ड्रुपल आणि मराठीकरण

ड्रुपल आणि त्याचे मराठीकरण ह्यासंबंधी सर्वांकरता माहिती उपलब्ध व्हावी याकरता हा लेख चालू करत आहे. ड्रुपलची मोड्यूल्स, ब्लॉक्स, थीम्स, लोकलायझेशन इ. चे मराठीकरण कोणकोणत्या पद्धतीने करता येईल ह्यावर अनुभव,मत,चर्चा,उपाययोजना इथे सापडेल. ड्रुपल आणि मराठी भाषेचे शिक्षक, विद्यार्थी, परीक्षक, तपासनीस, पर्यवेक्षक { :) :) :) :) :)} सर्वांच्या मतांसाठी हे सदर खुले आहे.

सुरुवात करण्याकरता काही मुद्दे

युनिकोड आणि ड्रुपल - काय आणि कसे?
ड्रुपल + गमभन + मुक्त जतुदितउजा ( ओपन wysiwyg)
लोकलायझेशन : .po पुस्तिका
ब्लॉक्स निर्मिती
लिखाणाचे प्रकार
लिहिण्याची पद्धत
मेनु, वर्गीकरण
शोध

Comments

ड्रुपल + गमभन + मुक्त जतुदितउजा

ड्रुपल + गमभन + मुक्त जतुदितउजा ( ओपन wysiwyg)

ह्याकरता ओपन wysiwyg मध्ये आवश्यक असलेले बदल केलेल्या पुस्तिका मी लवकरच जाळ्यावर चढवेन.
त्याचसोबत ड्रुपल मध्ये काय, कुठे, कसे बदलावे याची माहिती असलेल्या पृष्ठाचा दुवाही देईन. संबंधित माहिती शब्दन् शब्द सोप्या मराठीमध्ये लिहिणे माझ्यासाठी कठीण आहे. सर्व माहिती (इंग्रजीत) एकत्र करून; पुस्तिका आणि माहितीच्या पृष्ठाचा दुवा या शनि-रवि पर्यंत देण्याचा प्रयत्न करेन.

वितरण

वितरणाबरोबरच होस्टींगची सुविधा आहे का? मी सोर्सफोर्जचा अजून सदस्य झालेलो नाही. झाल्यावर कळवेनच.

पुस्तिका आणि माहिती

माहिती आणि पुस्तिका इथे आहेत.

धन्यवाद

ओंकार जोशी यांनी तयार केलेली गमभन ही सुविधा ड्रुपलमध्ये जोडून त्यात ओफलाईन टाईप केलेला हा मजकूर येथे चिकटवीत आहे. युनिकोड नीट हाताळले जात आहे की नाही ते कळण्यासाठी या चित्राची लिंक देत आहे. काही त्रुटी जाणवत आहेत, त्या खरडवहीत लिहीन.

ओंकारला जितके द्यावेत तितके धन्यवाद कमीच आहेत!

अद्यावत

गमभनच्या ७.०४.२१ आवृत्तीसोबत वरील माहिती आणि पुस्तिका आद्यावत केल्या आहेत!

डुपलवर मराठी संस्थळासाठी कोणते इडिटर जोडावे ?

मराठी संकेतस्थळासाठी डुपल मोड्यूल BUEditor चांगले आहे. पण त्यात जष्टीफाय लेफ्ट, जष्टीफाय सेंटर, वगैरे अजून भर घालायची आहे. तर CSV कोड डकवायला ते कुठे फुकट मिळते का ? किंवा अगदी तयार CSV फाईल अपलोड करायची असेल तर दुवा आहे का ? दुसरे इडिटर [जसे FCKEditor] नका सांगू राव. मी त्यावर प्रयोग करुन थकलो आहे. :)

कोणी तज्ञ यावर मार्गदर्शन/मदत करतील का ?

-दिलीप बिरुटे

मिसळपाव डॉट कॉम..;)

वा! वा!

आमचे प्रस्तावित मराठी संकेतस्थळ 'मिसळपाव डॉट कॉम' आता तयार होण्यास फारसा वेळ लागणार नाही! ;)

तात्या.

छान

छान उपक्रम आहे.
पुढील लेखांची वाट पाहत आहे.

पीओ एडीटर

ड्रुपलचे मराठीकरण करण्यासाठी मी poeditor वापरतो. सगळ्याच वाक्यांचे मराठी अनुवाद न करता केवळ उपयोगकर्त्याचा साचा मराठीत करतो. त्यामुळे माझ्याशिवाय कुणी इतराने ते मराठी करण वापरल्यास त्याला व्यवस्थापन करण्यास अडचन होऊ नये.

मराठी आदर्श (सर्वमान्य) शब्द तालिका निर्माण होत नाही तो पर्यंत असेच करावे लागेल. आदर्श तालिका म्हणजे काय या बद्दल ड्रुपल वर उदाहरण दिले जाते ते बंगाली भाषेसाठी काम कराणार्‍या अंकुर नावाच्या गटाचं. उदाहरण येथे पाहू शकाल.

ड्रुपलचे मराठी करतांना एक वचन अनेकवचनाचा त्रास झाला होता. तेव्हा मी १ व ० असे देऊन त्याची बोळवण केली, पण त्याचे उत्तर खात्रीलायक माहिती नाही. यावर प्रकाश टाकता येईल का?
माझ्यापुरता हा प्रश्न मी ती संचिका नोटपॅड ++ मधे उघडून त्यात अनेक वचनी बदल स्वतः करून सोडवला आहे.

साधारण उपयोगासाठी किमाण १२ मॉड्युल्स चे मराठी करण करावे लागते. काही खास गरजांसाठी वेगळे जसे उपक्रम ला ऑरगॅनीक ग्रुप चे मराठीकरण करावे लागले तसेच गेस्टबुकचे सुध्दा.

नीलकांत

छान

चांगला उपक्रम आहे. सीपीपी,कोअर जावा, जावास्क्रिप्ट,एच टी एम एल शी संबंधित काही मदत हवी असेल तर कळवावे.आमच्या कुवतीनुसार आम्ही ती अवश्य करु.

छान

छानच उपक्रम.
मी काही मदत करू शकतो का?

नीलकांत - मदत

सद्ध्या नीलकांत .po पुस्तिकांवर मराठी संस्करणाचे काम करत आहेत. कोणास मराठी शब्द सुधारण्याचे/सुचवण्याचे काम जमणार असल्यास कृपया नीलकांत यांच्याशी संपर्क साधावा.

ऑनलाइन मराठीकरण

एखाद्या साइटवर ड्रुपलचे ऑनलाइन मराठीकरण (व्यग्रपणे) करता येईल. त्यात कुणाला सहभागी व्हायचे असल्यास सांगावे. मी २-३ दिवसात तशी सोय करून ठेवीन.
एकदा का मराठीकरण पूर्ण झाले की त्याची .पीओ फाइल बनवता येईल.
चित्तरंजन

चालेल की...

चित्तरंजन म्हणताहेत ते उत्तम आहे. मग कधी करता सुरूवात? काही प्रस्तावना करता येईल का कसे काम होईल ते? आणि हो मी आधी विचारलेला अनेकवचनाचा कुणाकडून काहीच प्रतिसाद नाही.

मराठी शब्द सुचवने किंवा काही जागी समस्त वाक्य मराठीतून सुचवने हा मदत करण्याचा उत्तम उपाय आहे.
एक प्रकार आणि होऊ शकतो की काहींनी फाईल्स वाटून घ्यायच्या व त्या भाषांतरित करून एकत्र करायच्या, शेवटचा हात सोबत मारायचा आणि झाले. सर्वांनी आता नव्या ५.१ वर काम करावे.

नीलकांत

मदत

मराठी शब्द सुचवने किंवा काही जागी समस्त वाक्य मराठीतून सुचवने हा मदत करण्याचा उत्तम उपाय आहे.

---- अशाप्रकारची मदत करणे मला शक्य आहे आणि तसे करण्याची माझी तयारीही आहे. मात्र मी (मांत्रिक दच्या धर्तीवर) तांत्रिक नाही. तंत्रज्ञान विषयांमध्ये मला गती असेलच असे नाही. माझ्या परीने मी विषय समजावून घेण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेन. त्यामुळे मी कुठे आणि कशी सुरुवात करावी हे सांगावे.

ड्रुपल चे मराठीकरण

ड्रुपलचे मराठी करण करण्यासाठी चाललेल्या चर्चेत ते कसे करावे याची थोडक्यात माहिती देत आहे.

ड्रुपलची रचना वेगवेगळ्या मॉड्युल्स मधे झालेली आहे, त्यामुळे ड्रुपलची भाषांतरे सुध्दा अश्याच वेगवेगळ्या फाईल्स मधे करावी लागतात. खरं तर तशी वेगवेगळी टेम्पलेट्स् उपलब्ध आहेत ती सहज भाषांतरित होतात.
ही टेंम्पलेटस् येथे मिळतील.

ती उतरवून घेतल्यावर भाषांतर करण्यासाठी विंडोजवर पो एडीटर नावाचा संपादक वापरायला सोपा आहे. तो येथे मिळेल.
यात टेम्पलेट्स च्या .pot फाईल्स उघडायच्या, या संपादकाचा चेहरा असा आहे की येथे वरील अर्ध्याभागात हिरव्या रंगात मुळ वाक्ये दिसतात आणि त्यातील जे वाक्य निवडले असेल ते त्या खालील चौकटित दिसतं, सर्वात खालील जी चौकट आहे तेथे आपल्याला भाषांतरीत मजकुर लिहायचा असतो.
अश्या तर्‍हेने तयार झालेली फाईल .po या आडनावासोबत साठवा की झाले त्या मॉड्युलचे मराठीकरण.

आता हे काम करतांना येणार्‍या काही अडचणी.
१) एकवचन आणि अनेकवचन - अनेक भाषांत तीन किंवा जास्ती वचने असतात , त्यांच्यासाठी खास सोय करता यावी म्हणून ही रचना आहे. यात मी एक साधी युक्ती केली जी ड्रुपल वर दिलेली आहे. ती म्हणजे सेटींग्ज् मधे जाऊन १ , व् ० असा बदल केला. आणि नंतर ती फाईल साध्या संपादकात उघडून हवा तेथे अनेकवचनी शब्द दिला.
२)ही अडचन इतरांना कदाचित येणार नाही मात्र अनेक लोकांनी मिळूण काम केल्यास ही नक्की जाणवेल. ती म्हणजे अनेक पर्यायी शब्द. एखाद्या मॉड्युल मधे एका शब्दाला एक पर्यायी शब्द दिल्यास नेमका तोच शब्द इतरही जागी आल्यास दिल्या गेला पाहिजे. अन्यथा अनेक समानार्थी शब्दांची जत्रा होते व भाषांतर नको पण... ची अवस्था होते.
यासाठी वर आधीच्या प्रतिसादात दिलेला अंकुंर बांगला सारखा एक प्रमाण शब्दसंच केल्यास आज येथे तसेच भविष्यातही येणार्‍या काळात याचा फायदा होईल. वेगवेगळ्या प्रकल्पात असे प्रमाणीत शब्दसंच वापरण्यावर भर देता येईल. किंवा उपयोग कर्त्याला ही सूची संदर्भसूची म्हणूनही देता येईल.
३)भाषांतर पुर्ण झाल्यावर ड्रुपलवर ठेवण्यासाठी आणि वापरण्यासाठी सुध्दा एकच मोठी फाईल असने सोईचे असते. मात्र हे मला अद्याप जमलेले नाही. कुणी लिनक्स वापरत असल्यास ते याबाबतीत मदत करू शकतील.

याबाबत दूवे देत आहे.

ड्रुपल -

ड्रुपल भाषांतरकार मार्गदर्शक - दुवा


ड्रुपल भाषांतर फाईल्स येथे मिळतील - दुवा

पो संपादक येथे मिळतो -दुवा

एकवचन अनेकवचन बाबत अधिक चर्चा येथे आहे -दुवा

अंकुरबांगलाची आदर्श शब्दसुची येथे पहायला मिळेल - दुवा

नीलकांत

आकड्यांचे काय?

नीलकांत,

कदाचित तुम्हाला यातील अधिक माहिती असावी म्हणून एक प्रश्न कुतूहलाने विचारते. (इतरांना माहित असल्यास त्यांनीही सांगावे.) माझे शब्द, उपक्रम आणि मराठी गझल ही तीन संकेतस्थळे मी पाहिली. त्यांतील दिनांक आणि वेळा (प्रकाशन/ प्रतिसाद) इंग्रजीतून दिसतात. केवळ मनोगतावर आकडे मराठीत दिसतात. हे कसे? त्यासाठी काय करावे लागते.

सदर विषय आपल्या डोक्यावरून जाईल असे वाटत होते. थोडा थोडा कळतोय असे वाटते. :)

प्रियाली.

थोडा अभ्यास करून मग सांगेन

आकडे मराठीत असावेत यासाठी काय करता येईल हे शोधण्याची जबाबदारी मी घेईन.

धन्यवाद

मी सहजच न्याहळत असताना १ दिवस, १ तास, १ मिनीट असे लिहिणे शक्य आहे हे कळले परंतु बदलणारे आकडे (variable numbers) मराठीत कसे येतील, हे मनोगताशिवाय इतरत्र दिसले नाही. तुमच्या उत्साहाबद्दल आभारी आहे.

कळावे,
प्रियाली.

असमर्थ

प्रियाली,
तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी माझ्याजवळ नाही. पण मी त्या मागे आहेच. ड्रुपलवर सुध्दा याबाबत चौकशी केली असता हाती काही आले नाही.
मनोगताच्या प्रशासकांना याबाबत प्रश्न विचारण्याचा विचार आहे. कदाचित ते मदत करतीलही. पण ही समस्या खरच महत्वाची आहे.

नीलकांत

ड्रुपल मधे

ड्रुपल मधे प्रत्येक मॉड्युल मधे काही वाक्ये आहेत, त्यांना तेथे बदलता येतात.
काही बदल करायचे राहील्यास संकेतस्थळावर लोकलायजेशन मधे जाऊन हवं ते वाक्य वेळेवर सुध्दा बदलता येतं.
पण खुप प्रयत्न करूनही या अंकांचा माग काढता आला नाही. त्यांचा स्त्रोत समजला तर काही आशा आहे.
प्रयत्नाचा एक भाग म्हणून मी मनोगताच्या प्रशासकांनाही व्य. नि. पाठवला आहे. :-) असो.

शंतनू मदत करतो म्हणताहेत. हे आनंददायक आहे.

नीलकांत

तारखेचे लोकलायज़ेशन

माझ्या माहितीप्रमाणे तारखेचे लोकलायज़ेशन पीओ फाइल बदलून होणार नाही. त्यासाठी पी एच पी ची दोन फ़ंक्शन्स वापरावी लागतील. ड्रुपलचे फ़ॉरमेट डेट असे जे फ़ंक्शन आहे ते मी बदलून पाहणार आहे, या लिंकवर दिलेल्या माहितीप्रमाणे.

यात एक मुख्य गोष्ट अशी आहे की ड्रुपल ज्या सेवादात्याच्या यंत्रावर स्थापीत असेल त्या यंत्रावर देवनागरी लोकल स्थापीत असावा लागतो. स्वस्त सेवादाते सर्व लोकल्स नीट स्थापीत करत नाहीत व आपल्यालाही त्या यंत्राचा थेट संपर्क देत नाहीत. अशात तारखेचे आकडे इंग्रजीतच राहतील असे दिसते.

तारखेचा साचा

या पध्दतीने आपल्याला तारखेचा साचा सुध्दा बदलता येईल. म्हणजे मला लघु दिनांका सोबत वेळ नको असेल तर तसे करता येईल.
कुणी प्रयोग केला आहे का?

नीलकांत

कुणी प्रयोग केला आहे का?

हो, मी केला आहे असा प्रयत्न.

गुरुवार, एप्रिल 19, 07

अशी तारीख हवी असेल तर (sites\default) येथे असलेली settings.php ही फाईल उघडा. व
शेवटला खाली दिलेला मजकूर चिकटवा.

$conf = array(
'date_format_short' => 'm/d/Y',
'date_format_long' => 'l, F d, y',
'date_format_medium' => 'l, F d, y',
);

अधिक माहिती येथे वाचता येईल.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

ड्रुपल आणि मराठी

मित्र हो,
मला ड्रुपल शिकतानाच ते मराठी मध्ये कसे बनवायचे ते हवे आहे. मदत मिळेल का? सध्या मी खालील गोष्टी केल्या आहेत.

  1. ड्रुपलचे प्राथमिक संस्करण (इन्स्टॉल).
  2. प्रथम सदस्य बनवला आहे.
  3. पुढे काय करायचे? मला आता जर मराठी टंकित करायची तसेच सगळे काही मराठी करायचे आहे. (तात्पुरते मराठी टंकित करायची सोय कशी करायची ते सांगितले तरी चालेले.)

नोंदः कृपया सांगताना हे लक्षान घ्या कि मला यातले फारच थोडे ज्ञान आहे आणि मी नवशिका आहे.

पुढे काय करायचे

आपल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर येथे देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. मराठी टंकित करायची सोय कशी करायची ते इतर लोक सांगू शकतील.

धन्यवाद

शंतनू, धन्यवाद. प्रयोग करून सांगतो जमते आहे का नाही ते.

जमले

मी .po वापरली. जे हवे ते काही प्रमाणात जमले.

तुम्ही कुठली ओएस वापरता?

नमस्कार,
तुम्ही कुठली चालना प्रणाली वापरता? म्हणजे जर का एक्सपी वापरत असाल आणि ड्रुप॑ल नव्याने शिकायचे असेल तर बराहा वापरा.
ते मुक्त आहे, आणि सोपे आहे. त्यातच बराहा चा आयएमई वापरा.

ड्रुपल शिकताय ना? तर आधी तो चालतो कसा आणि त्याची मॉड्युल सिस्टीम कशी आहे. थीम कशी चालते , सदस्य, साहित्य आदी सर्वांशी परिचय व्हावा म्हणून आधी एखादी कल्पना घेऊन चाचणी संकेतस्थळ बनवा. मराठी जोडण्यासाठी प्रयोग चालले आहेत.
तुम्ही ड्रुपल सोबत सरावाचे झाल्यावर ते (मराठी जोडने) सहज होईल.
येथील जाणकार जेव्हा ड्रुपल मधे 'हे - येथे ' जोडा असं म्हणतील तेव्हा सहज लक्षात यावं एवढं ड्रुपल सरावाचं व्हावं ही अपेक्षा आहे.
बाकी काही अडचण असल्यास सगळे आपल्या सोबत आहेत.

पुढे काय करायचे?
तुमच्या संकेतस्थळावर काय काय सेवा सुविधा हव्यात त्यांचा शोध घ्या, मॉड्युल्स सक्रिय करा ते वापरा, थीम बदला.

एक काम करू शकता युट्युब वर ड्रुपल म्हणून शोधा अनेक छान क्लिप मिळतील त्यातील ४.७ मधे नविन काय अशी क्लिप आहे ती आवर्जून बघा.
लुल्लाबोट नावाचे संकेतस्थळ आहे त्यावर थीम कशी बनवावी या बद्दल मार्गदर्शन आहे.

नीलकांत

खिडक्या

मी विंडोज एक्स पी वापरतो. त्या सोबत बरहा आय एम ई तसेच ईंडिक आय एम ई सुद्धा वापरतो.

मग अडचन काय आहे?

मग ड्रुपल मधे बराहा च्या मदतीने मराठीत लिहा की, अडचण काय आहे?
तुम्हाला ड्रुपलचा चेहरा (इन्टरफेस) मराठीत करायचा आहे का? जरा दोन दिवस थांबा. त्या संचिका चढवतो.

जर का मराठी लिहीलेलं ड्रुपल स्विकारत नसेल तर एक चुक झालेली आहे. ती म्हणजे ड्रुपलसाठी विदागार बनवताना कॅरेक्टर सेट युटीएफ - ८ दिलेला नसेल. तो तसा नसेल तर युनिकोड स्वरूपातील लिखान त्या विदागारात साठवता येणार नाही.

अन्य काही अडचण नसावी असे वाटते.

नीलकांत

अडचण नाही

मग ड्रुपल मधे बराहा च्या मदतीने मराठीत लिहीताना काहिच अडचण नाही. तुम्ही म्हणता तसे मला ड्रुपलचा चेहरा (इन्टरफेस) मराठीत करायचा आहे. येथे जसे लिखाणाची भाषा निवडायची व्यवस्था आहे ते करायचे आहे.

ड्रुपलच्या मराठी संचिका

मी येथे ड्रुपल च्या मराठी संचिका चढवित आहे. तसेच ह्या घेऊन एक चाचणी संकेतस्थळ सुध्दा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. जेथे आपण वेगवेगळ्या चाचण्या घेऊ शकू.

ह्या संचिका वेगवेगळ्या आहेत. शंतनु अथवा अन्य कुणी जे लिनक्स चालवितात त्यांना विनंती आहे की ह्या एकत्रित करून त्याची एक संचिका बनवावी.
हे काम अर्धवट आहे. आवश्यक तेवढेच भाषांतर केलेले आहे. काम पुर्ण व्हायच्या आतच येथे प्रकाशित करण्याचा हेतू हा की येथे ज्यांना यात सहभाग द्यायचा आहे त्यांना कामाची कल्पना यावी आणि सहभागी होता यावं.

वर शंतनु यांनी दिलेला दुवा अतिशय योग्य आहे. त्याप्रमाणे ह्या संचिका चढवाव्या लागतील. मात्र प्रत्येक संचिकेला स्वतंत्र आयात करावे लागेल.

ह्या बघा, यावर चर्चा होऊ द्या, काही बदल , चुका आदी कळवा.

ह्या संचिका येथून उतरवा .

नीलकांत

नीलकांत आणि शंतनु

मी तुम्हा दोघांच्या संचिका वापरल्या. काही प्रमाणात मराठी करण झाले. आपण दोघांनी थोडी मदत केल्यास एक् गोंधळ कमी होऊ शकेल.

  1. आपल्या दोघांच्या .po या एकाच कारणासाठी आहेत का?
  2. नक्कि कोणत्या वापराव्या?

मी लोकलायझेशन करण्या करिता, शंतनुने त्याच्या अनुदिनीवर दिलेले मार्गदर्शन वापरले. त्यानंतर नीलकांत यांचा संच सुद्धा वापरायचा प्रयत्न केला. पण एक फाईल आयात करताना इशारा आला. बाकिच्या सगळ्याच आयात नाही केल्या. पण नक्कि काय होते आहे हे कळले नाही.

शक्य असेल तर समजवाल का?

आयातीकरण

नमस्कार,
शंतनु यांच्या दुव्यातील मराठीकरण हे ड्रुपल ४.७ साठी आहे. खरं तर त्या संचिका म्हणजे माझा पहिलाच प्रयोग होता. कदाचित त्यात काही उणीवाही असतील. असो.
शंतनु यांना विनंती आहे की त्यांनी ह्या नव्या संचिका त्यांच्या संकेतस्थळावर चढवाव्या आणि दुवा द्यावा.

आता कुठल्या संचिका वापराव्या चे उत्तर - तुमचे ड्रुपल ४.७ असेल तर शंतनु यांच्या संकेतस्थळावर आहेत त्या वापरा, खरं तर त्या ड्रुपलवर सुध्दा आहेत.मला त्या योग्य जागेवर चढवता आल्या नाहीत म्हणून तेथे शोधाव्या लागतात. मात्र सापडतात.

ह्या नव्या संचिका ड्रुपल ५.१ साठी आहेत. त्यामुळे दोन्ही संचिका एकत्र वापरण्याचा प्रश्नच येत नाही.

कुणाला काही सुचल्यास, काही बदल अथवा अडचणी आल्यास आवर्जून कळवा.

नीलकांत

नव्या संचिका

नव्या संचिका संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
ड्रुपल ४.७ साठी

ड्रुपल ५.१ साठी

दोन्ही संचिका नीलकांत यांनी बनवलेल्या आहेत.
आधी स्पष्ट न केल्याने कोणाचा गोंधळ झाला असल्यास माफी मागतो.

अरे हे काय?

आपण काही चुक नाही करत आहोत. माफी नका मागु. थोडे शब्द कमी पडले असे समजू. एकत्र काम करू. मी आता ४.७ वापरतो आहे. धन्यवाद.

हे खरं आहे.

माफी मागण्याचा काहीच प्रकार झालेला नाही. त्यामुळे फार औपचारिक वातावरण निर्मीती न करता सगळे मिळून काम करूया ना ! तुमचं मत काय?

खरं तर मराठीसाठी खुप कमी काम होते आहे. आपली भर त्यात अतिशय अल्प मग यात सुध्दा काम सोडून इतर काही करायला वाव नको. चला सोबत काम करू काही तरी केल्याचा आनंद मिळवू.

हे मराठीकरण झाल्यावर ड्रुपल कसे वापरावे या बद्दल मार्गदर्शक लेख लिहायचा आहे. सगळे मिळून लिहूया का?

नीलकांत

सहमत

एकदम बरोबर. आपल्याला करण्यासारखे खुप् काही आहे...

चर्चा

मित्र हो,
आपण नवीन चर्चा विषयक करूया का? "ड्रुपल मराठी प्रयोग आणि निकाल." उद्देश हा आहे की, हा सध्याचा विषय योग्य कारणासाठी वापरला जाईल आणि "ड्रुपल मराठी प्रयोग आणि निकाल." हा विषय फक्त आपल्या प्रयोगांसाठी वापरता येइल... आपले विचार लिहा...

नवे बदल?

या उपक्रमामध्ये काही नवे बदल झाले आहेत का?


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

बदल

गमभन टंकलेखन सुविधेत कोणतेही नवे बदल झाले असल्यास ते बदल इथेही लागू होतात. वर पुस्तिकांचा दुवा दिलेलाच आहे. तेथून नवे बदल उतरवता येतील.

आपल्या स्वाक्षरीत एक बदल सुचवू इच्छितो -

गमभन शुद्धलेखन चिकित्सा हे गमभन शुद्धलेखन चिकित्सेकरता आहे.

गमभन टंकलेखन सुविधा हे गमभन टंकलेखन सुविधेकरता आहे.

ह्म्म्म्

बदलतो आजच संध्याकाळी...


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

सुधारणा

सुधारणा योग्य आहे का आता?


- आर्य चाणक्य. मराठीत लिहा. वापरा.

ड्रूपल् मराठी लेखन् मोड्यूल्

प्रसाद शिरगावकरांच्या यूनिसरस्वती लेखन संचाचा उपयोग करून मी एक ड्रूपल मोड्यूल तयार केले आहे. त्याचा दुवा इथे देतो आहे. http://drupal.org/project/unisaraswati

प्रसाद ने एक लेख लिहिला आहे याबाबत त्याचा दुवा हा http://drupal.org/node/148403

वा

धन्यवाद तुषार.
कोणाकडे ड्रुपलच्या सर्व मराठीसाठीच्या .पो मिळतील का?


मराठीत लिहा. वापरा.

ड्रुपलच्या मराठीसाठीच्या .पो फाइल्स

नीलकांत यांनी सुरू केलेल्या भाषांतरात तुषार जोशी यांनी भर टाकून केलेल्या ह्या "पो" फाइल्स आपण पाहिल्या आहेत का?

९०% गूण

मी या फाइल्स वापरून मराठी संकेतस्थळ उभारण्याची चाचणी माझ्या घरच्या संगणकावर घेतली. त्यात या प्रकल्पाला ९०% गूण मिळाल्याचे मी जाहीर करतो. (हलकेच घ्या!)
भाषांतरासाठी खाली दिलेले सोपे प्रश्न या हुशार विद्यार्थ्यांनी असेच सोडून दिलेले पाहिले आणि या भाषेचे काय होणार याची मला चिंता वाटू लागली आहे.

Submitted by $suername on
Login or registr to post comments
Add new comment

विश्वास बसत नसेल तर या चित्रातील इंग्रजी शब्द पाहा.

व्यासपीठ - एक चाचणी

ड्रुपल आणि वर दिलेली मोड्यूल्स एकत्र करून एक चाचणी घेत आहे. आपल्यापैकी कोणाला शक्य असेल तर सभासद होऊन प्रतिसाद द्या.
http://saraswaticlasses.net/drupal/

व्यासपीठ चाचणीमध्ये अडचण

warning: mail(): Bad parameters to mail() function, mail not sent. in /home/content/s/h/a/shaileshr21/html/drupal/includes/common.inc on line 1970.

अशी एरर येत आहे.

रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन रोमन



येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.
 
^ वर