सध्या काय वाचताय् ? -भाग २

प्रतिसादांची संख्या वाढल्यानंतर नवीन लिखाण नीट वाचता येत नाही अशा अर्थाची थोडी पत्रे मला आली. याचा अनुभव मलाही यायला लागला. काही वाचकांनी पाठविलेल्या सूचनेनुसार मी उपरोल्लेखित विषयाचा दुसरा भाग सुरू करत आहे. आपला प्रतिसाद येथेही चालू ठेवावा ही विनंती.

पूर्वभागातील काही पोस्टस् वरून काही नव्या-जुन्या पुस्तकांचे संदर्भ मनात जागे झाले. सध्या "गावगाडा" पुन्हा वाचायला काढले आहे. वाचण्याचा वेग अतिमंद आहे (" कोण होतास तू काय झालास तू ! " :-) ) पण एका माणसाने केलेले काम पाहून थक्क व्हायला होते. सगळ्यात मी कशाची जास्त मजा घेत असेन तर ती या पुस्तकाची भाषा ! जमेल तसे काही उतारे उधृत करेन.

असो. मैफल चालू राहू द्या ...

लेखनविषय: दुवे:

Comments

आफ्टर यु से हॅलो

कोर्डे साहेबांनी सुचवलेले
"व्हॉट डु यु से आफ्टर यु से हॅलो"
हे बर्न नावाच्या लेखकाचे पुस्तक वाचतोय.
४०-५० पाने झालीत पण पुस्तकाने काही पकड घेतली नाही...
प्रत्येक माणसाचे एक प्राक्तन असते ते कसे लिहिले जाते अस काहीसा स्क्रीप्टचा भाग कळला... यात लहान पणाच्या शिकवणीचा, वातावरणाचा केव्हढा परिणाम असतो हे कळले.

पुस्तक चांगले आहे. अभ्यासपुर्ण लेखन आहे पण पुढे वाचायचा कंटाळा येतोय! :)
शिवाय जरा जुनेही आहे.
आपला
आळशी
गुंडोपंत

कसे वाचाल?

श्री.गुंडोपंत यांस,
पुस्तकांतील खालील भाग प्रथम वाचा व ते जितके समजतील तितके समजून घ्या. नंतर ओळीने पहिल्यापानापासून चालू केलेले वाचन पुढे चालू करा.
१) प्रकरण सातवे, परिच्छेद 'आय्' (Permission)
२) प्रकरण आठवे, परिच्छेद 'बी' (Rackets)
३) प्रकरण दहावे, परिच्छेद 'आय्' (The Posthumous Scene)
४) प्रकरण चौदावे, परिच्छेद 'एच्' आणि 'आय्' (The Ventriloquist's Dummy)
५) प्रकरण पंधरावे, परिच्छेद 'एच्' (Responsibility of the Parents)

अशा प्रकारे ओळीने वाचन चालू असतांना मधून मधून कुठलेही पान काढून त्यावर जिथे नजर पडेल तेथून वाचायला सुरवात करा. फार क्लिष्ट वाटू लागल्यास वाचन तात्पुरते बंद करा.

मिडलसेक्स

जेफरी यूजेनीडेस चे "मिडलसेक्स" हे पुस्तक.
एका विशिष्ट जनुकातील दोषामुळे बाळ मुलगा असून जननेंद्रिय (नीट लक्ष न दिल्यास) मुलीचे वाटते. अशी मुले पौगंडावस्थेपर्यंत मुलगी म्हणून वाढवली जातात. मग गडबड होते (दाढी मिशा वगैरे, मानसिक बदल...)
अशा एका मुलाचे आत्मकथन अशा प्रकारे कथा लिहिली आहे.
या वैद्यकीय दुर्दैवाची कुठेही टिंगल न करता न बोचणार्‍या विनोदी शैलीत हे पुस्तक लिहिलेले आहे. विनोदाला कारुण्याची झालर म्हणावी तर अगदी कधी खुदकन हसू आले तरी मन सहानुभूतीने हळवे होते.
काळाच्या दृष्टीने मुद्दामून विस्कळित अशी मांडणी लॉरेन्स स्टर्नच्या "ट्रिस्ट्रॅम शँडी" ची आठवण करून देते.

अजून पुस्तक अर्धेच वाचले आहे.

हे पाहिले का?

हे पुस्तक कुणी वाचले आहे का?
God: The Failed Hypothesis. How Science Shows That God Does Not Exist
सर्किटा तुला नक्की आवडेल असे वाटते...

आणी हे पुस्तक पण.. :)
The God Effect: Quantum Entanglement, Science's Strangest Phenomenon

आपला
गुंडोपंत
हे पुस्तक कुणी वाचले आहे का?
हे पुस्तक कुणी वाचले आहे का? हे पुस्तक कुणी वाचले आहे का? हे पुस्तक कुणी वाचले आहे का? हे पुस्तक कुणी वाचले आहे का?
हे पुस्तक कुणी वाचले आहे का? पुस्तक कुणी वाचले आहे का? पुस्तक कुणी वाचले आहे का?

ऍन फ्रँन्क्स् डायरी

पुर्वी सुरू केलेलं अपोसिंग व्ह्यू पॉईंटस् डायजेस्ट संपवल्यावर आता ऍन फ्रँन्क्स् डायरी वाचायला नुकतीच सुरवात केली आहे.
फार आधी भाषांतर वाचलं होतं. तेव्हा ऍन वयापेक्षा फार आगाऊ वाटली होती. पण आता इथे अमेरिकेतली मुलं (कींवा अगदी आजकालची भारतातील माध्यमिक शालेय मुलं) पाहिली की हे फार आगाऊ वाटत नाही
पुर्ण वाचून झालं की अजून लिहिनच

ऋषिकेश

सुंदर

सुंदर पुस्तक आहे. वाचून झाल्यावर सांगा कसे वाटले ते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

ऍन फ्रँक.. जबरदस्त

ऍन फ्रँक.. पुर्वी वाटलेली आगाऊ ऍन आता पुनर्वाचनानंतर खुप भावली.. समजली.. जबरदस्त!! नक्कीच वाचनीय पुस्तक ... जरूर वाचा!

ऑन ए शूस्ट्रिंग टू कूर्ग

डेर्व्ला मर्फी यांचे ऑन ए शूस्ट्रिंग टू कूर्ग मिळवले आहे. वाचायला सुरवात केली आहे. पुस्तकात आलेल्या भारतीय इतिहासाबद्दल अनेक गोष्टी या प्रथमच ऐकल्या आहेत किंवा वेगळ्या ऐकल्या आहेत. त्याबाबत विस्ताराने लिहीनच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बॉम्बार्डिअर्स

पो ब्रॉन्सन यांचे बॉम्बार्डिअर्स. बरेच दिवसांपूर्वी वाचले होते आता परत वाचतो आहे. कॅच २२ च्या धर्तीवर स्टॉक मार्केटच्या जगातील अब्जर्डीटी यात दाखवली आहे. एका शब्दात सांगायचे तर ध मा ल. :-)

अवांतर : उपक्रमावर स्मायली देता येतात का?
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

गावगाडा बद्दल

मुक्तसुनीत यांनी गावगाडा बद्दल मूळ चर्चाप्रस्तावात लिहिले आहे. त्यात मुसलमानांच्या जातींबाबतचे काही उल्लेख आहेत काय?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर