अभिमन्यू एकाकी पडलाय

शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत झालेल्या राड्याला अनेक पदर आहेत.ऐन थंडीत स्वतःची पॉलीटिकल पोळी शेकण्यासाठी होळी पेटवली कोणी आणि त्यात भाजले कोण? त्या होळीवर पाणी टाकले कोणी आणि त्यात पेट्रोल ओतून भडकण्याचा प्रयत्न केला कोणी?हे निट तपासले तर मराठी माणसाचे महाभारत लढण्यासाठी अभिमन्यू बनून राजकारणाच्या चक्रव्यूहात शिरलेल्या राज ठाकरे यांना आपले कोण आणि शत्रू कोण याची जाणीव होईल आणि त्यातून मनगटापेक्षा मेंदूने मुंबईची लढाई कशी लढायची याचे मार्गदर्शन मिळेल.
कौरवांच्या चक्रव्यूहात शिरलेला अभिमन्यू पराभूत झाला.कारण त्याला चक्रव्यूहात शिरण्याची पद्धत माहित होती,पण बाहेर पडण्याची माहित नव्हती.त्यामुळेच तो फसला.
उत्तर भारतीयांच्या प्रांतवादाच्या तमाशाला डिवचून राज ठाकरे यांनी मूलतः अशिक्षीत,असंस्कृत,तसेच भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण चालवणार्‍या उत्तर भारतीयांचे आग्यामोहोळ अंगावर ओढून घेतले आहे.अशा वेळी 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' अशा पद्धतीने न्याय आणि सत्य कोठे आहे आणि अन्याय असल्याच्या रणगाडा कोण रेटत आहे,हे निपक्षपातीपणे मांडण्याचे कार्य प्रसारमाध्यमांनी करायला पाहिजे होते,परंतू दूर्दैवाने 'इस्टंट न्यूज' दाखवणार्‍या वॄत्तवाहिन्यांना आज जास्त महत्व प्राप्त झालेले आहे.त्यांनी स्वतःचे कर्तव्य विसरून आपण स्वतः मराठी नसल्याने मराठी माणसांविरूद्ध कुटील पद्धतीने जेवढे काही गरळ ओकता येईल ती ओकली. आणि एकाच दिवशीच्या मारपिटीच्या प्रसंगाची चित्रफित दूसर्‍या दिवशीही दाखवत राहून मुंबईतील उत्तर भारतीय लोकांना दंगलीची चिथावणी देण्याचे हीन कृत्य केले.
एका वाहीनीतील बाळकृष्ण नावाच्या दिल्लीत बसून मल्लिनाथी करणार्‍या समालोचकाने आपली अक्कल पाजळून सांगीतले,'राज ठाकरे यांच्या पार्टीत (मनसे) दमच नाही.त्यांचे मुंबईत ७,पुण्यात ८ आणि नाशिकमधे १२ नगरसेवक आहेत',पण त्याने हे सांगीतले नाही की,स्थापनेपासून ३६५ दिवस पूरे होण्याच्या अल्पावधीत मनसेने हे यश कमावले आहे.मुस्लिमांची १० लाखांपेक्षा जास्त एकगट्ठा मते असूनही मुंबईत समाजवादी पार्टीला एकपेक्षा जास्त नगरसेवक ७ वर्षात का बनवता आला नाही?'
आपल्या फाटक्या तोंडाने ऊठसूठ आगी लावणार्‍या अमरसिंहापासून अबू आझमी(सिमीशी संबंधीत असल्याचा आरोप असणारा,दाऊदबरोबर चित्रफितीत दिसणारा) आणि कृपाशंकरपासून संजय निरुपमपर्यंत सर्व तोंडाळांची वारंवार बकबक दाखवणार्‍या वृत्तवाहिन्यांनी मराठी विचारवंत,साहित्यीक किंवा कार्यकर्ते यांना संपूर्णपणे वाळीत टाकून दिले होते.फक्त अधूनमधून विलासरावांचे वक्तव्य ते दाखवत होते.कारण राजधर्मानुसार दंगली आटोक्यात आणणे त्यांचे कर्तव्य आहे.
हि सर्व एकांगी नौटंकी प्रसारमाध्यमे मुद्दाम चालवत आहेत.कारण ते हिंदी भाषी आहेत आणि सुसंस्कृतपंणा,सखोल शिक्षण आणि प्रसारमाध्यमांचा दीर्घ अनुभव नसलेले छूटभय्ये एकमेकांच्या वशिल्याने घुसलेले असल्याने त्यांच्या आकलेची पातळी ताबडतोब दिसून आली.मराठी प्रसारमाध्यमे,खासकरुन मराठी वाहिन्या आणि दैनिकांतही स्वभाषीक मुद्द्यावर ठामपणे राहण्याऐवजी तळ्यात मळ्यात केले.याचे घातक परिणाम पुढे त्यांनाही भोगावे लागतील.एकदिवस असाही उगवू शकेल की,त्यांच्या वाहिन्या आणि त्यांची वृत्तपत्रे वाचण्यासाठी मुंबईत मराठी वाचकच शिल्लक राहिलेला नसेल.असे दू:स्वप्न कधीही खरे होऊ नये म्हणून मराठी प्रसारमाध्यमांनी एकत्र होऊन उत्तर भारतीय झूंडशाहीविरुद्ध सैद्धांतीक आणि तात्वीक मुद्यांची आघाडी आणि न्यायालयीन लढाया लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.शिवसेनेला मराठी माणसाला मदत करायची नसेल तरी चालेल,पण मराठी मते घेऊन सत्तारूढ होऊन भैय्याचा जयजयकार करण्याचे पाप तरी करु नये.बाळासाहेब,मराठी माणसाच्या मनाला सहस्त्र इंगळ्या डसतात हो त्यामुळे!

Comments

वास्तव

आताचे आणि नंतरचे असे चित्र अभ्यासपूर्वक मांडले आहे.
बा़की राजकीय पक्षांबद्दल भाष्य न् केलेले बरे. पुढे आपल्या सारख्या सर्व सामान्य मराठी जनांनाच एकत्र् पुढे यायचे आहे.

सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"

अभिमन्यू

अभिमन्यू एकाकी पडलाय आणि उरलेले सगळे कौरव आहेत.

राजसाहेबांचा यात राजकीय स्वार्थ असणार आहे ही समजूत मी बाजूला ठेवायला तयार आहे.

अभिजित...

अर्जुना कृष्णाला शोध

अभिमन्यूचा कळवळा असलेल्या आणि गोंधळलेल्या अर्जुना, जा पहिला कृष्णाला शोधुन आण. राजला अभिमन्यू ऐवजी युयुत्सु म्हणा हवं तर.
उगाच आपलं महाभारताचा संबंध लावुन राजला कशाला मोठं करताय? तो लहान आहे आणि लहानच राहणार आहे. मराठी अस्मिता, मराठी माणुस वगैरे वगैरे बोलुन पोळ्या भाजायचा धंदा सुचतोय त्याला. आपल्या पक्षाच नाव विसरला आहे का पहिला विचारा. म्हणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना - यातला महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई का? नवनिर्माण स्वतःचेच का? आणि सेना कोणाची?
महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्ल्यु प्रिंटची भाषा करणार्‍या राजना विचारा की ब्ल्यु प्रिंट काढण्याआधीचे ट्रेसिंग बनवायला ट्रेसिंग पेपर शोधताय काय? कि पेन्सिल? कुठे गेले ते दावे? आता काहीच हाती लागत नाही म्हणुन मराठी का? अरे बाबा, उत्तर भारतीय असले तरीही भारतीय आहेत. त्या त्याच्या मुंबईमध्येच बांग्लादेशी आहेत. ते काय मराठी आहेत काय? ते पहिला गेले पाहिजेत. मग बाकिच्यांबद्दल बोलु.
वृत्त वाहिन्यांबद्दल नवे काय सांगितले? जिथे तिथे तेच आहे. लोकं स्वतःची मतं बिनविरोध मांडण्यासाठी स्वतःची वृत्तपत्रे, वहिन्या, संकेतस्थळे काढतात. मग असल्या अपेक्षा त्यांच्याकडुनच कशाला?
मराठी माणुस हा अनेकदा कष्टापासुन दुर पळतो. पहिला आत्मनिरिक्षण करुन मराठी माणसाच्या चुका/ दोष शोधा. त्या सुधारण्याचे मार्ग शोधा आणि मग इतरांचे दोष दाखवा.
समस्यांचे मुळ शोधा. राजला अभिमन्यूचे नाव देउन तो महान होणार नाही की मुळ समस्या नष्ट होणार नाही. होय, आणि एक मुद्दा - मुंबईमध्ये आज जेवढे परप्रांतिय आहेत. तेवढेच मराठी लोक पुर्ण महाराष्ट्रातुन आजवर तिकडे का नाही गेले? त्यांना कोणी अडवलं होतं का? राजला सांगा की मराठी माणसाला सुद्धा पैसा कमवायचा आहे. तिथे मुंबई मध्ये मराठी का नाही आले याची उत्तरे सुद्धा दे म्हणावं....

करमणूक

राज ठाकरे अभिमन्यू हे वाचून बरीच करमणूक झाली. हा मर्दमराठी बाणा बघून संतोष जाहला. नाहीतर ते अमेरिकन्स. खुशाल विक्रम पंडीतांना सर्वात मोठ्या ब्यांकेचे प्रमुख नेमतात. स्वाभिमान नसला की अशी पाळी येते.

देशातील भ्रष्टाचार, गरिबी, गुन्हेगारी, अस्वच्छता, लोकसंख्या, दळणवळणाच्या सोईंचे गंभीर स्वरूप, कित्येक गांवांमध्ये वीज, पाणी, शाळा, रस्ते, रूग्णालये नसणे; शेतकर्‍यांचे गंभीर प्रश्न, शहरांमधील वाढते प्रदूषण, एड्सचे वाढते रूग्ण या सर्व किरकोळ गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणूनच यावर एकाही राजकारण्याने आंदोलन केलेले आठवत नाही. या सर्वांपेक्षा जात, धर्म, पुतळे, मंदिरे, भाषिक आणि प्रांतीय भेद यांना आम्ही जिवापाड जपतो आणि त्यांच्यासाठी हिंसाचार करायला, बशी जाळायला मागेपुढे पहात नाही.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

चाणक्य व राजेंद्र

यांच्याशी सहमत.... 'अभिमन्यू' चा उद्देश, स्वतःची पोळी भाजून घेणे, यापलिकडे काही होता असे वाटत नाही.

कौरव - पाण्डव

"मराठी माणसावर अन्याय होत आहे," हे मान्य आहे. बाकी राजकारण पटो अथवा न पटो, मनोहर जोशींनी बाँबेचे साधे मुंबई केले (बाकी काय केले हा वादाचा मुद्दा असला तरी) . बरीच बोंबाबोंब झाली पण आज मुकाट्याने अमराठीपण मुंबई म्हणायला लागले. बॉलीवूड (की मॉलीवूड?:)) मधेपण मुंबई हा शब्द चित्रपटात दिसू लागला. म्हणुन म्हणतो आता जबाबदारी आहे ती आपल्यासारख्या सर्वांची - पण या संबंधात आपण व्यक्तीगत काय काय करू शकतो यावर विचार करूया. उद्या तमाम मुंबईकर मराठी माणसाने आणि त्याचबरोबर महाराष्ट्राने मराठी भाषेचा १००% वापर करून काहीतरी दाखवायला सुरवात केली तरी अनेक गोष्टी बदलतील. भडक माथ्याने रस्त्यावर येण्या ऐवजी थंड डोक्याने सर्वत्र सुरवातीस मराठीत बोलूया - शाळात, कॉलेजात आणि सरकारी कारभारात (धंद्यात तुर्तास जिथे शक्य आहे तिथे, इतरत्र इंग्रजी/हिंदी - नाहीतर परत मराठी माणूस धंदा आणि नोकरी दोन्ही घालवून बसायचा!)

बाकी राजकीय पक्षांवरून भावनात्मक होयला लागून काही उपयोग नाही (अनलेस तुम्हाला मनसेकडून तिकीट वगैरे हवे असल्यास!)

बाकी राजना अभिमन्यू म्हणल्यामुळे मला एकदम अटलजींची कविता आठवली (क्षमस्व - हिंदीतच देत आहे कारण मूळ रूपच चांगले आहे, मराठी भाषांतर अस्तित्वात असले तरी)

कौरव कौन, कौन पाण्डव

कौरव कौन
कौन पाण्डव,
टेढ़ा सवाल है |
दोनोँ ओर शकुनि
का फैला
कूटजाल है |
धर्मराज ने छोड़ी नहीं
जुए की लत है |
हर पंचायत में
पांचाली
अपमानित है |
बिना कृष्ण के
आज
महाभारत होना है,
कोई राजा बने, (का राज बने?)
रंक को तो रोना है |

खतरेमे?

>> "मराठी माणसावर अन्याय होत आहे," हे मान्य आहे.

आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी "खतरेमे" ची आरोळी नेहमीच कामाला येते. मराठी माणसावर काय अन्याय होत आहे बरे?

वा!

उत्तर भारतीयांच्या प्रांतवादाच्या तमाशाला डिवचून राज ठाकरे यांनी मूलतः अशिक्षीत,असंस्कृत,तसेच भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण चालवणार्‍या उत्तर भारतीयांचे आग्यामोहोळ अंगावर ओढून घेतले आहे.

मूलतः अशिक्षीत,असंस्कृत,तसेच भ्रष्टाचार आणि गुंडगिरी हेच सत्य आहे... शिवाय यातही मुस्लीम तुष्टीकरण आहेच.

जोवर मराठी माणूसही तितकाच मुजोर नि माजत नाही तोवर त्याचे काही खरे नाही... हे अपेक्षा पुण्या सारख्या शहराकडून नाहीच असली तर छोट्या शहरांकडूनच आहे.

आज आम्हाला "खेड्यातल्या मराठी लोकांनो मुंबई कडे चला!" असे म्हणणार्‍या नेत्याची गरज आहे!

राज तूच काही कर नि हे उत्तर भारतीय आक्रमण अराजक थांबव.
उद्धव सारखा पुचाट काही करेल असे दिसत नाही...

आपला
उत्तरभारतातल्या मुस्लीम मत राजकारणविरोधी

गुंडोपंत

राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी

दोन-तीन दिवस काही उत्तरभारतीयांना मारहाण केली. पुढे काय? मारहाण करून ते परत जाणार आहेत का? (मार खाणारे असहाय होते आणि इतर उत्तर भारतीय बेसावध होते म्हणून एवढे तरी झाले. आता पुन्हा तसा प्रयत्न केला तर मनसेचे कार्यकर्तेच मार खातील हे निश्चित) मराठी माणसांना विधायक मार्गाने पुढे आणण्याची काही योजना राज ठाकरे यांच्याकडे आहे का? उलट ह्या प्रकाराने आपापले मतभेद विसरून सगळे "उत्तर भारतीय" या झेंड्याखाली एकत्र आले आणि "मराठी माणूस" (मनसे नव्हे) हा एक "कॉमन शत्रू" त्यांना मिळाला. यातून मराठी माणसांना त्रासच होईल. आता उत्तर भारतात राहणार्‍या मराठी लोकांच्या सुरक्षेचे काय? जमशेदपूरमध्ये एका मराठी तरूणाला स्थानिक लोकांनी जबर मारहाण केली, त्याला दवाखान्यात न्यावे लागले. त्याची काय चूक होती? अश्याच घटना इतर ठिकाणीही घडतील. राज ठाकरे अणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेल्या आक्रस्ताळ्या कर्माची फळे सर्व मराठी लोकांना भोगावी लागतील याचे वाइट वाटते.

परप्रांतीय

परप्रांतीयांनी मराठी माणसाच्या तोंडचा घास पळवला आहे ही मर्द मराठ्यांची आवडती तक्रार असते. (असे रडगाणे गाताना मर्दपणा कुठे जातो कोण जाणे?) यासंबंधत आशा भोसले यांची मुलाखत आठवते. त्यांनी आणि लतादीदींनी गाणे सुरू केले तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, पाकिस्तानी गायिकांचे वर्चस्व होते. अशा परिस्थितीत उर्दू गाण्यांसाठी मराठी गायिकांचा विचार कल्पनेच्या पलिकडे होता. शिवाय या गायिकांबरोबर द्वंद्वगीत असले तर काही गायिका धसमुसळेपणा करून माइ़कच्या जवळ येऊ देत नसत. लता आणि आशा दोघींनी यावर मराठी गायिकांवर अन्याय होतो आहे असे रडगाणे न गाता आपल्या गाण्यानेच उत्तर दिले. मेहनत करून उर्दू उच्चारांमधला मराठीपणा काढून टाकला. परिणाम सर्वांना माहितच आहे.

मुंबईतून परप्रांतीयांना हाकलायचे आहे का? मग टाटा, अंबानी, बिर्ला यांचे काय करायचे? शिवाय हे सर्व मुंबईतून गेले आणि समजा मुंबईऐवजी हैदराबाद आर्थिक राजधानी झाली तर त्याचा महाराष्ट्राला फायदा होणार आहे का? मराठी माणसाला बिझनेस सेन्स नाही हे कटू सत्य आपण कधी स्वीकारणार आहोत? भारतातील सर्वात आघाडीचे १० उद्योगपती घेतले तर त्यात किती मराठी आहेत? मुंबईपासून ३ तासावर पुण्यात मला दुपारी १ वाजता चितळ्यांची बाकरवडी खायची असेल, तर चार वाजेपर्यंत थांबावे लागते. मला बिझनेसमधले ओ की ठो कळत नाही, पण इथे काहीतरी चुकते आहे हे मलाही जाणवते. पुलंनी म्हटल्याप्रमाणे पुण्यातील दुकानांमध्ये सर्वात तुच्छ गोष्ट म्हणजे गिर्‍हाइक. अशा परिस्थितीत मराठी माणसाची प्रगती कशी होणार आहे? परप्रांतीयांना मारून, त्यांच्या टॅक्सी जाळून काय साध्य होणार आहे?

तलवार घेऊन समोरच्याला मारण्यापेक्षा जास्त धैर्य कठोर आत्मपरिक्षण करून स्वतःमध्ये बदल घडवून आणायला लागते.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

गल्लत

मराठी माणसावर अन्याय होतो म्हणले की मराठी माणूस धंद्यात कमी पडतो वगैरे गोष्टींशी गल्लत करतो. तो भाग नक्कीच आहे तसेच आपल्याला बदलायला हवे हे ही बरोबर आहे. जे बदलत आहेत ते पुढे जातही आहेत. लता-आशांचे उदाहरण नक्कीच आदर्श आहे. मला पण आशाची ती मुलाखत आठवते ज्यात त्यांना नवीन गायीका तक्रार करतात (की या बहीणी आम्हाला पुढे येऊन देत नाहीत वगैरे..) या संदर्भात प्रश्न विचारला होता आणि त्यावर त्यांनीे वर राजेंद्रने सांगीतलेले उत्तर दिले होते.

यात विसरले काय जाते तर सर्वच असामान्य कुठेच नसतात. आपण पण कुणाच्यातरी नोकर्‍याच करत आहोत. सुदैवाने आपल्याला विविध कारणांनी चांगले शिक्षण/नोकरी आणि संधी मिळाली. बर्‍याचदा अशी संधी मुंबईसारख्या कॉस्मोपॉलीट्न शहरात देताना आपापल्या राज्यातील/भाषिकांचा विचार केला जातो आणि अन्याय होतो. हे मी जवळून पाहीलेले आहे. मग कधी त्यात बीएआरसी असते तर आत्ताच्या घडीस त्यात अगदी साध्या मॉल्समधील नोकर्‍यापण असतात. ज्यांना खायची भ्रांत आहे, जे सामान्य आहेत त्यांना ते तसे आहेत असे म्हणून डिवचणे आणि म्हणून मराठी माणसांवर अन्याय होत नाही म्हणणे हे योग्य वाटत नाही.

मुंबईचे आर्थीक बळ हैद्राबादला अथवा इतरत्र गेले तर काय होईल ह्या प्रश्नाचे एकच उत्तर असे आहे की हजारो कोटींच्या घरात केंद्र सरकारला उत्पन्न मिळवून देणार्‍या मुंबईस आणि ती राजधानी असलेल्या महाराष्ट्रास नक्की कुठल्या रूपात अनुदान मिळते? विचार करा काँग्रेसच्या जन्मशताब्दीनिमित्ताने मुंबईत झालेल्या १०८५च्या सोहळ्यात राजीव गांधींनी काँग्रेसचे नेते आणि पंतप्रधान या नात्याने धारावीतील झोपडपट्टी सुधारण्यासाठी ताबडतोब १०० कोटी रूपये जाहीर केले. ते नंतर देण्यासाठी मात्र कूरकूर. नवीन सोसायट्या तयार करताना अशा अटी घालायच्या की त्यामुळे मराठी माणसे येउ शकणार नाही. मी असे ही ऐकले आहे की अमराठी काँट्रॅक्टर हा मराठी माणसास सांगणारी जागेची किंंमत आणि अमराठी माण्सास सांगाणारी किंमत यात तफावत करतो...पण हा भाग सांगोवांगी आहे जरी ते शक्य असले तरी.

मराठी भाषा बोलायला तयारी नाही - अर्थात तो दोष आपला आहे. कारण माझा माझ्या अनेक परप्रांतियांकडून चांगला अनुभव आहे... नुसते मुंबईतच काय पण येथे अमेरीकेतपण ते मराठीत बोलतात.

याचा अर्थ राज ठाकर्‍यांनी जे केले ते पटले असे मला म्हणायचे नाही आहे. तसल्या गुद्दागुद्दीच्या राजकारणास काही अर्थ नाही. पण त्याविरुद्ध आवाज उठवत भरीव काम केल्यास काहीच चूक म्हणता येणार नाही. पण तसे होणार नाही कारण ते करणे सोपे नसते.

थोडक्यात आपल्याला बदलायाला हवे का? तर अर्थातच. पण म्हणून सामान्यांचीजर पिळवणूक होत असेल तर त्याला विरोध करणे तो अन्याय म्हणणे यात काही गैर वाटायचे कारण नाही.

दुजोरा...

माझ्या अनेक परप्रांतियांकडून चांगला अनुभव आहे... नुसते मुंबईतच काय पण येथे अमेरीकेतपण ते मराठीत बोलतात.

माझाही अगदी असाच अनुभव आहे. मुंबईत शिक्षण घेतलेले किंवा पुणे परिसरात नोकरी केलेले झाडून सारे दक्षिणी सहकारी येथे अमेरिकेतही माझ्याशी मराठीत बोलतात.
४ तील ३ मराठी मंडळी मात्र मराठी बोलल्यास इंग्रजीतच प्रतिसाद देतात.

अभिमन्यू

'अभिमन्यूची' भूमिका इथे वाचा. राजकारणात आपले स्थान बळकट करणे यापलिकडे या आंदोलनाचा दुसरा हेतू दिसत नाही. बघता काय, सामील व्हा, याचा अर्थ सर्व मराठी माणसांनी मुंबईतील सर्व टॅक्सी, बशी जाळून टाकायच्या का?

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

खेकडा वृत्ती

मूळात मुंबईत मराठी मते राहिलीत किती हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे,त्याशिवाय का मराठी-मराठी करत स्थापन झालेल्या शिवसेनेने मराठीचा मुद्दा बाजूला सारलाय.अशावेळी राज यांनी घेतलेल्या भुमिकेत राजकिय स्वार्थ आहे असे मला वाटत नाही. मुंबईत सत्तेत राह्यचं असेल तर बिगरमराठींना धरुनच रहावं लागेल हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही जाणते म्हणूनच या मुद्द्यावर त्यांनी सावध भुमिका घेतली.
मराठी माणसाला खेकडा वृत्तीचा का म्हटले जाते हे वरील प्रतिसाद वाचून लक्षात येते.प्रत्यक्ष राजमान्य राजश्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना ही याचा अनुभव आला होता तीथे राज ठाकरे यांसारख्या साधारण माणसाचे काय?

धंदा

राज ठाकरे राजकारणातच असल्यामुळे आपले स्थान बळकट करणे हा त्यांच्या व्यवसायाशी निगडीत निर्णय आहे. ;)

राज ठाकरे यांची मुलाखत आज दिवसभर टीव्हीवर दाखवत होते. प्रसारमाध्यमे रंगवून सांगतात इतके त्यात प्रक्षोभक नाही. मुंबई महानगरपालिकेत हिंदी कशासाठी? मराठी तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न कोण सोडवणार? मुंबईत आलेले लोक एकाच परवान्यावर चार टॅक्स्या चालवतात. त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही? बाबासाहेब कुपेकर किंवा प्रभा राव जेव्हा हा मुद्दा उपस्थित करतात तेव्हा त्यांच्यावर आरोप केले जात नाहीत मात्र माझ्यावरच आरोप का? असलेच निरुत्तर करणारे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. अमिताभ बच्चन संदर्भात त्यांनी मागेही काही वाईट बोलले नव्हते व आताही बोललेले नाही. बातमीपिपासू प्रसारमाध्यमांच्या या रंगीत चुका आहेत.

मात्र मागील काही वर्षे राज ठाकरे शिवसेनेत असतानाही हेच प्रश्न लहान प्रमाणावर भेडसावत होते. त्याबाबत त्यावेळी त्यांनी काय केले. आताच हे प्रश्न का उपस्थित केले जात आहेत हे मात्र न समजण्यासारखे आहे. शिवाय मुद्दे बरोबर असताना विधायक मार्ग अवलंबण्याऐवजी तोडफोडीचा शिवसेनी मार्ग कशासाठी? लोकजागृती विधायक मार्गाने करता येत नाही का?

-- आजानुकर्ण

हं

राज ठाकरे यांचा लेख वाचला. अत्यंत मुद्देसुद आणि प्रभावी मांडणी असलेल्या लेखाने सगळ्यात मुख्य म्हणजे प्रसारमाधम्यांच्या भंपकतेला (पुन्हा एकदा) उघडे पाडले आहे. पण मला राजकारणात स्थान बळकट करणे हा "एकमेव" हेतु मात्र वाटत नाही. काहि प्रमाणात असलेली कळकळही जाणवली. (एखाद्या नेत्याच्या विचारांमागची कळकळ जाणवली असे म्हटले म्हणजे "तु अजून लहान आहेस", "अजून वीशीत आहेस म्हणून असं वाटतंय" "हेच दहा वर्षांने बोलून दाखव" वगैरे कॉमेंट्सना निमंत्रण आहे याची कल्पना आहेच् ;) )
पण यासाठी "रस्त्यावर" येणे हा एकच मार्ग शिल्लक होता हे मात्र पटले नाहि. असे कोणते इतर मार्ग त्यांनी अवलंबून बघितले?

जाता जाता: जर हेच आंदोलन दक्षिण भारतीयाविरुद्ध असतं तर हिंदी चॅनल्सने एतकी एकांगी भुमिका घेतली असती का?

-ऋषिकेश

माझी भूमिका, माझा लढा!

राज ठाकरे यांचा म.टा. मधील लेख

माझी भूमिका, माझा लढा!

मराठी भाषा , मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलल्याबद्दल आणि तिच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याबद्दल यूपी - बिहारमधून आलेल्या गुंडांकडून आणि पत्रकारांचा बुरखा पांघरून यूपी - बिहारची वकिली करणाऱ्या बहुतेक सर्व हिंदी चॅनल्सच्या भय्या पत्रकारांकडून माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची , माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संघटनेची सतत बदनामी होते आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मुलं आणि जे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत , ते चांगल्या घरातले आहेत . त्यांची घरची तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी अतिशय चांगली आहे . त्यांना उत्तम करीयर्स आणि व्यवसाय आहेत . परंतु तरीही त्यांनी ही बदनामी आणि हा प्रचंड त्रास अंगावर घेतला , ज्यातून त्यांना काहीही आथिर्क किंवा इतर कोणत्याच प्रकारचा फायदा होणार नाही . तात्काळ कोणती सत्तापदंही मिळणार नाहीत . नेता म्हणून आणि एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून मलाही या साऱ्या संघर्षाचा कोणताच व्यक्तिगत फायदा होणार नाही , हे सारं माहीत असूनही या संघर्षाला मी प्रवृत्त का झालो ?

संपूर्ण महाराष्ट्रातल्या समज असलेल्या जनतेसाठी मी हे लिहीत आहे . महाराष्ट्रात येणाऱ्या यूपी - बिहारमधल्या सर्व भय्यांना आपण इथे महाराष्ट्रात राज्य करण्याकरताच येतो आहे असे वाटत असते . एखाद्या प्रांतातल्या जनतेला तिची स्वत : ची भाषा असते . तिची समृद्ध अशी संस्कृती असते . पाहुणा जेव्हा येतो तेव्हा यजमानाकडून जशी आतिथ्यशीलतेची अपेक्षा असते , तशी पाहुण्याकडून यजमानाच्या घराशी , त्याच्या संस्कृतीशी समरस होण्याची अपेक्षा असते . उत्तर प्रदेश , बिहारमधला साधा माणूस असो , नेता असो , पत्रकार असो , शिक्षणासाठी येणारा विद्याथीर् असो , नट असो , वा मच्छीमार असो - तो तिथे त्या राज्यांमध्ये त्याच्यावर फाके मारण्याची वेळ तिथल्या नेत्यांमुळे आलेली असते म्हणून इथे महाराष्ट्रात येतो - पण इथे आल्यावर त्याची स्टाइल बदलते . इथली भाषा तो शिकत नाही . इथल्या संस्कृतीला , स्थानिक माणसाला तो तुच्छ लेखतो , त्याच्यावर दादागिरी करतो . एखाद्या यूपी - बिहारच्या रिक्षा - टॅक्सीवाल्यापासून ते सिनेमानटांपर्यंत हा अनुभव आपल्याला पुन : पुन्हा येत असतो . आपण आपल्या मराठी संस्कृतीनुसार त्याला उदार सहिष्णूपणे पुन : पुन्हा माफ करतो . विसरून जातो . असं बंगाली , पंजाबी , उडिया , आसामी किंवा तामिळ माणूस कधीही करणार नाही . कारण या भाषिकांची भाषिक आणि सांस्कृतिक उद्दिष्टं अतिशय तीक्ष्ण आहेत आणि त्याबाबत ते सतत सावध असतात . परंतु आपण सहिष्णू आहोत .

आजही सहिष्णुता हा मला गुणच वाटतो . सर्वच अमराठी माणसांशी असा संघर्ष करण्याच्या बाजूचा मी नव्हतो आणि नाही . परंतु यूपी - बिहारमधल्या भय्यांनी हा संघर्ष आमच्यावर लादलेला आहे . सैन्यात मराठा बटालियनमध्ये ' मराठा ' ( म्हणजे महाराष्ट्रीयन ) या शब्दाची फोड ' मरता लेकिन हटता नही वो मराठा ' अशी केली जाते . यापूवीर् हात जोडून या यूपी - बिहारवाल्यांना मी महाराष्ट्रातल्या मराठी माता - बांधवांच्या वतीने अनेकदा सांगितलेलं आहे की , इथल्या संस्कृतीने तुम्हाला सतत खूप दिलेलं आहे , तेव्हा या संस्कृतीचं रक्षण , संवर्धन आणि आदर करणं तुमचं कर्तव्य आहे , असं जाहीर भाषणांत आणि खासगी चर्चांत सांगितलं . परंतु यांची मगुरी इतकी आहे की , उत्तर प्रदेश - बिहारमधून तिथल्या जनतेची पूर्ण वाताहत करून गब्बर झालेले अमरसिंह , मुलायमसिंह आणि तत्सम इतर अनेक नेते इथे बोलावून घेऊन इथल्या मराठी जनतेला राज्यघटना आणि देशप्रेम ' शिकवण्याचे ' प्रयोग इथल्या यूपी - बिहारवाल्यांनी सुरू केले . एवढेच नव्हे , तर हिंदी भाषा आणि हिंदी संस्कृती मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रावर लादण्यासाठी दादागिरीची भाषा सुरू केली .

महाराष्ट्रातल्या बहुतेकांना खरंतर हिंदी भाषा येतेच . पण मराठी ही इथली राजभाषा आहे . तिला घटनेने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला आहे . शिवाय , स्वत : ची भाषा - संस्कृती वाढवण्यासाठी आणि अनिवार्य करण्यासाठी भाषावार प्रांतरचना झालेल्या राज्यातल्या जनतेला यूपी - बिहारमधल्या भय्यांची परवानगी घेण्याची गरज आहे का ? या भय्यांनी चक्क मुंबई महापालिकेत हिंदी अनिवार्य करण्याची मागणी करून मराठी मागे रेटण्याचे प्रयत्न सुरू केले . महाराष्ट्रात छट पूजा , उत्तर प्रदेश स्थापना दिवस , राजकीय बळ दाखवण्याकरिता , जोराने साजरे करायला सुरुवात केली . रिक्षा असो , टॅक्सी असो , रस्ते असोत , इमारती असोत , सोसायट्या असोत , वर्तमानपत्रं असोत , चॅनल्स असोत , मच्छिमारी असो , सिनेमे असो - सर्वत्र या यूपी - बिहारवाल्या भय्यांची बेबंद दादागिरी महाराष्ट्रात सुरू झाली . तेव्हा लक्षात आलं की , यांच्याशी हात जोडून बोलण्याचे दिवस संपले . आता यांना हात सोडून सामोरं जायला हवं . म्हणून मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात यूपी - बिहारवाल्यांच्या सांस्कृतिक व राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध संघर्ष सुरू केला . महाराष्ट्रात राहायचं असेल तर महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रीयनांच्याच जीवनपद्धतीप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांना जगावं लागेल . महाराष्ट्राशी त्यांना जुळवून घ्यावं लागेल . हे झालं नाही तर महाराष्ट्रात अराजक माजेल .

महाराष्ट्रात जी कायदा - सुव्यवस्था आहे , महाराष्ट्रात ज्या विकासाच्या संस्था आहेत , त्यांचा फायदा देशभरचे लोक घेत असतात . ती संस्कृतीच उखडून टाकली , तर इथे जौनपूर - आझमगढसारखीच परिस्थिती निर्माण होईल . राजाभय्या , अमरसिंह , लालू , पासवानांसारखे लोक महाराष्ट्राचा कब्जा घेतील . हे केवळ मी म्हणतोय असं नव्हे , तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभाध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आमचं आंदोलन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये ' महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अमराठी झाले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही ,' असे उद्गार काढले . आता कुपेकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्हेत . परंतु ही सार्वत्रिक भावना आहे . मराठी जनतेत , मराठी नेत्यांमध्ये , मराठी नटांमध्ये , सर्व महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांमध्ये या यूपी - बिहारवाल्यांबद्दल चीड आहे . मी आणि माझा पक्ष फक्त वाईटपणा घेऊन त्यांचं प्रतिनिधित्व करतो . नागड्याला नागडं म्हणण्याचं साहस कुणीतरी सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन केलं पाहिजे . ते साहस मी करतो आहे . परिणामांची पूर्ण कल्पना करून . एकेकाळी तेच साहस प्रबोधनकारांनी केलेलं होतं . आचार्य अत्र्यांनी केलेलं होतं . बाळासाहेबांनी केलेलं होतं . खुद्द कुसुमाग्रजांनी केलेलं होतं .

कित्येकजण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या आंदोलनाची तुलना शिवसेनेची स्थापना झाली तेव्हाच्या सुरुवातीच्या आंदोलनांशी करतात . परंतु भावना काही प्रमाणात तशीच वाटली तरी दोन्हींमध्ये फरक खूप आहे . तेव्हाचं ते आंदोलन हे गरीब मराठी माणसाचं , प्रामुख्यानं नोकऱ्यांसाठीचं आंदोलन होतं . इतर विषय त्याला नंतर चिकटत गेले . आज माझं आंदोलन हे उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक आणि राजकीय दादागिरी आणि गुंडगिरीविरुद्ध आहे . त्यांच्याकडे उत्तरेतून येणारे गुंड नेते , त्यांच्यामार्फत येणारे प्रचंड प्रमाणातले चलन , शस्त्रास्त्रं आहेत . इथे त्यांचं मग्रुर मनुष्यबळ वाढवण्याच्या प्रयत्नात ते असतात . भय्या टॅक्सीवाला , रिक्षावाला , मच्छीमार हा गरीब बिचारा उत्तरेतून आलेला असं चित्र भय्यांची लॉबी असलेली चॅनल्स उभी करतात . परंतु त्यांना रोजच्या जगण्यात एकेकटा स्थानिक मराठी माणूस भेटतो , त्यांच्याशी व्यवहार करतो , तेव्हा त्यांची खास उत्तरेतली मगुरी , महाराष्ट्राबद्दलचा त्यांचा द्वेष , उत्तरेतल्या गुंडांवरची त्यांची श्रद्धा या साऱ्याचं आपल्याला दर्शन होतं . त्यामुळे ' तो गरीब बिचारा पोटासाठी येतो ' अशा वाक्यात यांचं वर्णन होऊच शकत नाही .

राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्धची ही आमची लढाई कितीतरी अवघड आहे . ती एकपदरी नाही , बहुपदरी आहे . महाराष्ट्रात आज राज्य कोणत्याही पक्षाचं असो . यूपी - बिहारमधले त्या त्या पक्षाचे नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अतिशय मग्रुरीने ' व्हाया दिल्ली ' चेपू इच्छितात . हा महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे . प . बंगाल , तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओरिसा , आसाम , केरळच्या बाबतीत हे होऊ शकत नाही . कारण तिथली जनता या भय्यांच्या गुंडगिरीबाबत अतिशय सावध आहे . स्वत : च्या सांस्कृतिक आणि भाषिक राजकीय अस्मितेविरुद्ध एकही शब्द ते सहन करत नाहीत . पण महाराष्ट्राची स्थिती तशी नाही .

आज मराठी माणूस समृद्ध आहे . त्याची आज जागतिक बाजारात पत आहे . दीपक घैसास , आशुतोष गोवारीकर , सचिन तेंडुलकर आणि यासारखे अनेक दिग्गज मराठी आज बाजारपेठेत वेगवेगळ्या क्षेत्रांत आपलं अस्तित्व दाखवत आहेत . आज परप्रांतीय मराठी माणसांकडे नोकऱ्या करत आहेत . हा बदल स्वागतार्ह आहे . पण राजकीय आणि सांस्कृतिक सावधपणाविना तो व्यर्थ जाऊ शकतो . या जाणिवेनेच मी आणि माझा पक्ष रस्त्यावर उतरलेलो आहोत .

एकेकाळी , म्हणजे बाळासाहेब पूर्णपणे कार्यरत असताना शिवसेना पक्ष मराठी माणसांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा . तेव्हा तो माझाही पक्ष होता . तेव्हाही मी मराठी राजकीय वर्चस्वाचा मुद्दा लावून धरलाच होता . बिहारींविरुद्धचं माझं आंदोलन त्यावेळचंच . त्यामुळे माझ्या नव्या पक्षाच्या नव्या अजेंड्यात हा मुद्दा सामील झाला आहे असं अजिबातच नाही .

आता या भयानक परिस्थितीमुळे मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपलं राजकीय आयुष्य आणि सांस्कृतिक पुण्याई जुगारावर लावण्याचा निर्णय घेतला आहे . आपल्यातलेच काही मराठी मला अाणि माझ्या सहकाऱ्यांना शिव्याशाप देत आहेत . पण त्यांची मुलं - नातवंडं पुढे मला दुवा देतील . कविता , पुस्तकं , संस्कृती , अहिंसा , सहिष्णुता मलाही कळते . नवनिर्माणाच्या विकास कामांसाठी , विकासदृष्टीसाठी मी अकादमीच ( पुण्यात ) सुरू केलेली आहे . ज्या शिवाजी पार्कवर परवा स . पा . ने बिहारच्या आणि उत्तरेतल्या गुंडगिरीच्या भाषा केल्या , तिथे मीच मराठी काव्यवाचन आणि मराठी पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं . त्यामुळे मराठी सुसंस्कृतपणा आणि सहिष्णुता मलाही कळते . पण मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी कविता टिकेल . मराठी भाषा टिकेल , तेव्हा मराठी संस्कृती टिकेल . मराठी संस्कृती टिकेल , तेव्हा अस्सल मराठी राजकारण टिकेल . शेवटी रस्त्यावरचा संघर्ष कुणालाच प्रिय नसतो . पण आत्मरक्षणासाठी आणि संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो . तसं नसतं तर शेजाऱ्यांच्या सद्सदविवेकबुद्धीवर विश्वास ठेवून देशांनी सैन्य ठेवणं बंद केलं असतं आणि शेजारी राज्यांच्या प्रेमाखातर सर्व राज्यांत पोलिसदलही ठेवलं नसतं . संघर्ष करताना रक्त , घाम , अश्रू द्यावेच लागतात . पुढे ते संघर्ष यशस्वी झाल्यावर लोकप्रिय होतात !

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी आल्यावर स्वत : भारताचे पंतप्रधान शिखांच्या पगडीवर फ्रान्समध्ये असलेल्या बंदीवर रदबदली करतात . करुणानिधी मलेशियातल्या तामिळंासाठी मलेशियन सरकारशी वाग्युद्ध करतात आणि मग भारत सरकारला त्यात रदबदली करावी लागते . दमदमी टाकसाळमध्ये अकाली दलाच्या पुढाकाराने अतिरेकी जनेर्लसिंग भिंदनवाले याचा संत म्हणून फोटो लागतो . इंदिराजींच्या हत्येला कारणीभूत ठरणाऱ्या या संताबद्दल देशात अवाक्षरही निघत नाही . राजीव गांधींच्या हत्येला सरळ कारणीभूत असणाऱ्या एलटीटीईशी तामिळनाडूतील बहुतेक सर्व राजकीय पक्ष तामिळ मुद्द्यावर थेट संबंध ठेवून असतात . गांगुलीला टीममधून काढल्यावर पं . बंगालमधले कम्युनिस्ट बंगाली बनून आक्रमक होतात . हे सारं प्रांतवादी आणि सांस्कृतिक नाही ? मुंबईत चालणारे सर्व हिंदी चॅनल्स आणि त्यांचे पत्रकार महाराष्ट्राविरुद्ध विष ओकत यूपी - बिहारची वकिली करतात , ते प्रांतवादी नाहीत ? अमिताभ बच्चन स्वत : ला ' छोरा गंगा किनारेवाला ' मानतो . ते प्रांतवादी नाही का ? मी आणि माझ्या पक्षाने मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मिता यावर बोललं वा कृती केली की मी गुंड ठरतो ? हा मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे .

अमिताभ बच्चननी त्यांच्यासाठी मरमर मरून काम करणाऱ्या सावंत नावाच्या मेकअपमनच्या मराठी , भोजपुरी चित्रपटांत दयेने काम केलं , तर ते जणू काही महाराष्ट्रावर उपकारच करताहेत , असं दाखवलं जातं . त्यांचा मेकअपमन जरी गांगुली , सुब्रम्हण्यम , मिश्रा कुणीही असता तरी ते असेच वागले नसते काय ? त्याच्यात त्यांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध काय ? ते तन , मन , धनाने उत्तर प्रदेशचेच आहेत . त्यांनी जे मिळवलं ते इथे , हेही सत्य नाही का ?

फक्त मी माझ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिलो तर गुन्हेगार ठरतो ? राज्यघटनेत असं लिहिलंय का ?

मी इथे एकच पुन्हा सांगू इच्छितो . सर्व जग जरी विरोधात गेलं तरी मी आणि माझी संघटना मराठी भाषिक जनता , महाराष्ट्र संस्कृती , मराठी भाषा यासाठीच लढत राहू . यूपी - बिहारवाल्यांची महाराष्ट्रातली दादागिरी आणि गुंडगिरी आम्ही मोडून काढूच . मला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला एवढंच सांगावंसं वाटतं की , जर मी तुमच्या मनातलंच बोलत असेन तर बघता काय ? सामील व्हा !

आपण विजयी होऊच ; कारण कोणताही कायदा , कोणतंही युद्ध , कोणताही माणूस पेटलेल्या मराठी मनांना थोपवू शकतच नाही . माझ्यावर विश्वास ठेवा . माझ्या मराठी माता - भगिनी - बांधवांनो , विजय तुमचाच आहे .

जय महाराष्ट्र !

भावना योग्य मार्ग चुकीचा

असेच म्हणावेसे वाटते.

-- आजानुकर्ण

+१

भावना योग्य मार्ग चुकीचा

+१

स्वतंत्र पुणे

ही चर्चा वाचून आमचे हार्ट ट्रान्सप्लांट झाले आहे. पुण्याबाहेरच्या लोकांनी पुण्यात येऊन मराठी भाषा बिघडवली आहे. (कोण रे तो आम्ही इंग्रजी शब्द वापरतोय म्हणून ओरडला? बाजूला घ्या जरा त्याला!) यासाठी एकच उपाय. स्वतंत्र पुणे झालेच पाहिजे. यासाठी मुंबईतील टाटा, अंबानी यांची सर्व मालमत्ता जप्त करून पुण्यातील लेले, साने कंपनीला देण्यात यावी. (म्हणजे ती वाढणार नाहीच, पण एक कपर्दिकही खर्च होणार नाही!) पुण्यात येण्याआधी सर्वांनी मराठीची परिक्षा देणे अत्यावश्यक आहे. जे या परिक्षेत नापास होतील त्यांना चितळ्यांची बाकरवडी एक वर्ष खाता येणार नाही. नंतर खायची असल्यास पुन्हा परिक्षा द्यावी लागेल.

स्वतंत्र पुणे झालेच पाहिजे. स्वतंत्र पुणे झालेच पाहिजे. स्वतंत्र पुणे झालेच पाहिजे. स्वतंत्र पुणे झालेच पाहिजे.

अवांतर : ५० प्रतिसादांवर ही आयडीयाची कल्पना. पहिल्या पानावरच्या एखाद्या प्रतिसादाला प्रतिसाद द्यावा म्हणजे तुमचा प्रतिसाद पहिल्या पानावर तरंगत राहील.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

सहमत/असहमत

वरील प्रतिसादांशी काही अंशी सहमत आहे. मुद्दा हा की गंभीर प्रश्नांबाबत दांडगाई हे एकच उत्तर आहे का? यापेक्षा विधायक मार्गाने गेलात तर जास्त साध्य होणार नाही का? पण ज्याप्रमाणे अमेरिकेला वाटाघाटीच्या मार्गाने कुठलाही प्रश्न सोडवायचा नसतो, त्याचप्रमाणे या पक्षांना आंदोलन, जाळपोळ हाच मार्ग दिसतो.
'भावना योग्य मार्ग चुकीचा' याच्याशी सहमत आहे. पण हा मार्ग का पत्करला जातो? कारण यात प्रसिद्धी जास्त असते. दुसरे, समजा लोकांना चिथावण्याच्या दृष्टीने ही वक्तव्ये केली गेली नव्हती. पण आपल्या वक्तव्यांचा वेगळा अर्थ लावला गेला, तर लोक कापरासारखे पेटून उठतात हे या नेत्यांना माहित नाही का? वक्तव्य करण्याचा हेतू वेगळा असेल, पण मुंबईत झालेल्या राड्याची जबाबदारी कोणाची? आणि यामुळे मराठी माणसाचा प्रश्न सुटायला कसा हातभार लागणार आहे?
असे प्रश्न विचारण्याला जर खेकडावृत्ती म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. लोकशाही आहे.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

मूळ् कारण

बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांनी फक्त नेत्यांची पैदास करण्याव्यतिरीक्त काही केले नाही. नेते तेही असे की ज्यांनी स्वतःच्या तुंबड्या भरण्याशिवाय दुसरे काही केले नाही. शिक्षण आणि रोजगार निर्मिती मध्ये थोडा जरी प्रयत्न त्यांनी केला असता तर आज इकडून तिकडे नाईलाजास्तव स्थलांतराचे प्रश्न आले नसते.
उदाहरणार्थ जरा ह्यावर नजर टाका:
http://www.bihareducation.net/EducationProfile/
http://www.maharashtraeducation.net/EducationProfile/

गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्रातील तालुका पातळीची गावे कुठे आहेत आणि उत्तर प्रदेश, बिहार मधली गावे कुठे आहेत याचे विश्लेषण व्हावे.
किंबहुना उ आणि बि मध्ये राहून आलेल्या लोकांची मते ऐकायला आवडतील.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

दुर्दैव

दुर्दैव हे आहे की, या नेत्यांची राष्ट्रीय राजकारणावर सुद्धा घट्ट पकड आहे. हे नेते राष्ट्रीय राजकारणात इतके प्रभावी का आहेत आणि महाराष्ट्राचे का नाहीत? याचे सुद्धा विश्लेषण व्हावे.

मुंबई केंद्रशासित करावी

मुंबई आधी भारताची आहे मग महाराष्ट्राची. मुंबईमुळे फक्त महाराष्ट्राचे भले व्हावे हा बालहट्ट सोडायला हवा. मुंबईला खरोखर जागतिक स्तरावरील शहर बनवायचे असेल तर अश्या क्षुल्लक प्रादेशिक उबळींना टाळले पाहिजे आणि मुंबईला केंद्रशासित किंवा स्वतंत्र राज्य केले पाहिजे. मुंबईवर फक्त मराठी माणसाचा अधिकार आहे हा शुद्ध पोरकटपणा आहे.
आपला
(परखड) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

तीव्र विरोध..

वासुदेवा,

आणि मुंबईला केंद्रशासित किंवा स्वतंत्र राज्य केले पाहिजे.

तुझ्या वरील वाक्याचा मी तीव्र निषेध आणि विरोध करतो! मुंबईत भले सगळ्या देशभरातील माणसे येऊन राहात असतील, उद्योगधंदे करत असतील, तरीही मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या राजधानीचे शहर म्हणूनच केवळ आणि केवळ मुंबई ओळखली जावी असे माझे स्पष्ट मत आहे..

आपला,
(परखड) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

तीव्र विरोध..+१

तुझ्या वरील वाक्याचा मी तीव्र निषेध आणि विरोध करतो! मुंबईत भले सगळ्या देशभरातील माणसे येऊन राहात असतील, उद्योगधंदे करत असतील, तरीही मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या राजधानीचे शहर म्हणूनच केवळ आणि केवळ मुंबई ओळखली जावी असे माझे स्पष्ट मत आहे..

मी पण निषेध करत आहे. माफ करा वासुदेवराव पण, "करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगीसी" असे आपले विचार वाटले.

बरं तात्पुरते वासुदेवरावांच्या बालहट्टापोटी मुंबई केंद्रशासीत करण्याला मान्यता देऊ ... मग विचार येतो, मुंबई कुठपर्यत धरायची? - नव्या मुंबईचे काय? ठाण्याचे काय? अगदी पुण्याचेपण काय? सर्वत्र सामान्य मराठी जनतेला आणि मराठी भाषेला बाहेरून येणारे कमी लेखतात (अर्थात अपवाद आहेतच) आणि दुस्वास करतात.

"तुम्हाला मराठी माणसाचा आकस" आहे असे संसदेत विधान करून पहीले अर्थमंत्री चिंतमणराव देशमुखांनी नेहरूंच्या मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यांना ते स्वातंत्र्याच्या पहाटे वाटले (आणि का नाही वाटणार? याच नेहरूंनी शिवाजीला दरोडेखोरांच्या लाईनीत बसवले, आंध्र आणि इतर भाषिक प्रांत निर्माण करताना महाराष्ट्राला मात्र सापत्नपणे वागवले, वगैरे...). आज पण हा अनुभव विशेष करून उत्तरेकडील काँग्रेस आणि कम्युनिस्टांचा येतो. काँग्रेसला तर काय दिल्ली ही गादी आणि तिथून सर्वत्र राज्यकारभार एकछत्री अंमलाने करायचा असली लोकशाही हवी आहे....

आज न्यूयॉर्क ही अमेरीकेची आर्थीक राजधानी असली तरी न्युयॉर्क राज्यातील एक शहर आहे. तिथे काय आणि इतरत्र काय इतरांना येऊन देत असले तरी त्यांची अरेरावी चालवून देत नाहीत.

आज भारतात पण अनेक शहरे कॉस्मोपॉलीटन होत आहेत मग काय ती सर्वच "केंद्रशापीत" करायची? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेस मुंबईत ४८% मराठी होते तर बंगलोरमधे ३२ % कन्नड. तीच संख्या नंतर अनुक्रमे (सुमारे दशकापूर्वी) ३२% आण २१% झाल्याचे वाचल्याचे आठवते. मग बंगलोर का बर कर्नाटकात?

स्वतंत्र महानगरे - कारणमीमांसा

विकासराव, भारताच्या प्रगतीच्या आणि हिताच्या दृष्टीने विचार केल्यास माझ्या मतामागील विचार आपल्याला पटतील. दिल्ली जसे स्वतंत्र राज्य आहे त्याप्रमाणे मुंबईचेही स्वतंत्र राज्य करणे प्रशासकीय आणि विकासाच्या दृष्टीने योग्य आहे. स्वतंत्र राज्य, स्वतंत्र प्रशासन आणि स्वतंत्र अर्थसंकल्प असे झाल्यास मुंबईचा विकास होईल आणि आता जे बकाल स्वरूप आले आहे ते लवकर दूर करण्यात मदत होईल. मुंबईच नाही तर राष्ट्रीय स्तरावर महत्त्व असणार्‍या सर्व शहरांना असे स्वातंत्र्य द्यायला हवे. त्या त्या राज्यांच्या दावणीला बाधल्याने त्यांचा विकास खुंटतो तो खुंटतोच आणि या शहरांव्यतिरिक्त इतर भागांचाही म्हणावा तितका विकास होत नाही.
प्रादेशिक अस्मितेच्या गोंडस नावाखाली स्वार्थी राजकारणी फुटिरतेला खतपाणी घालत असतात. "तुम्हाला क्षक्षक्ष माणसाचा आकस" असे प्रत्येक राज्यातील माणसांना वाटत असते पण क्षणिक उद्दीपन बाजूला ठेऊन थोडा व्यापक विचार केला तर यामागील फोलपणा ध्यानात येईल. महानगरांचे प्रशासन स्वतंत्र केले तर काय फायदे/तोटे होतील यावर तुमची मते जाणून घ्यायला मला आवडेल.

आपला
(विश्लेषक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

स्वतंत्र

नमस्कार वासुदेवराव,

हे उत्तर मी मराठी-अमराठी वाद तुर्तास बाजूला ठेवून केवळ स्वतंत्रराज्य या संकल्पनेबद्दल लिहीत आहे.

आपण सुरवातीस म्हणालात की मुंबई केंद्रशासीत करावीत म्हणून ज्याला माझ्यासकट अनेकांनी विरोध दर्शवला. नंतर वरती आपण दिल्लीप्रमाणे मुंबईस स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला पाहीजेत असे म्हणालात. आपल्याला माहीत असेलच की दिल्ली ही आधी केंद्रशासीतच होती, पण नंतर तीला स्वतंत्र राज्याचा दर्जा, मला वाटते साधारण दहा-एक वर्षांपूर्वी दिला गेला. तो देण्याचे कारण असेच होते की केंद्रसरकारच्या अखत्यारीत राहील्याने तिच्या विकासाकडे दुर्लक्ष होत होते. तीच अवस्था पॉडेचारीची, गोवा-दिव-दमणची होती. त्यातील गोव्याचे केंद्रशासीत प्रदेशांमधून वगळून स्वतंत्र राज्य झाले. चंडीगढ ही दोन राज्यांची राजधानी आहे आणि तरीपण केंद्रशासीत आहे. थोडक्यात धेडगुजरी अवस्था आहे. थोडक्यात केंद्रशासीत असल्यावर यातील कुठलेच शहर सुधारले अशातला भाग नाही. केंद्रशासीत अर्थात सेंट्रलायझेशन ह्या गोष्टिस माझा विरोध आहे. केंद्र सरकारने कमीत कमी ढवळाढवळ राज्यांमधे आणि राज्यांनी स्वायत्त संस्था - स्थानीक स्वराज्य संस्थांमधे करणे जरूरीचे आहे.

आज मुंबईच काय पण कुठल्याही शहराची दुर्दशा होण्याचे प्रमुख कारण हे विकेंद्रीककरण नसणे हे आहे. दुसरा भाग मुंबईच्या बाबतीत असा आहे की तेथून जितका कर गोळा केला जातो त्याच्यातला फारच कमी परत विकासासाठी केंद्राकडून मिळतो. बरं मिळतो ते परत राज्यसरकारकडून... म्हणजे कुठल्याही भागाचा विकास होण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानीक राजकारणाला तोंड द्यावे लागते. सगळ्याच हातबट्ट्याचा कारभार!

आपण म्हणाल की मी (म्हणजे आपण) हेच म्हणतोय की, "...त्या त्या राज्यांच्या दावणीला बाधल्याने त्यांचा विकास खुंटतो तो खुंटतोच आणि या शहरांव्यतिरिक्त इतर भागांचाही म्हणावा तितका विकास होत नाही." आणि ते बरोबरही आहे. पण त्यावर जे सुचवत आहात (मुंबईसह इतर महानगरांसाठी) ते म्हणजे "रोगापेक्षा इलाज भयंकर" असा प्रकार आहे.

आज अमेरिकेत अनेक महानगरे म्हणता येतील अशी आहेत - न्यू यॉर्क, लॉस एंजल्स, सॅन फ्रॅन्सिस्को, शिकॅगो वगैरे. यातील शिकॅगो , बॉस्टन सोडल्यास इतर शहरे हे कोणत्या न कोणत्या राज्याचा भाग आहेत. शिकॅगो -बॉस्टन पण आहे, पण ती मुंबईसारखी राजधानीपण आहे. पण या शहरांतील तसेच अनेक इतर शहरातील महापौरांना एक्झिक्यूटीव्ह दर्जा असतो. बर्‍याचशा गोष्टी ह्या ते स्वतंत्रपणे करू शकतात आणि त्याचे उत्तरदायीत्व त्यांच्याकडे असल्याने त्यांची राजकीय कारकिर्द त्याला बांधलेली असते (ते अमेरिकन राष्ट्राध्यक्षाप्रमाणे सरळ निवडून येतात). रोजच्या कारभारात राज्य सरकार अजिबात ढवळाढवळ करत नाही की केंद्र सरकारचे आय ए एस अधिकारी (परत राज्यांनी त्यांना हवे ते पाठवलेले) स्वतंत्र सत्ताकेंद्र तयार करत नाहीत. परीणामी जसे नेतृत्व असते तसा विकास घडत जातो. यात परत आपल्या कॉर्पोरेटर प्रमाणे लोकल इलेक्टेड ऑफिशियल्स असतात (वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे असतात) त्यांचा पण सरळ वचक असतो.

आज आपल्याकडे जे बरेच प्रश्न तयार झाले आहेत त्याचे मूळ कारण नेतृत्वाचा अभाव आणि जनतेची स्वतःच्या विकासाबद्दल असलेली उदासीनता हे आहे. ते प्रश्न मुंबई वेगळे करून थोडेच थांबणार आहेत? विचार करा:

मुंबईच्या सीमा कुठल्या? कुठपर्यंत वेगळी करायची?
जे दरोज मुंबईस ये-जा करतात त्यांना ड्युएल टॅक्सेशन (मुंबई आणि महाराष्ट्र) जावे लागणार का?
मुंबईला पाणी महाराष्ट्राने का म्हणून देयचे? ते मग महाराष्ट्रातील जनतेला देता येईल की!
मुंबईचा कचरा कोण घेणार?
जसे मुंबईचे तसेच इतर महानगरांचे

गांधीजी स्थानीक स्वराज्य संस्थांना स्वातंत्र्य असण्याच्या बाजूचे होते. राजीव गांधी पंचायत राज म्हणून ओरडत होते. पण यात निवडणूका वगैरे घेतल्या गेल्या पण त्या व्यतिरिक्त अधिकार जास्त दिले गेले नाहीत. त्यात एक आठवले म्हणून उदाहरण देतो: ठाण्याला (नगरपालीका असताना) पुर्वी नगराध्यक्षांची निवडणूक सरळ होत असे. त्यावेळेस सतीश प्रधान हे शिवसेनेकडून नगराध्यक्ष झाले. ठाणे लहान होते आणि प्रधानांना (तेंव्हा) चांगले करावेसे वाटत होते. परीणामी - दरोज कचर्‍याची गाडी घरापाशी येयची, दुतर्फा झाडे लावली गेली आणि त्यांची निगराणी ठेवली गेली. गडकरी रंगायतन बांधले गेले तसेच तरण तलाव ही आला. हे सर्व झाले कारण राज्य-केंद्र यांची ढवळाढवळ नव्हती आणि राजकीय नेतॄत्वाची सक्रीय इच्छाशक्ती जागी होती, ठाण्यातल्या नागरीकांचा सक्रीय पाठींबा होता. नंतर ठाणे महानगरपालीका झाली , आजूबाजूची खेडी ठाण्यात आणली. सुरवातीस काही वर्षे निवडणूका न करता प्रशासकीय कारभार म्हणजे आय ए एस आणि एमपीएससी अधिकारी म्हणजे केंद्र-राज्य यांची ढवळा ढवळ... मग निवडणूका आणि महापौर निवडण्याचे राजकारण आणि त्यातून निवडून आलेल्या राजकारण्यांना तसे कमी हक्क. त्यात बाळासाहेब म्हणाले की चंद्रशेखरना जे काही करायचे ते करू देत मग काय झाले. एकछत्री अंमल. राम-मारूती रोड वरची झाडे उडवली, एक टुमदार निवासी रस्ता बघता बघता वाटेल तशी दुकाने बांधून आरएम रोड झाला. तिथे उपनगरांतील (विशेष करून पश्चिम) मुले-मुली आइवडीलांपासून लांब म्हणून फिरायला येऊ लागली. रस्ता मोठा झाला पण चालायची सोय राहीली नाही. स्टेशनपासून तास-दीडतास् लांब घरे घ्यावी लागली जिथे आता बिबळे आणि कोल्हे बेघर झालेत. मधे तर असाच एक बिचारा कोल्हा मासुंदा तळ्यावर वाटचुकून आला. त्यामुळे रहदारी वाढली, प्रदुषण वाढले. त्यात मुळचे ठाणेकर उखडले गेले आणि जे नवीन आलेत त्यांना स्वतःच्या चार भिंतींच्या बाहेरचे काही पडलेले नाही अशी अवस्था...हे सर्व काही चांगले नाही.

मग हे सर्व बदलंण्यासाठी ठाण्याचे वेगळे राज्य करायचे का? अर्थातच नाही. त्यासाठी स्थानीक स्वातंत्र्य अधीक हवे, चांगले नेतॄत्व आणि प्रजा हवी. तीच अवस्था मुंबईची आणि इतर शहरांची. ते जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत स्वतंत्र राज्य करा नाहीतर अजून काही, ती बकालच होत राहणार.

मुंबई

मुंबईला खरोखर जागतिक स्तरावरील शहर कशासाठी बनवायचे ? जगाला दाखवायला?

(विचारमग्न) आजानुकर्ण

का नको?

मुंबईला खरोखर जागतिक स्तरावरील शहर कशासाठी बनवायचे ? जगाला दाखवायला?

मुंबई जागतिक स्तरावरील शहर बनू नये असे तुम्हाला का बरे वाटते? मुंबईचा विकास ("जगाला दाखवण्याच्या" निमित्ताने का होईना) होत असेल तर अडचण काय?

आपला
(प्रश्नांकित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

आमची मुंबई

मुंबईला केंद्रशासित किंवा स्वतंत्र राज्य केले पाहिजे. मुंबईवर फक्त मराठी माणसाचा अधिकार आहे हा शुद्ध पोरकटपणा आहे.
असहमत

मुंबईला केंद्रशासीत करायचे... कशासाठी?
मुंबई महाराष्ट्राची आहे.आणि ती महाराष्ट्राचीच असेल.

असहमत

मुंबईला केंद्रशासित किंवा स्वतंत्र राज्य केले पाहिजे

पूर्णतः असहमत!!

-ऋषिकेश

अभिमन्यू की धृतराष्ट्र?

काल राज्यभर मनसेच्या गुंडांनी जो उच्छाद मांडला आहे तो पाहून सदर लेखाचे शीर्षक बदलावे असे वाटते. काल पुण्यात पीएमपीच्या ४५ गाड्यांवर, आणि राज्यभर एस्टी बसेस वर दगडफेक केली आणि त्यांचे नुकसान केले, बरेच 'मराठी' चालक, प्रवासी यात जखमी झाले. मंडई, लक्ष्मी रोड, कोथरूड मधील दुकाने बंद करायला लावली त्यातली ९९% मराठी लोकांची असतील. दुकाने बंद असल्याने इतर 'मराठी' लोकांना त्रास झाला तो वेगळाच. सार्वजनिक मालमत्ता आपल्या तीर्थरूपांची असल्याच्या थाटात जे नुकसान केले हे कोणी भरून द्यायचे?

मराठी बळी

अंबादास हरिभाऊ धाराव ह्या ५५ वर्षाच्या कुटुंबवत्सल मराठी माणसाचा बळी ह्या अतिरेकाने आज घेतला. सार्वजनिक आणि खाजगी दौलतीची किती धूळधाण केली याची गणतीच नाही.

कष्टाची भाकरी खाणार्‍या एका कुटुंबाला -- मराठी असो वा उत्तर भारतीय वा परदेशी -- दु:खाच्या खाईत लोटण्याचा अधिकार कोणालाही नाही.

मराठी एकलव्य

वरं अमराठी मुख्यमंत्री । वरं इटालिअन प्रधानमंत्री । ।
वरं मुंबई केंद्राच्या हाती । न मूर्खजनसंपर्कः मराठीदिल्लीपती । ।

१००% मान्य

एकलव्या,
कष्टाची भाकरी खाणार्‍या एका कुटुंबाला -- मराठी असो वा उत्तर भारतीय वा परदेशी -- दु:खाच्या खाईत लोटण्याचा अधिकार कोणालाही नाही.

सहमत आहे.
(जोवर कुणी आरेरावी करून त्रास देत नाही तोवर) हे मान्यच आहे... सहमत आहे! पण प्रश्न माजलेल्या भय्यांमुळे /लोकांमुळे निर्माण झाला आहे. दुर्दिवाने सामन्य लोक भरडले जात आहेत.
-
आपला
गुंडोपंत

प्रश्न

>> पण प्रश्न माजलेल्या भय्यांमुळे /लोकांमुळे निर्माण झाला आहे. दुर्दिवाने सामन्य लोक भरडले जात आहेत.

सध्याचा प्रश्न माजलेल्या उत्तरभारतीयांमुळे नाही, माजलेल्या काही मराठी लोकांमुळे निर्माण झाला (केला गेला?) आहे. त्यात सर्वसामान्य लोक , बहुसंख्येने मराठीभाषिक, भरडले जात आहेत हे बाकी खरे.

च्यामारी

च्यामारी!!!
भय्यांचे इतके प्रेम असेल तर घेऊन जा ना भो आपल्या घरी!!
आमच्या अंबड सातपूर लिंकरोड वरचे भंगारवाले भय्ये!
एकदा जाऊन बोलून तर पहा कसे गुरगुरतात ते. जसे काही तुम्ही त्याचे१० पीढ्यांचे कर्ज घेवून पळाला आहात...
आत तर ते तिथल्याच शेतकर्‍यांच्या जमीनी बळकावयाच्या मागे आहेत गुंडगीरीवर. भाडे तर लांबच राहिले जागेचे!

शिवाय चोर्‍या इतक्या वाढल्या आहेत की विचारू नका. पोलिस म्हणतात अहो इत्के भय्ये या गुन्हेगारीत आहेत की कसे पकडायचे हाच प्रश्न झाला आहे. आम्हाला शक्यच नाही... येणारे काही चांगले लोक येत नाहीत... चोर गुन्हेगार पळून इकडे येतात हे लक्षात घ्या!

पण इतके कशाला? जा बाबा नवीना त्या सगळ्यांना आपल्या घरी ठेव! लगेच घेवून जा...
ज्याचं जळतं त्याला कळतं!

आपला
गुंडोपंत

हमम...

>> एकदा जाऊन बोलून तर पहा कसे गुरगुरतात ते. जसे काही तुम्ही त्याचे१० पीढ्यांचे कर्ज घेवून पळाला आहात...
>> आत तर ते तिथल्याच शेतकर्‍यांच्या जमीनी बळकावयाच्या मागे आहेत गुंडगीरीवर. भाडे तर लांबच राहिले जागेचे!

हीच स्थिती बर्‍याच भागात आहे आणि तिथे असे गुरगुरणारे मराठी आहेत. मग्रुरी, गुंडगिरी ही काही एका समुदायाच्या लोकांची मक्तेदारी नाही. सगळ्या उत्तरभारतीयांना परत पाठवले तर महाराष्ट्रात गुंडगिरी राहणार नाही अश्या स्वप्नील दुनियेत तर वावरत नाही ना आपण?

>> ज्याचं जळतं त्याला कळतं!

हो खरंच आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी सार्वजनिक संपत्तीचा विध्वंस पाहिला, बसेस वर दगडफेक, दुकानदारांना दमबाजी, मारहाण होताना पाहिली आणि हे सर्व करणारे असेच गुरगुरत होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे करणारे लोक मराठी होते! कमाल आहे नाही?

परत तेच सांगतो

बरोब्बर हा भाग वगळला होता म्हणून परत सांगतो.

"च्यामारी!!!
भय्यांचे इतके प्रेम असेल तर घेऊन जा ना भो आपल्या घरी!!"

सहमत

गुंडोपंतांशी सहमत

यांच्या नोकर्‍यांची जबाबदारी यांचे 'नेते' म्हणवणारे दिवटे उचलायला तयार नाहीत.म्हणून हे चंबूगबाळं महाराष्ट्राच्या गळ्यात का? घटनेच्या अधिकाराचे दाखले देणार्‍यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले आहे काय?यांच्या भूमीपुत्रांना स्वतःच्या भूमीतच नोकर्‍या देण्याची यांची जबाबदारी नव्हती काय?
बस फोडण्याचा जो काही उद्योग केला ते आम्हालाही पटले नाही,पण यात फक्त मनसेचेच कार्यकर्ते होते असे नाही.राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कित्येक कार्यकर्त्यांनी या निमीत्ताने 'वाहत्या गंगेत हात धुवून घेतला.'(हे आमच्या अनुभवावरुन सांगत आहोत.)

महाराष्ट्रात राहून 'उत्तर प्रदेश दिन' साजरा करणारे जर निष्पाप असतील,तर महाराष्ट्रभूमीत महाराष्ट्रप्रेमाची अपेक्षा करणारे आम्ही 'प्रांतीयवादी' कसे?

स्वतंत्र महाराष्ट्र व परिक्षा

मराठी माणसांचा
स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र स्वतंत्र
स्वतंत्र महाराष्ट्र !!

याला काहीच पर्याय नाही हेच सत्य आहे!

मुंबईत यायला पासपोर्ट किंवा तत्सम काही लागावे
तसेच वापरातल्या मराठीची परिक्षा देणे गरजेचे व्हावे!

आपला
गुंडोपंत

पुल एक आठवण :)

"मुंबई बाहेरच्या लोकांनी येऊन मुंबईची मराठी बिघडवली.. 'चाय पिली' याऐवजी 'चहा घेतला' असं म्हणू लागली :)))" : इति पुलं ;)

प्रकाटाआ

अनावश्यक प्रतिसाद हटवला आहे.

च्यामारी!

च्यामारी
म्या म्हनु र्‍हायलो ना का फकस्त वापरातली... आता माजीच चड्डी कशापायी वडु लागले तुमी?

आपला
गुंडोपंत

नापास?

नापास हा ना धड मराठी शब्द ना धड इंग्रजी. अनुतिर्ण म्हणायला हवे होते. असो. तुम्ही काही परीक्षेचे पुरस्कर्ते नसल्याने "पमोटेड"! (आमच्या गावाकडचे एक आमच्या आधीच्या पिढीचे मास्तर हे पास आणि प्रमोटेड च्या ऐवजी पमोटेड म्हणायचे)

छे

छे!
माझी व्याकरण विषयक मते व त्याचे ज्ञान जगाला माहीत आहेत.
पण मी हे मराठीतूनच लिहितो आहे... 'म्हंजे' वापरातली मराठी मला येते म्हणून मला राहु दिले जावे.

मुंबई बेळगावसह स्वतंत्र महाराष्ट्र झालाच पाहिजे!
आपला
गुंडोपंत

जर...

जर इतर राज्यांचे पण लहान भाग झाले तर आपण म्हणता ती कल्पना योग्य ठरू शकेल. आज महाराष्ट्र उद्या इतरांचे बघू असे चालणार नाही....

पण तरीही ती (कल्पना) यशस्वी आणि व्यावहारीक ठरण्यासाठी केंद्राचा पगडा हा कमीतकमी असण्याची आणि अजून बर्‍याच काही सुधारणांची आवशक्यता राहील. नाहीतर लहान राज्ये म्हणजे केंद्राच्या जहागिर्‍या ठरतील आणि परत एकदा देशांतर्गत शकलांनी पारतंत्र्याची नांदी होईल.

शीला जी

दिल्ली: दोन राज्ये. मदनलाल आणि सुषमा ह्यांची..

शिला दिक्षीतांनी काय घोडे मारलयं म्हणून त्यांचे नाव यात नाही?

तसेच १०० शकले करायला तुम्ही वेताळ झालात तरी भारत काही तसा विक्रमादित्य होणार नाही!

नविन स्वाक्षरी!

महाराष्ट्राचे पाच भाग करावेत का? नको? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला?

ही कशी वाटतेय? :)

स्वातंत्र्य आणि परीक्षा

मराठी माणसांचा स्वतंत्र महाराष्ट्र, मग उद्या मूळ (?) मुंबईकरांची स्वतंत्र मुंबई का नको?
आणि बेंगळूरू, हैद्राबाद, चेन्नै मध्ये गेलेल्या मराठी लोकांनी कानडी, तेलुगु, तमिळ भाषेच्या परीक्षा द्याव्यात का?

 
^ वर