सुपर अँटीस्पायवेअर
अचानक कालपासुन संगणकावर कुठलीही साईट उघडली की एखादा पॉप अप उपटू लागला. मी उघडलेल्या साईट्सही नेहमीच्याच होत्या. तिथुन पॉप अप्स येत नाहीत ही खात्री होती. दोन तीनदा हा प्रकार झाल्यावर लक्षात आले, कुठलातरी ऍडवेअर/मालवेअर सारखा विषाणू घुसला आहे. लगेच आयईची सगळी कॅश मोकळी केली आणि कुक्या/हिस्ट्री वगैरे उडवुन लावले. पुन्हा ब्राउजींग सुरू केले तरी तोच प्रकार सुरू झाल. मग लक्षात आले की आपल्याकडे कुठलेही स्पायवेअरच नाही. लगेच विंडोज डिफेंडर डाउनलोड केले आणि सगळा संगणुक पिंजुन घेतला. त्याने किरकोळ एक दोन ट्रॅकिंग कुक्या उडवल्या पण त्यानंतरही बाकीची स्थिती जैसे थेच. आता मात्र लक्षात आले की काहीतरी गंभीर प्रकरण आहे. मग स्टार्टअप मध्ये जाउन कुठल्या कुठल्या प्रोसेसेस लोड होताहेत ते बघीतले तर त्यात एक विचित्र डीएलएल फाईल दिसली. त्या फाईलच्या नावाने गुगलले असता १-२ डिस्कशन बोर्ड्सवरच त्याची नोंद आढळली आणि तिथले पब्लिक हि फाईल विषाणू आहे म्हणून बोंबलताना दिसले. मग मात्र प्रकरणाला चांगलेच गांभिर्य आले. मी लगेचच माझा मकॅफी अँटी व्हायरस अपडेट केला आणि पुन्हा संगणक पिंजून काढला. जवळपास २-३ तास घेतल्यावर त्यातुनही काही फारसे हाताला लागले नाही आणि मूळ समस्या तशीच. आता मात्र काय करावे कळेना.
शेवटी गुगलबाबावर विश्वास ठेवुन आणखी काय उपाय आहेत का ह्याचा शोध एक शेवटचा प्रयत्न म्हणून सुरू केला. त्यातुन एका ठीकाणी मला 'सुपर अँटीस्पायवेअर' ह्या नविनच सॉफ्टवेअर विषयी माहिती मिळाली. त्यांच्या संकेतस्थळावर जाउन ते मोफतच आहे ना, कसल्याही जाहिराती घुसडत नाही ना इ. इ. ची कसुन माहिती काढली. कारण बर्याचदा ही नाव न ऐकलेली सॉफ्टवेअर्स भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था करुन ठेवतात. सगळी खात्री झाल्यावर शेवटी एकदाचे ते डाउनलोड केले, आणि नामवंत डॉक्टर्सनी हात टेकल्यावर शेवटचा उपाय म्हणून रुग्णाला जसे कोण काय सांगेल ते देतात तश्या अवस्थेत पुन्हा एकदा संगणक ह्या सॉफ्टवेअर कडून पिंजुन घेतला. "साध्या सुध्या व्याधी तर कुणीही बरे करते आम्ही असाध्य व्याधी देखिल बर्या करतो" असे काही तरी स्लोगन आले आणि उपचार सुरू झाले. जवळपास १-२ तास खाल्ल्यावर माझ्या संगणकात ह्याने बरेच काय काय शोधुन काढले. निरनिराळ्या ४१ व्याधी दाखवल्या आणि त्यावर उपायही केले. मी संगणक रिस्टार्ट केला आणि ब्राउजींग सुरू केले तर अहो आश्चर्यम!! मूळ समस्यातर दूरच नेटचा स्पीड पूर्वीपेक्षा किंचीत जास्त वाटत होता. सुपर अँटीस्पायवेअर ने झक्कास काम केले आणि माझी बराच ताण हलका केला. भविष्यात आणखी कुणाला असा त्रास उद्भवल्यास वेळ आणि ताप वाचावा म्हणून माझा अनुभव इथे द्यावासा वाटला.
सुपर अँटीस्पायवेअर इथे मोफत उतरवुन घेता येते. तुमच्या संगणकावर देखिल एक ट्रायल घेउन बघाच.
माझा संगणक : विंडोज एक्सपी आणि इंटरनेट एक्सप्लोरर.
----------------------------------------------------------------------------------------------
डिस्क्लेमर : माझा सदर सॉफ्टवेअर बनवणार्या कंपनीशी कसलाही संबध नाही, ज्याने त्याने आपापल्या जवाबदारीवर उतरवुन घ्यावे.
Comments
मध्यंतरी
एव्ही-२००९ नावाच्या स्पायवेअरने मला असाच त्रास दिला होता. मुख्य म्हणजे मी फारशी जाल भटकंती करत नाही आणि ज्या दिवशी हा प्रकार अवतीर्ण झाला तेव्हा फक्त उपक्रम आणि सी एन एन साईटला भेट दिली होती आणि उपक्रमावरून तुम्ही टिना फे चा विडिओ दिला होता तिथे गेले होते. (निवडणूक काळात) मलाही हे कसे काय घडले कळेना.
वरील सर्व उपाय केले. तरीही तेच - परंतु सिमँटेकने स्पायवेअर शोधून काढलं आणि सुटले पण हा सर्व घोळा लक्षात यायला २ दिवस गेले.
फेसबुक
मला माझ्या संगणकावरील विषाणू फेसबुक वरुन आला असावा असा संशय आहे. कारण हा त्रास सुरू होण्यापूर्वी मी फेसबुकवर कसलीतरी लिंक (तुमचा आयक्यू मोजा वगैरे असले काहीतरी) ओपन केली होती, ती भलत्याच ठिकाणी गेली आणि माझा सेल नंबर वगैरे मागायला लागल्याने मी बंद केली तिथुनच हा प्रकार आला असावा असा संशय आहे. (फेसबुक वापरणार्यांना सल्ला: इकडे तिकडे क्लिक करु नका :) )
हा कुठला व्हिडिओ ते आठवले नाही (स्याटर्डे नाईट लाईव वाला का?)
हो
म्हणजे तिथून आला असे म्हणत नाही. :-) पण मी इतरत्र कुठेच गेले नव्हते आणि घरात मी सोडून सहसा कोणाला डेस्कटॉपच्या वाटेला जायचे कारण नाही. त्यामुळे त्या स्पायवेअरची आमंत्रणकर्ती मीच असावी.
या स्पायवेअरने इतके हैराण केले होते की उपक्रम उघडले की मेसेज दिसायचा की ही साईट इन्फेक्टेड आहे आणि ऍक्सेस बंद व्हायचा. हेच विकिपीडियाबाबत पण बाकीच्या बर्याचशा साईट्स व्यवस्थित चालायच्या.
माझा पहिला संशय तर सी एन एनवर होता आणि दुसरा उपक्रमावरच. :))
निदान त्यामुळे मला नियमित अँटी वायरस अपडेट करण्याची बुद्धी होत आहे हे बरे झाले.
आयक्यू मोजा
आयक्यू मोजा वर क्लिक केल्यावर हे झाले काय.
बरं बरं....
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
चांगली माहिती
चांगली माहिती दिलीत.
सुदैवानी असले काही माझ्या टूरूटूरू पणे चालणार्य्या जूनाट संगणकाला झाले नाहीये.
झाले काही तर नक्की लक्षात ठेवेन.
आपला
गुंडोपंत
चांगली माहिती
उत्तम माहिती आहे. मला अजून एकदाही स्पायवेअरचा त्रास झालेला नाही. मात्र कार्यालयातील संगणकावर नाईलाजाने विडोज वापरावे लागते तिथे काळजी घेता येईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ऍक्टिव वायरस शील्ड
एओएल आणि म्याकॅफी यांच्या संयुक्त विद्यमाने (वापरला च्यायला हा शब्द एकदा) ऍक्टिव वायरस शील्ड हा मोफत कार्यक्रम वापरता येईल.
आपला,
(फुकट्या) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
उपयुक्त माहीती
उपयुक्त माहीती दिली आहे.
माझा अनुभव:
मध्ये एकदा पेन ड्राईव्ह (मराठी शब्द?) मधुन एक विषाणु आला होता. तो फायरफॉक्स उघडुच देत नव्हता. शोधल्यावर इलाज मिळाला. कोणत्या सॉफ्टवेअरची मदत न घेता. एका इंटरनेट एक्सप्लोरर प्रेमी ने केला असावा कारण आय लव आई बट डु नॉट हेट फायरफॉक्स असा काही तरी संदेश यायचा आणि इंटरनेट एक्सप्लोरर व्यवस्थित चालायचे.
उपयुक्त
उपयुक्त माहिती. मला स्पायवेअरचा एक-दोनदा त्रास झाला आहे तेव्हापासून मी ताकही फुंकुन पितो. मला मिळालेली माहिती अशी (चूभूद्याघ्या, तज्ञांनी दुरूस्ती करावी.)
साधारणपणे एखाद्या संगणकावर एकच अँटीव्हायरस वापरावे, दोन एकाच वेळी वापरल्यास अडचण येण्याची शक्यता असते. पण अँटीस्पायवेअर मात्र एकापेक्षा जास्त वापरल्यास ते एकमेकांना पूरक ठरून अधिक चांगली संरक्षक भिंत तयार होते. (अर्थात तुमच्या संगणकाची क्षमता पाहून किती वापरायचे ते ठरवावे. साहजिकच यांना मेमरी लागते.) हा सल्ला अनुसरून मी ही सर्व अँटीस्पायवेअर एकाच वेळी वापरतो.
विंडोज डिफेंडर
स्पायबॉट
स्पायवेअरब्लास्टर
स्पायबॉटचा अनुभव खूपच चांगला आहे. शिवाय यात रिअल-टाइम प्रोटेक्शन आहे.
दुसरे म्हणजे इन्स्टॉल केल्यानंतर या सर्वांचे नियमित उपडेट करणे अत्यावश्यक आहे.
इतके करूनही व्हायरस निघत नसेल तर इथे मदत मागता येईल. मी एकदा तसे केले आहे आणि तत्परतेने तज्ञांची मदत मिळाली.
आणि हे सर्व नको वाटत असेल तर लिनक्सकडे वळायचा विचार करावा.
----
असेच
असेच म्हणतो
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
+१
उपयुक्त माहीती.
वाचनखुण म्हणून हा धागा साठवता आला असता तर उत्तम.
संपादक
संपादक, उपक्रमपंत या धागा मुखपृष्ठात घालता येईल काय?
समुदाय
सुचवण्या (रेकमेन्डेशन्स) साठी वेगळा समुदाय करता येईल.
असेच म्हणतो
असेच म्हणतो.
+१
सुचवण्या (रेकमेन्डेशन्स) साठी वेगळा समुदाय करता येईल.
समुदाय केल्यास फारच मस्त!
----
शिफारस
नवा समुदाय निर्माण करण्याची सोय नाहीशी झाली की काय? अशा समुदायास सुचवणी ऐवजी शिफारस म्हणणे अधिक योग्य ठरावे.
उपक्रम
समुदाय तयार करण्या बद्दल माहिती.
दुवा
त्याला संकेतस्थळावरचा दुवा देणे ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. चाणक्य यांचे अभिनंदन! :)
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
स्पायबॉट जियो!
स्पायबॉटचा अनुभव चांगला आहे. आणि त्यासोबत फ्री अविरा अँन्टीव्हायरस! विंडोज एक्सपीचा माझा संगणक दगडासारखा ठणठणीत/टणटणीत आहे. ;-)
-सौरभदा
==================
'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'
हा होता का तो व्हायरस?
bratsk.exe and karna.dat files
अ श्या फाईल्स होत्या का?
फार अवघड आहे हा व्हायरस काढणं मी मागच्याच आठवड्यात झगडलो आहे.
फ्लॅश् प्लेयर मधून् घुसतो.. शक्यतो हिंदी मराठी चॅनेल्स कींवा सिनेमे बघत असाल तर्.
तुम्ही सांगितलेलं सॉफ्टवेअरच मी वापरलं आणि ऍव्हास्ट ने बूट् टाईम् स्कॅन् केलं त्यात ४-५ रुटकिट्स मिळाले.
रेजिस्ट्री मधून् पण या फाईल्सच्या एंट्री उडवा. हा सेल्फ् डाऊनलोड कॅटेगरीचा व्हायरस आहे.
नो स्क्रिप्ट
नेटसर्फिंग करताना जर स्पायवेअर येऊ नये असे वाटत असेल तर नोस्क्रिप्ट (noscript.net) वापरून पाहा. मला फारसा फायदा वाटत नाही पण मी लावून ठेवले आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
माझा अनुभव/मदत
माझ्या संगणकावर vondoo नावाचा व्हायरस आलेला आहे. हा व्हायरस संगणकावर आपला स्क्रीनसेव्हर आणि वॉलपेपर लावतो आणि तो बदलू देत नाही. त्याशिवाय जालावर न मागितलेली पाने उघडणे. टास्कबारच्या कोपर्यात सारखी एक वॉर्निंग येणे, टास्कमॅनेजर/रजिस्ट्री एडिटर उघडू न शकणे हे ही आहे. सुपर अँटीस्पायवेअर आणि स्पायबॉट दोन्ही डाऊनलोड केले. पण एकही चालत नाही. म्हणजे डबल क्लिक केल्यावर "डू यू वाँट टू रन धिस प्रोग्रॅम" असा बॉक्स येतो. "येस्" म्हटल्यावर पुढे काही च होत नाही. कुणाला याबद्दल माहिती असल्यास कृपया द्यावी. राजेन्द्र यांनी दिलेला दुवाही वापरून बघतो.
दुवा
वर दिलेला ग्लॅडिएटरचा फोरम हा 'एचजेटी लॉग्ज' या विशिष्ट प्रकारात मोडतो. इथे माहिती देण्याआधी तुम्हाला हायजॅक धिस नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून रन करावे लागेल. यामुळे तुमच्या संगणकावर कुठल्या प्रोसेस आहेत याचा एक रिपोर्ट तयार होतो (टेक्स्ट फाईल). तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा त्यासोबत तुम्हाला ही फाईल जोडावी लागेल.
प्रश्न विचारण्याआधी या सूचना वाचाव्यात.
सर्वात महत्वाचे : या किंवा इतर कुठल्या एचजेटी फोरमवर तुमच्यासारखीच अडचण इतर कुणाला आलेली दिसली तर त्याने केलेले उपाय तुम्ही करू नका. एचजेटी फोरमवर वापरले जाणारे प्रतिबंधक उपाय (उदा. कोम्बोफिक्स) अत्यंत जहाल असतात आणि तज्ञांच्या देखरेखीखाली न केल्यास तुमच्या संगणकाला अपाय होण्याचा संभव असतो.
शुभेच्छा!
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
हात्तिच्या..
सर्वात महत्वाचे : या किंवा इतर कुठल्या एचजेटी फोरमवर तुमच्यासारखीच अडचण इतर कुणाला आलेली दिसली तर त्याने केलेले उपाय तुम्ही करू नका. एचजेटी फोरमवर वापरले जाणारे प्रतिबंधक उपाय (उदा. कोम्बोफिक्स) अत्यंत जहाल असतात आणि तज्ञांच्या देखरेखीखाली न केल्यास तुमच्या संगणकाला अपाय होण्याचा संभव असतो.
कृपया याविषयी अधिक माहिती द्यावी. जहाल उपाय म्हणजे नक्की काय? संगणकाला ठसका वगैरे लागतो का? ;-)
-सौरभदा
==================
'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'
जहाल उपाय
संगणकाला ठसका वगैरे लागतो का? ;-)
नुसता ठसका लागत असता तर ठीक होते. पण नंतर संगणक बूटच होत नसेल तर त्याला काय म्हणाल? :)
जहाल उपायांमध्ये एक आहे कोम्बोफिक्स. माहीती नसताना हे वापरले तर काय होते याचे एक उदाहरण इथे.
सगळीकडे सगळे तज्ञ लोक कानीकपाळी ओरडून हेच सांगत आहेत की असे उपाय तज्ञांचे मार्गदर्शन नसेल तर वापरू नका.*
दुवा १
दुवा २
*लाल रंग, ठळक, अंडरलाईन : वाक्य महत्वाचे आहे हे दाखवण्यासाठी याहून पलिकडे काय करता येऊ शकते कल्पना नाही.
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
.
कोलबेर, राजेंद्र आणि सौरभदा यांनी लिहिल्याप्रमाणे सुपराअँटिवायरस, स्पायबॉट आणि अविरा कालच संगणकात टाकले. त्या तिघांनी मिळून बरेच काही नको ते शोधून काढून नष्ट केले. आता जालावरचा वावर गतीमान झाल्यासारखेसुद्धा वाटत आहे.
सूचनांबद्दल आभार.
ही चर्चा चालू केल्याबद्दल कोलबेरांचे आभार.
--लिखाळ.