उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
अडचणी आणि त्यांचे निराकरण
उपक्रम
March 16, 2007 - 8:07 am
या संकेतस्थळावर वावरताना बऱ्याच गोष्टी आपल्या ध्यानात येत असतात. कधी काही अडचणी येतात, कधी टंकलेखनाच्या चुका दिसतात, कधी अजूनही इंग्रजीत असणारी वाक्ये दिसतात, कधी अडचणींवर उपाय सापडतो. या व अश्या इतर गोष्टींची नोंद करण्यासाठी ही चर्चा सुरू केली आहे.
दुवे:
Comments
दुवा..
दुसर्या संकेतस्थळाचा दुवा इथे देतांना कसा देतात हे कुणी सांगेल का?
दुवे
उपक्रमराव,
सध्या दुवा देण्याची जी सोय आहे त्यावर टिचकी मारल्यावर दोन गोष्टी विचारल्या जातातः ज्याचा दुवा द्यायचा आहे तो पत्ता व टायटल टेक्स्ट. आता हे सर्व देऊन ओके वर टिचकी मारली असता दुव्याचा एचटीएमएल टॅग येतो व त्यात टायटल म्हणून आपण दिलेला मजकूर असतो. पण दुव्याचा दर्शनी मजकूर(म्हणजे जो इतरांना निळा दिसतो व त्यावर टिचकी मारली असता सदर दुवा उघडतो) मात्र कोरा असतो. असे दोनतीनदा झाल्यावर मठ्ठ डोक्यात प्रकाश पडला व <ए एच आर इ एफ="अमुक दुव्याचा पत्ता" टायटल="आम्ही आधी दिलेला मजकूर"> या दोन टॅगच्या मध्ये स्वतः मराठीत दर्शनी मजकूर लिहीला व दुवा उमटवला. आता ए टॅगची माहिती ज्या अतांत्रिक लोकांना नसेल ते दुवा देतात व दुवा का आला नाही याचे आश्चर्य करतात.दुवा तिथे हजर असतो, पण ज्याच्यावर टिचकी मारायची ते दर्शनी टेक्स्ट 'काही नाही'(नल) असल्याने टिचकी कुठेच मारता येत नाही आणि दुवा देण्याचे प्रयत्न असफल झाले असे वाटते.
यावर उपाय म्हणून जी गोष्ट दुवा बटनात 'टायटल टेक्स्ट' म्हणून विचारली जाते तीच <ए एच आर इ एफ="अमुक दुव्याचा पत्ता" टायटल="आम्ही आधी दिलेला मजकूर"> या दोन टॅगच्या मध्ये उमटवण्याची सोय केली असता सर्वांनाच सोपे होईल आणि दुवा त्या बटनाने देण्याऐवजी थेट तो पत्ता आंग्लभाषेत इथे चिकटवून टाकण्याची वेळ अतांत्रिक (आणि विसरभोळ्या तांत्रिक) लोकांवर येणार नाही(असे वाटते).
(कंटाळ्यामुळे स्क्रिनशॉट देत नाही. भा. पो. होण्यासाठी स्वतः दुवा द्या वर टिचकी मारुन प्रयोग करुन पहावे.)
स्वाक्षरी
एखाद्या संकेतस्थळाचा प्रचार/प्रसार करण्यासाठी मी अमुकमुक वापरतो/वापरते अशी स्वाक्षरी तयार करायची असल्यास हा तांत्रिक मजकूर स्वाक्षरीच्या तक्त्यात चिकटवा:
(त्रिकोणी कंस)table border bordercolor=blue cellpadding=3 width=30(त्रिकोणी कंस बंद)(त्रिकोणी कंस)tr(त्रिकोणी कंस बंद)(त्रिकोणी कंस)td(त्रिकोणी कंस बंद)मी (त्रिकोणी कंस)a href="तुम्हाला प्रचार करायचा असलेल्या संकेतस्थळाचा दुवा" target="_blank"(त्रिकोणी कंस बंद)(त्रिकोणी कंस)img src="तुम्हाला प्रचार करायचा असलेल्या संकेतस्थळाच्या लोगोच्या इमेजचा पत्ता"(त्रिकोणी कंस बंद)(त्रिकोणी कंस)/a(त्रिकोणी कंस बंद)वापरतो/वापरते.(त्रिकोणी कंस)/td(त्रिकोणी कंस बंद)(त्रिकोणी कंस)/tr(त्रिकोणी कंस बंद)(त्रिकोणी कंस)/table(त्रिकोणी कंस बंद)
(या सर्व त्रिकोणी कंस या शब्दांच्या च्या जागी < आणि त्रिकोणी कंस बंद या शब्दाच्या जागी > ही चिन्हे टाकावी. इथे एच टी एम एल टॅग म्हणून ते क्रिया करु नयेत म्हणून असे लिहीले आहे.)
स्वाक्षरी बनवून सेव्ह केल्यावर एकदा कशालातरी 'प्रतिसाद देण्यापूर्वी पाहून' स्वाक्षरी आपल्याला हवी तशी उमटते आहे का याची खात्री करुन घ्यावी. स्वाक्षरी खूप मोठी असल्यास शेवटची काही अक्षरे उपक्रम कमी करुन टाकतो म्हणून ही खबरदारी. स्वाक्षरी चाचणीत मनासारखी न उमटल्यास प्रतिसाद पाठवणे रद्द करुन ती मनासारखी करुन घ्यावी.
चित्र
सदस्य खात्याच्या संपादनामध्ये स्वाक्षरी अंतर्गत खालील कोड टाका
मराठी टंकलेखनासाठी
वापरा.
जमलं बर्र् का! ;)
जमलं बर्र् का! ;)
तुम्हाला आणि योगेशला धन्यवाद,
आपला,
(आनंदीत!) तात्या.
पण अजून एक प्रॉब्लेम!
अनुजी,
सही करणं आता आम्हाला येऊ लागलं आहे. पण अजून एक प्रॉब्लेम आहे. सहीभोवतीची जी निळ्या रंगाची कडा आहे ती जरा अंमळ जास्तच लांब (आडवी) वाटते. त्यामुळे प्रतिसादातील मजकूरही जास्त आडवा होऊन संगणकाच्या खाली असलेल्या पट्टीला हलवल्याशिवाय उजवीकडचा मजकूर दिसतच नाही. हे त्या जास्त लांब असलेल्या निळ्या कडेमुळे होतं की काय? तसं असेल तर ती निळी कडा लांबीने कमी करता येईल का?
बाकी ती निळी कडा दिसते मात्र छान हो! आम्ही गाण्यातली माणसं! त्या निळ्या कडेमध्ये आणि 'गमभन' अक्षरतील वळणदार डिझाईनमध्ये आम्हाला गाणं दिसलं! ;)
असो,
तात्या.
'तो' चे उदाहरण!
उदाहरणादखल 'तो' च्या सहीभोवतीची निळी कडा पाहता येईल. ती अगदी अंगासरशी वाटते! आमच्या सहीभोवतीची निळी कडा आमच्यासारखीच अंमळ जरा जास्त आडवी झाली आहे! ;)
ह्या लेकाच्या 'तो' ने ती निळी कडा कुठल्या शिंप्याकडून अल्टर करून घेतलीन कुणास ठाऊक! ;)
आपला,
(ढगळ!) तात्या.
हे करुन पहा
(div style="border: 2px solid; width: 270px;")(table)(tr)(td)मी (a href="http://saraswaticlasses.net/shabdasampada/" target="_blank")(img src="http://saraswaticlasses.net/shabdasampada/shasa_logo.jpg")(/a) शुद्धीचिकित्सा वापरते.(/td)(/tr)(/table)
(यातल्या प्रत्येक गोल कंसाच्या जागी योग्य तो ओपनिंग/क्लोजिंग त्रिकोण कंस टाकून चिकटवा व योग्य ते बदल करा.विड्थ २७० आहे ती कदाचित वाढवावी लागेल. खरं म्हणजे स्क्रिनशॉट देऊन हे समजावण्याचे काम पटकन झाले असते, पण आम्ही नेटावरील जागा वाचवू इच्च्छितो.तसेच्, हा प्रतिसाद घाईत लिहील्याने शु चि वापरलेला नाही.हे सर्व खरडण्याचे कारण म्हणजे रोमन मर्यादा कमी करणे. बघू थोडे लिहून बघते. आता १०% च्या कमी झाली असेल. असेल ना पण?ब्ला ब्ला ब्ला ब्ला....)
हे बघा!
हे बघा काय झालं! ;)))))))
आता तुम्हीच वाचवा मला याच्यातनं! सहीत अडकू नये म्हणतात ते खरंच म्हणायच! ;)
जमलं बरं का! ;)
पुन्यांदा जमलं बरं का! "गमभन" चा अंमळ ढगळ असलेला अंगरखा शिंप्याकडे जाऊन अंगासरशी करून घेतला! अहो पण हे करतांना निळी किनार कुठे गेली??
आता शेवटचंच एक काम! किनार तेवढी पुन्हा पूर्वीसारख्या छानश्या निळ्या रंगाची करून द्या! ;)
तात्या.
(आपली स्वाक्षरी अक्षरमर्यादे बाहेर आहे. कृपया आपली स्वाक्षरी अक्षरमर्यादेनुरूप बनवा - उपसंपादक)
निळी किनार
निळ्या किनारीसाठी डिव्ह स्टाइल च्या हटमल टॅगमध्ये विड्थ च्या नंतरच्या अर्धविमानंतर color: rgb(0, 43, 184); हे टाकायचे असते.(आर जी बी किंमती बदलल्या की रंगही बदलेल), पण आपला मजकूर मोठा झाल्यास शब्दमर्यादेमुळे कधीकधी शेवटचे टॅग (त्रिकोणी कंसातले) कापले जाऊन गणपतीचा मारुती होतो. आपला मराठी मजकूर कमी व विशेष जोडाक्षरे नसलेला छोटा असेल(जोडाक्षरवाली अक्षरे पडद्या आड भरपूर आस्की अक्षरे खातात.) तर हे आर जी बी टाकून चौकटीचा रंग बदलून पहा.(अधिक माहितीसाठी तो चा प्रतिसाद बघा.)
प्रयत्न सुरू आहेत,
प्रयत्न सुरू आहेत, पण अद्याप यश नाही! ;)
तात्या.
समजला नाही..
.(अधिक माहितीसाठी तो चा प्रतिसाद बघा.)
तो चा प्रतिसादही बघितला, पण तोही फारसा समजला नाही. आता पुन्हा एकदा सवकाशीने वाचीन.
(आणि अहो तसंही तो चं साधंसुधं लेखनदेखील आम्हाला जरा उशिरानेच कळतं, तर तांत्रिक काय कळणार? ;) आणि जिथ्थे तिथ्थे मेला त्याचं ते विकिपिडियाचं घोडं दामटवत असतो! ;))
असो!
तात्या.
एक नवीनच समस्या! ;)
निळ्या किनारीसाठी डिव्ह स्टाइल च्या हटमल टॅगमध्ये विड्थ च्या नंतरच्या अर्धविमानंतर color: rgb(0, 43, 184); हे टाकायचे असते.
आपण सांगितल्याप्रमाणे निळी किनार बसवायच्या आम्ही प्रयत्नात होतो त्या दरम्यान एक नवीनच समस्या उभी राहिली आहे. ती आपल्या कानावर घालावी म्हणून हा प्रतिसाद देत आहोत!
आम्ही निळी किनार बसवायचा एकिकडे प्रयत्न करत होतोच, पण काळ्या किनारीच्या सहीनिशीसुद्धा तसं आमचं बरं चाललं होतं. त्या दरम्यान अचानक आम्हाला उपसंपादकरावांचा (रजेवर गेले होते ते पुन्हा कामावर परत आलेले दिसतात! ;) खालील व्य नि आला. का माहीत नाही, परंतु उपसंपादकांच्या व्य नि ची आम्हाला आदरयुक्त भितीच वाटते!
उपसंपादकांचा व्य नि -
आपली स्वाक्षरी अक्षरमर्यादे बाहेर आहे. कृपया आपली स्वाक्षरी अक्षरमर्यादेनुरूप बनवा - उपसंपादक.
आम्ही ताबडतोब वेळ न दवडता त्यांना खालील उत्तर पाठवले -
म्हणजे काय करू तेवढं सांगा मालक! आम्हाला तांत्रिक गोष्टींची फारशी महिती नाही.
त्यावर उत्तरादाखल पुन्हा त्यांचा व्य नि आला -
नवी अक्षरमर्यादेत बसणारी, हवी तशी स्वाक्षरी मिळेपर्यंत या आधीची दुवा/चौकटी नसणारी स्वाक्षरी वापरा.
आता, 'नवी अक्षरमर्यादेत बसणारी, हवी तशी स्वाक्षरी मिळेपर्यंत' म्हणजे काय हे कळले नाही. आणि ते पुन्हा त्यांना विचारायची आमची हिंमत नाही. म्हणून आम्ही येथे धाव घेतली आहे! ;)
उपसंपादककाका म्हणतात,
या आधीची दुवा/चौकटी नसणारी स्वाक्षरी वापरा.
म्हणजे ते वळणदार आणि नक्षिदार गमभन आणि निळी चौकटही आता बोंबलली की काय?!
काय समजत नाय बुवा!
अरे का असा छळ मांडताय एका अतांत्रिक माणसाचा? ;)
अनुजी आपणच मला आता एकदाच या बाबतीतला फर्स्ट अँड फायनल सल्ला द्या आणि सुटका करा माझी याच्यातून. आणि हो, उपसंपादकरावांचा आदरयुक्त भितीचा व्य नि मला पुन्हा येणार नाही असा काहीसा सल्ला द्या.
आता आम्हीही मागे हटणार नाही. अंगासरशी बसणार्या निळ्या चौकटीची गमभन ची स्वाक्षरी हा आता आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही बजावणारच! ;)
अर्थात, 'उपसंपादकांचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा सवाल मात्र आम्ही करणार नाही! ;)
असो, जोक्स अपार्ट, पण प्लीज कुणीतरी योग्य तो सल्ला द्या!
आपला,
(अतांत्रिक मठ्ठ!) तात्या.
माहिती नाही
शब्दमर्यादेबद्दल सल्ला आम्ही आधी दिलाच होता. मराठी अक्षरे पडद्याआड बरीच जास्त अक्षरे खातात.स्वाक्षरी चा मजकूर लहान करुन प्रयत्न परुन पहा अन्यथा नवीन काही नियम असल्यास् आम्हालाही माहिती नाही.
धन्यवाद 'तो' राव!
धन्यवाद 'तो' राव!
जमलं बरं का! आपण आम्हाला व्य नि पाठवून मदत केलीत त्याबद्दल आभार..तूर्तास आम्ही गमभन च्या वळणदार डिझाईनची हौस बाजूला ठेवतो! ;) आणि फक्त निळ्या किनारीवरच समाधान मानतो!
अनुजींचेही अभार.
आता पुन्हा नव्याने आम्हाला उपसंपादकांचा व्य नि येणार नाही अशी आशा! ;)
तात्या.
त्याचं असं आहे..
(div style="border: 2px solid rgb(0, 43, 184); padding: 3px; color: rgb(0, 43, 184); width: 240px; text-align:center;")'तो '(a href="http://mr.wikipedia.org")मराठी विकिपीडिया(/a) चा सदस्य आहे.(/div)
शिंपी अर्थातच मराठी विकीपीडिया :)
१. '2'px मध्ये आकडा बदला चौकटीची जाडी बदलेल.
२. (०,४३,१८४) कंसातील आकडे बदलाल, तसे रंग बदलतील.
३. दुवा व् लिखाण आवश्यकते नुसार बदला.
४. गोल कंसा ऐवजी त्रिकोणी कंस वापरा.
३. '३'px हे अक्षरांचे कडेपासूनचे अंतर असावे.
हे तो इथे शिकला.
अलिकडील नव्हे अलीकडील
मुखपृष्ठावर येणारे 'अलिकडील' लेखन हे शीर्षक चुकीचे आहे. योग्य शब्द 'अलीकडील' असा आहे.
पानांचे दुवे
एखादी चर्चा किंवा लेखावरील प्रतिसाद एकापेक्षा अधिक पानांवर गेले तर पाने बदलण्याची सोय लेखाच्या सुरुवातीलाच टाकता येईल का? कारण पुढच्या पानावर जाण्यासाठी पूर्ण पान खाली सरकवावे लागते. (तसं मी CTRL-END वापरतेच तरीही..)
तसेच, जेव्हा अशा लेखांना एखादा नवा प्रतिसाद येतो तेव्हा जर तो दुसर्या/ तिसर्या पानावर असेल तर त्यावर टिचकी मारल्यावर लेखाचे पृष्ठ दिसते आणि नवा प्रतिसाद शोधण्यासाठी पाने धुंडाळावी लागतात.
यावर काही उपाय आहे का?