आपलाच पण आपणच विसरून गेलेला एक हिंदु भाग - इंडोनेशिया

इंडोनेशियाचा (मला जमेल तसा लिखित) इतिहास

रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया (इंग्रजी: Republic of Indonesia )हा हिंदी महासागरातील १७५०८ बेटांचा समुह आहे. याची लोक संख्या दोन कोटी चौतीस लाख आहे.
या देशाचे इस्ट तिमोर, मलेशिया व पापुआ न्युगिनी हे शेजारी देश आहेत. तसेच भारत(अंदमान निकोबार बेटे) , फिलिपाइंस, ऑस्ट्रेलिया व सिंगापूर हे ही शेजारी देश आहेत.
हा देश साडेतिनशे वर्षे डच अधिपत्या खाली होता. मात्र दुसर्‍या महायुद्धा नंतर इंडोनेशिया स्वतंत्र झाला.
जकार्ता ही देशाची राजधानी आहे. येथील मुख्य भाषा भाषा इंडोनेशिया आहे. या शिवायही येथे अनेक बोली भाषा आहेत जसे भाषा जावा, भाषा बाली, भाषा सुंडा, भाषा मदुरा. येथे कावि नावाची एक प्राचीन भाषा आहे. येथील प्रमुख साहित्यिक ग्रंथ याच भाषेत आहेत. कावि भाषेतील भिन्नेक तुंग्गल इक - विभिन्नतेत एकता - हे या देशाचे घोषवाक्य आहे.
यातील जावा हे बेट सर्वात मोठे असून त्या बेटावरील लोकांचे देशावर प्रभुत्व आहे. इंडोनेशिया मध्ये जगातली एक सर्वात मोठी जैवीक विवीधता आहे.

इतिहास
जीवाष्म अवषेशां वरून काढलेल्या निष्कर्शां नुसार पहिला आदिमानव येथे पाच लाख वर्षांपुवीचा सापडतो. याला जावा (इंग्रजी: जावामॅन) पुरुष म्हणून ओळखले जाते.
असे मानणारा एक प्रवाह आहे की, सुमारे २००० वर्षांपुर्वी येथे पुर्वेकडील देशां मधून म्हणजे तैवान मधून लोक आले व त्यांनी या भागाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कला कौशल्य मिळवले. भारत व चीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला. सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदु तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले.
त्या नंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर (आठवा अर्निको हा येथे पुर्वी आलेला लेख!) व प्रंभनन हे धारमीक शहरे वसवली. मजापहीत हे हिंदु राज घराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो.
प्राचीन राजे, वंश व साम्राज्य

  • श्रीविजय राजवंश
  • शैलेन्द्र राजवंश
  • सञ्जय राजवंश
  • माताराम राजवंश
  • केदिरि राजवंश
  • सिंहश्री
  • मजापहित साम्राज्य

मात्र त्या नंतर मुसलमान व्यापारी व्यापाराच्या उद्देशाने येथे आले हळू हळू जम बसवत त्यांनी सुमात्र बेटावर ठाणे वसवले. येथून इंडोनेशियाच्या मुसलमानीकरणाला सुरवात झाली. सोळाव्या शतका पर्यंत बहुतेक भाग मुसलमान झाले होते.
इ.स. १५२१ मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्य नंतर ब्रिटिश व डच आले. डच लोकांनी डच इस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. इ.स. १८०० मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषीत केले.
दुसर्‍या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्या नंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले. जपानच्या शरणागती नंतर इ.स. १९४५ मध्ये सुकार्नो यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण नेदलँडने आपला अंमल बसवण्याची धडपड सोदली नाही. शेवटी डिसेंबर इ.स. १९४९
मध्य इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.

भारताचा संबंध
या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे.
भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे.
सुमारे पाचशे वर्षांपुर्वी हा देश एक हिंदु देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोक बाटवून मुसलमान करण्यात आले. व हा देश मुसलमान गणला जायला लागला. जाही इंडोनेशियाच्या बाली नावाच्या बेटावर सुमारे ९०% लोक हिंदु आहेत. हिंदु धर्माला येथे आगम हिन्दु धर्म या नावाने ओळखतात. येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत या मंदिरांना चंडी नावाने ओलखले जाते. कारण यातले बहुतेक मंदिरे चंडी देवीच्या उपासनेसाठी स्थापन करण्यात आली होती.

सद्य स्थिती
इ.स. २००४ मध्ये आलेल्या सुनामी लाटा या देशाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस करून गेल्या. येथील आचे नावाचे राज्यात किमान दिड लाख लोक मृत्युमुखी पडले होते.
इंडिया व आशिया यांचा संगम येथे होतो म्हणून इंडोनेशिया यास पुर्वी इंडोचायना असेही म्हणत.
फुटीरतावादी शक्ती येथे कार्यरत आहेत. आचे बंडा हा मुस्लीम भाग स्वतंत्र होण्यासाठी मागणी करतो आहे.
इ.स.१९९८ मधील आर्थीक धक्क्यातून हा देश सावरण्याचा प्रयत्न करतो आहे. या मंदी मध्ये जागतिक बँक यांचा सल्ला घेणे अडचणीचे ठरले होते. मात्र सुनामी लाटा व भुकंपप्रवण क्षेत्र असल्याने अर्थव्यवस्थेवर नैसर्गिक आपत्तींचा ताण आहे.

----------
कृपया
अजून कुणाला या संदर्भात माहिती असेल तर नक्की द्या.
शुद्धलेखनाच्या चुका सांगा किंवा जमल्यास मराठी विकिवर इंडोनेशिया या लेखात दुरुस्त केल्यात तरी चालतील :-)
आपल्या सहकार्या बद्दल आभारी आहे.

-निनाद

Comments

काही अजून

पुढिल आठवणींचा संदर्भ "पूर्वरंग"...पण पुस्तक समोर नसल्याने चु भु द्या घ्या
१) इंडोनेशियन भाषेत पश्चिम दिशेलाच "बारत" म्हणतात
२) इथेही स्त्री ला वनिता म्हटलं जातं
३) मुसलमान देश असला तरी नोटेवर गणपती आहे, शिवाय अगदी मुसलमान घरांच्या दारावरही गणेश कोरलेला आढळतो. मुलांना 'ग्' गणेशाचा शिकवला जातो. (इथे पु.लंचे वाक्य आठवले... 'आपण मात्र धर्मनिरपेक्षतेच्या "भितीने" ग गद्द्याचा करून घेतला आहे :)) " )
४) प्रसिद्ध राजा सुकार्नो (सुकर्ण?) हे नावही तसे संस्कृतोत्भव वाटते. त्यांचीपुत्री मेगावती (मेघावती?) यांचे सध्या शासन आहे (परत चु भु दे घे)

अजून माहिती मिळेल तशी टाकत जाईन

-ऋषिकेश

खरे आहे

इथे पु.लंचे वाक्य आठवले... 'आपण मात्र धर्मनिरपेक्षतेच्या "भितीने" ग गद्द्याचा करून घेतला आहे

अगदी खरे आहे! काय चपखल आठवण आहे आपली!

तो लेख

येथे तो लेख आहे! संपादनात केलीत तर आपले सहर्ष स्वागत आहे!

दिशा

इंडोनेशियन "बहासा " (बहासा हे भाषा???) भाषेत दिशा

पश्चिम = बारात
उत्तर = उतारा
दक्षीण = सलातान
पूर्व = तिमोर

म्हणजे "इस्ट तिमोर" हा देश पिवळं पितांबर :-)

लिपी

भाषा इंडोनेशियाची लिपी मात्र दुर्दैवाने चक्क रोमन आहे!
यांनी आपली प्राचीन लिपी सोडून दिली आहे...

अजून काही

आठवणीतले इंडोनेशियन संस्कृतोद्भव शब्द --

उत्तरा = उत्तर दिशा
बूमी = भूमी
बहासा = भाषा
राजा = राजा

नंदन

मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

बहासा

इंडोनेशियन (बहासा इंडोनेशियन) ही इंडोनेशियाची अधिकृत भाषा आहे. खरंतर ही मलाय भाषेची एक बोली आहे जिला इंडोनेशियन भाषा म्हणून सन १९४५ मध्ये स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. त्याआधीही १९२८ पासून "इंडोनेशियन युवक प्रतिष्ठान"नुसार त्यास अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता.

इंडोनेशिया हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने ४था मोठा देश आहे. आणि या देशातील एकूण लोकसंख्येपैकी सहज बहासा बोलणारी जनता जवळ जवळ १००% आहे. त्यामुळे "बहासा इंडोनेशियन" ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी एक गणली जाते. बरीचशी इंडोनेशियन जनता बहासा इंडोनेशियन बरोबरच इतर स्थानिक बोलीभाषेतही पारंगत असते. मात्र सगळे दस्तऐवज, शिक्षण, पत्रकारिता आणि अधिकृत संभाषणाच्या इतर माध्यमात बहासा इंडोनेशियन हीच भाषा कटाक्षाने वापरण्यात येते. ईस्ट तिमोर या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशातही इंडोनेशियन भाषा ही इंग्रजीबरोबरच दुसरी राष्ट्रभाषा आहे. बर्‍याच जुन्या इंग्रजी दस्तऐवजांमध्ये अजूनही ह्या भाषेचा उल्लेख केवळ "बहासा" असा केलेला आढळेल.

टिपः वरील परिच्छेद विकीवरही चढवले आहे ;)

बरीचशी इंडोनेशियन जनता बहासा इंडोनेशियन बरोबरच इतर स्थानिक बोलीभाषेतही पारंगत असते. मात्र सगळे दस्तऐवज, शिक्षण, पत्रकारिता आणि अधिकृत संभाषणाच्या इतर माध्यमात बहासा इंडोनेशियन हीच भाषा कटाक्षाने वापरण्यात येते.

नाहीतर आपल्याकडे केवळ दुकानाच्या पाट्यांवर मराठी दिसलं पाहिजे म्हटलं तर केवढा आकांडतांडव

-ऋषिकेश

उत्तम

छोटासाच पण उत्तम लेख!!
विकि वर चढवल्या बद्दल धन्यवाद!

पल्लव कवी

इंडोनेशिया मध्ये कवी नावाची भाषाही होती.
काय पण नाव आहे... पण मेली बिचारी भाषा... सरकारने तीची लिपीच लंपास केल्यावर काय होणार?
तशी ही इंडोनेशियातली खरी प्राचीन भाषा असावी.
या देशातले काव्य याच भाषेत लिहिले गेले म्हणे. नावावरून तरी कवी व संस्कृत भाषेचा जवळचा संबंध आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या भाषेची आपली लिपी होती. ही लिपी पल्लव या भाषेवरून तयार झाली होती.
या पल्लव भाषे विषयी कुणाला काही माहीती आहे का हो? शिवाय पल्लाव नि संस्कृतचे काय संबंध होते?

आपला

कवी
गुंडोपंत

माहीतीपूर्ण

माहीतीपूर्ण लेख. इंडोनेशियाबद्दल काही (सांस्कृतिक) माहीती होती पण आपण अजूआ।ई जास्त चांगली एकत्रीत/संपादीत केली आहेत.

वर आलेल्या (लेख आणि प्रतिसादातील) माहीती व्यतिरीक्त अजून काही:

  1. मुसलमान धर्म आणि हिंदू संस्कृती या एकाचवेळी आत्मसात करून नांदू शकणारा एक देश - कदाचीत सुडोसेक्युलर्स आणि बरखा दत्त सारख्या रीपोर्टर्सना अजून तेथे "फंडींग" मिळत नसावे :)
  2. गरूड हे विमानसेवेचे नाव
  3. सुकर्णो ह्या नावाचा इतिहासः त्यांच्या वडीलांना (त्यांचे नावपण हिंदूच आहे, पण आत्ता लक्षात नाही) महाभारतातील कर्ण आवडायचा पण त्यातील दुर्गुण आवडत नसत - त्या मुळे त्यांनी नाव सुकर्णो ठेवले - त्यांच्या मुलीचे नाव "सुकर्णोपुत्री"
  4. देशाचा "नॅशनल हिरो" : - राम (ऐकीव माहीतीप्रमाणे, चुक असल्यास कृपया सांगावे).

एक प्रश्नः (ज्याच्या उत्तरात असा चांगला विरोधाभास कसा असू शकला याचे उत्तर असावे):

इंडोनेशियात मुस्लीम धर्म हा व्यापारांमुळे आला - पण तो आपलासा करावा असे तेथील बहुसंख्यांना वाटले म्हणून तेथे वाढला की तलवारीच्या जोरावर?

माहीतीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!

धर्मांतर...

इंडोनेशियात मुस्लीम धर्म हा व्यापारांमुळे आला - पण तो आपलासा करावा असे तेथील बहुसंख्यांना वाटले म्हणून तेथे वाढला की तलवारीच्या जोरावर?

इंडोनेशिया आणि मलेशियातच नव्हे तर आपल्या कोकण किनारपट्टीवरदेखील मुस्लिम धर्म अरबी व्यापार्‍यांमुळे आला आणि वाढला, तलवारीच्या जोरावर नव्हे.

आता त्यांना स्वधर्म सोडून इस्लाम आपलासा का करावासा वाटला हा संशोधनाचा विषय आहे. परंतु, असे दिसते की, जेव्हा माणसे आपणहून धर्मांतर करतात तेव्हा ते त्यांच्या जुन्या चालीरिती इ. बर्‍याचशा तश्याच ठेवतात. इंडोनेशियातदेखील तेच झाले असावे.

गणपती साजरा करणारे (मुर्ती न आणता) कोकणातील मोडक नावाचे एक मुस्लिम कुटुंब माझ्या परिचयाचे आहे.

अवांतर : कोकणातील कित्येक धर्मांतरीत हे मुळचे ब्राह्मण होते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केरळ

इंडोनेशिया आणि मलेशियातच नव्हे तर आपल्या कोकण किनारपट्टीवरदेखील मुस्लिम धर्म अरबी व्यापार्‍यांमुळे आला आणि वाढला, तलवारीच्या जोरावर नव्हे.

हे केरळबाबत ऐकले होते. कोकणाबद्दल आत्ताच कळले. बाकी हिंदू पूर्वज असलेल्या मुसलमानांच्या दोन पटकन आठवलेल्या गोष्टी:

(अनील थत्ते यांनी एकदा लिहील्याचे आठवते, त्या प्रमाणे): अंतुले ह्यांचे मूळ आडनाव करंदीकर असे होते. पण कुठल्या एका अनंत करंदीकर नामक पूर्वजाने मुस्लीम मुलीशी विवाह केला तेंव्हा त्याने मुस्लीम धर्म स्विकारला. तेंव्हा त्याला तत्कालीन हिंदूनी लांब केले पण मुलांना मात्र "अंतूची मुले" ("अंतुले") म्ह्णून ओळखू लागले.

दुसरे उदाहरण ऐकलेले: फारूख अब्दुल्ला जेंव्हा प्रथम मुख्यमंत्री झाले तेंव्हा वैष्णवीदेवीच्या दर्शनास (नवस फेडायला) गेले. पुजार्‍याने असे कसे काय विचारल्यावर त्यांनी स्वतःची वंशावळ काढून कधी हिंदू होते ते दाखवले.

बाकी जेंव्हा स्वेच्छेने कोणी धर्मांतर केलेले असते तेंव्हा "बाटगे जास्त कडवे आणि कोडगे असतात" (Converts are more Catholic than Pope) ही म्हण लागू होत नाही असे वाटते. असेच (चांगले) अनुभव काही भारतीय ख्रिश्च्न लोकांचेपण आलेले आहेत.

केरळची चूक

आता नक्की नाव आठवत नाही पण केरळच्या राज्याने राजादेशानेच १/३ लोकांना मुसलमान व्हायला लावले अन एक रात्रीत केरळ मधील मुस्लीम लोकसंख्या २% वरून १/३ झाली. तत्कालीन हिंदू पंडितांनी त्या राजाच्या आरमाराला विरोध केला होता. कारण काय तर म्हणे समुद्र ओलांडल्याने धर्म बुडेल. राजानेही काय आक्कल लढवली... धर्मच सोडला तर बुडेल कैसा?

आपला,
(चकित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

करंदीकर की लेले : अती अवांतर

अंतुले ह्यांचे मूळ आडनाव करंदीकर असे होते

मी ऐकले आहे की, त्यांचे नाव अंतू लेले असे होते. पुढे "लेले धर्माला" जागून त्यांनी आपल्या आडनावचे नॉर्मलायझेशन करून आपले नाव अंतुले असे केले!!!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

करंदीकर - लेले

मला लेले ऐकल्याचे आठवत नाही. तसेही असेल कदाचीत. खरे खोटे एक तो अंतू आंणि दुसरे हे अंतुलेच जाणे...

मला

इंडोनेशियात मुस्लीम धर्म हा व्यापारांमुळे आला - पण तो आपलासा करावा असे तेथील बहुसंख्यांना वाटले म्हणून तेथे वाढला की तलवारीच्या जोरावर?

मला मिळालेल्या माहितीनुसार बरेचदा 'इतर मुसलमान' इंडोनेशियन मुसलमानांना आपले समजत नाहीत. याचे कारण म्हणजे हे लोक मुर्ती पुजा करतात व सर्व आचार हिंदु धर्मा प्रमाणेच करतात. त्यामुळे मुस्लीम नावे असली तरी लोक तसे हिंदुच आहेत. सुमात्राच्या बाजूचे सुलतानाच्या जवळपासचे जरा मुस्लीम आहेत इतकेच. (ही एका इंडोनेशियन माणसाने दिलेली माहीती आहे.)

चांगला लेख

इतिहास, भारताशी संबंध, सद्यस्थिती अशी मांडणी आवडली.
राधिका

धन्यवाद!

मांडणी आवडल्याचे आवर्जून कळवल्या बद्दल धन्यवाद!

रामायणातील उल्लेख

यातील जावा हे बेट सर्वात मोठे असून त्या बेटावरील लोकांचे देशावर प्रभुत्व आहे

रामायणात किष्किंधाकांडात पूर्वेकडील यवद्विपाचा उल्लेख येतो. हेच जावा बेट असे सांगितले जाते.

यत्नवन्तो यव द्वीपम् सप्त राज्य उपशोभितम् ।
सुवर्ण रूप्यकम् द्वीपम् सुवर्ण आकर मण्डितम् ॥ ४-४०-३०

वर संस्कृतभाषेवर अन्याय झाला असल्यास क्षमस्व. तज्ज्ञांनी सुधारणा करावी.

श्लोकात यव आणि त्याच्या आसपासच्या सात राज्यांचा (बेटांचा) उल्लेख येतो. श्रीविजय या जुन्या राजघराण्याबद्दल मध्यंतरी वाचन केले होते... आता संदर्भ तपासायला हवेत. (थोडक्यात थोडा विसर पडला आहे. :))

बाली या बेटाचे मूळ नाव वालीद्विप असे होते, हे बालीतील काही कोरीव शिलालेखातून कळते.

असो. लेख आवडला.

इंडोनेशियातील काही मूळ नावे नंतर साफ बदलली गेली, एक उदा. जकार्ता

जकार्ताचे पूर्वीचे नाव सुंदकल्प, दुसर्‍या महायुद्धात जपान्यांनी बदलून जकार्ता केले.

विकि

ही माहिती महत्वाची आहे. या श्लोकासहीत
कृपया आपण ही माहीती विकिवर याच लेखात टाकाल का?

धुमे, बाली इ.

सदानंद धुमे हे '९० च्या दशकात व (मला आठवते त्यानुसार गेली तीन वर्षेपर्यंत) अनेक वर्षे फीर('फार इस्टर्न एकॉनॉमिकल रेव्यू') ह्या अत्यंत दर्जेदार मासिकाचे जकार्तामधील वार्ताहर होते. तेव्हाचे त्यांचे लेख म्हणजे तेथील सामाजिक व राजकिय परिस्थितीचे अत्यंत उत्कृष्ट आलेख असत. ह्या दुवावर त्यांचे काही ह्याबद्दलचे लेख दिलेले आहेत त्यावरून कल्पना यावी.

मेगावती सुकार्नोपुत्री २००४ सालापर्यंत इंडोनेशियाच्या राष्ट्रपतिपदावर होत्या. त्यांची कारकीर्द तशी अल्प व सामान्य ठरली. २००४ सालापासून डॉ. सुसिलो युधोयोनो हे तेथील राष्ट्रपति आहेत.

बालीत हिंदू बहुसंख्य आहेत. गेली अनेक वर्षे बाली हे आग्नेय आशियामधील टूरिझमचे एक प्रमुख ठिकाण आहे. टूरिझम हा तेथील प्रमुख व्यवसाय आहे. ह्या निमित्ताने तेथे दररोज रामलीलाचे खेळ दाखवले जातात. भेटल्यावर दोन्ही हात नीट जोडून 'नमस्कार' करण्याची तेथे प्रथा आहे.

वा

वा छोटासाच माहीतीचा तुकडा आवडला.
आपण विकि लेख काहात का हे माहीत नाही नसल्यास नक्की व्हा.
असल्यास हे तेथेही जोडून द्याल का?

कंबोडिया, थायलंड, ब्रम्हदेश

वा निनादराव! चांगला उपक्रम हाती घेतलात. दोन महिन्यापूर्वी एका इतिहास संशोधकाची भेट झाली होती. त्यांनी बर्‍याच शिलालेखांचा, मंदिरांचा, चालीरितींचा अभ्यास करुन व इतर संशोधकांना भेटून इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, ब्रम्हदेश व आजूबाजूच्या प्रदेशाचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते ज्याप्रकारे आशोकाने भारतात बौद्ध धर्माची सक्ती केली त्याप्रमाणेच इंडोनेशियातील राजांनी सुद्धा मुसलमान धर्माला राजाश्रय देऊन सक्ती केली. त्यांचे एक वाक्य असे होते, "भारत अन इंडोनेशियाच्या मध्ययुगीन इतिहासात एकच घटना अशी घडली ज्यामुळे या दोन देशांची एकमेकांसारखी संस्कृती असूनही त्यानंतर ते दोन्ही देश वेगवेगळ्या सांस्कृतीचे वारसदार ठरले. भारतात शिवाजी झाला अन इंडोनेशियाला ते भाग्य मिळाले नाही."

आता कंबोडिया, थायलंड, ब्रम्हदेश यांचेही लेख येऊ द्यात.

आपला,
(शिवभक्त) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रयत्न

नक्कीच प्रयत्न करेन.
एका देशावरील लेख आधी आहेच. उर्वरीत करण्याचा प्रयत्न राहीलच. जसे कमेल तसे. आपल्या प्रोत्साहना बद्दल धन्यवाद. आपले असे करणे आवडले.
लिखाणाचा हुरुप वाढला.

चांगली माहिती

लेखनाच्या जोडीला नकाशा पण हवा. गूगल -अर्थवरून केलेला इंडोनेशियाचा नकाशा देत आहे. यात भारताची आणि इतर देशांची भौगोलिक रचना दिसून येईल.

Indonesia

अगदी

अगदी माझ्या मनातले केलेत चित्राताई.
धन्यवाद. आपला प्रतिसाद छोटाच पण महत्वपूर्ण आहे!

लेखन

अनेक सदस्यांनी या लेखाला महत्वाचे ठरतील असे माहितीचे तुकडे येथे दिले आहेत. बहुतेकांना मी त्यांनी ते तुकडे विकि वर चढवावेत म्हणून विनंती केली आहे. ऋषीकेश ने तर विकि लिखाणाला प्रारंभही केला आहे.
मी तशी विनंती केली कारण ही माहीती त्या त्या सदस्याची आहे. ती तशीच उचलून विकिवर टाकणे मला योग्य वाटले नाही.
मात्र त्याच वेळी जर सदस्यांना काही कारणाने विकि लेखन शक्य नसेल,
आणि सदस्य; ही माहीती मला विकिवर टंकण्यास परवानगी देत असल्यास, मी ती टंकेन.

कृपया तसे कळवा.

आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आभाले आभार मानावे तितके कमीच आहेत.
(मला खरंच अपेक्षा नव्हती इतके येतील अशी...:) )

चांगला लेख.

लेख चांगला आहे आणि मनाला अंतर्मुख करणारा वाटला.

भारताने आपले एक खास विभाग ( स्वतंत्र मंत्री) निर्माण करावा आणि अश्या वेगवेगळ्या देशामध्ये सामंजंस्य आणि सौहार्द होईल याचा प्रयत्न करावा.

 
^ वर