अभिमन्यू एकाकी पडलाय
शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत झालेल्या राड्याला अनेक पदर आहेत.ऐन थंडीत स्वतःची पॉलीटिकल पोळी शेकण्यासाठी होळी पेटवली कोणी आणि त्यात भाजले कोण? त्या होळीवर पाणी टाकले कोणी आणि त्यात पेट्रोल ओतून भडकण्याचा प्रयत्न केला कोणी?हे निट तपासले तर मराठी माणसाचे महाभारत लढण्यासाठी अभिमन्यू बनून राजकारणाच्या चक्रव्यूहात शिरलेल्या राज ठाकरे यांना आपले कोण आणि शत्रू कोण याची जाणीव होईल आणि त्यातून मनगटापेक्षा मेंदूने मुंबईची लढाई कशी लढायची याचे मार्गदर्शन मिळेल.
कौरवांच्या चक्रव्यूहात शिरलेला अभिमन्यू पराभूत झाला.कारण त्याला चक्रव्यूहात शिरण्याची पद्धत माहित होती,पण बाहेर पडण्याची माहित नव्हती.त्यामुळेच तो फसला.
उत्तर भारतीयांच्या प्रांतवादाच्या तमाशाला डिवचून राज ठाकरे यांनी मूलतः अशिक्षीत,असंस्कृत,तसेच भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या जोरावर राजकारण चालवणार्या उत्तर भारतीयांचे आग्यामोहोळ अंगावर ओढून घेतले आहे.अशा वेळी 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' अशा पद्धतीने न्याय आणि सत्य कोठे आहे आणि अन्याय असल्याच्या रणगाडा कोण रेटत आहे,हे निपक्षपातीपणे मांडण्याचे कार्य प्रसारमाध्यमांनी करायला पाहिजे होते,परंतू दूर्दैवाने 'इस्टंट न्यूज' दाखवणार्या वॄत्तवाहिन्यांना आज जास्त महत्व प्राप्त झालेले आहे.त्यांनी स्वतःचे कर्तव्य विसरून आपण स्वतः मराठी नसल्याने मराठी माणसांविरूद्ध कुटील पद्धतीने जेवढे काही गरळ ओकता येईल ती ओकली. आणि एकाच दिवशीच्या मारपिटीच्या प्रसंगाची चित्रफित दूसर्या दिवशीही दाखवत राहून मुंबईतील उत्तर भारतीय लोकांना दंगलीची चिथावणी देण्याचे हीन कृत्य केले.
एका वाहीनीतील बाळकृष्ण नावाच्या दिल्लीत बसून मल्लिनाथी करणार्या समालोचकाने आपली अक्कल पाजळून सांगीतले,'राज ठाकरे यांच्या पार्टीत (मनसे) दमच नाही.त्यांचे मुंबईत ७,पुण्यात ८ आणि नाशिकमधे १२ नगरसेवक आहेत',पण त्याने हे सांगीतले नाही की,स्थापनेपासून ३६५ दिवस पूरे होण्याच्या अल्पावधीत मनसेने हे यश कमावले आहे.मुस्लिमांची १० लाखांपेक्षा जास्त एकगट्ठा मते असूनही मुंबईत समाजवादी पार्टीला एकपेक्षा जास्त नगरसेवक ७ वर्षात का बनवता आला नाही?'
आपल्या फाटक्या तोंडाने ऊठसूठ आगी लावणार्या अमरसिंहापासून अबू आझमी(सिमीशी संबंधीत असल्याचा आरोप असणारा,दाऊदबरोबर चित्रफितीत दिसणारा) आणि कृपाशंकरपासून संजय निरुपमपर्यंत सर्व तोंडाळांची वारंवार बकबक दाखवणार्या वृत्तवाहिन्यांनी मराठी विचारवंत,साहित्यीक किंवा कार्यकर्ते यांना संपूर्णपणे वाळीत टाकून दिले होते.फक्त अधूनमधून विलासरावांचे वक्तव्य ते दाखवत होते.कारण राजधर्मानुसार दंगली आटोक्यात आणणे त्यांचे कर्तव्य आहे.
हि सर्व एकांगी नौटंकी प्रसारमाध्यमे मुद्दाम चालवत आहेत.कारण ते हिंदी भाषी आहेत आणि सुसंस्कृतपंणा,सखोल शिक्षण आणि प्रसारमाध्यमांचा दीर्घ अनुभव नसलेले छूटभय्ये एकमेकांच्या वशिल्याने घुसलेले असल्याने त्यांच्या आकलेची पातळी ताबडतोब दिसून आली.मराठी प्रसारमाध्यमे,खासकरुन मराठी वाहिन्या आणि दैनिकांतही स्वभाषीक मुद्द्यावर ठामपणे राहण्याऐवजी तळ्यात मळ्यात केले.याचे घातक परिणाम पुढे त्यांनाही भोगावे लागतील.एकदिवस असाही उगवू शकेल की,त्यांच्या वाहिन्या आणि त्यांची वृत्तपत्रे वाचण्यासाठी मुंबईत मराठी वाचकच शिल्लक राहिलेला नसेल.असे दू:स्वप्न कधीही खरे होऊ नये म्हणून मराठी प्रसारमाध्यमांनी एकत्र होऊन उत्तर भारतीय झूंडशाहीविरुद्ध सैद्धांतीक आणि तात्वीक मुद्यांची आघाडी आणि न्यायालयीन लढाया लढण्याची तयारी ठेवली पाहिजे.शिवसेनेला मराठी माणसाला मदत करायची नसेल तरी चालेल,पण मराठी मते घेऊन सत्तारूढ होऊन भैय्याचा जयजयकार करण्याचे पाप तरी करु नये.बाळासाहेब,मराठी माणसाच्या मनाला सहस्त्र इंगळ्या डसतात हो त्यामुळे!
Comments
काय हरकत आहे?
काम तसे असेल तर काय हरकत आहे द्यायला?
आपला
गुंडोपंत
हरकत, नवा क्लॉज
>> काम तसे असेल तर काय हरकत आहे द्यायला?
हरकत काहीच नाही. तुम्ही मुंबईत 'गरजेचे व्हावे' म्हणाला होतात. शिवाय आता 'काम तसे असेल तर' असा क्लॉजही जोडलात.
माझा ४९ वा प्रतिसाद बहुतेक :)
५० प्रतिसांदां नंतर दुसरी चर्चा सुरु करावी
कृपया,
५० प्रतिसांदां नंतर दुसरी चर्चा सुरु करावी. कारण नंतर प्रतिसाद देणे अवघड होते.
त्यामुळे मी ५० च्या वर चर्चा गेली की त्यात सहभागी होण्याचे टाळतो.
आपला
गुंडोपंत
५० प्रतिसाद..
गुंडोपंताना तुम्हाला चर्चेतुन बाजुला काढायचा मस्त उपाय आहे हा :)