इतक्यात काय पाहिलेत? - भाग १

आठवड्यातून दोन किंवा एक दिवस सुट्टी. काही वेळ रिकामा. अशा वेळी एखादा सुंदर चित्रपट बघता आला तर आटवलेल्या दुधात केशर, बदाम, पिस्ते. पण निवड कशी करायची? आणि अशात घजनीसारख्या एखाद्या मरतुकड्या घोड्यावर पैसे लावले तर तीन तास गेल्यावर सुट्टी फुकट गेल्याचे दु:ख होतेच शिवाय आमिरने हे काय केले हा मनस्ताप वेगळा.

हा वेळ सत्कारणी लावण्यासाठी एखादी यादी असली तर? हा चर्चाप्रस्ताव अशा यादीसाठी आहे. हेतू हा की यादी पाहून चटकन चित्रपट ठरवता यावा आणि सुट्टी सत्कारणी लागावी. साधारण रूपरेखा अशी.

१. चित्रपट आवडला असेल तर एक-दोन ओळीत काय विशेष आहे ते सांगावे. अर्थात चित्रपटावर वेगळा परीक्षणात्मक लेख लिहायचा असेल तर स्वागतच आहे. पण प्रत्येक आवडलेल्या चित्रपटावर लेख लिहीणे शक्य होत नाही.
२. चित्रपट शक्यतो अपरिचित असावा. यात नवे, नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट येतीलच. पण जुने, परिचित नसलेलेही येऊ शकतील. उदा. मागे शशांकने 12 अँग्री मेन या सुंदर चित्रपटाची ओळख करून दिली होती. फक्त शोले किंवा म्याट्रिक्स असे आख्ख्या ब्रह्मांडाला माहित असलेले चित्रपट नसावेत.
३. खूप प्रसिद्ध चित्रपट टुकार असेल तर पाहू नका असे सांगावे. उदा. घजनी*
४. प्रतिसादाच्या शीर्षकात चित्रपटाचे नाव असल्यास वाचन सोपे होईल.

*घाव बराच खोल गेलेला दिसतो!

Comments

अरेरे

हे वाचून निराशा झाली. :-(

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

वेटींग लिस्टवर आहे....

.....

==================

फिडलर ऑन द रूफ

अगदी असामान्य नसला तरी, झारच्या काळातील एका गरीब, रशियन ज्यू कुटुंबावर बेतलेला हा चित्रपट (खरं तर ब्रॉडवेवरील संगीतिकेचे रूपांतर) नक्कीच पाहण्यासारखा आहे. पाच मुलींचा बाप असणारा परंपराप्रिय गरीब दूधवाला नायक, चढत्या क्रमाने बंडखोरी करून रूढी/धर्माबाहेर लग्न करणार्‍या मुलींच्या बाबत कसा बदलत जातो याचे छान चित्रण आहे. ज्यूंना मिळणारी दुय्यम दर्जाच्या नागरिकांची वागणूक आणि त्यांच्यावर परागंदा व्हायची आलेली पाळी, हा कथानकाचा मुख्य भाग नसला तरी पार्श्वभूमीवर या गोष्टींचे अस्तित्व सतत जाणवत राहते. अधूनमधून येणारे नर्मविनोदी संवाद आणि त्याकाळच्या रशियन ज्यूंचे बारीकसारीक तपशीलांसह उभे केलेले विश्व ही या चित्रपटाची आणखी काही वैशिष्ट्ये.

उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे आदिम सत्य सांगणारे हे सुंदर गाणेही याच चित्रपटातले -

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

लायन्स फॉर लॅम्ब्स्

"लायन्स फॉर लॅम्ब्ज्" रॉबर्ट रेडफोर्ड या अभिनेता दिग्दर्शकाचा हा चित्रपट. चित्रपटात रॉबर्ट रेडफोर्ड बरोबर मेरील स्ट्रीप, टॉम क्रुझ् हे नामवंत देखील आहेत.

चित्रपटाची कथा तीन धाग्यात गुंफली आहे. अमेरीका एका अप्रिय युद्धात आहे. एक रिपब्लिकन सेनेटर टॉम क्रुझ एका नामांकीत पत्रकाराला विश्वासात घेउन "अमेरिकेच्या भल्यासाठी चाललेल्या" या युद्धात जनमत करु पहात आहे व त्या करता त्याने खास तिला १ तास मुलाखत द्यायला बोलावले आहे. पत्रकार मेरील स्ट्रीप हिला व्हिएतनाम युद्धाचा अनुभव आहे व तिला असे वाटते आहे की पुन्हा राजकारणी मंडळी आपली महत्वाकांशा पूर्ण करण्यासाठी ही सगळी धुळफेक करत आहेत व पत्रकारांचा वापर करत आहेत. रॉबर्ट रेडफोर्ड एक प्राध्यापक आहे व तो त्याच्या एका हुशार पण आता अभ्यासात दुर्लक्ष करणार्‍या विद्यार्थ्याचे मतपरिवर्तन करु पहात आहे, रेडफोर्डचे दोन होनहार विद्यार्थी देशासाठी व आयुष्यात काही उदात्त करायचे ह्या हेतुने अमेरिकेसाठी सैन्यात भरती होउन युद्धात भाग घेत् आहेत व एका सैनिकी मोहीमेत त्यांच्या तुकडीवर हल्ला होउन ते दोघे लढत आहेत.

सैनिक, विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार, राजकारणी प्रत्येकाची काय भुमीका, कोणता निर्णय असे काहीसे स्वरुप असलेला हा चित्रपट एकदा विकांताला घरी बघायला काही हरकत नाही.

"स्पाय गेम" हा रॉबर्ट रेडफोर्ड व ब्रॅड पीटचा थ्रिलर सिनेमा देखील पहाण्यासारखा आहे. नुकत्याच येउन गेलेल्या "बॉडी ऑफ् लाइज्" ह्या रसेल क्रो व लिओनार्डो असलेल्या सिनेमापेक्षा "स्पाय गेम" जास्त उजवा वाटला.

इण्टू धि वैळ्ड् बघा.

इण्टू धि वैळ्ड् बघा.

हैयो हैयैयो!

आवो

आवो सायेब, जरा इसकटून सांगशिला का म्हंजी आम्हालाबी कळल त्येवढच. कंचा पिच्चर, विंग्रजी हाये का हिंदी, हिरू कोन आन महत्वाच म्हंजी हिरूनी कोन? जरा डीटेलवार सांगा की राव! काय गरीबाचं एक-दोन तास मजेत जातील, तुमच्या पोराबाळास्नीबी दुवा दिउ बगा, मंगळवारचं लबाड बोलत न्हाई आपुन.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

इंटू दी वाईल्ड्

हैयो हैय्योय्यो कदाचित याबाबत म्हणत असावेत

आपला
(वैळ्ड वैळ्ड वेष्ट) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आभार

अनेक आभार. :)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

माझी लीष्ट

१. फरगेटींग सॅरा मार्शल - पाहिला. चांगला आहे. बघावा. रेटिंग - ३

२. डार्क नाईट - पाहिला. वैताग आला. रेटिंग - १.५

३. वाँटेड - पहाण्याचा निष्फळ प्रयत्न केला. किळस आली. रेटिंग - -३

४. वॉट हॅपन्स इन वेगास - वेळ बरा जाईल असा आहे. रेटिंग - ३

५. यू डोन्ट मेस विद द् झोहान - अरेरे! हसावं का रडावं ते कळले नाही. रेटिंग - -१

६. गेट स्मार्ट - टीपी आहे. आवडला पण आवडण्याचे कारण श्ट्रीक्टली स्टीव कॅरेल आहे हे ध्यानात घ्यावे. रेटिंग - ३.५

७. मामा मिया - ऍबाचे फॅन असाल तर चित्रपट आवडेल. सादरीकरण आवडले नाही. रेटिंग - २.५

८. इंडिएना जोन्स अँड किंगडम ऑफ द क्रिस्टल स्कल - सर्वांनी माफ करा. आवडला असं म्हणावंच लागतं. रेटिंग - ३

९. हॅनकॉक - अर्ध्यापर्यंत ठिक. सुप्पर वुमन आली की पुढे बघितला नाही तरी चालेल. रेटिंग - १.५

रेटिंग्ज प्रियालीची आहेत.

:)

३.५ च्यावरचे चित्रपट पाहणे आवडत नाहि का? ;) (ह. घ्यालच)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

ऍनिमेशन

ईस एज १ आणि २
दोन्ही झक्कास आहेत.

चित्रपटासाठी संकेतस्थळ आहे काय?

एकदंरीतच मराठी /हिंदी चित्रपटासाठी एखादे संकेतस्थळ आहे काय? ज्या संकेतस्थळावर चित्रपट समिक्षा, परिक्षण, गुणांकन इत्यादी असायला हवे.

 
^ वर