अडचणी आणि त्यांचे निराकरण

या संकेतस्थळावर वावरताना बऱ्याच गोष्टी आपल्या ध्यानात येत असतात. कधी काही अडचणी येतात, कधी टंकलेखनाच्या चुका दिसतात, कधी अजूनही इंग्रजीत असणारी वाक्ये दिसतात, कधी अडचणींवर उपाय सापडतो. या व अश्या इतर गोष्टींची नोंद करण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

टंकलेखन् करताना

मला आढळलेली पहिली चूक् म्हणजे हे व् -> पाय मोडके अकारान्त् अक्षर्. मला वाटते कोणत्याही अकारान्त् शब्दानंतर् स्पेसबार् दाबल्यावर् पाय् मोडके अक्षर् अकारान्त् (पूर्ण्) व्हावे तसे न् झाल्याने टंकलेखकाला एक् अतिरिक्त "अ" दाबावा लागतो.

कृपया माझ्या व्याकरणातील संद्न्या (हे कसे लिहायचे?) लक्षात् घेऊ नये. मला काय् म्हणायचे आहे ते स्पष्ट् झाले आहे अशी आशा करते.

निरीक्षण/ज्ञ

तुमचे निरीक्षण बरोबर आहे. बराहा आणि इतर टंकलेखन सुविधांमध्ये अकारान्त शब्दाच्या शेवटच्या अक्षरात 'अ' निराळा मिसळावा लागत नाही. इथे 'अ'कारान्त शब्दांच्या शेवटच्या अक्षरात 'अ' मिसळावा लागतो.

बराहा किंवा इतर टंकलेखन सुविधांमध्ये, अकारान्त नसलेल्या शब्दांच्या शेवटच्या अक्षरात मात्र आवश्यक त्या स्वराची कळ दाबावी लागतेच. (शब्दांच्या अखेरीस नसलेल्या अक्षरांसाठीही स्वराची कळ दाबावी लागते.) तरीही बराहामध्ये असलेली ही सोय निश्चितच उपयोगी आहे. तांत्रिकदृष्ट्या हा बदल करता येईल का याचा शोध घेत आहोत.

"ज्ञ" लिहिण्यासाठी jYa असे लिहावे. (ज्ञ = ज् + ञ् + अ)

टंकलेखनाविषयी अधिक माहिती टंकलेखन साहाय्यात आहे.

मोडका पाय आवडला

उपक्रम,
नव्या संकेतस्थळाबद्दल अभिनंदन. मोडका पाय आवडला. त्यामुळे शब्दात दोन अक्षरांमध्ये स्वर राहिला आहे हे लक्षात येते. पण प्रियालीची शेवटच्या अक्षराबद्दलची सूचनाही चांगली आहे. दोन्ही (म्हणजे मोडका पाय आणि space दिल्यावर तो पूर्ण करणे ) ठेवता येईल का ते बघा. देवनागरी आणि रोमन लिपीसाठी keyboard shortcut देता आला तर अतिउत्तम.

- ओंकार

बदल

मिलिंदराव,
आपला जागेचा मुद्दा पटला. आजच याबाबतीत कामा आटपले आहे. नव्या पुस्तिका येत्या २ दिवसांत जाळ्यावर चढवेन.
केवळ जागा वाचवण्याच्या उद्देशाने काही ठरावीक बदल करून सद्ध्या पुस्तिकांचे आकार अनुक्रमे ३१ कि आणि २६कि केले आहेत.
पहिल्या पुस्तिकेत मोझिलासाठी काही बदल अंतर्भूत केले असल्याने आणि त्यातील नव्या ओळी आणि रिकाम्या जागा अजून काढल्या नसल्याने आकार थोडा वाढला आहे. लवकरच मुक्त स्रोताचे वारे वाहू लागले ( तर/की) अधिकाधिक श्रेणीकरण करणे सहज शक्य होईल.

GfKeyboardListener ह्या फंक्शनमध्ये कंट्रोल कळ दाबलेली नसेल तरच कळा हाताळल्या आहेत त्यामुळे कंट्रोल कळीने करायचे बदल गमभनच्या गाभ्यात करणे योग्य वाटत नाही. ड्रुपल वर असे बदल करता येणे सहज शक्य आहे. त्याबाबत थोड्या चाचण्या कराव्या लागतील. हा बदल जोडणी स्वरुपात करणे योग्य ठरेल.

प्रतिसादांची उघडझाप

१. प्रतिसादांची उघडझाप करणे मला वाचक म्हणून नेहमीच सोयीचे वाटते. नवा प्रतिसाद शोधणे आणि त्यापर्यंत पोहोचणे त्यामुळे सोपे पडते. यामुळे सर्वरवर अतिरिक्त भार मात्र पडत असावा परंतु वाचक म्हणून पान खाली सरकवत जाणे त्रासदायक वाटते.

२. प्रतिसादाला संपादनाची कळ आवडली. ती उपप्रतिसाद आल्यावर निघून जाते का? (मला स्वतःलाच उपप्रतिसाद देऊन पाहावे लागेल.)

३. या खिडकीत एचटीएमएल कोड कसा लिहायचा?

प्रतिसाद आणि एचटीएमएल

१. उघडझाप शक्य असलेले आणि आपोआप उघडलेले प्रतिसाद या दोन्हींचे काही फायदे आणि तोटे आहेत. दोन्हीपैकी हवे ते निवडण्याचा पर्याय देता आला तर उत्तमच पण याविषयी काय करता येऊ शकेल याचा शोध घेत आहोत.
२. प्रतिसादाला प्रति-प्रतिसाद येईपर्यंत लेखकाला तो संपादित करता येतो.
३. संपादन सुविधा वापरून सुशोभिकरण (फॉरमॅटिंग) कसे करायचे याची माहिती इथे आहे. त्याशिवायही काही एचटीएममएल कोड लिहायचा असेल तर तो थेट याच खिडकीत लिहिता येईल.

अपुर्ण लेखन

जे लेखन अजून पुर्ण झाले नाही असे लेखन साठवून ठेवण्याची सोय असावी जेणेकरुन त्यामध्ये वेळ मिळेल तशी भर घालून आणि सुधारणा करुन मगच सुपुर्त करता येइल.

नोंद घेतली आहे

लेखन हवे तसे होईपर्यंत अप्रकाशित स्वरूपात साठवण्याची सोय असावी यासाठी प्रयत्न करत आहोत.

कृपया..

लेखन हवे तसे होईपर्यंत अप्रकाशित स्वरूपात साठवण्याची सोय असावी यासाठी प्रयत्न करत आहोत.

आपण प्रयत्नात आहात हे चांगलेच आहे, पण या बाबतीत शक्य तितक्या लवकर काही उपाय सापडला तर बरेच होईल.

आजच मी "अहमदसेलर चाळीतील खाद्यस्पर्धा.." या शीर्षकाचा, माझ्या स्वानुभवावर आधारीत एक नवा लेख लिहायला घेतला. तो थोडा लिहून झाल्यावर त्याचे प्रकाशनपूर्व जतन करण्याचा विचार केला पण वरूणकाकांप्रमाणेच ती सोय/कळ मलाही कुठे दिसली नाही. शेवट अर्धवट लिहिलेले ते लिखाण मी स्वतःलाच माझ्या जीमेलच्या खात्यावर पाठवून दिले!

असो..

आपला,
(अपूर्ण लेखन प्रकाशित होईस्तोवर जतन करून ठेवण्याची सोय लवकरात लवकर व्हावी असे कळकळीने वाटणारा!) तात्या.

काही निरिक्षणे

१. संकेतस्थळावरील दिनांक आणि वेळ् इंग्रजीत दिसतात.

२. प्रतिसादांची आणि वाचनांची मुख्यपृष्ठावर जी संख्या दिसते ती काही ठिकाणी मराठीत तर काही ठिकाणी इंग्रजी दिसते.

३. लेखनाचे विभाग पाडलेले नसल्याने येथे काही विशिष्ट प्रकारचेच लेखन अपेक्षित आहे काय? की कालांतराने विभाग करण्यात येतील?

उत्तरे

१. हो. अंकांचे मराठीकरण कसे करायचे हे अजून समजले नाही. प्रयत्न सुरू आहेत.

२. प्रतिसादांची आणि वाचनांची संख्या १ असेल तर मराठीत दिसते पण एकापेक्षा जास्त असेल तर इंग्रजीत दिसते. ही गोष्ट पहिल्या मुद्द्याशी निगडीत आहे.

३. लेखनाचे 'लेख' आणि 'चर्चा' असे दोन प्रकार आहेत. लेखांचे विषयानुसार (भाषा, विज्ञान, इतिहास इ.) आणि प्रकारानुसार (माहिती, अनुवाद, व्यक्तिचित्र इ.) वर्गीकरण करता येते. चर्चेचेही विषयानुसार वर्गीकरण करता येते.

लेख आणि चर्चा समुदायानुसारही विभागता येतील. उदा. समजा तुम्ही "गणित" किंवा "मराठी साहित्य" या समुदायाचे सदस्य असाल तर नवा लेख किंवा चर्चाप्रस्ताव लिहिताना तो कोणत्या समुदायात समाविष्ट करायचा हे निवडण्याचा पर्याय दिसेल. किंवा त्या समुदायाच्या पानावर जाऊन तिथे "चर्चा प्रस्ताव लिहा" किंवा "लेख लिहा"हे दुवे वापरून त्या त्या समुदायासाठी लेख/चर्चाप्रस्ताव लिहिता येतील.

"नवे लेखन" या वरील-उजव्या कोपऱ्यातील दुव्यावर टिचकी मारली की स्वतःचे नवे लेखन, सगळे नवे लेखन, नवे लेख, नवे चर्चाप्रस्ताव, नवे प्रतिसाद पाहण्याची सोय आहे. "समुदाय" या दुव्यावर जाऊन सगळ्या समुदायांची यादी पाहता येईल. नवे ग्रुप समासातही दिसतील.

याशिवाय इतर माहिती साहाय्यात मिळेल.

धन्यवाद

संकेतस्थळाचे intial स्वरुपच (नव्या सोयी, तांत्रिक सुविधा आणि उत्तम भाषा) सुंदर असल्याने आपण या लहानसहान सुधारणा नक्कीच घडवून आणाल असा विश्वास वाटतो. आतापर्यंत प्रश्न थोडीशी खातरजमा करण्यासाठी विचारले होते. येथे लेख चढवायला आवडेल असे वाटते.

धन्यवाद!

संकेतस्थळाचे intial स्वरुपच (नव्या सोयी, तांत्रिक सुविधा आणि उत्तम भाषा) सुंदर असल्याने आपण या लहानसहान सुधारणा नक्कीच घडवून आणाल असा विश्वास वाटतो. आतापर्यंत प्रश्न थोडीशी खातरजमा करण्यासाठी विचारले होते. येथे लेख चढवायला आवडेल असे वाटते.

धन्यवाद! प्रश्न विचारले ते चांगलेच केले. शक्य होईल तसे अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न राहील.

एक गोंधळ

मी नुकताच एक नवा लेख चढवला. लेखाखाली मला समुदायांची यादी दिसली. चटकन माझ्या लक्षात न आल्याने मी त्यांची निवड केली. आता माझा लेख या समुदायात दिसत आहे आणि तो त्या समुदायांशी फारसा संबंधित नाही. ज्याप्रमाणे प्रतिसादाला प्रतिप्रतिसाद येण्यापूर्वी त्याचे पुनःसंपादन करता येते त्याप्रमाणे लेखाचेही करता येते काय? मला तशी कळ दिसली नाही. तशी कळ नसल्यास व्यवस्थापनाला हा बदल करून देता येईल काय?

बदल

व्यवस्थापनाला हा बदल करून देता येईल काय?

बदल केला आहे.

लिहिण्याची पध्दत

या संकेतस्थळावर मायक्रोसॉफ्टचा मराठी टंकलेखन साहाय्यक वापरुन मराठीत लिहीण्यासाठी 'लिहीण्याची पध्दत' इंग्रजी असणे आवश्यक आहे. लिहीण्याची पध्दत इंग्रजी निवडण्यासाठी shortcut key ची सुविधा उपलब्ध होऊ शकेल का?

चित्रांसाठी शीर्षकाची नवी सोय

आपल्या लेखात अधिक माहितीसाठी आकृत्या/चित्रे चिकटवताना त्यांना नाव देता येण्याची सोय केली आहे. मजकुरात जिथे चित्र चिकटवायचे असेल तिथे कर्सर ठेऊन या बटनावर टिचकी मारा. त्यानंतर दिसणाऱ्या तक्त्यात चित्राचा दुवा (Image URL), चित्राचे शीर्षक (Caption), संलग्नता (Alignment, 'right' किंवा 'left' यापैकी आवश्यकतेनुसार), आणि चित्र उपलब्ध झाले नाही तर दाखवायचा पर्यायी मजकूर (Alternate text) या गोष्टी भरा आणि 'Submit' या बटनावर टिचकी मारा.

या बटनावर टिचकी मारल्यावर काही प्रमादसंदेश (एरर मेसेज) दिसत असेल तर एकदा पान ताजेतवाने करावे.

नवा समुदाय (अडचण)

मी नुकताच एक नवा समुदाय सुरू केला, तो येथेदिसतो परंतु मुखपृष्ठ् किंवा इतर याद्यांत दिसत नाही. ही अडचण का आली ते कळले नाही. तसेच ती सुधारता येईल काय?

पडताळणी

नवे समुदाय प्रस्ताव आधी व्यवस्थापनाच्या पडताळणीसाठी पाठवले जातात. व्यवस्थापनाकडून संमत झाल्यानंतरच समुदाय अस्तित्वात येतात. त्यामुळे सुपूर्त केल्यानंतर लगेचच आपला समुदाय यादीत दिसणार नाहीत. ही माहिती समुदाय बनवण्याच्या पानावर दिली आहे.

प्रतिसाद

नमस्कार,

आपला उपक्रम छानच आहे. आत्ताच सभासद झालो. फक्त मला कुणाच्याच मूळ लेखाला प्रतिसाद देता येत नाही आहे. त्यांना आलेल्या प्रतिसादाला प्रतिसाद देता येत आहे. काही कपना किथे माझी काही तरी चूक होतेय?

धन्यवाद
विकास

प्रतिसाद

येण्याची नोंद केल्यानंतर कोणत्याही लेखाच्या किंवा चर्चेच्या पानावर गेल्यावर प्रतिसाद देण्याची खिडकी दिसते. फक्त समुदायाच्या स्वागताचा मजकूर असलेल्या पानावर प्रतिसाद देता येत नाही. तुम्ही "आमचा त्यांचा इतिहास" समुदायाचे सदस्य आहात, त्या समुदायाच्या स्वागताचा मजकूर असलेल्या पानावर प्रतिसादाची खिडकी दिसत नाही. पण तुम्ही जर कुठल्याही लेखाच्या किंवा चर्चेच्या पानावर गेलात उदा. "गणिती संज्ञांसाठी प्रतिशब्द"तर प्रतिसाद देण्याची खिडकी दिसायला हवी.

आर. आर. एस. फीड

सध्या आर्. एस्. एस्. फीड मध्ये लेखाचा सारांश मात्र दिसतो.
१. लेख कुठवर दिसावा हे कसे ठरते/निर्धारित/नियंत्रित केले जाते?
२. अनुदिन्यांप्रमाणे पूर्ण लेख फीड मधून पाठवता नाही का येणार?

~ तो ~

फीड्स विषयी

संपूर्ण लेख फीड्सच्या मार्फत पाठवणे तंत्रिकदृष्ट्या शक्य आहे. सध्या सारांश आणि लेखाचा दुवा (लेख एखाद्या समुदायाचा भाग असल्यास त्या समुदायाचा दुवा) ही माहिती पाठवली जाते. आपल्या समुदायामध्ये किंवा आपल्या आवडीच्या विषयावर कोणता नवा लेख आला आहे याची माहिती आपोआप मिळणे हे हेतू याने साध्य होतात. सारांशाच्या ऐवजी पूर्ण लेख पाठवल्याने सेवकावर अतिरिक्त ताण पडेल का आणि पडत असल्यास कितपत पडेल याचा अभ्यास करून याबाबतीत निर्णय घ्यावा लागेल.

कविता/विडंबन विभाग नाही!

एक उत्तम कवी तसेच विडंबनकार, तसेच आमचे परमस्नेही श्री केशवसुमार हे नुकतेच उपक्रमचे सदस्य झाले आहेत. त्यांचा मला माझ्या खरडवहीत खालील निरोप आला आहे. हा निरोप पुरेसा बोलका आहे. उपक्रमाने त्याची योग्य ती दखल घेऊन येथे 'कविता/विडंबन' प्रकार सुरू करावा, ही नम्र विनंती!

तात्या.. अलो रे इथे.. पण साला इथे कविता / विडंबन हा विभाग नाही त्यामुळे मजा नाही..

कवितांविषयी

स्वरचित कवितांचा वेगळा विभाग असावा का आणि असल्यास त्याचे स्वरूप कसे असावे यावर विचार करत आहोत. सध्या तरी समुदाय, लेख आणि चर्चा इतकेच स्वरूप राहील.

संपादन

एकदा प्रकाशीत केलेला लेख परत संपादीत करता येत नाही काय??

संपादन

लेख आणि चर्चाप्रस्ताव सुपूर्त केल्यानंतर सदस्यांना त्यात बदल करता येत नाही. त्यासाठी लेख किंवा चर्चाप्रस्ताव आपल्याला हवा तसा झाल्यानंतरच सुपूर्त करावा.

घोषवाक्य

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

याचा अर्थ कृपया संदर्भासहीत स्पष्ट करावा..

आपला
अडाणी आभ्या (तात्या तुमची ष्टाईल उचलली..)

माझा प्रयत्न..

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!
याचा अर्थ कृपया संदर्भासहीत स्पष्ट करावा..

वरील ओळी स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकरांच्या 'ने मजसी ने...' या कवितेतल्या आहेत. १९०९ साली ब्रायटनच्या समुद्रकिनार्‍यावर उभे असताना तात्यारावांना ह्या ओळी सुचल्या. 'हे सागरा, मला माझ्या मायभूमीवर परत घेऊन चल' असा संवाद तात्याराव ह्या कवितेतून सागराशी साधत आहेत.

'जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा!'

तात्यारावांनी बॅरिस्टर ह्या पदवीपर्यंतची उच्च विद्या संपादन केलेली असते. ते सागराला म्हणत आहेत की, 'ही जी मी उच्च विद्या संपादन केलेली आहे, तिचा उपयोग (व्यय) जर माझ्या मातृभूमीच्या उत्कर्षाकरता (उद्धरणी) होणार नसेल तर ह्या उच्चशिक्षणाचा काहीही फायदा नसून हे माझे शिक्षण व्यर्थ आहे!. (हा व्यर्थ भार विद्येचा!)'

असो! तात्याराव सावरकर हे खूप मोठे कवीही होते. माझी 'कविता' ह्या साहित्यप्रकाराची समज तशी नगण्यच आहे. तरीही मी वरील अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या क्षेत्रातली तद्न्य मंडळी वरील ओळींचा अधिक चांगल्या प्रकारे अर्थ स्पष्ट करू शकतील असा माझा विश्वास आहे!

आपला,
(सावरकरभक्त!) तात्या अभ्यंकर.

आपला
अडाणी आभ्या (तात्या तुमची ष्टाईल उचलली..)

अभिजितराव, ही मूळ ष्टाईल आमची नव्हे बरं का! 'मनोगत' ह्या संकेतस्थळावर 'प्रवासी' ह्या नांवाने वावरणारे एक सद्गृहस्थ होते, त्यांची ही ष्टाईल आहे. आम्ही ही ष्टाईल त्यांच्याकडूनच उचलली. त्यांचं माहीत नाही, पण आम्ही मात्र त्यांना आमचे मित्र मानायचो, त्यांच्याशी भांडायचो, परंतु त्यांचा आदरही करायचो!

गेल्या अनेक दिवसात त्यांच्याशी काही गाठभेट नाही, की त्यांची काही खबरही नाही. पुन्हा कधी भेटतील, न भेटतील हे सांगता येत नाही!

असो..!

'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ,
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा,
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!

आपला,
(प्रवासीप्रेमी!) तात्या.

सुंदर

तात्या धन्यवाद...उपक्रमरावांना काही अधिक सांगायचे आहे काय या विषयावर?

आपला..
(आभारी) आभ्या

यशस्वी/यशस्वि

चर्चा प्रस्ताव निर्मित केल्यानंतर येणर्‍या संदेशात

चर्चेचा प्रस्ताव यशस्विरीत्या निर्मित

यशस्विरीत्या हा शब्द चुकीचा आहे. यशस्वीरीत्या असे हवे.

धन्यवाद

धन्यवाद

धन्यवाद! आपले म्हणणे बरोबर आहे. एके ठिकाणी ही चूक राहून गेली होती. आता दुरुस्त केली आहे.

मात्र 'यशस्वीरित्या' आणि 'यशस्वीरीत्या' यातील अधिक योग्य शब्द कोणता? शोध घेतला असता दोन्ही शब्द वापरले जातात आणि 'यशस्वीरित्या' अधिक वापरला जात असावा असे आढळून आले. याबाबत खात्रीशीर माहिती असल्यास कळवावी.

क्रमवारी

नव्या लेखनातील 'लेख' आणि 'चर्चा' या विभागातील क्रम 'शेवटच्या लेखना'नुसार आहे. त्यामुळे 'सगळे नवे लेखन' या विभागातील क्रम 'प्रकाशना'च्या वेळेनुसार ठेवला आहे. हे वेगवेगळे पर्याय आयतेच उपलब्ध असल्याने सदस्यांना क्रमवारी बदलण्याची गरज पडणार नाही या उद्देशाने अशी मांडणी केली आहे.

संदेश

संकेतस्थळाचे सदस्य होण्याबद्दल मित्रांना निमंत्रण पाठवले असता... 8 invitations sent. असा इंग्रजी संदेश येतो. तो मराठीत करता येणे शक्य आहे का?

संदेशाचे मराठीकरण

त्या संदेशाचे मराठीकरण केले आहे. ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

सुशोभीकरणाचे पर्याय/ सदस्याचे नाव एकाहून जास्तवेळा दिसणे.

बरेचदा प्रतिसाद देताना किंवा पुनःसंपादीत करताना सुशोभीकरणाचे पर्याय दिसेनासे होतात. पूर्वपरीक्षणावर टिचकी मारल्यावर ते कधीतरी दिसू लागतात तर कधी दिसत नाहीत. याबाबत काही करणे शक्य आहे काय?

तसेच डावीकडील सदस्य यादीत मला बरेचदा एकाच सदस्याचे नाव दोनदा दिसते. जसे,

upkram

या यादीत योगेश (सदस्य क्र.३२) याचे नाव दोनदा दिसत आहे. याबाबत काही करणे शक्य आहे काय?

सुशोभीकरण आणि द्विरुक्ती

बरेचदा प्रतिसाद देताना किंवा पुनःसंपादीत करताना सुशोभीकरणाचे पर्याय दिसेनासे होतात.

म्हणजे 'ठळक अक्षरे' 'तिरकी अक्षरे' वगैरे बटने दिसेनाशी होतात का? असे होण्याचे काही कारण दिसत नाही.

सदस्यांची नावे किंवा समासातील काही दुवे कधीकधी दोनदा दिसतात ही माहीत असलेली त्रुटी (known bug) आहे. स्वभाषीकरणाची यंत्रणा (localization module) जोडल्यानंतर ही त्रुटी उत्पन्न होते असा कयास आहे.

हो असेच होत आहे!

म्हणजे 'ठळक अक्षरे' 'तिरकी अक्षरे' वगैरे बटने दिसेनाशी होतात का? असे होण्याचे काही कारण दिसत नाही.

हो असेच होत आहे. प्रथम प्रतिसाद लिहिताना हे पर्याय मला दिसत होते. पुन्हा संपादीत करताना दिसले नाहीत.

upakram2

उपक्रमः भविष्यकालीन योजना या चर्चेस पहिला प्रतिसाद देताना असेच दिसत नव्हते. परंतु पुन्हा संपादीत करण्याचा प्रयत्न केल्यावर दिसू लागले. (म्हणजे वरील घटनेच्या विरुद्ध प्रकार)

माझ्याबाबतितही असेच होते.

माझ्याबाबतितही असेच होते.
प्रतिसाद संपादित करताना सुशोभिकरणाचे पर्याय जातात त्यामुळे रंग बदलणे वगैरे करता येत नाही.
(माझे फार्शी भाषेसंदर्भातील चेर्चेमधील काही प्रतिसाद लाल अक्षरांत आपोआप आले आहेत त्यांचा रंग बदलू पाहतो तर ती सोयच उपलब्ध नाही. असो.)

तसेच अक्षरे मोठी करण्याचा पर्याय देता आला तर बरे होईल.
आपला,
--लिखाळ.

समुदाय आणि त्यांचा उपयोग?

संकेतस्थळावरील समुदायाची कल्पना उत्तम आहे, परंतु त्याचा उपयोग मला फारसा समजलेला नाही कारण सध्यातरी समुदायाचे सदस्यत्व घेतले नाही तरी त्यातील सर्व लेख आपल्याला दिसतात, वाचता येतात आणि त्यावर प्रतिसाद देता येतात.

कृपया, येथे वापरली जाणारी समुदायाची कल्पना आपण विशद करून सांगाल काय?

समुदायांविषयी

कोणत्याही समुदायातील लेखन वाचणे आणि त्यावर प्रतिसाद देणे सर्वांना शक्य व्हावे अशीच समुदायांची रचना केलेली आहे. कोणत्याही समुदायासाठी लेख आणि चर्चाप्रस्ताव लिहिण्यासाठी मात्र त्या समुदायाचे सदस्य असणे आवश्यक आहे.

अडचणी

१. जर एखाद्या सदस्याचे लेखन उपलब्ध नसेल तर येणारा संदेश इंग्रजीत आहे. (No posts available.)
२. डाव्या बाजूला येणार्‍या पर्यायांमध्ये एका ठिकाणी पूर्णविराम आहे मात्र इतर ठिकाणी नाही असे का?
उदा:

चर्चेचा प्रस्ताव लिहा
लेख लिहा
मित्रांना निमंत्रण पाठवा.
20 सदस्य
समुदाय संयोजक: उपक्रम
समुदाय सदस्यत्व

३. सदस्यत्व संपादन मध्ये
विरोपाने सूचना:
विरोपाने प्रसूचना नकोत.
विरोपाने प्रसूचना पाठवा
सगळ्या प्रसूचना न पाठवता प्रत्येक समुदायाच्या "समुदाय सदस्यत्व" पानावरील निवडीप्रमाणे विरोप पाठवा.
४. When posts are submitted into your subscribed groups, you may be notified via email. हा इंग्रजी संदेश अनावश्यक आहे असे वाटते.
५. खरडवहीतील नोंदी काढून टाकताना Are you sure you want to delete this guestbook entry?\n हा इंग्रजी संदेश येतो. सोबत येणारे बटनही इंग्रजीत आहे.

नमस्कार

मला काही अडचणी आहेत. कृपया साहाय करावे ही विनंती.
१) सर्व सदस्यांच्या नावाची सुची कुठे आहे का?
तसे असल्यास एखाद्या सदस्याला निरोप पाठवणे अथवा खरडणे सोपे जाईल. नाहितर त्या सदस्याचे नाव प्रतिसादांत वगैरे शोधत बसावे लागते.

२) मराठी ते इंग्रजी असा लिपीतील बदल करता येण्यासाठी लिहिण्याची पद्धत येथे जावून बदल करावा लागतो. यासाठी एखादी कळ आहे का?

३) ज्ञ चे टंकलेखन dny अशा कळक्रमाने व्हावे असे वाटते.

आपला,
--लिखाळ.

मुख्यपृष्ठ

हा जोडशब्द योग्य आहे काय? की मुखपृष्ठ हवा होता?

उपक्रम रावांना विनंती

मला वाटतं उपक्रमच्या टंकलेखन प्रणाली मध्ये काही सुधारणा केलीत तर फार बरं होइल.
इथं एखादा शब्द लिहिण्यासाठी तुलनेने बरेच कष्ट घ्यावे लागतात.
कोणतीही कळ दाबल्यावर येणारे पाय मोडकी अक्षरे तर फारच तापदायक ठरतायत.
backspace कळ दाबल्यावर तर काय होईल हे सांगताच येत नाही.
'मनोगत' वर असलेली टंकलेखन पद्धत तुलनेने फार सोपी वाटली.
अशा काही सुधारणा केल्यात तर लिखाणाचा वेळ कमी होण्यास मदत होइल.

धन्यवाद
रम्या

गमभन

गमभनच्या नवीन आवृत्ती मध्ये या अडचणी येणार नाहीत.

ग म भ न

माझ्यामते उच्चारानुसारी देवनागरी लेखनासाठी ग म भ न ही आजची सर्वोत्कृष्ट प्रणाली आहे.(अर्थात सुधारणेसाठी नेहमीच वाव असतो हे खरे.) गमभन प्रणाली इतकी तर्कसंगत आहे की कळपट एकदा पाहिला की लक्षात रहातो . ङ् ञ् ज्ञ् इ.व्यंजनांचे तसेच ऋ.ॡ या स्वरांचे लेखन चुकूच शकत नाही. या सुविधेच्या निर्मिती साठी श्री.ॐकार यांना प्रणाम!द्विवार प्रणाम! त्रिवार प्रणाम ! शतवार प्रणाम!!
............
.............यनावाला

ग म भ न

माझ्यामते उच्चारानुसारी देवनागरी लेखनासाठी गमभन ही आजची सर्वोत्कृष्ट प्रणाली आहे.गमभन इतकी तर्कसंगत आहे की कळपट एकदा पाहिला की लक्षात राहतो.ऋ,ॠ.ॡ, हे स्वर;
ङ्,ञ्, ज्ञ् ही व्यंजने यांचे लेखन चुकूच शकत नाही.(अर्थात सुधारणेला नेहमीच वाव असतो हे खरेच).
या सुविधेचे निर्माते श्री.ॐकार यांस प्रणाम. द्विवार प्रणाम! त्रिवार प्रणम! शतवार प्रणाम!!!

........................यनावाला

शीर्षक?

उपक्रमाच्या मुखपृष्ठावर शीर्षक या शीर्षकाशेजारी sort icon असे दिसत आहे.





मराठी टंकलेखनासाठी वापरा.

चित्राऐवजी दाखवायचा मजकूर

शीर्षकाशेजारी त्रिकोणाचे चित्र आहे. चित्र काही कारणाने दाखवता आले नाही तर त्याच्या बदली दाखवायचा मजकूर ("alt") "sort icon" असा आहे. हे चित्र आकाराने बरेच लहान आहे, ते दिसण्यास काही अडचण यायला नको. कृपया एकदा पान ताजेतवाने करून पाहावे.

 
^ वर