उपक्रम समुदाय

बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप किंवा कम्युनिटी सारखी सुविधा इथे समुदायाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. समुदाय कोणत्याही उपक्रमाशी संबंधित लोकांना किंवा विशिष्ट विषयांमध्ये रस असणाऱ्या लोकांना एक मंच मिळवून देतो. येथे सदस्य त्यांच्या सामायिक आवडीनिवडी किंवा ध्येय धोरणांवर लेख, चर्चा आणि प्रतिसादांच्या माध्यमातून माहितीचे आणि विचारांचे आदानप्रदान करू शकतात.

समुदाय बनवण्याविषयी मार्गदर्शन

  • समुदाय कोणत्याही विषयाला किंवा उपक्रमाला वाहिलेला असावा. उदाहरणार्थ, "मराठी साहित्य - मराठी साहित्यविषयक चर्चा आणि माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी", "भटकंती - ज्यांना डोंगरदऱ्यात, गडकिल्ल्यांवर भटकायला आवडते त्यांच्यासाठी".
  • समुदाय बनवताना, हा समुदाय कशासाठी आहे? कोणासाठी आहे? सदस्यांनी कसा सहभाग घेणे अपेक्षित आहे? वगैरे गोष्टींची माहिती द्यावी.
  • काही विशिष्ट लोकांसाठीच असणारे समुदाय न बनवता अधिकाधिक लोकांना सहभागी होता येईल असा व्यापक समुदाय बनवावा.
  • नकारात्मक, वादग्रस्त, तेढ वाढवणारे विषय टाळावेत.
  • नवीन समुदाय बनवण्यापूर्वी संबधित विषयावर कोणीतरी आधीच समुदाय बनवला नाही ना ह्याचा शोध घ्यावा.
  • व्यवस्थापनाकडून संमत झाल्यानंतरच समुदाय अस्तित्वात येईल याची कृपया नोंद घ्यावी. (त्यामुळे सुपूर्त केल्यानंतर लगेचच आपला समुदाय यादीत दिसणार नाही)

कोणत्याही विशिष्ट विषयांशी, उपक्रमांशी संबंधित नसलेले आणि/किंवा वैयक्तिक स्वरुपाचे समुदाय संमत होणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

समुदाय कसा बनवायचा?

नवीन समुदाय बनवण्यासाठी:

  • समुदायाचे नाव
  • समुदायाविषयी थोडक्यात माहिती (जी समुदायांच्या यादीमध्ये दिसेल.)
  • समुदायाच्या स्वागताचा मजकूर (हा समुदाय कशासाठी आहे? कोणासाठी आहे? सदस्यांनी कसा सहभाग घेणे अपेक्षित आहे? वगैरे माहिती द्यावी.)
  • समुदायाचे स्वतःचे संकेतस्थळ इतरत्र असेल तर त्याचा दुवा द्यावा.
  • वर उल्लेखलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असलेले आणि उपक्रमवरील लेखनविषयक मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असलेले समुदायच संमत करण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.
  • समुदायाच्या प्रस्तावाला वेळेच्या उपलब्धतेनुसार शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तरीही कधीकधी उत्तर मिळण्यात उशीर होऊ शकतो याची कृपया नोंद घ्यावी.
  • वरील-उजव्या कोपऱ्यातील "समुदाय" या दुव्यावर टिचकी मारून समुदायांची यादी पाहता येईल.

    समुदायासाठी लेख/चर्चेचा प्रस्ताव कसा लिहायचा?

    • समुदायासाठी लेख/चर्चेचा प्रस्ताव लिहिण्यासाठी आधी त्या समुदायाच्या मुख्यपृष्ठावर जावे. समुदाय -> समुदायाचे नाव.
    • उजव्या हाताला त्या समुदायाच्या नावाखाली असलेल्या पर्यायांतून "लेख लिहा" किंवा "चर्चेचा प्रस्ताव लिहा" हा पर्याय निवडावा.
    • शीर्षक आणि मजकूर लिहावा.
    • विषय आणि प्रकार निवडावा. एकाहून अधिक विषय निवडण्यासाठी कंट्रोल कळ दाबून ठेवून निवड करावी.
    • पूर्वपरीक्षण करून सुपूर्त करावा.
     
    ^ वर