दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
१. धनत्रयोदशी
यालाच बोली भाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.
२. धन्वंतरि जयंती
धन्वंतरी देवताआयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरि जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
३. यमदीपदान
अ. प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. कालमृत्यु कोणालाच चुकला नाही व चुकविता येत नाही; पण अकाली मृत्यु कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यज: प्रीयतां मम ।।
अर्थ : हे तेरा दिवे मी सूर्यपुत्राला अर्पण करतो. त्याने मृत्यूच्या पाशातून माझी सुटका करावी व माझे कल्याण करावे.
धनत्रयोदशी
नरक चतुर्दशी
लक्ष्मी पूजन
अलक्ष्मी नि:सारण
भाऊबीज
देवी-देवतांचे चित्र असलेले फटाके वाजवू नये
साभार : http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwali/
Comments
धन्यवाद
वर दिलेल्या दुव्यावर जाऊन पाहिले. बरीच रोचक माहिती दिली आहे. आजचा दिवस कारणी लागला.
काही उदा.
"१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले."
"हल्ली शोधलेले विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्तातील सिद्धान्तांशी जुळतात !"
"असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !"
"नामाचे उटणे सर्वांगाला लावा. सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंगस्नान करा व त्यात आपले स्वभावदोष आणि अहं धुवून काढा. त्यागाने सर्व अंग कोरडे करा. आनंदाची नवीन वस्त्रे परिधान करा. प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ व सात्त्विक बनवा. अष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून प.पू. डॉक्टरांच्या चरणी रहा !'"
----
कोण?
"१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले."
ह्मम....
अष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून प.पू. डॉक्टरांच्या चरणी रहा !'"
हे डॉक्टर कोण?
-सौरभ.
कल्पना नाही
हे डॉक्टर कोण?
युअर गेस इज ऍज गुड ऍज माइन!!
----
डॉक्टर तुम्हीसुद्धा?
आवडला
यम दिपन ही माहिती नवी होती.
यमाची दिशा दक्षिण आहे/असते का?
कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे,
कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे हे मात्र कशावरून आपण म्हणत आहात ते कळले नाही. याची काही माहिती आहे का?
शिवाय धन्वंतरीची पुर्ण कथा काय आहे ते कुणी सांगेल का?
धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे हे चुकीचे आहे. तो अमृतत्व देणारा म्हणजे काय?
धन्वंतरी समुद्र मंथन झाले असता समुद्रातून अमृताचा कुंभ बाहेर घेवून आला. म्हणून तो अमृतत्व देत नाही.
तुम्हाला अमरत्व म्हणायचे आहे का?
तर ते ही ठीक नाही कारण अमरत्व ही तो देवू शकत नाही आणि देवही देवू शकत नाहीत. अमरत्व तर देवांनाही राक्षसांना फसवून मिळवावे लागले.
(म्हणजे तेंव्हा देवच फसवणूक करणारे चुकीचे वागले असे???)
आपला
गुंडोपंत
दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा
कल्याणाचा ध्यास दे
दिव्या दिव्या माझ्या घरी मन भर प्रकाश दे,
मुक्त मोकळा श्वास दे ,
आनंदाची रास दे,
स्वप्नासाटी माथ्यावरती
झळझळते आकाश दे..
दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.!!
दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा...
वा
वा!
अशी सगळ्यांनाच एकदम शुभेच्छा देण्याची आयडिया चांगली आहे.
माझ्या कडूनही उपक्रमपंतां सहीत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
आपला
गुंडोपंत
शुभेच्छा...
आमचे मित्र शशांक, तसेच उपक्रमच्या सर्व सभासदांना आमच्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...
-- तात्या अभ्यंकर.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
शुभ दीपावली
रामाच्या आगमनासाठी दिव्यांनी सजली अयोध्या
तुमच्या समृद्धी व सुखाचा असाच दीपोत्सव असुद्या!
अगाध ज्ञान
सनातनवाल्यांचे अगाध ज्ञान पहिल्या "धनत्रयोदशी" या पहिल्याच चित्रफीतीत समजले. त्यांच्या मते दिवाळीच्या तिथ्या अशा (०.४० ते १.०४ मि. कालावधीत)
कार्तिक वद्य त्रयोदशी = धनत्रयोदशी? (बरोबर उत्तर - अश्विन वद्य त्रयोदशी)
कार्तिक वद्य चतुर्दशी = नरक चतुर्दशी? ( बरोबर उत्तर - अश्विन वद्य चतुर्दशी)
कार्तिक अमावस्या = लक्ष्मीपूजन? (बरोबर उत्तर - अश्विन अमावस्या)
कार्तिक शुद्ध प्रतिपदा = बलिप्रतिपदा (हे एकमेव उत्तर बरोबर आहे)
अशाच प्रकारचा गोंधळ अमिताभच्या "कौन बनेगा करोडपती?" या कार्यक्रमातही झाल्याचे आठवते.
विनायक