उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
संपादन सुविधा
उपक्रम
February 23, 2007 - 11:05 pm
बऱ्याचदा लिखाण करताना सुशोभीकरण (फॉरमॅटिंग) जसे की ठळक अक्षरे, तिरकी अक्षरे, अधोरेखन, रंगीत अक्षरे, आकडेवार यादी इ. करणे आवश्यक असते. त्यासाठी साहाय्यक अशी संपादन सुविधा इथे लिहिण्याच्या प्रत्येक खिडकीसोबत जोडलेली आहे.
इतर संकेतस्थळांपेक्षा इथे असणारी सुविधा थोडीशी वेगळी आहे. इतर ठिकाणच्या संपादन सुविधा "wysiwyg" म्हणजे "what you see is what you get" या प्रकाराच्या असतात. इथे असणारी संपादन सुविधा तश्या प्रकारची नाही. इथे वेगवेगळ्या बटनांवर टिचकी मारली असता एचटीएमएल भाषेतील मजकूर संपादन खिडकीत उमटतो.
संपादन सुविधा वापरून सुशोभीकरण करण्याची साधारण पद्धत अशी,
- सुशोभीकरण करायचे लेखन निवडा (सिलेक्ट करा)
- संपादन खिडकीच्या वर असणाऱ्या वेगवेगळ्या बटनांतून योग्य त्या बटनावर टिचकी मारा.
- त्यानंतर तुम्ही निवडलेल्या लिखाणाच्या सुरुवातीला आणि शेवटी एचटीएमएल भाषेतील मजकूर उमटेल.
- खिडकीच्या वर असणाऱ्या भिंगाच्या चित्रावर टिचकी मारली असता हे लिखाण प्रत्यक्षात कसे दिसेल ते पाहता येईल.
- पुन्हा भिंगाच्या चित्रावर टिचकी मारून संपादन खिडकीत परतता येईल.
अश्याच प्रकारे पुढे दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्रिया करता येतील
चित्र/बटन | क्रिया |
लिखाण ठळक करणे |
|
लिखाण तिरके करणे |
|
अधोरेखन करणे |
|
लिखाण डाव्या बाजूला चिकटवणे |
|
लिखाण मध्यात आणणे |
|
लिखाण उजव्या बाजूला चिकटवणे |
|
लिखाण उजवीकडे (समासाबाहेर) सरकवणे |
|
आकडेवार यादी बनवणे (ज्या गोष्टींची यादी बनवायची असेल त्या गोष्टी एका ओळीत एक अश्या लिहाव्या आणि सगळ्या ओळी निवडून (सिलेक्ट करून) या चित्रावर टिचकी मारावी) |
|
ठिपक्यांची यादी बनवणे (ज्या गोष्टींची यादी बनवायची असेल त्या गोष्टी एका ओळीत एक अश्या लिहाव्या आणि सगळ्या ओळी निवडून (सिलेक्ट करून) या चित्रावर टिचकी मारावी) |
|
अक्षरांचा रंग (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यातून हवा तो रंग निवडावा) |
|
अक्षरांच्या पार्श्वरंग (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यातून हवा तो रंग निवडावा) | |
लिखाण उद्धृत करणे |
|
सुशोभीकरण काढून टाकणे (लिखाणातील काही भाग निवडून जर या बटनावर टिचकी मारली तर फक्त त्या भागातील सुशोभीकरणाची माहिती काढून टाकली जाते आणि फक्त मजकूर उरतो. जर काही लिखाण न निवडता या बटनावर टिचकी मारली तर संपूर्ण लिखाणातून सुशोभीकरणाची माहिती काढून टाकली जाते.) |
|
मजकुरात चित्र चिकटवणे. (मजकुरात जिथे चित्र चिकटवायचे असेल तिथे कर्सर ठेऊन या बटनावर टिचकी मारावी. त्यानंतर उघडणाऱ्या छोट्या खिडकीत चित्राचा दुवा (Image URL), चित्राचे शीर्षक (Caption), संलग्नता (Alignment, 'right' किंवा 'left' यापैकी आवश्यकतेनुसार), आणि चित्र उपलब्ध झाले नाही तर दाखवायचा पर्यायी मजकूर (Alternate text) या गोष्टी भराव्या आणि 'Submit' या बटनावर टिचकी मारावी. |
|
दुवा (वेब लिंक) देणे (या बटनावर टिचकी मारली असता एक नवी छोटी खिडकी उघडेल त्यात दुवा आणि दुव्याचे नाव या गोष्टी भराव्या.) |
|
या बटनावर टिचकी मारली की लिखाण प्रत्यक्षात कसे दिसेल ते पाहता येईल. संपादन खिडकीत परतण्यासाठी पुन्हा याच बटनावर टिचकी मारावी. |
दुवे:
Comments
लेखन संपादन
मला जर मी स्वत: दिलेले लेखन, प्रतिसाद संपादित करावयाचे असतील तर कसं करू?
पल्लवी
मदत पाहिजे
वर्ड पॅड्मधील मजकूर उपक्रमवर चिकटवल्यावर सुधारता आला नाही. उदा. मंदिरे या लेखात सूची देतांना मधली जागाच नाहिशी झाली.
नंतर दुरुस्त करणे अवघड आहे. काय करावे ?
शरद
मदत पाहिजे
मदत पाहिजे
उपक्रमवर लेख पाठवतांना पूर्व परीक्षणाची कळी दाबल्यावर मजुकर कुठेही तुटतो व तो
सरळ करता येत नाही. काय करावे ? सुधारणा करण्याकरिता पहिला मजकूर हालवून पाहिला
पण फायद्द झाला नाही.
शरद
आणखी एक अडचण
पुष्कळदा लेखन विस्तृत असले तर ते एका बैठकीत पूर्ण होणे शक्य दिसत नाही. अशा वेळी अर्धवट झालेले लेखन 'पोस्ट्' न होता 'सेव्ह्' करायची काही सोय आहे का?
कसे लिहिता
तुम्ही लेख इथेच पहिल्यांदा टंकता कि इतरत्र आणि मग येथे डकवता? सरल साधा उपाय म्हणजे, लेख लिहून झाल्यावर एकदा नोटपॅडमध्ये डकवा आणि तोच परत नोटपॅड मधून उचलून येथे डकवा. जर येथेच पहिल्यांदा टंकत असाल तर शक्यतो असा तुटण्याचा अनुभव कधी आला नाही.
वर्डपॅडमध्ये लिहतो
लेख वर्डपॅडमध्ये लिहतो व नंतर येथे डकवतो.पूर्वपरीक्षणा आधी सरळ असते. पुढेच बिघडते.
शरद
पूर्वपरीक्षण असे करून पाहा
स्पष्टीकरण....
शरद, आपणाला येत असलेली अडचण नीट समजली नाही. मध्येच लिखाण तुटते म्हणजे काय होते?
मला तरी असा अनुभव कधी आलेला नाही. मी बरहा वापरुन नोटपॅडमध्ये लिखाण करुन सरळ इथे चिकटवतो.
मात्र उपक्रमावर लिखाण दिल्यावर आपण पाडलेले आधीचे परिच्छेद जातात आणि प्रत्येक वाक्य अगदी डावीकडून सुरुवातीपासून सुरु होते असा अनुभव आहे.
असे का होते?
हे टाळण्यासाठी जिथे परिच्छेद पाहिजे तिथे & n b s p; & n b s p; & n b s p; असे (या इंग्रजी शब्दांमधल्या स्पेस काढून) लिहले की योग्य स्पेस देता येतात.
-सौरभ.
==================
उदाहरण - "पाहुणेर" मधील तुटलेल्या ओळी
शरद यांच्या "पाहुणेर" लेखात पुढील ओळ उजवीकडे जाण्यापूर्वीच तुटलेली दिसते :
(मला ही आडचण येत नाही. शरद यांच्या लेखांत अशा जागा दिसतात, अशा जागेचा निर्देश करायचा आहे. वर्डपॅड मध्ये लिहिताना शरद अधूनमधून "एंटर"/"कॅरेज रिटर्न" बटन वापरत असावेत काय? अशी शंका येते. किंवा वर्डपॅड मधील मजकूर उपक्रमावरील संपादन खिडकीत चिकटवल्यावर चांगला दिसावा म्हणून "एंटर"/"कॅरेज रिटर्न" बटन वापरत असावेत काय?)
एक वाक्य
एखाद्या ब्लॉगवर एका वाक्याचा प्रतिसाद द्यायचा असेल तर मी उपक्रमावर येतो, इथल्या गूगल शोध खिडकीत टंकतो आणि चिकटवतो!
---
प्रकाशित केलेले लेखन संपादित कसे करायचे?
प्रकाशित केलेले लेखन संपादित कसे करायचे?
_____________________________________________________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥
प्रकाशित केलेले लेखन संपादित कसे करायचे?
प्रकाशित केलेले लेखन संपादित कसे करायचे?
मैं आप को आप इस लेख
मैं आप को आप इस लेख लिखने में बना दिया है प्रयासों के लिए धन्यवाद देना चाहूंगा. मैं भविष्य में तुम से ही सबसे अच्छा काम के रूप में अच्छी तरह से उम्मीद कर रहा हूँ. वास्तव में अपने रचनात्मक लेखन क्षमता मुझे प्रेरित किया है.
646-206 test
642-437 test
70-432 test
352-001 test