प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज !

शिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींंचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे !
फाल्गुन कृ. तृतीयेला (२४ मार्च २००८) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा लेख....!

शिवोत्सवाचा उद्देश
१९२८ साली मुंबईच्या `श्रद्धानंद' या साप्‍ताहिकामध्ये स्वा. सावरकरांचा `शिवोत्सव' हा लेख प्रसिद्ध झाला. त्यातील काही तेजस्वी परिच्छेद तर प्रत्येक हिंदूंने मुखोद्गत करायला हवेत. स्वा. सावरकर लिहितात, `सोळाव्या शतकात, जवळजवळ मरणदशेला पोचलेल्या हिंददेशाच्या पुनरुद्धाराचं प्रचंड कार्य, श्रीशिवप्रभूनं सतराव्या शतकारंभी हाती धरलं. जेथे राणा संग नि महाराणा प्रतापसिंह हे यशस्वी होऊ शकले नाहीत, ते कार्य एका तरुणानं पांच-पंचवीस मावळयांच्या साहाय्यानं सिद्ध केलं; आणि रायगडाच्या कोरड्या पठारावर मोहोरा-माणकांचा पाऊस पाडून रत्‍नखचित सुवर्ण सिंहासन उभं केलं !
परंतु हिंदूंनो, म्हणून असं मानू नका, की `फू:' करून उडवलेल्या चेटुकाच्या मातीफुंकीनं हे घडून आलं ! हे घडून आणायला भगीरथाप्रमाणं खडतर प्रयत्‍न करावे लागले. प्राणपणाची तपश्चर्या ज्या वेळी प्रभू शिवरायांनी केली, नि त्या वेळच्या पिढीस करायला लावली, तेव्हाच सर्व हिंदुस्थान व्यापून उरलेलं हिंदुसंस्कृतीचं भयाण मरणसंकट निवारता आलं !
हे हिंदुजाती, तू तर शिवाजीरायांचा हा उत्सव जाती-कर्तव्य, राष्ट्रकर्तव्य नि धर्मकर्तव्य म्हणून पाळला पाहिजे; कारण, तू आज जी आहेस, ती हा तुझा बाप शिवाजी झाला, म्हणून आहेस. या बापास आठव, आळव आणि प्रार्थना कर की, शिवप्रभो, आम्हालाही तानाजी-बाजीसारखे बनण्याची स्फूर्ती दे! आणि महाराष्ट्रा ! तू तर हा उत्सव प्राणांचे झोले करून नि त्यावरून शिवरायांच्या मिरवणुका काढून साजरा कर. तुझी सर्व बुद्धी नि तुझी सर्व शक्‍ती त्यांच्यापुढे तांबूलतूल्य अर्पून तू हा उत्सव साजरा कर; त्यांना तुझ्या रक्‍ताचा नैवेद्य दाखवून साजरा कर. आणि - तरुणांनो ! शिवरायांचा हा उत्सव नगरोनगरी व घरोघरी साजरा करीत- करीत हा महामंत्र म्हणा की, हे शिवप्रभो ! आम्हालाही तानाजी-बाजीसारखे बनण्यास स्फूर्ती दे ! क्षणाक्षणांचा व्यय नि कणाकणांचा त्याग या मातृभूमीच्या स्थंडिलावर करा. सतत नियतकुशल कर्माचरणाने हे कर्तव्य-स्थंडिल धगधग पेटू द्या; नि प्रसंगच आला, तर शेवटची आहुती, शेवटचा महाभोग या साडेतीन हात देहाचा देऊन, तुम्ही ती विजया-देवी हिंदुभूमीच्या अभ्युदयाकरिता हस्तगत करा. आज जर तुम्ही हे असे प्रत्यक्ष कृतीचे तोरणागड-सिंहगड उभे केलेत, तर निश्चित समजा, की तो विजयाचा रायगड अखेर याच पिढीत, `याच देही, याच डोळा' भूमातेच्या पायी लोळण घेईल !'

शिवोत्सवामागील उद्देश व तळमळ महाराष्ट्र विसरला ?
ज्या तळमळीने व उद्देशाने स्वा. सावरकरांनी शिवोत्सव करायला सांगितला आहे, ती तळमळ, तो उद्देश आज महाराष्ट्रातच विसरला गेला आहे कि काय, अशी शंका येते.
जगात कोणताही देश आपल्या राष्ट्रपुरुषाच्या जन्मदिनांकाचा घोळ घालत नाही. येथे तर हिंदुराष्ट्राच्या जनकाचाच प्रश्‍न आहे, की ज्याच्यामुळे सुंता होण्यापासून हिंदू वाचले. परकियांंचे (उदा. व्हॅलेंटाईन) दिवस आठवणीने साजरे करणार्‍या हिंदूंना मात्र स्वत:च्या अर्वाचीन युगपुरुषाचा जन्मदिवस नेमका माहीत नाही, हा दैवदुर्विलासच नव्हे काय ? मूठभर शिवप्रेमी वर्षातून गटागटाने दोनदा शिवजयंती साजरी करतात, याचे कोणालाच कसे काही वाटत नाही ? यामुळे नकळत हिंदू समाज दुभंगला जातो, याची जाणीव कोणालाच कशी होत नाही ? श्रीराम-श्रीकृष्ण यांच्यापासून सर्व युगपुरुषांचा इतिहास नक्षत्र-मितीवर जतन करणार्‍या हिंदूंना हे लांछनास्पद आहे !

धर्मांधाना छ. शिवाजी महाराज डोळ्यांसमोर नको !
स्वा. सावरकर हिंदूजातीला सांगताहेत, `तुझा बाप शिवाजी झाला, म्हणून तू आहेस, या बापाला तू आठव.' हिंदूंनी मात्र शिवजयंतीपुरतीच त्यांची आठवण काढायचे ठरवले आहे. महाराष्ट्रातला हिंदू छ. शिवाजी महाराजांचे चरित्र व पराक्रम विसरतोय; पण येथील मुसलमान मात्र महाराजांना एका वेगळया अर्थाने विसरत नाही. डिसेंबर २००७ मध्ये सातारा जिल्ह्यातील खर्शी-बारामुळे या गावातील जमीर मोमीन या माध्यमिक शिक्षकाने महाराजांचे आक्षेपार्ह चित्र भिंतीवर रेखाटले ! महाराष्ट्रातलाच जमीर मोमीन महाराजांचा द्वेष करतोय, असे नव्हे, तर तिकडे दूरवरील म्हणजे केरळमधील मुसलमानही महाराजांचे चित्रच डोळयांसमोर नकोय, असे म्हणतोय. जून २००७ मध्ये मंजेश्वर (केरळ) या गावातील एका शाळेत महाराजांचे चित्र व त्याखाली त्यांचा पराक्रम सांगणार्‍या चार ओळी असणार्‍या `सनातन वह्या' वितरीत करण्यात आल्या. या वह्यांमुळे `आपल्या धार्मिक भावना दुखावल्या' अशी तक्रार अबूबक्कर सिद्दीकी या स्थानिक मुसलमानाने पोलिसांकडे केली व वह्यांचे वाटप करणारे धर्माभिमानी श्री. सुरेश भट यांना अटक करवली !
महाराजांचे चरित्र कसे वाचावे, हे कळण्यासाठी या लेखात वर स्वा. सावरकर व पुढे पु.भा. भावे व लो. टिळक यांच्या मतांचा उल्लेख केला आहे. महाराजांच्या चरित्रातून हल्ली वेगवेगळे अर्थ राजकारणाच्या सोयीसाठी काढले जातात. याचे एक उदाहरण पाहूया. मार्गशीर्ष शुद्ध सप्‍तमी या दिवशी महाराजांनी अफझलखानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी संपवले. १६ डिसेंबर २००७ रोजी हा `शिवप्रतापदिन' प्रतापगडावर साजरा करण्यात आला. प्रतापगड उत्सव समितीला प्रतिबंध करून शासनाच्या पाठिंब्यावर हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या भाषणात मुस्लीम लीग फ्रंटचे प्रवक्‍ते ताहीर शेख म्हणाले, ``महाराजांनी अफझलखानाला मुस्लीम म्हणून नव्हे, तर राजकीय विरोधक म्हणून मारले.''(म.टा. १७.१२.२००७) ताहीर शेख यांनी केलेला शब्दांचा खेळ शासनाने जमवलेल्या श्रोत्यांच्या लक्षात आला नसेल; पण आपल्या लक्षात आला पाहिजे. अफझलखानाला महाराजांचा `राजकीय विरोधक' संबोधून खानाच्या दुष्कृत्यांवर शेख यांनी पांघरूण घातले आहे, तर दुसर्‍या बाजूला आपल्या राजकीय विरोधकाला संपवणार्‍या महाराजांना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या `खुनी' म्हटले आहे. अफझलखान महाराजांचा राजकीय विरोधक होता, तर त्याने हिंदूंचे पंढरपूर व तुळजाभवानीचे देऊळ का फोडले, याचे उत्तर ताहीर शेख देणार आहेत का ?
अफझलखानाच्या पोटात वाघनखं खुपसून महाराजांनी त्याचा `विश्‍वासघात' केला, अशी गांधीगिरी बर्‍याच वर्षांपासून केली जाते. अशा षंढगिरीवर हिंदुत्ववादी लेखक भाषाप्रभू पु.भा. भावे तुटून पडत. भावे म्हणत, ``शत्रूचा विश्‍वासघातच करायचा असतो, महाराजांकडची वाघनखं काही खानाची पाठ खाजवण्यासाठी त्यांनी सोबत घेतली नव्हती आणि खानानेही त्याची कट्यार महाराजांना भेटीत सफरचंद कापून देण्यासाठी आणलेली नव्हती !' भावे पुढे म्हणत,``पहिला वार हा नेहमी शिवाजीचाच हवा!'' आजचे राज्यकर्ते पहिला नव्हे, दुसरा नव्हे, तर शत्रूचे शंभर वारही मुकाट्याने सहन करत जनतेलाच शांतीचे पाठ देत रहातात !

महाराजांनी `इस्लाम'चेही आक्रमण रोखले !
महाराजांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नुसते `मुसलमानां'चे आक्रमण परतवले एवढेच नव्हे, तर `इस्लाम'चेही आक्रमण रोखले. महाराजांच्या जन्मापूर्वी मुसलमान सत्ताधीशांकडून हिंदु जनता कशी भरडली व चिरडली जात होती, याचे हृदयद्रावक वर्णन समर्थ रामदासस्वामींनी केले आहे.
मुसलमान आक्रमकांची टोळधाड आल्यावर जे पुरुष घरातून पळून जात, ते घरी परतल्यावर लक्षात येई की, सुलतानाचे लोक कुटुंबातील तरुण मुलगी घेऊन गेले आहेत. अनेक हिंदु कन्यकांची पाठवणी नंतर अरबस्तानात होत असे. मुसलमानांचे आक्रमण आले की, देवांच्या मूर्तीही विहिरीत वा तळयात लपवून ठेवाव्या लागत. याचे वर्णन करतांना `येक देव पाताळी बुडविला' असे समर्थांनी म्हटले आहे. ज्या हिंदूंना आपल्या देवमूर्तीची अशी काळजी घेणे शक्य होत नसे, त्यांच्या वाट्याला `येक देव फोडिला बळे' किंवा `येक देव घातला पायतळी' हे पहाण्याचे दुर्भाग्य येत असे !
समर्थांचे हे शल्य महाराजांनी जाणले. हिंदु धर्माचा आणि हिंदु राष्ट्राचा रक्षणकर्ता कोणीच न उरल्याने ही परिस्थिती आली आहे, हे ओळखून त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली.

हिंदु धर्मरक्षक छ. शिवाजी महाराज !
एखाद्या महाकाव्याच्या नायकाप्रमाणे छ शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याने हिंदू समाजाला महान राष्ट्रीय प्रेरणा दिली. शेकडो वर्षांचे मुसलमानांचे अत्याचार व गुलामगिरी यांमुळे आपली अस्मिता, धर्मविचार, धर्माचरण विसरून गेलेल्या हिंदूंना महाराजांनी निर्भय बनवले !
हिंदुराष्ट्राच्या निर्मितीसाठी तेराव्या वर्षापासून पुढे सदतीस वर्षे म्हणजे आयुष्याच्या अखेरपर्यंत आजाराचे दिवस वगळता महाराजांनी कधीही विश्रांती घेतली नाही. हिंदु धर्मशास्त्रानुसार राज्याभिषेक करून घेऊन महाराजांनी हिंदूंना `सनाथ' केले आणि एका स्वतंत्र व सार्वभौम हिंदू राज्याची मुहूर्तमेढ रोवली ! आज हिंदुस्थानातच `अनाथ' झालेल्या हिंदूंसाठी शिवचरित्र ही एक जयगाथा आहे. तिचे गायन व अनुकरण केले की, हिंदू पुन्हा `सनाथ' होतील !!

साभार - कु. दीप्‍ती मुळये, रत्‍नागिरी

Defamation of Shivaji Maharaj

Comments

वाढदिवस

मूठभर शिवप्रेमी वर्षातून गटागटाने दोनदा शिवजयंती साजरी करतात, याचे कोणालाच कसे काही वाटत नाही

भारतातील महत्वाचे हिंदु सण हे हिंदु पंचांगानूसार साजरे केले जातात. पुराणातील राजांचा जन्मदिवसही हिंदु पंचांगानूसर साजरा होतो. (जसे रामनवमी, गोकूळ अष्टमी इ.). मात्र हे राजे त्या काळातील आहे जेव्हा ख्रिश्चन कालगणना चालु झाली नव्हती. शिवरायांचा जन्म दिवस हा तिथीप्रमाणे करावा की तारखे प्रमाणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे (आपले स्वतःचे वाढदिवसही दोनदा येतातच). प्रश्न आहे शिवजयंती साजरी करायची म्हणजे काय? केवळ एखादा शामियाना उभारून, शिवमुर्ती ठेऊन समोर "सांस्कृतिक"(!) कार्यक्रमांचा धागडधिंगा घालणे का एक सुट्टी असल्याने मस्त पैकी ताणून देणे?
माझ्या मते (हे कोणीही विचारत नाहि तरी मी आपला देत असतोच ;) )शिवजयंतीच्य निमित्ताने दर वर्षी एक अश्या गतीनेही एका किल्याची साफसफाई (डागडुजी नव्हे.. केवळ स्वच्छ केले तरी खूप आहे) सरकार तर्फे केली गेली तरी भरून पावलो म्हणावे लागेल.

असो. बाकी लेख लेखकाच्या प्रसिद्ध शैलीशी इमान राखणारा वाटला :)

जाता जाता: ह्या वाढदिवसाच्या कॉन्फ्लिक्टला राष्ट्रीय सौर कॅलेंडर हे चतुर उत्तर होऊ शकेल का?

-ऋषिकेश

सहमत

शिवजयंतीच्य निमित्ताने दर वर्षी एक अश्या गतीनेही एका किल्याची साफसफाई (डागडुजी नव्हे.. केवळ स्वच्छ केले तरी खूप आहे) सरकार तर्फे केली गेली तरी भरून पावलो म्हणावे लागेल.
संपूर्ण सहमत आहे. म्हणजे नुसते बातों बातों में न रहाता कृती केली तर सोन्याहून पिवळे. (किंवा या निमित्ताने 'आनंदवनभुवनी'चे विवेचन केले तरी खूप!)

बाकी लेख लेखकाच्या प्रसिद्ध शैलीशी इमान राखणारा वाटला :)
:)))))
----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

क्षमस्व

किंवा या निमित्ताने 'आनंदवनभुवनी'चे विवेचन केले तरी खूप!

आम्ही पहिल्यापासूनच उदार असल्याने अधिक विचारांती या अवघड प्रश्नाला अजून एक ऑप्शन देत आहोत. (मार्क तेवढेच!) खालील गाण्याचा अर्थ सांगितला तरी चालेल.

----
"Those are my principles. If you don't like them, I have others." -- Groucho Marx

आनंदवनभुवनी

किंवा या निमित्ताने 'आनंदवनभुवनी'चे विवेचन केले तरी खूप!

कुठली इच्छा कधी, कशी पूर्ण होईल सांगता येत नाही. आनंदवनभुवनीचे विवेचन साक्षात पंडितजींकडूनच!

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

राष्ट्रीय सौर कॅलेन्डर

शिवाजीचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला शालिवाहन शके १५५१, शुक्लनाम (विक्रम) संवत्सरात, उत्तराय़णात, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्रावर , सिंह लग्न असताना, शुक्रवारी, सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर झाला हे नक्की. त्या दिवशी ग्रेगरियन कालमापन पद्धतीनुसार १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख होती. सरकारी नियमाप्रमाणे एका विशिष्ट तारखेपूर्वी होऊन गेलेल्या व्यक्तीची जयंती-पुण्यतिथी हिंदू पंचांगाप्रमाणे साजरी करायला हवी. पण काही अनाकलनीय कारणासाठी सरकारने शिवजयंतीच्या बाबतीत अपवाद केला आहे. त्यामुळे सरकारी जयंती तारखेने आणि जनताप्रणीत, तिथीने येते.
हिजरी पंचांगाप्रमाणे तिसरी आणि राष्ट्रीय सौर कॅलेन्डरप्रमाणे चौथी तारीख येईल. हरकत नसावी.
मला खटकतोय तो शिवाजीच्या नावाअगोदर आलेला छ शब्द. हे कुठल्याही शब्दाचे अधिकृत संक्षिप्त रूप नसावे. असे शब्द वापरणे टाळावे. हल्ली कुठल्याही उपटसुंभाच्या नावाआधी पू, मा असले शब्द लिहिलेले आढळतात. पू शब्दकोशात सापडला नाही, पण 'मा'चे अर्थ असे आहेत.
आई(मा जगदंबा), मातुश्री(गं.भा. मा. यमुनाबाई यांस),यांच्या(मा बदौलत-यांच्या दौलतीसह) वगैरे. त्यामुळे नावाअगोदर मा. लावताना ते याच अर्थी लावावे ह्यात शहाणपणा आहे. --वाचक्‍नवी

इतरांचे लेख

मूळ लेखक/लेखिकेच्या परवानगीशिवाय त्यांचे लेख इतरत्र जसेच्या तसे छापणे हा प्रताधिकार कायद्याचा भंग ठरू शकतो. तेव्हा लेखकाने मूळ लेखिकेची परवानगी घेतली आहे का नाही याचे जाहिर निवेदन येथे द्यावे.

मिसळपाव आणि मनोगत यांनी या विरोधात पाऊल उचललेले आहे. उपक्रमानेही हेच करावे असे वाटते.

वाईट परिस्थिती

खरोखरच!

धोका आणि विनंती

हिंदुधर्माच्या अस्तित्वास कोणाकडून धोका असेल तर तो आततायी, अतिरेकी आणि निर्बुद्ध हिंदुत्ववाद्यांकडूनच आहे हे वास्तवाच्या कसोटीवर उतरलेले वाक्य पुन्हा एकदा 'आठवले'.
आपला
(परखड) वासुदेव

तांबेबुवा एक नम्र विनंती आहे. हे असले विषारी लिखाण नका वाचत जाऊ आणि लिहित तर मुळीच नका जाऊ. जगात तिरस्कार आणि द्वेष यांच्याव्यतिरिक्तही काही आहे. काही माथेफिरूंचा वेळ जात नाही किंवा इतर काही स्वार्थ असतो ते असले भलतेसलते लेखन करून संपूर्ण समाजस्वास्थ्य बिघडवायला बघतात. शांतपणे विचार करा आणि याला बळी पडायचे की नाही ते ठरवा. "सर्वे भवन्तु सुखिनः " म्हणणारा आपला धर्म आहे आणि शांती समाधानाची प्राप्ती हे परम ध्येय आहे.
आपला
(सूचक) वासुदेव
~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

(१) सदर लेख काढून टाकावा

ही विनंती

(२) सदर लेख काढून टाकावा

ही विनंती

(३) सदर लेख काढून टाकावा

.

एक प्रश्न वजा विनंती...

स्वा. सावरकर हिंदूजातीला सांगताहेत, `तुझा बाप शिवाजी झाला, म्हणून तू आहेस, या बापाला तू आठव.'

ही भाषा सावरकरांची वाटत तरी नाही आहे...कृपया आपल्याला संदर्भ (अगदी अप्रत्यक्षपण चालेल, पण) माहीत असल्यास तो येथे द्यावा. न पेक्षा थोरामोठ्यांच्या तोंडी अशी विधाने देऊ नयेत असे वाटते. (आणि हो सावरकरांनी या भाषेत जर लिहीले असले तर त्यांच्या बद्दलचा आदर तसुभरही कमी न करता मला ते वाक्य रुचले नाही असे मी म्हणेन).

सहिष्णुता दाखवा!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
गेले काही दिवस पाहतोय श्री गणेश तांबे इथे ज्या प्रकारचे लेखन करत आहेत ते इथल्या बहुसंख्य सदस्यांना रुचत नाहीये(मलाही!). त्यावर सुरुवातीलाच अत्यंत जळजळीत आणि दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रिया आलेल्या दिसल्या. म्हणजे गणेश तांब्यांचे एक टोक तर बव्हंशी लोकांचे दुसरे टोक. काहींनी तर हे लेख दुफळी माजवणारे आहेत आणि ते इथे उपक्रमावर राहू देऊ नये असेही म्हटलेले आहे.
प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे असे मानले तर मग दोन्ही बाजूंचे ऐकून घ्यावे ही भूमिका असावी असे वाटते. दोन्ही बाजूंनी सहिष्णुता दाखवावी असेही मला वाटते. इथले सगळे सभासद विचारांनी प्रगल्भ असल्यामुळे अमूक एका लिखाणामुळे त्यांचे मतपरिवर्तन होईल असे मला तरी वाटत नाही. म्हणून एखाद्याच्या लेखनावर बंदी आणावी अथवा ते लेखन इथून उडवावे असे टोकाचे प्रतिसाद देण्याऐवजी अशा आपल्याला न पटणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही का करता येणार? अशा तर्‍हेच्या लेखनाला इथे प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ते आपोआप बंद होईल असे नाही का वाटत? प्रत्येक गोष्टीत बंदीची भाषा कशाला? मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे?
राहता राहिला प्रश्न तो म्हणजे इथे काय प्रकाशित व्हावे/होऊ नये वगैरे. तर मला असे वाटते की उपक्रमपंत आणि इथले संपादक मंडळ त्याबाबतीत निश्चितच सक्षम आहे असे मला वाटते. आपल्याला नाही का वाटत असे?

 
^ वर