग केला. इतक्या रद्दड चित्रपटाची इतकी हवा का केली आहे समजले नाही. उपक्रमींपैकी कुणी हा बघीतला आहे का?

मत

वॉली आमच्या मुलांनी पाहिला तेव्हा मी नव्हतो. मात्र कुंग् फु पांडा पाहिला तेव्हा होतो. मला तो खूप आवडला. (श्रेक् पार्ट् १ इतका प्रचंड जरी नाही तरी ). ऍनिमेशन सुरेख आहेच, पण जॅक् ब्लॅक् ने दिलेले आवाजी व्यक्तिमत्व सुद्धा खासच. त्यामानाने डस्टिन् हॉफमन् चा फारसा प्रभाव पडल्यासारखे वाटले नाही. त्यातला कासव आजोबा मात्र लई भारी (त्याचे काम अगदी थोडेच असले तरी )

कुंग फू पांडा

कुंग फू पांडा मधे ज्याक ब्ल्याकचे काम अशक्य आहे. डस्टिन हॉफमनला वर म्हटल्याप्रमाणेच वाया घालवलाय. पण एकूणात प्रत्येक फ्रेममध्ये वापरलेले रंग, फ्रेम्सचं काम्पोझिशन वगैरे उत्तम आहे. मला आवडलेल्या चित्रपटांपैकी एक.

सहमत्..

सहमत, कुंग फु पांडा अशक्य सही पिक्चर आहे. तसाच मादागास्कर्(१) , रॅटटुई, श्रेक(मला २ आवडतो) हे सहीच आहेत!

बायदवे, मुक्तसुनित, वॉली आमच्या मुलांनी पाहिला तेव्हा मी नव्हतो. या वाक्यात तुम्हाला "मी तिथे अथवा त्यांच्याबरोबर नव्हतो" असं म्हणायचे आहे का? :)) वाक्य वाचून एकदम हसू आले, प्लीज.. हलकेच घ्या! :)

वर लिहीलेला ऑफीस स्पेस नुकताच पाहीला.. वेगळ्या वातावरणातला, हलकाफुलका चित्रपट म्हणून आवडला.. मागे कुणीतरी परिक्षण लिहीले होते तेव्हापासून पाहायचा हे लक्षात् होते..

कुंग फू पांडा

धमाल आहे. क्राउचिंग टायगर आणि स्टार वॉर्स दोन्हींची रेवडी उडवली आहे.

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेतप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत

वॉली

काल विमानात वॉली दाखवला.. सुरवातीलाच आशय स्पष्ट झालाय.. आणि नंतर तो फक्त खेचत नेला आहे असे वाटले.. चित्रपट रटाळ आहे याच्याशी सहमत..

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

मादागास्कर २

मादागास्कर २ पाहीला. एक इतका चांगला नाही. करमणूक म्हणून बघायला हरकत नाही. कदाचित लहान मुलांना अधिक आवडेल. ऍनिमेशन पटांचे नाविन्य ओसरल्यावर बरेचदा तोचतोचपणा येतो आहे असे वाटते.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

अजून काही....

अलीकडे पाहिलेले अजून काही चित्रपट
१) मिस लिटल सनशाईन्
२)जुनो
३)फाइंडिंग नेवरलँड
४)१९७० चा मॅश
५)१९६३ चा ऑड्री चा the charade

भयपटांबाबतही कुणी लिहलं तर बरं होईल.
द डिसेंट मला आवडला. भयंकर आहे!
डॉन ऑफ द डेड पण झकास! ;-)

सौरभदा

==================

भयपट

भयपटांबाबतही कुणी लिहलं तर बरं होईल.

भयपट, भूतकथा वगैरे मला विशेष आवडत नसल्याने तसले चित्रपट सहसा बघत नाही. पण 'द् अदर्स' नावाचा निकोल किडमनचा एक चित्रपट पाहताना चांगलाच घाबरलो होतो. रात्री घरी एकटे असताना अंधार करुन हा चित्रपट बघा. पैसे वसूल!!

असहमत ;-)

द अदर्स हा माझा सर्वात लाडका चित्रपट आहे आणि तो सुमारे ५-६ वेळा पण प्रत्येक वेळी मी एकटीनेच पाहिलेला आहे. स्वच्छ (रक्ताने माखणे, चित्रविचित्र चेहरे, अवयव, भीतीदायक प्रसंग इ. नसलेला) चित्रपट कसा असावा त्याचे चांगले उदाहरण म्हणजे द अदर्स. ज्या लहान मुलांना फारशी भीती नसते (१०+ वय) त्यांना हा चित्रपट दाखवायला हरकत नसावी.

भीतीच वाटून घ्यायची असेल तर स्टिफन किंगचा द शायनिंग किंवा रोजमेरी'ज बेबी आणि गेला बाजार एक्झॉर्सिस्ट भीतीदायक आहेत.

भिती

अहो असे 'स्वच्छ' चित्रपटच सर्वात जास्त भितीदायक वाटतात. :)

रक्ताने माखणे, चित्रविचित्र चेहरे, अवयव, असले दाखवलेकी फक्त किळस येते, भिती वगैरे काही वाटत नाही.

त्यामु़ळेच हा चित्रपट खूप आवडला होता.

शायनिंग .... अहाहा!

शायनिंग खूपच भीतीदायक आहे. आवडला. एक्झॉर्सिस्ट पण आवडला पण स्केरी मूव्हीतले त्याचे विडंबन पाहून जास्त मजा आली. :-)

-सौरभ

==================

द रिंग

द रिंग चांगला आहे.
जपानी चित्रपट 'डार्क वॉटर'चा रिमेक आहे. मी दोन्ही पाहिलेत. मस्त आहेत.

पिंक पँथर

पीटर सेलर्स ने पिंक पँथर या मालिकेत एका मूर्ख, धांदरट फ्रेंच पोलीस अधिकार्‍याची भूमिका उत्कृष्ट रीत्या रंगवली होती. याचे तीन किंवा चार चित्रपट आले. नंतर २००६ मध्ये स्टीव्ह मार्टिनने हीच भूमिका केली. मला दोन्ही आवडले. या दोन्ही अभिनेत्यांचे टायमिंग अफलातून आहे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

पिंक पँथर २

स्टीव मार्टिनच्या पिंक पँथरचा दुसरा भाग येत आहे असे आजच पाहिले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ग्रेट

चांगली बातमी आहे. दोन तास सुखात जातील. :-)
या चित्रपटात ऐश्वर्या राय असल्याचे आत्ताच कळले.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

पुस्ती

पिंक पँथर २ फारच पानचट आहे. पाहू नका :))

आपला
(पैशे आणि वेळ घालवलेला) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर