इतर सुविधा आणि पर्याय

लेख, चर्चा, प्रतिसाद आणि समुदाय याशिवाय इतरही सुविधा इथे आहेत.

व्यक्तिरेखा -उपलब्ध पर्याय आणि माहिती

  • येण्याची नोंद केल्यावर "माझे सदस्यत्व" या दुव्यावर टिचकी मारून स्वतःची व्यक्तिरेखा पाहता येईल.
  • त्यातील "संपादन" विभागात तीन उपविभाग आहेत.
    • 'खात्याची मांडणी' या विभागात 'उपक्रम'वरील सुविधांविषयी पर्याय निवडता येतात.
    • 'वैयक्तिक माहिती' आणि 'व्यावसायिक माहिती' या विभागात अनुक्रमे वैयक्तिक आणि व्यावसायिक माहिती भरता येते.
  • येण्याची नोंद केल्यावर कोणत्याही सदस्याच्या नावावर टिचकी मारून त्या सदस्याची व्यक्तिरेखा पाहता येते.
  • आपली स्वतःची व्यक्तिरेखा पाहणे, संपादित करणे आणि इतरांची व्यक्तिरेखा पाहणे या गोष्टी केवळ येण्याची नोंद केल्यावरच शक्य आहेत.

व्यक्तिगत निरोप

  • डाव्या बाजूस दिसणाऱ्या पर्यांयातून "निरोप"या दुव्यावर टिचकी मारली असता निरोपांच्या मुख्य पानावर जाता येते.
  • प्रत्येक सदस्याच्या व्यक्तिरेखेत आणि सदस्याने लिहिलेल्या लेखात, प्रतिसादात त्यांना व्यक्तिगत निरोप पाठवण्याचा दुवा असतो.
  • व्यक्तिगत निरोप पाठवणे आणि पाहणे या गोष्टी केवळ येण्याची नोंद केल्यावरच शक्य आहेत.

खरडवही

  • बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या स्क्रॅपबुक सारखी सुविधा इथे 'खरडवही' च्या रूपात उपलब्ध आहे.
  • इतर सदस्यांच्या खरडवहीत नोंद करण्यासाठी त्या सदस्याच्या व्यक्तिरेखेच्या पानावर जाऊन "खरडवहीतील नव्या नोंदी पाहा" या दुव्यावर टिचकी मारावी
  • खरडवहीत नोंद करणे आणि नोंदी पाहणे या गोष्टी केवळ येण्याची नोंद केल्यावरच शक्य आहेत.

Comments

!

येथे खरडफळा नाहीये का?

जालावर सेव करण्याची सुविधा

लेख एका बैठकीत पुर्ण होत नाही अनेक वेळा बसावे लागते यावेळि लिहिलेला मजकुर सेव्ह करण्याची सुविधा काय आहे.
विश्वास कल्याणकर

 
^ वर