'अंतर्नाद' -एप्रिल २००८

आवर्जून वाचावा असा अंक आहे. सहसा एखादा अंक अथपासून इतीपर्यंत आवडतो असे होत नाही. पण या अंकाच्या देखण्या मुखपृष्ठापासून त्यातील लेख, कवितांपर्यंत सगळे उत्कृष्ट आहे. वाचन या मावळत चाललेल्या विषयावरचा 'वाचनसंस्कृतीची समृद्धी' हा नीलीमा भावे यांचा लेख, डॉक्टरी पेशातल्या आपल्या अनुभवांवरचे उर्मिला चाकूरकर यांचे दोन छोटे लेख आणि 'आजची कविता' मधल्या वर्जेश सोलंकी यांच्या सुरेख कविता -त्यातील 'जाहिरातीच्या कविता' तर थेट अरुण कोलटकरांची आठवण करून देणाऱ्या. पण या अंकाचे बलस्थान आहे ते म्हणजे 'बावाजींच्या सुरस कथा' हा पारशी समाजावरचा किशोर आरस यांचा आणि आपल्याकडे आलेल्या वृद्ध रुग्णांबाबतचा माधवी मेहेंदळे यांचा 'अलविदा' हा लेख. पारशी समाजावरचा लेख तर डोळे उघडणाराच वाटला. (पारश्यांविषयी आपण आतापर्यंत ज्याला ज्ञान वगैरे समजत होतो ते बहुतेक गैरसमजच होते, याची जाणीव करून देणारा) आणि मेहेंदळेंचा लेख तर चक्क डोळ्यात पाणी आणणारा.
इतर अंक अद्यापि वाचलेला नाही.

Comments

अंतर्नाद

बदलता भारत लिहिणारे भानु काळे हे अंतर्नादचे शिल्पकार आहेत. अतिशय सकस लेखन त्यात असते. अंतर्नाद हा केवळ वाचनीय नाही तर तो संग्राह्य आहे.
प्रकाश घाटपांडे

अंतर्नाद

पूर्ण सहमत.

मी मराठी

किशोर आरस

हे सुरेख लिहीतात, त्यांचे 'आठवणींच्या आठवणी' हे मेमॉयर अत्यंत वाचनीय आहे.

 
^ वर